आठवण...

सतिश गावडे's picture
सतिश गावडे in जे न देखे रवी...
2 Oct 2015 - 9:40 pm

आज दुपारपासून धो धो पाऊस पडतोय
अगदी कोकणातल्या पावसासारखा
तसा मी इथे आहेच कुठे
मी आता कोकणातच पोहचलो आहे,
त्या हिरव्यागार डोंगर टेकडयांवर,
दुथडी भरुन वाहणार्‍या ओढयांकाठी
सर सर तीरासारखे पाणी कापत जाणारे तुम्ही
अन तुमच्या पाठोपाठ मी
किती छान होतं ना आपलं आयुष्य
फक्त आपणच होतो आपल्या आयुष्यात
फक्त तुम्ही आणि मी
गाव सोडलं आणि त्याबरोबर मी तुम्हालाही सोडलं
आज तुमच्या आठवणींनी मन व्याकुळ झालंय
डोळे भरून आलेत तुमच्या आठवणींनी
आजुबाजूला कुणी नाही म्हणून बरं आहे
नाही तर मला थेट पावसातच जाऊन उभं राहावं लागलं असतं
कुठे असाल तुम्ही सारे आता,
खरं तर तुम्ही नसालच आता,
गाई म्हशींना कुठे वीसेक वर्षांपेक्षा अधिक आयुष्य असतं...

करुणमुक्तक

प्रतिक्रिया

खेडूत's picture

2 Oct 2015 - 9:44 pm | खेडूत

वाह!
अगदी सहज व्यक्त झालंय..

(आमच्या घरच्या गंगा गायीची आणि तिच्या वासरांची आठवण आली.)

प्रचेतस's picture

2 Oct 2015 - 9:44 pm | प्रचेतस

.....

मित्रहो's picture

2 Oct 2015 - 9:53 pm | मित्रहो

मस्तच

मांत्रिक's picture

2 Oct 2015 - 9:59 pm | मांत्रिक

वाह! सुंदर काव्य! सगाजी बरेच दिवसांनी लिहते झाले. पण मस्त लिहिलंय!!!

नाखु's picture

3 Oct 2015 - 8:52 am | नाखु

मोजकेच लिहितो पण थेट न अलंकारीक न अस्प्ष्ट.

द-बाहुबली's picture

2 Oct 2015 - 10:03 pm | द-बाहुबली

मथुराधीपती झाल्यावर आता गोकुळाची आठवण सतावु लागली काय ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Oct 2015 - 10:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

शिव कन्या's picture

2 Oct 2015 - 10:20 pm | शिव कन्या

व्याकुळ! सुंदर .

अभ्या..'s picture

2 Oct 2015 - 11:28 pm | अभ्या..

मस्त धनाजीराव.
सुटलेल्या अशा किती अन काय काय गोष्टींची खंत बाळगायची अन कमावलेल्या कशाचा माज करायचा तेच कळेना सध्या. :(
असो, तुम्हासाठी केलेले टीशर्टचे डिझाईन बरोबर होते म्हणजे.
d

प्यारे१'s picture

2 Oct 2015 - 11:33 pm | प्यारे१

खूपच भावनापूर्ण!

पैसा's picture

2 Oct 2015 - 11:37 pm | पैसा

गायी निदान २० वर्षं तरी रहातात. मांजरं तर नालायक ३/४ वर्षं, काही तर ६ महिन्यातच निघून जातात. :(

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Oct 2015 - 10:33 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आमच्या मोठ्ठ्या बोक्याला ३ आठवड्यापुर्वी कोणीतरी विष घालुन मारलं :/!!!

चाणक्य's picture

3 Oct 2015 - 5:24 am | चाणक्य

आवडली पण म्हणता येत नाही

दमामि's picture

3 Oct 2015 - 7:06 am | दमामि

वा!

श्रीकृष्ण सामंत's picture

3 Oct 2015 - 7:18 am | श्रीकृष्ण सामंत

मला कविता आवडली

मदनबाण's picture

3 Oct 2015 - 8:48 am | मदनबाण

मस्त...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Once Again - 2011 :- Hang Massive

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Oct 2015 - 10:34 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

धनाजीराजे सुंदर लिहिलयं.

पद्मावति's picture

3 Oct 2015 - 2:47 pm | पद्मावति

खूप सुंदर लिखाण.

किसन शिंदे's picture

5 Oct 2015 - 9:16 pm | किसन शिंदे

आपण शांत बसलोय.
आजूबाजूच्या वातावरणामुळे उगाचच भकास वाटू लागतं.
एकटेपणा अंगावर येतो आणि अचानक जुन्या काही आठवणी अचानक डोक्यात गर्दी करू लागतात.
आणि मग जखमेवरची खपली निघते, भळभळून रक्त व्हायला लागतं.
होतं असं राव कधी कधी. :(

हम्म्म!! आवडलं. पाऊस आणि संध्याकाळ्चा संधिप्रकाश मन कुठे भरकटत नेईल त्याचा नेम नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Oct 2015 - 9:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता.

-दिलीप बिरुटे

मीता's picture

6 Oct 2015 - 1:22 pm | मीता

.....