आज माझ्या मनाने, मला आग्रह करकरून, तोच मुलायम शालू नेसायला सांगितला होता. मोतीया रंगाचा आणि सुंदर लालचुटूक फाटलेल्या किनारीचा, तोच जुना शालू. तशी मी पहिल्यापासून हौशी, प्रत्येक गोष्ट कशी, सुंदर, नीटनेटकी आणि पद्धतशीर व्हायला पाहिजे, हा माझा कायमचा आग्रह. आजही माझ्या वयाला साजेसाच रंग होता आणि माहेरचा खानदानी बाज होता, काठ स्वतःच्या हाताने फाडला होता त्याचा मी. भावाची जखम बांधायला, मागेपुढे का पाहावे ?? म्हणूनच……फाटका, तरी अत्यंत प्रिय मला आणि माझ्या हृदयाच्या अगदी जवळ असलेला शालू ……
.......
.....
....
दार उघडलं आणि तो तीरासारखा आत घुसला, पायावर डोकं टेकवून केलेल्या दंडवताने माझी तंद्री भंगली.
त्याने निरोप दिला, 'आपल्याला तातडीने राजदरबारात बोलावले आहे, द्रौपादिदेवीजी ! '
प्रतिक्रिया
27 Jul 2015 - 10:37 am | अरुण मनोहर
छान कल्पना !
27 Jul 2015 - 10:39 am | खटपट्या
आवडली नेहमीप्रमाणे !!
27 Jul 2015 - 11:10 am | दमामि
कल्पना म्हणून छान आहे पण रजस्वला द्रौपदी एकवस्त्रा म्हणजे एका अतिशय साध्या वस्त्रात होती.
27 Jul 2015 - 11:28 am | अरुण मनोहर
एकाच शालूत होती. साधा फाटका शालू !
27 Jul 2015 - 11:31 am | पगला गजोधर
जुना (वापरून मुलायम झालेला), फटका (भावनिक बंध/नाते असलेला, इमोशनल कम्फर्ट झोन मधला ) शालू तिने वापरला….
27 Jul 2015 - 1:40 pm | दमामि
ओढून ताणून केलेले वाटते.
27 Jul 2015 - 1:53 pm | पगला गजोधर
आधी टकाच्या आयडीने 'चांगलंय' असा प्रतिसाद दिल्यावर, द मामी आयडीने 'ओढून ताणून' म्हणून प्रतिसाद देण्याचा खटाटोप लक्षात येतो बरे.
या आयड्या वेगवेगळ्या आहेत, असा मिपाकरांना दाखवून देण्याचा उद्योग, दुसरे काय
;)
27 Jul 2015 - 11:28 am | तुषार काळभोर
द्रौपदी ऑलरेडी राजमहालातच होती. शेवटचं वाक्य 'आपल्याला तातडीने राजदरबारात बोलावले आहे, द्रौपादिदेवीजी ! ' असं असायला हवं.
(पटलं तर बघा :) )
27 Jul 2015 - 11:36 am | पगला गजोधर
प्रती संपादक मंडळी,
"राजमहालात" च्या ऐवजी "राजदरबारात", अशी दुरुस्ती करावी, ही विनंती.
कळावे
प. ग.
27 Jul 2015 - 11:43 am | एस
गजोधरभैय्या नुसते सुटलेयंत. :-)
बाकी कनेक्शन छान आहे. शतशब्दकथा ही खर्या अर्थाने कथा असली पाहिजे. नाहीतर तो केवळ विशिष्ट शब्दमर्यादेतला एक प्रसंग किंवा किस्सा होऊन बसेल. तुमच्या शतशब्दकथा ह्याच भोवर्यात अडकून पडल्या आहेत असे मला वैयक्तिकरित्या जाणवले.
27 Jul 2015 - 11:51 am | पगला गजोधर
रुढार्थाने कथा नाहीये, पण एक वेगळा पर्स्पेक्टीव देण्याचा माझा प्रयत्न (१०० च्या बजेटमधे राहून)
:)
27 Jul 2015 - 11:55 am | टवाळ कार्टा
भाअरी
27 Jul 2015 - 12:13 pm | रातराणी
काठ स्वतःच्या हाताने फाडला होता इथेच कळल गोष्ट कशाबद्दल आहे. शेवटच्या एक दोन वाक्यात रहस्यभेद असेल तर शशक ची मजा येते. त्यामुळे ही तेवढी नाही आवडली. अजून छान लिहू शकाल तुम्ही.
27 Jul 2015 - 12:33 pm | द-बाहुबली
क्रमशः राहिलां काय ?
27 Jul 2015 - 12:55 pm | तुडतुडी
म्म्म्म्म्म्म्म बरं . कथा म्हणता येणार नाही ह्याला .
27 Jul 2015 - 1:13 pm | पद्मावति
ज्या शालूची चिंधी द्रौपदीने श्रीकृष्णाच्या बोटावर बांधली होती नेमका तोच शालू त्या दिवशी तीने नेसला होता. किती सुंदर कल्पना. श्रीकृष्णाने जणू वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदीला वस्त्रे पुरवून त्या चिंधीच्या उपकाराची आठवण ठेवली.
27 Jul 2015 - 1:29 pm | पगला गजोधर
पद्मावतितै,
मर्म कथेचे ह्या, बरोबर तुम्ही ते ओळखले |
१०० शब्दांना ह्या, कथा म्हणुनी, जे जाणिले ||
27 Jul 2015 - 1:18 pm | अनिता ठाकूर
द्रौपादिदेवीजी !.....? नाही हो! 'द्रौपदीदेवीजी'.(आणि तो 'जी' पण हल्लीचा...अमराठी! 'देवी' ह्या शब्दात आदर आलाच की.)
27 Jul 2015 - 1:37 pm | पगला गजोधर
;)
27 Jul 2015 - 2:02 pm | अनिता ठाकूर
असं वाचून वाचून येईलच मराठी.वाचते रहा.
27 Jul 2015 - 4:58 pm | जडभरत
चुकुन तोच जुना भालू असे वाचले गेले. (टकाबाळ, तुझ्या साठी मसाला तयारंय!)
पण असो कथा छान आहे.
मुख्य म्हणजे
हेच पद्मावती ताईंचे मत इथे नमूद करतो. कथेचा आत्मा तोच आहे.
27 Jul 2015 - 9:16 pm | उगा काहितरीच
कल्पना छान आहे.