तांत्रिक रात्रिसूक्तम् (भाग-१)

मांत्रिक's picture
मांत्रिक in जनातलं, मनातलं
5 Oct 2015 - 5:27 pm

॥ तांत्रिक रात्रिसूक्तम् ॥ (भाग-१)

श्री दुर्गा सप्तशती हा मार्कंडेय पुराणांतर्गत येणारा हिंदु धर्मशास्त्रातील एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ. दुर्गा सप्तशती किंवा नुसता सप्तशती हा शब्द ज्याने ऐकला नाही, असे हिंदु फार कमी असतील. आज श्रीमद्भग्वद्गीतेपेक्षा देखील फार मोठ्या प्रमाणात या ग्रंथाची उपासना होते. महर्षी मार्कंडेयांनी या दिव्य, प्रासादिक ग्रंथाची रचना केली. त्यावेळीस ते नाशिकमधील वणी येथील मार्कंडेय पर्वतावर साधना करीत होते व त्यांचा हा पाठ श्री भगवती लक्षपूर्वक ऐकत होती, असा पुराणांत उल्लेख आहे. त्यामुळेच श्री सप्तशृंगी देवीची मूर्ती काहीतरी लक्षपूर्वक ऐकत असल्यासारखी दिसते.

या सप्तशती ग्रंथामध्ये रात्रिसूक्त, शक्रादी स्तुती, देवीसूक्त आणि नारायणी स्तुती या अत्यंत महत्वपूर्ण व श्री भगवतीला अत्यंत प्रिय अशा ४ स्तुति समाविष्ट आहेत. त्यापैकी रात्रिसूक्त या प्रथम स्तुतीची आपण आज ओळख करून घेणार आहोत. ओळख हा शब्द मी मुद्दाम वापरतोय. कारण मी काही कुणी अंतिम अधिकारी सत्पुरुष नाही जो यावर अधिकारवाणीने बोलू शकतो. मला माझ्या वाचनातून, चिंतनातून, समजशक्तीतून, अनुभवांतून जो काही बोध झाला तो तुमच्यापुढे ठेवत आहे. जर तुमच्यापैकी कुणी यावर अजून काही प्रकाश टाकू शकत असेल तर मला अतिशय आवडेल. कदाचित काही ठिकाणी मला स्पष्ट करायला जमलं नसेल, काही ठिकाणी चुकलं देखील असेल, अशा वेळीस कृपया आपण स्पष्ट करून सांगितलं, काही मदत केली, सूचना दिल्या तर खूप आवडेल.

हे रात्रिसूक्त दुर्गा सप्तशतीच्या प्रथम अध्यायात श्लोक क्रमांक ७० ते ८७ (गीता प्रेस, गोरखपूर आवृत्तीप्रमाणे, अन्य अनेक आवृत्त्या आहेत व त्यात थोडीफार भिन्नता आढळते)मध्ये समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे आणखी एक वैदिक रात्रिसूक्त म्हणून ऋग्वेदात आहे. परंतु ते येथे अपेक्षित नाही. आज सर्वाधिक प्रचलित असणारे सूक्त म्हणजे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथांतर्गत येणारे सूक्तच होय. त्यालाच तांत्रिक रात्रिसूक्त असेही नाव प्रचलित आहे. कारण एकूणातच श्री भगवतीची उपासना प्रामुख्याने तंत्रमार्गाने केली जाते, आणि रात्रिसूक्त तर अशा प्रयोगांतील एक महत्वपूर्ण भाग आहे. असो, आता या रात्रिसूक्तामागील मुख्य कथानक काय आहे ते पाहू या.

पौराणिक कथाः- कल्पाच्या शेवटी, सृष्टीच्या महाप्रलयाच्या वेळीस विश्वाचे पालनकर्ता भगवान विष्णु क्षीराब्धीमध्ये अनंत नामक शेषावर निद्राधीन झाले, तेव्हा त्यांच्या कर्णमलातून मधु व कैटभ हे दोन असुर उत्पन्न झाले. त्या असुरांनी विष्णुंच्या नाभीकमळातील ब्रह्मदेवास पाहिले, तेव्हा त्याला मारून टाकण्याच्या हेतूने ते दोघे आपली शस्त्रे परजीत त्यांच्यावर धावून गेले. हे पाहून घाबरलेल्या ब्रह्मदेवाने भगवान विष्णुंना निद्राधीन करणा-या योगनिद्रेचे स्तवन सुरु केले. हेच ते १५ श्लोकांचे प्रसिद्ध रात्रिसूक्त होय. या स्तुतिमुळे प्रसन्न झालेल्या योगनिद्रेने भगवान विष्णुंची मायेच्या आच्छादनातून मुक्तता केली. तेव्हा जागे झालेल्या ईश्वराने मधु व कैटभ यांच्याशी पाच सहस्र वर्षेपर्यंत युद्ध केले. परंतु ते दोघेही असुर त्याला दाद लागू देईनात. तेव्हा महामायेने त्यांना आपल्या मायाशक्तीने भ्रमित केले. मग त्या दोघांनी भगवान विष्णुंना “तुझा पराक्रम पाहून आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत, तुला जो इच्छित वर असेल तो माग” असा शब्द दिला.
तेव्हा भगवान विष्णुंनी त्यांना, माझ्या हातून तुम्हाला मृत्यु येऊ दे, असा वर मागितला. तेव्हा जलमय असलेली पृथ्वी पाहून, जेथे पाणी नसेल तेथे आम्हाला मार, असा त्यांनी वर दिला. तेव्हा भगवान विष्णुंनी तत्काळ त्यांना स्वतःच्या मांडीवर घेऊन स्वचक्राने त्यांचे शिर छेदून टाकले.

गूढार्थः- इथे भगवान विष्णु जीवाच्या मायेने आवृत्त अवस्थेचे प्रतीक आहेत. तर मधु व कैटभ म्हणजे नाम व रूपात्मक माया होय. (कर्णमलात ते उत्पन्न होतात याचा अर्थ इतकाच घ्यावयाचा की, आपली पंच कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये ही सातत्याने बाहेरून मिळणा-या stimuli (याला योग्य मराठी प्रतिशब्द सुचवा) किंवा प्रलोभनांमुळे आपल्या सच्चिदानंद स्वरूपाशी संपर्क करण्याच्या आपल्या प्रयत्नांत मोठाच अडथळा निर्माण करतात. एक सोपे उदा. म्हणजे सकाळी जप करायला तुम्ही बसलात आणि अचानक कुणीतरी मोठ्या आवाजात गाणी लावली तर ५ मिनिट देखील तुम्ही शांत बसू शकणार नाही. अशा वेळेस त्या आदिमायेलाच आळवणी करावी लागते की माझे प्रयत्न अपुरेच पडणार, तूच मला आता आधार दे.) ही माया किंवा अविद्या जीवातील परब्रह्माला आवृत्त करण्याचा प्रयत्न करते. तेव्हां दुर्बल जीवाने या मायेच्या साम्राज्ञीचा केलेला धावा म्हणजेच रात्रिसूक्त होय.

1) ॐ ब्रह्मोवाच -
ब्रह्मदेवाने स्तुती आरंभ केली.
इथे ब्रह्मदेव म्हणजे कुणी देवता अपेक्षित नाही, तर मायेच्या साम्राज्यातील संकटे, अडचणी व दुःखांनी गांजलेला जीव अपेक्षित आहे. या जीवाने श्री भगवतीला अशा आणीबाणीच्या प्रसंगी मारलेली हाक म्हणजे रात्रिसूक्त.

2) विश्वेश्वरीम् जगद्धात्रीम् स्थितीसंहार कारिणीम् ।
स्तौमि निद्राम् भगवतीम् विष्णोरतुल तेजसः ॥

“विश्वाची स्वामिनी, जगाची उत्पत्ती, स्थिती व संहार करणारी, भगवान विष्णुंच्या अतुलनीय अशा त्या तेजस्वी निद्रेचे मी स्तवन करतो.”

विश्व - जड आणि जीव यांचे अस्तित्व असो किंवा नसो, तरीदेखील अस्तित्वात असणारी प्रचंड अथांग प्रकाशहीन पोकळी, तिची स्वामिनी ती विश्वेश्वरी.

जगद्धात्री - आपण पाहतो त्या जड व चैतन्याने युक्त अशा जगाची उत्पत्ती करणारी

स्थिती संहार कारिणी - जेव्हा परब्रह्म मायेने मोहित असते तेव्हाच जगताची धारणा टिकून राहू शकते, म्हणून एक प्रकारे तीच विश्वाची स्थिती टिकवायला कारणीभूत आहे. तसेच जेव्हा परब्रह्म अविद्येच्या आवरणातून बाहेर येते तेव्हा आपोआपच पंचमहाभूतात्मक विश्वाचा नाश होतो. म्हणून संहारकारिणी.

