मांत्रिक

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
30 Nov 2015 - 7:45 pm

कवठी गरगर फिरत होती. टेबलावरच्या ठोकळ्यासारखी. मांत्रिक तिचा वापर ठोकळ्यासारखाच करत होता. पिंपळाच्या झाडाखाली खरच एक टेबल होता. खुर्चीवर खरंच एक मांत्रिक बसला होता. आणि हातातली कवठी खरंच गरगर फिरवत होता. दुसऱ्या हातात पेन घेऊन समोरच्या जाडजुड पुस्तकात अगम्य रेघोट्या मारत होता. बराच वेळ त्याला पडलेले कोडे सुटत नव्हते.

अचानक समोरच्या वाड्यात एक भयचकीत किंकाळी घुमली. दुसऱ्या मजल्यावरच्या कोपऱ्यातल्या खोलीचा दिवाही लागला. हातात त्रिशूळ घेऊन मांत्रिक ऊठला. आणि सावध एकएक पाऊल टाकत वाड्याकडे चालला. गर्द अधारात त्याला काहीही दिसेना. वाड्याच्या आजुबाजूला घनदाट जंगल होते. रातकीडे किर्रर करत होते. अंदाजानेच एकएक पाऊल पुढे टाकत मांत्रिक वरच्या मजल्यावर पोहोचला. कोपऱ्यातल्या खोलीच्या दिशेने भितभीत चालू लागला. जेव्हा तो खोलीसमोर आला तेव्हा दार करकरत ऊघडले गेले. पांढरी साडी नेसलेली एक बाई थरथर कापत कोपऱ्यात बसली होती. केस मोकळे सोडून जमीनीकडे पहात होती. घाबरतच मांत्रिक आत गेला. आणि तिच्या समोरच्या भिंतीला टेकून खाली बसला. त्याने खोलीभर एक नजर फिरवली. तिथे दुसऱ्या कुणाचाही मागमुस नव्हता. मग त्या बाईचे निरीक्षण करत तसाच बसुन राहिला. कितीतरी वेळ. एक अनाम शांतता खोलीभर भरुन राहिली.

"आलास?" या एक शब्दाने शांतता शेवटी भंग पावली. मांत्रिक क्षणभर हडबडला. मग सावरुन घेत कसाबसा बोलला,
"हे ब..ब..बाई, तू क...क..कोण आहेस? आणि ईथं अशी का ब..ब..बसलीयस?"

"काळडोहातल्या निरब्ध शांतरसाचा स्वाद कधी चाखला आहेस का? सगुणांचे निरव हाकारे ऐकुण जीव विटाळुन गेला" अत्यंत गंभीर सुरमय आवाज त्या खोली घुमला.
"म..म..मला नीट समजत नाहीये, त...त...तुला काय म्हणायचेय ते, जरा व...व...व...व्यवस्थित सांगशील का काय ते?" मांत्रिक अजुन तंतरलेलाच होता. धीर एकवटुन कसाबसा संवाद करत होता.

"अतृप्तांच्या जगात वासनांचे वाभाडे, सोकावला काळ मोडशील काय? हरीत श्वापदं घिरट्या घाली, अविचल तरंग निथळशील काय? काय करतोयस ईथे?"
"हा वाडा भुताने झपाटलाय, त्याचाच शोध घेतोय" शेवटचा प्रश्न स्वतःला समजुन मांत्रिकाने एका दमात खुलासा केला.

"मुर्ख. मुर्ख आहेस तू. समोर बसलेली हडळ तुला दिसत नाही काय?"
"क..क..काय मला तर काही द..द..दिसत नाही" ईकडं तिकडं बघून मांत्रिक आत्मविश्वासानं बोलला . हातातलं त्रिशूळ चापचुन तयारीत बसला.

त्या स्त्रीच्या भेसूर हसण्याच्या कर्णकिंकाळ्या वाडाभर पसरल्या. केसांना हिसडा देऊन तिनं त्याच्याकडं रागानं बघितलं. तिच्या चेहऱ्यावर डोळेच नव्हते.
"त्..त्..त्..त्..तुच आहेस तर ती हडळ" बसल्या जागी मांत्रिक थिजुन गेला. पुढे काय होईल या भितीने त्याला दरदरुन घाम फुटला.

