अराजक

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in काथ्याकूट
27 Oct 2015 - 5:50 pm
गाभा: 

अराजक

- डॉ. सुधीर रा. देवरे

केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या साहित्य अकादमीसह इतर संस्थांचे पुरस्कार परत करणार्‍या साहित्यिकांची- विचारवंतांची संख्या देशभरात वीस पर्यंत पोचली आहे. (महाराष्ट्रातल्या काही साहित्यिकांनीही महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार परत केले.) आणीबाणी नंतर आजची राजकीय स्थिती ही सर्वात जास्त अराजकतेकडे चालली आहे काय? कोणाला ढळढळीत अराजकता अजूनही दिसून येत नसेल तर फक्‍त एका वर्षात छुपी अराजकता नक्कीच सुरू झाली आहे. डॉ. यू. आर. अनंतमूर्ती... बोलल्याप्रमाणे केवळ देशच नव्हे, तर आख्‍खं जग सोडून निघून गेले! खरंच हे जग आज इतके वाईट आहे का? पण साहित्यिकांच्या या कृतीने सरकारवर अजून तरी साधा ओरखडाही उमटलेला दिसत नाही. राजकारणी लोकांमध्ये आता साहित्यिक- विचारवंतांचा आदर राहिला नाही. आजच्या राजकारणात सुसंस्कृतपणा दिसून येत नाही.

एम. एस. कलबुर्गी, गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोळकर या तीन विचारवंतांचा खून. या हत्त्यांमागील लोक कोण हे शोधणे फार दूरचे काम असे आपण समजून चाललो तरी ज्या मारेकर्‍यांनी त्यांना रस्त्यात गाठून हत्त्या केली ते भाडोत्री मारेकरी सुध्दा हाती लागू नयेत हे आकलनापलिकडे आहे. एखादा संशयीत मारेकरी पोलिसांच्या हाती लागला तर तो कसा निष्पाप आहे हे न्यायाधिशांच्या आधी मंत्रीमहोदय सांगतात.

कोणी काय खावे हे दुसरा कोणी कसा ठरवू शकतो? कोणी कोणते कपडे घालावेत त्यावरून मतभेद. कोणाचे घर कोणत्या वस्तीत असावे हे तो तो कळप ठरवणार? मोहम्मद अखलाख दादरी हत्याकांडाने आक्खा देश हादरला. थरकाप उडवणारी आणि झोप उडवणारीही हिंसक घटना आहे ही. आपण मध्ययुगीन आदिम काळात जगतो आहोत की काय असा भास व्हायला लागला. आपापल्या जातीधर्माच्या कळपात राहून आपण आपले आदिम हिंसक टोळ्यांमध्ये रूपांतर करू पहात आहोत? गुजरातमध्ये मुस्लीम युवकांना गरबा नृत्य परिसरात येण्यावर बंदी घालण्यात आली. देशभरात विविध संघटनांकडून असे अनेक छोटेमोठे स्थानिक फतवे निघताहेत. हा कोणत्या प्रकारचा जमातवाद आहे.

यापुढे कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणे हे देशाच्या दृष्टीने हानीकारक ठरणार आहे का? आपण या देशाच्या विकासासाठीच नक्की सरकार निवडून दिलंय का? हा कोणत्या प्रकारचा विकास आहे? विकासाच्या आरोळ्या मारताना देशातल्या शंभरावर असलेल्या विविध नावांच्या संघटना सुप्तावस्तेत होत्या. सत्ता मिळताच त्या आपल्या खरे रूप दाखवायला लागल्या. रस्त्यांवर नंगानाच होऊ लागला. मत विभाजन होण्यासाठी एखादा नाटकी विरोधकही तसा खमक्या हवा म्हणजे आपला अजेंडा ठोसपणे राबवता येतो. आपल्या समूहावर विषारी टीका केली की आपल्यापासून थोडे दूर गेलेले लोक अजून आपल्या जवळ येतात या सिध्दांताने अगदी ठरवून एका राक्षसालाही जन्म देण्यात आला. तो जितके विषारी बोलेल तितका आपल्याला फायदा. इथे एक कळत नाही की एखाद्या नेत्यावर कोणी टीका केली तर त्या नेत्याच्या धर्माच्या लोकांचा अपमान कसा होऊ शकतो?

इतके सारे होत असूनही सिंहासनावर आरूढ झालेली व्यक्‍ती काही बोलायला तयार नाही. तेव्हाचे मौनीबाबा परवडले. आता सोयीनुसार बोलले जाते आणि सोयीनुसार दुर्लक्ष केले जाते. प्रचारसभांमध्ये आणि इतर देशांच्या दौर्‍यांवर जे बोलू नये ते बोलले जाते. रेडीओवर मनातले सगळे सोयीस्कर सांगितले जाते. पण देशांतर्गत हिंसेवर तोंडावर बोट... गडीगुप्प. उत आलेले लोक याचा फायदा उठवत आपला कार्यभाग उरकवताहेत.

महात्मा गांधींना संपवता येत नाही तर आता महात्मा गांधींचे नाव घ्यायचे आणि होता आले तर दुसरे महात्मा व्हायला काय हरकत आहे. मंदिरे बांधता बांधता पोटातल्या पोट आपलेही एखादे मंदिर का बांधू नये आता? दोन आक्टोबरला रस्त्यांची स्वच्‍छता करता करता मनातल्या जळमटांची स्वच्‍छता मात्र अजिबात करायची नाही! भारत पंधरा महिण्यांपूर्वी अस्तित्वात होता की नव्हता, माहीत नाही. कदाचित तो आताच घडवला गेला असेल ! चमकता येईल तिथे चमकायचे मग ते फेसबुक का असेना पण जग फिरताना आपल्याच देशाची निंदा करणे गरजेचे आहे का?

काल एका चॅनलवर ऐकले: बिहार मध्ये मुस्लीम मते नितीश आघाडीकडे किती जातील आणि भाजपकडे किती. राजपूत आणि तेल्यांची मते कुठे जातील तेही सांगू... माझी जात ज्या कोणाला मते देईल त्यालाच मी माझे मत देईल का? एक जात एक धर्म सर्व मिळून एखाद्या पक्षाला मतदान करू शकतात का? अशा जातीयवादी सर्वे करणार्‍या चॅनल्सना कोर्टात खेचले पाहिजे. कोणतं न्यूज चॅनल नेमकं कोणाला विकलं गेलंय हे सहज कळतं आता! लोकशाहीचा तिसरा स्तंभ विकला गेला आहे का!

सावधान! देशाच्या सवोच्च स्थानी असलेल्या नेत्यांची भाषा प्रचार सभांमध्ये पार रसातळाला गेली! आपला देश फक्‍त प्रचार सभांपुरताच आणि निवडून येण्यापुरताच उरला की काय? तसे नसते तर आज प्रचार करताना जातीय धर्मिय समिकरणे जिथक्या उथळपणे वापरली जातात तशी ती वापरली गेली नसती.

भारतात अशी अराजकता येणार असेल तर देशाच्या नुकसानासाठी दुसर्‍या शत्रू देशाला काहीच करायची गरज नाही. आपण आपल्याच कृत्यांनी देशाची एकता पोखरून काढू. अथवा शत्रू राष्ट्राला हे निमंत्रण आहे! असे म्हणावे लागेल. आपण खरंच अराजकतेकडे जात आहोत का, याचा सजगपणे विचार करण्याची वेळ आली आहे.

(या मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

- डॉ. सुधीर रा. देवरे
Email: sudhirdeore29@rediffmail.com
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता:
Dr sudhir Deore
sudhirdeore29.blogspot.com

प्रतिक्रिया

द-बाहुबली's picture

27 Oct 2015 - 6:03 pm | द-बाहुबली

अराजक नाही पण किंचीतसा विस्कळीतपणा येतोय का अशी बारीक शंका अधुन मधुन डोकावत असते. मी स्वतः विचार स्वातंत्र्याचा आदर करणारा प्राणी आहे. आणि व्यक्त होण्यात बंधने निर्माण होने मला मान्य नाही हे मी एका मराठी संस्थळावरील गाढवांना सुध्दा स्पश्ट शब्दात सुनावले होते अन बॅन झालो होतो. दुर्दैवाने असे आता सर्वांनाच सुनावण्याची वेळ येत असेल तर... आपण परिस्थीतीचे सुक्ष्मनिरीक्षन करुन आवश्यक ते बदल केले पाहिजेत, घटनेने तो अधिकार आपल्याला नक्किच दिला आहे.

एक लक्षात घ्या विरोध ज्यांनी केलेला आहे त्यांची साधी व्हरायटी बघा
किती कीती वेगवेगळ्या विचारधारांचे भाषांचे साहित्यीक आहेत
आता गुलजारं सारखा एरवी अलिप्त असणारा माणुसही निषेध नोंदवतोय
थोरात संजय भास्कर जोशी कीती वेगळ्या विचारसरणीचे दोन्ही
नयनतारा सहगल हे सर्व इतक्या भिन्न भिन्न भाषा विचार चिंतन शैलीतले आहेत
तरीही
या सर्वांना कुठेतरी इतकं जास्त असह्य होत आहे की ते अतिशय अडचणीचा तापदायक ठरु शकतो असा स्टॅन्ड भुमिका घेत आहेत.
तेव्हा कुठे होता ? हा इतका थिल्लर प्रश्न या इतक्या मोठा प्रश्न उपस्थित केल्याला दिलेला प्रतिसाद कुठेच टीकत नाही.

रामदास's picture

27 Oct 2015 - 8:47 pm | रामदास

राधासुता तुझा धर्म ? अशा अर्थाने का ?

विवेकपटाईत's picture

27 Oct 2015 - 7:40 pm | विवेकपटाईत

याला खाल्या मिठाला जगणे म्हणतात. कर्नाटक सरकारचा विरोध करा, उत्तर प्रदेश सरकारचा विरोध करा. केंद्र सरकारचा विरोध काही कळत नाही बा....

आनंदी गोपाळ's picture

30 Oct 2015 - 9:41 pm | आनंदी गोपाळ

पीएमो मधे नोकरीला आहात ना तुम्ही? ;)

रामदास's picture

27 Oct 2015 - 8:52 pm | रामदास

लेख विचार करायला लावणारा आहे पण विस्कळीत आहे असा भास झाला.
तसाही लेखाचा आशय वेगवेगळ्या माध्यमांतून चर्चेला आल्यामुळे प्रभावी वाटला नाही.
मिपासारख्या व्यासपिठाचा वापर विचार मंथनासाठी तुम्ही करत आहात हे स्वागतार्ह आहे.
पुलेशु.

सुबोध खरे's picture

27 Oct 2015 - 9:06 pm | सुबोध खरे

सर्व जण अराजक आहे म्हणून म्हणत आहेत पण याला उपाय काय आणी तो कसा करायचा यावर कोणाचाही ठोस उपाय येताना दिसत नाही.
ज्यांना मोदी सरकारला विरोध करायचा आहे त्यांच्याकडून सुद्धा पर्याय काय या वर मौन बाळगलेले दिसते. हे म्हणजे लग्न संस्था परिपूर्ण नाही पण त्याला पर्याय काय यावर उत्तर नाही. कांग्रेसचे सरकार राहुल गांधींच्या नेतृत्वा खाली हा पर्याय हास्यास्पद दिसतो. दुसरा कोणताही पक्ष त्या कुवतीचा दिसत नाही. मिलीजुली सरकारचा कार्यक्रम (COMMON MINIMUM PROGRAM) चा लसावी काढाल तर तो शून्य होता कारण त्यांच्यात COMMON ठोस असे काहीच नव्हते. होता तो फक्त भाजप विरोध.
त्यांची विचारसरणी पाकिस्तान सारखी आहे.पाकिस्तानच्या चारही राज्यांचा समन्वय नाही. एकच COMMON MINIMUM PROGRAM तो म्हणजे भारत विरोध. पण याने विकास तर होत नाही.
कलबुर्गी, दाभोलकर यांची हत्या झाली तेंव्हा तेथे कान्ग्रेसचेच राज्य होते आणी दादरी येथे हत्याकांड झाले तेथे हि भाजपचे सरकार नाहीच मग सपाच्या सरकारला तेथे सज्जड काम करायला कोण थांबवीत आहे? केजरीवाल आणी इतर लोकांना ज्यांचे सरकार तेथे नाही ज्यांचा त्याच्याशी कोणताही इतर सम्बन्ध नाही त्यांनी दादरीला जाण्याची (राजकारण सोडून) काय गरज होती?
त्यामुळे बर्याच वेळेस हे लेखक कांग्रेसच्या सरकारच्या मेहेरबानीने पारितोषिके मिळालेले आहेत आणी आता "त्यांचे" सरकार गेले म्हणून हि कोल्हेकुई चालू आहे हा उजव्या गटाच्या म्हणण्यास काही तरी आधार आहे असे वाटू लागले आहे.

द-बाहुबली's picture

28 Oct 2015 - 6:48 pm | द-बाहुबली

विचारवंतांच्या हत्या उलगडण्ञात येत असलेले अपयश हा साहित्यिकांच्या चिंतेचा महत्वाचा विषय आहे असे कोणालाच वाटत नाही काय ?

आता कृपया हे कुणी वैयक्तिक घेउ नये, पण हा वरचा प्रश्न म्हणजे ज्याचं जळतं त्यालाच कळतं अशा अर्थी आहे का?

अनिरुद्ध.वैद्य's picture

31 Oct 2015 - 4:43 pm | अनिरुद्ध.वैद्य

फक्त त्येंनी कर्नाटक, उत्तर प्रदेश सरकारच्या निषेधाबाबत अवाक्षर न काढता डायरेक्ट केंद्रावर हल्ला चढविला न ...
मग कसकाय हेतू प्रामाणिक म्हणायचं?

