बेच दे !…… (शतशब्दकथा )

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
21 Jul 2015 - 9:22 am

क्षितिजाच्या कानाकोपऱ्यातून अंधार ओघळून गडदपणा वाढला की ट्राफिक हॉर्न मारतमारत घराकडे परतू लागायाचं, तरीही गेल्या काही आठवड्यांपासून झेडब्रिजवर, तो, हातामधल्या पाकिटातल्या, मधुचंद्राच्या आधी काढलेल्या फोटोकडे एकटक पाहत बसलेला असायाचा, जणूकाही आयुष्यात करण्यासारखं असं..... काही उरलंच नव्हतं त्याच्याकडे.….मनातून अगदीच रिकामटेकडा … वाऱ्यामुळे जमिनीवर उडणाऱ्या पानासारखा... दिशाहीन... निरुद्देश... फोनच्या रिंगटोनने त्याला एकदम भूतकाळातून बाहेर यायला मजबूर केलं…

"अरे तुला सकाळी बोललो त्याबद्दल विचार केला का ?…. त्यातून तुझ्याच बहिणीसाठी नवी अँक्टीवा घेतां येईलनां !" पलीकडून घरजावई मेहुणा.
"तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा" असं बोलून त्याने कॉल संपवला…

दुसर्या दिवशी ओएलएक्सवर नवी जाहिरात झळकली

विकणे:
फक्त दोन वर्षे एकहाती वापरेली स्कुटी
आणि नवाकोरा पाळणा …

शब्दक्रीडाविरंगुळा

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

21 Jul 2015 - 9:37 am | विशाल कुलकर्णी

ह्म्म्म
आवडलीच.
हेमींग्वेच्या लघुकथेची आठवण झाली..
For sale: baby shoes, never worn.

तुषार काळभोर's picture

21 Jul 2015 - 10:20 am | तुषार काळभोर

मलाही त्या कथेची आठवण झाली, पण गजोधरांची शशक जास्त आत घुसली. उगाचच वाचली असं वाटातंय आता. :(

चुकलामाकला's picture

22 Jul 2015 - 9:50 pm | चुकलामाकला

+१११११११

अमृत's picture

21 Jul 2015 - 9:38 am | अमृत

चटका लावणारी कथा. :-(

dadadarekar's picture

21 Jul 2015 - 9:43 am | dadadarekar

.

खटपट्या's picture

21 Jul 2015 - 9:45 am | खटपट्या

कळायला थोडा वेळ लागला पण आवडली

कळायला झेड ब्रिज ओलांडून बादल बरखा बिजलीपर्यंत जावं लागलं.

विदेशी वचाळ's picture

21 Jul 2015 - 10:51 am | विदेशी वचाळ

कळायला वेळ लागला पण कळल्यावर डोक्यातून जात नाही अहे.

देवा वाचव रे .

शॉट लागला रे बाबा

विदेशी वाचाळ

पगला गजोधर's picture

21 Jul 2015 - 11:14 am | पगला गजोधर

यैल्ला आपुनबी साला लिखाके सेंटी हो गयेला, उपरसे साला बाहर बारीश, माहौल बन गयेला था भीडू सुबैच्च ….

नाव आडनाव's picture

21 Jul 2015 - 10:53 am | नाव आडनाव

गजोधर भाऊ (भैय्या) शतशब्दकथा भारी लिहिता तुम्ही.

सदस्यनाम's picture

21 Jul 2015 - 11:04 am | सदस्यनाम

अब रुलाएगा तू पगले. :-(

नाखु's picture

21 Jul 2015 - 12:42 pm | नाखु

..........

एस's picture

21 Jul 2015 - 12:46 pm | एस

कथा फारच टोचली!

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jul 2015 - 12:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

:(

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Jul 2015 - 12:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फॉर सेल: बेबी शुज, नेव्हर युझ्ड वाल्या गोष्टीची प्रकर्षाने आठवण झाली :(

शंतनु _०३१'s picture

21 Jul 2015 - 2:07 pm | शंतनु _०३१

→आर → पार →

अन्या दातार's picture

21 Jul 2015 - 2:12 pm | अन्या दातार

.