आता येथे कुणी प्रश्न विचारेल की, जर अचानक पृथ्वीवर एखादी मोठी उल्का आदळली आणि सर्व जीवसृष्टीचा नाश झाला तर ती काय जगदंबेची इच्छा समजायची काय? त्याला माझे उत्तर असे, की काही झालं तरी शेवटी सर्वांनाच, पुण्यवान आणि महापापी, दोघांना देखील त्याच ठिकाणी परत जायचे आहे, तर त्याला कारणीभूत घटना हा महत्वाचा निकष होऊ शकत नाही. हां, आता येथे कुणी असे म्हणेल की सर्वांना परब्रह्माकडेच परत जायचे आहे तर मी एखाद्याचा खून केला तर काय बिघडेल? अशा माणसाला प्रश्न करावा की त्याच न्यायाने पहिले तुला मारले तर चालेल काय? म्हणूनच बायबल मध्ये येशू ख्रिस्ताने Golden Rule सांगितलेला आहे की, लोकांनी तुमच्याशी जसं वागावं अशी तुमची इच्छा आहे, तसंच तुम्ही देखील त्यांच्याशी वागावं.

स्तौमि - मी स्तुति करतो

निद्रां भगवतीं – या देवतेला भगवान विष्णुंची योगनिद्रा म्हटलेलं आहे. निद्रा याचा अर्थ जेव्हा परब्रह्म मायेने मोहित असते तेव्हां ते आपोआपच आपल्या ईश्वरत्वाविषयी निद्रिस्त असते, तर जेव्हां मायेपासून मुक्त असते तेव्हां आपोआपच नामरूपात्मक जगताविषयी निद्रिस्त असते. उदाहरण म्हणजे सामान्य मनुष्य मायेने भ्रांत परब्रह्म असल्याने तो प्रपंचात अगदी रममाण असतो. दुःख, आजारपण, वेदना, मृत्यु, विषमता इ. जगातील कटकटी समजून देखील तो जगाला घट्ट चिकटून बसतो. त्याच वेळेस रामकृष्ण परमहंस यांच्यासारखे सत्पुरुष मात्र या भ्रामक जगातून स्वतः बाहेर पडतात आणि इतर अनेक लोकांनाही त्यातून बाहेर पडायचा मार्ग दाखवतात. तर अशा या योगनिद्रेचे सर्वात सुस्पष्ट रूप म्हणजे नवदुर्गांपैकी सप्तमी दुर्गा भगवती श्री कालरात्रि होय. भगवतीचे या प्रकारे ध्यान करतच सूक्ताचा पाठ करणे अपेक्षित आहे.

विष्णोरतुलतेजसः - भगवान विष्णूंची अत्यंत तेजस्वी आणि अतुलनीय अशी.

3) त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं हि वषट्कार-स्वरात्मिका ।
सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता ॥

खरे सांगायचे तर मला या श्लोकाचा समाधानकारक अर्थ अजूनपर्यंत समजलेला नाही.

स्वाहा म्हणजे देवतांच्या मंत्रांद्वारे देवतांप्रीत्यर्थ केले जाणारे हवन होय. उदा. ॐ गं गणपतये स्वाहा।

स्वधा या मंत्राने पितरांच्या मंत्रांद्वारे पितरांप्रीत्यर्थ हवन केले जाते. उदा. ॐ अर्यमाये नमः स्वधा। आज पितरांप्रीत्यर्थ फारसे हवन कुठे होत असेल असे वाटत नाही.

वषट् या मंत्राद्वारे देखील देवतांप्रीत्यर्थ विशिष्ट हवन केले जाते. पण वषट् माझ्या वाचनात फारसे कुठे आलेले नाही. (जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.) पण इतका वरवरचा अर्थ सप्तशतीकारांना अपेक्षित असेल असे वाटत नाही.

माझ्या मनात दोनच दिवसांपूर्वी सहज आलेली कल्पना सांगतो. (हा लेख लिहिण्यापूर्वी मला या श्लोकाचा अर्थ काहीही करुन पाहिजे होताच. आणि लेख तर नवरात्रापूर्वी टाकावयाचा होताच. आणि अचानक जणू स्वर्गीय मदतच मिळाली.)

स्वाहा म्हणजे बाह्य वस्तुंकडून कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये आपणांस ज्ञान मिळवून देतात. ती प्रक्रियाही मायेच्या शक्तीमुळेच शक्य आहे. कारण केवळ ब्रह्माला. जो निर्गुण निराकार आहे, कसलेही ज्ञान होणे शक्य नाही.

स्वधा म्हणजे बाह्य वस्तु उपस्थित नसतानाही आपले मन एखाद्या पदार्थाची चव चाखू शकते, रंग पाहू शकते, एखादे गाणे मनातल्या मनात ऐकू शकते. उदा. चिंचेच्या नुसत्या आठवणीने तोंडाला पाणी सुटणे. मायेच्या या शक्तीला स्वधा म्हटले असावे.

वषट् म्हणजे आंतर्बाह्य ज्ञानेंद्रियांचे व्यापार थांबून मन देखील जेथे न-मन होते, तेव्हां केवळ आत्मरूपाने आत्मरूपाबाबत जाणून घेतलेले ज्ञान होय. हे देखील मायेचेच सामर्थ्य होय. कारण जोपर्यंत माया जीवाला बंधन्मुक्त करीत नाही, तोपर्यंत हे शक्यच नाही. हे ज्ञान शब्दांत मांडता येत नाही. खुणेने सांगता येत नाही.

(हा माझा अर्थ आहे. चुकलेला असू शकतो. कुणी व्यक्ती दुसरा दृष्टीकोण मांडत असेल तर नक्कीच जाणून घ्यायला आवडेल.)

स्वरात्मिका - अ पासून अः पर्यंत जे 16 स्वर आहेत ते तुझेच रूप आहेत कारण त्यांच्याशिवाय व्यंजनांना पूर्णत्व येऊच शकत नाहीत. अ ते अः यांचे अस्तित्व भाषेत स्वतंत्ररूपाने असे दिसून येत नाही. सहजपणे दिसतात ती व्यंजनेच. अगदी त्याचप्रमाणे या विश्वात अनेक सजीव-निर्जीव वस्तुंचे ज्ञान आपणांस होत राहते. परंतु त्यासर्वांमागे मायाशक्ती हीच प्रधान आहे.

सुधा - अमृतस्वरूपी किंवा सु-धा, उत्तम प्रकारे जगताला किंवा शरीराला धारण करणारी, त्याचे पालन पोषण करणारी. आता श्री भगवती शरीराचे धारण करणारी कशी? आतमध्ये तर परमात्माच विराजमान आहे? तर याचे उत्तर असे की, जोपर्यंत अविद्येच्या आवरणाने परमात्मा भ्रमित होत नाही तोपर्यंत पंचभूतात्मक जगत् आकाराला येऊच शकत नाही.

त्वम् अक्षरे - तू अ-क्षरा आहेस म्हणजे जी क्षय पावू शकत नाही, जिच्यावर काळाचा “व्यवस्थेकडून अव्यवस्थेकडे जाणे हा वस्तूचा गुणधर्म आहे” असा नियम लागू पडत नाही, किंबहुना काळच जिचा नम्र, पदशरण किंकर आहे अशी ती महाकाली.

नित्ये - जिला सुरुवात देखील नाही व अंत देखील नाही.

त्रिधा मात्रात्मिका स्थिता - ॐकाराच्या अ, ऊ, म या तीन व अ‍ॅ ही अर्धी अशा एकूण साडेतीन मात्रास्वरूपी जी आहे, म्हणजे ईश्वराचा वाचक शब्द जो प्रणव आहे, तो तीच आहे.

(क्रमशः-1)

धर्मआस्वाद

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

5 Oct 2015 - 5:33 pm | मांत्रिक

खरे तर नवरात्रीला लेख सुरु करायचा होता. पण मनात आलं की लेख आत्ताच टाकायला सुरुवात करावी म्हणजे ज्या कुणाला नवरात्रीच्या पवित्रतम मुहुर्तावर श्री भगवतीच्या उपासनेला सुरुवात करावयाची असेल त्यांना सोयीचे पडेल. म्हणून आजपासूनच सुरुवात केली. अजून फार तर दोन भाग होतील. तेवढ्यात विषय पूर्ण होईल. आणि हो! कुणाला स्वतःचा दृष्टिकोण मांडावयाचा असेल तर स्वागत आहेच. न्यास, ध्यान, विनियोग यांची माहिती कुणाला उपासनेसाठी आवश्यक असेल तर व्यनी करावा. तसेच आध्यात्मिक आणि व्यावहारिक लाभ कोणते यांची माहिती देखील व्यनीद्वारे देईन.

