सिझोफेनिया.... आजार की पेर्सेप्शन? भाग ५

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
26 Sep 2015 - 12:10 pm

भाग ५
मध्ये दोन दिवस गिताची तब्बेत बिघडली. त्यामुळे ती क्लिनिकला गेली नव्हती. फारच बर नसल्याने गिता झोपूनच होती. तिच्या आईने तस कळवलं देखील होत क्लिनिकमध्ये. विक्रांतने गिताला त्याच्या मोबाईलवरून अनेकदा फोन केला होता. पण तापात असल्याने ती त्याचे कॉल्स उचलू शकली नव्हती. त्यादिवशी संध्याकाळी दरवाजाची बेल वाजली आणि तिने दार उघडल तर दारात विक्रम उभा होता. त्याला अस अचानक घरी आलेलं बघून तिला खूप आश्चर्य वाटलं.

"अरे विकी तू कसा काय आत्ता? क्लिनिकमध्ये नाही गेलास?" तिने त्याला आत यायला सांगून बसवल आणि विचारल.

"नाही गेलो. जावसच नाही वाटलं तू नसताना." अस म्हणून तो क्षणभर शांत बसला आणि मग अचानक तिचे दोन्ही हात धरून त्याने तिला जवळ बसवलं आणि म्हणाला;"गिता मला तू खूप खूप आवडतेस ग. कस सांगू तुला? अग राजन, प्रकाश आणि हरीने अनेकदा सांगितल की मी तुझ्याशी बोलण सोडलं पाहिजे. कारण तू कदाचित त्याना स्वीकारणार नाहीस. पण मग आयुष्यात पहिलांदाच मी त्याना न सांगता तुझ्याशी बोलण चालू ठेवल आहे. गिता आजवर मी माझ्या मित्रांशी कधीच खोट बोललो नाही किंवा काही लपवल नाही. पण तुझा विचार आला ना की तुझ माझ्या आयुष्यात असण खूप महत्वाच वाटत मला."

विक्रमच्या अश्या अचानक झालेल्या उद्रेकामुळे गिता गोंधळली होती. पण मग तिच्या लक्षात आल की हीच वेळ आहे की विक्रमशी काही गोष्टी बोलता येतील. ती म्हणाली,"विकी मलाही तू खूप आवडतोस. तुलाही हे कळल आहे. पण हे जे तू सारख तुझ्या मित्राना घाबरून असतोस ना ते मला अजिबात आवडत नाही. मुळात तुला आणि तुझ्या मित्राना अस का वाटत की मी तुला त्यांच्यापासून तोडेन?" अस म्हणून गिताने त्याच्या डोळ्यात खोल बघितल आणि त्याला विचारल;"विकी, अस काही आहे का जे तू माझ्यापासून लपवतो आहेस?"

विक्रमच्या मनाचा निर्णय होत नव्हता. खरच त्याचा जीव अणूमध्ये गुंतला होता. पण अजूनही त्याचा तिच्यावर पूर्ण विश्वास बसला नव्हता.

"ठीक आहे विकी. मी समजू शकते. हव तर तू तुझ्या वडिलांशी बोल. कारण शेवटी मी काय किंवा तुझे मित्र काय... आम्ही आज आहोत उद्या नाही... पण तुझे वडील कायम तुझ्याबरोबर होते आणि रहाणार आहेत. त्यामुळे तुमच्या घरातला काही विषय असेल जो मला सांगायचा की नाही असा तुझ्या मनात विचार येत असेल; तर ते चुकीचे नाही. मी थांबीन तू आपणहून बोलेपर्यंत." गीता मुद्धाम म्हणाली.

आता मात्र विक्रमच्या डोळ्यात तिला निश्चय दिसला. तो गीताकडे बघत म्हणाला;"गिता मी स्चीझोफ्रेनियाचा पेशंट आहे; अस डॉक्टर खरात आणि माझ्या वडिलांच म्हणण आहे."

तो अशी सुरवात करेल आणि इतके स्पष्ट बोलेल अस तिला वाटल नव्हत. पण म्हणूनच तिच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं, जे आवश्यक होत आणि खर देखील होत. अर्थात एका क्षणात गिता भानावर आली. आता तिची खरी कसोटी होती. तिने त्याच्याकडे बघितल आणि म्हणाली;"विकी माझी चेष्टा करतो आहेस का? अरे, मी स्वतः साय्कोलोजीस्ट आहे. मला नसत का कळल आतापर्यंत की तू पेशंट आहेस? मुख्य म्हणजे तुला माहित आहे ना की डॉक्टर खरात माझ्या वडिलांचे बेस्ट फ्रेंड आहेत. त्यांनी मला सांगितल नसत का?"

