अराजक
In reply to एक साधी बाब आहे इतक्या विवीध स्तरातुन विरोध होतोय by मारवा
In reply to याला खाल्या मिठाला जगणे by विवेकपटाईत
In reply to सर्व जण अराजक आहे म्हणून by सुबोध खरे
In reply to विचारवंतांच्या हत्या by द-बाहुबली
In reply to विचारवंतांच्या हत्या by द-बाहुबली
In reply to जाती आणी धर्मा वरून राजकारण by ट्रेड मार्क
In reply to ट्रेड मार्क, by तर्राट जोकर
In reply to ट्रेड मार्क, by तर्राट जोकर
In reply to आले, आदर्श लिबरल आले.... by बोका-ए-आझम
हत्या ही हत्या असते. जसा गुन्हेगारांना धर्म नसतो तसा त्यांच्या बळींनाही धर्म नसतो. पण कोणी त्यावरून मिळालेल्या पुरस्कारांचा त्याग करेल असं वाटत नाही.चूक. बळींना धर्म असतो आणि त्यांच्या मारकर्यांनाही धर्म असतो आणि बळी व मारेकर्यांच्या धर्मावरून पुरोगामी आणि निधर्मी विचारवंतांची प्रतिक्रिया ठरते. याच्यात साधारणपणे खालील वर्गवारी असते. (१) बळी हिंदू, मारेकरी अहिंदू पुरोगामी आणि निधर्मी विचारवंतांची प्रतिक्रिया - संपूर्ण दुर्लक्ष करून मौन पाळणे आणि या घटनेचा चुकुनही उल्लेख न करता मारेकर्यांविरूद्ध चकार शब्द न काढणे. समजा कोणी चिकाटीने प्रतिक्रिया विचारली तर बळी पडलेला बजरंग दल, संघ इ. गुंड संघटनेचा गुंड सदस्य होता व ही हत्या धार्मिक द्वेषातून झालेली नसून हा राजकीय खून आहे असे सांगून प्रश्न झटकून टाकणे. उदाहरणे - ओरिसामधील स्वामी लक्ष्मणानंद व त्यांच्या ४ शिष्यांची धर्मांतर प्रकरणावरून ख्रिश्चनांनी केलेली हत्या, बीफला विरोध केल्यामुळे कर्नाटकातील मुस्लिमांनी केलेली प्रशांत पुजारीची हत्या, बीफबंदीमुळे संतापलेल्या मौलवीने नमाजाच्या वेळी प्रक्षोभक भाषण करून डिवचल्यामुळे एका मुस्लिम युवकाने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाला भोसकल्याचे प्रकरण इ. (२) बळी हिंदू, मारेकरी हिंदू पुरोगामी आणि निधर्मी विचारवंतांची प्रतिक्रिया - संपूर्ण दुर्लक्ष करून मौन पाळणे (३) बळी अहिंदू, मारेकरी अहिंदू पुरोगामी आणि निधर्मी विचारवंतांची प्रतिक्रिया - संपूर्ण दुर्लक्ष करून मौन पाळणे (४) बळी अहिंदू, मारेकरी हिंदू पुरोगामी आणि निधर्मी विचारवंतांची प्रतिक्रिया - प्रचंड आरडाओरडा करून निषेध करणे, थेट मोदींना जबाबदार धरणे, देशात भीतिचे व दडपशाहीचे वातावरण आहे असे वेगवेगळ्या परिसंवादांमध्ये सांगत रहाणे, वृत्तपत्रातून लेख लिहून हिंदुत्ववादी संघटनांचा फॅसिस्ट, दहशतवादी, अतिरेकी असा उल्लेख करणे, मिळालेले पुरस्कार परत करण्याचे नाटक करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करणे इ. (५) बळी अहिंदू किंवा यांच्यासारखाच निधर्मी, पुरोगामी, विचारवंत इ.इ. आणि मारेकरी अज्ञात पुरोगामी आणि निधर्मी विचारवंतांची प्रतिक्रिया - रचंड आरडाओरडा करून निषेध करणे, थेट मोदींना जबाबदार धरणे, देशात भीतिचे व दडपशाहीचे वातावरण आहे असे वेगवेगळ्या परिसंवादांमध्ये सांगत रहाणे, वृत्तपत्रातून लेख लिहून या हत्येमागे हिंदुत्ववादी संघटनांचा फॅसिस्ट, दहशतवादी, अतिरेकी चेहरा आहे असा कोणत्याही पुराव्याविना सतत आरोप करीत राहणे, मिळालेले पुरस्कार परत करण्याचे नाटक करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करणे इ.