मांत्रिक's picture

5 Oct 2015 - 5:58 pm | मांत्रिक

अर्धचंद्र Ä ही सं.मं. कृपया इथे अर्धचंद्राचे चिह्न टाकावे. आणि हा प्रतिसाद उडवावा.
मोजीसाहेबांना सतत प्रसन्न असणारं हे चिह्न माझ्यावर का रुसून बसलंय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Oct 2015 - 9:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

E = अ‍ॅ

उदा: bEMk = बँक

द-बाहुबली's picture

5 Oct 2015 - 6:02 pm | द-बाहुबली

आता येथे कुणी प्रश्न विचारेल की, जर अचानक पृथ्वीवर एखादी मोठी उल्का आदळली आणि सर्व जीवसृष्टीचा नाश झाला तर ती काय जगदंबेची इच्छा समजायची काय? त्याला माझे उत्तर असे, की काही झालं तरी शेवटी सर्वांनाच, पुण्यवान आणि महापापी, दोघांना देखील त्याच ठिकाणी परत जायचे आहे, तर त्याला कारणीभूत घटना हा महत्वाचा निकष होऊ शकत नाही. हां, आता येथे कुणी असे म्हणेल की सर्वांना परब्रह्माकडेच परत जायचे आहे तर मी एखाद्याचा खून केला तर काय बिघडेल? अशा माणसाला प्रश्न करावा की त्याच न्यायाने पहिले तुला मारले तर चालेल काय? म्हणूनच बायबल मध्ये येशू ख्रिस्ताने Golden Rule सांगितलेला आहे की, लोकांनी तुमच्याशी जसं वागावं अशी तुमची इच्छा आहे, तसंच तुम्ही देखील त्यांच्याशी वागावं.

मुळात लोकांनी माझ्याशी कसं वागावं हे ठरवणारा मी कोण ?

द-बाहुबली's picture

5 Oct 2015 - 6:12 pm | द-बाहुबली

मला इतकचं म्हणायचे आहे की माझे नियंत्रण फक्त माझ्या आचार विचारवर असु शकते. लोकांच्या नाही.

उदा:- अगदी याक्षणी या माझ्या प्रतिसादाला अतिशय हिन प्रतिसाद लिहायची माझी कोणालाही परवानगी आहे. कारण ही परवानगी देणे माझ्या (आचार वा विचारांच्या) नियंत्रणाखालील गोष्ट आहे. पण एखाद्याने आक्षेपहार्य प्रतिसाद लिहला तर माझे त्यावर नियंत्रण आहे का ?

नाही ? समोरचा व्यक्ती चर्चेचा मुख्य विषय भरकटवुन थर्डक्लास मंद प्रतिसाद लिहायला मुक्त आहे. पण संपादक त्यांना वाटले तर हे होउ देणार नाहीत.

थोडक्यात जर मला नको असलेले प्रतिसाद कोणी मला देउ नये असे वाटत असेल तर मी स्वतः तसे प्रतिसाद लिहणे टाळणे हा त्यावर उपाय नसुन मला विषेश अधिकार प्राप्त असणे हा यावर रास्त उपाय ठरतो. आणी हा उपाय आपण इठे सांगत आहात तो येशुचा सुवर्ण-नियम नक्किच भंग करत आहे.. असे का ?

थोडक्यात जर मला नको असलेले प्रतिसाद कोणी मला देउ नये असे वाटत असेल तर मी स्वतः तसे प्रतिसाद लिहणे टाळणे हा त्यावर उपाय नसुन मला विषेश अधिकार प्राप्त असणे हा यावर रास्त उपाय ठरतो.

हा तरी उपाय कसा होऊ शकतो? प्रतिसाद तर देऊन झालेला असतो. तुम्ही फक्त उडवू शकता. हे म्हणजे जखम केल्यावर मलमपट्टी करण्यासारखे आहे. आणि म्हणूनच तो उपाय सांगितलेला आहे.

त्याहीपेक्षा त्याचा अर्थ अधिक सोपा करून सांगतो.
"तुम्हाला इतरांकडून फक्त अश्याच गोष्टींची अपेक्षा करण्याचा अधिकार आहे जे तुम्ही इतरांना देता."
अजून कळले नसेल तर सांगा.

द-बाहुबली's picture

5 Oct 2015 - 7:27 pm | द-बाहुबली

अजून कळले नाही .

तुम्हाला इतरांकडून फक्त अश्याच गोष्टींची अपेक्षा करण्याचा अधिकार आहे जे तुम्ही इतरांना देता.

मुळात मला अधिकार हवाच कशाला हा मुलभुत प्रश्न आहे. मग माझ्या अधिकाराचा माझ्याकडुनच भंग वगैरे जे नॉट मेकींग सेन्स मुद्दे उभे राहत आहेत आपल्या विवेचनातुन ते नंतर घेउ विचारात.

तर्राट जोकर's picture

5 Oct 2015 - 8:11 pm | तर्राट जोकर

Treat other the way you want to be treated.

सरळ अर्थ आहे. अधिकार वैगेरे काही नाही. जसे लोकांनी तुमच्याशी वागावे असे तुम्हास वाटते तसे तुम्ही इतरांशी वागा. मांडणी चुकते त्यामुळे घोळ होतो. इथे 'लोकांनी तुमच्याशी कसे वागावे' हा परिणाम साधण्यासाठी 'आपण कसे वागावे' हे कारण नाही. तर आपण इतरांशी कसे वागावे? ह्या प्रश्नाचं ते उत्तर आहे. आपण इतरांशी असेच वागावे जसे इतरांनी आपल्याशी वागावे असे आपणास वाटते. यात 'इतरांनी तुमच्याशी कसे वागावे' हे आपल्या वागण्यातून सूचित करणे अपेक्षित नाही.

'इतरांनी तुमच्याशी कसे वागावे' हे आपल्या वागण्यातून सूचित करणे अपेक्षित नाही.

करेक्ट आपण मुद्यावर येउ लागलो आहोत. मला वादासाठी वाद अथव शब्दछ्चल करण्यात रस नाही. मला इतकेच म्हणायचे आहे मी ( अथवा एखादा व्यक्ती) कसा वागतो याच्यावर ना माझे नियंत्रण आहे ना माझ्या आचार विचारांचे.... एकदा हे वास्तव मान्य झाले की.. मग

की.. मग (वादासाठी) पुढे येतो तो कर्माचा सिध्दांत :) बरेच लोक आपले आचरण व इतरांची वागणूक आणी कर्माचा सिध्दांत याची सॉलीड गल्लत करतात पण सध्याची चर्चा वर उल्लेखिलेला सुवर्ण-नियम पुरेसा (अप्लाय) नाही हे अध्यारुत होण्याइतपत मर्यादीत ठेउया.

तर्राट जोकर's picture

5 Oct 2015 - 8:39 pm | तर्राट जोकर

अध्यात्म हा अनुभूती नसणार्‍यांसाठी शब्द्च्छलच आहे. तर अनुभूती ही प्रचंड वैयक्तिक बाब असल्याने त्यावर चर्चाही शक्य नाही. एक योग्य गुरू शोधून त्याच्याद्वारे ज्ञानप्राप्तीचा मार्ग शोधणे हेच योग्य. आंतरजालीय संस्थळांवर अशा प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत. तुमची इच्छा असो वा नसो तो केवळ वाद-शब्दच्छलच असेल. ज्ञान कदापि नाही.

द-बाहुबली's picture

5 Oct 2015 - 9:50 pm | द-बाहुबली

तुमची इच्छा असो वा नसो तो केवळ वाद-शब्दच्छलच असेल. ज्ञान कदापि नाही.

मी माझी इछ्चाच प्रकट केली आहे. त्याचे स्वरुप कोणाला काय भासत आहे याचे ज्ञान मागितले नाही. म्हणूनच आपले प्रतिसाद हे ज्ञानरुप नसुन फक्त शब्दछ्चल आहे हे माहीत असुनही मी चर्चेतील माझा भाव प्रकट केला.

तर्राट जोकर's picture

5 Oct 2015 - 10:52 pm | तर्राट जोकर

उल्का काय, जगदंबा काय, परब्र्हम काय, येशू ख्रिस्त काय, गोल्डन रूल काय, एकाच प्रतिसादात एवढे स्ग्ळे असंबद्ध लिहून धाग्याशी सूतराम संबंध नसलेला वाद उकरून काढून शब्दच्छल करायचा नाही असे म्हणून परत तीच इच्छा आहे असे सांगणे हे हिशोब करण्यास बसलेल्या व्यक्तीचे लक्षण वाटते असे माझे वैयक्तिक मत आहे.