"गीता त्यांनी तुला तस सांगितल नाही कारण त्यांच्या मते मला स्चीझोफ्रेनिया हा आजार झाला होता. मग मी बरा झालो अस देखील त्यांनी माझ्या बाबांना सांगितल." हसत विक्रम म्हणाला.

"विकी आता मात्र हद्द झाली ह! मला वेड ठरवण्यासाठी आला आहेस का तू आज? अरे तुला आजार होता; मग तू बरा झालास. काय प्रकार आहे हा?" गीता त्याला बोलत करण्यासाठी म्हणाली.

"अस काय करतेस गिता? ऐकून तर घे माझ. अग माझी आई गेली ना त्यावेळी मी खूप डिस्टर्ब झालो होतो. अग कोणताही मुल डिस्टर्ब होईल न? अग सुरवातीला मला आधार द्यायला माझी आई यायची माझ्याजवळ. मला धीर द्यायची; म्हणायची बेटा असा रडू नकोस. तूच तुझ्या बाबाना आता आधार द्यायचा आहे. आजी काही करणार नाही. उलट ती त्यानासुद्धा बोलेल माझ्यावरून. तू रडत राहिलास तर तुला सुद्धा रागावेल. म्हणून रडू नकोस. बाबांना सांभाळ. मी काही अशी नेहेमी नाही येऊ शकणार तुला भेटायला. गिता, खर सांगू का... मी काही खूप लाहान नव्हतो माझी आई गेली तेव्हा. त्यामुळे मला सगळ कळत होत. पण हे देखील तितकच खर आहे की माझी आई यायची. आणि ती गेली की मला खूप रडायला यायचं. आजीला नाही आवडायचं मी रडलेल. म्हणून मग आई येऊन गेली की मी खाली जायचो मित्रांकडे. अगदी बाबा घरी येयीपर्यंत मी त्यांच्याबरोबर असायचो. त्या तिघांनी मला खूप सांभाळल ग. अग हरीला तर माझी आई एकदा घरातून बाहेर पडताना दिसलीसुद्धा होती. त्यामुळे मी जे सांगायचो त्यावर त्यांचा विश्वास बसला. पण मी कितीही सांगितल तरी माझ्या बाबांचा माझ्यावर विश्वास बसला नाही. अग माझी आई म्हणजे त्यांची पत्नी ना. पण तरीही ती मला भेटायला येऊ शकते; हे मान्य करायला ते तयार नव्हते. मग कधीतरी त्यांनी माझे मित्रदेखील नाहीत अस म्हणायला सुरवात केली. कुठूनतरी डॉक्टर ख्रराताना शोधून काढल आणि मला तिथे घेऊन गेले. डॉक्टर खरातानी अगोदर अस दाखवल की त्यांचा माझ्यावर विश्वास आहे; आणि माझ्याकडून सगळ काढून घेतल. मग मात्र त्यांनीसुद्धा माझ्या बाबांसारख मला सांगायला सुरवात केली की माझी आई येतच नाही. काही दिवसांनी आम्ही घर बदलल. तोपर्यंत मला लक्षात आल की माझ्या बाबांना जर बर वाटायला हव असेल तर मी आई भेटते हे म्हणण बंद करायला हव. आईने पण तेच तर सांगितल होत मला. बाबांना सांभाळ. शिवाय नवीन घरात आम्ही आलो आणि आईच येण बंद झाल. अग मी तिला नवा पट्टा द्यायला विसरलो होतो. कदाचित ती जुन्या घरी आजही जात असेल. पण मला कल्पना नाही. मी आईच जाण स्वीकारलं आणि मग हळूहळू सगळ ठीक होत गेल."

गिता त्याच म्हणण एकूण घेत होती. आणि तिला धक्यांवर धक्के बसत होते. तिच्या लक्षात आल होत की विक्रम कधीच बरा झाला नव्हता. डॉक्टर ख्ररातांसारख्या अनुभवी आणि जुन्या डॉक्टरना ही विक्रमने सहज फिरवल होत. त्यांना खरच वाटल होत की विक्रम बरा झाला आहे.

