आप-मतलबी

विकास's picture
विकास in काथ्याकूट
26 Aug 2015 - 1:55 am
गाभा: 

आप बद्दल आता अजून काही बोलायचे राहीले नाही असे वाटत असतानाच अचानक दोन गोष्टी नव्याने आल्यात. एक प्रत्यक्ष आणि दुसरी किमान वरकरणी अप्रत्यक्ष... दुसरी अधिक गंभीर आहे.

दिल्लीत एका मुलीने एका मुलाविरोधात विनयभंगाची तक्रार केली आणि त्यावरून मोठा गदारोळ झाला, त्या मुलाला अटक देखील झाली, जरी त्याला आता जामिनावर सोडले असले तरी. त्यावरून टाईम्स नाऊ वगैरेने आकांडतांडव करत जनतेच्या भावना (त्या मुला विरोधात) भडकवण्याचे काम केले आहे असे देखील दिसत आहे. मात्र नंतर जे बाहेर आले ते वेगळेच होते. एका वयाने मोठी दिसत असलेल्या एका व्यक्तीने "आंखो देखा हाल" सांगितला त्याप्रमाणे तो मुलगा तिच्या जवळ देखील गेला नाही. आणि ती मुलगी मात्र आरडाओरडा करत होती. त्याला त्या मुलीची अथवा मुलाची ओळख नव्हती. त्याने झी टिव्हीवर दिलेल्या मुलाखतीत जे शेवटी म्हणले ते महत्वाचे वाटले... असे जर खोटे मुली बोलू लागल्या आणि ते प्रकाशात आले तर नंतर जेंव्हा खरेच एखादीस गरज असेल तेंव्हा जनता विश्वास ठेवणार नाही आणि दुर्लक्ष करेल... अर्थात त्याचे या आप समर्थकांना काय पडलेय?

दुसरा भाग जास्त महत्वाचा आणि गंभीर वाटतो. गुजरातेत विशीच्या सुरवातीत असलेल्या एका युवकाने हार्दीक पटेल याने पटेल-पाटीदार समाजाला ओबिसी घोषित करून राखीव जागा मिळाव्यात म्हणून आंदोलन सुरू केले आहे. त्यातून थोडा भडका उडालेला आहेच पण तो अजून मोठा होण्याची शक्यता आहे. पण त्याचे त्याला काही नाही. वरकरणी तो भाजपाला पुढच्या निवडणुकात हराल असा दम देत आहे. हे प्रकरण अधिक गंभीर अशा साठी आहे कारण "भाजपाचे" म्हणून सरकारला ब्लॅकमेल करत असताना जनतेला आणि अगदी एका विशिष्ठ पटेल समाजाला देखील वेठीला धरणे चालू आहे. हे खचीतच योग्य नाही. पण कोण आहे हा हार्दीक पटेल? जेंव्हा जरा शोधले तेंव्हा त्याचे पान २०१४ चे ट्विटरचे अकाउंट मिळाले आणि त्यात त्याने केलेले आपचे समर्थन देखील दिसले...खालील दोन ट्वीट्स या प्रातिनिधीक आहेत.

यातून एक गोष्ट स्पष्ट आहे, या सगळ्या आंदोलना मागचा बोलविता धनी वेगळाच आहे आणि अर्थातच तो धनी इतर कोणी नसून साक्षात अरविंद केजरीवाल आणि आप असावेत असेच यावरून दिसत आहे. ज्या पध्द्तीने यांचे "आप-मतलबी" राजकारण आता जनतेत जातीवरून फूट पाडण्याचा आणि भडका उडवण्याचा प्रयत्न करत आहे ते बघता सत्तेसाठी देश फोडायला पण आम्ही मागेपुढे बघणार नाही हा हीन उद्देश दिसत आहे.

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

26 Aug 2015 - 2:06 am | प्यारे१

तरीच! हे अचानक से उभरा हुआ नेतृत्व कुठून आलं याचा विचार करत होतोच. जनतेचं समर्थन जोरात आहे असं सध्या तरी दिसतंय.
आज केजरी अचानक मोदीजींची स्वप्नं पूर्ण करु म्हणताना आश्चर्य वाटत च होतं. म्हटलं या महानुभावाला काय झालं? इकडे नॉन स्ट्राइकर ला जाऊन हार्दिक पटेल ला स्ट्राइक दिला गेलाय तर....!

बहुगुणी's picture

26 Aug 2015 - 3:26 am | बहुगुणी

IBN च्या बातमीत अखेरीस म्हंटलं होतं: Hardik is inspired by Delhi chief minister Arvind Kejriwal.

आणि हा एक फोटो ज्यामध्ये म्हणे कदाचित हार्दिक पटेल गुजरात भेटीत केजरीवालबरोबर त्यांचा चालक म्हणून गाडीत एकत्र आहे:
--

अहमदाबाद, सुरत, बडोदा येथील बर्‍याच विभागांत मोठ्या प्रमाणावर खाजगी वाहने आणि बसेस जाळपोळींना सुरूवात झाली आहे. उघड-उघड संघर्ष पोलीस आणि जनता (यात बरेचसे पाटीदार सामील आहेत असं दिसतं आहे) यांत होतांना दिसतो आहे.

आप / केजरीवाल यांचा पाठिंबा असो वा नसो, पण समाजाला आंदोलनासाठी प्रोत्साहित करू शकणारा, पण त्याच समाजाला हिंसेपासून मात्र नियंत्रित / परावृत्त करण्याची क्षमता नसणारा आणखी एक नेता जन्माला येतांना दिसतो आहे ही खेदाची गोष्ट आहे.

आप ला सिंगल आऊट करायचं कारण कळलं नाही. असेल तो हार्दीक पटेल आपचा समर्थक किंवा अगदी कार्यकर्ता देखील. मला एकदम डाव्या लोकांची भाषा आठवली. ते लोक पण असंच बोलतात - "अरे तो चक्क संघाचा माणूस आहे!!!" अरे?? संघाचा माणूस असणं काही गुन्हा आहे का? थोडक्यात जरी तुम्हाला (आणि मला देखील) केजरीवाल आणि आप आवडत नसली तरी आपचा माणूस असणे काही गुन्हा नाही. इन फॅक्ट भाजपविरोधी विचारसरणीचा मर्यादीत अवकाश बघता ते साहजिकच आहे.
दुसरा मुद्दा फुटीचे राजकारण करण्याचा तर ते कोण नाही करत (याचा अर्थ म्हणून आप ने ते करावे असा नाही). फारतर आप पण बाकी राजकीय पक्षांसारखीच निघाला असं म्हणता येईल. पण ते आधीच सिद्ध झाले नाहीये का?

फुटीचे राजकारण हे तर भारतीय लोकशाहीचे दुर्दैवी व्यवच्छेदक लक्षणच बनले आहे. 'धर्मनिरपेक्ष' काँग्रेसी पार्टी पण तेच करतात आणि 'जातीयवादी' भाजप वाले पण तेच करतात. जोपर्यंत समाज असल्या जातीय अस्मितांना बळी पडून यांना मते देत राहील तोपर्यंत हे पक्ष त्याचा फायदा उठवणारच. त्यात दोष या पक्षांपेक्षा जास्त समाजाचा आहे.

विकास's picture

26 Aug 2015 - 8:09 am | विकास

केजरीवाल आणि आप आवडत नसली तरी आपचा माणूस असणे काही गुन्हा नाही.

अजिबात गुन्हा नाही. मी देखील तसे म्हणत नाही. मात्र हे प्रकरण भडकवले जात असताना तो भडकवणारा आप समर्थक असला तर नक्कीच धुरामागे आग कुठली आहे असा प्रश्न पडतो. तोच येथे देखील पडत आहे.

फुटीचे राजकारण हे तर भारतीय लोकशाहीचे दुर्दैवी व्यवच्छेदक लक्षणच बनले आहे.

सहमतच. तसे करणार्‍या कुणाचेही समर्थन करू नये. मात्र जातीयवाद वर उफाळण्याचा प्रकार १९८०च्या दशकाच्या शेवटी व्हि पि सिंग यांनी केला आणि त्यानंतर त्याची चेन रिअ‍ॅक्शन चालू झाली. केजरीवाल हे विविध पद्धतीने व्हि पि सिंग यांची (अजून) बिघडवून वाढवलेली आवृत्ती आहे अशी अनेकदा काळजी वाटते. महाराष्ट्रात पण काही म्होरक्यांमुळे गेल्या काही वर्षात जातीयता वाढत गेली. त्याचे परीणाम शेवटी सगळ्यांणाच भोगायला लागणार हे वास्तव आहे... असो.

गुलाम's picture

26 Aug 2015 - 11:46 am | गुलाम

जातीयवाद वर उफाळण्याचा प्रकार १९८०च्या दशकाच्या शेवटी व्हि पि सिंग यांनी केला

भलेही आरक्षणाचा मुळ हेतु सामाजिक न्याय प्रस्थापित करणं असला तरी त्यामुळे एक प्रकारे जातीयवादाला प्रोत्साहन देखील मिळाले आहे, हे नाकारता येणार नाही. ही एक प्रकारची विसंगतीच म्हणावी लागेल. आणि त्या विसंगतीचा फायदा उठवणारे लोकही आपल्याकडे भरपुर आहेत.

पगला गजोधर's picture

26 Aug 2015 - 9:45 am | पगला गजोधर

त्याला पुरवणी म्हणून माझे मुद्दे
१. गुजरातेत विरोधी पक्ष अतिशय दुर्बल आहे गेली १५ वर्षे (माझ्या शेजारी भक्तगणातील ऐकला विचारूनच लिहितोय)
त्यामुळे त्यांचा या आंदोलनामागे हात आहे फे म्हणणे हास्यास्पद.
२. हार्दिक स्वतः बि जे पी आमदार आहे, त्याच्या मागे प्रवीण तोगाडिया व संजय जोशी आहेत असे ऐकण्यात आले.
प्रवीण तोगडिया म्हणजे दोन धर्मात तणाव निर्माण करणारे एक्स्पर्ट, वि हिं प नेते, आता सत्ता मिळाल्यामुळे नेतृत्वाला त्यांचा फारसा उपयोग नाही, त्यामुळे ते केंद्रीय पदावरील नेत्याला उपद्रव मुल्य दाखवत असावेत.
संजय जोशी हे संघाचे प्रचारक, व प्रचारकाची सर्व बंधने त्यामुळे त्यांना सार्वजनिक जीवनात अमलात आणणे बाध्य होते, पण त्यांचे गुजरातेतील पक्षांतर्गत एका नेत्याशी स्पर्धा होती, त्या नेत्याने संजयजी जोशी यांची एका महिलेबारोबरची बेडरूम मधली निर्वस्त्र अवस्थेतील पूर्ण कामक्रीडा सी डी वर स्टिंग करून जाहीर केल्यामुळे, ते पक्षात वाळीत टाकल्या सारखे मागे गेले, (त्यांना पूर्व महाराष्ट्रातील एक अवजड व वजनदार बि जे पी खासदाराने आपल्या पंखाखाली घेतले आहे सध्या)
३. महाराष्ट्रात मराठा आरक्षणामुळे काही पक्षांवर बि जे पी ने, त्यांना जातीयवादी म्हणून टीका केलेली, व काही धुडगूस घालणाऱ्या संघटनांशी असणाऱ्या संबधावर बोट ठेवले होते, पण आता त्यांच्याच राज्यात अशी चळवळ उभी राहिल्यामुळे, त्यांचा नाईलाज होत असावा म्हणून दुसरीकडे बोट दाखवण्यात येत असावे.
ऐक गोष्ट आता त्यानिम्मित्ताने सिद्ध होतेय जातीयवादी तर सर्वच पक्षात आहे,
अजून ऐक साम्य, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा व आरक्षण अश्या मुद्द्यावर सत्ता मिळवणे वा टिकवणे , तर तीथे पटेलांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा व आरक्षण अश्या मुद्द्यावर सत्ता मिळवणे वा टिकवणे, असे खेळ चालवले जात आहे.

*ही माझी वैयक्तिक मते आहेत.तुम्हाला पटेल न पटेल ….

हार्दिक स्वतः बि जे पी आमदार आहे

तो २२ वयाचा आहे असं ऐकलंय.

Article 84 (b) of Constitution of India provides that the minimum age for becoming a candidate for Lok Sabha election shall be 25 years. Similar provision exists for a candidate to the Legislative Assemblies vide Article 173 (b) of the Constitution read with Sec. 36 (2) of the R. P. Act, 1950.

पगला गजोधर's picture

26 Aug 2015 - 10:39 am | पगला गजोधर

मी हार्दिक पटेल बी जे पी आमदार असल्याच्या दावा केला तो चुकीचा असून, मला त्याचा अत्यंत खेद आहे.

