अंदमान - एक अविस्मरणीय सफर-२

तिमा's picture
तिमा in भटकंती
6 Nov 2015 - 1:09 pm

भाग - १
http://www.misalpav.com/node/33551#new

रॉस आयलंड हे ब्रिटिशांनी स्वतःला आराम करण्यासाठी विकसित केले होते. मधे तीन वर्षे ते जपान्यांच्या ताब्यात होते.
आता तेथे त्यांच्या इमारतींचे भग्नावशेष आहेत. रॉस आयलंड म्हटले की 'अनुराधा राव' या गाईडची आठवण येणारच. या बाईंनी तिथल्या पशु-पक्ष्यांना अगदी आपलंसं करुन टाकले आहे. आम्ही गेलो तेंव्हा त्या, वीणा ट्रॅव्हल्स च्या सदस्यांना मार्गदर्शन करत होत्या, म्हणून त्यांना डिस्टर्ब केले नाही. हरिणे, ससे, मोर व विविध पक्षी इथे, माणसांना अजिबात न घाबरता वावरताना दिसतात.

१. My Dear

२.
more

३.
Black

तिथल्या बागाही अतिशय सुंदर आहेत.

४.
Garden

दीड तासांनंतर आमची बोट आम्हाला परत न्यायला आली. म्हणून आम्ही परत पोर्ट ब्लेअरला निघालो. तिथे पोचल्यावर, आमचा ड्रायव्हर जेटीवर हजर होताच. तिथून आम्ही चिडिया टापू नांवाच्या किनार्‍यावर सूर्यास्त बघायला गेलो. पण त्यादिवशी खूप ढग होते त्यामुळे सूर्यदर्शनच शक्य नव्हते. या किनार्‍यावर त्सुनामीच्या विध्वंसाची झलक पहायला मिळाली.

५.
Tsunami

त्सुनामीमुळे पडलेल्या झाडांच्या खोडापासून तिथे नॅचरल बेंचेस तयार केले आहेत.

६.
Benches

तिसर्‍या दिवशी सकाळी आम्ही हॅवलॉक आयलंडला निघालो. तिथे एक दिवसाची सहल सुद्धा करता येते. पण आम्ही तिथे रहायचे ठरवले. कारण तिथले इतर बीचेसही आम्हाला निवांतपणे पहायचे होते. तो निर्णय योग्य ठरला कारण हे बेट फारच सुंदर आहे.

७.विजयनगर बीच-हॅवलॉक
vijaynagar

८.
vijaynagar

९. बीचसमोर आमचे रिसॉर्ट
Resort

१०. राधानगर बीच - हॅवलॉक

Radhanagar

११.
radhanagar

१२. काला पत्थर बीच - हॅवलॉक

kala patthaar

१३.
kala Patthar

१४. आमची परतीची क्रूज

Cruise

हॅवलॉकहून परत यायला अंधार झाला. त्यामुळे संध्याकाळी आराम केला. पाचव्या दिवशी सकाळी लवकर उठून बारटांगला गेलो. अंतर १०० किमी आहे. तिथे जाताना, अर्ध्या रस्त्यावर एक चेकपोस्ट आहे. तिथे सर्व वाहने शिस्तीत थांबतात. प्रत्येकाची परमिशन तपासली जाते. त्यानंतर एक आदिवासी टापू सुरु होतो. तिथे कुठेही वाहन थांबवायचे नाही, आदिवासींचे फोटो काढायचे नाहीत, त्यांच्याशी बोलायचे नाही, अशा सक्त सूचना होत्या. वाटेत आम्हाला दोन आदिवासी स्त्रिया दिसल्या.त्यांतील एक पूर्ण विवस्त्र होती. पुढे बारटांगला गेल्यावर कार पार्क करुन, फेरीने समोरच्या किनार्‍याला गेलो. तिथे कागदपत्रांची खातरजमा झाल्यावर एका स्पीडबोटीत बसलो. अर्धा तास प्रवास केल्यावर एका किनार्‍यावर उतरलो. तिथून १.२ किमी चालल्यावर लाईमस्टोनची गुहा आली. त्यांतले चित्रविचित्र लोंबणारे शेप्स पाहून परतलो, पुन्हा चालत किनार्‍यावर येऊन बोटीने बारटांगला आलो. काही पर्यटक, एवढ्या एका गुहेसाठी इतका प्रवास कशासाठी? अशा तक्रारी करत होते. पण अशा लोकांना हे समजत नाही की या प्रवासांत आजूबाजूचा निसर्ग पहायचा असतो, त्याचा आनंद त्या गुहेपेक्षाही जास्त असतो.

