"वैनी, पोरगं रडतयं"
"आरं बसकी थोडं खेळवत त्येला, यीवढी भांडी घासुन हु दी माजी"
"आवं पण म्या कायचं क्येलं नाय, तरीबी रडतयं"
"तसच करतयं रं, आण की थोडं फिरवुन"
"बाला, खुलकुला दीव का तुला"
"ई~या, ई~या"
"मोठ्या आय पशी न्हीवुन दी रय"
"मोठ्या आयं, बाळ रडतयं"
"हा~ड, तेव्हड कुत्रं हाण रं, मगाधरनं दारात बसलयं"
"च्तु च्तु च्तु, छौ छौ"
'काय जालं आमच्या बालाला, आगं व्हयं, आगं व्हयं, पाजलयं कागं ह्येला? आरं हा~ड की"
'मुंगी बिंगी आसल तर बगावयं कुटं"
"काय बाई, ह्या बायांचं आजिबात ध्यान नसतयं गय"
"ई~या, ई~या"
"भया, आण्णा हायतं का बघ रं कुटं, त्येंच्याकडं गेल्यावर ऱ्हायलतरी"
"आण्णा, बाळ रडतयं"
"आरं त्येला जरा मोकळ्या पटांगणातनं फिरवा रं, कदीपस्न सांगतुय, बाया आयकतचं न्हायत्या"
"आणा की मग तुमीच फिरवुन"
"माणुस बसलयं त्यला बसु बी द्यायचं न्हाय, ये भया, आण रं त्यला फिरवुन"
"ऊं, लय जड हाय"
"ई~या, ई~या"
"ये भया ह्येज्या आयलाच बुलीव रं, न्हाय ऱ्हायचं आसं"
"आणा हिकडं, काय देवा, काय कालवा लावलाय ह्येनं, कुणासठाव"
"आयवं, तुमाला बगीतलं की लगीच गप बसलं बगा"
"व्हय त्येला सारखी आयच लागती"
'भया तीवढी सतरंजी हातरं रं, झोप लागलीय बग ह्येला, हितच झोपवती आता"
"सावलीत टाक गय त्येला, तोंडावर पांघरुन नगु घालू"
"वैनी, मी जावका खेळाय?"
"आरं बसकी ह्येज्याजवळ, माश्या बसत्या त्या रं तोंडावर, आलीच मी यीवढी भांडी धुन"
.
.
.
.
.
"उ~...उ~"
"य्या~...."
"अीही ~ अीही ~ अीही..."
"ई~या, ई~या, ई~या"
"वैनी, पोरगं रडतयं"
प्रतिक्रिया
14 Nov 2015 - 11:26 pm | शिव कन्या
हहपु झाली.:))
तंतोतंत चित्र उभे केलेत.
आवडले.
14 Nov 2015 - 11:52 pm | पैसा
छान लिहिलंय!
15 Nov 2015 - 11:36 am | मांत्रिक
मस्त जव्हेरगंजभौ!
लहान मूल खेळत असेल तर प्रत्येकजण लगेच घेतो, पण रडू लागल्यावर मात्र आईच घेते त्याला.
15 Nov 2015 - 11:40 am | रातराणी
:)
15 Nov 2015 - 11:43 am | मुक्त विहारि
मांत्रिक म्हणाले, त्याला अनुमोदन...
"लहान मूल खेळत असेल तर प्रत्येकजण लगेच घेतो, पण रडू लागल्यावर मात्र आईच घेते त्याला."
15 Nov 2015 - 11:45 am | नाव आडनाव
:)
15 Nov 2015 - 12:19 pm | जव्हेरगंज
15 Nov 2015 - 1:16 pm | बाबा योगिराज
परत एकदा,
मान गए उस्ताद.
भेष्टच लिव्लै.
असच लिवत रावा.