अराजक
- डॉ. सुधीर रा. देवरे
केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या साहित्य अकादमीसह इतर संस्थांचे पुरस्कार परत करणार्या साहित्यिकांची- विचारवंतांची संख्या देशभरात वीस पर्यंत पोचली आहे. (महाराष्ट्रातल्या काही साहित्यिकांनीही महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार परत केले.) आणीबाणी नंतर आजची राजकीय स्थिती ही सर्वात जास्त अराजकतेकडे चालली आहे काय? कोणाला ढळढळीत अराजकता अजूनही दिसून येत नसेल तर फक्त एका वर्षात छुपी अराजकता नक्कीच सुरू झाली आहे. डॉ. यू. आर. अनंतमूर्ती... बोलल्याप्रमाणे केवळ देशच नव्हे, तर आख्खं जग सोडून निघून गेले! खरंच हे जग आज इतके वाईट आहे का? पण साहित्यिकांच्या या कृतीने सरकारवर अजून तरी साधा ओरखडाही उमटलेला दिसत नाही. राजकारणी लोकांमध्ये आता साहित्यिक- विचारवंतांचा आदर राहिला नाही. आजच्या राजकारणात सुसंस्कृतपणा दिसून येत नाही.
एम. एस. कलबुर्गी, गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोळकर या तीन विचारवंतांचा खून. या हत्त्यांमागील लोक कोण हे शोधणे फार दूरचे काम असे आपण समजून चाललो तरी ज्या मारेकर्यांनी त्यांना रस्त्यात गाठून हत्त्या केली ते भाडोत्री मारेकरी सुध्दा हाती लागू नयेत हे आकलनापलिकडे आहे. एखादा संशयीत मारेकरी पोलिसांच्या हाती लागला तर तो कसा निष्पाप आहे हे न्यायाधिशांच्या आधी मंत्रीमहोदय सांगतात.
कोणी काय खावे हे दुसरा कोणी कसा ठरवू शकतो? कोणी कोणते कपडे घालावेत त्यावरून मतभेद. कोणाचे घर कोणत्या वस्तीत असावे हे तो तो कळप ठरवणार? मोहम्मद अखलाख दादरी हत्याकांडाने आक्खा देश हादरला. थरकाप उडवणारी आणि झोप उडवणारीही हिंसक घटना आहे ही. आपण मध्ययुगीन आदिम काळात जगतो आहोत की काय असा भास व्हायला लागला. आपापल्या जातीधर्माच्या कळपात राहून आपण आपले आदिम हिंसक टोळ्यांमध्ये रूपांतर करू पहात आहोत? गुजरातमध्ये मुस्लीम युवकांना गरबा नृत्य परिसरात येण्यावर बंदी घालण्यात आली. देशभरात विविध संघटनांकडून असे अनेक छोटेमोठे स्थानिक फतवे निघताहेत. हा कोणत्या प्रकारचा जमातवाद आहे.
यापुढे कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणे हे देशाच्या दृष्टीने हानीकारक ठरणार आहे का? आपण या देशाच्या विकासासाठीच नक्की सरकार निवडून दिलंय का? हा कोणत्या प्रकारचा विकास आहे? विकासाच्या आरोळ्या मारताना देशातल्या शंभरावर असलेल्या विविध नावांच्या संघटना सुप्तावस्तेत होत्या. सत्ता मिळताच त्या आपल्या खरे रूप दाखवायला लागल्या. रस्त्यांवर नंगानाच होऊ लागला. मत विभाजन होण्यासाठी एखादा नाटकी विरोधकही तसा खमक्या हवा म्हणजे आपला अजेंडा ठोसपणे राबवता येतो. आपल्या समूहावर विषारी टीका केली की आपल्यापासून थोडे दूर गेलेले लोक अजून आपल्या जवळ येतात या सिध्दांताने अगदी ठरवून एका राक्षसालाही जन्म देण्यात आला. तो जितके विषारी बोलेल तितका आपल्याला फायदा. इथे एक कळत नाही की एखाद्या नेत्यावर कोणी टीका केली तर त्या नेत्याच्या धर्माच्या लोकांचा अपमान कसा होऊ शकतो?