"घाबरु नकोस, तुझ्यासारख्या मुर्ख मांत्रिकाला नेऊन मी माझं हसं करुन घेणार नाही, मी विद्वानाच्या शोधात आहे, तू निघ आता" असं म्हणून ती स्त्री अंतर्धान पावली.

मांत्रिकाला झाल्या प्रकारावर विश्वास बसेना. झपाझप पावले टाकत तो वाड्याबाहेर आला.अन पिंपळाच्या झाडाखाली येऊन खुर्चीवर बसला. एका हाताने कवठी गरगर फिरवली. टेबलावरच्या ठोकळ्यासारखी. अन दुसऱ्या हातात पेन घेऊन समोरच्या पुस्तकात त्याने अगम्य रेघोट्या मारणे सुरु केले. त्या पांढऱ्या साडीतल्या स्त्रीने आपल्याला सोबत का नेले नाही याचे कोडे त्याला काही केल्या सुटेना.

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

मम्बाजी सर्वज्ञ's picture

30 Nov 2015 - 7:47 pm | मम्बाजी सर्वज्ञ

वातावरण निर्मिती झकास पण.....अपूर्ण वाटली.
कवठी कि कवटी?

जव्हेरगंज's picture

30 Nov 2015 - 7:55 pm | जव्हेरगंज

अरे हो, कवटी पाहिजे.
धन्यवाद हो!!

जेपी's picture

30 Nov 2015 - 7:52 pm | जेपी

हम्म..

नै जम्या. त्या बाईंचं बोलणं कृत्रिम वाटलं. यापेक्षा मुपीवरच्या एक प्रसिद्ध बाई मस्त प्रतिसाद देतात.

जव्हेरगंज's picture

30 Nov 2015 - 9:41 pm | जव्हेरगंज

ओक्के!मुपीला भेट द्यायला हवी!

मम्बाजी सर्वज्ञ's picture

30 Nov 2015 - 9:55 pm | मम्बाजी सर्वज्ञ

मुपी चा दर्जा खालावलाय. दहातोंडे, ब्रम्हे, पोपा म्याडम, सप्तर्षी काकू, सगळे कुठे गायब झालेत कुणास ठावूक. चैन पडत नाही आजकाल.....सकाळ बघावासा सुधा वाटत नाही.

बाबा योगिराज's picture

1 Dec 2015 - 12:18 am | बाबा योगिराज

काय झाल?
कै तरी कमी पलड़ै आज. म्हैत नै काय, पण जव्हेर भौ आज मजा नै आली.
तरीही पुलेशु. वाट बघतोय.

क्रमशः बाकी आहे का???

शिव कन्या's picture

3 Dec 2015 - 6:51 pm | शिव कन्या

:) :) मला वाटले मांत्रिक भौ हिरो हैत का काय कथेचे!!!!
बाकी आदुबाळ आणि मंबाजी यांच्याशी सहमत.

जव्हेरगंज's picture

3 Dec 2015 - 7:24 pm | जव्हेरगंज

तडका! तडका मारायचा विसरलो या कथेला! असो!

स्पा's picture

3 Dec 2015 - 7:58 pm | स्पा

मजा नाय,

हेमंत लाटकर's picture

3 Dec 2015 - 10:48 pm | हेमंत लाटकर

मलाही तेच वाटले मांत्रिक भाऊ विषयी काही लिहले का?

उगा काहितरीच's picture

5 Dec 2015 - 10:27 am | उगा काहितरीच

हेच लिहायला आलो होतो. रच्याकने जव्हेरगंज भौ , वातावरण निर्मिती झक्कास पण अजून फुलवता आली असती.
-

जव्हेरगंज's picture

5 Dec 2015 - 11:39 am | जव्हेरगंज

नोटेड!

पीशिम्पी's picture

4 Dec 2015 - 10:28 pm | पीशिम्पी

हे मु पी काय आहे?

