आत घुसलो की आधीच ३-४जण असायचे...

Anonymous's picture
Anonymous in जनातलं, मनातलं
18 Nov 2015 - 1:43 pm

आत घुसलो की आधीच ३-४जण असायचे...

कधी रीकामं पाहिलच नाही, त्यात मध्येच १जण असा यायचा जो नंबर लाउन गेलेला असायचा, अजुन चीडचीड, असो, जुनी गाणी ठीक लागली/लावली तर ठीक, पण ९०ची कुमार शानू हिट्स लागले/लावले की माझं डोकं फीरायचं/फीरतं! मग वेळ जायचा पोस्टर्स पाहण्यात, वेगवेगळ्या फालतू चेहर्यांचा मस्तकावरचे विविध ढंगाच्या चित्रविचित्र केश-रंजना, बापरे विचारू नका, असले आउट ऑफ़ घीस वर्ल्ड वाले कट्स! त्यांकडे बघुन झालं की मग निरनीराळ्या तेलाच्या, क्रीमांच्या... बाटल्या! तिथून नजर जायची, अरश्याकडे... ते अरश्यासमोर आरसा आणि त्यातले इंफीनाइट प्रतिबिंब... १० तुम्ही आणि बाकीचे १०... डोळे आणि डोकं गरगरायचया आत मी दुसरीकडे बघणार तर कोणीतरी काखेचा खजाना दाखवत डोके वर करुन उभा... मग ते बघुन न बघितल्या सारखं करत 'माझा नंबर कधी येणार!?' ह्याची खात्री करण्यासाठी विचारायचं... की तो बोलणार 'बसा की निवांत काय घाई!?' इतक्या आरामत ते केस कापणं चालू असतं काही विचारू नका... जसं काही हां त्याच्या आयुष्यातला शेवटचा 'कष्टम्बर' आहे!

असो... माझी वेळ आली बसायची की, ठरल्याप्रमाणे मी संगायचो, मागे स्लोप, लाइन नको... बाकी मिडियम, मग मान वर खली अड्जस्ट वगैरे करून, अंगावर ते काळं नीळं कपड़ं पांघरून, जी काही स्टीरियो कचकच सुरु व्हायची, माझे डोळे बंद, अजुबाजुला काय घडतय ह्याचा विसर पडायचा, पण तो कुमार शानू डब्डं(शौचालयातलं) घेऊन अखंड गायचा (गायचा!?) ह्याचा अतीप्रचंड त्रास होऊन मी 'त्याला वाइट वाटू दे' ह्या पातळी वर येऊन गाणं बदलवायला भाग पाडायचो! आणि ह्या सर्व प्रसंगात बाजुचा माणूस केस कापून घेत असताना घोरतांना पाहिलय मी, बाकीचे इकडे बघ तिकडे बघ, सगळी कड़े बघुन झालं की मग स्वतःकड़े बघ! मग तो उस्तरा घेऊन यायचा. ब्लेड चेंज, मग कानावरचे केस उडवत आणि कल्ले तोडत अखेरचा टप्पा, मालिश, कट काट कूट, डोळे तीरळे, एक पंखा दसऱ्यात घुसल्याचा जादूप्रयोग व्हायचा, महाभारतातला तो खुप अवतरांमधला सीन दीसायचा (कारण पंख्याच्या खालेच्याच् बाजूला होती ती फ्रेम)

ते सुखदायक रणांगण सोडून त्या सिंहासनावरून रजा घेताना जड़ अतःकरणाने हा जीव बाहेरच्या जगात पाउल टाकायचा, तो कुमार शानू सोडला तर बैस्ट होता आमचा 'बार्बर'

 आत घुसलो की आधीच ३-४जण असायचे...