ट्रेड मार्क's picture

27 Oct 2015 - 10:07 pm | ट्रेड मार्क

जाती आणी धर्मा वरून राजकारण सुरू करण्यात कॉंग्रेसचा मोठा हात आहे. इतकी वर्ष एका धर्माचं लांगुलचालन झालं, विविध आरक्षणं, झुकतं माप त्यांच्या पदरात पडलं. आता तथाकथित हिंदू विचारसरणीचं सरकार आहे असं वाटून काही आत्यंतिक कट्टर विचारसरणीचे लोक उन्माद आल्यासारखे वागत असतील. एखाद्या ग्रुप अथवा विचारसरणीच्या काही लोकांमुळे लगेच अराजक माजले आहे असं म्हणणे जरा अतिशयोक्तीचे होईल.

दादरी हत्या ही निंदनीय आहेच परंतु त्याबरोबरच प्रशांत पुजारीच्या हत्येबद्दल कोणीच काही बोलत नाही. दादरीची हत्या ही एका जमावानी केलेली होती त्यात पूर्वनियोजित काही नसावे असं वाटतं. प्रशांतची हत्या तर पूर्वनियोजित होती असा म्हणायला बराच वाव आहे. मुळात दादरी घटनेपेक्षा कितीतरी थरकाप उडवणाऱ्या, झोप उडवणाऱ्या, देश हादरवणाऱ्या घटना आधी पण घडल्या आहेत आणि नंतर पण घडल्या आहेत. माहिती नसल्यास सांगतो, प्रशांतची हत्या दादरी नंतर काही दिवसात झाली आणी दोन्ही घटनेमागचं कारण गोहत्या बंदी हे आहे. (मी दोन्ही किंवा कुठल्याच अतिरेकी घटनेचं समर्थन करत नाहीये).

केंद्र सरकारला एखाद्या व्यक्तीच्या हत्येमधे (हत्या करण्यामागे अथवा करवण्यामागे) एवढा इंटरेस्ट असावा असं वाटत नाही. त्यातूनही जर करायचीच असती तर सुमडीत केली असती, त्यासाठी कितीतरी मार्ग, प्रशिक्षित लोकं सहज उपलब्ध आहेत. तेथील घटनेची जबाबदारी खरं तर राज्य सरकारची आहे. त्यात केंद्र सरकारने काय करावे असं अपेक्षित आहे?

कोणी कुठले कपडे घालावेत या बाबत हिंदू धर्मापेक्षा मुस्लिम धर्मात जास्त कडक कायदे आहेत. आणी आपला त्यास विरोध आहे हे स्वागतार्ह आहे. राहिला गोमांस भक्षणाचा मुद्दा तर त्यावर दुसर्या एका धाग्यात बरीच चर्चा झाली आहे.

अजून एक मुद्दा म्हणजे, निवडणुकीच्या काळात कॉंग्रेसचे नेते म्हणतच होते की भाजपाचं सरकार आलं तर जातीय दंगे होतील. कश्यावरून तसे दंगे व्हावेत असे प्रयत्न केले जात नसतील?

सहिष्णुता ही भारतात राहणाऱ्या सर्व लोकांनी पाळणे जरुरीचे आहे, मग तो कुठल्याही धर्माचा असो. खरं तर मानवता हाच (फक्त) धर्म स्वीकारण्याची सर्व जगातच वेळ आली आहे.

तर्राट जोकर's picture

29 Oct 2015 - 5:25 pm | तर्राट जोकर

ट्रेड मार्क,

हा प्रश्न तुम्ही आधी एका धाग्यावर विचारला होता. की प्रशांत पुजारी बद्दल कोण का बोलत नाही?
इथे ते उत्तर सापडतं का बघा:

Prashant Poojary was a Bajrang Dal activist in Moodbidri. The Bajrang Dal has self-admittedly used violence as a weapon against minorities (don't believe me, meet Babu Bajrangi in Gujarat or listen to him in a Tehelka expose). Poojary has been allegedly involved in cases of intimidation and violence in the region. He was fighting the “beef Mafia” as part of the anti-cow slaughter agitation.

Poojary was part of a political war between the Bajrang Dal and minority group outfits, some of them with criminal links. Can his killing be compared to Mohammed Akhlaq, an innocent householder whose only crime was that he was the victim of a rumour that he had stored beef and belonged to a particular religion. Naturally, the outrage over a hate crime will be and must be greater in his case.

दोन केसमधला मूलभूत फरक लक्षात येत असेल तर दोन व्यक्तिंचे धर्म बघण्यात काय पॉईंट आहे?

ट्रेड मार्क's picture

29 Oct 2015 - 8:39 pm | ट्रेड मार्क

यात मूलभूत फरकापेक्षा मूलभूत साम्य आहे की दोघांची हत्या झाली. तुमच्या प्रतिसादात असं वाटतंय की तुम्ही प्रशांतच्या हत्येचं समर्थन करताय आणी अख्लाक च्या हत्ये बद्दल मात्र तुम्हाला वाईट वाटतंय.

फरकाबद्दल बोलायचं तर अख्लाकची हत्या जमावानी मारहाण करून केली आणी प्रशांतची हत्या धारदार शास्त्रांनी झाली. योग्य काय होतं तर दोन्ही घटनेत पोलिसांच्या हाती आरोपीला सुपूर्द करणं, जे झालं नाही.

नुसतं शिरोमणी राजदीप सरदेसाई म्हणतात म्हणून प्रशांत "Poojary was part of a political war between the Bajrang Dal and minority group outfits, some of them with criminal links.". या गोष्टीचा काही पुरावा आहे का? त्यानी किती हत्या, मारामाऱ्या, दंगे यात भाग घेतला होता? त्याच्यावर किती गुन्हे पोलिस चौकीत नोंदलेले आहेत? तसे अख्लाक वर पण तिथल्या स्थानिक लोकांनी चोरीचे आरोप केले आहेत.

मुळात मी धर्माबद्दल काहीच म्हणत नाहीये. दोघेही भारतीय होते तर दोघांना सारखी वागणूक मिळायला हवी हा मुद्दा आहे.

बोका-ए-आझम's picture

31 Oct 2015 - 3:30 pm | बोका-ए-आझम

तजो,दोन व्यक्तींची हत्या झाली आहे. एक एअरफोर्सचा कर्मचारी होता आणि दुसरा एका हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता होता पण कायद्याच्या दृष्टीने दोघेही सारखे. निदान या देशात तरी. अर्थात मिडियाच्या आणि आदर्श लिबरल सिक्युलर्सच्या दृष्टीने एका मुस्लिम माणसाचा मृत्यू हा जास्त महत्वाचा आहे आणि हिंदू माणसाचा नाही हे तुमच्या प्रतिसादावरुन समजतंच. शिवाय बाबू बजरंगीला त्याच्या कृत्यांबद्दल जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, पण ते कुणा तहलकाने expose केलं म्हणून नाही, तर कोर्टात त्याचा गुन्हा सिद्ध झाला म्हणून. तसा प्रशांत पुजारीच्या गुन्ह्यांबद्दल आहे का? आणि अशा भेदभावामुळेच हिंदू - मुस्लिम तेढ वाढायला मदत होते आहे हे आदर्श लिबरल्सना कधी समजणार आहे? हत्या ही हत्या असते. जसा गुन्हेगारांना धर्म नसतो तसा त्यांच्या बळींनाही धर्म नसतो. पण कोणी त्यावरून मिळालेल्या पुरस्कारांचा त्याग करेल असं वाटत नाही.

श्रीगुरुजी's picture

1 Nov 2015 - 3:13 pm | श्रीगुरुजी

हत्या ही हत्या असते. जसा गुन्हेगारांना धर्म नसतो तसा त्यांच्या बळींनाही धर्म नसतो. पण कोणी त्यावरून मिळालेल्या पुरस्कारांचा त्याग करेल असं वाटत नाही.

चूक. बळींना धर्म असतो आणि त्यांच्या मारकर्‍यांनाही धर्म असतो आणि बळी व मारेकर्‍यांच्या धर्मावरून पुरोगामी आणि निधर्मी विचारवंतांची प्रतिक्रिया ठरते. याच्यात साधारणपणे खालील वर्गवारी असते.

(१) बळी हिंदू, मारेकरी अहिंदू

पुरोगामी आणि निधर्मी विचारवंतांची प्रतिक्रिया - संपूर्ण दुर्लक्ष करून मौन पाळणे आणि या घटनेचा चुकुनही उल्लेख न करता मारेकर्‍यांविरूद्ध चकार शब्द न काढणे. समजा कोणी चिकाटीने प्रतिक्रिया विचारली तर बळी पडलेला बजरंग दल, संघ इ. गुंड संघटनेचा गुंड सदस्य होता व ही हत्या धार्मिक द्वेषातून झालेली नसून हा राजकीय खून आहे असे सांगून प्रश्न झटकून टाकणे.

उदाहरणे - ओरिसामधील स्वामी लक्ष्मणानंद व त्यांच्या ४ शिष्यांची धर्मांतर प्रकरणावरून ख्रिश्चनांनी केलेली हत्या, बीफला विरोध केल्यामुळे कर्नाटकातील मुस्लिमांनी केलेली प्रशांत पुजारीची हत्या, बीफबंदीमुळे संतापलेल्या मौलवीने नमाजाच्या वेळी प्रक्षोभक भाषण करून डिवचल्यामुळे एका मुस्लिम युवकाने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाला भोसकल्याचे प्रकरण इ.

(२) बळी हिंदू, मारेकरी हिंदू

पुरोगामी आणि निधर्मी विचारवंतांची प्रतिक्रिया - संपूर्ण दुर्लक्ष करून मौन पाळणे

(३) बळी अहिंदू, मारेकरी अहिंदू

पुरोगामी आणि निधर्मी विचारवंतांची प्रतिक्रिया - संपूर्ण दुर्लक्ष करून मौन पाळणे

(४) बळी अहिंदू, मारेकरी हिंदू

पुरोगामी आणि निधर्मी विचारवंतांची प्रतिक्रिया - प्रचंड आरडाओरडा करून निषेध करणे, थेट मोदींना जबाबदार धरणे, देशात भीतिचे व दडपशाहीचे वातावरण आहे असे वेगवेगळ्या परिसंवादांमध्ये सांगत रहाणे, वृत्तपत्रातून लेख लिहून हिंदुत्ववादी संघटनांचा फॅसिस्ट, दहशतवादी, अतिरेकी असा उल्लेख करणे, मिळालेले पुरस्कार परत करण्याचे नाटक करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करणे इ.

(५) बळी अहिंदू किंवा यांच्यासारखाच निधर्मी, पुरोगामी, विचारवंत इ.इ. आणि मारेकरी अज्ञात

पुरोगामी आणि निधर्मी विचारवंतांची प्रतिक्रिया - रचंड आरडाओरडा करून निषेध करणे, थेट मोदींना जबाबदार धरणे, देशात भीतिचे व दडपशाहीचे वातावरण आहे असे वेगवेगळ्या परिसंवादांमध्ये सांगत रहाणे, वृत्तपत्रातून लेख लिहून या हत्येमागे हिंदुत्ववादी संघटनांचा फॅसिस्ट, दहशतवादी, अतिरेकी चेहरा आहे असा कोणत्याही पुराव्याविना सतत आरोप करीत राहणे, मिळालेले पुरस्कार परत करण्याचे नाटक करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करणे इ.

रमेश आठवले's picture

1 Nov 2015 - 11:03 pm | रमेश आठवले

छान विश्लेषण

अनिरुद्ध.वैद्य's picture

31 Oct 2015 - 4:46 pm | अनिरुद्ध.वैद्य

म्हणजे बजरंग दल दंगा करत म्हणून त्यांना कापायचं असंच न?

अर्धवटराव's picture

28 Oct 2015 - 7:30 am | अर्धवटराव

निर्भया वगैरे प्रकरणांमुळे जी संवेदना द्रवली नाहि, सलमानभौला कायद्याच्या कचाटीत आणणार्‍या पाटलाच्या पोराचे हाल-हाल मरण बघुन ज्या प्रतिभेला पाझर फुटला नाहि, नाना-मक्या फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावायचे प्रयत्न करत असताना अशी परिस्थिती मुळात उद्भवलीच कशामुळे वगैरे प्रश्नांनी जी सद्भावना जागी झाली नाहि, ति अचानक देशातलं वातावरण फार म्हणजे फारच -ते हि अचानक, आणि काहि केंद्र शासनाने मुद्दाम तसं केल्यामुळे - अगदी झंकारुन उठली आहे. साहित्यीकांचा फार फार अभिमान वाटतो आहे मला :)

बाकि हा लेख साहित्यीक चळवळीची पुढील पायरी म्हणावा असा फक्कड जमुन आला आहे.

अवांतरः मानवी जीवनाचं अवमुल्यन घडवणार्‍या घटकांना सरळ पोलिसी दंडुके वापरुन दोन मिनीटात ठीक करता येतं... आणि राज्य सरकारे तसं अगदी सहज करु शकतात. किंबहुना ते त्यांचं प्रथम कर्तव्य आहे. पण अशा किरकोळ मुद्द्यांना फाट्यावर मारलेलं बरं. :)

प्यारे१'s picture

28 Oct 2015 - 7:53 pm | प्यारे१

+१
देर से आये दुरुस्त आये म्हणून आम्ही देखील साहित्यिकांचे अभिनंदन करतो.
तरीही अर्धवटरावांच्या प्रतिसादाचा निषेध.

श्रीगुरुजी's picture

2 Nov 2015 - 3:04 pm | श्रीगुरुजी

देर से आये दुरुस्त आये म्हणून आम्ही देखील साहित्यिकांचे अभिनंदन करतो.