इतके सारे होत असूनही सिंहासनावर आरूढ झालेली व्यक्ती काही बोलायला तयार नाही. तेव्हाचे मौनीबाबा परवडले. आता सोयीनुसार बोलले जाते आणि सोयीनुसार दुर्लक्ष केले जाते. प्रचारसभांमध्ये आणि इतर देशांच्या दौर्यांवर जे बोलू नये ते बोलले जाते. रेडीओवर मनातले सगळे सोयीस्कर सांगितले जाते. पण देशांतर्गत हिंसेवर तोंडावर बोट... गडीगुप्प. उत आलेले लोक याचा फायदा उठवत आपला कार्यभाग उरकवताहेत.
महात्मा गांधींना संपवता येत नाही तर आता महात्मा गांधींचे नाव घ्यायचे आणि होता आले तर दुसरे महात्मा व्हायला काय हरकत आहे. मंदिरे बांधता बांधता पोटातल्या पोट आपलेही एखादे मंदिर का बांधू नये आता? दोन आक्टोबरला रस्त्यांची स्वच्छता करता करता मनातल्या जळमटांची स्वच्छता मात्र अजिबात करायची नाही! भारत पंधरा महिण्यांपूर्वी अस्तित्वात होता की नव्हता, माहीत नाही. कदाचित तो आताच घडवला गेला असेल ! चमकता येईल तिथे चमकायचे मग ते फेसबुक का असेना पण जग फिरताना आपल्याच देशाची निंदा करणे गरजेचे आहे का?
काल एका चॅनलवर ऐकले: बिहार मध्ये मुस्लीम मते नितीश आघाडीकडे किती जातील आणि भाजपकडे किती. राजपूत आणि तेल्यांची मते कुठे जातील तेही सांगू... माझी जात ज्या कोणाला मते देईल त्यालाच मी माझे मत देईल का? एक जात एक धर्म सर्व मिळून एखाद्या पक्षाला मतदान करू शकतात का? अशा जातीयवादी सर्वे करणार्या चॅनल्सना कोर्टात खेचले पाहिजे. कोणतं न्यूज चॅनल नेमकं कोणाला विकलं गेलंय हे सहज कळतं आता! लोकशाहीचा तिसरा स्तंभ विकला गेला आहे का!
सावधान! देशाच्या सवोच्च स्थानी असलेल्या नेत्यांची भाषा प्रचार सभांमध्ये पार रसातळाला गेली! आपला देश फक्त प्रचार सभांपुरताच आणि निवडून येण्यापुरताच उरला की काय? तसे नसते तर आज प्रचार करताना जातीय धर्मिय समिकरणे जिथक्या उथळपणे वापरली जातात तशी ती वापरली गेली नसती.
भारतात अशी अराजकता येणार असेल तर देशाच्या नुकसानासाठी दुसर्या शत्रू देशाला काहीच करायची गरज नाही. आपण आपल्याच कृत्यांनी देशाची एकता पोखरून काढू. अथवा शत्रू राष्ट्राला हे निमंत्रण आहे! असे म्हणावे लागेल. आपण खरंच अराजकतेकडे जात आहोत का, याचा सजगपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
(या मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
- डॉ. सुधीर रा. देवरे
Email: sudhirdeore29@rediffmail.com
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता:
Dr sudhir Deore
sudhirdeore29.blogspot.com
वर्गीकरण
वाचने
16355
प्रतिक्रिया
98
मिसळपाव
प्रतिक्रिया
अराजक नाही पण किंचीतसा
एक साधी बाब आहे इतक्या विवीध स्तरातुन विरोध होतोय
तेव्हा कुठे होता ?