In reply to हत्या ही हत्या असते. जसा by श्रीगुरुजी
In reply to ट्रेड मार्क, by तर्राट जोकर
In reply to साहित्यीकांचे अभिनंदन. by अर्धवटराव
In reply to +१ by प्यारे१
देर से आये दुरुस्त आये म्हणून आम्ही देखील साहित्यिकांचे अभिनंदन करतो.हे खरे नाही. हे तथाकथित विचारवंत देरीने आलेले नाहीत आणि दुरूस्त देखील आलेले नाहीत. पुरस्कार ऑक्टोबर २०१५ मध्ये करण्यामागची त्यांची मुख्य कारणे खालीलप्रमाणे - (१) २० ऑगस्ट २०१३ रोजी नरेंद्र दाभोलकरांचा खून (केंद्रात सत्ताधारी - युपीए, राज्यात सत्ताधारी - काँग्रेस + राष्ट्रवादी) घटना घडून २ वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर यांना जाग आली. खुनानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग व तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दोष दिला नाही. (२) २० फेब्रुवारी २०१५ रोजी गोविंद पानसरेंचा खून (केंद्रात सत्ताधारी - भाजप, राज्यात सत्ताधारी - भाजप) घटना घडून ७ महिन्यांहून अधिक काळ लोटल्यानंतर यांना जाग आली. खुनानंतर तत्कालीन पंतप्रधान मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना दोष दिला नाही. (३) ३० ऑगस्ट २०१५ रोजी कलबुर्गींचा खून (केंद्रात सत्ताधारी - भाजप, राज्यात सत्ताधारी - काँग्रेस) घटना घडून १ महिन्यांहून अधिक काळ लोटल्यानंतर यांना जाग आली. खुनानंतर तत्कालीन पंतप्रधान मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना दोष दिला नाही. (४) ............. (५) ३० सप्टेंबर २०१५ रोजी दादरी येथे अखलाखचा खून (केंद्रात सत्ताधारी - भाजप, राज्यात सत्ताधारी - सपा) आता मात्र यांना जाग आली. खुनानंतर तत्कालीन पंतप्रधान मोदींवरच या खुनासाठी व सर्व आधीच्या खुनांसाठी दोष द्यायला सुरूवात झाली. कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा नामोल्लेखही नाही. (६) ............. काही जणांना वाटले की पूर्वी हे जागे झाले नव्हते, पण निदान उशीरा का होईना हे जागे झालेत हे चांगलेच झाले. परंतु हे उशीरा जागे झाले आणि योग्य कारणासाठी जागे झाले हे खोटे आहे. कारण वर न लिहिलेली घटना क्रमांक (४) आणि (६). (४) २५ सप्टेंबर २०१५ रोजी यवतमाळमध्ये अब्दुल मलिक नावाच्या एका मुस्लिम तरूणाने नमाज संपल्यावर बंदोबस्तावर असलेल्या एका पोलिसाला भोसकले. गोवंश हत्याबंदीमुळे संतापलेल्या एका मौलवीने प्रक्षोभक भाषण करून चिथावणी दिल्यामुळे अब्दुल मलिकने एका पोलिसाला भोसकले व इतर २ पोलिसांवर हल्ला केला. While stabbing him, an angry Malik allegedly shouted, “Tumhari government beef ban karti hai, toh yeh lo (Your government bans beef, so you suffer).” Malik allegedly also attacked two more constables who tried to intervene. http://indianexpress.com/article/india/india-news-india/maharashtra-constable-stabbed-to-avenge-beef-ban-hunt-on-for-maulana/ ही घटना दादरीच्या ५ दिवस