मीठ (शतशब्दकथा)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
13 Jul 2015 - 4:52 pm

होना आणि डॉक्टर म्हणाले हे असं कुणाबरोबरही होऊ शकतं…. इकडून मी बोललो, 'हो का?' 'अरे बापरे' 'चक् चक्' 'आई गं' या व्यतिरिक्त कुठलीही प्रतिक्रिया पलीकडून येत नव्हती. कॉल संपवला शेवटी कसातरी. आज बायको वॉर्डात आईजवळ राहणार होती तर माझी ड्युटी होती लेकीला झोपवण्याची, रोजच्याप्रमाणे झोपण्यापूर्वी आपल्या लहान लेकीला, गोष्टीच्या पुस्तकातुन एकीकडे पुढची गोष्ट वाचून दाखवत होतो, तर दुसरीकडे ती मनाने कुठेच्या कुठे पोहोचली होती. "अलिबाबाने मरजीनाला सांगितले 'खानेकी सारी चीजे मिठीही बनाई जाए, क्योंकी आजका मेहमान नमक बिलकुल नही खाता' " गोष्ट ऐकता ऐकता, झोपत आलेल्या छकुलीने, पेंगूळलेल्या डोळ्याने विचारले, 'का हो बाबा, त्या मेहमानाला पण अज्जीसारखा बिपीचा त्रास होता का ? '

शब्दक्रीडाविरंगुळा

प्रतिक्रिया

जडभरत's picture

13 Jul 2015 - 5:08 pm | जडभरत

पहिल्यांदा होना म्हणजे कुणीतरी मनुष्यच वाटला.
(पगला गजोधर साहेब थायलंडवरून आले वाटतं?)
होना आणि डॉक्टर म्हणाले हे असं कुणाबरोबरही होऊ शकतं…. --- हे वाक्य अवतरण चिन्हांमध्ये पाहिजे होतं. म्हणजे गोंधळ होणार नाही.
ठीक आहे. फारशी भयानक दणके किंवा कलाटण्या देत नाही. ते एक बरे!

:(

खेडूत's picture

13 Jul 2015 - 5:09 pm | खेडूत

मस्त जमलीय !

शुद्धलेखन, विरामचिन्हे, साचा .

प्रिव्ह्यू पाहून दुरुस्त करून टाकली असतीत तर अजून प्रभावी झाली असती.

उगा काहितरीच's picture

13 Jul 2015 - 5:18 pm | उगा काहितरीच

"मिठी" कथा, आवडली.

एक एकटा एकटाच's picture

13 Jul 2015 - 5:36 pm | एक एकटा एकटाच

मस्त आहे
आवडली

टवाळ कार्टा's picture

13 Jul 2015 - 5:40 pm | टवाळ कार्टा

मस्तयं

पद्मावति's picture

13 Jul 2015 - 6:24 pm | पद्मावति

एकदम गोड. आवडली कथा.

मस्तच. तेवढे ते विरामचिन्हे वगैरे होना मेरेकु.

रातराणी's picture

13 Jul 2015 - 11:29 pm | रातराणी

क्यूट गोष्ट. : )