( रेशनकार्ड )......शतशब्द-सम्मुच्चय

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
29 Jul 2015 - 11:21 am

३ वर्षे खच्चून पर्फोर्मंस दिल्यावर शेखरअण्णाने तीला सोलो पाठवायचं ठरवलं. घरवालीशी बोलून झालं, नगरसेवक काचीचं नाव निघालं. घरवालीला केवढा आनंद झाला, काचीबरोबरची रात्रीची "बैठक" छान झाली.
"१८ वर्षांपेक्षा मोठी दिसायला लागली आता तु" असं काचीकडून उत्तर मिळाल्यावर खुश झाली.

टोपाझची रात्र जवळ येवू लागली, खरेदी वैगेरे झाली. शेखरअण्णाने पारदर्शक डीपकट घालायला लावलं तीला.
"कष्टमरको खुश रखेगी…. इदर जैसे डान्स किया, उससे अच्छा उदर करेगी" असं ऐकल्यावर त्याचं टेन्शन कमी झालं.

आवश्यक सोपस्कार पार पडले. टोपाझमधे धंदेके टाइमवाला डान्सफ्लोर मिळाला. कपडे उतरवून डान्स करताना, विचार करू लागली, "अजून बीएमसी इलेक्शन… २०१७ पर्यंत, म्हणजे तोपर्यंत वाट बघितली तर नक्की मिळेल भारताचं रेशनकार्ड."

शब्दक्रीडाविरंगुळा

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

29 Jul 2015 - 11:31 am | टवाळ कार्टा

चपखल बसतेय

पगला गजोधर's picture

29 Jul 2015 - 2:39 pm | पगला गजोधर

या लेखाची मूळ-प्रेर्ना

एस's picture

29 Jul 2015 - 12:21 pm | एस

.....

काय बोलणार!

खटपट्या's picture

29 Jul 2015 - 2:52 pm | खटपट्या

कथा आवडली !!

पगला गजोधर's picture

29 Jul 2015 - 5:00 pm | पगला गजोधर

लगे हाथो आपभी शशक जलेबी तलो ;)

उगा काहितरीच's picture

29 Jul 2015 - 6:07 pm | उगा काहितरीच

सगळीकडेच बोंबाबोंब !

द-बाहुबली's picture

29 Jul 2015 - 7:51 pm | द-बाहुबली

अफलातुन...!

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jul 2015 - 9:19 pm | अत्रुप्त आत्मा

छान प्रयत्न.

माम्लेदारचा पन्खा's picture

29 Jul 2015 - 9:27 pm | माम्लेदारचा पन्खा

आसरा दिलाय..."आधार" दिलाय ह्यांना...आता काय रेशनकार्डच !!

पगला गजोधर's picture

30 Jul 2015 - 9:09 am | पगला गजोधर

बिएमसी वर ज्याचं इतकी वर्षे राज्य आहे (कथेतील काल्पनिक नगरसेवक काची ) त्यांनीच दिलीये रेशनकार्ड ……

अमृत's picture

30 Jul 2015 - 9:09 am | अमृत

जमली मस्त

नाखु's picture

30 Jul 2015 - 9:29 am | नाखु

कार्डावर त्यांच "रेशन" चालू आहे हेच खरं !!!

अभामिपाशशवाचकाअस्वादक संघ

तुडतुडी's picture

30 Jul 2015 - 3:22 pm | तुडतुडी

आसरा दिलाय..."आधार" दिलाय ह्यांना...आता काय रेशनकार्डच !!>>> खि:क

पगला गजोधर's picture

30 Jul 2015 - 3:56 pm | पगला गजोधर

बिएमसी वर ज्याचं इतकी वर्षे राज्य करताना, भूमिपुत्रांना रेशनकार्ड द्यायची, तर खंडणीखोरिकरून, बांगड्यांना झोपड्या द्यायच्या वर रेशनकार्ड वाटायची