विक्रम आपल्याच तंद्रीत बोलत होता. "गिता मी नवीन घरी रहायला आलो ना तेव्हा जस मी आईला नवा पत्ता द्यायला विसरलो होतो तसा माझ्या मित्राना पण पत्ता द्यायला विसरलो होतो. पण माझे मित्र खरच ग्रेट आहेत. त्यांनी मला शोधून काढल; आणि मग ते अधून मधून थोडा वेळ मला भेटायला यायला लागले. पण यावेळी मात्र मी माझ्या बाबांना काही सांगतील नाही. एकतर त्यांनी परत घर आणि शाळा बदलली असती आणि परत मला सांगायला सुरवात केली असती की जशी आई नाही तसे हे मित्रदेखील नाहीत. पण मग एक गमात झाली. त्या तिघांनी माझ्याच कॉलेजमध्ये अडमिशन घेतली. मी त्या दिवशी खूप खुश होतो त्याना माझ्या कॉलेजमध्ये बघून. त्याच आनंदात मी बाबाना ती न्यूज दिली आणि मग माझ्या लक्षात माझी चूक आली. तरी राजन म्हणाला होता की बाबांना आमच्याबद्धल अज्जीब्बत सांगू नकोस. त्याना आम्ही आवाडत नाही, त्यामुळे ते तुला आमच्यापासून तोडायचा प्रयत्न करतील. पण माझ्या चेहेऱ्यावरचा आनंद बाबांना सगळ सांगून गेला होता.

बाबांनी पूर्वीप्रमाणे परत मला डॉक्टर खरातांकडे नेल. डॉक्टर खरातानी परत मला सांगायला सुरवात केली की माझे मित्र नाहीतच. त्यांच म्हणण खर करण्यासाठी त्यांनी मला सांगितल की मी आजारी आहे आणि माझ्या आजाराच नाव स्चीझोफ्रेनिया आहे. अगोदर मला खूप राग आला होता त्यांचा आणि एकूणच या प्रकाराचा. पण मग मी जेव्हा राजन, प्रकाश आणि हरीशी बोललो तेव्हा माझ्या मनातले प्रश्नच सुटले."

"अरे वा! सुटले तर! काय उपाय मिळाला तुला?" गीताने मुद्धाम त्याची तंद्री भंग करत त्याला डिस्टर्ब केल. त्याची लिंक तुटल्या नंतरची त्याची रीअक्शन तिला बघायची होती. तिच्या मते तो गोंधळायला हवा होता. किमान त्याची लिंक तोडली म्हणून तिच्यावर थोडा वैतागायला हवा होता. पण अस काहीच झाल नाही. विकारामने तिच्याकडे बघितल आणि म्हणाला;"अग गिता अस बघ तुझ्या हातात आत्ता ग्लास आहे की नाही?" गिताने ग्लासकडे बघितल आणि म्हणाली;"हो विकी! तुलासुद्द्ध दिसतो आहे की नाही?" तिने मुद्धामच त्याला विचारल होत की त्यालासुद्धा तो ग्लास दिसतो आहे ना. त्यामुळे तिला कदाचित तिचा मुद्दा समजावता आला असता.

मात्र त्यावर विक्रमच उत्तर तिला पूर्णपणे अनपेक्षित होत. "गिता तुझ्या हातात ग्लास नाही आहे. मी फक्त कल्पना करतो आहे की ग्लास आहे."

गिताने एकदम रिफ्लेक्ट अक्शन मध्ये तिच्या हाताकडे बघितल. ग्लास तिच्याच हातात होता. क्षणभर तिला वाटल की तिने कदाचित तो समोरच्या टीपॉय वर ठेवला की काय. पण मग त्या ग्लासचा स्पर्श विक्रमला करत ती म्हणाली;"विक्रम अरे तुला स्पर्श जाणवत नाही का? हा बघ तुझ्या हाताला मी हा ग्लास लावला आहे."

"तू म्हणतेस तर हो... होतोय स्पर्श माझ्या हाताला." विक्रम म्हणाला.