#सशुश्रीके

राहणीलेख

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2015 - 2:07 pm | टवाळ कार्टा

नाव वाचून बसणे या क्रियापदाशी संबंध असणार्या जागांबद्दल काहीतरी लिहिले आहे असे वाटून गेले =))

पगला गजोधर's picture

18 Nov 2015 - 3:33 pm | पगला गजोधर

शीर्षक वाचून, मला वाटलेले की, एखाद्या पांडवाची काहीतरीकथा आहे का कांय, असे वाटून गेले =))

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2015 - 3:50 pm | टवाळ कार्टा

bomb

बबन ताम्बे's picture

18 Nov 2015 - 7:27 pm | बबन ताम्बे

:-)

गामा पैलवान's picture

19 Nov 2015 - 1:05 pm | गामा पैलवान

पगला गाजोधर,

तुमच्याकडून सूचित होणारी पांडवांवर आणि विशेषत: द्रौपदीवरची कंबरेखालील शेरेबाजी आवडली नाही.

आ.न.,
-गा.पै.

टीप : हवेच असतील तर देशद्रोह्यांवर हवे तेव्हढे क.खा.वि. करा.

दिपक.कुवेत's picture

18 Nov 2015 - 2:42 pm | दिपक.कुवेत

बाय द वे तुमचा रेफरेन्स देउन केस कापण्यात डिसकाउंट मिळेल का?? आणि "बैस्ट होता आमचा 'बार्बर'" होता म्हणजे?? त्याच्या स्मरणार्थ हा लेख आहे का??

नाखु's picture

18 Nov 2015 - 2:53 pm | नाखु

तुमच्याकडे (यांची)जुनी उधारी मागीतली जाऊ शकते !!!

तेव्हा सावध ऐक पुढल्या हाका !!

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2015 - 3:21 pm | टवाळ कार्टा

हे तुम्हाला कसे म्हैत =))

नाखु's picture

18 Nov 2015 - 3:30 pm | नाखु

उगाच नवीन गिर्हाइक का पाठवतील नाभीका कडे ( जाहीर धागा टंकून) झैरात टक्या झैरात.

सगळ्या एमेलेम पसून सावध असलेला नाखु

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2015 - 3:50 pm | टवाळ कार्टा

खिक्क

मांत्रिक's picture

18 Nov 2015 - 4:15 pm | मांत्रिक

कुथे असा शब्द लिहू नका हो भाऊ. फार काहीतरी विचित्र वाटतं.
kuThe असं टाईप करा, मग कुठे असा दिसेल तो शब्द. टी हा कॅपिटलच टाईप करा.

चित्रगुप्त's picture

18 Nov 2015 - 3:35 pm | चित्रगुप्त

मला दर वेळेला वेगवेगळी न्हावगंडाची दुकानं हुडकावी लागतात, कारण दुकानात शिरल्यावर जमिनीवरले केसांचे ढिगारे मी आधी स्वच्छ करायला सांगतो, तुम्हाला करायचे नसतील तर मला केरसुणी द्या, मी ते करतो असेही म्हणतो पण त्यांचा झाडूवाला पोरगा दिवसातून एकदा जेंव्हा येणार तेंव्हाच सफाई होणार (वा झालेली) असते. दुसरे म्हणजे कर्णकटु आवाजात बोबलणारा रेडियो बंद करायला मी सांगतो, तेही त्यांना करायचे नसते. अलिकडे ही दुकाने वातानुकूलित असतात, त्यात जीव गुदमरतो. नापितकर्माचे शेवटी ब्रश वा टॉवेल माझ्या चेहर्‍याला लावायचा नाही हे आधीच सांगूनही ते विसरतात... कठीण आहे हे सर्व.

काळा पहाड's picture

18 Nov 2015 - 3:35 pm | काळा पहाड

अरे कुठं नेवून ठेवलाय मिपा माझा!!!

भाऊंचे भाऊ's picture

18 Nov 2015 - 3:42 pm | भाऊंचे भाऊ

आत घुसलो की आधीच ३-४जण असायचे...

म्हणजे हजर सदस्य म्हणा की...

कपिलमुनी's picture

18 Nov 2015 - 3:43 pm | कपिलमुनी

अगदी तात्यासारखा लिहिता हो तुम्ही !
क्षणभर रोशनी आठवली

जातवेद's picture

18 Nov 2015 - 3:47 pm | जातवेद

मी आत घुसलो आणि आत आधिच ३-४ जण होते. टवाळ कार्टा, नाद खुळा, दिपक.कुवेत आणि साक्षात सशुश्रीके हेच ते ३-४ जण.

