स्टारशिप इंटरप्राईज्_नॅनो (शतशब्दकथा)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
22 Jul 2015 - 12:52 pm

स्टारवर्ष: '२११५', उर्सुला तारेसमुच्चय

अंतराळ … अंतिम अथांग मिती……… आणि ती अथांग आहेत, हे माहीत असूनही, स्वयंचलित 'स्टारशिप इंटरप्राईज् नॅनो' धैर्याने निघाली होती, तिच्या अविरत ध्येयाच्या पाठ्लागावर….नवजीवन आणि नवसंस्कृतींच्यां शोधात….अमर्यादित असणा-या मितीचा शोध घेणाच्या, एकदलीय साहसी मोहिमेवर. अथांगाचा अंत समजून येण्यासाठीच्या गणिताचा उलगडा करण्याच्या निर्धार केलेल्या, कॅप्टनच्या पथदर्शक नेतृत्वाखाली…




"चेतावणी … "
"सिरी यानाला हादरे का बसत आहेत ?" साखरझोपेतून चाळवत कॅप्टन 'मिस्टर बिन्स’ ने विचारले
"कॅप्टन आपण ५७zx२६ या कृष्णविवराजवळून चाललेलो आहोत, त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या मगरमिठीतून सुटण्यासाठी, फुलथ्रोटलंने हार्डपोर्टसाईड स्टीयर केलं पाहिजे. "
"सिरी तसं कर"
" बॅटरी क्षमता न्यूनतम "
"सिरी मागच्या स्पेसस्टेशनवर आपण सर्व बॅटऱ्या रिचार्ज केल्या होत्या नं ?????
…………… सिरी
………. सिरी
……. सी…री…… ! "

शब्दक्रीडाविरंगुळा

प्रतिक्रिया

मास्टरमाईन्ड's picture

22 Jul 2015 - 12:57 pm | मास्टरमाईन्ड

साखरझोपेतून चाळवत कॅप्टन 'मिस्टर बिन्स’ ने विचारले

:)

पगला गजोधर's picture

22 Jul 2015 - 3:14 pm | पगला गजोधर

Mr. Beans

टवाळ कार्टा's picture

22 Jul 2015 - 4:11 pm | टवाळ कार्टा

अब्बी सम्ज्या

काळा पहाड's picture

24 Jul 2015 - 2:49 pm | काळा पहाड

आरशा समोर उभं राहून या फोटोबरहुकुम चेहरा करण्याचा बराच प्रयत्न केला. कै जमत नै.

काळा पहाड's picture

24 Jul 2015 - 3:19 pm | काळा पहाड

तो टाय आणि सूट जरा उधार देता का भौ. बनियन वर फार चांगलं दिसत नै.

पगला गजोधर's picture

24 Jul 2015 - 3:32 pm | पगला गजोधर

Baniyan

पगला गजोधर's picture

24 Jul 2015 - 3:38 pm | पगला गजोधर

Baniyaan

ह्या येड्याला कप्तान केल्यावर दुसरं काय होणार!
धडाम धुडुम!
क्रिष्णविवरात जाऊन शेवईसारखे ताणले जाणार विमान आणि वैमानिक!!!

टवाळ कार्टा's picture

22 Jul 2015 - 1:03 pm | टवाळ कार्टा

नै समज्ले :(

पगला गजोधर's picture

22 Jul 2015 - 1:04 pm | पगला गजोधर

.

टवाळ कार्टा's picture

22 Jul 2015 - 1:36 pm | टवाळ कार्टा

कैच्नै सम्ज्ले

पगला गजोधर's picture

22 Jul 2015 - 1:39 pm | पगला गजोधर

!!

ज्या वेगाने शतशब्द कथा येतायत ते पाहता गजोधर सर्वात पहीले शतक पुर्ण करणार असे दीसतेय..

बॅटमॅन's picture

22 Jul 2015 - 2:20 pm | बॅटमॅन

मस्त रे गजोधरा.

(स्पेसप्रेमी) बॅटमॅन.

पद्मावति's picture

22 Jul 2015 - 2:32 pm | पद्मावति

अरे.... येस....स्टारशिप एंटरप्राइज़? USS एंटरप्राइज़? स्टार ट्रेक?.....मस्तं कल्पना आहे. कथा समजायला थोडा वेळ लागला पण छान हटके आहे.