हे खरे नाही. हे तथाकथित विचारवंत देरीने आलेले नाहीत आणि दुरूस्त देखील आलेले नाहीत. पुरस्कार ऑक्टोबर २०१५ मध्ये करण्यामागची त्यांची मुख्य कारणे खालीलप्रमाणे -

(१) २० ऑगस्ट २०१३ रोजी नरेंद्र दाभोलकरांचा खून (केंद्रात सत्ताधारी - युपीए, राज्यात सत्ताधारी - काँग्रेस + राष्ट्रवादी)
घटना घडून २ वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर यांना जाग आली. खुनानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग व तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दोष दिला नाही.

(२) २० फेब्रुवारी २०१५ रोजी गोविंद पानसरेंचा खून (केंद्रात सत्ताधारी - भाजप, राज्यात सत्ताधारी - भाजप)
घटना घडून ७ महिन्यांहून अधिक काळ लोटल्यानंतर यांना जाग आली. खुनानंतर तत्कालीन पंतप्रधान मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना दोष दिला नाही.

(३) ३० ऑगस्ट २०१५ रोजी कलबुर्गींचा खून (केंद्रात सत्ताधारी - भाजप, राज्यात सत्ताधारी - काँग्रेस)
घटना घडून १ महिन्यांहून अधिक काळ लोटल्यानंतर यांना जाग आली. खुनानंतर तत्कालीन पंतप्रधान मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना दोष दिला नाही.

(४) .............

(५) ३० सप्टेंबर २०१५ रोजी दादरी येथे अखलाखचा खून (केंद्रात सत्ताधारी - भाजप, राज्यात सत्ताधारी - सपा)
आता मात्र यांना जाग आली. खुनानंतर तत्कालीन पंतप्रधान मोदींवरच या खुनासाठी व सर्व आधीच्या खुनांसाठी दोष द्यायला सुरूवात झाली. कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा नामोल्लेखही नाही.

(६) .............

काही जणांना वाटले की पूर्वी हे जागे झाले नव्हते, पण निदान उशीरा का होईना हे जागे झालेत हे चांगलेच झाले. परंतु हे उशीरा जागे झाले आणि योग्य कारणासाठी जागे झाले हे खोटे आहे. कारण वर न लिहिलेली घटना क्रमांक (४) आणि (६).

(४) २५ सप्टेंबर २०१५ रोजी यवतमाळमध्ये अब्दुल मलिक नावाच्या एका मुस्लिम तरूणाने नमाज संपल्यावर बंदोबस्तावर असलेल्या एका पोलिसाला भोसकले. गोवंश हत्याबंदीमुळे संतापलेल्या एका मौलवीने प्रक्षोभक भाषण करून चिथावणी दिल्यामुळे अब्दुल मलिकने एका पोलिसाला भोसकले व इतर २ पोलिसांवर हल्ला केला. While stabbing him, an angry Malik allegedly shouted, “Tumhari government beef ban karti hai, toh yeh lo (Your government bans beef, so you suffer).” Malik allegedly also attacked two more constables who tried to intervene.

http://indianexpress.com/article/india/india-news-india/maharashtra-cons...

ही घटना दादरीच्या ५ दिवस आधी म्हणजे २५ सप्टेंबरला घडली. हा उघडउघड जातीयवादी द्वेषातून केलेला हल्ला होता. या घटनेवर आजतगायत पुरस्कार परत करणार्‍यांपैकी एकानेही तोंड उघडलेले नाही.

(६) ८ ऑक्टोबर २०१५ रोजी मंगळूरमध्ये प्रशांत पुजारीला अनेक मुस्लिमांनी एकत्र येऊन त्याचा खून केला. कारण तो गोवंशहत्येला विरोध करीत होता. हा उघडउघड जातीयवादी द्वेषातून केलेला हल्ला होता. या घटनेवर आजतगायत पुरस्कार परत करणार्‍यांपैकी एकानेही तोंड उघडलेले नाही. जर हे विचारवंत "देर आए, दुरूस्त आए" होते, तर दादरीनंतर घडलेल्या निदान या हल्ल्याचा तरी त्यांनी निषेध करायला हवा होता. पण तसे झालेले नाही, कारण वरील दोन्ही घटनात हल्लेखोर मुस्लिम होते व बळी हिंदू होते.

http://www.daijiworld.com/news/news_disp.asp?n_id=363789

हे सिलेक्टिव्ह निषेध करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. यांचा ढोंगीपणा पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे. दादरी घटनेच्या आधी आणि नंतर घडलेल्या घटनेबद्दल मौन पाळताना यांनी फक्त दादरीचाच निषेध केला कारण दादरीचे हल्लेखोर हिंदू होते व बळी मुस्लिम होता आणि इतर २ घटनांमधील हल्लेखोर मुस्लिम होते व बळी पडलेले हिंदू होते.

हे तथाकथित विचारवंत देरीने आलेले नाहीत आणि दुरूस्त देखील आलेले नाहीत. नक्की कोणत्या घटनेचा निषेध करायचा आणि कधी तोंड बंद ठेवायचे हे यांना चांगलेच समजते. दुसर्‍या एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे यांचे वर्तन हे हल्लेखोरांचा धर्म व बळी पडलेल्यांचा धर्म यावर ठरते.

देरीने दुरुस्ती केल्याबद्दल प्यारेंचा णिशेढ !!

भंकस बाबा's picture

30 Oct 2015 - 12:20 am | भंकस बाबा
आकाश कंदील's picture

28 Oct 2015 - 5:12 pm | आकाश कंदील

एक दुर्लक्ष करण्यायोग्य धागा

आणी हो ते पुरस्कार परत करणारे सुध्दा दुर्लक्ष करण्यायोग्यच

रामदास's picture

28 Oct 2015 - 7:46 pm | रामदास

धागा वाचनीय आहे. चर्चा होणे आवश्यक आहे. आपण सर्वच या संस्थळावर संवेदनाशील नागरीक आहोत. जर दुर्लक्ष करण्यायोग्य धागा असेल तर तुमच्या मताचेही स्वागत असावे पण तुम्हीही हा धागा दुर्लक्ष करण्यासारखा का आहे या बद्दल चार शब्द लिहावे.

रामदास साहेब प्रतिसादाबद्दल आभार. मी "एक दुर्लक्ष करण्यायोग्य धागा" असे लिहिले कारण मला "अर्धवटराव " आणि "ट्रेड मार्क" यांचे मुद्दे पटले आणि तेच परत आपले म्हणून लिहावेसे नाही वाटले. मला वाटते विरोधी पक्ष सरकारला विरोध करणार आणि आपल्या देशात तर बरेचवेळा विरोध करायचा म्हणून केला जातो. म्हणूनच पत्रकार आणि माध्यमांनी तरी संतुलित विचार करावा असे मला वाटते. माझ्या माहिती प्रमाणे "साहित्य अकादमीने " आत्ता पर्यंत १२२७ पुरस्कार दिले आहेत.(तज्ञ योग्य आकडा सांगतीलच) त्यातील धागा लेखक "डॉ. सुधीर रा. देवरे" यांच्या सांगण्याप्रमाणे आत्तापर्यत २० पुरस्कार परत केले गेले. म्हणजे अंदाजे १.६३% म्हणजे दुसरा अर्थ असा कि ९८.३७ % साहित्यिकांनी पुरस्कार परत केले नाहीत आणि खचितच हा आकडा दुर्लक्ष करण्या एवढा नाहि. तरी TV वाहिन्यावर, पेपरात सर्वत्र एकच विषय त्यावरच चर्चा.
गोमांस बंदी हा कायदा फार पूर्वीपासून लागू आहे. तो मुद्दा मला वाटते माध्यमे मुद्दाम उकरतात, कोणीतरी साक्षी महाराज, उमा भारती, वि. के. सिंग यासारक्या विचार करून न बोलाण्यार्या व्यक्तींचा साक्षात्कार घेतात आणि ते बोललेले आणि नबोललेले असे म्हनून "breaking news" म्हणून खपवतात. आणि वर अपेक्षा कि जरी सरकारने, पक्ष म्हणून भाजपने यावर नापंसन्ति दर्शवली तरी मोदिनी त्याचे खंडन करावे, आता जरी ते केले तरी इतक्या उशिरा का केले म्हणून आक्षेप. मला वाटते एखादा पक्ष किवा व्यक्तीचे कोणीच समाधान करू शकणार नाही जर त्यांना तसे जाणूनबुजून करून घ्यायचे नसेल तर. मला तर या सर्व पुरस्कार वापसी मागे मोठी राजकीय शक्ती काम करत असावी असे वाटते. मला एक विचारेवेसे वाटते अत्तापार्यत कित्ती लेखक आणि पत्रकार प्रशांत पुजारीच्या हत्येबद्दल बोलले, कश्मीरी निर्वासित लोकांबद्दल बोलले, आसामातील सामुहिक हत्याबद्दल बोलले, बंगाल मधील "Nalhati" गावात ३ वर्ष दुर्गापूजा होऊन दिली जात नाही ती का ?. का त्याला त्यांच्या भाषेत TRP मुल्य नाही म्हणून. दादरी हत्याकांड किवा या सारख्या नृशंस घटना घडणे कधीही दुख दायक, पण यासारख्या घटनांना रोज प्रसारित करून आपण समाजातील तेढ वाढवत असतो.

शेतकऱ्याच्या आत्महत्या, G.S.T. विधेयक, कमी होणारे पेट्रोलचे भाव, वाढणारे डाळीचे भाव, लघु उद्योजकाकरिता असणारी मुद्रा बँक योजना, pension योजना, परराष्ट्र धोरण, वाढणारे जमिनीचे भाव यासारख्या विषयावर अळीमिळी गुपचिळी आणि भावनिक मुद्दे पहिल्या पानावर. सहज आठवले दोन दिवसापूर्वी लोकसत्ता पेपरमध्ये कोजागिरीचा चंद्र ढगाळ हवामांमुळे नीट दिसणार नाही हि पहिल्या पानावरिल मोठी सचित्र बातमी आणि कित्येक तरुणांना अपेक्षित आणि दिलासा देणारी बातमी म्हणजे आता ब, क ड वर्गाना (Gazette officer सोडून) साक्षात्काराची गरज नाही हि बातमी आतील ४ थ्या पानावर ती पण १० ओळीत. आता काय बोलणं दादा सांगा

रामदास's picture

29 Oct 2015 - 8:09 pm | रामदास

उदाहरणार्थ : शेवटच्या परीच्छेदातील अत्यावश्यक बाबींबद्द्ल.
आता प्रश्न मनात येतो तो असा की मिडीया हे प्रश्न मुख्यपृष्ठावर का आणत नाहीत ?
मला असे वाटते की इतरांप्रमाणे (इतर उद्योगाप्रमाणे) खपणारा माल ते शोकेस मध्ये आणून ठेवतात. विचार करायला लावणार्‍या बातम्या वाचकांना निरस वाटत असाव्या असे त्यांचे निरीक्षण असावे. हाच प्रकार राजकारणी व्यक्तिंचा असावा. एरवी "ऑल्सो रॅन " या यादीत बसणारे "काय बरळत आहेत " असा माझ्या मनात विचार येतो तेव्हा "वा! काय बोलले हो ?" असे म्हणणारे पण असतीलच. तूर्तास त्यांची संख्या जास्त असली तर मिडीया त्यांना अनुकुल असे मथळे देत राहणार आहे.
आता मूलतत्ववादी( हा शब्द बरोबर आहे का ?) सरकार येऊन अराजक माजेल का ? असा प्रश्न लेखकाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही त्या लेखकाच्या मनातील भिती बोलत आहे असे मी मानतो. पण असे भितीदायक प्रश्न वारंवार मनात यावे ही स्थिती प्रत्येकाच्या मनात उभी राहत असेल. लेखकाने ती मांडून दाखवली आहे.
अशा परीस्थितीत आपण सर्वजण जी चर्चा करत असतो त्या चर्चेची दखल कुठेतरी घेतली जातच असेल असे मला वाटते.(किंबहुना मला तशी खात्री आहे .)
या निमित्ताने तुम्ही चर्चेत भाग घेतला हे पण महत्वाचे आहे. धन्यवाद.

अमृत's picture

29 Oct 2015 - 1:59 pm | अमृत

आशा आहे तुम्हाला मंगल पांडेनी पहिली गोळी का चालवली याचं कारण माहिती असेलच. जर खाण्याविशयी बोलाल तर का म्हणून एका विशिष्ट समूहातील लोकांचे लाड करावेत. जर त्यांच्या काही सवयी बहुतांशांच्या भावन दुखावणार्या असतील तर त्यांनीसुद्धा थोडी अ‍ॅडजस्टमेंट का करू नये?

प्रश्न हाच आहे की घंटा बांधणार कोण? गेल्या कित्तेक दशकांपासून लाडोबा बनवून ठेवलय तेव्हा बदल मान्य करताना त्रास होणारच.

तर्राट जोकर's picture

29 Oct 2015 - 5:22 pm | तर्राट जोकर

ओके ओके, आपण भारतात भगवा तालिबान आणण्याच्या समर्थनात आहात तर...

द-बाहुबली's picture

29 Oct 2015 - 6:03 pm | द-बाहुबली

ओके ओके, आपण भारतात भगवा तालिबान आणण्याच्या समर्थनात आहात तर...

घाबरु नका हो, भगवा तालिबान म्हणजे सावरकरांना अभिप्रेत नसलेले हिंदुराष्ट्र म्हणताय का ?