In reply to एक साधी बाब आहे इतक्या विवीध स्तरातुन विरोध होतोय by मारवा
याला खाल्या मिठाला जगणे
याला खाल्या मिठाला जगणे म्हणतात
In reply to याला खाल्या मिठाला जगणे by विवेकपटाईत
डॉक्टर देवरे
सर्व जण अराजक आहे म्हणून
विचारवंतांच्या हत्या
In reply to सर्व जण अराजक आहे म्हणून by सुबोध खरे
आता कृपया हे कुणी वैयक्तिक
In reply to विचारवंतांच्या हत्या by द-बाहुबली
वाटतो न!
In reply to विचारवंतांच्या हत्या by द-बाहुबली
जाती आणी धर्मा वरून राजकारण
ट्रेड मार्क,
In reply to जाती आणी धर्मा वरून राजकारण by ट्रेड मार्क
मूलभूत साम्य
In reply to ट्रेड मार्क, by तर्राट जोकर
आले, आदर्श लिबरल आले....
In reply to ट्रेड मार्क, by तर्राट जोकर
हत्या ही हत्या असते. जसा
In reply to आले, आदर्श लिबरल आले.... by बोका-ए-आझम
छान विश्लेषण
In reply to हत्या ही हत्या असते. जसा by श्रीगुरुजी
अरे वा?
In reply to ट्रेड मार्क, by तर्राट जोकर
साहित्यीकांचे अभिनंदन.
+१
In reply to साहित्यीकांचे अभिनंदन. by अर्धवटराव
देर से आये दुरुस्त आये म्हणून
In reply to +१ by प्यारे१
देरीने दुरुस्ती केल्याबद्दल
In reply to देर से आये दुरुस्त आये म्हणून by श्रीगुरुजी
मी पण
In reply to साहित्यीकांचे अभिनंदन. by अर्धवटराव
एक दुर्लक्ष करण्यायोग्य धागा
एक दुर्लक्ष करण्यायोग्य धागा
In reply to एक दुर्लक्ष करण्यायोग्य धागा by आकाश कंदील
असहमत
रामदास साहेब प्रतिसादाबद्दल आभार
काही मुद्दे समजले आहेत
In reply to रामदास साहेब प्रतिसादाबद्दल आभार by आकाश कंदील
१८५७ चा उठाव
ओके ओके, आपण भारतात भगवा
In reply to १८५७ चा उठाव by अमृत
ओके ओके, आपण भारतात भगवा
In reply to ओके ओके, आपण भारतात भगवा by तर्राट जोकर
भाजप सरकारला पाठीशी घालणारे
मी पण
In reply to भाजप सरकारला पाठीशी घालणारे by तर्राट जोकर
अच्छा! म्हणजे तुम्हाला या
In reply to भाजप सरकारला पाठीशी घालणारे by तर्राट जोकर
हिंदू राष्ट्र कुणाला हवे आहे?
माझ्या वरच्या प्रतिसादातला
दोन मुद्द्यांची सरमिसळ
सोप्प आहे. मुद्दे संपले कि
In reply to दोन मुद्द्यांची सरमिसळ by सुबोध खरे
अगदी अगदी.....! त्यात नवीन
म्हणजे मूळ धाग्यात महागाई ई.
बाब्बौ, डॉक्टर.....? आर यु ऑल
एक कुशंका
In reply to बाब्बौ, डॉक्टर.....? आर यु ऑल by तर्राट जोकर
पुरस्कार परत करणारे जर इतकेच
अहो डॉ
In reply to पुरस्कार परत करणारे जर इतकेच by सुबोध खरे
खरं काय गरज होती का? गोहत्येची
भाजपाच्या प्रामाणिक
सिद्ध करा
In reply to भाजपाच्या प्रामाणिक by तर्राट जोकर
जरा सविस्तर सांगा हो आम्हा मिपाकरांना.........
In reply to भाजपाच्या प्रामाणिक by तर्राट जोकर
सर्टीफिकेट आणि शिक्का घेऊन
काय करणार फिरावाच लागतं
In reply to सर्टीफिकेट आणि शिक्का घेऊन by तर्राट जोकर
एवढी काळजी करता म्हणुन घुसमट
In reply to काय करणार फिरावाच लागतं by दत्ता जोशी
>>>
In reply to एवढी काळजी करता म्हणुन घुसमट by तर्राट जोकर
तर्रात जोकर साहेब
+१
In reply to तर्रात जोकर साहेब by आकाश कंदील
सिद्ध करा की मे २०१४ पासून
बाब्बौ!!