रमेश आठवले's picture

26 Aug 2015 - 6:10 am | रमेश आठवले

१. ज्या कॉलेज विद्यार्थिनी बाबत चर्चा सुरु झाली आहे तिचे नाव आहे जसलीन कौर. तीने दिलील्या मुलाखतीवरून ती खरे सांगत आहे असे मला वाटले.
http://www.ndtv.com/video/player/news/woman-shames-abuser-on-social-medi...
२. गुजरात मधील पटेल समाज खूप संघटीत,धनवान आणि भाजपा समर्थक आहे. त्या समाजाला, एका होतकरू तरुणाला हाताशी धरून, एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र करून भाजपाचे स्थानिक सरकारच्या विरुद्ध उभे करण्या साठी लागणारी ताकद केजरीवाल मध्ये आज आहे असे मला वाटत नाही . गुजरात सरकार मध्ये इतर पटेल मंत्री आहेत. त्यांच्यातील एक तर अंबानी बंधूंचा जवळचा नातेवाईक आहे. राज्यात इतर ही मान्यवर पटेल नेते आहेत. त्यांच्या पैकी कोणीतरी, आनंदी बेन पटेल यांच्या मुख्य मंत्री पदाचा अभिलाषी असणारा, या आंदोलनाचा बोलविता धनी असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
३. मी पाहिलेल्या इतर फोटोतील हार्दिक पटेल कार मधील व्यक्ति पेक्षा जरा बुटका आहे आणि तो चष्मा लावत नाही. कारमधील केजरीवाल यांच्या जवळ बसलेली व्यक्ति कोण याची शहा निशा करावयास हवी.

विकास's picture

26 Aug 2015 - 7:56 am | विकास

विद्यार्थिनीच्या केस संदर्भात ही चित्रफीत बघा.

भाजपाचे स्थानिक सरकारच्या विरुद्ध उभे करण्या साठी लागणारी ताकद केजरीवाल मध्ये आज आहे असे मला वाटत नाही .

म्हणूनच हे प्यादे तयार केले आहे आणि ज्याने पब्लीकला भडकवता येईल असा मुद्दा तयार केला आहे असे म्हणायला जागा आहे.

कारमधील केजरीवाल यांच्या जवळ बसलेली व्यक्ति कोण याची शहा निशा करावयास हवी.

सहमत.

म्हणजे आप/केजरीवाल आंतरराष्ट्रीय राजकारणातलं प्यादं आहे असं म्हणताहात कि काय ?? ;)

गॅरी ट्रुमन's picture

26 Aug 2015 - 10:36 am | गॅरी ट्रुमन

ताकद केजरीवाल मध्ये आज आहे असे मला वाटत नाही

२०११ पूर्वी अण्णा हजारे हे नाव कोणी ऐकले होते का?तरी दिल्लीमध्ये हजारो लोक खेचलेच की त्यांनी आणि देशभरात लाखो लोक रस्त्यावर आणलेच की त्यांनी. अण्णांच्या उपोषण नामक तमाशामागचा ब्रेन केजरीवालच होता हे सर्वांनाच माहित आहे.वरकरणी ताकद नाही असे वाटू शकते पण आतून नक्की काय डाव हा गृहस्थ खेळेल हे सांगता येत नाही.

गॅरी ट्रुमन's picture

26 Aug 2015 - 10:38 am | गॅरी ट्रुमन

२०११ पूर्वी अण्णा हजारे हे नाव कोणी ऐकले होते का?

हे वाक्य "२०११ पूर्वी अण्णा हजारे हे नाव महाराष्ट्राबाहेर कोणी ऐकले होते का?" असे हवे.

रमेश आठवले's picture

26 Aug 2015 - 8:51 pm | रमेश आठवले

ही पटेलांची एवढी मोठी चळवळ फक्त ५५ दिवसात उभी करण्यात आली. त्या काळात केजरीवाल हे दिल्लीत केंद्र सरकार, भाजप आणि नायब राज्यपाल यांच्या विरुद्ध रोज नव्या काड्या करण्यात व्यस्त होते.दिल्ली विधान सभेचे अधिवेशन हि या काळात झाले. केजरीवाल स्वत: एवढ्यात गुजरात मध्ये गेले नाहित.
म्हणून मला असे वाटते कि या आंदोलनाचा बोलविता धनी कोणीतरी दुसरा आहे .
प्रवीण तोगडिया पटेल आहेत आणि न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने अतिक्रमण केलेली देवळे पाडली म्हणून ते मोदींच्या वेळे पासून नाराज आहेत.

विकास's picture

26 Aug 2015 - 9:17 pm | विकास

प्रवीण तोगडिया पटेल आहेत आणि न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने अतिक्रमण केलेली देवळे पाडली म्हणून ते मोदींच्या वेळे पासून नाराज आहेत.

ही शक्यता देखील नाकारता येत नाही. मात्र त्यातून तोगाडीयांना काही फायदा होईल असे वाटत नाही. एके हे कितीही दिल्लीत व्यस्त असले तरी ते चाणाक्ष व्यक्तिमत्व आहे. मात्र ज्या पद्धतीने ते त्याचा वापर करत आहेत त्यामुळे त्याला चाणाक्ष पेक्षा कावेबाज म्हणावे लागत आहे.

राजकारणात स्वपक्षिय आणि अगदी स्वतःला महत्व मिळवण्याची महत्वाकांक्षा ठेवली म्हणून बिघडत नाही. त्यांच्या implementation च्या पध्दती वेगळ्या असल्या म्हणून हरकत नाही. मात्र त्या ज्या काही आहेत त्या सुरवातीपासूनच मारक वाटत होत्या आता त्या अधिक मारक वाटत आहेत. आणि टोकाची महत्वाकांक्षा सोडल्यास या माणसाकडे काही नाही असे वाटू लागते.

असो.

रमेश आठवले's picture

26 Aug 2015 - 10:39 pm | रमेश आठवले

नुकतेच निवृत्त न्यायाधीश काटजू यांनी एके यांचे वर्णन Ingenious fraud असे केले आहे.

विकास's picture

26 Aug 2015 - 11:36 pm | विकास

नुकतेच निवृत्त न्यायाधीश काटजू यांनी एके यांचे वर्णन Ingenious fraud असे केले आहे.

एका अर्थी या त्यांच्या निरीक्षणाशी सहमत आहे. पण त्यांची आत्तापर्यंतची ए़कूणच सगळी वक्तव्ये बघता, त्यांच्याशी सहमती दाखवणे अवघड जात आहे. :( ;)

उगा काहितरीच's picture

26 Aug 2015 - 10:33 am | उगा काहितरीच

पूर्ण व्हिडीओ पाहिला.

यावर काहीच लिहिण्यासारखा नाही आणि लिहिणार नव्हतो पण हा धागा म्हणजे "काहीही हं श्री..." किताबास पात्र आहे नक्की .
<<<२०११ पूर्वी अण्णा हजारे हे नाव कोणी ऐकले होते का?>>>
धन्य आहे....!
<<<<अण्णांच्या उपोषण नामक तमाशामागचा ब्रेन केजरीवालच होता हे सर्वांनाच माहित आहे.>>>>
अजून धन्य आहे. भ्रष्टाचार विरोधी सूर लावून कोन्ग्रेस विरोधी वातावरण तापाव्ण्यास उत्सुक असलेल्या भाज्पियांनी सुरवातीला जवळीक साधायचा प्रयत्न केला होता हो पण ......हाय ....अण्णांनी जवळ फिरकू नाही दिले. मग वि के सिंग सारखी माणसे आंदोलनात उतरविली गेली.... किरण बेदींना मधाचे बोट दाखवले गेले V K सिंघ आणि किरण बेदी चे करविते, बोलाविते धनी कोण होते बरं?
..जन लोकपाल बिलाला पाठींबा देण्याच्या वेळी कोन्ग्रेस जवळची वाटली. आता पक्षाला RTI लागू करू नका म्हणून घोषा सुरु आहे अशी बातमी वाचली परवाच.

पैसा's picture

26 Aug 2015 - 10:55 pm | पैसा

स्वार्थासाठी हे कोणीही काहीही करू शकतात. :(

श्रीगुरुजी's picture

27 Aug 2015 - 12:22 am | श्रीगुरुजी

हार्दिक पटेलच्या आंदोलनामागे आआप आहे असे वाटत नाही. मुळात केजरीवाल किंवा आआपची दिल्लीबाहेरील ताकद नगण्य आहे. केजरीवालांचा हार्दिकला पाठिंबा असू शकेल, परंतु दिल्लीपासून बाहेर गुजरातमध्ये त्याच्यामागे इतकी प्रचंड जनता उभी करणे हे केजरीवालांच्या चहाचा कप नाही.

पण मग इतके मोठे आंदोलन उभे कसे राहिले असावे? गेल्या २-३ दशकांपासून गुजरातेतील पटेल समाज अस्वस्थ आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाचे जे प्राबल्य आहे तसेच पटेलांचे प्राबल्य गुजरातमध्ये सुरवातीपासून होते. १९८० च्या दशकात कॉंग्रेसच्या माधवसिंह सोळंकींनी पटेलांना बाजूला सारून खाम (क्षत्रिय + हरिजन + आदिवासी + मुस्लिम) यांची एकत्रित मोट बांधून पटेलांना राजकारणातून काहीसे हद्दपार केले. त्यानंतर १९९०-१९९४ या काळात चिमणभाई पटेल मुख्यमंत्री होते व नंतर १९९५ मध्ये केशुभाई पटेल मुख्यमंत्री झाल्यावर पुन्हा एकदा गुजरातच्या राजकारणात पटेलांचे वर्चस्व निर्माण झाले. १९९५ मध्ये शंकरसिंग वाघेलांनी बंड करून केशुभाईंना पायउतार होण्यास लावले परंतु १९९८ मध्ये पुन्हा एकदा बहुमत मिळवून केशुभाई पटेल मुख्यमंत्री झाले. परंतु २००१ च्या भूजच्या भुकंपानंतर केशुभाईंनी परिस्थिती नीट हाताळली नाही आणि त्यामुळे २-३ पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने केशुभाईंना हटवून त्या जागी मोदी आले. सलग साडेबारा वर्षे मुख्यमंत्री राहिल्यावर मोदी दिल्लीत गेले व त्यांच्या जागी आनंदीबाई पटेल मुख्यमंत्री झाल्या. त्या जरी पटेल असल्या तरी त्या मोदींच्याच छायेत सरकार चालवितात असे पटेलांना वाटते. एकंदरीत राजकारणात काहीशी पिछेहाट झाल्याने पटेल समाज फारसा आनंदी नाही. सध्या गुजरात मंत्रीमंडळात ७ पटेल आहेत व १८२ आमदारांमध्ये ४० पटेल आहेत. तरीसुद्धा राजकारणातील आपले प्राबल्य व दबदबा कमी झाल्याची पटेलांची समजूत झाली आहे. विशेषतः २००१ पासून पटेलांचा असंतोष वाढायला लागला आणि आता तो बाहेर येऊ लागला आहे.

आपल्याला सत्तेत पुरेसे स्थान नाही अशी पटेलांची समजूत झाली आहे. त्याचेच दृश्य स्वरूप म्हणजे हे आंदोलन आहे. सत्तेत आपला अधिकाधिक वाटा असावा व सर्व मोक्याची सत्तापदे आपल्याकडे असावीत या जाणिवेतून हे आंदोलन सुरू झाले आहे. राखीव जागा हे केवळ निमित्त आहे.

भविष्यात महाराष्ट्र कदाचित याचे दिशेने जाईल. २०१४ च्या निवडणुकीनंतर सत्ता गेल्याने मराठा समाज अस्वस्थ आहे. बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या पुरस्काराला विरोध हा त्यातूनच आलेला आहे. सत्ता हातातून गेलीच परंतु मुख्यमंत्रीपदी ब्राह्मण बसल्याने मराठा नेत्यांची चिडचिड होत आहे. त्यात भर म्हणून उच्च न्यायालयाने मराठा जातीला दिलेल्या राखीव जागांचा निर्णय रद्द केला. यापुढील काळात मराठा वि. ब्राह्मण हा संघर्ष अजून वाढण्याची शक्यता आहे. मनोहर जोशींप्रमाणेच फडणवीस देखील आपली ५ वर्षांची कारकीर्द पूर्ण करू शकणार नाहीत असा माझा अंदाज आहे. भविष्यात भाजपला त्यांच्या जागी एखादा मराठा आमदार आणावा लागेल. यदाकदाचित फडणविसांनी ५ वर्षे पूर्ण करून २०१९ मध्ये पुन्हा बहुमत मिळवून दुसर्‍यांदा मुख्यमंत्री झाले तर पटेलांप्रमाणेच मराठा समाज संघर्षासाठी रस्त्यावर उतरेल.

मोदींनी महाराष्ट्राप्रमाणेच हरयानात बिगरजाट व्यक्तीला मुख्यमंत्री केले तर झारखंडमध्ये बिगर आदिवासी व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी बसविले. या दोन्ही राज्यात कालांतराने जाट आणि आदिवासी नेत्यांचा असंतोष उफाळून वर येण्याची शक्यता आहे.

विकास's picture

27 Aug 2015 - 12:47 am | विकास

यदाकदाचित फडणविसांनी ५ वर्षे पूर्ण करून २०१९ मध्ये पुन्हा बहुमत मिळवून दुसर्‍यांदा मुख्यमंत्री झाले तर पटेलांप्रमाणेच मराठा समाज संघर्षासाठी रस्त्यावर उतरेल.

एव्हढा उशीर कशाला?

मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला येत्या १५ दिवसांत आरक्षण न मिळाल्यास राज्यात गुजरातप्रमाणेच जनक्षोभ उसळेल, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी दिला.