ते होणार नाही कारण एवरीवन नोज हिंदु राश्ट्रा इज अ फेल्ड कॉन्सेप्ट... जेव्हां फक्त ब्राम्हणांना शिक्षणाधीकार होते भारताची अवस्था शिक्षण क्षेत्रात काय होती ? जेंव्हा फक्त क्षत्रीयांकडे संरक्षणाच्या जबाबदार्‍या होत्या, संरक्षण क्षेत्रात भारताची अवस्था काय झाली ? जेंव्हा फक्त वैश्य व्यापार करत होते भारताची अवस्था व्यापारात काय होती किती भारतीयांनी वसाहती निर्माण केल्या ? इन इंडीया एवरीवन नोज.. भगवा तालिबान इज ह्युज फेल्युअर. जे शतकोनशतके मुघल राजवटीखाली राहुन उमजले नाही ते दिडशे वर्षात इंग्रज राजवटीमुळे कळाले ते म्हणजे सावरकरांना अभिप्रेत नसलेले हिंदुराष्ट्र हे भारताचे न भुतो न भवीष्यती अपयश आहे अन पुन्हा तोच ऐतीहासीक चुकांचा कित्ता गिरवायची हौस/क्षमता भारतीय जनतेत आता नक्किच उरली नाही.

तर्राट जोकर's picture

29 Oct 2015 - 5:32 pm | तर्राट जोकर

भाजप सरकारला पाठीशी घालणारे प्रतिसाद पाहिले की तळपायाची मस्तकात जाते. शिवाय मुद्दे मांडायची एक टिपिकल पद्धत आहे. समोरच्याला चकवून खर्‍या मुद्द्याला सोयिस्कर बगल द्यायची. कंटाळा आलाय तिच्यायाला....

ठिक आहे बाबा... करा हिंदूराष्ट्र. दाखवा तुमचा हिंदूअभिमान. तुमचे सर्व प्रॉब्लेम्स देश हिंदूराष्ट्र नसल्यामुळेच आहे. तुरीच्या डाळीचे भाव वाढले ते एक मायचा लाल पुढे नाही आला विरोध करायला. इथे सारी भाजपाची तळी धरतायत. व्वारे देशप्रेम. कि फक्त पक्ष-प्रेम, कि जाती-प्रेम?

भंकस बाबा's picture

30 Oct 2015 - 12:35 am | भंकस बाबा

मी पण मला इयत्ता पहिलीत चमचा गोटी स्पर्धेत मिळालेले तृतीय क्रमांकाचे पारितोषिक शाळेला परत करत आहे. आता मलापण टीवी वर झळकन्याचा मोका द्या

बोका-ए-आझम's picture

31 Oct 2015 - 3:41 pm | बोका-ए-आझम

अच्छा! म्हणजे तुम्हाला या देशात हुकूमशाही हवी आहे तर! बरं, तो मागे एक धागा झोपवण्याची वगैरे वल्गना केली होती, त्याचं काय झालं? जे सरकार या देशात व्यवस्थित बहुमत मिळवून निवडून आलेलं आहे, त्याला पाठिंबा देणारे प्रतिसाद पाहिल्यावर जर तुमची तळपायाची आग मस्तकाला वगैरे जात असेल तर मग लोकशाही तुम्हाला मान्य नाही असाच अर्थ निघतो त्यातून. उद्या काँग्रेसचं किंवा इतर पक्षाचं सरकार आलं तर आमच्या तळपायाची आग वगैरे काहीही मस्तकाला जाणार नाही. बहुमताने आलेलं सरकार स्वीकारणं आणि त्या मताचा सन्मान करणं ही लोकशाही आहे आणि ज्यांच्या तळपायाची वगैरे फालतू आगी मस्तकात जातात, त्यांनी स्वतःमध्ये लोकशाही रुजवावी!

सुबोध खरे's picture

29 Oct 2015 - 7:22 pm | सुबोध खरे

हिंदू राष्ट्र कुणाला हवे आहे? आम्हाला भारत देश हवा आहे.
आम्हाला निधर्मी राष्ट्र हवे आहे. अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करणारे नव्हे.
गोमांस खावे कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. गोवध बंदीला व्यक्तीशः माझा विरोध आहे. जातीव्यवस्था किंवा चातुर्वर्ण्य पद्धतीला कोण पाठींबा देत आहे ? या गोष्टी केंव्हाच( निदान १००० वर्षापूर्वी) कालबाह्य झाल्या आहेत.
माझा विरोध या तथाकथित सेक्युलर विचारवंतान्बद्दल आहे जे याकुब मेमन च्या फाशीच्या वेळेस सर्वोच्च न्यायालयावर टीका करायला पुढे आले. अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण म्हणजे सेक्युलर हा गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. अल्पसंख्यांकाना त्यांच्या संस्थामध्ये ५० टक्के राखीव जागा हे कसे चालवून घेता येईल.
भगवा तालिबान कुणालाच नको आहे. गायीचे शेण पवित्र म्हणून खाण्याची किती लोकांची तयारी असेल? आपली परंपरा कितीही थोर असली तरी मोक्ष घोर आहे हे शाहीर रामजोशी नि म्हटले आहे. आपण ओडीसा मध्ये न गन्ज्णारे लोखंड २००० वर्षापूर्वी बनवत होतो म्हणून ते तंत्रज्ञान आज वापरणार का? किंवा पारंपारिक ज्ञान/ तंत्र वापरून रस्ते घरे बांधणार का किंवा आधुनिक रुग्णालये/ वैद्यकीय महाविद्यालये बंद करुन जुन्या पद्धतीची गुरु शिष्य परंपरेचे पुनरुज्जीवन करणार का? अर्थातच नाही.
धर्म हा घरातच असावा या विधानाला येथील बहुसंख्य लोक पाठींबा देतील मग मशीदीवर असो कि गणेशोत्सवात असो बोंबल्या (लाउड स्पीकर) नकोच असेच बहुसंख्य म्हणतील). कानठळ्या बसवणारे ढोल ताशे हि नकोत किंवा महा मिरवणुकाही नकोत. प्रत्येक गावात एकच मंदिर( त्यात हव्या तितक्या मूर्त्या ठेवा) एकच मशीद असावी. एकच चर्च असावे अल्पसंख्यांकांना सवतासुभा बंद असावा. विज्ञानाची कस धरून पुढच्या शतकात जाणारा भारत हवा आहे. मान्य आहे हे फारच आदर्शवादी तत्वज्ञान आहे.
राहिली गोष्ट डाळीचे भाव-- मागच्या सरकारच्या वेळेस कांद्याचे भाव गगनाला भिडले होते तेंव्हा हे विचारवंत कुठे होते? भाव वाढ झाली याचे कारण व्यापारी साठेबाजी करतात म्हणून सरकार नेहमीप्रमाणे सावकाश काम करते. पण केवळ एक अजेंडा घेऊन विखारी प्रचार करणाऱ्या या तथाकथित बुद्धीवान्तानचा संताप येतो. डाळींचा भाव हे पुरस्कार परत करण्याचे कारण असू शकते का ?
महागाई हे कारण घेऊन सरकारला झोडपण्याचा हेतू विचारवंतानी का करावा त्यासाठी विरोधी पक्ष आहेतच कि. मग स्वच्छपणे तुम्ही त्या पक्षात सामील व्हा आणि बोला. संताप यांच्या दुटप्पीपणाचा आहे.
भाववाढ झाली तर त्याबद्दल काय भाजप प्रेमी खुशीत आहेत का?
अराजक अराजक म्हणून जो साप म्हणून भुई बडवण्याचा अश्लाघ्य प्रकार चालू आहे तो बंद झाला पाहिजे.

तर्राट जोकर's picture

29 Oct 2015 - 7:39 pm | तर्राट जोकर

माझ्या वरच्या प्रतिसादातला पहिला मुद्दा उदाहरणासहित सिद्ध करणारा प्रतिसाद लगेच....! :-)

काँग्रेस सरकारकाळात कांद्याच्या भावाच्या वेळेस, महागाईबद्दल भक्तगण आरडाओरडा करत होते ते आता कुठे गेले...? तेव्हा सोशलमिडीयावरून भरभरून महागाईचे संदेश वाहत होते, आता फक्त गाईचे संदेश वाहतात.... आता अच्छे दिन आलेत ना. भाजपप्रेमींना तोंड कुठे राह्यलंय. त्यांचं तोंड ह्या फालतूच्या चर्चा करण्यात बीझी आहे.

डोळे मिटून दूध पिणार्‍या भाजपाला जग आंधळं नाही हे कधी समजेल...?

सुबोध खरे's picture

29 Oct 2015 - 7:48 pm | सुबोध खरे

दोन मुद्द्यांची सरमिसळ

दत्ता जोशी's picture

29 Oct 2015 - 11:19 pm | दत्ता जोशी

सोप्प आहे. मुद्दे संपले कि विषय भरकट्वत न्यायचा. हीच तर खासियत आहे ना असल्या विचारवंतांची. हेतू पुरस्सर ठराविक घटना हायलाईट करायच्या आणि तशाच दुसर्या घटनेकडे डोळेझाक करायची मग हिंदू राष्ट्र , महागाई, गोहत्या बंदी, बाजारू विचारवंतांचे सिलेक्तीव्ह मुद्दे उगीच फिरून फिरून टाकत राहायचे. आणि गोंधळ निर्माण करायचा प्रयत्न करायचा. मग काही मिळाल नाही कि काश्मिरी पंडिताची हत्या झाली तेव्हा तुम्ही कुठे होता, मग तुमचे पूर्वज कसे भित्रे आणि अल्पसंतुष्ट होते असला काहीही लिहित सुटायचं आणि काय.
हि सगळी घुसमट वेगळ्याच कारणासाठी आहे. व्यवस्था बदलतांना आधीच्या व्यवस्थेत विरघळून गेलेल्यांना होणारा त्रास अशी याची व्याख्या करावी लागेल. मग मिळेल तो मुद्दा म्येग्निफाय करावाच लागणार. प्रत्येक गोष्टीला धर्माचा, जातीयवादाचा रंग द्यावा लागणार. महागाई रोखण्यात भाजपा ला अपयश आला हे मोठ्या प्रमाणात खरा असला तरी भ्रष्टाचार आणि शासकीय यंत्रणांमधली अंदाधुंदीवर फास आवळण्याचा भाजपचा प्रयत्न प्रामाणिक वाटतोय तेव्हा बर्याच लोकांची घुसमट हि होणारच.

तर्राट जोकर's picture

29 Oct 2015 - 7:59 pm | तर्राट जोकर

अगदी अगदी.....! त्यात नवीन काय..?

सुबोध खरे's picture

29 Oct 2015 - 8:13 pm | सुबोध खरे

म्हणजे मूळ धाग्यात महागाई ई. विषयांचा उल्लेखही नसताना आपण तो ओढून ताणून आणता आहात "तुरीच्या डाळीचे भाव वाढले ते एक मायचा लाल पुढे नाही आला विरोध करायला" तर आपला भाजप द्वेषच दिसून येतो आहे.
राहिली गोष्ट आपला आय डी ७ महिने ३ आठवडे नवा असताना आपल्याला अगोदरच्या सरकारच्या वेळेस मि पा वर झालेली आरडा ओरड कशी आठवली?
"काँग्रेस सरकार काळात कांद्याच्या भावाच्या वेळेस, महागाईबद्दल भक्तगण आरडाओरडा करत होते ते आता कुठे गेले...?"
असो. आपले पाय किती पाण्यात आहेत ते पहा.

तर्राट जोकर's picture

29 Oct 2015 - 8:39 pm | तर्राट जोकर

बाब्बौ, डॉक्टर.....? आर यु ऑल राइट..?

तुमच्या प्रतिसादावरून असं समजतंय की मिपा हेच आंतरजालावरचे एकमेव सोशल मिडिया संस्थळ आहे. मिपावरच्या आयडी फक्त मिपावर झालेल्या चर्चांचे संदर्भ घेऊन बोलत असतात. सदस्य झाल्यावरच मिपा वाचू शकतात. मिपा आयडीचे वय हा त्याच्या प्रत्यक्ष वयाचा दाखला आहे.

मिपाच्या बाहेरही एक भल्लं मोठ्ठं जग आहे हे तुमच्या सारख्या ज्येष्ठ सद्स्यांना मी सांगावं हे काय बरोबर दिसणार नाही.

पुरस्कार परत करणार्‍यांवर सगळ्या सोशलमिडीयासंस्थळांवरून भक्तगण चिखलफेक करण्यात मश्गुल आहेत. गायीचे धार्मिक महत्त्व पटवण्यात मश्गुल आहेत. पुरस्कार परत करणारे जर इतकेच अनुल्लेखनिय अदखलपात्र आहेत तर त्यांच्या विरूद्ध इतके घमासान कँपेन का चालू आहे हे मला म्हणायचे आहे. खर्‍या देशभक्तांच्या प्रायोरिटी लिस्ट मधे सामान्य जनतेला भेडसावणार्‍या समस्या टॉपला हव्यात. अडगळीत पडलेले कोणी साहित्यिक किंवा त्यांचे बालीश वर्तन नाही.

डाळीचा मुद्दा महागाईचे, लोकांच्या अपेक्षांचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. ते छद्मी देशभक्तांना महत्त्वाच्या मुद्द्यांची आठवण करून देण्यासाठी वापरले आहे ज्याला ते सपशेल अनुल्लेखाने मारत आहेत.

भंकस बाबा's picture

30 Oct 2015 - 12:41 am | भंकस बाबा

त्या कुलबर्गी ना का मारले हो? हे नाव होटेलातल्या डिश सारखे वाटते नाही?