आता त्याच्या अशा उत्तराने गिता निरुत्तर झाली. ती शांतपणे विक्रमकडे बघत बसून राहिली. कारण तिला लक्षात आल होत की जर विक्रम अस म्हणतो आहे तर त्याचा अर्थ त्याच्याकडे या सगळ्या बोलण्याच एकस्प्लानेषन नक्की असणार.*****

"विक्रम मला कळत आहे की तुला ग्लास दिसतो आहे. नाहीतर तू त्याचा उल्लेखच केला नसतास. पण तुला तुझा मुद्धा मला सांगायचा आहे. म्हणूनच तू हा ग्लास माझ्या हातात असण हे फक्त माझ म्हणण आहे अस म्हणतो आहेस. तू बोल विक्रम; मी एकते आहे." गिता म्हणाली आणि विक्रम हसला.

"गीतू तू ना मला ओळखायला लागली आहेस माझ्या मित्रांसारखी; अस मला वाटत. तर, तुझ्या हातात ग्लास आहे अस तू म्हणते आहेस. किंवा समजा आत्ता इथे अजून ४-५ माणस असती आणि त्यांनी म्हंटल असत... तर मग खरच तुझ्या हातात ग्लास आहे हे सिद्ध झाल असत. बरोबर? आणि समजा तू एकटीनेच म्हंटल असत की तुझ्या हातात ग्लास आहे पण बाकीच्यांनी म्हंटल असत की तुझ्या हातात अस काहीच नाही... तर मग पलीकडच्या खोलीतल्या लोकांना काय वाटल असत?" विक्रमने तिला विचारल.

गिता एकदम गोंधळली. "अरे काय म्हणतो आहेस तू?" तिने विक्रमला विचारल.

"अग अस काय करतेस? ok! परत सांगतो. थोड वेगळ्या पद्धतीने. तू जर एखादी गोष्ट या खोलीत आहे म्हणते आहेस आणि इतरांनी दुजोरा दिला, तर तू जे म्हणते आहेस ते खर ठरत; बरोबर? पण जर तू म्हणते आहेस त्याला दुजोरा नाही मिळाला तर मग तू कितीही ओरडून सांगितलस तरी ते खर ठरत नाही. त्यातून जे लोक अस एखाद संभाषण दुसरीकडून एकत असतील ते लोक तर अनेकांनी जे म्हंटल असेल तेच खर मानणार... हो की नाही?" विक्रमने परत एकदा त्याच म्हणण सांगायचा प्रयत्न केला.

गिताला आता त्याचा मुद्दा लक्षात आला. "विकी तू म्हणतो आहेस ते बरोबर आहे. पण मुळात माझ्या हातात ग्लास आहे हे इतराना दिसत असत. जर त्यांनी ते नाकारलं तर मी ते सिद्ध करू शकते न? त्या ग्लासचा स्पर्श त्याना करून. किंवा काचेचा ग्लास असल्याने तो जमिनीवर फोडून... त्यामुळे केवळ मी म्हणते म्हणून हे सिद्ध होत नाही की ग्लास आहे. तर त्याच्या अस्तित्वाला सिद्ध केल्यानंतर ते मान्य होत." गीताने एकूण चर्चेला तिला हव तस वळण द्यायला सुरवात केली. तिच्या एक लक्षात आल होत की विक्रमच्या विचारांना योग्य मार्गावर आणण; आणि तेही इतर कोणी नाही तर त्याने स्वतःच! हाच एक उपाय आहे त्याच्या बरे होण्याच्या मार्गाचा. पण अगोदर त्याच्या मनातल पूर्ण समजून घेण आवश्यक होत. म्हणून मग तिने एकूण संभाषण मागे फिरवल.

"विकी तो ग्लास आणि त्याच असण याबद्धल आपण नंतर बोलू. अगोदर तू मला जे सांगत होतास ते पूर्ण कर बघू. तुझ आणि तुझ्या मित्राचं अस काय बोलण झाल रे की सगळे प्रश्नच सुटले." तिने त्याला आठवण करून दिली.

"गिता तुलासुद्धा मी स्चीझोफ्रेनिक वाटतो आहे का?" अचानक विक्रमने तिला विचारल.

"विकी मी जे विचारते आहे ते सोडून तू अस मलाच का सारखे प्रश्न विचारतो आहेस? जर तुला नसेल सांगायचं की तू आणि तुझ्या मित्रांनी मिळून तो प्रश्न कसा सोडवला तर राहु दे. मी आग्रह करणार नाही. पण मी तुला उत्सुकतेपाई मी तुला विचारते आहे; एवढाच." त्याच्या प्रश्नाच उत्तर टाळत गीताने थोडा त्याच्या भावनांना हात घातला. आणि त्याचा योग्य तोच परिणाम झाला.