बाकी तुमच्या (आणि इतर काहींच्या) प्रतिसादातले तर्क मान्य आहे की, "परंतु दिल्लीपासून बाहेर गुजरातमध्ये त्याच्यामागे इतकी प्रचंड जनता उभी करणे हे केजरीवालांच्या चहाचा कप नाही." तसे मी म्हणलेले देखील नाही. म्हणूनच त्यांच्यासारखे अ‍ॅनार्कीस्ट हे बोलवते धनी होऊन प्रत्यक्षात नामानिराळे होतात. एकदा का प्रकरण हाताबाहेर गेले की मग जनतेचे तारणहार म्हणून स्वारी प्रत्यक्षात येईल. India Against Corruption ला अचानक एव्हढे यश कसे मिळू शकले? तसाच काहीसा हा प्रकार आहे, असे मला वाटते. फरक इतकाच, India Against Corruption चळवळीतल्या मागण्या व्यावहारीक वाटल्या नव्हत्या, पण तरी देखील त्या मान्य झाल्या असत्या तर फरक पडला नसता. पण येथे नुसते व्यावहारीकतेचा प्रश्न नाही सामाजीक ऐक्याचा प्रश्न आहे, म्हणून हे प्रकरण गंभीर आहे.

उगा काहितरीच's picture

27 Aug 2015 - 12:47 am | उगा काहितरीच

खरंच परिस्थिती वाईट आहे मग !

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Aug 2015 - 9:59 am | माईसाहेब कुरसूंदीकर

ह्या आंदोलनामागे केजरीवाल आहेत म्हणणार्या मंडळीना कोपरापासून नमस्कार आम्हा दोघांचा. सध्याच्या मुख्यमंत्री आनण्दीबेन प्रभावशून्य आहेत असे ऐकले आहे.त्यांना संकटात आणून आपले ईप्सित साध्य करायचे असा गुजरात भाजपामधील काहींचा डाव असावा असे ह्यांचे म्हणणे.

दत्ता जोशी's picture

27 Aug 2015 - 11:44 am | दत्ता जोशी

वन रेंक वन पेन्शन आंदोलनामागेपण केजारीवालाच आहेत. महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळ आणि नागपूरच्या पुरामागेही केजारीवालांचेच राजकारण आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी केजरीवालच प्रवृत्त करत आहेत.

श्रीगुरुजी's picture

28 Aug 2015 - 1:20 pm | श्रीगुरुजी

>>> दिल्लीत एका मुलीने एका मुलाविरोधात विनयभंगाची तक्रार केली आणि त्यावरून मोठा गदारोळ झाला,

झी वाले त्या मुलीच्या घरी गेले होते व तिला या प्रकरणाच्या साक्षीदाराच्या समोरासमोर येऊन बोलण्यास सांगितल्यावर तिने साक्षीदाराच्या समोर येण्यास नकार दिला. दरम्यान त्या मुलीचे कौतुक करणार्‍या सोनाक्षी सिन्हाने आता त्या तरूणाची माफी मागितली आहे.

पराचा कावळा करणे हे आआपवाल्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. यापूर्वी राखी बिडला, अलका लांबा, दिलीप पांडे आणि दस्तुरखुद्द केजरीवाल यांचा असाच खोटेपणा उघडकीला आला होता. याबाबतीतही तसेच होताना दिसतेय. रस्त्यात झालेली किरकोळ बाचाबाचीसाठी विनयभंगाचा आरोप करून त्या मुलीला नक्की काय मिळाले?

http://zeenews.india.com/news/videos/top-stories/sonakshi-sinha-apologiz...

गॅरी ट्रुमन's picture

28 Aug 2015 - 1:41 pm | गॅरी ट्रुमन

पराचा कावळा करणे हे आआपवाल्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

+१०००००.

या जसलीन कौरचे स्टेटस मी पण फेसबुकवर काही मिनिटांसाठी शेअर केले होते.कुतूहल म्हणून मी तिची फेसबुक भिंत पाहिली त्यावरून ती आआपवाली होती हे समजलेच. आआपवाले म्हटल्यावर खोटे बोलणे, रेटून बोलणे, पराचा कावळा करणे, राईचा पर्वत करणे इत्यादी इत्यादी सगळे आलेच.त्यामुळे ताबडतोब मी ते शेअर केलेले स्टेटस डिलीट केले.बाकी कोणावरही विश्वास ठेवता येईल पण आआपवाल्यांवर मला तरी विश्वास ठेवता येणारच नाही.

त्या रोहतकच्या दोन बहिणी, ही जसलीन कौर इत्यादी प्रकरणे स्त्रियांनाच हानी पोहोचवत आहेत हे त्यांना कळत नाही का? उद्या खरोखरच कोणी एखाद्या मुलीला/स्त्रीला त्रास देत असेल आणि त्याविरूध्द त्यांनी काही लिहिले तर त्यावर विश्वास ठेवला जायचे प्रमाण कमी होईल.अर्थात आआपवाल्यांना अशा गोष्टींची काही पडली असेल असे वाटत नाही.

अस्वस्थामा's picture

28 Aug 2015 - 3:02 pm | अस्वस्थामा

त्या रोहतकच्या दोन बहिणी, ही जसलीन कौर इत्यादी प्रकरणे स्त्रियांनाच हानी पोहोचवत आहेत हे त्यांना कळत नाही का? उद्या खरोखरच कोणी एखाद्या मुलीला/स्त्रीला त्रास देत असेल आणि त्याविरूध्द त्यांनी काही लिहिले तर त्यावर विश्वास ठेवला जायचे प्रमाण कमी होईल.

हे अगदी सहमत. आणि सर्वांनीच खासकरुन इतर मुलींनी/स्त्रियांनी याचा जोरदार निषेध करायला हवा असं वाटतं.

रमेश आठवले's picture

28 Aug 2015 - 9:22 pm | रमेश आठवले

मिडीया ट्रायल दोन्ही बाजूने झाली. आता पोलिस आणि कोर्ट काय म्हणतात हे पाहणे गरजेचे झाले आहे .

विकास's picture

28 Aug 2015 - 6:40 pm | विकास

केजरीवाल कसे सहज दिशाभूल करू शकतात (आणि माध्यमे मदत करतात) याचे एक उदाहरण. त्यांनी आज खालील ट्वीट केले...

त्यावर एनडीटिव्हीने खालील News alert प्रसारीत केला:

"Delhi's Aurangzeb Road to be named after former president APJ Abdul Kalam, tweets Chief Minister Arvind Kejriwal"

आता हे वाचून मला देखील वाटले की अरविंदरावांनी काहीतरी (भले पोटापाण्याचे नाही पण) काम केले. नंतर जेंव्हा मित्राने प्रतिप्रश्न विचारला तेंव्हा शोधायला लागलो आणि मग उत्तर मिळाले की हा निर्णय घेण्यात त्यांचा काही हातभार लागलेला नाही. पण अशा प्रकारे सगळ्यात पहील्यांदा ट्वीट केले की पब्लीकला वाटावे की त्यांनीच निर्णय घेतला. ते अधिक वाटण्यासाठी एनडीटिव्ही आहेच मदतीला.

असो.

नांदेडीअन's picture

28 Aug 2015 - 8:46 pm | नांदेडीअन

ट्विटमध्ये सरळ सरळ उल्लेख आहे NDMC चा.
मग क्रेडिट घेण्याचा प्रश्न येतोच कुठे ?

श्रीगुरुजी's picture

28 Aug 2015 - 11:25 pm | श्रीगुरुजी

तुम्हाला विकास यांचा प्रतिसाद समजलेला नाही.

नांदेडीअन's picture

28 Aug 2015 - 8:47 pm | नांदेडीअन

तो ड्रायव्हर म्हणून टाकलेला फोटो आप कार्यकर्ता रोहित पांडेचा आहे, हार्दिक पटेलचा नाही.

नांदेडीअन's picture

28 Aug 2015 - 8:47 pm | नांदेडीअन

गेल्या काही दिवसांत हार्दिक पटेलबद्दल आपण बरेच ऎकले आणि वाचले असेल.
याच घटनेशी संबंधित मी काही गोष्टी नोटिस केल्यात, त्या अशा....

१. हा हार्दिक पटेल त्याच्या रॅलीमध्ये लाखोंची गर्दी जमवतो आणि गुजरात सरकारला त्याचा काहीच पत्ता लागत नाही. (यावर विश्वास बसतो तुमचा ?)
२. लोकसभेच्या निकालाच्यावेळी याने याच्या फेसबुक प्रोफाईलवर लिहिले होते, "कॉंग्रेस का खेल खत्म, अब की बार हिंदुत्व की धाक ।"
३. हा हार्दिक पटेल स्वतःसोबत बंदूक ठेवून प्रवीण तोगडीया यांच्यासोबत फोटो काढून घेऊ शकतो.
४. हा हार्दिक पटेल भाजपाच्या एका राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊ शकतो.
५. या हार्दिक पटेलच्या फक्त दोन मागण्या आहेत, एक तर आम्हाला आरक्षण द्या, नाहीतर सगळ्यांचे आरक्षण काढून टाका. (दुसर्‍या मागणीमुळे दाल में कुछ काला है असे वाटत नाहीये तुम्हाला ?)
६. माझ्या वाचण्यात जेवढे आले आहे, त्यानुसार पाटीदार पटेल हा समाज मुळीच ‘मागासलेला’ नाहीये, उलट सगळ्यात संपन्न समाजापैकी एक आहे.
७. भक्तांच्या म्हणण्यानुसार गुजरात हे जगातले सगळ्यात विकसित राज्य आहे, पण त्याच राज्याच्या विकासाच्या फुग्याला हा टाचणी लावतोय.
८. त्याच्या रॅलीनंतर जी दगडफेक आणि जाळपोळ झाली, ती भारतातल्या कोणत्या पक्षाची मोडस ऑपरेंडी आहे हे सगळ्यांना माहित आहे.
९. स्वतः गुजरात पोलिस लोकांच्या गाड्यांची तोडफोड करत आहेत.

आता दहावा आणि शेवटचा, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा...

१०. वर लिहिलेले सगळे मुद्दे विसरून जा.
आता थोडे पाणी पिऊन या, त्यानंतर आम आदमी पार्टी आणि केजरीवालला मन भरून शिव्या घाला.
काय करणार, अच्छे दिनांचे फ्रस्ट्रेशन कुठेतरी काढावे लागेलच ना !

जव्हेरगंज's picture

28 Aug 2015 - 9:41 pm | जव्हेरगंज

आता दहावा आणि शेवटचा, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा...>>>>>>

हा हा हा ...

श्रीगुरुजी's picture

28 Aug 2015 - 11:24 pm | श्रीगुरुजी

१. हा हार्दिक पटेल त्याच्या रॅलीमध्ये लाखोंची गर्दी जमवतो आणि गुजरात सरकारला त्याचा काहीच पत्ता लागत नाही. (यावर विश्वास बसतो तुमचा ?)

गुजरात सरकारला त्याचा काहीच पत्ता नव्हता हे कोणी सांगितलं? केजरीवालांनी?

२. लोकसभेच्या निकालाच्यावेळी याने याच्या फेसबुक प्रोफाईलवर लिहिले होते, "कॉंग्रेस का खेल खत्म, अब की बार हिंदुत्व की धाक ।"

हे कोणी सांगितलं? केजरीवालांनी?

३. हा हार्दिक पटेल स्वतःसोबत बंदूक ठेवून प्रवीण तोगडीया यांच्यासोबत फोटो काढून घेऊ शकतो.

फोटो शेअर करा.

४. हा हार्दिक पटेल भाजपाच्या एका राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊ शकतो.

भाजपचे अनेक राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत (उदा. विनय सहस्त्रबुद्दे, श्याम जाजू). त्यांची कोणीही, कोठेही भेट घेऊ शकतो.

५. या हार्दिक पटेलच्या फक्त दोन मागण्या आहेत, एक तर आम्हाला आरक्षण द्या, नाहीतर सगळ्यांचे आरक्षण काढून टाका. (दुसर्‍या मागणीमुळे दाल में कुछ काला है असे वाटत नाहीये तुम्हाला ?)

नाही.

६. माझ्या वाचण्यात जेवढे आले आहे, त्यानुसार पाटीदार पटेल हा समाज मुळीच ‘मागासलेला’ नाहीये, उलट सगळ्यात संपन्न समाजापैकी एक आहे.

असेल.

७. भक्तांच्या म्हणण्यानुसार गुजरात हे जगातले सगळ्यात विकसित राज्य आहे, पण त्याच राज्याच्या विकासाच्या फुग्याला हा टाचणी लावतोय.

असे कोणीही म्हणत नाही. गुजरात हे जगातले सगळ्यात विकसित राज्य आहे असे दस्तुरखुद्द मोदीसुद्धा कधीही म्हणाले नव्हते. कधीतरी फेकाफेकी थांबवा. आआपचे समर्थन करायचे म्हणजे खोटे बोललेच पाहिजे का?

फक्त गुजरात नव्हे, तर कोणत्याही राज्यात कोणत्याही प्रकारचे आंदोलन झाले तरी त्या राज्याच्या विकासावर परीणाम होतोच.