पगला गजोधर's picture

22 Jul 2015 - 2:38 pm | पगला गजोधर

स्टार वॉर्स या मालिकेमधे कॅप्टन कर्क सुरुवातीला बोलतो
Space: the final frontier. These are the voyages of the starship Enterprise. To explore strange new worlds, to seek out new life and new civilizations, to boldly go where no man has gone before. हेच काहीसं मी मराठीत मांडलाय सुरुवातीला …।

ऋतुराज चित्रे's picture

24 Jul 2015 - 1:58 pm | ऋतुराज चित्रे

to boldly go where no man has gone before. आणि कॅप्टन कर्क लेडिज टॉयलेटमधे घुसला.

पगला गजोधर's picture

24 Jul 2015 - 2:05 pm | पगला गजोधर

:=>)

बॅटमॅन's picture

24 Jul 2015 - 5:08 pm | बॅटमॅन

हाण्ण्ण तेजायला =)) =)) =)) =)) =))

"स्टार वॉर्स" नै हो "स्टार ट्रेक" ...
उगाच जाता जाता:
स्टारट्रेकच्या सुरूवातीला "५ इयर मिशन ... नो मॅन हॅज गॉन बिफोर" हे शब्द नंतर स्टार ट्रेक नेक्स्ट जनरेशन मधे बदलून "कंटिन्युइंग मिशन... नो वन हॅज गॉन बिफोर" असे केले आहेत.

ट्रेकी मराठे

काळा पहाड's picture

22 Jul 2015 - 2:44 pm | काळा पहाड

१. अथांग मिती ची शास्त्रीय व्याख्या काय आहे? तुम्ही फायनल फ्रॉन्टीयर वापरायचा प्रयत्न करताय का?
२. 'अथांगाचा अंत समजून येण्यासाठीच्या गणिताचा उलगडा करण्याच्या': वाक्य पटलं नाही. गणिताचा उलगडा?

बाकी कथा जमलीयच.

पगला गजोधर's picture

22 Jul 2015 - 2:50 pm | पगला गजोधर

हा स्वैर अनुवाद करण्याचा माझा प्रयत्न होता,
तुम्ही कसा केला असता अनुवाद ?

रातराणी's picture

23 Jul 2015 - 12:52 pm | रातराणी

जिथं कुणीही मानव आजवर गेला नाही, अशा विश्वात जाण्यासाठी! त्या विश्वातील जीवसृष्टीबरोबर मैत्री प्रस्थापित करण्यासाठी, सर्वांना बरोबर घेऊन या चराचर सृष्टीच्या अस्तित्वाचे कोडे सोडवण्यासाठी. ?

काळा पहाड's picture

22 Jul 2015 - 4:05 pm | काळा पहाड

१. अवकाश: अंतिम सीमा.
२. अथांगाचा अंत समजून येण्यासाठीच्या गणिताचा उलगडा करण्याच्या निर्धार केलेल्या: सॉरी मला वाक्याचा उलगडा झाला नाही म्हणून मी हे पॉईंट आऊट केलं. पण इथे काय येईल ते मला खरोखरच माहिती नाही.

अवकाश सर्व दिशांना अमर्याद पसरले आहे. अंतिम सीमा आणि मर्यादा हे शब्दच तिथे लागू पडत नाहीत. स्थल व काल हे आपणासाठी अस्तितवात आहेत. अवकाशाला त्याची काहीच फिकीर नाही.जड द्रव्य अवकाशाच्या फार छोट्याशा भागात समाविष्ट आहे. उरलेली पोकळी द्रव्यहीन व कालहीन अशीच आहे.उद्या सर्व जीवन, सर्व ग्रह-तारे-दीर्घिका नष्ट झाल्या तरी अवकाश आहेच. कारण पोकळी नष्ट होत नाही. जीवन नष्ट झाल्यावर काळ देखील नष्ट होतो.पण स्पेस. नो रे बाबा.

काळा पहाड's picture

25 Jul 2015 - 1:24 am | काळा पहाड

अवकाश सर्व दिशांना अमर्याद पसरले आहे. अंतिम सीमा आणि मर्यादा हे शब्दच तिथे लागू पडत नाहीत.

चूक. अवकाश मर्यादित आहे. ते (बहुधा अजूनही) प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने विस्तारतंय. पण त्याला सीमा आहे.

