काहूर

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
21 Oct 2015 - 12:09 am

" आयं, भायर कावदान सुटलयं" म्या पाटीवर पिन्शीलीनं गिरगुट्या मारत मनालु, पर आय भाकऱ्या थापतच ऱ्हायली, म्या पण नुसतं तिच्याकडं बघत ऱ्हायलु. आय कायच बुलली नाय.
मग म्या ऊठून कवाड ऊघडलं, भाईर रिपीरीपी पाऊस लागला हुता. छपराच्या वळचणीवरचं थेंब म्या हातात धरलं. मग त्यनंच हात धुतलं. मग पुना थेंब थेंब पाणी हातात धरलं, परत त्यनंच हात धुतलं. भिताडाच्या कडकडनं जाऊन मी गोठ्यात नजर मारली. आमची जरशी गाय गरीब बापुडी. अंधारात बसली हुती. म्या तिकडं गीलू न्हाय. पावसाचं टपोरं थेंब वट्यावर पडाय लागलं, मग माज्या बी पायावर शितुडं उडाय लागलं. उंबऱ्यावर पाय पुसून म्या पुना घरात गीलू. पाटी पिन्शील वायरीच्या पिशवीत टाकुन दिली. मग वाकळंवरं उगच पडुन ऱ्हायलु.
छपरातनं पाणी गळायला लागलं. वाकळंवरच. म्या वाकळं एका बाजुला वढुन घीतली.
ऊठुन दिवळीतलं भगुणं घेतलं, आन टपकणाऱ्या पाण्याखाली आदानाला ठिवलं. मग ऊखळापाशी बी टपकाय लागलं, तिथं फुलपात्र ठिवलं, शिक्क्याच्या खाली पाटी ठिवली, चुलीम्होरं तांब्या ठिवला. सगळं घरबार फिरुन म्या भांडीच भांडी केली. पर आय कायच बुलली न्हाय, नुसत्याच भाकऱ्या थापत ऱ्हायली.
कोपऱ्यात बसून म्या ठिबकणाऱ्या पाण्याकडं बघत ऱ्हायलु. कितीतरी येळ.
दुपारच्याला आमच्या शेताचा बांध कोरताना सदू पाटलाला आयशीनं बघीतलं हुतं. ह्यो सदू पाटील दादा माणुस. संध्याकाळी जवा बाप घरी आला, तवा टिकाव घीऊनच त्येच्या घरी गेलता. आजुन परत आला नव्हता.
"आयं, आण्णा कदी येत्यालं गं?" म्या पाय हालवत रडकुंडीला यीवुन ईचारलं. पर आय कायच बुलली नाय. भाकऱ्याचा आवाज माझ्या मनात घुमत ऱ्हायला. रातभर.

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

एस's picture

21 Oct 2015 - 12:14 am | एस

जबरदस्त लिहिलंय!

जव्हेरभाऊ. लिव्हताय खरं पन असं चिपट्या मापट्यानं नगं. जरा हुंद्या उफणणी अन भरा कणगी पायली मणानी. निक्क्या सोन्याची रास बघता आमच्या संगं तुमचाबी जीव हारखून जाईल बगा.
आन पावणं तुम्ही कुनकल्डं मनायचं? ईंदापूर पंढरपूर का बार्शी परंडा? असा टपोरा शाळू गावत नाही हो दुसरीकडं

रातराणी's picture

21 Oct 2015 - 12:33 am | रातराणी

मस्त लिहताय! अभ्या.. ला अनुमोदन.

प्राची अश्विनी's picture

21 Oct 2015 - 7:29 am | प्राची अश्विनी

तुम्ही फार ताकदीने लिहिता ! अभ्या..शी सहमत!

बाबा योगिराज's picture

21 Oct 2015 - 8:01 am | बाबा योगिराज

लिखाण आवडले. अभ्या भौ म्हांत्येत तस, जरा मोट्ट मोट्ट लिवा की. भेष्ट. अंजून बी येऊ द्या की....

शशक शशक नगा करू. पर्धा कवाच संप्ली. दीर्घ कथा लिवा एकांदी.

शित्रेउमेश's picture

21 Oct 2015 - 11:03 am | शित्रेउमेश

हेच म्हणतोय....

टवाळ कार्टा's picture

21 Oct 2015 - 8:59 am | टवाळ कार्टा

:(

तुषार काळभोर's picture

21 Oct 2015 - 10:10 am | तुषार काळभोर

सदू पाटीलसारखे काही जण बघितलेत..अन् 'बापासारखे'पन काही बघितलेत.