८. त्याच्या रॅलीनंतर जी दगडफेक आणि जाळपोळ झाली, ती भारतातल्या कोणत्या पक्षाची मोडस ऑपरेंडी आहे हे सगळ्यांना माहित आहे.

बरोबर. ही मोड्यूस ऑपरेंडी आम आदमी पक्षाची आहे. गतवर्षी निवडणुक आयोगाने निवडणुका जाहीर करून आचारसंहिता लागू केल्यानंतर सुद्धा तुमचे केजरीवाल गुजरातमध्ये निवडणुक आयोगाची परवानगी नसताना सुद्धा रॅली काढायचा हट्ट धरून बसले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटकाव केल्यावर दिल्लीतील आशुतोष आआपच्या गुंडांची टोळी घेऊन व बरोबर दगडधोंडे व लाठ्याकाठ्या घेऊन दिल्लीतील भाजपच्या कार्यालयावर गेला आणि तिथे जाऊन त्यांनी भाजपच्या कार्यालयावर हल्ला चढवून दगडफेक करून लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली हे तुम्ही सोयिस्कररित्या विसरलेले दिसता.

९. स्वतः गुजरात पोलिस लोकांच्या गाड्यांची तोडफोड करत आहेत.

कधी आणि कोणाच्या आणि किती गाड्यांची तोडफोड केली?

१०. वर लिहिलेले सगळे मुद्दे विसरून जा.
आता थोडे पाणी पिऊन या, त्यानंतर आम आदमी पार्टी आणि केजरीवालला मन भरून शिव्या घाला.
काय करणार, अच्छे दिनांचे फ्रस्ट्रेशन कुठेतरी काढावे लागेलच ना !

आम्हाला अच्छे दिन किंवा इतर कशाचेही फ्रस्ट्रेशन नाही. फ्रस्ट्रेशन मोदीविरोधकांनाच आहे.

कपिलमुनी's picture

29 Aug 2015 - 12:10 am | कपिलमुनी

img

बाकी नेहमीचेच आहे. नवीन धागा का काढला असा प्रश्न पडलाय?

नाव आडनाव's picture

29 Aug 2015 - 9:23 am | नाव आडनाव

अजून एक फोटो (आणि बातमी)
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/balasaheb-thackeray-is-my-...

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2015 - 1:53 pm | श्रीगुरुजी

प्

रवीण तोगडिया यांच्यासोबत असलेल्या फोटोमध्ये विशेष काही नसल्याचं हार्दिक म्हणाला. 'तोगडियांशी माझं रक्ताचं नातं नाही. तोगडिया हेदेखील आमच्याप्रमाणंच समाजाच्या संरक्षणाचं काम करतात. त्यांची स्वत:ची अशी एक भूमिका आहे आणि त्यांची भेट घेण्यात गैर काहीच नाही,' असं तो म्हणाला. 'केजरीवालांशी तर मला काहीच घेणंदेणं नाही,' असं त्यानं स्पष्ट केलं. हार्दिकजवळ असलेल्या बंदुकीबाबत तो म्हणाला, 'माझ्याकडं बंदुकीचा परवाना आहे. गेल्या वर्षीच तो मला मिळाला. मी अनेकदा एकटाच फिरतो. कोणीही मदतीची हाक दिली की समाजाच्या रक्षणासाठी धावतो. त्यामुळं बंदूक ठेवावीच लागते.'

राजकीय पक्ष काढणार का, या प्रश्नावर हार्दिकनं नकारार्थी उत्तर दिलं. 'सरदार वल्लभभाई पटेल आणि बाळासाहेब ठाकरे हे माझा आदर्श आहेत. मात्र, राजकीय पक्ष स्थापन करण्याचा किंवा कोणत्याही राजकीय पक्षात जाण्याचा माझा विचार नाही. माझ्या हातात रिमोट कंट्रोल असताना त्याची गरज काय?,' असा सवाल त्यानं केला.

वरील विचार पुरेसे बोलके आहेत.

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2015 - 1:49 pm | श्रीगुरुजी

यातून काय सिद्ध होतंय?

कपिलमुनी's picture

29 Aug 2015 - 3:24 pm | कपिलमुनी

३. हा हार्दिक पटेल स्वतःसोबत बंदूक ठेवून प्रवीण तोगडीया यांच्यासोबत फोटो काढून घेऊ शकतो.

फोटो शेअर करा.

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2015 - 3:30 pm | श्रीगुरुजी

हो, पण त्यातून काय सिद्ध होतंय? किंवा काय सिद्ध करण्याचा प्रयत्न चाललाय?

कपिलमुनी's picture

29 Aug 2015 - 3:40 pm | कपिलमुनी

तो दिला

या सगळ्या आंदोलना मागचा बोलविता धनी वेगळाच आहे आणि अर्थातच तो धनी इतर कोणी नसून साक्षात अरविंद केजरीवाल आणि आप असावेत असेच यावरून दिसत आहे.

१-२ ट्वीट किंवा फोटोमुळे हार्दिक आणि केजरीवालचा संबंध जोडला जात आहे किंवा आंदोलनचा संबंध जोडला जात आहे ते चुकीचे आहे , हार्दिक पटेलचे सर्व विचारधारेच्या लोकोसोबत फोटो किंवा सोशल स्टेटस आहेत

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2015 - 3:44 pm | श्रीगुरुजी

मी हार्दिक आणि केजरीवालांचा संबंध कधीच जोडला नव्हता. माझ्या सर्वात पहिल्या प्रतिसादात देखील मी हेच म्हटले आहे. परंतु तुम्ही लिहिल्याप्रमाणे काही जण १-२ ट्विट किंवा फोटोंमुळे हार्दिक व भाजपचा संबंध जोडू पहात आहेत.

कपिलमुनी's picture

29 Aug 2015 - 3:57 pm | कपिलमुनी

आंदोलन आणि केजरीवालचा धागाकर्त्याने संबंध जोडला होता.
नंतर केजरीवाल म्हणजे घरचा कार्य म्हणून तुम्हीच सगळा अंगावर ओढलेत

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2015 - 5:58 pm | श्रीगुरुजी

मी काहीच अंगावर ओढून घेतलं नाही. केजरीवाल या आंदोलनामागे नसणार कारण गुजरातमध्ये त्यांची तेवढी ताकद नाही हे मी माझ्या पहिल्याच प्रतिसादात लिहिले होते. परंतु नंतर इथल्या एका अंध आआप भक्ताने लेख स्वत:च्या अंगावर ओढून घेऊन एक भलीमोठी यादी देऊन हार्दिक व भाजपचा नसलेला संबंध जोडण्याचा प्रयत्न केला.

अभिजित - १'s picture

28 Aug 2015 - 9:52 pm | अभिजित - १

कांदाधोरणात "पानिपत'!
- विजय गायकवाड - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2015 - 01:00 AM IST

मुंबई - कांद्याच्या महागाईची झळ गल्लीपासून दिल्लीपर्यंत बसत असली, तरी देशातील सर्वांत मोठा उत्पादक असलेल्या महाराष्ट्राचे दिल्लीसारख्या लहान राज्याने पानिपत केल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिलमध्ये कांदा संकटाची चाहूल लागलेल्या दिल्लीने महाराष्ट्रातून आगाऊ कांदा खरेदी केल्याने दिल्लीकर आजही कांद्याची "स्वस्ताई‘ अनुभवत आहेत

अवकाळी पाऊस आणि दुष्काळी संकटामुळे कांद्याचे यंदा वांदे होणार असल्याचे स्पष्ट संकेत अनेक संस्थांनी दिले होते. कांदा महागाईचा परिणाम भोगलेल्या दिल्ली सरकारला याची जाणीव वर्षाच्या सुरुवातीलाच झाली होती. त्यामुळे दिल्लीतील "लघु कृषक कृषि व्यापार संघ‘ (SFAC) या सरकारी संस्थेद्वारे एप्रिल- मेमध्ये महाराष्ट्रात येऊन कांदाखरेदी करण्यात आली. "एसएफएसी‘च्या खरेदीमुळे त्या वेळी प्रतिकिलो 16 रुपये असलेला भाव 21 रुपयांपर्यंत गेला. दिल्ली सरकारच्या या खरेदीचा लाभ राज्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही झाला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निर्देशावरून ही खरेदी झाल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे कांदा साठवणुकीची समस्या असलेल्या काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांदाचाळीच खरेदी करून अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. "गो फॉर फ्रेश‘ आणि एका शेतकरी उत्पादक कंपनीच्या सहकार्याने एप्रिल-मेमध्ये झालेली कांदाखरेदी अजूनही टप्प्याटप्प्याने दिल्लीकडे रवाना केली जात आहे.

महाराष्ट्र टाईम्स मधील या वृत्तानुसार अशी कांदा-खरेदी हा दिल्ली राज्य सरकारचा नाही तर केंद्र सरकारचा आदेश होता.

अभिजित - १'s picture

29 Aug 2015 - 4:45 pm | अभिजित - १

तुम्ही बातमी वाचली का लिंक मधली ? ती कांदा पावडर , सुकी पात या विषयी आहे. मी वर दिलेल्या बातमी तील कांदा खरेदीशी काहीही संबध नाही याचा.

श्रीगुरुजी's picture

28 Aug 2015 - 11:27 pm | श्रीगुरुजी

बादवे, अलिकडे केजरीवाल मफलर वापरताना दिसत नाहीत. खोकणेही बंद झालेले दिसते. परंतु बाकी सर्व गोष्टी पूर्वीच्या दुप्पट जोमाने सुरू आहेत.

डँबिस००७'s picture

28 Aug 2015 - 11:27 pm | डँबिस००७

१. <<<<गुजरात सरकारला त्याचा काहीच पत्ता लागत नाही >>>>>> हे तुम्हाला कोणी सांगीतल ?

२.<<<<<लोकसभेच्या निकालाच्यावेळी याने याच्या फेसबुक प्रोफाईलवर लिहिले होते, "कॉंग्रेस का खेल खत्म, अब की बार हिंदुत्व की धाक ।" >>>>>>> अजुनही हे फेस बुकवर असेलच मग स्क्रिन शॉट द्या !

३. <<<<<हा हार्दिक पटेल स्वतःसोबत बंदूक ठेवून प्रवीण तोगडीया यांच्यासोबत फोटो काढून घेऊ शकतो. >>>>>> काही पुरावा आहे ? का उगाच उचलली जीभ ..... ?

४. दुसर्‍या मागणीमुळे दाल में कुछ काला है असे वाटत नाहीये तुम्हाला ? ह्या मागणीत तुम्हाला च का दाल मे काला वाटत आहे ? आता पर्यंत आरक्षणाने समाजा चा किती फा यदा झालेला आहे ? पुरावा म्हणुन तुम्हाला लिंका मिळाल्या मग बघु |

५. <<<<<< त्याच्या रॅलीनंतर जी दगडफेक आणि जाळपोळ झाली, ती भारतातल्या कोणत्या पक्षाची मोडस ऑपरेंडी आहे हे सगळ्यांना माहित आहे. >>>>>> स्पष्ट लिहा की !! आआपची नाही अस पण लिहा! मग तुम्हाला पुरावे देऊच !

१०. तुमच प्रस्ट्रेशन तुम्ही कस काढत असता हे सर्वांना दिसतच असतय !!

श्रीगुरुजी's picture

28 Aug 2015 - 11:33 pm | श्रीगुरुजी

३. >>>>> काही पुरावा आहे ? का उगाच उचलली जीभ ..... ?

पुरावे? कसले पुरावे? आआपच्या नेत्यांच्या तोंडची वाक्ये म्हणजे ब्रह्मवाक्ये असतात. ते त्रिकाल सत्य असते. पुरावे-बिरावे असल्या फालतू गोष्टी मागू नका.

कपिलमुनी's picture

29 Aug 2015 - 12:28 am | कपिलमुनी

यामधे त्याने केजरीवालचा संबंध नहीये असे सांगितला आहे. पण नमो भक्तांना स्वतःला वाटेल तेच खरे असे वाटते.
त्यामुळे ते पुन्हा स्वत:ला हवे तेच ढोल वाजवणार

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2015 - 1:58 pm | श्रीगुरुजी

केजरीवालांचा आणि हार्दिक पटेलचा काही संबंध आहे असे फारच थोडे जण बोलत असावेत. मी सर्वात पहिल्या प्रतिसादात देखील केजरीवाल या आंदोलनामागे असतील असे वाटत नाही हेच लिहिले होते.

परंतु तुमच्या १० कलमी प्रतिसादात भाजप आणि पटेलचा संबंध आहे असे सूचित केले गेले आणि तेही पूर्ण खोटे आहे. १५ ऑगस्ट संचलनाच्या वेळी देखील केजरीवालांनी शाळकरी मुलांकडून स्वतःच्या नावाचे ढोल बडविले होते. त्यावर सर्व थरातून टीका झाल्यावर शीला दिक्षितांनी आणि नजीब जंग यांनी भूतकाळात असेच केले होते असे प्रसिद्ध करून स्वतःच्या चुकीवर पांघरूण घालायचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात अंतर्बाह्य खोटारडे असलेल्या केजरीवालांनी "भाजपचे नजीब जंग" असे धडधडीत लिहिले होते. त्यामुळे स्वतःला हवे ते ढोल कोण बडवत आहे हे स्पष्ट आहे.

कपिलमुनी's picture

29 Aug 2015 - 12:32 am | कपिलमुनी

हा व्हिडीओ तर नक्कीच बघण्यासारख आहे.

कपिलमुनी's picture

29 Aug 2015 - 12:34 am | कपिलमुनी
श्रीगुरुजी's picture

29 Aug 2015 - 2:00 pm | श्रीगुरुजी

लाखो नागरि़कांनी एकत्र येऊन दगडफेक, जाळपोळ सुरू केल्यावर पोलिसांनी काय करणे अपेक्षित होते?

कपिलमुनी's picture

29 Aug 2015 - 3:14 pm | कपिलमुनी

पोलिसांनी काय करणे अपेक्षित होते?

सोसायटीमध्ये घुसुन , रस्त्यावरच्या गाड्या फोडणे, खासगी व सार्वजनिक
मालमत्तेचा नुकसान करणे अपेक्षित आहे का ??

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2015 - 3:29 pm | श्रीगुरुजी

सोसायटीमध्ये घुसुन , रस्त्यावरच्या गाड्या फोडणे, खासगी व सार्वजनिक मालमत्तेचा नुकसान करणे हे पूर्ण चुकीचेच आहे. परंतु नक्की कोणत्या कारणामुळे पोलिस नेमके त्याच सोसायटीत का गेले हे समजणे आवश्यक आहे. ही चित्रफीत फक्त ४० सेकंदांची आहे. त्यामुळे पोलिस येण्यापूर्वी तिथे नक्की काय झाले होते त्याचा उलगडा होत नाही.

कपिलमुनी's picture

29 Aug 2015 - 3:49 pm | कपिलमुनी

सोसायटीमध्ये घुसुन , रस्त्यावरच्या गाड्या फोडणे, खासगी व सार्वजनिक मालमत्तेचा नुकसान करणे हे पूर्ण चुकीचेच आहे,

. त्यामुळे पोलिस येण्यापूर्वी तिथे नक्की काय झाले होते

काय झाले तर पोलीसांना सार्वजनिक ठिकाणी नासधूस करायचा परवाना मिळतो ?
पोलीसांनीच कायदा मोडलाय . याचा कोणत्याही परीस्थिती मध्ये याचा समर्थन होउ शकत नाही

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2015 - 5:54 pm | श्रीगुरुजी

ही चित्रफीत फक्त ४० सेकंदांची आहे. चित्रफीतीचे चित्रीकरण सुरू असताना कॅमेरा अत्यंत स्थिर आहे. त्यामुळे कॅमेरा अत्यंत व्यवस्थित अ‍ॅडजस्ट करून चित्रीकरण झाले आहे ते उघड आहे. या प्रसंगाच्या आधीचे आणि नंतरचे चित्रीकरण नक्कीच उपलब्ध असणार.

ही चित्रफीत नक्की या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच चित्रित करण्यात आली आहे का, ही चित्रफीत एखादी जुनी चित्रफीत तर नाही ना, ही चित्रफीत नक्की गुजरात पोलिसांचीच आहे का दुसर्‍या कोणत्या तरी राज्यातील जुनी चित्रफीत आहे हे स्पष्ट नाही. त्यासाठीच फक्त ४० सेकंदाचा तुकडा पाहून निष्कर्ष काढण्याआधी संपूर्ण चित्रीकरण बघून नंतरच निष्कर्ष काढता येतील.

अर्थात चित्रफीत कोणत्याही काळातील किंवा कोणत्याही राज्यातील असली तर पोलिसांकडून दिसलेली नासधून निषेधार्ह आहे

कपिलमुनी's picture

29 Aug 2015 - 12:43 am | कपिलमुनी

गुजरातमध्ये एवढा मोठा आंदोलन चालू आहे. १० हून जास्त लोका मेली आहेत . कित्येक जखमी आहे. शांतता राखण्यासाठी आर्मी बोलावली आहे, परंतु मिडीया कव्हरेज नाही. मिडिया शीना प्रकरण चघळत आहे. अचानक आंदोलनाच्या बातम्या गायब होउन एका मर्डर केसमागे पूर्ण मिडीया लागला .
केवढा मोठा योगायोग !

अर्धवटराव's picture

29 Aug 2015 - 3:11 am | अर्धवटराव

प्रकरण इतक्या उग्र पातळीवर पोचलं पण मेडीयात म्हणावी तशी दखल नाहि. एरवी आआप आणि भाजपामधे माशी जरी शिंकली तरी जीवाचे कान करुन ऐकणारे पत्रकार लोक्स आता निरुत्साह का दाखवत आहेत न कळे.

ई-सकाळमधली बातमी, द हिंदू चं संपादकीय अशा ठिकाणी आंदोलन हळू-हळू शांत होतं आहे आणि दबकत-दबकत का होईना पण निर-निराळ्या शहरांत स्थिती पूर्ववत होते आहे असं दिसतंय. तेंव्हा हे जर खरं असेल तर peace should get a chance. वातावरण निवळलं तर बरंच आहे, नाही तर हे लोण इतर राज्यांत पसरेल आणि देशाच्या एकात्मकतेची आणखी वाट लागेल. एकीकडे मिडिया फाटाफुटीला प्रोत्साहन देतात म्हणून आपणच आरोप करायचा, आणि त्यांनी तसं न करता राळ उडवणं शांततेसाठी थांबवलं की आपणच त्यांना दोष द्यायचा असं होऊ नये.

अर्धवटराव's picture

29 Aug 2015 - 4:20 am | अर्धवटराव

मीडीयाने उतावीळपणा दाखवला नाहि हि बाब कौतुकास्पद आहेच, पण हा त्यांच्या विवेकाचा दाखला आहे कि इतर जुगाड हा प्रश्न आहे. काहि का असेना, आग शांत होतेय हे महत्वाचं.

विकास's picture

29 Aug 2015 - 10:07 am | विकास

आता हार्दीक गुज्जर समाजाबरोबर एकत्रित आंदोलन करणार आहे असे म्हणत आहे. म्हणजे गुजरात नंतर राजस्थान. मग महाराष्ट्र? - अर्थात भाजपाची राज्ये. हा योगायोग असेल कदाचीत झालं. ;)

अर्धवटराव's picture

29 Aug 2015 - 10:18 am | अर्धवटराव

आमचे बारामतीकर काका यामागे नाहि हां.... पहिलेच सांगुन ठेवतो :)

अर्धवटराव's picture

29 Aug 2015 - 10:59 am | अर्धवटराव

अत्यंत विवेकनिष्ठ आंबेवाल्यांनी जो हार्दीक धुमाकुळ चालवला आहे त्याचं पटेल असं कौतुक करायला विसरु नका :)

कपिलमुनी's picture

29 Aug 2015 - 11:15 am | कपिलमुनी

भाजपाची राज्ये ?
गुज्जर आणि मराठा समाजाची मागणी जुनीच आहे, कॉंग्रेसची सत्ता असताना सुद्धा मागणी होतीच
फक्त या वेळेस या मागणीला गुजरातमध्मोये मोठा पाठिंबा मिळाला
गुज्जर पूर्वीपासुन तीव्र आंदोलन करत आहेत

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2015 - 2:35 pm | श्रीगुरुजी

आता हार्दीक गुज्जर समाजाबरोबर एकत्रित आंदोलन करणार आहे असे म्हणत आहे. म्हणजे गुजरात नंतर राजस्थान. मग महाराष्ट्र? - अर्थात भाजपाची राज्ये. हा योगायोग असेल कदाचीत झालं. ;)

हे आंदोलन यशस्वी होणार नाही हे पटेलांनी एव्हाना ओळखलं असेल. गेल्या काही वर्षात न्यायालयाने जाट, मुस्लिम, मराठा इ. दिलेल्या राखीव जागांचे निर्णय रद्द केले आहेत. त्यामुळे आपल्याला राखीव जागा दिल्या तर तोही निर्णय रद्द होईल हे ते ओळखून असतील. जर आंदोलन वाढले तर २००२ प्रमाणे संचारबंदी, दुकाने/व्यवसाय इ. बंद राहून आपल्यालाच फटका बसेल हे व्यापारी वृत्तीचे गुजराती नक्कीच ओळखून असतील.

मी याआधीच लिहिल्याप्रमाणे राखीव जागा हे वरवरचे निमित्त आहे. पटेलांचा राजकारणातला प्रभाव कमी झाला आहे हे मूळ कारण आहे. त्यामुळे हे आंदोलन काही दिवसातच बंद होईल.

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2015 - 2:01 pm | श्रीगुरुजी

>>> गुजरातमध्ये एवढा मोठा आंदोलन चालू आहे. १० हून जास्त लोका मेली आहेत . कित्येक जखमी आहे. शांतता राखण्यासाठी आर्मी बोलावली आहे, परंतु मिडीया कव्हरेज नाही.

त्या आंदोलनाचा जोर फक्त २ दिवस होता. त्यानंतर ते थंड झाले आहे.

नांदेडीअन's picture

29 Aug 2015 - 10:27 am | नांदेडीअन

माझ्या अगोदरच कपिलमुनी यांनी फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेले आहेत.
त्याबद्दल त्यांचे आभार.
पण अर्थातच भक्तांसाठी हे मॉर्फ वगैरे केलेले व्हिडिओ असतील, किंवा पटेल समाजातले काही लोक पोलिसांच्या वर्दीत येऊन स्वतःच्या गाड्यांची तोडफोड करत असतील.

असो,
मिपावर मी परमभक्तांच्या (‘भक्त’ ही जमात आता नामशेष झाली आहे.) नादी लागणार नाहीये हे दोन-तीन वेळा सांगून झाले आहे.
त्यातल्या त्यात श्री. गुरूजींसारख्या महान व्यक्तीच्या नादी तर मुळीच नाही लागणार मी.
मी अक्षरशः गुडघे टेकलेत त्यांच्यापुढे.

तरीही हार्दिक पटेलच्या फेसबुक प्रोफाईलवर जाऊन मी स्वतः घेतलेले स्क्रिनशॉट्स इथे शेअर करतो. (या धाग्यावर बरेच जण नि:पक्षपाती वाटले म्हणून.)


ज्यांना हे फोटो खोटे वाटत असतील, त्यांनी स्वतःचा थोडा वेळ खर्ची घालून हार्दिक पटेलच्या प्रोफाईलवर चक्कर मारून यावी.

गुजरात पोलिसांचे अजून काही व्हिडिओ.
https://www.youtube.com/watch?v=1j9XHorJdDc

https://www.youtube.com/watch?v=RmNmGgou4lE

https://www.youtube.com/watch?v=0NcAmgQmrv4

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2015 - 2:07 pm | श्रीगुरुजी

पण अर्थातच भक्तांसाठी हे मॉर्फ वगैरे केलेले व्हिडिओ असतील, किंवा पटेल समाजातले काही लोक पोलिसांच्या वर्दीत येऊन स्वतःच्या गाड्यांची तोडफोड करत असतील.

व्हिडिओ मॉर्फ करणे किंवा २-३ वेगवेगळ्या चित्रफिती तयार करून एक नवीन बनावट चित्रफीत तयार करणे या क्षेत्रात आआपला तोड नाही. काही दिवसांपूर्वीच तुम्ही दिलीप पांडेवर पोलिसांनी व्हॅन घालून त्याला मारण्याचा प्रयत्न केल्याची चित्रफीत टाकली होती. ती चित्रफीत बनावट असल्याचे मी दाखवून दिल्यावर तुम्ही कोणताही प्रतिवाद न करता त्या धाग्यावरून पलायन केले.

मिपावर मी परमभक्तांच्या (‘भक्त’ ही जमात आता नामशेष झाली आहे.) नादी लागणार नाहीये हे दोन-तीन वेळा सांगून झाले आहे.
त्यातल्या त्यात श्री. गुरूजींसारख्या महान व्यक्तीच्या नादी तर मुळीच नाही लागणार मी.
मी अक्षरशः गुडघे टेकलेत त्यांच्यापुढे.

तुमच्यासारख्या आंधळ्या आआपभक्तांनी आआप आणि केजरीवालांचा जो खोटा प्रचार चालविला आहे, तो मी सबळ पुराव्यानिशी खोडून काढतो आणि त्यामुळेच तुम्हाला गुडघे टेकायची वेळ येते.

तरीही हार्दिक पटेलच्या फेसबुक प्रोफाईलवर जाऊन मी स्वतः घेतलेले स्क्रिनशॉट्स इथे शेअर करतो. (या धाग्यावर बरेच जण नि:पक्षपाती वाटले म्हणून.)

त्या स्क्रीनशॉट्समधून काय सिद्ध होते किंवा काय निष्कर्ष निघतो तेही सांगा.

विकास's picture

30 Aug 2015 - 10:11 am | विकास

त्याचे चेपुचे पान पाहीले तर वरील पैकी एकच फोटो दिसतो जो त्याने कुठल्याही कॉमेंटविना ऑगस्ट २४ ला अपलोडकेला आहे असे दिसते... त्याचे प्रोफाईल बघायचा गेलो तर खालील अजून एक "इंटरेष्टीग" फोटो दिसला... ;)

Hardik

तसेच त्याच्या वॉलवर ऑगस्टच्या आधीचे काहीच का दिसत नाही ते कळले नाही....

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2015 - 2:23 pm | श्रीगुरुजी

गेल्या २-३ वर्षात आम आदमी पक्ष आणि त्यातील केजरीवाल, आशुतोष, संजय सिंग इ. नेते यांच्या संबंधित मी काही गोष्टी नोटिस केल्यात, त्या अशा....

१. या पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि अंधभक्त आयुष्यात कधी खरे बोलतात का?

२. या पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि अंधभक्तांना कोणत्याही पुराव्याशिवाय दुसर्‍यावर कायम खोटे आरोप का करावेसे वाटतात?

३. केजरीवाल आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांकडून स्वतःला जाहीररित्या चारचौघात थोबाडीत का मारून घेतात आणि स्वतःवर शाई का शिंपडून घेतात? असे झाल्यावर प्रत्येक वेळी ते भाजपवरच का आरोप करतात? या प्रकारामागे आआपचेच कार्यकर्ते होते हे प्रत्येकवेळी सिद्ध झाल्यावर आपण खोटे बोललो हे मान्य करून ते भाजपची माफी का मागत नाहीत?

४. दिल्ली विधानसभेत ७० पैकी तब्बल ६७ जागा मिळूनसुद्धा आआपचे सर्व नेते आणि कार्यकर्ते यांना नौटंकी करण्याची काय गरज आहे?

५. या पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि अंधभक्त नौटंकी करतच राहणार आहेत का? नौटंकी करणे कधीच थांबविणार नाहीत का?

६. राजस्थानमधील २७ एकर जमिनीचा मालक असलेल्या गजेंद्र सिंहला आआपच्या नेत्यांनी दिल्लीत बोलावून त्याला आत्महत्येला का प्रवृत्त केले? आआपमधील नक्की कोणत्या व्यक्तीने त्याच्या नावाने आत्महत्येची खोटी चिठ्ठी लिहिली होती? त्याला आत्महत्या करायला भाग पाडल्यावर, आआपच्या संजय सिंगांना, त्याच्या कुटुंबियांनी तोंड उघडू नये म्हणून बरोबर बाऊन्सर्सची टोळी घेऊन कुटुंबियांना धमकाविण्यास आआपमधील कोणत्या नेत्याने सांगितले होते? आपल्यामुळे एका व्यक्तीचा जीव गेला याची खंत आआपच्या नेत्यांना कधी वाटली का?

७. जनतेच्या पैशातून दरमहा लाखो रूपयांची वीज स्वतःच्या घरी वापरताना केजरीवालांना कधी खंत वाटते का?

८. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, मारूती भापकर इ. ना आआपच्या अधिवेशनात बाऊन्सर्सकरवी मारहाण करून का घालवून देण्यात आले? केजरीवालांना त्यांची भिती का वाटत होती?

९. भ्रष्टाचाराविरूद्ध टाहो फोडणारे केजरीवाल बिहारमध्ये महाभ्रष्टाचारी असलेल्या लालूच्या पक्षाच्या युतीला पाठिंबा देत आहेत. याबद्दल आआपचे अंधभक्त गप्प का?

आता दहावा आणि शेवटचा, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा...

१०. वर लिहिलेले सगळे मुद्दे विसरून जा.
आता थोडे पाणी पिऊन या, त्यानंतर आम आदमी पार्टी आणि केजरीवालांची मन भरून स्तुती करा. काय करणार, शेवटी आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते कारटे!

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2015 - 2:29 pm | श्रीगुरुजी

अंध आआपभक्त यावर कोणतेही उत्तर देणार नाहीत याची खात्री आहे. काही दिवस ते गायब होतील आणि नंतर परत येऊन आआपने तयार केलेल्या बनावट चित्रफिती आणि मॅनेज्ड खोट्या बातम्या इथे देणे सुरू करतील याची खात्री आहे.

कपिलमुनी's picture

29 Aug 2015 - 4:00 pm | कपिलमुनी

या प्रतिसादाचा आणि धाग्याचा काय संबंध आहे ?

नाव आडनाव's picture

29 Aug 2015 - 4:16 pm | नाव आडनाव

+१

तसंच वरच्या एका प्रतिसादात "यदाकदाचित फडणविसांनी ५ वर्षे पूर्ण करून २०१९ मध्ये पुन्हा बहुमत मिळवून दुसर्‍यांदा मुख्यमंत्री झाले तर पटेलांप्रमाणेच मराठा समाज संघर्षासाठी रस्त्यावर उतरेल." याचा ह्या धाग्याशी काय संबंध हे मला कळलं नाही. त्यांना उत्तर देणार्‍या विकास साहेबांनी जी लिंक दिली आहे त्यातली आंदोलनं ही आधीचं सरकार असतांना सुध्धा रस्त्यावरंच झालेली आहेत, त्यामुळे त्या आदोलनांचा आणि आताच्या मुख्यमंत्र्यांचा डायरेक्टली / ईनडायरेक्टली का संबंध जोडला हे ही नाही कळलं.

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2015 - 6:01 pm | श्रीगुरुजी

माझा सर्वात पहिला प्रतिसाद नीट वाचला तर संबंध समजेल.

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2015 - 6:00 pm | श्रीगुरुजी

पहिल्या प्रतिसादापासून शेवटपर्यंत सर्व प्रतिसाद वाचलेत तर संबंध समजेल.

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2015 - 2:49 pm | श्रीगुरुजी

http://timesofindia.indiatimes.com/city/ahmedabad/Anti-Modi-Hardik-backe...

Hardik Patel, convener of the Patidar Anamat Andolan Samiti (PAAS) who has emerged as the face of the Patels' demand for OBC status, has always claimed that he is not linked to any political party. However, sources say that it is apparent from Hardik's past political activities that he has been consistently opposed to Narendra Modi. In one of his tweets during the Lok Sabha polls of 2014 when he actively supported the AAP , Hardik had called Modi "the worst betrayer of the people."

Even his close friend, Chirag Patel, who is a key member of PAAS, was anti-Modi in his political stand earlier. He contested the 2012 assembly elections from Ghatlodiyaconstituency against Anandiben Patel as a candidate of former CM Keshubhai Patel's Gujarat Parivartan Party . Sources said Chirag had later joined AAP but Hardik claims that Chirag is currently in the BJP . During the 2014 Lok Sabha elections, Hardik had worked for AAP . In a tweet on March 26, 2014, he called Modi a `dhokebaj (betrayer)'. "Dhokebaj kone he vo sab ham Gujarat vale Jante he...Modi sabse bada dhokebaj hai."

Hardik declined to say anything on his AAP connections.

पुर्वी भारतात काहि घडल की त्यामागे "विदेशी ताकत का हाथ " असायचा.

आता मोदी किंवा केजरीवालचा हात असतो.*

*बोलणारा कुठल्या बाजुला आहे त्यावर ठरत.

केजरीवाल के पीछे विदेशी ताकद का हाथ है जो मोदी के लिये भी काम करती है

याला इथले केजरीवाल समर्थक उत्तर देतील का?

कपिल मिश्रा या तत्कालीन आप मंत्रीमंडळातील कायदेमंत्र्याने शीला दिक्षित यांच्यावर एफ आय आर दाखल करण्याची सुचना सुचवली. या छोट्याश्या "तपाचे फळ" काय? कायदे मंत्रालयातून तात्काळ उचलबांगडी... आता ते फकस्त दिल्ली नामक शहरी राज्याचा टूरीझमचा कारभार बघणार... आणि शीला दिक्षितांचे काय झाले? अर्थातच जैसे थे!

Tweet

अर्धवटराव's picture

1 Sep 2015 - 8:47 pm | अर्धवटराव

शीला मड्डमवर एफ.आय.आर. फाइल झालं हे क्रेडीत तरी द्यायचं कि नाहि आप ला?

श्रीगुरुजी's picture

1 Sep 2015 - 10:46 pm | श्रीगुरुजी

एफआयआर दाखल करावा अशी शिफारस कपिल मिश्रांनी केली आहे. परंतु शीला दिक्षितांवर अजून एफआयआर दाखल केलेला नाही.

अर्धवटराव's picture

2 Sep 2015 - 2:04 am | अर्धवटराव

बरेच दिवसानी केजरीसाहेबांचं कौतुक करायला एक मुद्दा मिळाला होता... त्यालाही टाचणी लागली :)

विकास's picture

2 Sep 2015 - 2:55 am | विकास

टाचणीचा संबंध नाही हो हा! फुगा प्रमाणाबाहेर गेल्यावर फुटणारच! ;)

नांदेडीअन's picture

2 Sep 2015 - 11:59 am | नांदेडीअन

लागली भाजपाची मंडळी कामाला.

कपिल मिश्रा यांनी ही चौकशी आणि FIR दाखल करण्याची सूचना दिल्ली जलमंडळाचे अध्यक्ष या नात्याने केली आहे, दिल्लीचे कायदा मंत्री या नात्याने नाही !
जर आम आदमी पार्टीला शीला दीक्षितचा बचाव करायचा असता, तर दिल्ली सरकारने कपिल मिश्रा यांची दिल्ली जल बोर्डावरून उचलबांगडी केली असती.
याउलट दिल्ली सरकारने त्यांना तिथेच ठेवून एक प्रकारे त्यांना पाठिंबाच दिला आहे.

मग प्रश्न उरतो की दिल्ली सरकारने कपिल मिश्रा यांच्याकडून कायदा मंत्रीपद का काढून घेतले ?
याबाबत दिल्ली सरकारकडून अजूनपर्यंत तरी काही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
पण Indian Express मध्ये आलेल्या एका बातमीनुसार, कपिल मिश्रा दिल्ली जल बोर्डामध्ये जितके तत्पर आणि कार्यक्षम आहेत, तेव्हढे लॉ मिनिस्ट्रीमध्ये नाहीयेत.
"It is learnt that complaints of the law department’s handling of government issues in the High Court had been conveyed to the upper echelons of the ruling AAP, including Kejriwal.
Senior officials said that complaints included non-appearance of government lawyers before HC benches and lack of information with the government lawyers due to non-briefing by concerned department officials."

हे झाले कपिल मिश्रांबद्दल.
आता शीला दीक्षित आणि आप सरकारमध्ये असलेल्या सख्यत्वाबद्दल बोलुयात.

मागच्या ४९ दिवसांच्या कार्यकाळामध्ये आप सरकारने शीला दीक्षित यांच्यावर FIR दाखल केली होती. (कॉमनवेल्थ खेळांच्या दरम्यान झालेल्या भ्रष्टाचारासाठी.)
पण त्यावेळी केंद्रात असलेल्या कॉंग्रेस सरकारने शीला दीक्षित यांना केरळच्या राज्यपाल बनवून त्यांना एकप्रकारे राजाश्रयच मिळवून दिला होता.
काही दिवसांनी केंद्रामध्ये भाजपाचे सरकार आले.
त्यांनी एका मागोमाग एक सगळीकडचे राज्यपाल बदलायला सुरूवात केली, पण शीला दीक्षित यांना काही राज्यपाल पदावरून काढले नाही. (दिल्लीच्या नजीब जंग यांनासुद्धा काढले नाही.)
यामागचे कारण तुम्हाला समजत नसेल, तर एकतर तुम्ही परमभक्त आहात किंवा फारच भोळे आहात.

या चौकशीची वाट लागल्यानंतर आम आदमी पार्टी वर्षभरानंतर परत सत्तेमध्ये आली.
यावेळी त्यांनी शीला दीक्षित यांच्या काळात झालेल्या CNG स्कॅमची चौकशी करायचे ठरवले.
या चौकशीच्या शेवटी शीला दीक्षित आणि त्यांचे त्यावेळचे अनेक सहकारी अडकण्याची शक्यता होती, पण केंद्रात असलेल्या भाजप सरकारने आम आदमी पार्टीने स्थापन केलेली ही चौकशी समितीच रद्द करून टाकली.
यामागचेसुद्धा कारण तुम्हाला समजत नसेल, तर तुम्ही एकतर परमभक्त आहात किंवा फारच भोळे आहात.

आता आपच्या श्री. कपिल मिश्रा यांनी दिल्ली जल बोर्डात झालेल्या ४०० करोडच्या वाटर टॅंक घोटाळ्यामध्ये शीला दीक्षित यांच्यावर FIR दाखल करण्याचे सुचवले आहे.
हे बघणे आता औत्सुक्याचे ठरेल की दिल्ली सरकार शीला दीक्षित यांच्यावर कधी FIR दाखल करते आणि केंद्रातील भाजप सरकार परत एकदा शीला दीक्षित यांना कसे वाचवते.

अवांतर :
आम आदमी पार्टीच्या दुर्दैवाने खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही यंत्रणा नाहीये.
आणि भाजपाच्या सुदैवाने खोटी माहिती लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी त्यांच्याकडे मीडिया आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे परमभक्तांची फौज आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

2 Sep 2015 - 1:30 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

बरी माहिती दिलीस रे नांदेडियना.गेल्या काही महिन्यात मिडियाच्या लोकांचे आम्हाला आश्चर्य वाटत आलेय.अनेक बातम्या,त्या सादर करण्याची स्टाईल राजकीय हेतुने प्रेरित असते.राजकीय मत जरूर असावे पण भाटगिरी करू नये असे ह्यांचे मत.

श्रीगुरुजी's picture

2 Sep 2015 - 1:44 pm | श्रीगुरुजी

मागच्या ४९ दिवसांच्या कार्यकाळामध्ये आप सरकारने शीला दीक्षित यांच्यावर FIR दाखल केली होती. (कॉमनवेल्थ खेळांच्या दरम्यान झालेल्या भ्रष्टाचारासाठी.)
पण त्यावेळी केंद्रात असलेल्या कॉंग्रेस सरकारने शीला दीक्षित यांना केरळच्या राज्यपाल बनवून त्यांना एकप्रकारे राजाश्रयच मिळवून दिला होता.
काही दिवसांनी केंद्रामध्ये भाजपाचे सरकार आले.
त्यांनी एका मागोमाग एक सगळीकडचे राज्यपाल बदलायला सुरूवात केली,

मोदी पंतप्रधान झाले त्यावेळी भारतात अंदाजे ३० वेगवेगळ्या राज्यात राज्यपाल होते. मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यापैकी काही जणांनी स्वत:हून राजीनामा दिला तर काही जणांची बदली केल्यावर बदली केलेले राज्य न आवडल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. ३० राज्यपालांपैकी एकूण १० पेक्षा कमी राज्यपालांनी वरील २ पैकी एका कारणामुळे पद सोडले. मोदींनी एकाही राज्यपालाला स्वतहून काढलेले नाही. २० हून अधिक राज्यांचे राज्यपाल बदलले गेले नाहीत. त्यात जसे नजीब जंग आहेत तसेच त्रिपुराचे राज्यपाल डी. वाय. पाटिलही आहेत. जर मोदींना राज्यपाल बदलायचे असते तर त्यांनी सर्व ३० राज्यांचे राज्यपाल बदलले असते. मोदींना अत्यंत त्रस्त करणार्‍या गुजरातच्या राज्यपाल कमला बेनिवाल यांची सुद्धा मोदींनी हकालपट्टी केली नव्हती. त्यांची बदली मिझोरामच्या राज्यपालपदी केल्यावर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला.

तस्मात मोदींनी एका मागोमाग एक सगळीकडचे राज्यपाल बदलायला सुरूवात केली हा आरोप इतर सर्व आरोपांप्रमाणे धडधडीत खोटा आहे.

पण शीला दीक्षित यांना काही राज्यपाल पदावरून काढले नाही. (दिल्लीच्या नजीब जंग यांनासुद्धा काढले नाही.)
यामागचे कारण तुम्हाला समजत नसेल, तर एकतर तुम्ही परमभक्त आहात किंवा फारच भोळे आहात.

नांदेडिअन किंवा आआपचे अंधभक्त कधी खरे बोलतील ही अपेक्षाच नाही. जरा २६ ऑगस्ट २०१४ ची खालील बातमी वाचा.

http://indianexpress.com/article/india/india-others/modi-government-fina...

या बातमीप्रमाणे

Yet another UPA appointed Governor Sheila Dikshit resigned today as the Narendra Modi government named former Uttar Pradesh Chief Minister Kalyan Singh as the nominee for Rajasthan along with three others for Maharashtra, Karnataka and Goa.

Appointed in March on the eve of Lok Sabha elections, Sheila Dikhsit, who has been facing pressure, quit the post as Kerala Governor after her meeting with President Pranab Mukherjee and Home Minister yesterday.

केरळच्या राज्यपालपदावरून शीला दिक्षितांनी खूप पूर्वीच स्वतःहून राजीनामा दिलेला होता. त्यांच्यानंतर त्यांच्या जागी ५ सप्टेंबर २०१४ या दिवशी माजी न्यायाधीश पी. सथासिवम यांची केरळच्या राज्यपालपदी नेमणूक झाली. त्यांच्याविषयी अधिकृत माहिती खालील धाग्यावर आहे.

http://www.rajbhavan.kerala.gov.in/

शीला दिक्षितांनी स्वतःहून केरळ राज्याचा राजीनामा ऑगस्ट २०१४ मध्येच दिलेला असताना मोदी सरकारने शीला दिक्षित यांना राज्यपालपदावर कायम ठेवले (म्हणजे त्यांच्या भ्रष्टाचाराला संरक्षण दिले) असा धडधडीत खोटा आरोप नांदेडिअन यांनी केला आहे.

यावेळी त्यांनी शीला दीक्षित यांच्या काळात झालेल्या CNG स्कॅमची चौकशी करायचे ठरवले.
या चौकशीच्या शेवटी शीला दीक्षित आणि त्यांचे त्यावेळचे अनेक सहकारी अडकण्याची शक्यता होती, पण केंद्रात असलेल्या भाजप सरकारने आम आदमी पार्टीने स्थापन केलेली ही चौकशी समितीच रद्द करून टाकली.
यामागचेसुद्धा कारण तुम्हाला समजत नसेल, तर तुम्ही एकतर परमभक्त आहात किंवा फारच भोळे आहात.

चौकशी समिती रद्द केली कारण अशी समिती नेमणे हे दिल्ली सरकारच्या अधिकारात येत नाही.

"It has been clarified that the GNCTD (Government of NCT of Delhi) is not the competent authority to set up such an inquiry under various provisions of the Constitution and the Commissions of Inquiry Act, 1952. The notification issued by the GNCTD has therefore been declared legally invalid and void ab initio,"

स्वतःची घटनात्मक अधिकारकक्षा ओलांडणे हे केजरीवाल पहिल्या दिवसापासून करीत आले आहेत. कोणतेही नियम, कायदे, घटना याची पर्वा न करता मनाला येईल तसे वागणे आणि या वागण्यावर कोणी कायदेशीर आक्षेप घेतला तर तो भ्रष्टाचारी, भ्रष्टाचार्‍यांना पाठिंबा देणारा आहे असा कांगावा करून स्वतःची पाठ थोपटून घेणे हे केजरीवालांचे सुरवातीपासूनचे धोरण राहिले आहे. दिल्ली सरकारला अशी चौकशी समिती नेमायचे कायदेशीर व घटनात्मक अधिकार नाहीत हे माहित असूनसुद्धा त्यांनी मुद्दामच अशी समिती नेमली कारण ही समिती बेकायदेशीर आहे हे त्यांना माहित होते व अशी समिती नेमल्यावर ती रद्द होईल व त्यामुळे शीला दिक्षितांचा बचाव करता येईल हे त्यांनी ओळखले होते. म्हणून मुद्दाम हा खटाटोप त्यांनी केला.

शीला दिक्षितांचा सहभाग असलेल्या सीएनजी घोटाळ्याची चौकशी यापूर्वीच अ‍ॅंटी करप्शन ब्यूरोने सुरू केली आहे. असे असताना त्याला समांतर अशी दुसरी चौकशी समिती नेमणे हे बेकायदेशीर आहे हे माहिती असूनसुद्धा शीला दिक्षितांना वाचविण्यासाठी त्यांनी ही समिती नेमण्याचा उद्योग केला आणि समिती रद्द झाल्यावर खापर भाजपवर फोडले.

आता आपच्या श्री. कपिल मिश्रा यांनी दिल्ली जल बोर्डात झालेल्या ४०० करोडच्या वाटर टॅंक घोटाळ्यामध्ये शीला दीक्षित यांच्यावर FIR दाखल करण्याचे सुचवले आहे.
हे बघणे आता औत्सुक्याचे ठरेल की दिल्ली सरकार शीला दीक्षित यांच्यावर कधी FIR दाखल करते आणि केंद्रातील भाजप सरकार परत एकदा शीला दीक्षित यांना कसे वाचवते.

केजरीवाल आजतगायत शीला दिक्षितांना वाचविण्यात यशस्वी झाले आहे. अजून किती काळ ते त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालू शकतील हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. आम आदमी पक्ष हा काँग्रेसचाच 'ब' संघ असल्याने केजरीवाल कॉन्ग्रेसमधील भ्रष्ट नेत्यांना वाचविण्यास पराकोटीचे प्रयत्न करणार हे नक्की.

अवांतर :
आम आदमी पार्टीच्या दुर्दैवाने खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही यंत्रणा नाहीये.
आणि भाजपाच्या सुदैवाने खोटी माहिती लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी त्यांच्याकडे मीडिया आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे परमभक्तांची फौज आहे.

पुन्हा एक असत्य. दिल्ली सरकारने केजरीवालांचा उदोउदो करणार्‍या जाहिरातबाजीसाठी तब्बल ५२६ कोटी रूपये बाजूला काढून ठेवले आहेत. दिल्लीत रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी रस्ते विभागाकडे निधीची चणचण आहे. परंतु जाहिरातबाजीसाठी अब्जावधी रूपये आहेत.

त्याच बरोबरीने आआपची टिमकी वाजविण्यासाठी आणि भाजपवर धडधडीत खोटे आरोप करण्यासाठी सोशल मिडियावर नांडेदिअन यांच्यासारखे आआपचे अंधभक्त आहेतच.

_______________________________________________________________________________

नांदेडिअन यांच्या प्रतिसादातील खोटेपणा मी पुराव्यानिशी वर मांडला आहे. यावर ते उत्तर देतील ही अपेक्षाच नाही. यापूर्वी प्रत्येकवेळी त्यांच्या प्रत्येक प्रतिसादातला खोटेपणा मी पुराव्यानिशी दाखवून दिला आहे. परंतु आजतगायत त्यांनी आपल्या खोटेपणाची कबुली दिलेली नाही.

श्रीगुरुजी's picture

2 Sep 2015 - 2:02 pm | श्रीगुरुजी

खालील धाग्यावर भारतातील सध्या पदावर असलेल्या राज्यपालांची नावे आहेत. ते नक्की कोणत्या दिवसापासून राज्यपालपदावर आहेत हे देखील दिलेले आहे.

https://en.wikipedia.org/wiki/List_of_current_Indian_governors

त्यानुसार, ओदी पंतप्रधान झाल्यावर २९ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेशांपैकी, एकूण १२ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवीन राज्यपाल आले. काही राज्यपालांकडे एकापेक्षा अधिक राज्याची जबाबदारी आहे. त्यांमुळे मूळच्या ३६ राज्यपालांपैकी प्रत्यक्षात ११-१२ राज्यपालच नवीन आहेत.

कॉन्ग्रेसने राज्यपालपदी नेमलेले स्वतःचे नेते के. रोशय्या, एस सी जमीर, डी वाय पाटील, राम नरेश यादव, श्रीनिवास पाटिल असे अनेकजण अजून पदावर आहेत. काही राज्यात २००८ व २००९ पासून पदावर असलेले राज्यपाल अजूनही पदावर आहेत.

मोदींनी सत्तेवर आल्यावर राज्यपाल बदलायचा सपाटा लावला हा आरोप अर्थातच खोटा आहे.

गॅरी ट्रुमन's picture

2 Sep 2015 - 3:42 pm | गॅरी ट्रुमन

अर्थातच दणकून सहमत आहे.केजरूच्या गुलामांची अशीच पिसे काढायला हवीत.

त्यात जसे नजीब जंग आहेत तसेच त्रिपुराचे राज्यपाल डी. वाय. पाटिलही आहेत.

आणि तसेच तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून के.रोसय्याही आहेत. हे २००९ ते २०११ या काळात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर ७-८ महिन्यांपर्यंत शिवराज पाटीलही पंजाबचे राज्यपाल होते.

श्रीगुरुजी's picture

3 Sep 2015 - 2:30 pm | श्रीगुरुजी

हे बघणे आता औत्सुक्याचे ठरेल की दिल्ली सरकार शीला दीक्षित यांच्यावर कधी FIR दाखल करते आणि केंद्रातील भाजप सरकार परत एकदा शीला दीक्षित यांना कसे वाचवते.

https://www.youtube.com/watch?v=dKYrwp0qly4#t=156

वरील चित्रफीत पहा. १४ नोव्हेंबर २०१३ रोजी दिल्ली विधानसभेच्या निवडणुक प्रचारात केलेले हे केजरीवालांचे भाषण आहे. या भाषणात त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे शीला दिक्षितांच्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या आयोजनातील भ्रष्टाचाराचे ३७० पानांचे पुरावे आहेत. नोव्हेंबर २०१० मध्ये त्यांनी हे पुरावे पोलिसांकडे देऊन शीला दिक्षितांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. आपल्या वरील भाषणात शीला दिक्षितांच्या भ्रष्टाचाराची मोठी यादी केजरीवालांनी वाचून दाखविली आणि शीला दिक्षितांना आपण अजिबात सोडणार नाही असे सूचित केले होते.

परंतु यानंतरचा हा यू टर्न - http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/Give-proof-of-graft-agains...

२९ डिसेंबर २०१३ या दिवशी याच भ्रष्ट कॉन्ग्रेसचा पाठिंबा घेऊन केजरीवाल मुख्यमंत्रीपदावर आरूढ झाले. नंतर लगेच ६ जानेवारी २०१४ रोजी त्यांना शीला दिक्षितांच्या भ्रष्टाचाराविषयी विचारले असताना त्यांनी खालील उत्तर दिले.

Responding to charges by BJP leader that AAP was not taking action against Dikshit, Kejriwal said: "I have asked him (Harsh Vardhan) to provide evidence and I will take action. We will not spare anyone involved in corruption.

स्वतःकडे ३७० पानी पुरावे असताना कृती करायची सोडून हे हर्षवर्धनांनी शीला दिक्षितांविरूद्ध पुरावे द्यावेत आणि नंतरच आपण कारवाई करू असा केजरीवालांनी यूटर्न घेतला.

सीएनजी घोटाळ्याबद्दल हेच होणार आहे.

महाराष्ट्रात जेव्हा जलसंधारण कामात पवार, तटकरे इ. विरूद्ध भ्रष्टाचाराचे जोरदार आरोप झाले तेव्हा विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी आणि पवार, तटकरे इ. ना क्लीन चिट देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक स्वतःची चौकशी समिती नेमली आणि नंतर त्या समितीने "या प्रकरणात अजिबात भ्रष्टाचार झाला नाही" असा निष्कर्ष काढून पवार, तटकरे इ. क्लीन चिट दिली.

सीएनजी घोटाळ्याबद्दल केजरीवालांनी हीच युक्ती केली. आपण भ्रष्टाचाराविरूद्ध लढत आहोत हे दाखविण्यासाठी आणि आपल्याच पक्षाच्या शीला दिक्षितांना क्लीन चिट देऊन त्यातून वाचविण्यासाठी त्यांनी चौकशी समिती नेमायचे ठरविले. या चौकशी समितीकडून थातुरमातुर चौकशीचे नाटक करून शीला दिक्षित या निर्दोष आहेत असा रिपोर्ट देऊन त्यांना वाचवायचे अशी त्यांची योजना होती.

त्यांच्या आणि शीला दिक्षितांच्या दुर्दैवाने केंद्र सरकारने वेळीच त्यांचा प्लॅन ओळखून समिती रद्द करून टाकली व आपल्या पक्षाच्या शीला दिक्षितांचा चौकशी समितीच्या माध्यमातून बचाव करण्याची केजरीवालांची योजना धुळीला मिळाली.

आपल्याच पक्षाच्या शीला दिक्षित यांना भ्रष्टाचाराच्या खटल्यातून वाचविण्यात केजरीवाल आजवर यशस्वी झाले आहेत. हे बघणे आता औत्सुक्याचे ठरेल की दिल्ली सरकार आणि केजरीवाल परत एकदा शीला दीक्षित यांना वाचविण्याची कोणती नवीन योजना बनविते.

होबासराव's picture

2 Sep 2015 - 1:57 pm | होबासराव

=:))

होबासराव's picture

2 Sep 2015 - 2:44 pm | होबासराव

5 Convicted in 2010 Commonwealth Scam
Breaking News: 5 Convicted in 2010 Commonwealth Scam

Delhi court convicts five in 2010 Commonwealth Scam

श्रीगुरुजी's picture

2 Sep 2015 - 2:48 pm | श्रीगुरुजी

न्यायालयाला ५ नसून ६ जण दोषी आढळले आहेत.

http://indianexpress.com/article/cities/delhi/first-conviction-in-cwg-sc...

श्रीगुरुजी's picture

2 Sep 2015 - 3:07 pm | श्रीगुरुजी

सादरीकरण करताना गायिका शिल्पा राव.

येत्या ११ सप्टेंबर रोजी दिल्ली विद्यापीठात निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर 'आम आदमी'कडून या 'रॉक शो'चे आयोजन करण्यात आले होते. दस्तुरखुद्द केजरीवालांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा आणि मजा वाढविली.

३-४ दिवसांपूर्वी बिहारमध्ये राजद-संजद-कॉंग्रेस-सपा या महायुतीची सभा आयोजिली होती. त्या सभेत सोनिया गांधी, लालू, नितीश इ. नी भाषणे केली. त्या सभेसाठी गर्दी जमविण्यासाठी सभेपूर्वी बारबालांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.

या कॉन्सर्टचा एक वृत्तांत -

http://www.dnaindia.com/india/report-aap-promises-1-lakh-jobs-free-wi-fi...

अजूनही खोटी आश्वासने देणे सुरूच आहे.

Higher education loan scheme, one lakh jobs within a year and free wi-fi in colleges were among the promises made by Chief Minister Arvind Kejriwal to students of poll-bound Delhi University on a star-studded event organised by AAP's students' wing on Tuesday.

खोटे दावे अजूनही सुरूच आहेत.

In his speech, Kejriwal also pitched for "clean student politics" saying that Delhi University was besetted with corruption. The AAP government has reduced corruption in Delhi by over 70 per cent in six months, he said.

कलाकारांनी आपली कला सादर करूनसुद्धा केजरीवालांच्या उपस्थितीत त्यांना कार्यक्रम सादरीकरणाचे पैसे मागण्याची हिंमत नाही असे सिसोदियांनी अभिमानाने सांगितले.

In a bid to offset criticism over expenditure incurred for the marquee event, Sisodia emphasised that the artistes had not taken money for performing.

"No one has been paid. Who can dare take money in front of Arvind Kejriwal in any case?" he quipped.

हेचि फल काय मम तपाला!

Kejriwal said bringing DU among the top 100 universities of the world was an imperative and stressed that an AAP-backed students' body would ensure that. "We are a party of the youth." However, the crowd had considerably thinned by the time Kejriwal rose to speak at the fag end of the event, officially publicised as freshers' rock concert 'DU rocks'.

श्रीगुरुजी's picture

12 Sep 2015 - 1:02 pm | श्रीगुरुजी

अरेरे! हे काय झालं!!

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत सर्व चार जागांवर अभाविपचे उमेदवार विजयी झाले. काँग्रेसप्रणित एनएसयूआय चे उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर राहिले आणि आआपच्या छात्र युवा संघर्ष समिती या विद्यार्थी संघटनेचे उमेदवार तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले.

एकंदरीत आआपने दिलेल्या 'एका वर्षात एक लाख नोकर्‍या देणार', 'महाविद्यालयात मोफत वायफाय देणार' इ. खोट्या आश्वासनांना आणि विद्यार्थ्यांना भुलविण्यासाठी आआपने आयोजित केलेल्या रॉक शो ला विद्यार्थी फसलेले दिसत नाहीत. २१ व्या शतकातील अवतारी महापुरूष श्री. रा. रा. केजरीवाल आपल्या संघटनेच्या उमेदवारांसाठी प्रचार करायला गेले होते. परंतु विद्यार्थ्यांचा त्यांच्या थापेबाजीवर विश्वास बसलेला दिसत नाही.

डँबिस००७'s picture

3 Sep 2015 - 10:57 pm | डँबिस००७

गुरुजी,

आपले चरण कमल कुठे आहेत,

आहो त्या मायबोलीवर सुद्धा येऊन तिथल्या 'आपटार्ड'लोकांपासुन सामान्य जनांची सुटका कराच !

विकास's picture

3 Sep 2015 - 11:02 pm | विकास

आपले चरण कमल कुठे आहेत,

यात "कमल" हा शब्द योगायोगाने आला आहे का? ;)

(ह.घ्या)

प्यारे१'s picture

12 Sep 2015 - 1:13 pm | प्यारे१

धाग्याचं शतक झाल्याबद्दल

विकासरावांना पट्ट्याच्या पितळी बक्कलला चमक येण्यासाठी पॉलिश आणि तांब्याचं बिगुल (अर्ध्या किंमतीत),
श्रीगुरुजींना बंच ऑफ थॉट्स च्या नवी आवृत्ती च्या १० प्रति
(तुमच्या भेटीला येणारांना वाटण्यासाठी. तुमचंच लिखाण तुम्हीच वाचा)
नांदेडीयनना ट्विट्टरचं नवं अकाऊंट उघडण्यासाठी नेट कॅफे चा मासिक पास.
कपिलमुनी आणि माईसाहेबांना अनुक्रमे 'मी कपिल' आणि 'मीच ह्यांची लाडकी' असं लिहीलेल्या टोप्या देऊन

सत्कार करण्यात येत आहे.

- अखिलमिपाझालंशतककीकरसत्कारसमितीसचिव

नाखु's picture

12 Sep 2015 - 1:43 pm | नाखु

तरीच जेप्या म्हणत होता "आज मी निवांत आहे म्हणून"

कृपया "माई" टोपी वर नाव पूर्ण लिहिणे संक्षीप्त नको "घोळ" होईल.

-अखिलमिपाझालंशतककीकरसत्कारसमितीसचिव खुलासा सचीव क्र २

Ram ram's picture

12 Sep 2015 - 4:05 pm | Ram ram

अन्ना हजारे मस्त खाउन पिउन तब्बेत बनवतो। मग वजन वाढल्यावर उपोषण करतो। त्यापेक्षा त्याने साने गुरुजींचा अादर्श घ्यावा।

Ram ram's picture

12 Sep 2015 - 4:05 pm | Ram ram

अन्ना हजारे मस्त खाउन पिउन तब्बेत बनवतो। मग वजन वाढल्यावर उपोषण करतो। त्यापेक्षा त्याने साने गुरुजींचा अादर्श घ्यावा।

विकास's picture

20 Sep 2015 - 8:55 pm | विकास

गरीबांचे तारणहार आणि स्वार्थी भांडवलवाद्यांचे संहारक श्री. अरविंद केजरीवालांचे म्हणणे होते की त्यांनी जनतेसाठी रू. ४० प्रतिकिलो भावाने कांदे घेऊन रु. ३० प्रतिकिलोने जनतेला दिले... पण आता माहितीअधिकारातून बाहेर आलेल्या माहितीत वेगळेच चित्र दिसते... कांदे घेताना रु. १५ प्रतिकिलोने घेतले आणि जनतेला रू. ३० प्रतिकिलोने दिले... याला म्हणतात सरकारी... स्वारी स्वारी, समाजवादी उद्यमशिलता!

onion

श्रीगुरुजी's picture

21 Sep 2015 - 1:41 pm | श्रीगुरुजी

गरीबांचे तारणहार आणि स्वार्थी भांडवलवाद्यांचे संहारक श्री. अरविंद केजरीवालांचे म्हणणे होते की त्यांनी जनतेसाठी रू. ४० प्रतिकिलो भावाने कांदे घेऊन रु. ३० प्रतिकिलोने जनतेला दिले... पण आता माहितीअधिकारातून बाहेर आलेल्या माहितीत वेगळेच चित्र दिसते... कांदे घेताना रु. १५ प्रतिकिलोने घेतले आणि जनतेला रू. ३० प्रतिकिलोने दिले... याला म्हणतात सरकारी... स्वारी स्वारी, समाजवादी उद्यमशिलता!

यात दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ४० रू. प्रतिकिलो भावाने कांदे घेऊन ३० रू. किलो भावाने विकले ही आआपची शुद्ध थाप आहे. अर्थात थापा मारणे, खोटे बोलणे, खोटे आरोप करणे, कांगावा करणे इ. गोष्टी आआपची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. त्यामुळे या थापेबाजीत काहीच आश्चर्य नाही.

आता दुसरा मुद्दा. कांदे घेताना १५ रू. प्रतिकिलो दराने घेतले असतील. परंतु त्यानंतर मालाची साठवण, वाहतूक, ५-१० टक्के खराब माल निघणे इ. ची किंमत विकताना वाढविली तर विकताना ३० रू. प्रतिकिलो दराने विकणे रास्त वाटते.

श्रीगुरुजी's picture

27 Oct 2015 - 12:59 pm | श्रीगुरुजी

हार्दिक पटेल चांगलाच अडकलाय.

http://www.thehindu.com/news/national/other-states/gujarat-hc-upholds-se...

अतिशहाणपणा करायला गेल्यावर शिक्षा मिळणारच. आता म्हणे त्याच्या समर्थकांनी धमकी दिली आहे की पटेलांना आरक्षण दिले नाही तर आम्ही धर्म बदलू. एकंदरीत हा हार्दिक पटेल आणि त्याचे समर्थक म्हणजे अत्यंत उथळ आणि गुंडगिरी करणारे टगे आहेत. बहुतेक कोणी तरी उचकावल्याने, नरेंद्र मोदी व गुजरातमधील भाजपला अडचणीत आणण्यासाठी त्याने हा उद्योग केला असावा आणि आता तो चांगलाच गोत्यात आला आहे.

विकास's picture

27 Oct 2015 - 7:53 pm | विकास

अतिशहाणपणा नसून सगळे कुठेतरी व्यवस्थित योजले जात आहे असे वाटते. बाकी धर्म बदलला तर राखीव जागा कशा मिळणार त्या?

रमेश आठवले's picture

27 Oct 2015 - 8:01 pm | रमेश आठवले

कॉंग्रेस त्याला आर्थिक मदत करत असल्याची खबर आहे. तसेच कॉंग्रेस आता पटेल आरक्षणाला पाठींबा देत असल्याचे दिसते. तेथील स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकी लवकरच होणार आहेत. त्यात या युतीचा प्रभाव काय होतो ते दिसेल.
एका गुजराती मित्राने हार्दिक चे वर्णन ' चिबावला' या शब्दाने केले. मला या शब्दा साठी मराठी शब्द सुचत नाहीये.