स्थल व काल हे आपणासाठी अस्तितवात आहेत. अवकाशाला त्याची काहीच फिकीर नाही.

पुन्हा चूक. कालाची मिती अवकाशाला विस्तारित होण्यासाठी आवश्यक असणारच. या विश्वातले स्थल आणि काल अवकाशाच्या आस्तित्वासाठी आवश्यक आहेत. किंबहुना अवकाश हे स्थल आणि कालाच्या एकत्र गुंफण्यानेच बनलं आहे. यातल्या एक किंवा दोन्ही गोष्टींना मर्यादेबाहेर ताणलं गेलं (जसं कृष्ण विवरामध्ये होतं) तर अवकाशाचं वस्त्र उसवायला, फाटायला लागेल (जसं तिथं बहुधा होतं).

जड द्रव्य अवकाशाच्या फार छोट्याशा भागात समाविष्ट आहे.

बहुधा सत्य असावं. कारण जड द्रव्य प्रकाशापेक्षा जास्त वेगाने जावू शकत नाही. अवकाशाला ती मर्यादा नाही.

उरलेली पोकळी द्रव्यहीन व कालहीन अशीच आहे.

चूक. अवकाशाची पोकळी ही कधीच कालहीन नसते. काल हा अवकाशाचा एक न बदलता येणारा भाग आहे (अर्थात हे सुद्धा तितकसं खरं नाही, पण विश्वाच्या आपल्या भागात तरी हे निदान खरं आहे). किंबहुना अवकाशाची एक मिती काल आहे. बाकीच्या ९ किंवा २५ मित्या (हा नंबर अजून सिद्ध झालेला नाही, आपल्याला फक्त ३ मितीचा अनुभव येतो) स्थलाच्या आहेत. अर्थात आपल्याला हे सुद्धा माहिती नाही की कालाच्या दोन किंवा जास्त मित्या आहेत की नाहीत. तसं असेल तरची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही.

उद्या सर्व जीवन, सर्व ग्रह-तारे-दीर्घिका नष्ट झाल्या तरी अवकाश आहेच. कारण पोकळी नष्ट होत नाही.

तुम्हाला यावर नक्की विश्वास आहे? =) कारण आत्तापर्यंत असं मानलं जातंय की कृष्ण उर्जेच्या मुळे (कृष्ण द्रव्याला न जुमानता) विश्वाचं प्रसरण कमी न होता वाढत चाललं आहे. त्याचा दृश्य परिणाम म्हणून दूरच्या आकाशगंगा आपल्याला जवळच्या आकाशगंगांपेक्षा वेगाने दूर जाताना दिसतात. म्ह्णजे जर विश्वाच्या टोकाला पाहिलं तर त्या आकाशगंगांचा वेग हा त्या पेक्षा जवळ असणार्‍या आकाशगंगांपेक्षा जास्त आहे. पण गेल्या काही वर्षात एक नवीन सिद्धांत मांडला गेलाय. त्यानुसार, हा भ्रम आपल्याला होतोय कारण विश्वाच्या त्या दूरच्या भागात काळाची मिती स्थला मध्ये परिवर्तित होतीय. त्यामुळे जसं आपल्याला दृश्य वक्र करून मूळापेक्षा छोटं दाखवेल, तशा त्या आकाशगंगा दिसताहेत (त्यांपासूनची प्रसारणे वक्र होत आहेत). महाविस्फोटाच्या काही सुरवातीच्या काळात स्थलाची एक मिती काळात बदलली गेली (तीच ही आत्ताची काळाची मिती) असावी असा कयास आहेच. ही प्रक्रिया त्याची उलट प्रक्रिया असण्याचा कयास लावला जातोय.

जीवन नष्ट झाल्यावर काळ देखील नष्ट होतो.पण स्पेस. नो रे बाबा.

हे सुद्धा फारसं खरं नाही. जर विश्व याच वेगाने प्रसारित होत गेलं तर सगळे ग्रह, तारे, अणु, रेणू ताणल्यासारखे जावून फुटतील. त्याला बिग रिप असं म्हणतात. अवकाशाचे गुणधर्म हे एखाद्या दाट सूप सारखे असण्याबद्दल तुम्हाला माहिती असेलच. बिग रिप मुळे अवकाश फाटेल की नाही माहिती नाही पण ही एक शक्यता असू शकते. बिग क्रंच मध्ये अवकाश पुन्हा एका बिंदूत सामावलं जाण्याची शक्यता मांडली गेली होतीच. त्यामुळे अवकाश नष्ट होणार नाही हे बहुधा चुकीचंच असावं. अर्थात अवकाश कायम असण्याची सुद्धा एक शक्यता आहे ज्याला बिग फ्रीज म्हणतात. पण मला फक्त हे सांगायचं होतं की अवकाश ही काही कायम असणारी गोष्ट नव्हे.

