पुणेरी व्यंगशोधक नजर (शतशब्दकथा)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
14 Jul 2015 - 12:25 pm

'अरे चीलकी नजर होती है हम पुनाइट्सकी', गोल्फकोर्सवर गोल्फ खेळताना पहिला शॉट मारण्याच्या वेळेस तोल सावरता सावरता म्हणालो, 'अरे सिच्युऐशनमधलं व्यंग लगेच पकडतो मी',…… सुपरलक्झरी लाइफस्टाइलचा परीघतूनच त्याला पुढे सांगतच राहिलो,...'आता आज सकाळचंच बघ, ड्रायविंग करताना दुकानाचा बोर्ड पहिला, "मृत्युंजय - सिजनल्स "…. '

'खिक्क …. ' समोरचा रीस्पॉन्स….

'आई वडिलांचा आर्शिवाद…… "आ.र.शी.वा.द" बरका, 'रेहमतअली- दुर्वेश' … आशीर्वाद, दरवेश असं पावलांपावलांवर व्यंग सापडतं'
हिरव्यागार गालीच्यासारखे आऊटफिल्ट, डोंगरदऱ्या, उंचउंच झाडे, ओढे, वाळूंचे पॅचेस, नीरव शांतता आणि मध्येच पक्ष्यांची किलबिल अशा आल्हाददायक वातावरणात आमच्या चाळीशीच्या गर्भश्रीमंताच्या खेळाचे शॉट होलमध्ये जात होते, तर बाजूला आठ दहा वर्षांची मुले गोल्फबॉल कलेक्ट करण्याची पोटापाण्याची ड्युटी मान खाली घालून करत होती.

शब्दक्रीडाविरंगुळा

प्रतिक्रिया

तुम्ही कधी गोल्फकोर्सवर गेलाय का? या तथाकथित पुणेरी नजरेची माणसे आणि 'खिक्क' असा प्रतिसाद देणारे त्यांचे सवंगडी तिथे कधीतरी सापडतील का? आणि अजून एक. गोल्फ बॉल गोळा करायला तिथे अशी आठ-दहा वर्षांची मुले नसतात. तिथे कॅडी म्हणून काम करणारे तरूण हे बॉम्बे सॅपर्सच्या आजूबाजूच्या वस्त्यांमधील, येरवडा इथले असतात.

कथा वास्तवाशी जुळत नाहीच, ते सोडूनही शतशब्दकथा हा फॉरमॅट ही ती पुरेशी पाळत नाही.

नाही आवडली. तुमच्या इतर कथा, लेख इत्यादींच्या दर्जापेक्षा बरीच कमी अशी वाटली. पुलेशु.

पगला गजोधर's picture

14 Jul 2015 - 1:04 pm | पगला गजोधर

काल्पनिक आहे कथा. पुढच्या वेळी मी आणखी जास्त प्रयत्न करेन कथा लिहिताना.

:)

आदूबाळ's picture

14 Jul 2015 - 12:43 pm | आदूबाळ

ह्या:... नाय जमलं.

मृत्युन्जय's picture

14 Jul 2015 - 12:56 pm | मृत्युन्जय

स्वतःला पुनाइट्स म्हणणारा पुणेकर असुच शकत नाही. शतशब्दकथा वास्तववादी नाही ;)

अनुप ढेरे's picture

14 Jul 2015 - 1:43 pm | अनुप ढेरे

अजिबात नाही आवडलं. तुम्ही सिनेमा नाटक बघताना असा विचार करता का?

पगला गजोधर's picture

14 Jul 2015 - 2:00 pm | पगला गजोधर

लेख आवडला नाही हे कळलं, पण तुमचा पुढचा प्रश्न कळाला नाही :(

मला पण नै कळला दुसरा प्रश्न.

कपिलमुनी's picture

14 Jul 2015 - 1:45 pm | कपिलमुनी

सदर शब्द कॉपीराईटेड असून केवळ नदीच्या अलिकडल्या लोकांच्या संदर्भात वापरावा

विजुभाऊ's picture

14 Jul 2015 - 2:11 pm | विजुभाऊ

गोल्फ मुळे त्या तरुणाना रोजगार मिळाला हे वास्तव का दुर्लक्षीत करताय.
अर्थात कथा जमलेलीच नाही त्यामुळे इतर सर्व मुद्दे डीबार ठरतात

पगला गजोधर's picture

14 Jul 2015 - 2:17 pm | पगला गजोधर

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, पण मी या काल्पनिक कथेत ८-१० वर्षांची 'मुले'(पक्षी: बालकामगार) योजले आहे, आपण उल्लेखल्या प्रमाणे 'तरुण' नाही.

बॅटमॅन's picture

14 Jul 2015 - 2:18 pm | बॅटमॅन

आहे-रे वाल्यांना गिल्ट काँप्लेक्स देऊन वाहवा मिळवणे इतकाच हेतू असलेले लेखन आता जुने अन शिळे झाले.

कपिलमुनी's picture

14 Jul 2015 - 2:26 pm | कपिलमुनी

१.गिल्ट काँप्लेक्स
२. शाळा , कॉलेजचा नॉस्टेल्जिया
३. थोर थोर संगीतकार, तीच ती जुनी गाणी यांचे कौतुक
४. उगीचच दर २-३ वाक्याला शाब्दिक कोट्यांचा अट्टाहास असलेले विनोदी (?) लेखन

पगला गजोधर's picture

14 Jul 2015 - 2:35 pm | पगला गजोधर

आपल्या या प्रतिक्रियेनंतर, आपला फ्यानच झालो आहे !