सुबोध खरे's picture

29 Oct 2015 - 8:47 pm | सुबोध खरे

पुरस्कार परत करणारे जर इतकेच अनुल्लेखनिय अदखलपात्र आहेत तर त्यांच्या विरूद्ध इतके घमासान कँपेन का चालू आहे
कारण मिडिया त्यांना विकला गेला आहे. रोज कोणत्यातरी अडगळीत पडलेल्या साहित्यिकाने पुरस्कार परत केल्याची बातमी पहिल्या पानावर कशी येते हो?
गायीचे धार्मिक महत्त्व हा मुद्दा इथे कसा आला? येथील बरेच सदस्य गायीला उपयुक्त पशु मानतात. (मी त्यातच आहे)
राहिली गोष्ट अराजकाचा आणी डाळीचा भाव याचा ( बादरायण) संबंध आपण का लावलात हे समजले नाही? भाजपचा द्वेष आपण करा त्याबद्दल म्हणणे नाही. आपल्या मताचा आदर आहे. फक्त बाजीरावाची शेंडी अहमदशहा अब्दालीला लावू नका.

रामपुरी's picture

29 Oct 2015 - 9:13 pm | रामपुरी

पण त्यांना बाजीरावाची शेंडी अहमदशहा अब्दालीलाच लावायची आहे. लावू द्या. त्याही मताचा आदर आहेच की. :)

कापूसकोन्ड्या's picture

29 Oct 2015 - 9:59 pm | कापूसकोन्ड्या

त्यांना जो पुरस्कार मिळाला तो विधिवत निवडून आलेल्या सरकारेन दिला आहे.तो सर्व लोकांतर्फे दिलेला आहे. त्या सर्वांच हा अपमान आहे.
याना मिळ्णारी दुभती गाय त्यानी मारली आहे. कित्येक वर्षे ही गाय चारा सरकार चा आणि दुध याना देत होती. दुखरी नस तिथे आहे. हजारो एन्जीओ कित्येक वर्षे इन्कम टॅक्स नाहीच पण साधा रितर्न पण भरत नाहीत. त्यांच्या नाड्या आवळल्या आहेत. हे सर्व लोक लुच्चे आणि भ्रष्ट आहेत.

तर्राट जोकर's picture

29 Oct 2015 - 11:34 pm | तर्राट जोकर

भाजपाच्या प्रामाणिक प्रयत्नावरून आठवली,. सिंहाला डावलून माकडाला जंगलाचा राजा करतात ती कहाणी....

ट्रेड मार्क's picture

30 Oct 2015 - 1:43 am | ट्रेड मार्क

सिद्ध करा की मे २०१४ पासून कुठले भ्रष्टाचार झाले. त्यात किती पैश्यांचा अपहार झाला आणी त्यात कोण कोण गुंतले आहेत. नुसत्या डरकाळ्या मारून कोणी सिंह होत नाही आणि शेपूट लावून माकड पण होत नाही.

नुसतेच म्हणता, एका ठिकाणी "या धाग्याचा एका फटक्यात निकाल लावता येईल", दुसर्या ठिकाणी "आत्ता वेळ नाही नंतर सविस्तर प्रतिसाद देतो". अजून कुठे, "आत्ता एवढंच सांगतो, नंतर सवडीने प्रतिसाद देइन" पण हे सविस्तर प्रतिसाद कधीच आले नाहीत आत्तापर्यंत.

एका प्रतिसादात एवढेच मुद्दे लिहितो कारण जास्त लिहिले तर तुम्ही सोयीनुसार काही मुद्द्यांवरच प्रतिसाद देता. विशेष करून पहिल्या मुद्द्यावर उत्तर अपेक्षित आहे. (असं म्हणून तुमची घुसमट करत नाहीये. "विशेषकरून" या शब्दाला महत्व आहे. तुम्ही या दोन्ही किंवा अजून कुठल्या ही मुद्द्यावर उत्तर देवू शकता. पण मला पहिल्या मुद्द्याच्या उत्तरात जास्त रस आहे.)

तेव्ह्डीच आपली आम्हाला आपल्या ज्ञानात भर टाकता येइल.

बाकी तुमचे चालू द्या नेहमीप्रमाणे, लगे रहो.

तर्राट जोकर's picture

29 Oct 2015 - 11:36 pm | तर्राट जोकर

सर्टीफिकेट आणि शिक्का घेऊन फिरणारे फेरिवाले इकडेही आले आहेत.

दत्ता जोशी's picture

29 Oct 2015 - 11:59 pm | दत्ता जोशी

काय करणार फिरावाच लागतं विचारवंतांची घुस्मट होते न! ..

तर्राट जोकर's picture

30 Oct 2015 - 12:24 am | तर्राट जोकर

एवढी काळजी करता म्हणुन घुसमट होते हो... काळजी करणं सोडा घुसमट थांबेल, पण हो... तुमचा पोटापाण्याचा धंदा बंद पडेल, तेवढं बगा मंजी झालं.

दत्ता जोशी's picture

30 Oct 2015 - 3:14 pm | दत्ता जोशी

<<<<तुमचा पोटापाण्याचा धंदा बंद पडेल,>>>>
च्छ्या!! फारच त्रास करून घेत बुवा... .. :=D :=D :=D

आकाश कंदील's picture

30 Oct 2015 - 10:44 am | आकाश कंदील

तर्रात जोकर साहेब, काही लोक आपल्या व्यक्तिमत्वा प्रमाणे टोपण नवे वापरतात याची प्रचीती आली

दत्ता जोशी's picture

30 Oct 2015 - 3:07 pm | दत्ता जोशी

सहमत. तेव्हढाच तर जमू शकतं ना.

मार्मिक गोडसे's picture

30 Oct 2015 - 1:13 pm | मार्मिक गोडसे

सिद्ध करा की मे २०१४ पासून कुठले भ्रष्टाचार झाले. त्यात किती पैश्यांचा अपहार झाला आणी त्यात कोण कोण गुंतले आहेत.

एक वेळ तो भष्टाचार परवडला. परंतू सरकार प्रायोजीत कृत्रिम महागाई ही अधीक भयानक. डाळ व कांद्याच्या साठेबाजीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने जनतेच्या खिशातून करोडोचा पैसा व्यापार्‍यांनी लूटला. साखरेचे विक्रमी उत्पादन व मागील वर्षाच साठा शिल्लक असल्यामुळे साखरेचे भाव गडगडले. सरकारने साखरेचा निर्यात कोटा वाढवण्याचा निर्णय घेतल्याबरोबर फक्त ३ दिवसात साखरेचे घरगुती भाव ६- ८ रुपयांनी वाढले. साखरेचा निर्यात भाव २५ ठेवूनही आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी नसल्यामुळे साखरेची निर्यात वाढली नाही. अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांकडून पडेल भावात व्यापार्‍यांनी प्रचंड प्रमाणात साखर खरेदी केली. अनुदान दिल्याशिवाय साखरेची निर्यात वाढणार नाही, साखर निर्यात केल्याशिवाय कारखाने शेतकर्‍यांची ऊस थकबाकी देऊ शकनार नाही, आणि बिहार राज्याच्या निवडणुका झाल्याशिवाय केन्द्र सरकार अनुदान देणार नाही. मधल्यामधे व्यापारी ह्या परिस्थितीचा फायदा उठवत आहे. कांदे,डाळ व साखरेचे खरे लाभार्थी शोधून काढने महाकठीण. कदाचीत २ जी पेक्षाही हा घोटाळा मोठा असू शकेल. निदान २ गी घोटाळ्यामुळे जनतेचे प्रत्यक्ष नुकसान झाले नव्हते, परंतो ह्या कांदे,डा़ळ व सा़खरेच्या घोटाळ्यामुळे जनतेचे थेट आर्थिक नुकसान होत आहे. पुढेही होत राहील.सरकारला भ्रष्टाचार करायची गरजच उरली नाही.

अन्या दातार's picture

30 Oct 2015 - 2:00 pm | अन्या दातार

साखरेचे विक्रमी उत्पादन व मागील वर्षाच साठा शिल्लक असल्यामुळे साखरेचे भाव गडगडले.

याला सध्याचे सरकारच कसे जबाबदार आहे? साखर कारखाने काढायला परवानगी देणार्‍यांबद्दल काय?

साखरेचा निर्यात भाव २५ ठेवूनही आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी नसल्यामुळे साखरेची निर्यात वाढली नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारातली मागणी सरकार कसे ठरवू शकेल?

अनुदान दिल्याशिवाय साखरेची निर्यात वाढणार नाही

ऑलरेडी ४००० रुपये प्रतिटन सबसिडी दिली जाते आहेच. पण अनुदान दिल्याशिवाय निर्यात वाढणार नाही हे कसे? तेवढा एकच मार्ग आहे काय? भाव पाडून तर सगळेच देश बसलेत. जर अनुदान वाढवत नेले तर त्याचा फायदा फक्त आणि फक्त कारखान्यांना होईल. मग परत सामान्य माणसाला काय मिळणार? कारखाने काय चॅरिटीसाठी बसलेत का? तसे असेल तर आजवर त्यांनी १५-२० रुपये किलोने साखर (अंदाजे ब्रेक इव्हन भावास) का नाही उपलब्ध केली? यापूर्वी ५०-६० रु. किलो भाव उपलब्ध असताना प्रॉफिट केलाच असेल. तो कुठे गेला? त्यातून ऊस उत्पादकाला पैसे देता आले नसते का?

साखर निर्यात केल्याशिवाय कारखाने शेतकर्‍यांची ऊस थकबाकी देऊ शकनार नाही

प्रच्चंड हास्यास्पद वाक्य! कॉस्ट कंट्रोल मेकॅनिजम्स मोडीत काढून भरमसाट खर्च जो केला तो टाळूनही साखर कारखान्यांकडे तरलता असू शकते. साखरेचे अर्थकारण तुम्हास खरेच माहित आहे काय?

मधल्यामधे व्यापारी ह्या परिस्थितीचा फायदा उठवत आहे.

हे गेल्या सरकारांच्या काळातही चालतच होते. तुम्ही उद्यापासून ३ दिवसात एखाद्या शेअरची किंमत ६-८ रुपयांनी वाढल्यानंतर प्रॉफिट बुक करणार नाही काय?
बाकी डाळींच्या बाबतीत धाडी पडल्यावर यापूर्वी व्यापारी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन रडल्याचे वाचले नव्हते. पहिल्यांदाच ही स्थिती बघतोय. शिवाय स्ट्रॅटेजी अंमलात आणल्यापासून ४ दिवसात निदान भाव पडल्याचेही वाचले. (स्वतः खरेदीस रोज बाहेर पडावे न लागल्याने आजचा ताजा भाव माहित नाही)

गॅरी ट्रुमन's picture

30 Oct 2015 - 6:22 pm | गॅरी ट्रुमन

अन्या, अरे ज्या गोष्टींसाठी देवाला दोष देता येत नाही त्या गोष्टींसाठी मोदींना दोष दिला जातो हे माहित नाही का रे?

ट्रेड मार्क's picture

30 Oct 2015 - 5:55 pm | ट्रेड मार्क

प्रश्न भ्रष्टाचाराचा विचारला तर त्याला उत्तर डाळ आणी साखरेची वाढलेली किंमत! साठेबाजी कडे कोणी दुर्लक्ष केले तर फक्त मोदींनी, अंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला उठाव नाही त्याला जबाबदार मोदी, कुठल्याही शहरात, गावात काही चुकीचं घडलं तर जबाबदार फक्त मोदी. तसं तर काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या मोठ्या साहेबांनी भविष्यवाणी केली की भाव वाढायचे, Openly सांगायचे की एप्रिल महिन्यात साखरेचे भाव रु. ३५ होतील कि बरोब्बर व्हायचं. तेव्हा पण तुम्हाला हा प्रश्न पडला होता का?

साठेबाजीला एक ग्राहक म्हणून आपण काय करू शकतो याचा कोणी विचार केला आहे का? खूपच भाव वाढले आहेत तर नाही करायची खरेदी थोडे दिवस किंवा अगदी थोडी करायची, फारच आवश्यक असेल तर थोडे शहराबाहेर जाउन परस्पर शेतकऱ्याकडून खरेदी करता येतेय का बघावं. तुम्हाला आणी इथल्या इतरांना अजून काही उपाय सुचतात का बघा. फक्त सरकारवर आरोप ठेवणे हे काही उत्तर होवू शकत नाही.

आणी हो, ह्या व्यापार्यांकडून पुढे पैसे कसे मोदींपर्यंत पोचतात, किती रुपयांचा घोटाळा आहे हा ते पण सांगा.

विनोद१८'s picture

1 Nov 2015 - 3:30 pm | विनोद१८

......तुमच्या म्हणण्यात जर तथ्य असेल तर ह्या विषयात खोलात जाउन 'माहितीच्या अधिकाराखाली' त्याची अधिक माहिती घेउन कोणी सरकारला कोर्टात का नाही खेचत ?? आपल्या देशात असे अनेक जण आहेत जे अशी कामे अगदी मनोभावे करतात. विरोधी पक्षाचे काय काम आहे, ते काय करताहेत ?? त्यांच्यासाठी तर हे आयतेच कोलीत आहे. विकावू मिडीया का गप्प बसलाय त्यांच्यासाठी बराच काळ चघळायला चांगला व अतिशय आवडता विषय आहे हा. का नाही यापैकी कोणी मनावर घेउन काही कारवाइ या भ्रष्टाचारी मोदीसरकारविरूद्ध करीत ?? जर तुमच्या मुद्द्यात तथ्य असेल तर.

मार्मिक गोडसे's picture

1 Nov 2015 - 5:41 pm | मार्मिक गोडसे

तुमच्या म्हणण्यात जर तथ्य असेल तर ह्या विषयात खोलात जाउन 'माहितीच्या अधिकाराखाली' त्याची अधिक माहिती घेउन कोणी सरकारला कोर्टात का नाही खेचत ??