तर्राट जोकर's picture

6 Oct 2015 - 9:34 am | तर्राट जोकर

प्रतिसाद कुठे गेला?

"....धाग्याशी सूतराम संबंध नसलेला कर्मसिद्धांताचा वाद उकरून काढून..." अस होतं ते.

द-बाहुबली's picture

6 Oct 2015 - 11:22 am | द-बाहुबली

उल्का काय, जगदंबा काय, परब्र्हम काय, येशू ख्रिस्त काय, गोल्डन रूल

हे सर्व मी न्हवे धागाकर्त्याने लिहलेल्या पॅरेग्राफमधे आलेले शब्द आहेत जो पमी मुळ धाग्यातुन जसाच्या तसा कॉपी पेस्ट केला आहे. पण आपण मुळ धागाच वाचला नसल्याने ते शब्द माझे नाहीत याची आपल्याला जाणीवच नाही. तेंव्हा आपली वैयक्तीक मते प्रकट केल्यास त्यातु आपले अज्ञान व उतावीळपणाच उघडा पडला आहे.

"....धाग्याशी सूतराम संबंध नसलेला कर्मसिद्धांताचा वाद उकरून काढून..."

मराठी वाचता येतं ना ? मग मी कर्म सिध्दांतावर चर्चा टाळुया म्हटलेले लक्षात आलेच असेल ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Oct 2015 - 6:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>अचानक पृथ्वीवर एखादी मोठी उल्का आदळली आणि सर्व जीवसृष्टीचा नाश झाला तर ती काय जगदंबेची इच्छा समजायची काय?

हो ! दुसरं कोणाची इच्छा चालते पृथ्वीवर ?

-दिलीप बिरुटे

मांत्रिक's picture

5 Oct 2015 - 7:28 pm | मांत्रिक

आता तरी बास करा!!!

द-बाहुबली's picture

5 Oct 2015 - 8:24 pm | द-बाहुबली

>>>>>अचानक पृथ्वीवर एखादी मोठी उल्का आदळली आणि सर्व जीवसृष्टीचा नाश झाला तर ती काय जगदंबेची इच्छा समजायची काय?

हा मला पडलेला प्रश्न नाही.

हो ! दुसरं कोणाची इच्छा चालते पृथ्वीवर ?

मला वाटतय आपण विषयाची खिल्ली उड्वत आहात. माझा हा समज चुकीचा असल्यास अवश्य दुरुस्ती करावी.

इथे थोडी गल्लत वाटते आहे म्हणून लिहितो.... संपादकही प्रतिसाद उडवू शकतात लिहिण्यापासून थांबवू नाही शकत...control is an illusion!
अधिकार ही तुम्ही समजताय तशी absolute गोष्ट नाही...अन्यथा शिक्षा या कृतीची गरजच (वरील उदाहरणात संपादन) पडायला नको! अधिकार मानण्यावर अवलंबून आहे.. अध्यात्मातील logical reversal हेच आहे की तुम्ही माना अथवा नका मानू "तो" आहेच..यत्र, तत्र, सर्वत्र, अनादी, अनंत!
यामुळेच शास्त्रीय दृष्ट्या देवाचे अस्तित्व नाकारणे असंभव आहे..
राहता राहिला वागणुकीचा प्रश्न...त्यात तुम्ही एका सुवर्ण नियम पाळणार्‍याची तुलना एका न पाळण्यार्‍याशी करु पहात आहात...Apples and Oranges!!
बाकी इथे अजूनही बरेच आहेत माझ्यापेक्षा योग्य प्रतिसाद देणारे... चू. भू. माफ असावी!

द-बाहुबली's picture

5 Oct 2015 - 7:15 pm | द-बाहुबली

संपादकही प्रतिसाद उडवू शकतात लिहिण्यापासून थांबवू नाही शकत...control is an illusion!

संपादक कोणत्यासही प्रतिसाद लिहण्यापासुन थांबवु शकतात हे द्रुपलचे (ज्याधारे हे संस्थळ विकसीत केल्या आहे)वैज्ञानीक सत्य आहे.

मला वाटले तुम्ही तुम्हाला नको असलेले प्रतिसाद देणार्‍यांबद्दल बोलत आहात..एखाद्याला सरसकट थांबवणे शक्य आहेच..एखद्या विषयावर तुम्हाला नको असणारा प्रतिसाद तो द्यायच्या आधीच थांबवता येतो असे तुम्ही म्हणताय का? कारण त्यात तो प्रतिसाद नको असलेला असण्याची आधीच झालेली खातरजमा अभिप्रेत आहे...आणि ते तसे तुम्ही जरी ठरवलेत, तरी तुम्हाला तो मिळालेला असेलच...त्याशिवाय कसे ठरवणार??

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Oct 2015 - 6:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तंत्रमार्गाने उर्फ़ रात्रिसूक्त म्हटल्याने मी प्राध्यापकाचा प्राचार्य किती दिवसात होऊ शकतो ? आणि कोणत्या महाविद्यालयात होऊ शकतो ?

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

5 Oct 2015 - 7:01 pm | यशोधरा

काय प्राडॉ? तुम्ही पण?
उत्तरे आहेत शून्य आणि कोणत्याही नाही.

प्रयत्नांशिवाय काहीही शक्य होणार नाही पण काहीजणांना मनवी प्रयत्नांबरोबर देवता माझ्या पाठीशी आहे हा विचार/ विश्वास एक मानसिक बळ देतो, आयुष्य सकारात्मक बनवतो. काय हरकत आहे? टिंगल उडवायलाच हवी का?

मांत्रिक's picture

5 Oct 2015 - 7:04 pm | मांत्रिक

धन्यवाद ताई!!! बाकी मी असा कुठलाही दावा केला नसताना त्यांचे हे प्रतिसाद पाहून त्यांची प्राडाॅ ही पदवी एक टिंगल वाटू लागल्ये.

मांत्रिक's picture

5 Oct 2015 - 7:11 pm | मांत्रिक

माफ करा! पण तुम्ही सं.मं. वर आहात. आणि तुम्हीच एक असे लेखन ज्यात कुणाचा अपमान नाही, कोणती जाहिरातबाजी नाही, कोणतेही चमत्कारांचे दावे नाहीत, केवळ फक्त एका प्राचीन संस्कृत स्तोत्राचे भाषांतर आहे, असे लेखन मी प्रसिद्ध होऊच देणार नाही अशा राणा भीमदेवी गर्जना करीत सुरंगी ताईंच्या धाग्यापासून थेट इथे आलात. नक्की म्हणायचंय काय तुम्हाला?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Oct 2015 - 7:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉला असल्या तंत्रामंत्रावर अजिबात विश्वास नाही. आपलं लेखन माहिती म्हणुन वाचेल मी आणि वाचलंही आहे. आपल्या लेखनाचा मी आदर करतो. पण अशा मंत्रातंत्रामुळे आपलं आयुष्य बदलुन जाईल असं कोणी (तुम्ही नै) स्वप्न पाहात असेल तर त्यांना जागं केलं पाहिजे असे माझे मत आहे. म्हणुनच मी आपल्या लेखाबद्दल एक अवाक्षरही वाईट लिहिलेलं नाही.

-दिलीप बिरुटे

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Oct 2015 - 7:30 pm | बिपिन कार्यकर्ते

"त्यांची प्राडाॅ ही पदवी एक टिंगल वाटू लागल्ये. "

त्यांनी तुमच्यावर कोणत्याही स्वरूपाची वैयक्तिक टीका केलेली नाहीये. त्यांची मतं तुम्हाला (आणि त्यांना तुमची मतं) पटावीतच असं नाही, पटतीलच असं नाही. पण त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर इतक्या पटकन घसरायची काय गरज आहे? अत्यंत चुकीचे वागणे आहे हे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Oct 2015 - 7:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छोडो.

महानतंत्र विद्येचे आद्य जालगुरु माननिय परासेठ म्हणायचं तुम्ही एकदा जाल खिडकीत बसलात की लोक कशावरुनही तुम्हाला शुकशुक करु शकतात. ;)

-दिलीप बिरुटे

मांत्रिक's picture

5 Oct 2015 - 7:38 pm | मांत्रिक

तंत्रमार्गाने उर्फ़ रात्रिसूक्त म्हटल्याने मी प्राध्यापकाचा प्राचार्य किती दिवसात होऊ शकतो ? आणि कोणत्या महाविद्यालयात होऊ शकतो ? हा दावा मी कुठे केलाय सांगा की मग? आणि देवीच्या मूर्तीविषयी त्यांनी काढलेले उद्गार त्यांच्याविषयी काय सांगतात मग?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Oct 2015 - 7:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रात्रिसुक्त म्हटल्याने काही प्रगती होते की काय असे वाटल्याने मी तसं विचारलं. माझं तसं विचारणं चुक आहे असं लेखन दोनदा तिनदा वाचल्याने माझं थोडं थोडं लक्षात आलं आहे.