"अस नाही ग. पण तू अगदी डॉक्टरच्या भूमिकेतून विचारल्यासारख विचारते आहेस म्हणून मला वाटल." विक्रम नरमून म्हणाला आणि सांगायला लागला;"अग उत्तर सोप्प होत. आम्ही सर्वांनी मिळून चर्चा करून ते शोधलं होत. मी पूर्वी सारख डॉक्टर ख्ररातांच म्हणण मान्य करायचं. ही पहिली गोष्ट. आणि त्याहूनही महत्वाच म्हणजे त्यांच्या लक्षात येणार नाही अशा प्रकारे स्चीझोफ्रेनिया आजाराचा अभ्यास स्वतःच करायचा. उत्तर तर मिळाल होत. फक्त ते कस करायचं ते कळत नव्हत. कारण मी जरी अभ्यास करायचा म्हंटल तरी बाबांचं माझ्यावर बारीक लक्ष असणारत्यात डॉक्टर आता परत औषध सुरु करणार. म्हणजे एकतर मी थोडा जास्त झोपायला लागणार, जेवण-खाण नकोस होणार. उत्साह नाही वाटणार एकूणच. . हे माझ्या लक्षात आल होत. त्यामुळे काय कराव याचा मी विचारच करत होतो; आणि उत्तर डॉक्टर खरातानी दिल. त्यांनी मला विचारल की मी त्यांच्याच क्लिनिकमध्ये काम करेन का! मी लगच हो म्हणून टाकल. पण जर मला केसेसचा अभ्यास करायचा असला तर ते मी एकटा असतानाच शक्य होत. म्हणून मग मी पोस्ट ग्रजुएशन करणार आहे अस सांगून क्लिनिक बंद असताना आत थांबायची परवानगी घेतली.

गिता त्यानंतर मात्र मी खूप प्रामाणिकपणे अभ्यास केला या आजाराचा. केसेसचा खजिनाच होता डॉक्टर ख्ररातांच्या क्लिनिक मध्ये. शिवाय इंटरनेट होताच; थियरीसाठी.

त्या अभ्यासातूनच मला कळल की स्चीझोफ्रेनिया हा विचारांचा आजार आहे. ही काही स्प्लिट पर्सानालीटी नाही. किंवा हा आजार असणारी व्यक्ती डेंजरसही नसते. अनेकदा हा आजार पिढ्यान मागून पिढ्या चालत आलेला असतो. म्हणजे किमान ७०% वेळा अस असत. मेंदूमधल्या काही केमिकल्सच्या imbalanceमुळे हा आजार होऊ शकतो. serotonin आणि dopaminc अशी त्या केमिकल्सची नाव आहेत. त्यांच्या imbalanceमुळे मेंदू विचित्र react होतो. हा आजार असणाऱ्याना आवाज, वास, दृष्टी, चव या बाबतीत hallucinations होऊ शकतात.

ही माहिती कळल्यानंतर मी स्वतःलाच एझामिन करायला लागलो. मुळात बाबांना गप्पानमधून विचारल की त्यांच्या किंवा आईकडच्या नात्यामध्ये मागच्या पिढीत हा आजार कोणाला कधी झाला होता का? पण तस काही नव्हत. मग मी स्वतःच्या serotonin आणि dopaminc टेस्ट्स करून घेतल्या. त्यांच्या नकळत ह. त्यात थोडा imbalance आला खरा. पण तो disturb मानास्तीथित होऊ शकतो हे मी वाचून शोधून काढल. आणि बाबांना मी आजारी आहे अस वाटत यामुळे मी disturb तर होतोतच न. म्हणजे ही पोसिबिलीटी सुद्धा बाद झाली. बर वास, दृष्टी, चव, आवाज या बाबतीत मला hallucinations देखील नाहीत. डॉक्टर खरातांच्या क्लिनिककडे येताना ती कचऱ्याची पेटी आहे तिथून येताना मला खूप त्रास व्हायचा वासाचा. एकदा तिथून पास होताना मी मुद्धाम बाबांना म्हणालो किती छान वाटतय न? तर ते म्हणाले हा वास सोडला तर सगळ छान आहे. अशाच प्रकारे मी दृष्टी, चव आणि आवाजाच्या बाबतीत खात्री केली. गीतू मला जे जस जाणवत तसच ते इतराना जाणवत हे माझ्या लक्षात आल. आणि मग मी समजून चुकलो की मला असा कोणताही आजार नाही आहे." विक्रमच हे एकूण बोलण एकून गिताला काय बोलाव तेच कळेना.

