[शतशब्दकथा स्पर्धा] ग्रीन कार्ड

तुडतुडी's picture
तुडतुडी in जनातलं, मनातलं
28 Jul 2015 - 4:49 pm

३ वर्षे खचून performanse दिल्यावर कंपनीने त्याला ऑनसाईट पाठवायचं ठरवलं . अप्लिकेशन करून झालं . लॉटरी मध्ये नाव निघालं . त्याला केवढा आनंद झाला . इंटरव्ह्यू छान झाला . 'पारपत्रावर वर विसा चिकटवून कंपनीत पाठवला जाईल' असं एम्बसी कडून उत्तर मिळाल्यावर तो खुश झाला.

उडण्याचा दिवस जवळ येवू लागला तसा त्याचा उत्साह वाढत होता. खरेदी वगेरे करून झाली . आई बाबांनी काय काय घ्यायला लावलं त्याला . अहो आई बाबा आता US मधलं सगळं काही तिकडे मिळतं . असं म्हणून ओझं कमी केलं .

आवश्यक ते सोपस्कार पार पडले . बोर्डिंग पास मिळाला . विमानात बसल्या बसल्या तो विचार करू लागला . आत्ता ३ वर्षे validity आहे विसा ची . २१५२ पर्यंत म्हणजे अजून २ वर्षे वाढवून मिळाली तर भारताचं ग्रीन कार्ड नक्की मिळेल

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

28 Jul 2015 - 4:58 pm | राघवेंद्र
टुंड्रा's picture

28 Jul 2015 - 4:59 pm | टुंड्रा

आवडली!
आणि असा दिवस आला तर खूपच आवडेल...

जडभरत's picture

28 Jul 2015 - 5:06 pm | जडभरत

सहमत! आवडली.

अहो पण तुडतुडी तै भयकथा सोडून इकडे कुठे शिरलात? ह्या टैपचं लिहणारे अनेक जण आहेत. भयकथा लिहीणारे बरेच कमी. तुम्ही आपलं लोकांना घाब्रवैचं काम करा.

चिमी's picture

29 Jul 2015 - 11:13 am | चिमी

हो मीपण रोज वाट बघत आहे त्या भयकथेच्या पुढच्या भागाची ...

उगा काहितरीच's picture

28 Jul 2015 - 5:15 pm | उगा काहितरीच

वा ! फक्त २१५२ च्या जागी २०२० व्हावे अशी इच्छा ;-)

नगरीनिरंजन's picture

28 Jul 2015 - 5:19 pm | नगरीनिरंजन

स्वप्नरंजन बरंय पण भविष्यात सगळे देश सारखे आणि देशांच्या सीमा पुसट झाल्या तर जास्त आवडेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jul 2015 - 6:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

ते पण स्वप्नरंजनच नव्हे काय ?! :)

नगरीनिरंजन's picture

28 Jul 2015 - 8:28 pm | नगरीनिरंजन

हो. :-) ते माझ्या आवडीचं स्वप्नरंजन आहे एवढंच.

श्रीरंग_जोशी's picture

28 Jul 2015 - 5:21 pm | श्रीरंग_जोशी

कथेतली कल्पना आवडली.

सदस्यनाम's picture

28 Jul 2015 - 5:23 pm | सदस्यनाम

छान आहे कथा.
(तवा ग्रीन देतेत का सॅ़फ्रन देतेत कार्ड कुणास ठौक ;) )

प्रसाद गोडबोले's picture

28 Jul 2015 - 6:41 pm | प्रसाद गोडबोले

हा हा हा

ग्रीनकार्ड देण्याची च शक्यता जास्त आहे =))

वेल्लाभट's picture

28 Jul 2015 - 5:25 pm | वेल्लाभट

कथेपुरतंच असेल हे. वास्तवात पुसटशीही आशा नाही. दुर्दैवाने.

जयंत कुलकर्णी's picture

28 Jul 2015 - 5:25 pm | जयंत कुलकर्णी

///अहो आई बाबा आता US मधलं सगळं काही तिकडे मिळतं //// याच्या जागी
अहो आई बाबा आता इथलं सगळं काही तिकडे मिळतं '' असे केलेत तर अजून चांगले होईल...अर्थात माझे मत..

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jul 2015 - 6:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

फक्त बदल "अहो आई बाबा आता इथे मिळणारं सगळं काही तिकडेही मिळतं " असा केल्यास शब्दसंख्या कायम राहील... शशक मध्ये हे फार महत्वाचे !

मस्त कथा !

तिमा's picture

28 Jul 2015 - 6:32 pm | तिमा

परफॉर-मानसे हा नवीन शब्द वाचून ज्ञानात भर पडली.