कापसाहेब, अतिशय अभ्यासपूर्ण प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! पण मला जे वाटतं ते असं:

चूक. अवकाश मर्यादित आहे. ते (बहुधा अजूनही) प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने विस्तारतंय. पण त्याला सीमा आहे.

मला वाटतंय मी अवकाश (space) म्हणतोय आणि आपण विश्व (universe) या संकल्पनेबद्दल मत मांडत आहात!
विश्व विस्तारू शकेल पण अवकाश अनादी अनंत पोकळी (nothingness, emptiness, void) ही कशी विस्तारू शकेल? दीर्घिका प्रचंड वेगाने दूर दूर जात असल्याने विश्व विस्तारत आहे, पण म्हणून अवकाश विस्तारत आहे असे म्हणणे मला तरी पटत नाही. माझ्य मते अवकाशात विश्व समाविष्ट आहे. त्यामुळे अवकाशाच्या पोकळीत विस्तार करायला विश्वाला जागा आहे. परंतु अवकाश हे कुणाच्या पोकळीत स्वतःचा विस्तार करणार? बरं आपण म्हणता त्याप्रमाणे अवकाश विस्तारत असेल तरीही त्याच्या पलिकडे काय आहे? हे अजून कुणीच स्पष्ट केलेले नाही. किमान माझ्या वाचनात तरी अजून आलेले नाही. काय आहे या अथांग अनंत पोकळीच्या पलीकडे?
जड द्रव्य? नाही, जड द्रव्य हेच अवकाशाच्या आधाराने राहू शकते.
चैतन्य? नाही. चैतन्य हे देखील जड द्रव्यातूनच स्वतःला व्यक्त करते? शुद्ध चैतन्य कुणी डोळ्याने पाहिले आहे?
याच्याही पलिकडे एक मोठे विश्व आहे असे समजू, पण हे विश्व देखील कुठल्या तरी अवकाशात / पोकळीत समाविष्ट असणार ना?

जडभरत's picture

25 Jul 2015 - 10:24 am | जडभरत

पुन्हा चूक. कालाची मिती अवकाशाला विस्तारित होण्यासाठी आवश्यक असणारच. या विश्वातले स्थल आणि काल अवकाशाच्या आस्तित्वासाठी आवश्यक आहेत. किंबहुना अवकाश हे स्थल आणि कालाच्या एकत्र गुंफण्यानेच बनलं आहे. यातल्या एक किंवा दोन्ही गोष्टींना मर्यादेबाहेर ताणलं गेलं (जसं कृष्ण विवरामध्ये होतं) तर अवकाशाचं वस्त्र उसवायला, फाटायला लागेल (जसं तिथं बहुधा होतं).

समजा Big Bang पूर्वी शुद्ध अवकाश अस्तित्वात होते. सर्व काही एका एकमेव बिंदूत समाविष्ट होते. त्या व्यतिरिक्त अवकाशत धुळीचा कण देखील नाही. कुणी द्रष्टा ही नाही. द्रुष्यही नाही. मग काळ कसा अस्तित्वात असेल? कारण काळाची जाणीव ही जड द्रव्यात होणार्‍य बदलांवरूनच जोखता येते ना. big bang नंतरच काळ अस्तित्वात येतो. आणि तो देखील जड द्रव्यापुरताच मर्यादीत आहे. अवकाश रूपी पोकळीत स्थळ आणि काळ तुम्ही कसे ठरवणार?

किंबहुना अवकाशाची एक मिती काल आहे. बाकीच्या ९ किंवा २५ मित्या (हा नंबर अजून सिद्ध झालेला नाही, आपल्याला फक्त ३ मितीचा अनुभव येतो) स्थलाच्या आहेत. अर्थात आपल्याला हे सुद्धा माहिती नाही की कालाच्या दोन किंवा जास्त मित्या आहेत की नाहीत

विश्वाच्या त्या दूरच्या भागात काळाची मिती स्थला मध्ये परिवर्तित होतीय.

