आरत्यांचे आणि स्तोत्रांचे रिंग्टोन

सामान्यनागरिक's picture
सामान्यनागरिक in काथ्याकूट
7 Oct 2015 - 10:25 am
गाभा: 

नमस्कार,

नुकताच गणेशोत्सव येऊन गेला. त्या काळात तसेच ईतरही वेळी, अनेकांच्या मोबाईलवर गनेशस्तवन, आरती आणि इतर पवित्र स्तोत्रांचे रिंगटोन ऐकण्यात आले. अनेक लोक अमक्या देवाचे नांव असणाररेरिंगटोन आपल्या मोबाईलला लावतात.

ती व्यक्ती चौघांत बोलत असतांना अचानक कुठल्यातरी देवाची आरती सुरु होते आणि ती व्यक्ती मोबाईल घेउन कानाला लावते. बरे देवाची आरती ऐकल्याने त्यात काही फरक पडत नाही. मोबाईल कानांला लावुन ते धडधडीत खोटे बोलत असते. ' नाही, मी येई शकत नाही मी ऑउट ऑफ स्टेशन आहे...' वगैरे .

मला या विषयी असे वाटते :

१. देवादिकांची स्तोत्रे आणि आरत्या एका विशेष्ट वेळी आणि मानसिक अवस्थेत असतांना म्हणायची / ऐकायची असतात. बरेचदा आपण शूचिर्भूत होऊन मग ही कामें करतो.
२. हे रिंगटोन कधीही/कुठेही वाजतात. उदा: पानर्ट्टीवर अग्निकांडीचा आस्वाद घेत असतांना , पान तंबाखु खात असतांना, मदिरालयांत असतांना, पाकिस्तानला गेलो असतांना ई.

तर मग अश्या रिंगटोन्स आपल्या मोबाईलवपावापरणे योग्य आहे का ? अश्याने त्या देवादिकांचा अपमान होत नाही का ?

मला वाटते योग्य धार्मिक संघटनांनी हा प्रश्नं हातात घ्यावा. अश्या रिंगटोन्स वरती बंदी आणण्यात यावी.

जाणकार मिपाकरांनी या आपली मते व्यक्त करावेत.

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

7 Oct 2015 - 11:31 am | माईसाहेब कुरसूंदीकर

एक 'सामान्य नागरिक'म्हणून तू मत व्यक्त केल्यावर आम्ही तरी काय म्हणणार रे नागरिका?
खरे तर अशा रिंग टोन्स बन्वणेच अयोग्य वाटते.

सौंदाळा's picture

7 Oct 2015 - 11:33 am | सौंदाळा

पाकिस्तानला गेलो असतांना!!!

काहीही हा सा. ना.

तर्राट जोकर's picture

7 Oct 2015 - 11:35 am | तर्राट जोकर

घरात आरती, पुजा, स्त्रोत्र चालू असतांना काय काय गमती चालू असतात ते ठवूक नै का?

टवाळ कार्टा's picture

7 Oct 2015 - 11:36 am | टवाळ कार्टा

खिक्क....गणपती विसर्जनात ढिंच्याक गाणी चालतात???

द-बाहुबली's picture

7 Oct 2015 - 12:38 pm | द-बाहुबली

सार्वजनीक गणेशोत्सव हा धार्मीक न्हवे राजकीय वा सामाजीक कार्यक्रम आहे. लग्न ही धार्मीक बाब असुन जर तिथे गाणी चालत असतील तर गणपतीत विचकट गाणी नको आपण कोणत्या हेतुने म्हणायचे ?

मी तर एखाद्या वर्षी गणपती बसवणे जमले नाही तर सोसयटीला काही फरक पडणार नाही म्हटले तर काय गजहब झाला. त्यांच्यापुढे डोके आपटुन सांगत होतो की भाउ सार्वजनीक गणेशोत्सव ही धार्मीक परंपरा नाही. एका थोर पुरुषाने सुरु केलेली ती राजकीय/सामाजीक परंपरा आहे ति सुरु होण्याचे कोणतेही धार्मीक महत्व/प्रयोजन नाही. जर ती पाळता आली नाही तर ना धर्माचे नुकसान आता होणार आहे ना देशाचे. झेपणार नसेल यावर्षी तर उगाच ताण घेउन कार्यकर्ते कशाला राबवायचे, पुढच्या वर्षी करुच की लोक रिकामे असतील तर. अगदी प्रतिकात्मक छोटी मुर्ती बसवुनही त्याची यावर्षी पुजा करायची गरज नाही. आपण घरात मंगलमुर्तीची स्थापना करतोय ना मग काय काळजी देव आहेच पाठीशी ? पण गोष्टी लोक डोळे उघडे ठेउन बघतील तर शपथ.. मग काय.. करा कट्टे अन लाइफ एंजॉय. आमी काय नाकारतो का ?

मुख्य अवंतरः- बाकी सा.ना. म्हणत आहेत तशाच कारणाने मी कोणत्याही देवाचे किचेन, लॉकेट वगैरे वापरत नाही. रोज शंभरवेळेला कुठे कुठे कधी जावे लागेल हे सांगता येत नाही त्यात ते पावीत्र्य जवळ बाळगुन काय साधणार ?

सतिश गावडे's picture

7 Oct 2015 - 1:12 pm | सतिश गावडे

असा सारासार विचार प्रत्येकाने केला तर खुप सकारात्मक बदल होतील समाजात.

नाखु's picture

7 Oct 2015 - 11:39 am | नाखु

अ सामान्य प्रश्न इतके बोलून मी खाली बसतो.

अति सामान्य मिपा वाचक (एकोळी नको म्हणून किमान चारोळी वाचावे लागेल असा)

चकवा लागल्यानं पुन्हा त्याच 'चौकात' आल्या गेले आहे. ;)

प्रसाद गोडबोले's picture

7 Oct 2015 - 1:53 pm | प्रसाद गोडबोले

अश्याने त्या देवादिकांचा अपमान होत नाही का ?

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ

मला वाटते योग्य धार्मिक संघटनांनी हा प्रश्नं हातात घ्यावा. अश्या रिंगटोन्स वरती बंदी आणण्यात यावी.

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ !

काहीही हां सा ना .

कुत्येक दिवस आमची रिंगटोन " अग्निमिळे पुरोहितं " ही होती त्या नंतर "सहस्त्रशीर्षा: पुरुषः " ही होती , फोनची रिंगटोन ठेवल्याने देवाला अपमान वगैरे वाटत असेल मुळीच वाटत नाही , देवाच्या काळात मोबाईल नव्हते त्या मुळे त्यांना रिंगटोन म्हणजे काय हेच माहीत नसणार खी खी खी !!

उगाच कैच्याकै समज पसरवु नका .

एकदा गोंदावलेकर महाराजांना कोणी तरी विचारले की देवाचे नाव कसे घावे कधी घ्यावे तेव्हा महाराज स्पष्ट म्हणाले , देवाचे नामस्मरण हे पेढ्या सारखे आहे कधीही खाल्ले कोणत्याही बाजुने खाल्ले कसेही खाले तरी पेढा गोड लागतोच तसेच देवाचेही आहे ! नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही.
http://satsangdhara.net/shri/jan04.htm

जर मोबाईल्ची रिंगटोन ठेवुन देवाचे स्मरण होत असेल तर बिन्धास्त ठेवा रे वाट्टेल ती रिंगटोन !!