आधी म्हणजे २५ सप्टेंबरला घडली. हा उघडउघड जातीयवादी द्वेषातून केलेला हल्ला होता. या घटनेवर आजतगायत पुरस्कार परत करणार्यांपैकी एकानेही तोंड उघडलेले नाही. (६) ८ ऑक्टोबर २०१५ रोजी मंगळूरमध्ये प्रशांत पुजारीला अनेक मुस्लिमांनी एकत्र येऊन त्याचा खून केला. कारण तो गोवंशहत्येला विरोध करीत होता. हा उघडउघड जातीयवादी द्वेषातून केलेला हल्ला होता. या घटनेवर आजतगायत पुरस्कार परत करणार्यांपैकी एकानेही तोंड उघडलेले नाही. जर हे विचारवंत "देर आए, दुरूस्त आए" होते, तर दादरीनंतर घडलेल्या निदान या हल्ल्याचा तरी त्यांनी निषेध करायला हवा होता. पण तसे झालेले नाही, कारण वरील दोन्ही घटनात हल्लेखोर मुस्लिम होते व बळी हिंदू होते. http://www.daijiworld.com/news/news_disp.asp?n_id=363789 हे सिलेक्टिव्ह निषेध करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. यांचा ढोंगीपणा पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे. दादरी घटनेच्या आधी आणि नंतर घडलेल्या घटनेबद्दल मौन पाळताना यांनी फक्त दादरीचाच निषेध केला कारण दादरीचे हल्लेखोर हिंदू होते व बळी मुस्लिम होता आणि इतर २ घटनांमधील हल्लेखोर मुस्लिम होते व बळी पडलेले हिंदू होते. हे तथाकथित विचारवंत देरीने आलेले नाहीत आणि दुरूस्त देखील आलेले नाहीत. नक्की कोणत्या घटनेचा निषेध करायचा आणि कधी तोंड बंद ठेवायचे हे यांना चांगलेच समजते. दुसर्या एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे यांचे वर्तन हे हल्लेखोरांचा धर्म व बळी पडलेल्यांचा धर्म यावर ठरते.
In reply to देर से आये दुरुस्त आये म्हणून by श्रीगुरुजी
In reply to साहित्यीकांचे अभिनंदन. by अर्धवटराव
In reply to एक दुर्लक्ष करण्यायोग्य धागा by आकाश कंदील
In reply to रामदास साहेब प्रतिसादाबद्दल आभार by आकाश कंदील
In reply to १८५७ चा उठाव by अमृत
In reply to ओके ओके, आपण भारतात भगवा by तर्राट जोकर
ओके ओके, आपण भारतात भगवा तालिबान आणण्याच्या समर्थनात आहात तर...घाबरु नका हो, भगवा तालिबान म्हणजे सावरकरांना अभिप्रेत नसलेले हिंदुराष्ट्र म्हणताय का ? ते होणार नाही कारण एवरीवन नोज हिंदु राश्ट्रा इज अ फेल्ड कॉन्सेप्ट... जेव्हां फक्त ब्राम्हणांना शिक्षणाधीकार होते भारताची अवस्था शिक्षण क्षेत्रात काय होती ? जेंव्हा फक्त क्षत्रीयांकडे संरक्षणाच्या जबाबदार्या होत्या, संरक्षण क्षेत्रात भारताची अवस्था काय झाली ? जेंव्हा फक्त वैश्य व्यापार करत होते भारताची अवस्था व्यापारात काय होती किती भारतीयांनी वसाहती निर्माण केल्या ? इन इंडीया एवरीवन नोज.. भगवा तालिबान इज ह्युज फेल्युअर. जे शतकोनशतके मुघल राजवटीखाली राहुन उमजले नाही ते दिडशे वर्षात इंग्रज राजवटीमुळे कळाले ते म्हणजे सावरकरांना अभिप्रेत नसलेले हिंदुराष्ट्र हे भारताचे न भुतो न भवीष्यती अपयश आहे अन पुन्हा तोच ऐतीहासीक चुकांचा कित्ता गिरवायची हौस/क्षमता भारतीय जनतेत आता नक्किच उरली नाही.