महाविस्फोटाच्या काही सुरवातीच्या काळात स्थलाची एक मिती काळात बदलली गेली (तीच ही आत्ताची काळाची मिती) असावी

या संकल्पना मला माहीत नाहीत. क्रिपया स्वतंत्र धागा काढून चर्चा केलीत तर खूप आवडेल! येवंद्या नवीन धागा! खूप नवीन विषय आहे. माझा तर अतिशय आवडता. गेल्या १०-१२ वर्षांत नोकरीमुळे या विषयात लक्ष देता आले नव्हते. पण आता जाणून घेण्याची इच्छा आहे.

काळा पहाड's picture

26 Jul 2015 - 12:50 am | काळा पहाड

महाविस्फोटापूर्वी काहीही आस्तित्वात नव्हते. अवकाश (space) ची निर्मिती महाविस्फोटात झाली. महाविस्फोटापूर्वी जो बिंदू होता तो आपण जे सध्या अवकाश म्हणतो त्यात नव्हता. महाविस्फोटापूर्वीच्या कोणत्याही वस्तू, घटना आणि प्रक्रिया यांच्याशी (जर काही त्या आस्तित्वात असल्याच तर) महाविस्फोटानंतर आस्तित्वात आलेल्या आपला कोणताही संबंध पोचू शकत नाही. आपले गणिताचे नियम आणि पदार्थ विज्ञानाचे नियम महाविस्फोटानंतर जन्माला आले. त्यापूर्वी आपले पदार्थ विज्ञानाचे नियम लागू होत नाहीत**. महाविस्फोटानंतर बहुधा लगेचच अवकाश, काळ आणि मितींची निर्मिती झाली. बर्‍याच वेळाने प्रकाश जन्माला आला. त्यापूर्वीचं विश्व प्रकाशाविना होतं. अवकाश (तुम्ही म्हणतात तसं पोकळी/nothingness/emptiness/void) विस्तारीत होताना त्याच्यावर पदार्थ विज्ञानाचे गतीचे नियम (उदा: प्रकाशाची वेग मर्यादा) लागू नाही. त्यामुळे पदार्था पेक्षा वेगानं ते विस्तारीत होत गेलं.

** जसं आपलं विश्व आहे तशी अनेक विश्वे आस्तित्वात असू शकतात, ती त्यांच्या त्यांच्या महाविस्फोटांत बनलेली असू शकतात आणि त्यांना पदार्थ विज्ञानाचे वेगळे नियम लागू असू शकतात. महाविस्फोट हा समांतर विश्वातल्या [parallel universe] दोन प्रतलांच्या टक्करीमुळे बनलेला आहे हा एक वेगळाच सिद्धांत आहे आणि धागे सिद्धांत [string theory] च्या काही गणितीय सिद्धता त्या दिशेने अंगुली निर्देश करतात. तसं असेल तर दोन प्रतलांची प्रत्येक टक्कर ही एक नवीन विश्व बनवेल असं मानलं जावू शकतं.

आता तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचे प्रयत्न करतो. अर्थातच या बाबतीत सर्व उत्तरं सापडलेली नाहीत आणि जे मानलं जातं ते पुंज आणि सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार आणि गणितीय प्रमाणांवर आधारित असतं.

अवकाश हे कुणाच्या पोकळीत स्वतःचा विस्तार करणार? बरं आपण म्हणता त्याप्रमाणे अवकाश विस्तारत असेल तरीही त्याच्या पलिकडे काय आहे?
...
याच्याही पलिकडे एक मोठे विश्व आहे असे समजू, पण हे विश्व देखील कुठल्या तरी अवकाशात / पोकळीत समाविष्ट असणार ना?

कदाचित काहीच नाही. तुम्ही काहीतरी पलिकडे असणं हे 'आपल्या' पदार्थ विज्ञान नियमात असण्याबद्दल विचार करताय. तुम्ही तथाकथित 'पलिकडे' कधीच जावू शकणार नाही किंवा असं म्हणता येईल की 'पलिकडे' आस्तित्वात नाहीच. अवकाश विस्तारीत होतोय म्हणजे तो 'कुठेतरी' व्हायला हवा असं तुम्हाला वाटतंय. तसं नाहीये. कारण मग तथाकथित पलीकडच्या गोष्टींना तुम्ही आपल्या विश्वातली पदार्थ विज्ञान विषयक तत्वं लावताय. अवकाश ही या विश्वातलं एक तत्व (entity) आहे.