१५. स्पीडबोटीतून उतरताना

Boat

१६. गुहेकडे जाताना

guha

१७.
road

१८. परतीचा प्रवास

return

बारटांगहून गेस्ट हाऊसला पोचायलाही उशीर झाला. शेवटच्या दिवशी अर्धा दिवस हातात होता. प्रथम एक सॉ मिल पाहिली. त्यांचे म्युझियम चांगले आहे. नंतर सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणजे सेल्युलर जेल! प्रत्येक मराठी माणसाचा उर अभिमानाने भरुन येईल अशी पवित्र जागा.

१९. लाईट व साऊंड शो साठी बसायची जागा.

L & S

२०.तुरुंगाच्या सात विंग्सना जोडणारी केंद्रीय हुकमत

jail

बाकीचे सावरकरांच्या कोठडीचे वा कोलुचे फोटो मुद्दमहूनच देत नाही. त्या दु:खद आठवणी कशाला ?

एकंदरीतः- अंदमानला एकदा तरी जरुर जावे. सर्व प्रकारची उपहारगृहे आहेत. रहायची हॉटेल्स फार महाग नाहीत. निसर्ग उत्तम आहे.लोकसंख्या कमी आहे. आम्हाला नेहमीच्या टूर कंपन्यांचे जे माणशी दर आहेत त्याच्या निम्माच खर्च, त्यांच्याहीपेक्षा चांगली व्यवस्था असून झाला. आपली पृथ्वी खरंच फार सुंदर आहे. आपण माणसांनीच तिचे बकाल शहरांत रुपांतर केलंय.

कुणालाही माहिती हवी असेल तर व्य.नि. करावा.

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

6 Nov 2015 - 1:17 pm | प्रीत-मोहर

मस्त लेखमाला. अजुन फोटो टाका ना.

जातवेद's picture

6 Nov 2015 - 1:29 pm | जातवेद

नयनरम्य!

वा! त्या टूर ऑपरेटरची माहिती देऊ शकलात वाचकांचा फायदा होईल असे वाटते. यात जाहिरात होण्याचा प्रश्न येणार नाही.

असेच म्हणतो. अंदमानला जायचा दोनदा प्रयत्न केला, पण दोन्ही वेळा बजेटच्या बाहेर जात होतं, त्यामुळे रद्द करावं लागलं. बजेटमध्ये बस(व)णारा टूर ऑपरेटर सुचवलात तर फार बरं होईल.

एकदा अंदमान जमलं नाही तेव्हा "कवरत्ती" नावाच्या बोटीवरून लक्षद्वीप पाहिलं. वह दिन ऐसे थे की टोट्टल मिळून दोन फोटो काढले. पण लक्षद्वीपचं (विशेषतः मिनिकॉयचं) सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवलं आहे.

अधिक माहिती इथे: http://www.mvkavaratti.com/index.htm

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Nov 2015 - 1:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त झाली सफर ! फोटो अप्रतिम !

मीउमेश's picture

6 Nov 2015 - 1:56 pm | मीउमेश

मेक माय ट्रीप नी जा , छान पेकेज आहेत त्यांचे मी पण मेक माय ट्रीप नी गेलो होतो

मीउमेश's picture

6 Nov 2015 - 1:56 pm | मीउमेश

मेक माय ट्रीप नी जा , छान पेकेज आहेत त्यांचे मी पण मेक माय ट्रीप नी गेलो होतो

मीउमेश's picture

6 Nov 2015 - 2:01 pm | मीउमेश

अंदमान , नाव काढलं कि माझ्या आयुष्यातले ते सर्वात छान आठ दिवस मला आठवतात.

मी मुंबईहून चार्टर विमानाने तिकडे गेलो होतो, हनिमून साठी….
सर्व ठिकाणे एकाहून के सरस …

खरच छान जागा आहे , शांत जागा नयनरम्य, खूप जास्त एकांत

पद्मावति's picture

6 Nov 2015 - 2:56 pm | पद्मावति

सुंदर सफर. फोटो तर फारच छान आहेत.

मंजूताई's picture

6 Nov 2015 - 3:13 pm | मंजूताई

अजून डिटेलवार हवे होते ... फेबुमध्ये जाणार आहोत ... व्यनि केलाय..

प्रचेतस's picture

6 Nov 2015 - 3:16 pm | प्रचेतस

क्या बात है...!!!!!

जबरदस्त निळाई आणि हिरवाई.
डोळे निवले.

अक्षया's picture

6 Nov 2015 - 4:12 pm | अक्षया

फोटो मस्तचं !

यशोधरा's picture

6 Nov 2015 - 6:42 pm | यशोधरा

हा भागही आवडला.

सेल्युलर जेल, स्वा.सावरकरांची कोठडी, कोलू ह्यांचे फोटो जरुर द्यायला हवे होते.