काय????? तुम्हाला मुक्तपीठ माहीत नाही??

धाकलं पाटील's picture

5 Dec 2015 - 10:07 pm | धाकलं पाटील

अगदी थर्डक्लास लेखन आहे.
लेखकाला थोडी तरी सुबुद्धी मिळावी ही प्रार्थना...
एकदम भंगार लेखन...
अगदी पॅथेटीक लेखक आहे...

एक एकटा एकटाच's picture

5 Dec 2015 - 10:14 pm | एक एकटा एकटाच

ही कथा थोडी बिघडलीय एव्हढचं

पण जव्हेरगंज ह्यांच्या इतर कथा खरच दमदार आहेत.

होत असं कधी कधी.....

सचिनचीही बेटिंग कधी कधी होत नाही चांगली.

मला खात्री आहे की

जव्हेरगंज

पुन्हा come back करतील

मांत्रिक's picture

5 Dec 2015 - 10:26 pm | मांत्रिक

दमदार कथा???
साहेब? शुद्धीवर आहात?

एक एकटा एकटाच's picture

5 Dec 2015 - 11:15 pm | एक एकटा एकटाच

शनिवारी रात्री
आणि
शुध्दित??????

तुम्ही फ़ारच विनोदी बुआ

दमदार ह्या अर्थाने की
त्यांच्या काही काही कथा चांगल्या आहेत

शिंदळ
काहुर
एक होती म्हातारी
भुईक

वेगळा विषय आणि एका विशिष्ट भाषेवरची पकड

काहीतरी वेगळ वाचायला मिळते.

बाकी काही नाही

आपल्याला काय?

काहीतरी चांगल वाचायला मिळाल की बास......

बाय द वे तुमचा
इशकजादे पार्ट ४ ची वाट पहातोय

चांदणे संदीप's picture

5 Dec 2015 - 10:25 pm | चांदणे संदीप

अगदी थर्डक्लास प्रतिसाद आहे.
प्रतिसादकर्त्याला थोडी तरी सुबुद्धी मिळावी ही प्रार्थना...
एकदम भंगार प्रतिसाद...
अगदी पॅथेटीक प्रतिसादकर्ता आहे...

तुमच्या कथांसारखा पॅथेटिक? का हो दवणीय लेखक?

चांदणे संदीप's picture

5 Dec 2015 - 10:38 pm | चांदणे संदीप

तुमच्याकडून अशा प्रतिसादाची अपेक्षा नव्हती!
असो....

मांत्रिक's picture

5 Dec 2015 - 10:43 pm | मांत्रिक

तुमच्याकडुन पण इतक्या चीप, भंगार, थर्ड क्लास आवडीची अपेक्षा नव्हती...
भले लेखकाला असो.

चांदणे संदीप's picture

5 Dec 2015 - 11:02 pm | चांदणे संदीप

मांत्रिकभाऊ कुणाला काय आवडावं हे आपण ठरवू नये. आपल्याला जे आवडत नाही ते दुस-यांना आवडू शकत आणि त्याला नाव ठेवण्याचा आपल्याला काय आधिकार?

दवणीय वगैरे म्हणून आपली मानसिकता दाखवून दिलीत याबद्दल धन्यवाद!

या इथे आधीच जव्हेरगंजविरोधी आघाडी उघडलेली स्पष्टच दिसतीये. चांगल्या लेखक/कवि यांना असे इथे कुणी विनाकारण टार्गेट करत असेल तर मी शांतपणे पाहत नाही बसू शकणार!! मी अशा ग्रूपबाजी/प्रवृत्ती विरोधात पहिल्यापासून आहे आणि राहणार! याआधीही त्या डॉ. अहिररावांच्या कवितेवरती एका "भैड्या" नामक आयडीने बिनडोक प्रतिसाद लिहिला होता तेव्हा अतिशय संताप झाला होता माझा! अरे, व्हाट द फ*!! कुणीही उठाव आणि काहीही लिहाव! त्याच्या खरडवहीत जाऊन सुनावून आलो त्याला!