समजा Big Bang पूर्वी शुद्ध अवकाश अस्तित्वात होते. सर्व काही एका एकमेव बिंदूत समाविष्ट होते. त्या व्यतिरिक्त अवकाशत धुळीचा कण देखील नाही. कुणी द्रष्टा ही नाही. द्रुष्यही नाही. मग काळ कसा अस्तित्वात असेल? कारण काळाची जाणीव ही जड द्रव्यात होणार्‍य बदलांवरूनच जोखता येते ना. big bang नंतरच काळ अस्तित्वात येतो. आणि तो देखील जड द्रव्यापुरताच मर्यादीत आहे. अवकाश रूपी पोकळीत स्थळ आणि काळ तुम्ही कसे ठरवणार?

महाविस्फोटापूर्वी काहीही - अगदी अवकाश सुद्धा अस्तित्वात नव्हते. प्रकाश नव्हता. मिती (स्थल वा काल) नव्हत्या. पदार्थविज्ञानाचे नियम (गुरुत्वाकर्षण, अणूंमधले बल, उष्णता) काहीही आस्तित्वात नव्हते.

क्रिपया स्वतंत्र धागा काढून चर्चा केलीत तर खूप आवडेल!

मलाही. पण सध्याच्या कामामुळे वेळेवर मर्यादा आहेत. आणि या धाग्यासाठी बरेच रेफरन्सेस, डिटेल्स आणि फोटोग्राफ्स जमवावे लागतील. लगेच होणार नाही. पण महाविस्फोट, विश्वाची उत्पत्ती आणि विलय याचे सिद्धांत, सापेक्षतावाद, पुंज सिद्धांत, कृष्ण विवर, कृष्ण द्रव्य, कृष्ण उर्जा, काळाचं स्वरूप या विषयावर जसं जमेल तेव्हा नक्कीच लिहीन.

उगा काहितरीच's picture

22 Jul 2015 - 6:31 pm | उगा काहितरीच

नाय बॉ नाय आवडली.

निमिष ध.'s picture

22 Jul 2015 - 7:38 pm | निमिष ध.

पण खुप गोष्टी एकत्र आल्यामुळे नक्की कुठल्या रूपकातून कुठला बोध घ्यायचा ते काय कळले नाही

पगला गजोधर's picture

23 Jul 2015 - 9:41 am | पगला गजोधर

कथेचं कमून टेंशन घेऊ राहिला भाऊ ? शनिवारी बाजाराच्या दिवशी मस्तपैकी नगरपालिकेजवळच्या नढेची भेळ खायची अन तसंच अशोकचौकातून पुढे खोजे गल्ली मोमिनपुरा ओलांडून, पुढे स्टान्ड कडे जाताना मारवाडी जोश्याकडची जिलेबी खायची अन गरम दुध प्यायचं, पुढे निवांतपणे दत्तदेवळाच्या प्रांगणात खुर्ची टाकून, आरामात मोबाईलवर मिपा वाचत बसायचं. हाय काय अन नाय काय.

(र च्या क ने : यावेळीही थोरले वि. पाटील, भांडरदऱ्याचं पाणी, संगमनेरला मिळू देतात का लोणी-प्रवरा कडे घेऊन जातात ?)

कथा काय कळली नाय. आवड नावड लांब राहिलं.

रातराणी's picture

23 Jul 2015 - 1:05 pm | रातराणी

आवडली. डोक्यावरून गेली पहिल्यांदा वाचली तेव्हा. क्रुश्न विवर म्हणजे ब्लेक होल अशी टूब पेटल्यावर जरा कळल्यासारखी वाटतेय. हे म्हणजे ये ग गाई गोथ्यात ऐकायची सवय असलेल्या बाळाला एकदम वार्याने हलते रान ऐकवाव असं झाल.
Which proves what calvin says : sometimes I think the surest sign that intelligent life exists somewhere else is that none of it has tried to contact us! : )

पैसा's picture

23 Jul 2015 - 1:42 pm | पैसा

मि. बीन्स स्टार ट्रेकमधे? मग बरोबर. कदाचित तो कृष्णविवराच्या तावडीतून काहीतरी यडचापगिरी करून सुटेल पण!