रातराणी's picture

21 Jul 2015 - 11:13 pm | रातराणी

: (

संचित's picture

22 Jul 2015 - 1:30 pm | संचित

परत परत वाचून देखील नाही कळली. कोणी सांगेल का सस्पेन्स?

dadadarekar's picture

22 Jul 2015 - 5:47 pm | dadadarekar

त्याची बायको व पोर मेले.
बायकोच्या स्कूटीच्या व पोराच्या सामानाच्या विक्रीच्या पैशावर रिकामटेकड्याचा डोळा आहे.

....

आता याचा सिक्वल..... त्याचा दुसरा विवाह होऊ दिला जाणार नाही. तो आता भीष्माचार्य उर्फ कटप्पा होणार !

.....

प्यारे१'s picture

22 Jul 2015 - 1:32 pm | प्यारे१

च्यायला का लिहीता रे असलं! :(

प्रसाद गोडबोले's picture

22 Jul 2015 - 3:24 pm | प्रसाद गोडबोले

म्हणजे ??

नक्की काय झालं तेच कळाले नाही ...

असो .

उगा काहितरीच's picture

22 Jul 2015 - 5:55 pm | उगा काहितरीच

काय राव ! उगाच वाचली! अतिशय कमी शब्दात रंगवली... दंडवत स्विकारा मालक !

मी-सौरभ's picture

22 Jul 2015 - 6:09 pm | मी-सौरभ

:(

मितान's picture

22 Jul 2015 - 8:01 pm | मितान

आईग्गं!!!

एक एकटा एकटाच's picture

23 Jul 2015 - 12:46 am | एक एकटा एकटाच

अगदी आरपार.......

कविता१९७८'s picture

23 Jul 2015 - 6:12 am | कविता१९७८

कथा आवडली

तळ्यात मळ्यात's picture

23 Jul 2015 - 6:52 am | तळ्यात मळ्यात

कथा छानच. मोजक्या शब्दांत किती कारुण्य!

ब़जरबट्टू's picture

23 Jul 2015 - 9:35 am | ब़जरबट्टू

मस्त तरी कशी म्हणावे.. :(

स्वीत स्वाति's picture

23 Jul 2015 - 9:53 am | स्वीत स्वाति

वाचून कसे तरी च झाले.
मस्त आहे असे तरी कसे म्हणणार ......

अर्धवटराव's picture

23 Jul 2015 - 10:01 am | अर्धवटराव

.

बळच इमोशनल करायचा प्रयत्न

Activa आणि पाळणा विकणे आहे वरून , येथे पेणचे पापड ,सोललेले वाल आणि परकर मिळतील ची आठवण झाली

असो, पुढील जिलबीच्या प्रतीक्षेत :)

अविकुमार's picture

23 Jul 2015 - 10:33 am | अविकुमार

त्ये पोर कशाला मारता बे.... पु. लं च्या रावसाहेब मधून...

:(

उमा @ मिपा's picture

23 Jul 2015 - 11:03 am | उमा @ मिपा

निःशब्द

प्रणित's picture

23 Jul 2015 - 12:54 pm | प्रणित

हुरहुर लावणारी कथा

अजया's picture

23 Jul 2015 - 2:21 pm | अजया

:(

स्पंदना's picture

23 Jul 2015 - 3:17 pm | स्पंदना

भोगणार्‍याला कळत!!

म्या बी एकदा तिसर्‍या म्हयन्यात दुपटी वाळवली होती. बाहेर निघालीच नाहीत.

पैसा's picture

23 Jul 2015 - 6:08 pm | पैसा

छान लिहिलंय.

जडभरत's picture

23 Jul 2015 - 8:52 pm | जडभरत

:(
कथा खूप उशिरा कळली, पण कळली तेव्हा खूप चटका लावून गेली.

अग आइ ग खरच् सोलिद कथा..