अंदमान - एक अविस्मरणीय सफर-२
भाग - १
http://www.misalpav.com/node/33551#new
रॉस आयलंड हे ब्रिटिशांनी स्वतःला आराम करण्यासाठी विकसित केले होते. मधे तीन वर्षे ते जपान्यांच्या ताब्यात होते.
आता तेथे त्यांच्या इमारतींचे भग्नावशेष आहेत. रॉस आयलंड म्हटले की 'अनुराधा राव' या गाईडची आठवण येणारच. या बाईंनी तिथल्या पशु-पक्ष्यांना अगदी आपलंसं करुन टाकले आहे. आम्ही गेलो तेंव्हा त्या, वीणा ट्रॅव्हल्स च्या सदस्यांना मार्गदर्शन करत होत्या, म्हणून त्यांना डिस्टर्ब केले नाही. हरिणे, ससे, मोर व विविध पक्षी इथे, माणसांना अजिबात न घाबरता वावरताना दिसतात.
१.
२.
३.
तिथल्या बागाही अतिशय सुंदर आहेत.
४.
दीड तासांनंतर आमची बोट आम्हाला परत न्यायला आली. म्हणून आम्ही परत पोर्ट ब्लेअरला निघालो. तिथे पोचल्यावर, आमचा ड्रायव्हर जेटीवर हजर होताच. तिथून आम्ही चिडिया टापू नांवाच्या किनार्यावर सूर्यास्त बघायला गेलो. पण त्यादिवशी खूप ढग होते त्यामुळे सूर्यदर्शनच शक्य नव्हते. या किनार्यावर त्सुनामीच्या विध्वंसाची झलक पहायला मिळाली.
५.
त्सुनामीमुळे पडलेल्या झाडांच्या खोडापासून तिथे नॅचरल बेंचेस तयार केले आहेत.
६.
तिसर्या दिवशी सकाळी आम्ही हॅवलॉक आयलंडला निघालो. तिथे एक दिवसाची सहल सुद्धा करता येते. पण आम्ही तिथे रहायचे ठरवले. कारण तिथले इतर बीचेसही आम्हाला निवांतपणे पहायचे होते. तो निर्णय योग्य ठरला कारण हे बेट फारच सुंदर आहे.
७.विजयनगर बीच-हॅवलॉक
८.
९. बीचसमोर आमचे रिसॉर्ट
१०. राधानगर बीच - हॅवलॉक
११.
१२. काला पत्थर बीच - हॅवलॉक
१३.
१४. आमची परतीची क्रूज
हॅवलॉकहून परत यायला अंधार झाला. त्यामुळे संध्याकाळी आराम केला. पाचव्या दिवशी सकाळी लवकर उठून बारटांगला गेलो. अंतर १०० किमी आहे. तिथे जाताना, अर्ध्या रस्त्यावर एक चेकपोस्ट आहे. तिथे सर्व वाहने शिस्तीत थांबतात. प्रत्येकाची परमिशन तपासली जाते. त्यानंतर एक आदिवासी टापू सुरु होतो. तिथे कुठेही वाहन थांबवायचे नाही, आदिवासींचे फोटो काढायचे नाहीत, त्यांच्याशी बोलायचे नाही, अशा सक्त सूचना होत्या. वाटेत आम्हाला दोन आदिवासी स्त्रिया दिसल्या.त्यांतील एक पूर्ण विवस्त्र होती. पुढे बारटांगला गेल्यावर कार पार्क करुन, फेरीने समोरच्या किनार्याला गेलो. तिथे कागदपत्रांची खातरजमा झाल्यावर एका स्पीडबोटीत बसलो. अर्धा तास प्रवास केल्यावर एका किनार्यावर उतरलो. तिथून १.२ किमी चालल्यावर लाईमस्टोनची गुहा आली. त्यांतले चित्रविचित्र लोंबणारे शेप्स पाहून परतलो, पुन्हा चालत किनार्यावर येऊन बोटीने बारटांगला आलो. काही पर्यटक, एवढ्या एका गुहेसाठी इतका प्रवास कशासाठी? अशा तक्रारी करत होते. पण अशा लोकांना हे समजत नाही की या प्रवासांत आजूबाजूचा निसर्ग पहायचा असतो, त्याचा आनंद त्या गुहेपेक्षाही जास्त असतो.
१५. स्पीडबोटीतून उतरताना
१६. गुहेकडे जाताना
१७.
१८. परतीचा प्रवास
बारटांगहून गेस्ट हाऊसला पोचायलाही उशीर झाला. शेवटच्या दिवशी अर्धा दिवस हातात होता. प्रथम एक सॉ मिल पाहिली. त्यांचे म्युझियम चांगले आहे. नंतर सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणजे सेल्युलर जेल! प्रत्येक मराठी माणसाचा उर अभिमानाने भरुन येईल अशी पवित्र जागा.
१९. लाईट व साऊंड शो साठी बसायची जागा.
२०.तुरुंगाच्या सात विंग्सना जोडणारी केंद्रीय हुकमत
बाकीचे सावरकरांच्या कोठडीचे वा कोलुचे फोटो मुद्दमहूनच देत नाही. त्या दु:खद आठवणी कशाला ?
एकंदरीतः- अंदमानला एकदा तरी जरुर जावे. सर्व प्रकारची उपहारगृहे आहेत. रहायची हॉटेल्स फार महाग नाहीत. निसर्ग उत्तम आहे.लोकसंख्या कमी आहे. आम्हाला नेहमीच्या टूर कंपन्यांचे जे माणशी दर आहेत त्याच्या निम्माच खर्च, त्यांच्याहीपेक्षा चांगली व्यवस्था असून झाला. आपली पृथ्वी खरंच फार सुंदर आहे. आपण माणसांनीच तिचे बकाल शहरांत रुपांतर केलंय.
कुणालाही माहिती हवी असेल तर व्य.नि. करावा.
वाचन
11384
प्रतिक्रिया
0