पन्नास फालतू धागे - काथ्याकूट - चर्चा वगैरे लोक काढतात तिथे तुम्ही जाता का हो त्या-त्या धागाकर्त्याला सुनवायला?? आणि निरूपद्रवी लेखक - लेखांविषयी कसला आकस बाळगताय??

मांत्रिक, मिपाच्याच भाषेत सांगतो - वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

Sandy

मांत्रिक's picture

5 Dec 2015 - 11:03 pm | मांत्रिक

शुभेच्छा भंगारलेखन आवडु!!!

मांत्रिक's picture

5 Dec 2015 - 11:07 pm | मांत्रिक

उद्या संदीप चांदणे नावावर कै पण बकवास लिहिलं तर पिसळु नका. मग दुसर्याला शिकवा शाणपण!!!! ओक्कै!!!

चांदणे संदीप's picture

5 Dec 2015 - 11:30 pm | चांदणे संदीप

हे म्हणजे शीला/मुन्नी गाण्यांमुळे बदनामी होतीय म्हणून त्या गीतकाराला कोर्टात खेचण्यासारखेच आहे!

असला "टुकार" आयडी घ्यायच्याआधी या शक्यतेचा विचार केला नव्हता का मग??

उद्या मांत्रिक हे नाव एखाद्या कथानायकाला देऊन जबरदस्त अशी कथा लिहिली तर काय गावजेवण घालणार काय मग??

आणि राहिला प्रश्न माझ्या नावाचा आयडी घेऊन कै पण बकवास लिहिल तर निश्चीतच तुमच्यासारखा मी पिसाळणार नाही! कारण आयडी म्हणजे मी नव्हे, इतक समजण्यासाठी मला कुठल्या गुरूची आवश्यकता पडणार नाही! :)

आणखी डाऊट असतील तर या परत... मी इथेच आहे! :)

वादात न पडणारा, आणि पडला तर पुरून उरणारा! ;-)
Sandy

आयला तुमचा आयडी काय कमी टुकार आहे का? संदीप चांदणे म्हणे? काय भिकार आयडि आहे. आणि तुम्ही कुणाला पुरणार?
http://www.misalpav.com/user/2138

इथेच तर तुमची फॅ फॅ उडली होती. तेव्हां असले भंगार डायलाॅग मारु नयेत

चांदणे संदीप's picture

5 Dec 2015 - 11:48 pm | चांदणे संदीप

गैरसमज आहे तुमचा!

जुन्या जाणत्या आयडीचा/लेखकाचा प्रतिवाद करून अपमान करायचा नव्हता शिवाय प्रा. डॉ. बिरूटे सरांचा मौलिक सल्लाही तिथेच आलेला की अशा प्रतिसादकांकडे दुर्लक्ष करा म्हणून! त्याचाही मान राखला कारण, असे करणे/वागणे मला जमते. नुसतं देवादिकांकवर लिहून किंवा कसले कसले आयडी घेऊन हे जमेलच असे नाही! तस्मात्, मोठे व्हा! पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

Sandy

मांत्रिक's picture

6 Dec 2015 - 12:03 am | मांत्रिक

ओ साहेब. मी बंद करतोय मिपावर लिहिणं. चिडु नका राव. तुम्ही चालू ठेवा लिहीणं. माझं काय म्हणणं नाही. आमचा पास दिला की राव. तरी पण का उड्या मारताय? विषय सोडायले शिका की राव.
जव्हेरभौनं पण विषय सोडला की! मग तुम्हीच काहून उड्या मारायले?

असो. रागवू नका. आमी या क्षणापासून बंद इथं लिहिणं. आता चला, पुढे वाटेल ते लिहा. आम्ही चाललो आमच्या गावा.

चांदणे संदीप's picture

5 Dec 2015 - 11:07 pm | चांदणे संदीप

वेळ जात नाहिये का??