तिमा's picture

6 Nov 2015 - 7:20 pm | तिमा

१. सावरकरांच्या कोठडीकडे जाताना- शेवटची कोठडी सावरकरांची.

way

२. आंत शिरताना

saavarkar

३. नतमस्तक

jayostute

४. कोलू

kolu

५. कोलू फिरवताना मॉडेल

kolu

६. बेड्या

Bedya

७. सेल्यूलर जेल

jail

यशोधरा's picture

6 Nov 2015 - 7:29 pm | यशोधरा

खरेच नतमस्तक!

सुबोध खरे's picture

6 Nov 2015 - 8:19 pm | सुबोध खरे

अंदमानची सर्व च्या सर्व बेटे अतिशय सुंदर आहेत. भारतातील प्रत्येक माणसाने थायलंड किंवा दुबई ला जाऊन परदेशाना पैसे देण्यापेक्षा आपल्या देशातील नितांत सुंदर अशा गोष्टी प्रथम पाहिल्या पाहिजेत. पण भारतातच फिरायला गेलो हे डाऊन मार्केट वाटणारे रेसिडेंट नॉन इंडियन्स फार दिसतात.
सेल्युलर जेल पाहताना आणी तेथील सर्व गोष्टी पाहताना स्वातंत्र्यसैनिकांनी भोगलेल्या अनन्वित हाल अपेष्टान्चे दर्शन पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. स्वातंत्र्य वीर सावरकर यांचा फोटो पाहून मी एक मिनिट नतमस्तक होऊन शांत उभा होतो. त्या माणसाच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची झलक पाहून तुम्ही किती क्षुद्र आहात याची जाणीव होते आणी आपण लोकांनी देशाची काय स्थिती करून ठेवली आहे ते पाहून स्वतःची लाज वाटते. प्रत्येक देशभक्त माणसाने एकदा तरी भेट द्यावी असे स्थळ आहे.

नाखु's picture

7 Nov 2015 - 11:53 am | नाखु

अमरनाथला बद्री केदारला जाईल का नाही ते माहीत नाही पण सेल्युलर जेल पाहण्यासाठी(मुलांसमवेत) तरी, देवाने मला इच्छापूर्ती वर ( वेळ आणि पुरेसा नगद नारायण) द्यावा

तुम्ही भाग्यवान. तिथे भेट देऊन आलात.

देशा बाहेर कुठल्याही कारणास्तव बिलकुल न गेलेला (अर्थात अडाणी) नाखु

अत्रुप्त आत्मा's picture

6 Nov 2015 - 8:21 pm | अत्रुप्त आत्मा

अतिशय सूंदर फोटो व माहिती.

कविता१९७८'s picture

6 Nov 2015 - 10:49 pm | कविता१९७८

मस्त झाली सफर ! फोटो अप्रतिम !

सुनिल जोग's picture

7 Nov 2015 - 5:29 am | सुनिल जोग

सुरेख वर्णन ! मी डिसेम्बर मधे जातोय. मजा येइल.

पियुशा's picture

7 Nov 2015 - 1:26 pm | पियुशा

खुपच सुरेख :)

मित्रहो's picture

7 Nov 2015 - 5:31 pm | मित्रहो

सुरेख फोटो.
अंदमानला आता जायलाच पाहीजे

तिमा's picture

7 Nov 2015 - 7:22 pm | तिमा

माझे नव्हे, २०१० साली ऋषिकेशने अंदमानवर जे लिहिले आहे ते अवश्य वाचा. प्रत्येक भागाच्या खाली पुढची लिंक दिसेल. लिहावे तर असे!
http://www.misalpav.com/node/10844

पैसा's picture

8 Nov 2015 - 6:10 pm | पैसा

फोटोही अप्रतिम!

नूतन सावंत's picture

8 Nov 2015 - 10:03 pm | नूतन सावंत

दोन्ही भाग आताच वाचले.स्वतःच फिरुन आल्यासारखं वाटलं.फोटो तर अप्रतिमच.

सफर आवडली. चित्रेही छान आहेत.
मला जाववणार नाही म्हणून जाणार नाही. तिथे जाऊन जेल पाहिल्याशिवाय परत येणे हे पटणार नाही व जेल पाहिल्यावर अनेक दिवसांच्या झोपेचे खोबरे नक्की! फार अस्वस्थ करणारे ठिकाण आहे.

दोन्ही भाग आवडले.अंदमानला जाण्याचे उगाच राहून जातेय हे लेख वाचल्यावर पुनः जाणवले.

जेपी's picture

9 Nov 2015 - 10:10 am | जेपी

भटकंती आवडली.