एखाद्या अत्यंत हुशार आणि सयुक्तिक विचार करणाऱ्या व्यक्ती सारखा विक्रम बोलत होता. मुख्य म्हणजे त्याचे मुद्दे खोडून काढण अवघड होत हे गिताच्या लक्षात आल. कारण त्याने खरच स्चीझोफ्र्णियाचा खूप चांगला, खोलात जाऊन अभ्यास केला होता. त्याने सांगितलेले सगळेच simptumps बरोबर होते. फक्त एक खूप मोठ्ठा फरक होता; आणि तो म्हणजे विक्रमने हे पक्क स्वीकारलं होत की त्याचे मित्र खरच आहेत आणि म्हणूनच तो हे मान्य करायलाच तयार नव्हता की मुळात त्याला हा आजार झाला आहे हे म्हणण्याच मुळ 'ते मित्र या जगातच नाहीत,' यात आहे.

आता गीता समोर एक खूप मोठ आव्हान उभ राहील होत. तिला विक्रमला संशय येऊ न देता हे समजावायचं होत की त्याचे मित्र मुळात नाहीच आहेत. कारण विक्रमने इतक्या बेमालूमपणे डॉक्टर खरात आणि त्याच्या वडिलाना फसवल होत आणि या विषयाचा अभ्यास इतका चांगला केला होता की तिची एखादी चूक खूप मोठ नुकसान करून गेली असती.
-----------------------------------------------

भाग ६
विक्रमला गीलाबद्ध्ल खूप विश्वास वाटत होता हे उघडच होत. म्हणूनच केवळ त्याने तिला सगळ अगदी सगळ सांगितल होत. जे आजवर त्याने कोणाशीच शेअर केल नव्हत. जर ह्या त्याच्या विश्वासाला तडा गेला असता, तर मग त्याला परत सामान्य जीवनात आणणं अवघड नाही तर अशक्य झाल असत. गिताला कोणत्याही परिस्थितीत विक्रमला हरवायचं नव्हत. म्हणून मग तिने त्याच्या कलाने घ्यायचं ठरवलं. त्याहूनही मोठा निर्णय तिने हा घेतला की जोवर ती काही निर्णयापर्यंत येत नाही तोवर डॉक्टरकाकांना किंवा बाबांना काही सांगायचं नाही.

गिता शांत झाली आहे हे बघून विक्रम अस्वस्थ झाला. "गिता तुझा पण माझ्यावर विश्वास बसत नाही ना?" त्याने तिला विचारल.

"तस नाही विक्रम. पण मला सारखा एकाच प्रश्न पडतो आहे की तू म्हणतोस ते सगळ बरोबर असेल तर मग तुला असा अवघड आणि मनाचा आजार झाला आहे, अस तुझे वडील का म्हणतील? कारण अजूनही आपल्या समाजाने मनाचे आजार शरीराच्या आजारांसारखे सहज स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे मनाचा आजार असलेल्या व्यक्तीला वेगळ्या नजरेने बघितल जात. सर्वसाधारणपणे 'वेड लागल आहे या व्यक्तीला,' अस सहज म्हंटल जात. अस असताना तुझे वडील का तुला डॉक्टर खरातांसारख्या well known डॉक्टरकडे आणतील? त्याना काही बर वाटत नसणार न, तुला मनाचा आजार आहे असा विचार करताना?" गीताने मुद्धाम विक्रमला विचारले.

त्यावर विक्रमने दिलेले उत्तर तिला काहीसे अपेक्षितच होते. तो म्हणाला;"माहित नाही ग. पण माझे बाबा कायम त्यांच्या कामात गुंतलेले असतात. त्यांना माझ्यासाठी कधी वेळच नव्हता आणि अजूनही नसतो. म्हणून मग कदाचित त्याना मनातून गिल्टी वाटत असेल. त्यात मी माझ्या मित्रांमध्ये जास्त रमतो हे आवडत नसेल. म्हणून मग त्यांच्यापासून तोडायला काही सबळ कारण हव, म्हणून मग मला आजार आहे अस सिद्ध केल की झाल अस त्याना वाटत असेल."