In reply to भाजप सरकारला पाठीशी घालणारे by तर्राट जोकर
In reply to भाजप सरकारला पाठीशी घालणारे by तर्राट जोकर
In reply to दोन मुद्द्यांची सरमिसळ by सुबोध खरे
In reply to बाब्बौ, डॉक्टर.....? आर यु ऑल by तर्राट जोकर
In reply to पुरस्कार परत करणारे जर इतकेच by सुबोध खरे
In reply to भाजपाच्या प्रामाणिक by तर्राट जोकर
In reply to भाजपाच्या प्रामाणिक by तर्राट जोकर
In reply to सर्टीफिकेट आणि शिक्का घेऊन by तर्राट जोकर
In reply to काय करणार फिरावाच लागतं by दत्ता जोशी
In reply to एवढी काळजी करता म्हणुन घुसमट by तर्राट जोकर
In reply to तर्रात जोकर साहेब by आकाश कंदील
सिद्ध करा की मे २०१४ पासून कुठले भ्रष्टाचार झाले. त्यात किती पैश्यांचा अपहार झाला आणी त्यात कोण कोण गुंतले आहेत.एक वेळ तो भष्टाचार परवडला. परंतू सरकार प्रायोजीत कृत्रिम महागाई ही अधीक भयानक. डाळ व कांद्याच्या साठेबाजीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने जनतेच्या खिशातून करोडोचा पैसा व्यापार्यांनी लूटला. साखरेचे विक्रमी उत्पादन व मागील वर्षाच साठा शिल्लक असल्यामुळे साखरेचे भाव गडगडले. सरकारने साखरेचा निर्यात कोटा वाढवण्याचा निर्णय घेतल्याबरोबर फक्त ३ दिवसात साखरेचे घरगुती भाव ६- ८ रुपयांनी वाढले. साखरेचा निर्यात भाव २५ ठेवूनही आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी नसल्यामुळे साखरेची निर्यात वाढली नाही. अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांकडून पडेल भावात व्यापार्यांनी प्रचंड प्रमाणात साखर खरेदी केली. अनुदान दिल्याशिवाय साखरेची निर्यात वाढणार नाही, साखर निर्यात केल्याशिवाय कारखाने शेतकर्यांची ऊस थकबाकी देऊ शकनार नाही, आणि बिहार राज्याच्या निवडणुका झाल्याशिवाय केन्द्र सरकार अनुदान देणार नाही. मधल्यामधे व्यापारी ह्या परिस्थितीचा फायदा उठवत आहे. कांदे,डाळ व साखरेचे खरे लाभार्थी शोधून काढने महाकठीण. कदाचीत २ जी पेक्षाही हा घोटाळा मोठा असू शकेल. निदान २ गी घोटाळ्यामुळे जनतेचे प्रत्यक्ष नुकसान झाले नव्हते, परंतो ह्या कांदे,डा़ळ व सा़खरेच्या घोटाळ्यामुळे जनतेचे थेट आर्थिक नुकसान होत आहे. पुढेही होत राहील.सरकारला भ्रष्टाचार करायची गरजच उरली नाही.
In reply to सिद्ध करा की मे २०१४ पासून by मार्मिक गोडसे
साखरेचे विक्रमी उत्पादन व मागील वर्षाच साठा शिल्लक असल्यामुळे साखरेचे भाव गडगडले.याला सध्याचे सरकारच कसे जबाबदार आहे? साखर कारखाने काढायला परवानगी देणार्यांबद्दल काय?
साखरेचा निर्यात भाव २५ ठेवूनही आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी नसल्यामुळे साखरेची निर्यात वाढली नाही.आंतरराष्ट्रीय बाजारातली मागणी सरकार कसे ठरवू शकेल?
अनुदान दिल्याशिवाय साखरेची निर्यात वाढणार नाहीऑलरेडी ४००० रुपये प्रतिटन सबसिडी दिली जाते आहेच. पण अनुदान दिल्याशिवाय निर्यात वाढणार नाही हे कसे? तेवढा एकच मार्ग आहे काय? भाव पाडून तर सगळेच देश बसलेत. जर अनुदान वाढवत नेले तर त्याचा फायदा फक्त आणि फक्त कारखान्यांना होईल. मग परत सामान्य माणसाला काय मिळणार? कारखाने काय चॅरिटीसाठी बसलेत का? तसे असेल तर आजवर त्यांनी १५-२० रुपये किलोने साखर (अंदाजे ब्रेक इव्हन भावास) का नाही उपलब्ध केली? यापूर्वी ५०-६० रु. किलो भाव उपलब्ध असताना प्रॉफिट केलाच असेल. तो कुठे गेला? त्यातून ऊस उत्पादकाला पैसे देता आले नसते का?