कोणत्या मुद्द्याबद्दल तुम्हाला शंका वाटतेय आणि माहितीच्या अधिकाराखाली सरकारकडून काय माहीती अपेक्षीत आहे तुम्हाला?

मार्मिक गोडसे's picture

7 Nov 2015 - 6:58 pm | मार्मिक गोडसे

बिहार विधानसभा निवडणुका संपल्याबरोबर केंद्र सरकारने जनतेला दिवाळीची 'भेट' दिली. आता साखरेच्या वाढीव अनुदानाच्या घोषणेची वाट बघतोय.

श्रीगुरुजी's picture

7 Nov 2015 - 8:08 pm | श्रीगुरुजी

बिहार विधानसभा निवडणुका संपल्याबरोबर पुरस्कार वापसीची नौटंकी देखील बंद झालेली दिसतेय.

मार्मिक गोडसे's picture

30 Oct 2015 - 3:51 pm | मार्मिक गोडसे

ऑलरेडी ४००० रुपये प्रतिटन सबसिडी दिली जाते आहेच. पण अनुदान दिल्याशिवाय निर्यात वाढणार नाही हे कसे?

नवीन अनुदान म्हणायचे होते.

वर्तमान सरकारने जर येत्या काही दिवसात साखरेचे निर्यात अनुदान वाढवले तर तुम्ही त्याचे समर्थन कराल का?

हे गेल्या सरकारांच्या काळातही चालतच होते. तुम्ही उद्यापासून ३ दिवसात एखाद्या शेअरची किंमत ६-८ रुपयांनी वाढल्यानंतर प्रॉफिट बुक करणार नाही काय?

म्हणजे आजही व्यापारी फायदा उठवत आहेत हे तुम्हाला मान्य आहे तर.
शेअरच्या किमती कमी जास्त होण्यामागे अनेक कारणे असतात, मागणी आणि पुरवठा हे एक कारण असू शकते जे साखरेलाही लागू होते. परंतू यंदा भारतात साखरेचा पुरवठा जास्त व मागणी कमी असे असताना फक्त साखर निर्यातीची घोषणा केल्याबरोबर साखरेचे भाव अचानक ३ दिवसात ६-८ रुपयांनी कसे वाढले?

बाकी डाळींच्या बाबतीत धाडी पडल्यावर यापूर्वी व्यापारी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन रडल्याचे वाचले नव्हते. पहिल्यांदाच ही स्थिती बघतोय. शिवाय स्ट्रॅटेजी अंमलात आणल्यापासून ४ दिवसात निदान भाव पडल्याचेही वाचले. (स्वतः खरेदीस रोज बाहेर पडावे न लागल्याने आजचा ताजा भाव माहित नाही)

तू रडल्यासारखे कर मी मारल्यासारखे करतो असला प्रकार आहे हा तुम्ही इतके हळवे होउ नका.. डाळींचे भाव २५ ट्क्क्यावरून १०० ते १५० टक्क्यापर्यंत वाढेपर्यंत सरकार झोपले होते का? भाव पडल्याचे वाचले ना मग प्रत्यक्ष खात्री करून या की किती ने भाव कमी झाले ते आणि आम्हालाही सांगा.

ट्रेड मार्क's picture

30 Oct 2015 - 6:20 pm | ट्रेड मार्क

निर्यात न करता ती साखर तशीच पडून ठेवायला पाहिजे होती का? मग शेतकऱ्यांचे उसाचे पैसे कसे दिले असते? घोटाळे तर शेअर मार्केट पासून ते आपल्या स्थानिक मार्केट पर्यंत सगळीकडेच होत आहेत. उपाय सांगा काही असेल तर. मुख्य प्रश्न आहे आपली मानसिकता बदलायचा. सर्वसामान्य माणूस (यात व्यापारी, सेवा देणारे, ग्राहक ई सगळेच आले) किती प्रामाणिकपणे रोजच्या आयुष्यात वागतो? संधी मिळाली तर किती लोक जास्त पैसे मिळवण्यासाठी त्या मार्गाला जातील अथवा जाणार नाहीत?

बाकी देशभक्ती, देशासाठी त्याग वगैरे गोष्टी बाजूला ठेवल्या तरी वैयक्तिक आचरण किती लोकांचे चांगले आहे? समोर १००० ची नोट पडलेली दिसली किंवा iPhone सापडला तर किती लोक स्वतःजवळ ठेवणार नाहीत? चित्र आत्तातरी असं दिसतंय की बहुतांशी सगळेच ओरबाडायला बसलेत.

थोडक्यात सांगयचं म्हणजे Civic Sense ची कमतरता आहे आपल्या कडे.

महत्वाचे - यातील कुठलेही वाक्य तुमच्यावर अथवा येथील कोणावरच वैयक्तिक आरोप करण्याकरता केलेले नाहीये. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे.

महत्वाचे - यातील कुठलेही वाक्य तुमच्यावर अथवा येथील कोणावरच वैयक्तिक आरोप करण्याकरता केलेले नाहीये. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे.

ही आज्ञा की सुचना की सल्ला?

ट्रेड मार्क's picture

30 Oct 2015 - 7:36 pm | ट्रेड मार्क

आज्ञा किंवा सल्ला मी कोण देणारा? उगाच घुसमट, गळचेपी, व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला वगैरे चालू होईल.
बाकी समजण्याएवढे सगळेच सुज्ञ आहेत असं मला वाटतंय. (हे विधान कोणीही वैयक्तिक घेवू नये अशी विनंती).

अस्वस्थामा's picture

30 Oct 2015 - 8:08 pm | अस्वस्थामा

उगाच घुसमट, गळचेपी, व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला वगैरे चालू होईल.

अहो मग बरंय की मग.. असं झालं की मिपादेशी डु-आयडी परत करतेत म्हणे.. हितेसभौ (सध्या मोगा) नी त्यांचे नुकतेच काही डु-आयडी परत केले म्हणे (त्यांचा कुठला डु आणि कुठला आयडी कै म्हैत नै) .. ;)

आनंदी गोपाळ's picture

30 Oct 2015 - 9:49 pm | आनंदी गोपाळ

एकंदर धागा वाचल्यानंतर भाजपाने काहीही केले तरी त्याचे समर्थन करण्यासाठी नेमणूक केलेला सायबर सेल मजबूत जोरात सुरू आहे, हेच समजले.

बाकी छाने.

ट्रेड मार्क's picture

30 Oct 2015 - 10:54 pm | ट्रेड मार्क

धागाकार्त्याची नेमणूक भारताच्या निर्वाचित सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी/ लिहिण्यासाठी कोणी केली आहे ते पण सांगा. तसेच बाकी विरोधी गटातील पण कोणाची आणी कोणी नेमणूक केली आहे तेही सांगा. फक्त भाजपाच्या बाजूने कोणी बोललं की का असं वाटतं की मोदींनी किंवा भाजपानी काहीतरी मोबदला देवून नेमणूक केली आहे?

सगळी गोची इथेच आहे, की फक्त एका गटाला नावं ठेवायची. तीच गोष्ट दुसऱ्या गटांनी केली तर काही बोलायचे नाही किंवा कदाचित समर्थन पण करायचे.

रमेश आठवले's picture

31 Oct 2015 - 1:55 am | रमेश आठवले

या सर्व बक्षिसे आणि अनुदाने परत करणार्या तथाकथित पुरोगामी ,सेक्युलर आणि साहित्यक लोकाना अचानक दिल्लीतील भा ज पा सरकार आणि मोदी यांच्यामुळे अराजक माजले आहे आणि सहिष्णुता नाहीशी झाल्याचा भास झाला आहे . असे वाटण्याची जी मुख्य कारण सांगितली जातात त्यांचे तथ्य आणि वास्तव हे जाणले पाहिजे .
१. दाभोळकर यांचा खून ऑगस्ट २०१३ मध्ये झला. त्या नंतर १४ महिने महाराष्ट्रात कॉंग्रेस चे सरकार होते. या लोकांनी या खुनाचा उलगडा कॉंग्रेस काळात झाला नसताना त्या विरुद्ध ब्र ही काढला नाही.
२. कलबुर्गी यांचा खून कर्नाटकात कॉंग्रेस राजवट असताना झाला आहे परंतु तेथील कायदा व सुव्यवस्था या बाबत यांनी नाराजगी व्यक्त केली नाही .
३. पानसरे खुना नंतर महाराष्ट्र पोलिसांनी मुख्य आरोपी पकडला . पण तेथे भा ज पा चे सरकार असल्यानी या पुरोगामी लोकांनी त्याची दखल घेतली नाही.
४. दादरी हत्येला महिना उलटून गेला तरी अजून आरोप पत्र दाखल झाले नाहि. तेथे भा ज पा विरोधी सरकार असल्याने या गोष्टीकडे पुरोगामी मंडळी कानाडोळा करत आहेत. , तसेच तेथील कायदा व सुव्यवस्था हे केंद्र सरकाr अथवा मोदी यांच्या हातात नाही, या ढोबळ गोष्टीचा याना विसर पडला आहे .
५. हरयाणातील एका गावात दोन कुटुंबामधील जुन्या वैमनस्यामुळे दलित कुटुंबाच्या घराची जाळपोळ झाली. त्या साठी तेथील विद्यमान सरकार व दिल्लीतील सरकार जबाबदार असल्याचा हे गवगवा करतात. नुकत्याच आलेल्या न्याय वैद्यकीय अहवाला प्रमाणे घराचे दार बंद असताना घराच्या आत आग लागली असे आढळले आहे. असे असेल तर हा दलितांवर सवर्णांनी केलेला अत्याचार कसा ?
तात्पर्य हे की ही सर्व मंडळी पूर्वग्रह दुषित आहेत. त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भा ज पा याना पहिल्या पासून विरोध होता आणि त्याना नरेंद्र मोदी यांच्या बद्दल खास आकस आहे. नेमके तेच सत्तेवर आल्याने यांची बेचैनी वाढली आहे. त्यांना गेल्या दीड वर्षात केलेल्या स्वछ आणि भरीव कामाची चाड नाही, जनमानसाची कदर नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचा आदर नाही .
मोदींच्या विरुद्ध त्याना आजतरी पुरेसा दारुगोळा मिळालेला नहॆ. त्यांचा हा अभियानाचा फुगा लवकरच आणखी वर जावून विरेल किंवा खाली येउन फुटेल

भंकस बाबा's picture

31 Oct 2015 - 9:51 am | भंकस बाबा

कलबर्गीणी काय लिहिले होते हे सामान्य माणसाला सागिन्तलेच जात नाही. वरील पुरस्कार परत करणाऱ्यानी हिरव्या , पांढऱ्या ,निळ्या रंगाबद्दल आक्षेपार्ह लिहून दाखवावे. मग जी आग लागेल तेव्हा पुरस्कार परत करावेत. कलबुरगीच्या कमेंट्स अजुन सामान्य माणसाला माहितच नाहीत . जेव्हा कळतील तेव्हा मग उत्तर द्यावित्. हिन्दू सहिष्णु आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या डोक्यावर मुतनार काय?

बोका-ए-आझम's picture

31 Oct 2015 - 8:56 pm | बोका-ए-आझम

आणि समजा केली असेल नेमणूक, तर त्यात चुकीचं असं काय आहे? भाजपा हा एक अधिकृतरित्या नोंदवला गेलेला राजकीय पक्ष आहे. त्याच्यासाठी किंवा इतर कोणत्याही पक्षासाठी काम करणं आणि त्याचा उचित मोबदला घेणं यात चुकीचं काय आहे? भाजपविरोधक विरोधाने एवढेे आंधळ झालेले आहेत की त्यांना भाजपशी संबंधित असणारे कोणीही हे शत्रूच वाटताहेत.

ट्रेड मार्क's picture

31 Oct 2015 - 12:29 am | ट्रेड मार्क

ज्या सगळ्या घटनांबद्दल एवढा गोंधळ चालू आहे, असहिष्णू वातावरण आहे असं म्हणताहेत, सरकारविरोधात जालावर अथवा वर्तमान पत्रात लिहिण्याची, पुरस्कार परत करण्याची स्पर्धा चालू आहे त्याची सत्यासत्यता तरी बघू -

दाभोलकरांची हत्या August 20, 2013 रोजी झाली. केंद्रात आणी राज्यात काँग्रेसचे सरकार होतं. पण या हत्येबद्दल जबाबदार भाजपा आणी मोदी सरकार?

गोविंद पानसरे हत्या दिनांक February 20, 2015 कोल्हापूर मध्ये झाली. शिवाजी महाराजांवरील पुस्तक आणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे काम यामुळे कट्टर हिंदुत्ववादी गट जसे सनातन संस्था ई च्या टार्गेट वर होते. या एकाच प्रसंगी भाजपा सरकार केंद्र आणी राज्य दोन्ही कडे होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे यांचे हत्यारे सापडले आहेत.

कलबुर्गींची हत्या August 30, 2015 रोजी धारवाड,कर्नाटक मध्ये झाली. स्वतः जातीने लिंगायत असून त्यांनी बसव (बसवेश्वर?) या लिंगायत लोकांतील पूजनीय तत्ववेत्ता, लेखक/कवी यांच्याबद्दल अपमानास्पद विधाने केली होती. ज्यावरून लिंगायत लोकांनी त्यांना विरोध केला होता. त्यानंतर हिंदू लोकांच्या मूर्तीला पूजण्यावरून पण वादग्रस्त विधाने केली होती, ज्यावर त्यांच्या विरोधात एक केस चालू होती. ज्या व्यक्तीविरोधात त्याच्याच जातीतील लोकं होती आणी ज्या लोकांच (लिंगायत) कर्नाटक राज्य सरकार मध्ये बरंच वजन आहे आणी जिथे राज्य सरकार काँग्रेसचं आहे, त्या व्यक्तीची हत्या झाली तरी भाजप आणी मोदी जबाबदार? यांची हत्या करण्यातला मुख्य आरोपीचे शव सापडले असं म्हणत आहेत.