In reply to सिद्ध करा की मे २०१४ पासून by मार्मिक गोडसे
शिंपल लॉजिक
In reply to बाब्बौ!! by अन्या दातार
विषय बदलू नका
In reply to सिद्ध करा की मे २०१४ पासून by मार्मिक गोडसे
@ गोडसे.........
In reply to सिद्ध करा की मे २०१४ पासून by मार्मिक गोडसे
तुमच्या म्हणण्यात जर
In reply to @ गोडसे......... by विनोद१८
बिहार विधानसभा
In reply to सिद्ध करा की मे २०१४ पासून by मार्मिक गोडसे
बिहार विधानसभा निवडणुका
In reply to बिहार विधानसभा by मार्मिक गोडसे
ऑलरेडी ४००० रुपये प्रतिटन
निर्यात
In reply to ऑलरेडी ४००० रुपये प्रतिटन by मार्मिक गोडसे
महत्वाचे - यातील कुठलेही
In reply to निर्यात by ट्रेड मार्क
कंफ्युज्ड!!!
उगाच घुसमट, गळचेपी,
In reply to कंफ्युज्ड!!! by ट्रेड मार्क
एकंदर धागा वाचल्यानंतर
नेमणूक
In reply to एकंदर धागा वाचल्यानंतर by आनंदी गोपाळ
आंतर: कोपि हेतु
In reply to नेमणूक by ट्रेड मार्क
सत्य आहे
In reply to आंतर: कोपि हेतु by रमेश आठवले
+१
In reply to नेमणूक by ट्रेड मार्क
सत्यासत्यता
मार्केट यार्ड आणि किरकोळ भावात बराच फरक आहे असं म्हणायचं आहे का?
In reply to हे शेटजी भटजीचे सरकार आहे. by मितभाषी
साठेबाजी कडे कोणी दुर्लक्ष
मार्ग शोधणे हा हेतू आहे
In reply to साठेबाजी कडे कोणी दुर्लक्ष by मार्मिक गोडसे
पुरस्कार परत करणार्यांनी
ओ
In reply to पुरस्कार परत करणार्यांनी by कॅप्टन जॅक स्पॅरो
नाय तर काय?
In reply to ओ by इरसाल
अर्थातच मोदींना
In reply to नाय तर काय? by नाखु
कं झाला मंग
In reply to नाय तर काय? by नाखु
कॅप्टन,
In reply to पुरस्कार परत करणार्यांनी by कॅप्टन जॅक स्पॅरो
भारतरत्न परत करणं हा गमतीचा
In reply to कॅप्टन, by बोका-ए-आझम
एक पटियाला पेग आमचाही
ये टिल्लू, दोन कटींग घे रे
सगळ्यात जबरदस्त गणेश देवी आहेत
सहमत आहे
In reply to सगळ्यात जबरदस्त गणेश देवी आहेत by गामा पैलवान
मिपाकरांसारखे
या तथाकथित विचारवंतांचे विचार
धन्यवाद
संपले ना? अगदी निश्चित?
In reply to धन्यवाद by डॉ. सुधीर राजा…
काय अराजक माजलं आहे!!!
In reply to धन्यवाद by डॉ. सुधीर राजा…
यांच्या म्हणण्याला कोणी काहीच किंमत नाही दिली…
माधवन नायर नक्कीच संघवाले,
In reply to यांच्या म्हणण्याला कोणी काहीच किंमत नाही दिली… by ट्रेड मार्क
सर्वांना धन्यवाद.
एक कथा - हिंदीत
अराजक लगेच थांबलेलं दिसतंय
+१
In reply to अराजक लगेच थांबलेलं दिसतंय by ट्रेड मार्क
लालूप्रसाद याना
In reply to अराजक लगेच थांबलेलं दिसतंय by ट्रेड मार्क