साखर निर्यात केल्याशिवाय कारखाने शेतकर्यांची ऊस थकबाकी देऊ शकनार नाहीप्रच्चंड हास्यास्पद वाक्य! कॉस्ट कंट्रोल मेकॅनिजम्स मोडीत काढून भरमसाट खर्च जो केला तो टाळूनही साखर कारखान्यांकडे तरलता असू शकते. साखरेचे अर्थकारण तुम्हास खरेच माहित आहे काय?
मधल्यामधे व्यापारी ह्या परिस्थितीचा फायदा उठवत आहे.हे गेल्या सरकारांच्या काळातही चालतच होते. तुम्ही उद्यापासून ३ दिवसात एखाद्या शेअरची किंमत ६-८ रुपयांनी वाढल्यानंतर प्रॉफिट बुक करणार नाही काय? बाकी डाळींच्या बाबतीत धाडी पडल्यावर यापूर्वी व्यापारी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन रडल्याचे वाचले नव्हते. पहिल्यांदाच ही स्थिती बघतोय. शिवाय स्ट्रॅटेजी अंमलात आणल्यापासून ४ दिवसात निदान भाव पडल्याचेही वाचले. (स्वतः खरेदीस रोज बाहेर पडावे न लागल्याने आजचा ताजा भाव माहित नाही)
In reply to बाब्बौ!! by अन्या दातार
In reply to सिद्ध करा की मे २०१४ पासून by मार्मिक गोडसे
In reply to सिद्ध करा की मे २०१४ पासून by मार्मिक गोडसे
In reply to @ गोडसे......... by विनोद१८
तुमच्या म्हणण्यात जर तथ्य असेल तर ह्या विषयात खोलात जाउन 'माहितीच्या अधिकाराखाली' त्याची अधिक माहिती घेउन कोणी सरकारला कोर्टात का नाही खेचत ??कोणत्या मुद्द्याबद्दल तुम्हाला शंका वाटतेय आणि माहितीच्या अधिकाराखाली सरकारकडून काय माहीती अपेक्षीत आहे तुम्हाला?
In reply to सिद्ध करा की मे २०१४ पासून by मार्मिक गोडसे
In reply to बिहार विधानसभा by मार्मिक गोडसे
ऑलरेडी ४००० रुपये प्रतिटन सबसिडी दिली जाते आहेच. पण अनुदान दिल्याशिवाय निर्यात वाढणार नाही हे कसे?नवीन अनुदान म्हणायचे होते. वर्तमान सरकारने जर येत्या काही दिवसात साखरेचे निर्यात अनुदान वाढवले तर तुम्ही त्याचे समर्थन कराल का?
हे गेल्या सरकारांच्या काळातही चालतच होते. तुम्ही उद्यापासून ३ दिवसात एखाद्या शेअरची किंमत ६-८ रुपयांनी वाढल्यानंतर प्रॉफिट बुक करणार नाही काय?म्हणजे आजही व्यापारी फायदा उठवत आहेत हे तुम्हाला मान्य आहे तर. शेअरच्या किमती कमी जास्त होण्यामागे अनेक कारणे असतात, मागणी आणि पुरवठा हे एक कारण असू शकते जे साखरेलाही लागू होते. परंतू यंदा भारतात साखरेचा पुरवठा जास्त व मागणी कमी असे असताना फक्त साखर निर्यातीची घोषणा केल्याबरोबर साखरेचे भाव अचानक ३ दिवसात ६-८ रुपयांनी कसे वाढले?
बाकी डाळींच्या बाबतीत धाडी पडल्यावर यापूर्वी व्यापारी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन रडल्याचे वाचले नव्हते. पहिल्यांदाच ही स्थिती बघतोय. शिवाय स्ट्रॅटेजी अंमलात आणल्यापासून ४ दिवसात निदान भाव पडल्याचेही वाचले. (स्वतः खरेदीस रोज बाहेर पडावे न लागल्याने आजचा ताजा भाव माहित नाही)तू रडल्यासारखे कर मी मारल्यासारखे करतो असला प्रकार आहे हा तुम्ही इतके हळवे होउ नका.. डाळींचे भाव २५ ट्क्क्यावरून १०० ते १५० टक्क्यापर्यंत वाढेपर्यंत सरकार झोपले होते का? भाव पडल्याचे वाचले ना मग प्रत्यक्ष खात्री करून या की किती ने भाव कमी झाले ते आणि आम्हालाही सांगा.