-दिलीप बिरुटे

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Oct 2015 - 9:31 pm | बिपिन कार्यकर्ते

तुमचा वाद चालू दे. पण तुम्ही वैयक्तिक स्तरावर उतरलात म्हणून बोलणे भाग पडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Oct 2015 - 7:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> प्रयत्नांशिवाय काहीही शक्य होणार नाही.
१०० टक्के सहमत.
>>>> काहीजणांना मानवी प्रयत्नांबरोबर देवता माझ्या पाठीशी आहे हा विचार/ विश्वास एक मानसिक बळ देतो,
हेही एक वेळा मान्य.

पण, असल्या मंत्र तंत्रांनी कोणतंही पाठबळ लाभत नसतं. उलट माणुस त्याच भरवशावर जास्त राह्यला लागतो.
यावरुन आठवण झाली. नाथपंथाच्या अगोदर तांत्रिक साधनेचं असंच पेव आठव्या नवव्या शतकात फुटलं होतं. गोरक्षनाथ नावाचे एक महान योगी सर्व भारतभर तांत्रिक साधनेच्या मागे लागलेल्या साधुंना या तांत्रिक वामाचारी मार्गापासून परावृत्त करण्याचं ध्येय त्यांनी बाळगलं होतं. याच गोरक्षनाथांनी मच्छिंद्राचीसुद्धा योगिनीच्या जाळ्यातून मुक्तता केली होती. गोरक्षनाथांच्या अंगी प्रज्ञा, मौलिक चिंतन, निष्कलंक चारित्र्य लोककल्याणाची तळमळ हे गुण उपजतच होते. असा समाज उभार करायचा की तंत्र मंत्र यावर विश्वास राहील असा समाज उभा राहीला पाहिजे.

सांगायचं असं की असल्या गोष्टी थोतांड असतात आणि आपल्या डोक्यात एकदा की त्या भिनल्या त्यातून मग बाहेर पडता येत नाही.

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

5 Oct 2015 - 8:29 pm | यशोधरा

आपले प्रयत्न सोडून मंत्र तंत्र ह्यामागे लागावं हा माझ्या म्हणण्याचा अजिबात उद्देश नाही. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Oct 2015 - 7:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>>सप्तशृंगी देवीची मूर्ती काहीतरी लक्षपूर्वक ऐकत असल्यासारखी दिसते.

अजिबात तसं काही वाटत नै. हं आता भक्तिभावाने पाहिल्यास देवी आपल्याकडे पाहते आहे, आपल्याशी संवाद साधते आहे, देवी आपले सर्व संकट दूर करेल अशा अविर्भावात आशीर्वाद देत आहे असे काहीही वाटू शकते.

-दिलीप बिरुटे

मांत्रिक's picture

5 Oct 2015 - 7:15 pm | मांत्रिक

अरे देवा! सप्तशृंगी मातेची मूर्ती तरी नीट पाहीलेत का? एक कान हातावर ठेवून मनुष्य लांबचं ऐकू पाहतो तशी मूर्ती घडवलेली आहे. आंजावर सर्च तरी मारा! यात चमत्कार कसला? मूर्तीकेरानंच मूर्ती तशी घडवलीये.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Oct 2015 - 7:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> अरे देवा! सप्तशृंगी मातेची मूर्ती तरी नीट पाहीलेत का ?
खुप वेळा पाहिली आहे. जवळ जवळ दहा वेळा किंवा अधिक वेळा तरी. मला देवीचे डोळे पाहुन ती देवी नेहमी घाबरलेली, डचकलेली, थोडी टेन्शनमधे असल्यासारखीच वाटली आहे. (सर्व भक्तांची माझ्या मताबद्दल क्षमा मागतो) खुपच डोळे वटारुन कोणाला दमात घेत आहे अशीच वाटली आहे. मुर्तीकाराला तिच्यात प्रसन्नता भरता आली नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. देवी आणि देवाला पाहुन मन कसं प्रसन्न झालं पाहिजे. काय म्हणता ?

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Oct 2015 - 7:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुवा.

-दिलीप बिरुटे

अजया's picture

5 Oct 2015 - 7:09 pm | अजया

सहमत!

मला या प्राचीन स्तोत्राचा जो गहन,आध्यात्मिक अर्थ आहे, त्यावर वाचकांनी चर्चा करणं अपेक्षित आहे. माझ्याही विवेचनात कुणाला काही योग्य-अयोग्य आढळून आल्यास तसे सुचवावे. मला यातून सप्तशती या ग्रंथाच्या खर्‍या रहस्याचा शोध घ्यावयाचा आहे. तुमचे विवेचनही नक्कीच मांडावे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Oct 2015 - 7:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> मला या प्राचीन स्तोत्राचा जो गहन,आध्यात्मिक अर्थ आहे, त्यावर वाचकांनी चर्चा करणं अपेक्षित आहे
हं मग ठीक आहे. शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

मग असे अगोदरच सांगायचे होतेत की. उगीच लोकांनी मेगाबायटी विवेचने करेपर्यंत कशाला वाट पाहिलीत?

असंका's picture

5 Oct 2015 - 8:22 pm | असंका

मला माझ्या वाचनातून, चिंतनातून, समजशक्तीतून, अनुभवांतून जो काही बोध झाला तो तुमच्यापुढे ठेवत आहे. जर तुमच्यापैकी कुणी यावर अजून काही प्रकाश टाकू शकत असेल तर मला अतिशय आवडेल. कदाचित काही ठिकाणी मला स्पष्ट करायला जमलं नसेल, काही ठिकाणी चुकलं देखील असेल, अशा वेळीस कृपया आपण स्पष्ट करून सांगितलं, काही मदत केली, सूचना दिल्या तर खूप आवडेल.

बॅटमॅन's picture

5 Oct 2015 - 8:39 pm | बॅटमॅन

धन्यवाद. तरी डिस्क्लेमर स्पष्ट शब्दांत टाकला असता तर ही वेळच आली नसती. असो.

सप्तशती सातवाहन कालीन आहे. असे आयकुन आहे. खखो..
वल्लीदा जाणे..

सूड's picture

5 Oct 2015 - 8:39 pm | सूड

ती गाथा सप्तशती...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Oct 2015 - 8:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

वर उल्लेख येतोय तो सप्तशती म्हणजे सप्तश्लोक.
दुर्गासप्तशती (सात श्लोक आहेत)

-दिलीप बिरुटे

दुर्गासप्तशती (सात श्लोक आहेत) >> सातशे.

मांत्रिक's picture

5 Oct 2015 - 8:57 pm | मांत्रिक

७०० श्लोक व १३ अध्याय आहेत मूळ ग्रंथात...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Oct 2015 - 9:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आभार.

-दिलीप बिरुटे

दुर्गासप्तशती (सात श्लोक आहेत)

"कॅफिन म्हणजे ख्रिस्ती लोकांची शवपेटिका" हा म्हैस मधला डायलॉग आठवला!! =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Oct 2015 - 7:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ॐ अथ सप्तश्लोकी दुर्गा (सप्तशती)
शिव उवाच –
देवी त्वं भक्तसुलभे सर्वकार्यविधायिनी ।
कलौ हि कार्यसिद्ध्यर्थमुपायं त्रूहि यत्नतः ।।
देव्युवाच –
श्रृणु देव प्रवक्ष्यामि कलौ सर्वेष्टसाधनम् ।
मया तवैव स्नेहेनाप्यम्बास्तुतिः प्रकाश्यते ।।
ॐ अस्य श्री दुर्गा सप्तश्लोकी स्तोत्र मंत्रस्य
नारायण ऋषि: अनुष्टुप् छ्न्द:
श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वत्यो देवता:
श्री दुर्गा प्रीत्यर्थे सप्तश्लोकी दुर्गा पाठे विनियोग: ।
ॐ ज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती हि सा
बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति ।।१।।
दुर्गे स्मृता हरसिभीतिमशेष जन्तो:
स्वस्थै: स्मृता मति मतीव शुभां ददासि
दारिद्र्य दु:ख भय हारिणि का त्वदन्या
सर्वोपकार करणाय सदार्द्र चित्ता ।।२।।
सर्व मङ्गल माङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते ।।३।।
शरणागत दीनार्त परित्राण परायणे
सर्वस्यार्ति हरे देवि नारायणि नमोऽस्तुते ।।४।।
सर्वस्वरूपे सर्वेशे सर्व शक्ति समन्विते
भयेभ्यस्त्राहि नो देवि दुर्गे देवि नमोऽस्तुते ।।५।।
रोगान शेषा नपहंसि तुष्टा
रुष्टा तु कामान् सकलान भीष्टान् ।
त्वामाश्रितानां न विपन् नराणां
त्वामाश्रिता ह्या श्रयतां प्रयान्ति ।।६।।
सर्वा बाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि
एकमेव त्वया कार्यमस्मद् वैरि विनाशनं ।।७।।
इति सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र सम्पूर्णा ।।
(जालावरुन साभार)

बाकी, कॅफिन म्हणजे ख्रिस्ती लोकांची शवपेटिका आणि म्हैस मधील डायलॉग आम्हाला माहिती नाही. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

श्री दुर्गा सप्तश्लोकी स्तोत्र मंत्रस्य

सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र

सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र आहे तुम्ही म्हणताय ते (स्मॉल), आणि मांत्रिकबुवांचा लेख सप्तशती वर आहे (व्हास्ट व्हर्जन). रेफरन्स गंडलाय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Oct 2015 - 5:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मांत्रिक म्हणतात तेही बरोबर आहे आणि मी म्हणतो तेही बरोबर आहे.
माझ्यावर विश्वास नसू देत या दुव्यावर तरी विश्वास ठेवा.