त्यावर गिता म्हणाली;"अरे ते तुझे वडील आहेत विकी. तुला आजार आहे अस सिद्ध झाल्याने त्याना आनंद कसा होईल? आणि तुझे मित्र तू म्हणतोस म्हणून आहेत अस कस म्हणता येईल? तुझ्या बाबांना तर ते दिसत नाहीत; पण त्यांच एकवेळ बाजूला राहुदे. बाकी कोणाला ते दिसतात का?"

ती असाच काहीस त्याला सांगायचा प्रयत्न करत होती आणि अचानक तिला थांबवून विक्रम म्हणाला;"गिता, अस तर नसेल की माझ्या बाबांनाच स्चीझोफ्रेनिया हा आजार असेल? ते म्हणतात की फक्त मलाच माझे मित्र दिसतात; पण कदाचित फक्त त्यांनाच ते दिसत नसतील. पण ते वडील आहेत.... मोठे आहेत... त्यामुळे आजार त्याना झाला आहे हे त्याना स्वीकारायचे नसेल. मग सोपा उपाय काय... तर मलाच आजार आहे अस म्हणायचं. काय वाटत तुला?"

त्याचे हे विचार एकून मात्र गिता आवाक झाली. क्षणभर तिला काय बोलाव सुचेना. पण मग तिने विचार करून म्हंटल,"विकी एकवेळ हे म्हंटल की तुझ्या वडिलानाच फक्त तुझे मित्र दिसत नाहीत, तर मग तुला हे सिद्ध करावा लागेल की त्यांच्या व्यतिरिक्त इतराना तुझे मित्र दिसतात. सांग कस सिद्ध करशील?" हे म्हणताना तिला इच्छा होती की विक्रमने म्हणावं की चल तुला माझ्या मित्रांची ओळख करून देतो.

पण त्यावर त्याचे उत्तर वेगळेच होते. तो म्हणाला;"गिता अग माझे मित्र इतराना दिसतात."

हे एकून गिता पुरती गोंधळून गेली. तिला माहित होत आणि खात्रीदेखील होती की विक्रम स्चीझोफ्रेनिक आहे. हा आजार त्याला झाला आहे. तरीही त्याच्या आत्मविश्वासपूर्ण वाक्याने ती पुरती गोंधळून गेली.

"कोणाला दिसतात तुझे मित्र विकी?" तिने आवाजावर ताबा आणत त्याला विचारले.

"अग आमच्या बिल्डिंगचा वॉचमन आहे ना त्याला नाक्कीत दिसतात. कारण आम्ही कधी कधी गच्चीवर बसतो ना तेव्हा जर मी वाकून बघितल आणि त्याचवेळी तो वर बघत असला तर खालूनच ओरडतो... तुम बच्चा लोग उप्परसे झुकता हे और गाली हमको पडती हे. चलो पिछे हो जाव." विक्रमने तिला सांगितले.

"विकी तुमच्या बिल्डिंगचा वॉचमन काय म्हणतो त्याचा काय संबंध विकी?" गीताणे थड वैतागून विचारले.

"अग गिता तुला कस समजत नाही? तो म्हणतो तुम बच्चा लोग... याचा अर्थ त्याला आम्ही सगळे दिसतो ना?" विक्रम तिला समजावत म्हाणाला.

त्याने असे म्हणताच गिताच्या लक्षात त्याचा मुदा आला. त्याक्षणी तिला वाटले, 'खरच जर तो वॉचमन अस म्हणत असेल तर त्याचा अर्थ त्याला मुल दिसत असतील नाही का? खात्री करून घेतली पाहिजे.' पण तिने हा विचार विक्रमला बोलून नाही दाखवला. उलट ती महाली,"त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणी आहे का विकी ज्यांनी तुझे मित्र बघितले आहेत?"

विक्रम विचारात पडला. निदान आता तरी तो तिच्या मनातल बोलेल अशी तिला आशा होती. आणि विक्रम तेच म्हणाला;"दुसऱ्या कोणाची साक्ष कशाला हवी गिता? चाल तुझीच ओळख करून देतो मी माझ्या मित्रांशी. त्याना मी सांगितलेल नाही अजून की मला तू किती जवळची वाटतेस. त्यामुळे अचानक तुला माझ्याबरोबर बघून त्याना पण आश्चर्य वाटेल. चल येतेस? तुझी भेट घालून देतो मी माझ्या मित्रांशी."