परंतु त्याआधी ६ कन्नड साहित्यकांनी आरोपींच्या अटकेला मुद्दाम उशीर केला जातो आहे असा आरोप करून आपले पुरस्कार परत केले आहेत.

चर्च वरील हल्ल्याचे सत्य

प.बंगालमध्ये नन वर झालेल्या अत्याचारात बांगलादेशी इसमास पकडण्यात आलं होतं.

फरीदाबादमधील दलित हत्याकांडावर फोरेन्सिक तज्ञांचे म्हणणे आहे की आग आतूनच लागली आहे (म्हणजे बाहेरून कोणी लावलेली नाही), बातमी इथे पहा.

गुरु ग्रंथसाहिब फाडण्यात आला होता त्यातील मुख्य आरोपीला बाप्तिस्मा देण्यात आला होता. म्हणजे त्याने धर्म बदलून ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.

बाकी गोमांस खाण्यावर, कपडे घालण्यावर याच धाग्यात किंवा इतर काही धाग्यात बरीच चर्चा झाली आहे.

एका हिंदू सोडून दुसर्या धर्माच्या व्यक्तीवर काही वाईट प्रसंग ओढवला तर तो हिंदू दहशतवादाचा बळी, पण हिंदू लोक किती का संख्येने बॉम्बस्फोटात, सशस्त्र हल्ल्यात मेले, हिंदू स्त्रियांवर बलात्कार झाले तर मात्र त्यांच्या कर्माची फळं. कारण हिंदू सोडून इतर धर्मीय कधीच अतिरेकी, दहशतवादी असूच शकत नाहीत. कारण त्यांना प्रेषितानीच सांगितलय ना! धर्म खतरेमे है म्हणालं कि काही पण करायला परवानगी आहे. बाकी देशाचा कायदा काही पण असो… धर्मानी सांगितलं म्हणजे कसला कायदा आणि कसलं काय! सगळ्या अशांततेला, अराजकतेला, असहीष्णुततेला कारणीभूत फक्त हिंदूच? फक्त मे २०१४ नंतरच हे सगळं चालू झालं का? त्या आधी सगळं अगदी आलबेल होतं?

प्रत्येक मुद्द्यावर किमान logic ने आणी पुराव्याने उत्तरं दिली जावीत अशी अशा अपेक्षा आहे.

मग तुमच्या सोसायटीतील काही लोक अथवा तुमचे काही मित्र, एकाच शहरात राहणारे नातेवाईक असे मिळून मार्केट यार्डातून घाऊक खरेदी करू शकता. आम्ही पुण्यात असताना धान्य आणि भाज्या घाऊक खरेदी करून मग वाटून घ्यायचो. फारसं अवघड नाही ते. माझा एक मित्र तर पुण्याजवळच्या गावांमध्ये जाउन एका शेतकऱ्याकडून वर्षभराचे तांदूळ घेवून यायचा.

दूध सुद्धा एका भूगाव मधील गवळ्याकडून घ्यायचो, जो रोज सकाळी घरी आणून द्यायचा. थोडी शोधाशोध केली तर पर्याय सामोर येतात, आता एखाद्याला घरात बसून काही प्रयत्न न करता सगळं हवं असेल तर मग ज्या भावात मिळेल त्या भावात घ्यावं लागेल.

सरकारनी कुठलं बोलबच्चन दिलं आणी त्यावर कसं काही झालं नाही ते सांगा. तसेच जे केलं ते अजून चांगल्या प्रकारे कसं करता आलं असतं ते ही जमल्यास सांगावं.

बारामती ते दिल्ली कशी लिंक आहे त्याचा विदा द्यावा.

मार्मिक गोडसे's picture

31 Oct 2015 - 12:10 pm | मार्मिक गोडसे

साठेबाजी कडे कोणी दुर्लक्ष केले तर फक्त मोदींनी, अंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला उठाव नाही त्याला जबाबदार मोदी

मोदींचे नाव माझ्या प्रतिसादात तुम्हाला कुठे आढळले? केन्द्रात भाजप पक्षाचे सरकार आहे, मोदींचे नव्हे.
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला उठाव नाही त्याला वर्तमान सरकार जबाबदार आहे असे मी म्हणलेले नाही. उलट साखरेचा निर्यात भाव २५ ठेवूनही आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी नसल्यामुळे साखरेची निर्यात वाढली नाही असे लिहीले आहे.

Openly सांगायचे की एप्रिल महिन्यात साखरेचे भाव रु. ३५ होतील कि बरोब्बर व्हायचं. तेव्हा पण तुम्हाला हा प्रश्न पडला होता का?

म्ह्णूनच त्यांना पाडले व ह्यांना खांद्यावर घेतले, हे तर आता कानात मुतायला लागले.

साठेबाजीला एक ग्राहक म्हणून आपण काय करू शकतो याचा कोणी विचार केला आहे का? खूपच भाव वाढले आहेत तर नाही करायची खरेदी थोडे दिवस किंवा अगदी थोडी करायची, फारच आवश्यक असेल तर थोडे शहराबाहेर जाउन परस्पर शेतकऱ्याकडून खरेदी करता येतेय का बघावं.

भयानक सल्ला व एकप्रकारे साठेबाजीचे समर्थन. साखरेची साठेबाजी झाली तर शहराबाहेरच्या कोणत्या शेतकर्‍याकडे साखर मिळेल? मुंबईच्या ग्राहकाने तूरडाळीसाठी लातूरच्या शेतकर्‍याकडे जावे असे आपले म्ह्णणे आहे का? मुख्य म्हणजे व्यावहारीक आहे का? आणि शेतमालाची साठेबाजी ही शेतकर्‍याकडील माल संपल्यावरच होते.

निर्यात न करता ती साखर तशीच पडून ठेवायला पाहिजे होती का? मग शेतकऱ्यांचे उसाचे पैसे कसे दिले असते?

नीट वाचा. "अनुदान दिल्याशिवाय साखरेची निर्यात वाढणार नाही, साखर निर्यात केल्याशिवाय कारखाने शेतकर्‍यांची ऊस थकबाकी देऊ शकणार नाही", हा माझा प्रतिसाद.
मी निर्यातीला विरोध केलेला नाही हे स्पष्ट दिसतेय.
माझा विरोध बिहारच्या निवडणूका संपेपर्यंत सरकारनी साखरेला वाढीव निर्यात अनुदान न देण्याला आहे. दुसरे म्हणजे सध्याच्या निर्यात अनुदानात आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पर्धेमुळे आपल्या साखरेला उठाव नसताना फक्त साखरेचा निर्यात कोटा वाढवल्यामुळे जर आपल्याकडील बाजारात साखरेचे भाव अचानक ६-८ रू. वाढत असतील तर सरकार काय करत आहे?
ह्या दरवाढीचा फायदा साखर कारखान्यांना होत असेल तर निर्यात कोटा वाढवण्याची गरजच नाही.

घोटाळे तर शेअर मार्केट पासून ते आपल्या स्थानिक मार्केट पर्यंत सगळीकडेच होत आहेत. उपाय सांगा काही असेल तर.

बरोबर आहे.. मागील सरकारच्या काळातही हे प्रकार होत होतेच. सध्याच्या सरकारकने तर ह्यावर आमच्याकडे जालिम इलाज आहे असा प्रचार केल्यामूळे जनतेने त्यावर विश्वास ठेवून त्यांना सत्तेवर आणले, आता लोकांकडून उपाय कशाला मागता?

ट्रेड मार्क's picture

1 Nov 2015 - 8:12 pm | ट्रेड मार्क

मी ज्या गोष्टीची साठेबाजी होते त्या स्वस्तात कश्या मिळतील यावर मार्ग शोधायचा प्रयत्न करतोय. नेहमीप्रमाणे तुम्ही फक्त दुसरा कसा चुकीचा आहे हे सांगताय. तुम्ही सुचवा कि सर्वसंमत मार्ग.

साठेबाजी साखरेची होती का? साठेबाजी वरचा प्रतिसाद तुम्ही साखरेसाठी वापरलात. तसेच बाकी पण प्रतिसादातील काही ठराविक वाक्य घेवून आपल्या पाहिजे तसा अर्थ काढलात. मी कुठे साठेबाजीचे समर्थन केलंय?

मुख्य प्रश्न विचारला त्याचं उत्तर मात्र टाळलंत. या व्यापार्यांकडून/ साठेबाजांकडून पैसा सरकारला कसा मिळतो ते सांगा.

रच्याकने: ज्या प्रतिसादावर उत्तर देताय त्याच्या खाली तुमचा प्रतिसाद द्या हो. उगाच शोधाशोध करायला लागते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Oct 2015 - 12:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पुरस्कार परत करणार्‍यांनी पुरस्काराची रक्कम राज्य सरकारच्या कोट्यामधुन मिलालेली घरं वगैरे परत केल्याचं ऐकिवात नाही. ते करुन दाखवलं तर खरं.

इरसाल's picture

31 Oct 2015 - 3:49 pm | इरसाल

दादुस्ला काय रस्त्यावं आननार काय तुमी लोका आं ? घरा परत करा म्हने. घराबिराचा बोलाचा नाय !!!!!

नाखु's picture

31 Oct 2015 - 4:04 pm | नाखु

ज्याची आता किंमत नाय तेच वापस करणार घर वापसी कराची बोली नव्हती काय? घरा आम्ही पोरा बाळाम्साठी ठिवणार आणि फक्त पुरस्कार वापस करणार . हा पैश्याचं विचारू नको रे बाबा.


रच्याकाने माझ्या भागात एक पाण्याची पाईपलाईन फुटली आहे आणि एक गटार तुंबले आहे त्याला मी कुणाला जो जिम्मेदार धरू, नगरसेवक की आमदार की फडणवीस का थेट नरेंद्र मोदी का जागतीक आरोग्य संघटना का आणखी कुणी (इथल्या थोर विचारवंतानी प्रकाश विजेरी झोत टाकावा) आणी हो माझ्याकडे एकही पुरस्कार नाही परत द्यायला मग मी काय करावे.

गॅरी ट्रुमन's picture

31 Oct 2015 - 4:17 pm | गॅरी ट्रुमन

रच्याकाने माझ्या भागात एक पाण्याची पाईपलाईन फुटली आहे आणि एक गटार तुंबले आहे त्याला मी कुणाला जो जिम्मेदार धरू, नगरसेवक की आमदार की फडणवीस का थेट नरेंद्र मोदी का जागतीक आरोग्य संघटना का आणखी कुणी

एवढा सोपा प्रश्न तुम्हाला पडूच कसा शकतो? अर्थातच मोदींना जबाबदार धरायला हवे.

इरसाल's picture

2 Nov 2015 - 3:41 pm | इरसाल

सगल्यान पयल्यांदा तुमी सोताला एक घर-गुती पुर्स्कार देवुनशिनी टाका. (भले तो पुर्स्कार, पत्नीला भाजी चिराला मदत केली, कपडे सुकाला टाकाला मदत केली, दुद आणुनशिनी दिला, पोरा अब्यास नवती करत पोकल बांबुचे फटके दिले असा अस्ला तरी चालल, कं बोल्ता ?)
मंग दुसरे छुट पयपलाइन आनी गटरीसाटी मोदीन्ला जिम्मेवार धरुनशिनी सोताला दिलेला पुर्स्कार परत द्या.

बोका-ए-आझम's picture

31 Oct 2015 - 4:09 pm | बोका-ए-आझम

अहो ती घरं किमान दोन बीएचके आणि हिरानंदानी किंवा एम आय जी काॅलनी वगैरे ठिकाणी असतात (मुंबईत या दोन ठिकाणी १०% कोटावाल्यांची घरं आहेत.) ती कोण परत करेल? तो विनोद ऐकला असेल तुम्ही - एक मुलगा घरांवर दगड मारत असतो. एक बाई त्याच्या आईकडे तक्रार करते, तेव्हा आई म्हणते - जाऊ दे हो. तो थोडा वेडा आहे. तेव्हा ती बाई म्हणते - मग तो आपल्या स्वतःच्या घरावर का नाही मारत दगड? तेव्हा आई म्हणते - एवढा वेडा नाहीये तो!
हे सगळे स्वयंघोषित निर्भीड विचारस्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते आताच जागे होणार. रच्याकने अमर्त्य सेनना भारतरत्न पण भाजपच्या सरकारनेच दिलं होतं. अजूनपर्यंत ते कसं नाही परत केलेलं?

भारतरत्न परत करणं हा गमतीचा विषय होउ शकत नाही. जेव्हा ते होइल तेव्हा अराजक आले असं म्हणायला खरंच हरकत नसेल.

नाना स्कॉच's picture

31 Oct 2015 - 5:08 pm | नाना स्कॉच

समस्तजनहो,

पॉलिटिकल alligence हा राष्ट्रनिर्मिती प्रथम डोळ्यासमोर अंगी बाणवायचा असतो, त्याला तोल लागतो मेंदूत, किती कठीण आहे हे विधान समजणे ?

मला मोदींचे काही निर्णय आवडतात काही आवडत नाहीत, मोदी हे सद्धया बेस्ट अवेलेबल ऑप्शन आहे पण शेवटी एक ऑप्शनच आहे बाबांनो लोकशाही मधे ऑप्शन ला मेसायापद दिले की अधोगती होतेच हे आपण इंदिरा अन जवाहर उदाहरण समोर असताना ही शिकणार नाही आहोत का?