-दिलीप बिरुटे

सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र आहे तुम्ही म्हणताय ते (स्मॉल), आणि मांत्रिकबुवांचा लेख सप्तशती वर आहे (व्हास्ट व्हर्जन)

हे परत वाचा. तरीही तुम्हाला वाटत असेल तुम्हीच बरोबर आहात; तर तसं समजा.

सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र फार वेगळं आहे. ते सप्तशतीतील काही निवडक मंत्र एकत्र घेऊन बनवलेलं आहे. मी बोलतोय ती १३ अध्यायांची ७०० श्लोकांची सप्तशती.

मांत्रिक's picture

5 Oct 2015 - 8:55 pm | मांत्रिक

काही बोलतो मनातलं. माझा यामागे हेतु फक्त माणसाने माणसाशी चांगलंच वागावं. त्यासाठी अद्वैतमताचा प्रसार हे मी माझं कर्तव्य समजतो. माझं पूर्व आयुष्य अतिशय त्रास, अन्याय, अपमान, दारिद्र्य, कमतरता, विषमता सहन करण्यात गेलं. सगळे तपशील देऊ शकत नाही. पण अगदी अनेकदा आयुष्यही नकोसं वाटलं. अजून काय बोलू?
माझे प्रयत्न इतकेच आहेत की अद्वैत मताच्या प्रसाराने माणसामाणसातील भेद, विषमता, अन्याय करण्याची वृत्ती नष्ट व्हावी. माझ्या अर्थचिंतनातून हे स्पष्ट होत नाही का?
बरे, लेख अजिबात न वाचताच टीकेची झोड उठवायलाच काहीजण धावून आले. पुढे लेख नीट न वाचल्याचे कबूल केलेच म्हणा. ते असो.
पण या सर्व विवेचनाचा खटाटोप केवळ माणूस हा परब्रह्माचाच अंश आहे व तो त्यामुळे ईश्वराचेच रुप आहे हे ज्ञानेश्वर विवेकानंद यांनी मांडलेल्या विचारांचाच प्रसार करण्यासाठी आहे. मग मी काय चूक केली?
जे काम काही महामानवांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने केले त्याचेच इथे माझ्या कुवती व समजे प्रमाणे करण्याचा प्रयत्न मी केला आहे.
केवळ तंत्र मंत्र स्तोत्र इ. शब्द दिसले की नीट वाचन न करताच टीका सुरू?
बरे! माझा अर्थचिंतनाचा उद्देश मी:
मला माझ्या वाचनातून, चिंतनातून, समजशक्तीतून, अनुभवांतून जो काही बोध झाला तो तुमच्यापुढे ठेवत आहे. जर तुमच्यापैकी कुणी यावर अजून काही प्रकाश टाकू शकत असेल तर मला अतिशय आवडेल. कदाचित काही ठिकाणी मला स्पष्ट करायला जमलं नसेल, काही ठिकाणी चुकलं देखील असेल, अशा वेळीस कृपया आपण स्पष्ट करून सांगितलं, काही मदत केली, सूचना दिल्या तर खूप आवडेल. या दुसर्या परिच्छेदातच स्पष्ट केलाय! मग पहिले एक दोन पॅराही न वाचता टीका सुरू?
काहीही सकारात्मक माहिती न मिळता धागा उगाच प्रतिसाद गोळा करत सुटलाय!!!

यशोधरा's picture

5 Oct 2015 - 9:07 pm | यशोधरा

आता इथं हे थांबवून मूळ विषयाकडे का वळत नाही? :)

सतिश गावडे's picture

5 Oct 2015 - 9:10 pm | सतिश गावडे

तुमची कळकळ पटली. मात्र काळ बदलला आहे. आता मानवजातीने सलोख्याने राहण्यासाठी अद्वैतमताच्या नव्हे तर विवेकवादाच्या प्रसाराची आवश्यकता आहे.

दत्ता जोशी's picture

6 Oct 2015 - 11:29 am | दत्ता जोशी

विवेक ( संस्कृत) = ability to distinguish good from bad ,right from wrong , true from false (conduct , thoughts , act , state etc.)
धर्म तत्वज्ञान या विवेकावर आधारित आहे, किंबहुना धर्म विवेकच शिकवितो. या विवेक बुद्धीने मनुष्याने त्याची नेमून दिलेली कर्मे करावीत ( जगात वागावे) हा ( ज्याचा) त्याचा "धर्म". याच विवेकाचा उहापोह सर्व संतांच्या शिकवणुकीत पुन्हा पुन्हा येतो. याच विवेकाची कास धरली कि माणूस सदाचरणी बनतो किंवा बनवा असे अपेक्षित आहे. सदाचरणाची ज्याची त्याची व्याख्या वेगळी असू शकेल तेव्हा परत ती तपासून पाहण्यास विवेकाचीच गरज! योग्य अशा धर्म संस्कारांची गरज हि त्यासाठीच. जैन बौध, क्रिस्त किंवा हिंदू मला वाटत सगळ्याचा गाभा मनुष्याला समाज केंद्रित बनवण्याबरोबरच हा विवेक सांगत असतो. अर्थात या विवेकाने वागतांना माणसाला अनेक नैतिक आणि सामाजिक बंधने येतात. पण सध्या अनिर्बंध आचार हाच कुल (cool )आचार . म्हणजेच विवेक आणि धर्म विरोधी असत नाहीत.
"अद्वैत" पुढची संकल्पना आहे आणि ती अध्यात्मिक आहे.

मांत्रिक's picture

6 Oct 2015 - 11:31 am | मांत्रिक

धन्यवाद जोशी साहेब.

आम्हाला तरुणांच्या कल्पकतेचे फार कौतुक आहे. तेच आज भवीष्य स्मर्थपणे पेलु शकतात याची खात्रीही आहे म्हणूनच जणून घ्यायचय..

विवेकवादाच्या प्रसाराची आवश्यकता आहे.

हा विवेकवाद म्हणजे काय ? तो संपुर्ण विवेकपुर्ण आहे की काही अविवेकीपणाचा अंश त्यात शिल्लक आहे ?

सतिश गावडे's picture

7 Oct 2015 - 1:16 pm | सतिश गावडे

तुमच्या या प्रश्नाचे खुप सुंदर उत्तर तुम्हीच तुमच्या कृतीतून दिलंय.

द-बाहुबली's picture

22 Oct 2015 - 2:04 pm | द-बाहुबली

मला अजुनही (माझी) नेमकी एखादी विशीष्टकृती आपल्या नजरेत विवेकवादी (वा अविवेकवादी) कोणत्या ताळेबंदावर सिध्द होते याची अजुनही उकल आपण केलेली नाही.

दत्ता जोशी's picture

5 Oct 2015 - 9:06 pm | दत्ता जोशी

तुमचा हेतू उदात्त आहे पण व्यासपीठ चुकले आहे असे मला वाटते. विचार करा.

खरे तर नवरात्रीला लेख सुरु करायचा होता. पण मनात आलं की लेख आत्ताच टाकायला सुरुवात करावी म्हणजे ज्या कुणाला नवरात्रीच्या पवित्रतम मुहुर्तावर श्री भगवतीच्या उपासनेला सुरुवात करावयाची असेल त्यांना सोयीचे पडेल.
उत्तम विचार !
वाचतोय... लिहीत रहा.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pondicherry Vazhiyela... :- Irumbu Kuthirai

मांत्रिक's picture

6 Oct 2015 - 11:35 am | मांत्रिक

५७ प्रतिसाद व १००० पेक्षा जास्त वाचने! अजून एकाने देखील माझ्या रात्रिसूक्ताच्या भावानुवादात मदत करण्याचा प्रयत्न केला नाही. अति अवांतरेच चालू आहेत. काही जणांनी त्या निमित्ताने थेट जगदंबेलाच नावे ठेवून सूर्यावर थुंकू पाहणारे मूर्ख अजूनहि आहेत याची खात्री पटवून दिली. असो.