In reply to ऑलरेडी ४००० रुपये प्रतिटन by मार्मिक गोडसे
In reply to निर्यात by ट्रेड मार्क
महत्वाचे - यातील कुठलेही वाक्य तुमच्यावर अथवा येथील कोणावरच वैयक्तिक आरोप करण्याकरता केलेले नाहीये. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे.ही आज्ञा की सुचना की सल्ला?
In reply to कंफ्युज्ड!!! by ट्रेड मार्क
उगाच घुसमट, गळचेपी, व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला वगैरे चालू होईल.अहो मग बरंय की मग.. असं झालं की मिपादेशी डु-आयडी परत करतेत म्हणे.. हितेसभौ (सध्या मोगा) नी त्यांचे नुकतेच काही डु-आयडी परत केले म्हणे (त्यांचा कुठला डु आणि कुठला आयडी कै म्हैत नै) .. ;)
In reply to एकंदर धागा वाचल्यानंतर by आनंदी गोपाळ
In reply to नेमणूक by ट्रेड मार्क
In reply to आंतर: कोपि हेतु by रमेश आठवले
In reply to नेमणूक by ट्रेड मार्क
In reply to हे शेटजी भटजीचे सरकार आहे. by मितभाषी
साठेबाजी कडे कोणी दुर्लक्ष केले तर फक्त मोदींनी, अंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला उठाव नाही त्याला जबाबदार मोदीमोदींचे नाव माझ्या प्रतिसादात तुम्हाला कुठे आढळले? केन्द्रात भाजप पक्षाचे सरकार आहे, मोदींचे नव्हे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला उठाव नाही त्याला वर्तमान सरकार जबाबदार आहे असे मी म्हणलेले नाही. उलट साखरेचा निर्यात भाव २५ ठेवूनही आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी नसल्यामुळे साखरेची निर्यात वाढली नाही असे लिहीले आहे.
Openly सांगायचे की एप्रिल महिन्यात साखरेचे भाव रु. ३५ होतील कि बरोब्बर व्हायचं. तेव्हा पण तुम्हाला हा प्रश्न पडला होता का?म्ह्णूनच त्यांना पाडले व ह्यांना खांद्यावर घेतले, हे तर आता कानात मुतायला लागले.
साठेबाजीला एक ग्राहक म्हणून आपण काय करू शकतो याचा कोणी विचार केला आहे का? खूपच भाव वाढले आहेत तर नाही करायची खरेदी थोडे दिवस किंवा अगदी थोडी करायची, फारच आवश्यक असेल तर थोडे शहराबाहेर जाउन परस्पर शेतकऱ्याकडून खरेदी करता येतेय का बघावं.भयानक सल्ला व एकप्रकारे साठेबाजीचे समर्थन. साखरेची साठेबाजी झाली तर शहराबाहेरच्या कोणत्या शेतकर्याकडे साखर मिळेल? मुंबईच्या ग्राहकाने तूरडाळीसाठी लातूरच्या शेतकर्याकडे जावे असे आपले म्ह्णणे आहे का? मुख्य म्हणजे व्यावहारीक आहे का? आणि शेतमालाची साठेबाजी ही शेतकर्याकडील माल संपल्यावरच होते.
निर्यात न करता ती साखर तशीच पडून ठेवायला पाहिजे होती का? मग शेतकऱ्यांचे उसाचे पैसे कसे दिले असते?नीट वाचा. "अनुदान दिल्याशिवाय साखरेची निर्यात वाढणार नाही, साखर निर्यात केल्याशिवाय कारखाने शेतकर्यांची ऊस थकबाकी देऊ शकणार नाही", हा माझा प्रतिसाद. मी निर्यातीला विरोध केलेला नाही हे स्पष्ट दिसतेय. माझा विरोध बिहारच्या निवडणूका संपेपर्यंत सरकारनी साखरेला वाढीव निर्यात अनुदान न देण्याला आहे. दुसरे म्हणजे सध्याच्या निर्यात अनुदानात आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पर्धेमुळे आपल्या साखरेला उठाव नसताना फक्त साखरेचा निर्यात कोटा वाढवल्यामुळे जर आपल्याकडील बाजारात साखरेचे भाव अचानक ६-८ रू. वाढत असतील तर सरकार काय करत आहे? ह्या दरवाढीचा फायदा साखर कारखान्यांना होत असेल तर निर्यात कोटा वाढवण्याची गरजच नाही.