टवाळ कार्टा's picture

14 Jul 2015 - 2:49 pm | टवाळ कार्टा

दवणिय र्हैले ;)

पगला गजोधर's picture

14 Jul 2015 - 2:28 pm | पगला गजोधर

लेखामागच्या विषयाशी सुसंगत असलेल्या (जरी प्रतिकूल असली तरी) प्रतिक्रियांमधलि आपली प्रतिक्रिया आहे.
नशीब माझे की मिपावर आपल्यासारखे विचारपूर्वक प्रतिक्रिया देणारे आहेत, नाहीतर मुपीसारख्या ठिकाणी लगेचच एखाद्याने जातीवाचक वळण लावलं असते इथे.

तुडतुडी's picture

14 Jul 2015 - 2:55 pm | तुडतुडी

अरे चीलकी नजर होती है हम पुनाइट्सकी>>
पक्का पुणेकर असलं वाक्य उच्चारणं शक्य नाही

पगला गजोधर's picture

14 Jul 2015 - 3:00 pm | पगला गजोधर

पक्का पुणेकर कुठे कधी कसा काय बोलेल, याची काही नियमावली आहे का ? कोणी मास्टरी केली आहे त्यावर ?

एखाद्या कट्ट्याला भेटा, मग सांगतो.

पगला गजोधर's picture

14 Jul 2015 - 4:03 pm | पगला गजोधर

जरूर … वल्ला क सुक्का कट्टा ?

टवाळ कार्टा's picture

14 Jul 2015 - 4:13 pm | टवाळ कार्टा

खिक्क...मला पण बोलवा रे...व्हिडो शुटिंग करेन म्हणतो =))

पगला गजोधर's picture

14 Jul 2015 - 4:23 pm | पगला गजोधर

वल्ला कट्टा असल्यास, व्हिडो शुटिंगवाल्यांना सुक्क राहावं लागतंय बगा !

टवाळ कार्टा's picture

14 Jul 2015 - 4:25 pm | टवाळ कार्टा

चालेल की...सूड समजावतोय आणि तुम्ही ऐकताय असा व्हिडो काडायचा हाय :)

पगला गजोधर's picture

14 Jul 2015 - 4:35 pm | पगला गजोधर

पहिली गोष्ट, पुण्यात ऐक पुणेकर सांगतोय व दुसरा ते निमुटपणे ऐकतोय, असं तुम्ही फारच वैयक्तिक श्रद्धा ठेवून बोलताय अस मी मानतो.
दुसरी गोष्ट, दोन पुणेकरांमधले संभाषणाचे व्हिडो शुटिंगसाठी केवढा मोठ्ठा कँन्वास कवर करावा लागेल टकाभौ तुम्हाला ….
;)

टवाळ कार्टा's picture

14 Jul 2015 - 4:38 pm | टवाळ कार्टा

खिक्क
रच्याकने सूडला पुणेकर पुणेकर मानतात? ;)

पगला गजोधर's picture

14 Jul 2015 - 4:55 pm | पगला गजोधर

आता मला काय माहित ते पुणेकर आहेत की नाही ते !
१. त्यांचे नाव एकदम जाज्वल्य वाटलं (पुणेकरपणाची ऐक अट )
२. मी काही पुणेविषयक शंका विचारल्यावर, त्यांनी ज्या उत्स्फूर्तपणे ('जा घाश्या केला तुला कोतवाल' च्या चालीवर) मला कट्ट्याचे आमंत्रण दिले (पुणेकरपणाची अजून ऐक अट ) त्यावरून तर माझा असा ग्रह झाला बुवा …

अशे एकदा मैदानात या हां, मग बोलू आपण!!

पगला गजोधर's picture

14 Jul 2015 - 5:09 pm | पगला गजोधर

अहो सूडपंत असे टकाभौंनी टाकलेल्या काडीने पेटू नका हो. बाकी तुम्हाला जे सांगायचे आहे ते आपण बेडेकरांची मिसळ खाताना चर्चेला घेऊच की…

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jul 2015 - 5:05 pm | अत्रुप्त आत्मा

@त्यांनी ज्या उत्स्फूर्तपणे ('जा घाश्या केला तुला कोतवाल' च्या चालीवर) मला कट्ट्याचे आमंत्रण दिले (पुणेकरपणाची अजून ऐक अट ) त्यावरून तर माझा असा ग्रह झाला बुवा …>>> वार'करी आळंदीत आला,की त्याची पावर वाढती! ;)

वार'करी आळंदीत आला,की त्याची पावर वाढती!

बरोब्बर!! तुम्हाला नाय एखादी चांगली कविता दिसली की परसाकडली विडंबनं सुचतात, तसंच!!

पगला गजोधर's picture

14 Jul 2015 - 5:32 pm | पगला गजोधर

वार'करी आळंदीत आला,की त्याची पावर वाढती! ;)

मिन्त्रो मै यहां आया नही हुं, मुझे मुळा-मुठा-इंद्रायणी मैय्यांओने बुलाया है…।

विजुभाऊ's picture

14 Jul 2015 - 4:13 pm | विजुभाऊ

कधी कर्ताय?