द-बाहुबली's picture

6 Oct 2015 - 11:52 am | द-बाहुबली

मांत्रिकजी आपण नमनाला घडाभर तेल घातले आहे म्हणून लोकांना धुडगुस घालायला रान मोकळे मिळाले. राखीव कुरण मिळाले.

इथला एकही विरोधक तुमच्या मताशी सरळ चर्चा करणार नाही पण डायरेक्ट उपरोधीक व खिल्लीदायक प्रतिसाद लिहुन, अथवा आपले मत मांडुन (जे योग्य का आहे याचा कोणताही गोषवारा न लिहता) मोकळा होइल परंतु हीच गोष्ट तुम्ही त्यांच्याबाबत केली तर ते तुम्हाला हमखास नावे मात्र ठेवतील. तुम्हाला विषय विनाकारण वाढवतोय भरकटवत आहे म्हणतील.... असो यापुढील लेख लिहताना तो अवधुत स्टाइल फॅंटसीच ठेवा बरे.. किमान लोकांची तोंडे बंद राहतील.

तिकडे सुरंगी ताइंच्या धाग्यावर एकही व्यक्ती चकार विरोधी, खिल्लीत्मक सुर काढणार नाही. त्यांना अंधश्रध्दा, मनाचे खेळ , योगायोग आहेत म्हणून हिणवणार नाही, सगळे कौतुकच करणार (मी अपवाद का ते लक्षात आलेच असेल) पण इतरांबाबत ...? मिपा आहे हे असं आहे... आता हळु हळु लक्षात आलेच असेल की *** **लेल्या लोकांशी विनम्र, प्रगल्भ न्हवे तर थिल्लरच रहावे तेच परम सुखदायी असते. कारण ना त्यांना तुमच्या विनम्रतेची किंमत असते ना संतापाची फिकीर.

दमामि's picture

6 Oct 2015 - 12:07 pm | दमामि

हेच लिहायला आलो होतो. सुरंगीताईंच्या धाग्यावर एखाददुसरा अपवाद वगळता " वा छान अनुभव। भाग्यवान आहात" आणि इथे मात्र.....

असंका's picture

6 Oct 2015 - 12:11 pm | असंका

_/\_

द बाहुबली आणि दमामि यांना

आणि धन्यवाद!

मांत्रिक's picture

6 Oct 2015 - 12:19 pm | मांत्रिक

आपणा तिघांना खूप धन्यवाद!
भले शंभरात तिन चार जणं का असेनात पण मदतीला आलात याला महत्व आहे.

द-बाहुबली's picture

6 Oct 2015 - 12:31 pm | द-बाहुबली

स्वारी मी मदतनीस नाही. अंजावर कोणाची मदत करायची नाही व घ्यायची नाही हे अनुभवातुन शिकलो आहे. इथली एक वेगळीच बुरखा संस्कृती जी आहे त्यातील उणे जे समोर येते त्यावर फक्त भाष्य करणेच काय ते थोडेफार जमुन जाते.

आता बघना सुरंगी ताइ धार्मीक असत्या, सश्रध्द असत्या, स्व्भावने भोळ्या असत्या अन त्यांनी हाच अनुभव जसाचा तसा लेखात विषद केला असता तर त्यांची इथे उडवेली खिल्ली अथव केली जाणारी फजीती संवेदनशील मिपाकर म्हणून या डोळ्यांनी बघवली गेली नसती.

पण काय आहे की त्या विषेश सश्रध्द नाहीत म्हटल्यावर विरोधकांना प्रश्न पडतो की आता गंमत करायचे तर डोके चालवावे लागेल कारन बिंडोक विधानाने समोरील व्यक्ती सश्रध्द नसल्याने व्यथीत नक्किच होणार नाही. अन समजा ते आळस वा सवय झटकुन चालवावे म्हटले तर प्रश्न येतो की ज्या व्यक्तीमागे "म" ची ताकत खणखणीत उभी आहे त्याच्याशी उगाच का बरे पंगा घ्या ? आणी हा ताकतवान "म" म्हणजे माणुसकी न्हवे बरं का.

भले शंभरात तिन चार जणं का असेनात पण मदतीला आलात याला महत्व आहे.

चालायचे... म्हशींच्या कळपात दोच चार रेडे पुरेसे आहेत.

बैलांचा उल्लेख न केल्याबद्दल निषेध. ;)

शुचिमामी, बाहुबली अन दमामि यांना सहमत. अगदी १०० टक्के.

दमामि's picture

6 Oct 2015 - 12:43 pm | दमामि

मांत्रिकभौ,
माझा मंत्र तंत्र,देवी ने बोलावून घेतले, पुजार्याचे स्वप्न ई. गोष्टीवर काडीचाही विश्वास नाही. असतात एकेकाच्या मनाचे खेळ वा वैयक्तिक अनुभव. मी त्याचा आदर करतो.
पण इथल्या प्रतिसाद देण्या न देण्याच्या वृत्ती वर मात्र बोलावेसे वाटले.

मांत्रिक's picture

6 Oct 2015 - 12:48 pm | मांत्रिक

मला ते ही चालेल. पण इतक्या मेहनतीनं हा अनुवादाचा प्रयत्न केला त्यात सर्वांचीच मदत अपेक्षित होती. मी कुठे चुकलोय, कुठे बरोबर हेच मला पाहिजे होतं. तर एका संपादकानेच मी चक्क निर्मल बाबाचा दरबार चालू केल्यागत थयथयाट सुरु केला. ते पण लेख मुळीच न वाचता!
बाकी गोष्टी जाऊ देत. पण किमान भाषांतर तरी तपासा.
मला काय सांगायचंय ते लोकांपर्यंय पोचतंय का हे मला पहायचं होतं. असो.

द-बाहुबली's picture

6 Oct 2015 - 1:12 pm | द-बाहुबली

तर एका संपादकानेच मी चक्क निर्मल बाबाचा दरबार चालू केल्यागत थयथयाट सुरु केला

ते संपादक आहेत म्हणून त्यांनी थयथयाट केला असे नाही इतपत जाण मनात कायम असुदे.

नूतन सावंत's picture

6 Oct 2015 - 12:50 pm | नूतन सावंत

मी सश्रद्धच आहे.

द-बाहुबली's picture

6 Oct 2015 - 1:06 pm | द-बाहुबली

तरीही आपल्या अनुभवाला "बिंडोकपणा" न ठरवलेजाण्याची कारणे ही तपासावीच लागतील. आपल्या श्रध्देला आलेले ते फळ आहे हे ही त्यात एक कारण असु शकेल. मुळात आपण धारीश्ट्याच्या आहात हे आपल्या लेखांतुन समोर आलेच होते म्हणूनच आपण असा अनुभव मिपावर लिहण्ञाचे धारिश्ट्य केलेच कसे हा प्रश्न माझ्या मनात आला नाही पण इतरांचे मात्र आपली खिल्ली उडवायचे धारीश्ट्य झाले नाही हे मात्र विषेश लक्षणीय होते. कारण अतर्क्य लिहुन मिपाकरांचे धारीश्ट्य (थोड्या फार प्रमाणात) खच्ची राखणे या आधी फक्त एका सदस्याला थोडेफार साधले गेल्याचे माझ्या स्मरणात आहे. बाकिच्यांचा बाजार मिपाकरांनी क्षनोक्षणी उठवला आहे.

नीलमोहर's picture

6 Oct 2015 - 5:37 pm | नीलमोहर

१. ज्या व्यक्तिमागे 'म' ची ताकत खणखणीत उभी आहे,
- यातील 'म' नाही कळले.

२. अतर्क्य लिहुन मिपाकरांचे धारीश्ट्य (थोड्या फार प्रमाणात) खच्ची राखणे या आधी फक्त एका सदस्याला थोडेफार साधले गेल्याचे माझ्या स्मरणात आहे.
- कोण ते भाग्यवान, कळू द्या तरी.

नीलमोहर's picture

6 Oct 2015 - 1:26 pm | नीलमोहर

लेख आणि त्याला अनुसरून न येत असलेल्या प्रतिसादांबद्दल बोलायचे तर,

१. लेखातील बर्‍याच गोष्टी लोकांच्या समजण्यापलीकडे असू शकतात (मीही त्यातील एक).