गेल्याच महिन्यात आमच्या बांधावर भावकीतल्या एकाची थोरल्या चुलत्याबरोबर भांडणं झालती. बांध कोरण्यावरणं भांडणं करणं लईच कॉमन आहे.क्वचित कुनाचं तरी डो़कंपन फुटतं.

नाव आडनाव's picture

21 Oct 2015 - 10:33 am | नाव आडनाव

.

अजया's picture

21 Oct 2015 - 11:04 am | अजया

जबरदस्त कथा.

चांदणे संदीप's picture

21 Oct 2015 - 11:05 am | चांदणे संदीप

भारीच!

आतिवास's picture

21 Oct 2015 - 11:13 am | आतिवास

तुमच्या ब-याच कथा वाचल्या. छान लिहिता आहात.
दीर्घकथा वाचायला आवडेल.

जव्हेरगंजभो अभ्याशी शतप्रतिशत सहमत.

मेसमध्ये जेवताना मावशी रश्श्याबरोबर एक भाकरी करून वाढते, पैलवान दोन घासात संपिवतो आणि पुढच्या भाकरीची वाट बघत बसतो तसं झालंय. टोपली आक्खी भरा आधी नंतर हाळी द्या.
येतोच वास काढत.

बिन्नी's picture

21 Oct 2015 - 1:18 pm | बिन्नी

माय गॉड ! काय भारी लिहिताय तुम्ही !
एकदम राजन खान वाचल्यासारखं वाटलं !

द-बाहुबली's picture

21 Oct 2015 - 1:28 pm | द-बाहुबली

कथा आवडली नाही.

मनीषा's picture

21 Oct 2015 - 4:21 pm | मनीषा

चांगली आहे .

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Oct 2015 - 4:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी लिखाण. बरेच जण म्हणत आहेत त्याप्रमाणे मोठी कथा-कादंबरी लिहायला घ्या आता... भातुकलीचा खेळ पुरे झाला. काय म्हणताय ?

आनंद कांबीकर's picture

21 Oct 2015 - 7:52 pm | आनंद कांबीकर

एकदम झक्कास. पर प्यारे भौ म्हनताय तसं तोपलिभरुंन हवं.

अभ्या..'s picture

21 Oct 2015 - 9:39 pm | अभ्या..

मायेव. कसं जाणतं झालं माय ह्ये लेकरु.

मला ही पाणी घातलेली कढी आवडली नाही. पहिली खास इफेक्टवाली आहे!

जव्हेरगंज's picture

21 Oct 2015 - 10:23 pm | जव्हेरगंज

हेच म्हणतोय. थोडक्या शब्दांत लिहुन परिणामकरीत्या पोहोचले तर बस ना.पण लोकं वरडतात. लहान लहान म्हणुन. मग ओतावं लागतं पाणी. असो.

ऐकावे जनाचे करावे मनाचे हेच खरं! :)

जव्हेरगंज's picture

21 Oct 2015 - 10:24 pm | जव्हेरगंज

हेच म्हणतोय. थोडक्या शब्दांत लिहुन परिणामकरीत्या पोहोचले तर बस ना.पण लोकं वरडतात. लहान लहान म्हणुन. मग ओतावं लागतं पाणी. असो.

ऐकावे जनाचे करावे मनाचे हेच खरं! :)

चांदणे संदीप's picture

21 Oct 2015 - 10:32 pm | चांदणे संदीप

जव्हेरगंजभाऊ... तुम्ही ती पुणेकर माणसाची आणि मासेविक्रेत्या दुकानाच्या पाटीची गमतीशीर गोष्ट ऐकली नाही का??

नसल्यास सांगा, व्यनि करतो!

जव्हेरगंज's picture

21 Oct 2015 - 10:42 pm | जव्हेरगंज

व्यनि करा मालक :)

ज्योति अळवणी's picture

21 Oct 2015 - 10:52 pm | ज्योति अळवणी

लिखाण आवडल. पण पहिल्या कथेत पूर्णता नव्हती. दुसऱ्या कथेत अघळपघळ होत थोड.

तर्राट जोकर's picture

21 Oct 2015 - 11:03 pm | तर्राट जोकर

हरेक का अपना अपना ष्टाइल है. तुम तुम्हारा ष्टाइल संभालो.. बदल आपोआप घडले तरच मजा हाय...

तुडतुडी's picture

30 Oct 2015 - 1:56 pm | तुडतुडी

ऑ. एवढूसच व्हय ? जरा मोट्ट लिवलं असतं तर मजा आली असती .

जव्हेरगंज's picture

30 Oct 2015 - 3:41 pm | जव्हेरगंज

काहूर (संपुर्ण)
http://www.misalpav.com/node/33396