मोदींचे समर्थन म्हणजे काय? हाताची पाचही बोटे लांब करावी का? ते नैसर्गिक असेल का? विचार करा , मोदींचे काही निर्णय काही वर्तन मला आवडते म्हणून मी भक्त होत नाही अन काही निर्णय न आवडल्या मुळे मी विरोधक ही होत नाही

बघा काय मत पड़ते आहे

अन या बारमधे आमच्या

राष्ट्रिय एकात्मता उरलेली ती बहुतेक एकच जागा आजकाल उरली आहे

अलग-अलग पथ बतलाते सब पर मैं यह बतलाता हूँ
'राह पकड़ तू एक चला चल, पा जाएगा मधुशाला।।

पिऊन ही बौद्धिक तोल न जाऊ देणारा

नाना

याॅर्कर's picture

1 Nov 2015 - 4:17 pm | याॅर्कर

पेशल हं

गामा पैलवान's picture

1 Nov 2015 - 8:53 pm | गामा पैलवान

पुरस्कार परत करणाऱ्यांत सगळ्यात आचरट वल्ली गणेश देवी आहेत. या महाशयांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला, पण पद्म पुरस्कार परत केला नाही. ये हुई ना बात!

-गा.पै.

गॅरी ट्रुमन's picture

1 Nov 2015 - 9:01 pm | गॅरी ट्रुमन

पुरस्कार परत करणाऱ्यांत सगळ्यात आचरट वल्ली गणेश देवी आहेत.

छ्या. असं कसं बोलता गामा पैलवान? गणेश देवी म्हणजे चालतेबोलते विद्यापीठच हे माहित नाही का तुम्हाला? फक्त कुठले विद्यापीठ हे विचारू नका-- जगात हावर्ड, प्रिन्स्टन विद्यापीठे आहेत तसेच ज्ञानेश्वर विद्यापीठही आहे :)

नाखु's picture

2 Nov 2015 - 12:59 pm | नाखु

हे पुरस्कार पात्र वर्तमान पत्र वाचत नाहीत काय?

आजची आणी तात्काळ बातमी चर्चेस तयार

पण कदाचीत नवी कारण सांगून (मोदींनीच बे भेटले पाहिजे प्र्त्येक गोष्टीची माफी मागीतली पाहिजे अगदी गुडघे टेकले पाहिजेत यासम बाल बुद्द्धी मागण्या करतील.

श्रीगुरुजी's picture

2 Nov 2015 - 3:20 pm | श्रीगुरुजी

या तथाकथित विचारवंतांचे विचार किती पूर्वग्रहदूषित आहेत हे खालील लेखात दिसते.

http://www.loksatta.com/navvodattarinataka-news/article-about-satyashodh...

अतुल पेठ्यांनी लिहिलेल्या या लेखातील खालील परिच्छेद पहा.

या कानाचे त्या कानाला कळणार नाही अशी यंत्रणा असल्याशिवाय आणि ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असे साटेलोटे असल्याखेरीज दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गीचा खून होऊ शकेल?

या तिघांचा गुन्हा काय? तर ते मुख्यत्वे आताच्या काळात धर्मचिकित्सा करीत होते!!!

या तीनही खुनामागचा हेतू अजून स्पष्ट झालेला नाही. २ प्रकरणातील एकही आरोपी सापडलेला नाही तर एका प्रकरणातील संशयिताविरूद्ध फारसे सबळ पुरावे मिळाल्याचे दिसत नाही. तरीसुद्धा या तिघांचा खून त्यांनी केलेल्या धर्मचिकित्सेमुळे झाला हा निष्कर्ष पेठ्यांनी काढलेला आहे.

धर्मचिकित्सा करणाऱ्या सर्वच माणसांना त्यांच्या काळात त्रास सहन करावा लागला. पण आताच्या काळात? थेट गोळ्याच!!! अशा कृत्यांनी आजच्या काळातील खुन्यांना अपेक्षित असलेला धर्म वाढेल? चिकित्सेचा, अभ्यासाचा आणि विचारांचा अवकाश संकुचित करणारी ही माणसे धर्म वाढवतात की बुडवतात? खऱ्या धर्माची मूल्ये कोणती? सहिष्णुता, अहिंसा, करुणा, सहभाव, बंधुत्व, क्षमाशीलता आणि मानवता यांची जोपासना करणे म्हणजेच धर्म ना? आज जे स्वत:ला धर्माचे प्रवक्ते मानतात, ते यातील नेमके कुठले तत्त्व आचरणात आणतात? म्हणजे खरे धर्मप्रेमी कोण आणि खरे धर्मद्रोही कोण? दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी की खुनी?

इथेही तेच. त्या तिघांच्या खुन्यांनी त्यांना त्यांच्या धर्मचिकित्सेमुळेच मारले हे पेठ्यांचे ठाम मत आहे. जरी खुनी सापडले नसले, जरी खुनामागचे हेतू अजूनही स्पष्ट झाले नसले तरी पेठे आपल्या निष्कर्षावर ठाम आहेत.

जोतिबांबाबत महाराष्ट्रात घोषित आणि अघोषित ‘सेन्सॉरशिप’ कायम होती आणि आजही आहे. पण जोतिबा ठामपणे अभेद्य राहिले आहेत.

कसली घोषित आणि अघोषित सेन्सॉरशिप? जोतिबा फुल्यांचा गेली अनेक वर्षे सर्वत्र उदोउदो होत आहे, त्यांच्या साहित्यावर अनेकांनी पीएचडी केली आहे. त्यांच्या नावाचे विद्यापीठात अद्यासन आहे. त्यांच्या घराचे स्मारक झाले आहे. त्यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात. सावित्रीबाई फुलेंचे नाव विद्यापीठाला दिले आहे. त्यांचे समग्र साहित्य सरकारने प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्यावर लिहिलेल्या नाटकाचे प्रयोग व्यवस्थित सुरू आहेत. मग कोठे आहे सेन्सॉरशिप? उगाच विनाकारण नसलेला बागुलबुवा निर्माण करणे हे असल्या विचारवंतांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. आतासुद्धा देशात आणिबाणीसदृश स्थिती आहे, विचारवंतांचा गळा आवळला आहे, मोदींवर टीका केलेली सहन होत नाही असे अनेक बिनबुडाचे आरोप सुरू आहेत.

अजून एक-पुण्यात फुलेवाडय़ाच्या शंभराव्या मराठी प्रयोगाला डॉ. भालचंद्र नेमाडे आले होते. त्यांनी या नाटकाचे कौतुक केले. (नुकतेच त्यांनाही धमकीचे पत्र आले आहे. गुन्हा काय? तर लोकांना विचार करायला भाग पाडणे!!!)

हे वाचून तर हसायला आहे. नेमाडे म्हणे लोकांना विचार करायला भाग पाडतात! आपल्याबद्दल हे असे वाचले तर नेमाडे सुद्धा खदाखदा हसतील. आव्हाड सुद्धा म्हणतो मला धमकीची पत्रे येतात. नेमाड्यांना कोण धमकीचे पत्र पाठविणार? त्याविरूद्ध त्यांनी पोलिसात तक्रार केली होती का?

दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी या विचारवंत समाजसेवकांचा निर्घृण खून झाला आहे. आपण वृत्तपत्रांत वाचतो की, या खुन्यांनी अशीच मोठी यादी केली आहे. याला खून म्हणण्यापेक्षा कत्तली म्हणावे का? चिकित्सक विचार करायला लावणाऱ्या आणि विचार करू पाहणाऱ्यांच्या ‘धर्माचे शुद्धीकरण’ या नावाखाली आता कत्तलीच होणार आहेत?

परत तेच आणि परत तेच तेच! खुन्यांनी अशी यादी केली असेल तर खुनी सापडले असे समजायचे का? अजून खुनी कोण हेच सापडलेले नाही, खुनाच्या हेतूबद्दल माहिती नाही, पकडलेल्या संशयिताविरूद्ध सबळ पुरावे नाहीत. परंतु कोण खुनी आहेत आणि खून का झाले याविषयी अतुल पेठ्यांची कोणत्याही पुराव्याविना ठाम मते आहेत. हा पूर्वग्रहदूषित विचार आहे.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Nov 2015 - 6:13 pm | डॉ. सुधीर राजार...

आपल्या सर्वांचे मनापासून अाभार. छान चर्चा झाली.

अभ्या..'s picture

2 Nov 2015 - 6:31 pm | अभ्या..

संपले ना? अगदी निश्चित?

छान झाले

ट्रेड मार्क's picture

2 Nov 2015 - 8:54 pm | ट्रेड मार्क

असं इथे म्हणावं का? धागाकर्ते नुसता धागा टाकून साठमारी बघत (वाचत?) बसले. आणि सगळ्यात शेवटी नुसतं छान चर्चा झाली म्हणून समारोप? कुठल्याच मुद्द्यावर प्रतिवाद नाही किंवा त्यांचा मुद्दा पटवून दिला नाही.

याचा निषेध म्हणून मी पण माझा पुरस्कार परत करणार (न मिळालेला कसा परत करावा बरं??) आहे.

ह. घेणे…

बिचारे माधवन नायर (पूर्वीचे इस्रो मुख्य) यांनी पुरस्कार परत देणाऱ्यांवर टीका केली.
http://www.hindustantimes.com/india/return-of-awards-just-a-show-ex-isro...

पण सध्या फक्त पुरस्कार परत करणाऱ्यांना महत्व आहे बहुतेक.

श्रीगुरुजी's picture

2 Nov 2015 - 9:10 pm | श्रीगुरुजी

माधवन नायर नक्कीच संघवाले, जातीयवादी असणार.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

6 Nov 2015 - 5:42 pm | डॉ. सुधीर राजार...

सर्वांना धन्यवाद.

हेमन्त वाघे's picture

8 Nov 2015 - 5:09 am | हेमन्त वाघे

एक कुत्ता हमारे भाईसाहब की काफी खिदमत करता था, रोज़ सुबह वह घर आ जाता और भाईसाहब के तलवे चाटने लगता था, भाई साहब भी खुश हो कर उसे टुकड़े डाल देते थे, ये सिलसिला काफी दिनों तक चलता रहा, दोनों खुश थे, भाई साहब तलवे चटवा कर और कुत्ता टुकड़े पा कर, एक दिन भाई साहब ने अपने टूटे बैग से पट्टी काट कर कुत्ते को पहना दी, मैंने कहा अरे भाईसाहब ये क्या कर रहे हैं आवारा कुत्ता है, भाई साहब बोले देखो ये पट्टी अपने किसी मतलब की नहीं है और इसके गले में बाँध दी तो अब ये इसका पट्टा हो गया, बेशक इसकी कीमत हमारे लिए कुछ् भी नहीं बस एक नायलॉन का टुकड़ा है पर इस कुत्ते के लिए इसकी बहुत कीमत है, ये इस पट्टे को ले जा कर पूरी दुनिया को दिखायेगा और इतरायेगा कि आज से में आवारा नहीं रहा, और आ-जीवन मेरा वफादार भी बना रहेगा ।

भाईसाहब का ट्रान्सफर हो गया वो चले गए, कुत्ता बदस्तूर रोज़ सुबह आता रहा, मुझे तलवे चटवाना पसंद नहीं है सो मैं उसे अपने पैर नहीं चाटने देता, भाईसाहब के जाने के बाद उसे टुकड़े मिलने भी बंद हो गए ।

आज अचानक कुत्ता आया और अपना पट्टा वापस कर गया ।

नोट : इस कहानी को अवार्ड वापसी ं से जोड़ कर देखना घोर पाप की श्रेणी में आएगा ।

ट्रेड मार्क's picture

10 Nov 2015 - 8:36 pm | ट्रेड मार्क

७-८ नोव्हेंबर नंतर देशांतर्गत परिस्थिती लगेच सुधारलेली दिसतेय. एकही पुरस्कार परत नाही झाला किंवा देश असहिष्णू झाला म्हणून कोणी आरडाओरडा नाही केला.

चला २ दिवसात एकदम परिस्थिती बदलली याचं श्रेय कोणाला बरं द्यायचं? राहुल, केजरीवाल, नितीश, लालू का मेडिया?

श्रीगुरुजी's picture

10 Nov 2015 - 9:23 pm | श्रीगुरुजी

+१

(१) बिहार निवडणुकीचा प्रचार सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाला आणि लगेच ३० सप्टेंबरला दादरी प्रकरण घडले.

(२) ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून देशात असहिष्णूतेचे वातावरण असल्याचा तथाकथित पुरोगाम्यांना साक्षात्कार झाला व पुरस्कार परत करण्याची मोहीम सुरू झाली.

(३) १२ ऑक्टोबरपासून बिहारमध्ये मतदान सुरू झाले.

(४) एकदम सर्वांनी पुरस्कार परत करण्याऐवजी रोज ३-४ जणांनी पुरस्कार परत करणे हा प्रकार ५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहिला.

(५) सूझन अरूंधती रॉयने ५ नोव्हेंबरला पुरस्कार परत केला. त्यानंतर ही मोहीम थांबली.

(६) ५ नोव्हेंबर हा बिहारमधील मतदानाचा शेवटचा दिवस होता.

(७) ६ नोव्हेंबरपासून पुरस्कार परत करणे बंद झाले आहे कारण देशात ६ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा सहिष्णुतेचे वातावरण सुरू झाले आहे.

वरील घटनाक्रम हा निव्वळ योगायोग आहे. त्यामागे कोणतेही राजकारण नाही अशी माझी श्रद्धा आहे.

रमेश आठवले's picture

11 Nov 2015 - 7:51 am | रमेश आठवले

आता जंगल राज २ ची सुरुवात होणार असल्याने असहिष्णुता -असहिष्णुता असा गवगवा करण्याची आवश्यकता उरली नाही.