घोटाळे तर शेअर मार्केट पासून ते आपल्या स्थानिक मार्केट पर्यंत सगळीकडेच होत आहेत. उपाय सांगा काही असेल तर.बरोबर आहे.. मागील सरकारच्या काळातही हे प्रकार होत होतेच. सध्याच्या सरकारकने तर ह्यावर आमच्याकडे जालिम इलाज आहे असा प्रचार केल्यामूळे जनतेने त्यावर विश्वास ठेवून त्यांना सत्तेवर आणले, आता लोकांकडून उपाय कशाला मागता?
In reply to साठेबाजी कडे कोणी दुर्लक्ष by मार्मिक गोडसे
In reply to पुरस्कार परत करणार्यांनी by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to ओ by इरसाल
रच्याकाने माझ्या भागात एक पाण्याची पाईपलाईन फुटली आहे आणि एक गटार तुंबले आहे त्याला मी कुणाला जो जिम्मेदार धरू, नगरसेवक की आमदार की फडणवीस का थेट नरेंद्र मोदी का जागतीक आरोग्य संघटना का आणखी कुणी (इथल्या थोर विचारवंतानी प्रकाश विजेरी झोत टाकावा) आणी हो माझ्याकडे एकही पुरस्कार नाही परत द्यायला मग मी काय करावे.
In reply to नाय तर काय? by नाखु
रच्याकाने माझ्या भागात एक पाण्याची पाईपलाईन फुटली आहे आणि एक गटार तुंबले आहे त्याला मी कुणाला जो जिम्मेदार धरू, नगरसेवक की आमदार की फडणवीस का थेट नरेंद्र मोदी का जागतीक आरोग्य संघटना का आणखी कुणीएवढा सोपा प्रश्न तुम्हाला पडूच कसा शकतो? अर्थातच मोदींना जबाबदार धरायला हवे.
In reply to नाय तर काय? by नाखु
In reply to पुरस्कार परत करणार्यांनी by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to कॅप्टन, by बोका-ए-आझम
In reply to सगळ्यात जबरदस्त गणेश देवी आहेत by गामा पैलवान
पुरस्कार परत करणाऱ्यांत सगळ्यात आचरट वल्ली गणेश देवी आहेत.छ्या. असं कसं बोलता गामा पैलवान? गणेश देवी म्हणजे चालतेबोलते विद्यापीठच हे माहित नाही का तुम्हाला? फक्त कुठले विद्यापीठ हे विचारू नका-- जगात हावर्ड, प्रिन्स्टन विद्यापीठे आहेत तसेच ज्ञानेश्वर विद्यापीठही आहे :)
या कानाचे त्या कानाला कळणार नाही अशी यंत्रणा असल्याशिवाय आणि ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असे साटेलोटे असल्याखेरीज दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गीचा खून होऊ शकेल? या तिघांचा गुन्हा काय? तर ते मुख्यत्वे आताच्या काळात धर्मचिकित्सा करीत होते!!!या तीनही खुनामागचा हेतू अजून स्पष्ट झालेला नाही. २ प्रकरणातील एकही आरोपी सापडलेला नाही तर एका प्रकरणातील संशयिताविरूद्ध फारसे सबळ पुरावे मिळाल्याचे दिसत नाही. तरीसुद्धा या तिघांचा खून त्यांनी केलेल्या धर्मचिकित्सेमुळे झाला हा निष्कर्ष पेठ्यांनी काढलेला आहे.
धर्मचिकित्सा करणाऱ्या सर्वच माणसांना त्यांच्या काळात त्रास सहन करावा लागला. पण आताच्या काळात? थेट गोळ्याच!!! अशा कृत्यांनी आजच्या काळातील खुन्यांना अपेक्षित असलेला धर्म वाढेल? चिकित्सेचा, अभ्यासाचा आणि विचारांचा अवकाश संकुचित करणारी ही माणसे धर्म वाढवतात की बुडवतात? खऱ्या धर्माची मूल्ये कोणती? सहिष्णुता, अहिंसा, करुणा, सहभाव, बंधुत्व, क्षमाशीलता आणि मानवता यांची जोपासना करणे म्हणजेच धर्म ना? आज जे स्वत:ला धर्माचे प्रवक्ते मानतात, ते यातील नेमके कुठले तत्त्व आचरणात आणतात? म्हणजे खरे धर्मप्रेमी कोण आणि खरे धर्मद्रोही कोण? दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी की खुनी?इथेही तेच. त्या तिघांच्या खुन्यांनी त्यांना त्यांच्या धर्मचिकित्सेमुळेच मारले हे पेठ्यांचे ठाम मत आहे. जरी खुनी सापडले नसले, जरी खुनामागचे हेतू अजूनही स्पष्ट झाले नसले तरी पेठे आपल्या निष्कर्षावर ठाम आहेत.
