चुक लक्षात येणे..... (शतशब्दकथा)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
16 Jul 2015 - 11:12 am

"क्रुरसिंहराजा, माझ्याकडून झालेल्या गेल्या दहा वर्षांची सेवा स्मरुण, कृपया माझा मृत्युदंड दहा दिवसांनंतर अमलात यावा, जी शिकारी कुत्र्यांची टोळी माझी लचकेतोड करणार आहे, त्यांच्या सेवेत माझे शेवटचे दिवस जावे" निष्ठारामाने विनवले.

"ठीक…" क्रुरसिंह फुत्कारला

ते दहा दिवस निष्ठारामाने, गजांआडून कुत्र्यांना स्वतः जेवायला वाढले….

मृत्युदंडाच्या दिवशी निष्ठारामाला जेव्हा गजांपलीकडे कुत्र्यांच्या बाजूला ढकलण्यात आले, तेव्हा सर्व कुत्रे त्याला चाटू लागले,

"पाहिलंस क्रुरसिंहराजा, केवळ दहा दिवसांच्या सेवेनंतर जनावरेसुद्धा उपकार स्मरतात, मी तर आपली दहा वर्ष सेवा केलीय" निष्ठाराम म्हणाला

त्याचंक्षणी क्रुरसिंहाला आपली चुक लक्षात आली, मग त्याने आज्ञा फर्माविली, निष्ठारामाला शिकारी कुत्र्यांकडून लाचाकेतोडीने मृत्युदंड देऊ नका …

त्याला आपल्याकडच्या जंगली लांडग्यांसमोर लचकेतोडीसाठी पिंजर्यात ढकला.

शब्दक्रीडाविरंगुळा

प्रतिक्रिया

अमृत's picture

16 Jul 2015 - 11:19 am | अमृत

कथेचं शिर्षक वेगळं हवं होतं. आणि हो तुम्ही शतशब्द कथांपलिकडे लिहिलेलंसुद्धा वाचायला आवडेल.

एकोणीस भागांची 'खुशबु' हि कथा वाचा की … माझ्या वाखू पहा

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jul 2015 - 11:29 am | अत्रुप्त आत्मा

@कथेचं शिर्षक वेगळं हवं होतं.>> +१

अरुण मनोहर's picture

16 Jul 2015 - 12:33 pm | अरुण मनोहर

कथा आवडली.

खटपट्या's picture

16 Jul 2015 - 12:45 pm | खटपट्या

कथा आवडली !!

उगा काहितरीच's picture

16 Jul 2015 - 7:15 pm | उगा काहितरीच

वा !

विवेकपटाईत's picture

16 Jul 2015 - 9:20 pm | विवेकपटाईत

मस्त कथा आवडली

एक एकटा एकटाच's picture

16 Jul 2015 - 9:29 pm | एक एकटा एकटाच

मस्त आहे

एक एकटा एकटाच's picture

16 Jul 2015 - 9:32 pm | एक एकटा एकटाच

तुम्ही ही कथा अगोदर कुठे प्रकाशीत केली होती का?

कारण गेल्या महिन्यात सेम कथा व्हॉटस अप वर वाचली होती.

कॉरोपरेट जोकच्या नावाखाली

अविनाश पांढरकर's picture

16 Jul 2015 - 11:03 pm | अविनाश पांढरकर

मस्त कथा आहे.

मीसुद्धा दोन महिन्यांपूर्वी हीच कथा व्हॉटस अप वर वाचली आहे. फक्त त्यात राजा, सेवकाची नावे नव्हती.