'finally!' गिताच्या मनात आल. तिला विक्रमने स्वतः अस म्हणायला हव होत की तो तिला त्याच्या मित्राना भेटायला घेऊन जाईल. कारण जर तिने उत्सुकता दाधावली असती तर तो घेऊनही गेला असता, आणि जर तिला कोणी दिसत नाही अस तिने म्हंटल असत तर कदाचित त्याने असा stand घेतला असता की 'मुळात माझ्या मित्राना तू आवडत नाहीस, त्यात मी त्याना न विचारता तुला घेऊन आलो, म्हणून तेच समोर यायला तयार नाहीत.'

परंतु विक्रम स्वतःच म्हणाला की तो गिताला त्याच्या मित्राना भेटवायला तयार आहे; हे एकून तिचा चेहेरा खुलला. विक्रमच्या एकूण आत्मविश्वासपूर्वक बोलण्यामुळे तिच्या मनात विक्रमच्या वडीलांबद्धल थोडा संदेह निर्माण झाला होता; त्यामुळे ती विक्रमबरोबर जायला उत्सुक होती. जर ते मित्र खरच तिला भेटले असते तर मोठाच प्रश्न उभा रहाणार होता. पण जर ते नाहीच भेटले किंवा दिसले तर मात्र तिला विक्रमला त्याच्या कलाने घेत समजावावे लागणार होते. पण त्याला तिची तयारी होती. तिचा स्वतःवर पूर्ण विश्वास होता.

गीताने विक्रमला विचारले;"हे मस्तच झाल. कधी जाऊया आपण? मला आता बर वाटत आहे. उद्या चालेल का तुला? मी उद्या येणार आहे क्लिनिकला. मग तिथूनच एकत्रच जाऊ."

गिताला वाटल होत तो म्हणेल त्याना कधी वेळ आहे आणि मग आपण जाऊ. अर्थात तिलाही तेच हव होत. त्यामुळे तिला थोडा वेळ मिळाला असता डॉक्टर खरातांशी बोलायला. त्याना अनेक गोष्टी माहीतच नव्हत्या. त्याना ती सगळी माहिती देण अत्यंत आवश्यक होत. बर, विक्रमच्या वडीलाना काही प्रोब्लेम नाही ना ही दुसरी possibility तपासून बघणे देखील आवश्यक होते. या सगळ्यासाठी तिलासुद्धा थोडा वेळ लागणारच होता.

पण त्यादिवशी बहुतेक गिताला shocks मागून shocks बसावेत अस होत. कारण विक्रम घड्याळाकडे बघत म्हणाला;"चल आताच जाऊ. आता बाबा नसतील घराजवळ. त्यामुळे ते तिघे मोकळेपणाने भेटतील आपल्याला. तसा उशीर झाला आहे, मान्य आहे. पण तू काही लाहान बाळ नाहीस न. आणि अजून तुझे आई-बाबासुद्धा आलेले नाहीत. तू फक्त त्याना भेट आणि ये परत. मी थांबवणार नाही तुला. तस त्यानासुद्द्धा त्यांच्या घरी जायचं असत. पण अलीकडे आम्ही ठरवल आहे की रोज निदान पाच मिनिट तरी भेटायचं. कारण नाहीतर मला फार फार एकट वाटत. चल निघू. ते थांबले असतील माझ्यासाठी."

गिताला काय कराव सुचेना. नाही म्हणायची इच्छा होती. पण तस कारण सापडत नव्हत. तिनेच काही मिनिटांपूर्वी म्हंटल होत की आता तिला आता बर वाटत आहे. तिने क्षणभर विचार केला आणि मनाशी निश्चय करून ती उठली. म्हणाली;"चल विकी, येते मी. पाच मिनिटात तयार होते."

खरोखरच गिता पाच मिनिटात बाहेर आली. तिने आई-बाबांसाठी टेबलावर चिट्ठी लिहून ठेवली... मला बर वाटत आहे, म्हणून जरा फिरायला बाहेर जाते आहे. काळजी करू नका. जेवायच्या वेळेपर्यंत घरी येते.' आणि ती विक्रम बरोबर निघाली. मुद्धामच तिने कुठे जाते आहे आणि कोणाबरोबर ते लिहील नाही. कारण ते लिहील असत तर तिची आई उगाच घाबरली असती आणि सारखा मोबाईलवर फोन करत बसली असती.

गीताने लगेच आपल म्हणण एकल आणि ती यायला तयार झाली हे बघून विक्रम खुश होता. तो तिच्याबरोबर निघाला.
---------------------------------------

कथा