जोतिबांबाबत महाराष्ट्रात घोषित आणि अघोषित ‘सेन्सॉरशिप’ कायम होती आणि आजही आहे. पण जोतिबा ठामपणे अभेद्य राहिले आहेत.कसली घोषित आणि अघोषित सेन्सॉरशिप? जोतिबा फुल्यांचा गेली अनेक वर्षे सर्वत्र उदोउदो होत आहे, त्यांच्या साहित्यावर अनेकांनी पीएचडी केली आहे. त्यांच्या नावाचे विद्यापीठात अद्यासन आहे. त्यांच्या घराचे स्मारक झाले आहे. त्यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात. सावित्रीबाई फुलेंचे नाव विद्यापीठाला दिले आहे. त्यांचे समग्र साहित्य सरकारने प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्यावर लिहिलेल्या नाटकाचे प्रयोग व्यवस्थित सुरू आहेत. मग कोठे आहे सेन्सॉरशिप? उगाच विनाकारण नसलेला बागुलबुवा निर्माण करणे हे असल्या विचारवंतांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. आतासुद्धा देशात आणिबाणीसदृश स्थिती आहे, विचारवंतांचा गळा आवळला आहे, मोदींवर टीका केलेली सहन होत नाही असे अनेक बिनबुडाचे आरोप सुरू आहेत.
अजून एक-पुण्यात फुलेवाडय़ाच्या शंभराव्या मराठी प्रयोगाला डॉ. भालचंद्र नेमाडे आले होते. त्यांनी या नाटकाचे कौतुक केले. (नुकतेच त्यांनाही धमकीचे पत्र आले आहे. गुन्हा काय? तर लोकांना विचार करायला भाग पाडणे!!!)हे वाचून तर हसायला आहे. नेमाडे म्हणे लोकांना विचार करायला भाग पाडतात! आपल्याबद्दल हे असे वाचले तर नेमाडे सुद्धा खदाखदा हसतील. आव्हाड सुद्धा म्हणतो मला धमकीची पत्रे येतात. नेमाड्यांना कोण धमकीचे पत्र पाठविणार? त्याविरूद्ध त्यांनी पोलिसात तक्रार केली होती का?
दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी या विचारवंत समाजसेवकांचा निर्घृण खून झाला आहे. आपण वृत्तपत्रांत वाचतो की, या खुन्यांनी अशीच मोठी यादी केली आहे. याला खून म्हणण्यापेक्षा कत्तली म्हणावे का? चिकित्सक विचार करायला लावणाऱ्या आणि विचार करू पाहणाऱ्यांच्या ‘धर्माचे शुद्धीकरण’ या नावाखाली आता कत्तलीच होणार आहेत?परत तेच आणि परत तेच तेच! खुन्यांनी अशी यादी केली असेल तर खुनी सापडले असे समजायचे का? अजून खुनी कोण हेच सापडलेले नाही, खुनाच्या हेतूबद्दल माहिती नाही, पकडलेल्या संशयिताविरूद्ध सबळ पुरावे नाहीत. परंतु कोण खुनी आहेत आणि खून का झाले याविषयी अतुल पेठ्यांची कोणत्याही पुराव्याविना ठाम मते आहेत. हा पूर्वग्रहदूषित विचार आहे.
In reply to धन्यवाद by डॉ. सुधीर राजा…
In reply to धन्यवाद by डॉ. सुधीर राजा…
In reply to यांच्या म्हणण्याला कोणी काहीच किंमत नाही दिली… by ट्रेड मार्क
In reply to अराजक लगेच थांबलेलं दिसतंय by ट्रेड मार्क
In reply to अराजक लगेच थांबलेलं दिसतंय by ट्रेड मार्क
अराजक नाही पण किंचीतसा