ड्रायफ्रूट हलवा

Primary tabs

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in दिवाळी अंक
17 Oct 2015 - 9:13 pm

.
.
दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास, रांगोळ्या, आकाशदिवे, नवे कपडे, फटाके, फराळ, मिठाई आणि दिवाळी अंक!
लाडू, चिवडा, चकली, कडबोळी, करंज्या, शेव, शंकरपाळे असे नेहमीचे फराळाचे पदार्थ तर असतातच. शिवाय हे एक खास कॅलरीबाँब डेझर्ट - खास दिवाळीसाठी!

साहित्य -

सुके अंजीर, बदाम, काजू - प्रत्येकी ५० ग्रॅम
खारीक पावडर ५० ग्रॅम
अक्रोड २५ ग्रॅम
खजूर २५ ग्रॅम
खवा २५० ग्रॅम
साजूक तूप - ४ ते ५ टेबलस्पून
दूध - १२५ मि.ली. (साधारण १ कप)
साखर - सपाट २ वाट्या
वेलदोडे किवा केशर वेलची सिरप - चवीसाठी

कृती -
काजू, बदाम, अक्रोड यांची वेगवेगळी भरड पावडर करून घ्या.
अंजीर व खजूर मिक्सरमधून फिरवून घ्या.
खवा मोकळा करून भाजून घ्या.
काजू, बदाम, अक्रोड यांच्या पावडरी प्रत्येकी चमचाभर तुपावर वेगवेगळ्या परतून घ्या.
अंजीर व खजूरही तुपावर परतून घ्या.
खवा आणि सर्व ड्रायफ्रूट्स एकत्र करून मंद आचेवर भाजा.
त्यात कपभर दूध घालून घोटत राहा.
मिश्रण थोडे घट्ट होऊ लागले की साखर घाला.
साखर विरघळेस्तोवर सतत घोटत राहा. हलवा लागू देऊ नका.
चमचाभर वेलदोडे पावडर किवा केशर वेलची सिरप घाला.
थोड्य वेळाने कडांनी हलव्याचे मिश्रण सुटू लागेल. तेव्हा आच बंद करा.
बदाम/पिस्त्याच्या कापांनी सजवा.
ड्रायफ्रूट हलवा तयार आहे.

.
.

प्रतिक्रिया

कहर फोटो आलाय ताई... सोपी आणि आता थंडीसाठी अत्यंत योग्य रेसिपी दिलीस त्याबद्दल धन्यवाद .

कविता१९७८'s picture

10 Nov 2015 - 6:46 am | कविता१९७८

वाह, चविष्ट आणि पौष्टीक पाकक्रुती

नूतन सावंत's picture

10 Nov 2015 - 9:26 am | नूतन सावंत

व!,कसला मस्त दिसतोय तो हलवा.

मस्त दिसतो आहे हलवा.करायला फार कटकटीचाही नाही.छान पाकृबद्दल अनेक आभार्स!

पियुशा's picture

10 Nov 2015 - 1:24 pm | पियुशा

जब्र्यादस्त !!!!

दिपक.कुवेत's picture

10 Nov 2015 - 2:45 pm | दिपक.कुवेत

जीवघेणा फोटो आहे. आवडला हलवा.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Nov 2015 - 2:33 pm | अत्रुप्त आत्मा

+१

भुमी's picture

10 Nov 2015 - 7:04 pm | भुमी

सोपी कृती , पौष्टीक खरोखर कॅलरीबाँब पण थंडीत चालेल :)

मनिमौ's picture

11 Nov 2015 - 9:45 am | मनिमौ

हलवा लई झ्याक दिसतोय.

सही... हलवा आवडला ताई. नक्की करुन बघेन,

मधुरा देशपांडे's picture

11 Nov 2015 - 2:35 pm | मधुरा देशपांडे

भारी. कधी येऊ खायला?

प्रीत-मोहर's picture

11 Nov 2015 - 2:37 pm | प्रीत-मोहर

भारीच.

पैसा's picture

12 Nov 2015 - 1:51 pm | पैसा

लै झ्याक!

प्रचेतस's picture

12 Nov 2015 - 2:23 pm | प्रचेतस

उत्कृष्ट.

सानिकास्वप्निल's picture

12 Nov 2015 - 5:09 pm | सानिकास्वप्निल

वाह! वाह! स्वादिष्ट दिसतोय हलवा, खूप आवडली पाककृती ताई :)

एस's picture

12 Nov 2015 - 6:21 pm | एस

खल्लास पाकृ!

मदनबाण's picture

12 Nov 2015 - 6:30 pm | मदनबाण

मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ किजिए... :- Sanam

पद्मावति's picture

15 Nov 2015 - 2:41 pm | पद्मावति

वाह मस्तं, सुटसुटीत आणि पौष्टिक पाककृती.

इशा१२३'s picture

15 Nov 2015 - 3:25 pm | इशा१२३

मस्त दिसतीये पाकृ.

सस्नेह's picture

15 Nov 2015 - 6:44 pm | सस्नेह

अगदी पौष्टिक, चविष्ट आणि सोप्पी पाकृ !