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2015 - 3:50 pm | टवाळ कार्टा

पुरावा द्या

हातच्या धाग्याला पुरावा कशाला पाहिजे?

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2015 - 5:21 pm | टवाळ कार्टा

वाट्लेच होते...पुरावा द्या म्हटले की शेपूट वर करून पळणार

बॅटमॅन's picture

18 Nov 2015 - 3:56 pm | बॅटमॅन

"कस्सा राव थांबू" ची अठवण झाली. =))

परिकथेतील राजकुमार's picture

18 Nov 2015 - 4:08 pm | परिकथेतील राजकुमार

केतकरा ओळखलेस का रे?
तुझे लिखाण आवडीने वाचतो; पण काही सूचना आहेत.

१) दोन लिखाणांमध्ये अंतर हवेच हवे.
२) इतरांचे लेखन वाचून तिथे देखील प्रतिक्रीया देत जा. तुला समजायला इतरांना सोपे जाईल.

असंका's picture

18 Nov 2015 - 4:47 pm | असंका

खिलाडू वृत्ती!!गुड!!

मन घट्ट दिसतंय तुमचं.
विनोद बिनोद ठिक आहे, पण त्यात तो सल्ला विसरून तर जाणार नाहीत ना?

अद्द्या's picture

18 Nov 2015 - 4:14 pm | अद्द्या

बाबौ .

लेख कसा का असेना . शीर्षक नीट देत जावा हो . .

उगा नाही नाही ते visualize व्हायला लागतं मग .

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Nov 2015 - 5:04 pm | ज्ञानोबाचे पैजार

नंतर मी पुण्यात शिफ्ट झालो

पुण्यात शनिवार वाड्यावर जाता का? तिकडे या पेक्षाही रोमांचक अनुभव मिळतात असे ऐकिवात आहे.

त्या अनुभवांबद्दल पण जरुर लिहा.

पैजारबुवा,

पुण्यात शनिवार वाड्यावर जाता का? तिकडे या पेक्षाही रोमांचक अनुभव मिळतात असे ऐकिवात आहे.
आज पैजारबुवा रॉक्स...

कंजूस's picture

18 Nov 2015 - 5:10 pm | कंजूस

मला वाटलं कोणालातरी ओंकारेश्वराला झटपट पोहोचवून पाय धुवू न यावं तर अगोदरच तीन चार जण होते छाप अनुभव कथन असावं.बालबाल बच गया केसावर निभावलं.पुढच्या वेळेस असेच संदिग्ध ( suspence ?)शीर्षक { केस अर्धवट कापलेलं }देत जा.

मास्टरमाईन्ड's picture

18 Nov 2015 - 5:19 pm | मास्टरमाईन्ड

डोळे आणि डोकं गरगरायचया आत मी दुसरीकडे बघणार तर कोणीतरी काखेचा खजाना दाखवत डोके वर करुन उभा

व्यॅक

ह्या सर्व प्रसंगात बाजुचा माणूस केस कापून घेत असताना घोरतांना पाहिलय मी

हे बाकी खल्लास.
अजूनतरी असलं ध्यान पाहण्यात नाही.

जव्हेरगंज's picture

18 Nov 2015 - 6:40 pm | जव्हेरगंज

फोटो झॅक आलाय बरका!!!!
कुणी काढला?

:)

मम्बाजी सर्वज्ञ's picture

18 Nov 2015 - 7:19 pm | मम्बाजी सर्वज्ञ

'हजामत' हे शीर्षक कसं वाटतंय?
किवा 'बिन पाण्याची'??

माम्लेदारचा पन्खा's picture

18 Nov 2015 - 7:28 pm | माम्लेदारचा पन्खा

णिषेध !!!

काळा पहाड's picture

18 Nov 2015 - 8:23 pm | काळा पहाड

कुमार शानू डब्डं(शौचालयातलं) घेऊन अखंड गायचा

कुमार शानू बद्दल असं? अहो चांगला गायक आहे तो. अन्नू मलिक बद्दल बोलला तर ठीक आहे.