बाबा योगिराज's picture

28 Jul 2015 - 6:39 pm | बाबा योगिराज

खासच....

मुक्ती's picture

28 Jul 2015 - 6:42 pm | मुक्ती

असेल असेल. २१५२ मधली मरथी वाटते.

अजया's picture

28 Jul 2015 - 6:53 pm | अजया

रंजक कथा!

विवेकपटाईत's picture

28 Jul 2015 - 8:24 pm | विवेकपटाईत

आवडली कथा. सोनियाच्या दिवसाची प्रतीक्षा ...

मनीषा's picture

28 Jul 2015 - 9:51 pm | मनीषा

आशावादी शतशब्दंकथा. ..

( ही स्पर्धेसाठी आहे का? तसे असल्यास मला वाटते तसा उल्लेख करावा . )

स्पर्धेसाठी असल्यास माझ्याकडून +१

श्रीरंग_जोशी's picture

28 Jul 2015 - 9:55 pm | श्रीरंग_जोशी

स्पर्धा १ ऑगस्ट पासून सुरु होत असल्याने ही शतशब्दकथा स्पर्धेसाठी नसावी असे वाटते.

माम्लेदारचा पन्खा's picture

28 Jul 2015 - 10:39 pm | माम्लेदारचा पन्खा

पण काही पक्ष ते स्वतःच्या फायद्यासाठी वापरून "बांगड्यांना" देत आहेत .....

टवाळ कार्टा's picture

29 Jul 2015 - 11:24 am | टवाळ कार्टा

"बांगड्यांना" हा शब्द काळजाला भिडला =))

माम्लेदारचा पन्खा's picture

29 Jul 2015 - 4:19 pm | माम्लेदारचा पन्खा

तेवढीच मराठी भाषेची सेवा !

"बांगड्यांना" = बांग देणारे... जबराट शब्दसंग्रह

टवाळ कार्टा's picture

30 Jul 2015 - 1:36 pm | टवाळ कार्टा

बहुतेक बांग्लादेशी म्हणायचे होते इथे

माम्लेदारचा पन्खा's picture

30 Jul 2015 - 2:21 pm | माम्लेदारचा पन्खा

हेच ते हेच ते....

माम्लेदारचा पन्खा's picture

30 Jul 2015 - 2:21 pm | माम्लेदारचा पन्खा

हेच ते हेच ते....

सर्व प्रतिसादांसाठी धन्यवाद
जडभरत अहो कुणीतरी सांगितलं कि तशी भयकथा आधी चाफा ह्यांनी लिहिली आहे . म्हणून ती अप्रकाशित करण्यात आलीये . मी संपादक मंडळाला ढीगभर मेसेजेस केलेत कि मला चाफा च्या मूळ कथेची लिंक द्या . पण अजून दिली नाहीये .हे बरोबर आहे का ? माझ्याकडे पुढची भयकथा तयार आहे . पण ती लिंक मिळाल्याशिवाय मी ती लिहिणार नाही .

हि कथा स्पर्धेसाठी नाहीये . स्पर्धेसाठी दुसरी कथा लिहिणारे

टवाळ कार्टा's picture

29 Jul 2015 - 11:50 am | टवाळ कार्टा

कॉल्लिंग्ग रंगांण्णा :)

मी ती मूळ कथा वाचली. तिथेच कुणीतरी संदर्भ दिलेला होता, टकाच्या प्रतिसादाच्याखालीच होता. पण दोन्हींच्या सादरीकरणात खूप फरक होता. तुमची कथा खूप वेगळी होती. मालमसाला पण वेगळा होता. डिलिट करण्याची काही गरज नव्हती, माझ्या मते तरी. असो.

पद्मावति's picture

29 Jul 2015 - 2:28 pm | पद्मावति

खरंच हे झालं तर मस्तं होईल.

तुडतुडी's picture

29 Jul 2015 - 4:16 pm | तुडतुडी

हो ना . म्हणूनच मला ती लिंक हवीये . कोणाकडे असेल तर द्या प्लीज .

जडभरत's picture

29 Jul 2015 - 4:49 pm | जडभरत
सामान्यनागरिक's picture

29 Jul 2015 - 4:52 pm | सामान्यनागरिक

१.डॉ च्या बदल्यात रूपये मिळाले की
काळ्याबाजारातून घ्यावे लागले ?
२. काय भाव होता ?
3.भारताचे पंतप्रधान कोण होते त्या वेळी ? कें अरविंद तृतीय ?

मंदार कात्रे's picture

30 Jul 2015 - 5:17 am | मंदार कात्रे

आवड्ली !

तुडतुडी's picture

30 Jul 2015 - 1:35 pm | तुडतुडी

कैच्या कै . चाफा आणि माझ्या कथेचा कैतरी संबंध आहे का