२. ज्या थोड्या लोकांना माहिती असेल त्यांनी प्रतिसाद न देण्यामागे - तुमचा लेख वाचलेलाच नसणे,
तुमचा आयडी + हेतूबद्दल पुरेसा विश्वास नसणे, इथे लिहील्या जाणार्‍या गोष्टी कितीजण गंभीरपणे वाचतात याबाबत नसलेली खात्री, लिहीण्याबाबत अनास्था, अशी अनेक कारणे असू शकतात.

३. काही लोकांना इथे फक्त टवाळपणाच करायचा असतो त्यांच्यासाठी असे धागे म्हणजे पर्वणीच असते.

मिपावर 'काय लिहीलंय पेक्षा कोणी लिहीलंय ते जास्त महत्वाचं असतं' असं कोणीतरी म्हणून गेलं आहेच.

त्यामुळे अशा विषयांसाठी हे व्यासपीठ योग्य नाही हे समजून पुढे चलावे.
आपली श्रध्दा ही फक्त आपलीच असते, शक्यतो ती इतरांसोबत शेअर करू नये आणि त्याचे विश्लेषणही करू नये, कारण असे की समोरचा माणूस आपल्या त्या वेव्ह्लेंथ वर असेल, आपली प्रामाणिक भावना समजून घेऊ शकेलच असे नाही. आपली श्रध्दा आहे, विश्वास आहे, तसे अनुभवही आलेत याची जाणीव आपल्यालाच असणे पुरेसे आहे.

इतरांनीही आपले विचार मानावेत, आपल्याशी सहमत असावं ही अपेक्षा करणं व्यर्थ आणि त्रासदायकच ठरतं.

तंत्रमार्गाशी संबंधित गोष्टी कुप्रसिद्ध असल्याने तंत्र म्हणले की आम्ही लोक पहिल्यापासून चार हात लांब. तरीही सप्तशती वगैरे काव्य म्हणून अभ्यास करायला हरकत नसावी. त्यातील मधु कैटभाची कथा माहीत आहे. या कथेत आणि स्तोत्रात पुन्हा आदिमाया आणि श्रीविष्णु यांचा समन्वय साधलेला दिसतो. त्यावरून विवेक पटाईत साहेबांचा धागा आठवला.

इतर गूढ अर्थ वगैरे तुम्ही सांगत आहात ते ठीक आहे. समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे.

काही विरोध झालाच तर तो का झाला याच्या मूळ कारणापर्यंत पोचून ते दूर करणे जास्त चांगले नाही का! त्यावर जर थंडपणे चर्चा केली तर लोकांना माहिती देण्याचा तुमचा उद्देश साध्य होईल आणि निदान पुढच्या धाग्यात अवांतर होणार नाही. ते करताना जरा थंडपणे लिहीत जा आणि कोणाला वैयक्तिक लिहिणे कृपया टाळा. इथे लिहिताना कोणीही एक सदस्य म्हणूनच आपली मते मांडत असतो. नाहीतर संपादकांनी एकही प्रतिक्रिया द्यायला नको होती!

दुसरे महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकजण आपल्या बाजूने किंवा विरोधात असतो असे नव्हे. या सगळ्याशी देणे घेणे नसलेला असाही एक मोठा वर्ग असतो. ते चर्चेचा कल बघून कधी टवाळकी करतील तर कधी वाहवा देतील! तेव्हा हे सगळे न बघता लिहीत रहा.

आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे "मला व्यनि करा" इ. लिहिणे कृपया टाळा, कारण तुमचा व्यवसाय वगैरे काहीही माहिती इथे कोणाला नाही. तर व्यवसायाची जाहिरात होते आहे का? असा प्रश्न कोणाच्याही मनात येऊ शकतो.

मूळ ग्रंथ वाचला नसल्याने भाषांतराबद्दल काही बोलू शकणार नाही. मात्र इंटरेस्टिंग विषय आहे. यावर वाचायला आवडेल. लिहीत रहा!

मांत्रिक's picture

6 Oct 2015 - 2:05 pm | मांत्रिक

आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे "मला व्यनि करा" इ. लिहिणे कृपया टाळा, कारण तुमचा व्यवसाय वगैरे काहीही माहिती इथे कोणाला नाही. तर व्यवसायाची जाहिरात होते आहे का? असा प्रश्न कोणाच्याही मनात येऊ शकतो.

धन्यवाद! पण माझा त्यामागे उदेश उपासनेबाबत चांगली पुस्तके, एखादी उपासनेला वाहून घेतलेली वेबसाईट वगैरे बाबत लोकांना माहिती देणे इतपतच आहे. कारण अशी माहिती ओपनमध्ये दिली की पुन्हा नास्तिक मंडळी टीका करणार हे माहितच आहे. अशी चांगली पुस्तके, वेबसाईट बाबत माहिती देऊ नये काय?
आणि शिवाय या धाग्यात वरतीच अशी विनंती करण्याचे कारण

न्यास, ध्यान, विनियोग, फलश्रुती या केवळ उपासकाने करावयाच्या गोष्टी

आहेत. त्या इथे सांगत बसलो तर वेळ तर जाईलच, शिवाय नास्तिकांकडून थट्टा होणारच. मग यात मी काय चूक केलं?
पाहिजे तर माझे व्यनि संपादकिय अधिकारात तपासून पहावेत. काही जाहिरातबाजी, तंत्र, मंत्र, आढळलं तर तुम्ही पुढील कारवाई करूच शकता.

पैसा's picture

6 Oct 2015 - 2:13 pm | पैसा

संपादकांना व्यनि बघायचे अधिकार नाहीत आणि त्यात रसही नाही. मी फक्त मिपा धोरणाप्रमाणे काय योग्य तेवढेच सांगितले. कारण मिपावर कोणत्याही प्रकारे व्यवसाय, त्याची जाहिरात, पैशाची देवाण घेवाण होऊ नये हे महत्त्वाचे. इतर जास्तीची माहिती तुम्ही लोकांना व्यनि, खरड यातून देऊ शकताच! आणि ज्यांना तशी माहिती हवी असेल ना, ते स्वतःच संपर्क जरूर करतील! त्या सगळ्याला हरकत नाहीच.

पुस्तके, वेबसाईट्स, संदर्भ यांचे यादी लेखाच्या शेवट दिली की मोठे काम होऊन जाते.

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Oct 2015 - 3:01 pm | बिपिन कार्यकर्ते

एक सांगू का?

आधी खरं तर तुमच्या प्रकल्पाला शुभेच्छा. मदत मात्र करू शकणार नाही. पण मूळात हा धागा भलत्या मार्गाने जाण्यात तुमचेही काही योगदान आहे असे वाटत नाही का? तुम्हाला टीका सहन झाली नाही. विरूद्ध मताला तुम्ही अगदी अभिनिवेशाने उत्तर द्यायला जाता. अर्थातच, जालावरील भांडणे किंवा वाद हे दही वाळत घालून भांडत बसल्यासारखे असल्यामुळे, तुमच्या अरे ला कारे येणारच. तुम्ही काही गोष्टी अनुल्लेखाने मारल्या असत्या तर इतके वळण लागले नसते. असेल एखाद्याला जबदंबेवर टीका करायची.... करू दे की. तुम्ही सहभागी होऊ नका, आणि स्पष्ट पण योग्य पद्धतीने असहमती दर्शवा आणि सोडून द्या. तुम्ही काही एक कार्य योजले आहे, ते नेटाने चालू ठेवा. तुम्हाला त्यातून मिळणारे समाधान हे खरे आणि पुरे असेल, तर प्रतिसाद आले न आले, मदतीचे प्रस्ताव आले न आले... वाईट वाटणे तर दूरच, पण मनातसुद्धा येणार नाही.

परत एकदा तुमच्या प्रकल्पाला शुभेच्छा.

प्यारे१'s picture

6 Oct 2015 - 3:03 pm | प्यारे१

अवांतरः
>>> दही वाळत घालून भांडत बसल्यासारखे

याचं खरंच कुतुहल वाटलं. अर्थ काय याचा?

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Oct 2015 - 3:15 pm | बिपिन कार्यकर्ते

दही वाळत घातलं तर ते वाळायला किती वेळ लागेल? भरपूर वेळ लागेल. म्हणजे भरपूर वेळ असेल हाताशी भांडायला.

प्यारे१'s picture

6 Oct 2015 - 3:15 pm | प्यारे१

ओह्ह्क्के. धन्यवाद.

आणि शेवटी दही वाळवून तरी पनीर होणार काय? नै ना.

आले का लक्षात प्यारे?

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Oct 2015 - 3:30 pm | बिपिन कार्यकर्ते

;)

दमामि's picture

6 Oct 2015 - 3:31 pm | दमामि

:):)

प्यारे१'s picture

6 Oct 2015 - 3:35 pm | प्यारे१

हो गुर्जी.