मांत्रिक's picture

5 Dec 2015 - 11:26 pm | मांत्रिक

http://www.misalpav.com/user/2138
चांदणे साहेब. इथुन पुढचे प्रतिसाद वाचा. कसं वाटलं तुम्हाला ते आठवा. मग दुसर्याला हसा.
तुम्ही, मी व जव्हेरगंज तिघेपण मिपावर नवे लेखक. पण हे भान त्या जव्हेरगंजला नाहीये. मी त्याला काहीही त्रास दिलेला नसताना तो हे असं मुर्खासारखं वागतोय. असो. लिही म्हणावं एकटा मिपावर. आम्ही बंद करतोय. नो प्राॅब्लेम.

चांदणे संदीप's picture

5 Dec 2015 - 11:50 pm | चांदणे संदीप

B-bye!

मांत्रिक's picture

5 Dec 2015 - 11:55 pm | मांत्रिक

ओ साहेब. अहो खाली जव्हेरचा प्रतिसाद वाचा. त्यानं सोडलाय विषय. तुम्हीही सोडा. त्याच्यासारखं मोठं मन ठेवा. भांडणं होतच रहातात हो. त्यातून बाहेर पडणं हा खरा मोठेपणा.

धाकलं पाटील's picture

5 Dec 2015 - 10:41 pm | धाकलं पाटील

याचं विडंबन येतंय!!!

टवाळ कार्टा's picture

5 Dec 2015 - 10:43 pm | टवाळ कार्टा

इतक्या लौकर आलासपण ;)

जव्हेरगंज's picture

5 Dec 2015 - 11:34 pm | जव्हेरगंज

@मांत्रिकभाऊ,
तुमचा आयडी हॅक झाला की काय?

एक खुलासा: कथेतला मांत्रिक आणि मिपाकर मांत्रिक यांच्यामध्ये कसलाही संबंध नाही.

तरीही तुम्हाला काही आक्षेप असेल तर जरुर सांगा, नाव बदलून घेतो.
तुमच्याविषयी आदर आहेच. कृपया गैरसमज नको.

धन्यवाद. काय समजायचं ते समजलो. इथे बंद करतोय लिहीणं. तुम्हाला व संदीपला शुभेच्छा.
रागारागात काही बोललो असेन तर क्षमा करा. माझ्या मनात आता राग नाही. कारण जे बोलून मन मोकळं करायचंय ते केलंय. यापुढे मनात राग नाही नक्कीच.

मांत्रिक's picture

5 Dec 2015 - 11:39 pm | मांत्रिक

संदीप चांदणे व जव्हेरगं?, मी कायम एक लेखक म्हणून तुमचा आदर केलाय. तुमचं लेखन वाचून आवर्जून प्रतिसाद दिलेत. पण तुम्ही हे लक्षात न घेता माझा अवमान करत आहात निष्कारण. ठीक आहे. मी मिपावर पूर्ण बंद करतोय लिहिणं. तुम्ही चालू ठेवा. भांडणं लावणारांचं मनोरंजन. तुम्ही गैरसमज करताय, मला त्रास देताय एवढंच बोलतो.

चांदणे संदीप's picture

6 Dec 2015 - 12:03 am | चांदणे संदीप

उल्टा चोर कोतवाल को डाटे! - यालाच म्हणत असावेत काय?
मांत्रिक, ही जातो वगैरेची भाषा काढून, काय ओकायची ती गरळ ओकून - माझ्या मनात काही राग नाही वगैरे म्हणणे हास्यास्पद आहे! :)

एकदा वरती स्क्रोल करून "दवणीय" म्हणून आणि माझ्या आवडीनिवडींवर टिका-टिप्पणी कोणी केली ते बघून घ्या आणि मग आम्हांला बोला!

तुमच्या अवधूतवर मी दिलेली प्रतिक्रिया आणि व्यनितून कळवलेला निरोप यातून तरी माझ्यावर असे व्यक्तिगत, कुजकट हल्ले मला अपेक्षित नव्हते!

धन्यवाद,
Sandy

मांत्रिक's picture

6 Dec 2015 - 12:06 am | मांत्रिक

http://www.misalpav.com/comment/780259#comment-780259
हे वाचा आता. आणि कळत नसेल तर जुलाबाच्या गोळ्या खा!!! पण आता बास करा भंपकपणा.
बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना....