भामी

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
31 Jul 2015 - 3:23 pm

भामाक्का बाजाराच्या टेम्पोमधून खाली उतरली तेव्हा उन्हं उतरायला होती. घराजवळ पोहोचल्यावर ओट्यावर बसलेल्या धाकट्या लेकी उराशी बिलगल्या, तसं लेकींना कवटाळू धरताना, भामीचं लेकुरवाळं आभाळ आणखीनच भरून आलं. "गोमू कुटं दिसंनांग पोरींनो ? ". " मगाचंधरनं ती शोध्तीय्या पाडीला अन तिच्या पाडसाला". …… "पाडी लई द्वाड, हायवेच्याकडच्या फाट्याकड बघायला जात्येगं पोरींनो ". असं बोलून भामी तिथून निघालीसुद्धा. दाटलेलं मळभ आकाशाचा निळा रंग पुन्हा करड्यात कालवायला लागलेल्या वेळी कोडगेपणे निर्विकार पाडी रस्त्याच्याकडंला पडलेली… पायाशी तिचं वासरू आचळाला लुचायला खटपट करत होतं… भामेनं जवळ जाउन पाहिलं तर काळजातून काहीतरी तुटतंय वाटून अंधारी आली…. रस्त्याकडंच्या जीपच्या टायरचा ठसठशीत चिखलाचा पट्टा उमटला होता…… पाडीच्या मानेवर…अन पलीकडच्या बाभळीतल्या गोमूच्या ओढणीवरसुद्धा ………

शब्दक्रीडाविरंगुळा

प्रतिक्रिया

भिंगरी's picture

31 Jul 2015 - 3:30 pm | भिंगरी

आईग

टवाळ कार्टा's picture

31 Jul 2015 - 3:48 pm | टवाळ कार्टा

:(

ब़जरबट्टू's picture

31 Jul 2015 - 4:25 pm | ब़जरबट्टू

अरारा

तुषार काळभोर's picture

31 Jul 2015 - 4:37 pm | तुषार काळभोर

अरेरे!

स्रुजा's picture

31 Jul 2015 - 6:04 pm | स्रुजा

:(

उगा काहितरीच's picture

31 Jul 2015 - 6:27 pm | उगा काहितरीच

चांगल लिहीता याबद्दल दुमत नाहीए ! पण का लिहीता असं ? करूण रस सोडून बाकी बरेच रस आहेत !

मी-सौरभ's picture

31 Jul 2015 - 8:20 pm | मी-सौरभ

सहमत आहे

जडभरत's picture

31 Jul 2015 - 6:52 pm | जडभरत

आईशप्पथ!!!
:(

जडभरत's picture

31 Jul 2015 - 6:53 pm | जडभरत

बाकी स्किल चांगलंय या प्रकारात तुमचं.

आताशा शतशब्दकथा वाचायचच सोडून दिलयं... उठ सुठ डोळे पाणावुन घ्यायचे. (अपवाद फक्त गजोधर पगल्वाचा..)

बॉमकेस बॅक्षी असं करू नका हो . मत द्यायचंय न तुम्हाला ? कि कथा स्पर्धेसाठी आहे का ?

विवेकपटाईत's picture

1 Aug 2015 - 4:24 pm | विवेकपटाईत

डोळ्यांत पाणी आलेले मला हि पाहवत नाही, हलकी फुलकी आत्ताच टाकली आहे.