आत्महत्या!

सटक's picture
सटक in जनातलं, मनातलं
9 Jun 2015 - 2:26 am

आज तो येउन गेला. असे म्हणा ना की येण्याची नुसती वर्दी देउन गेला. आताशा तो असेच करतो, नुसते कळवतो आणि कित्येक दिवस मग तोन्ड्च दाखवत नाही. मग कित्येक दिवस मी नुसता तगमगत रहातो. तो आल्यावर काय करायचे याचे बेत डोक्यात घोळवत!
पण त्याला सहसा सोयर-सुतक नसते त्याचे. तो ही काय करणार म्हणा...आज काल हवाच अशी वहाते की त्याचाही नाइलाज होत असणार. तो येणार म्हटले ना की खूप तरतरी असते पण....मी विचार करतो, आपण किती वेडे आहोत! तो काही आपल्याकरिता खचितच येत नाही. आपण आपले उगीच त्याला अवास्तव महत्व देउन त्याच्या आजुबजूला आपले जीवन जगत रहातो. मी मग निश्चय करतो, ह्या वेळी आपण तसे नाहीच वागायचे जसे नेहमी वागतो. पण तरी...उत्सुकता असतेच!!

माझ्या छोट्याश्या जगात त्याचा वावर सहसा वादळापेक्शा कमी नसतोच मुळी. त्याच्याबरोबर मुक्त फिरायला, हुन्दडायला मजा येते. कधी रस्त्यावरून मोकाट तर कधी शान्त, गहिरा! मला त्याची अनेक रूपे महिती आहेत. उत्तम कवी आहे तो. सहज जाता जाता सुरेख ओळी रचून जातो. लयबद्धही तसाच. काव्य आणि गेयता ह्यान्चा एक्मेकान्शी गहिरा सम्बन्ध आहेच!

बघा काय काय लिहीत बसलो. त्याचा विशय काढला ना पण की असेच होते. भानच उरत नाही की काय कसे कुठे बोलतोय ते.

छान सन्ध्यकाळ असावी, समुद्रकिनारा, भरती आलेला उफाणलेला दरिया...उन्च उन्च लाटा. सोबत तो...जरा अन्धारलेलेच असावे. गर्दीत मिळणारा जो एकान्त असतो ना त्याला तोड नाही!! सगळे आपापल्या विश्वात दन्ग!! तो मात्र तुमची साथ सोडत नाही. तुमच्या बरोबर तो ही बसून रहातो. रडत.. समजावत...कधी पुचकारत कधी फुसकारत...पण कधीतरी मात्र त्याचा रन्ग बदलतो. मग तो समोरचा काळा काळा समुद्र आपलासा वटायला लागतो.
धुमसणारा, आपल्या पोटात जहाल अग्नी, कराल वारे आणि तळाशी निर्मम प्रुथ्वी घेउन आकाशाला भिडू पहाणारा समुद्र. तो समुद्र नेहमी आपल्या विशालतेने मला खुणावत असतो. लोकाना भिती वाटते त्याची, मला मात्र तो नेहमीच आवडतो. त्याचे सुन्दर चन्चलपण, अथान्ग सामर्थ्य, सगळे चान्गले वाईट सामावून घेण्याची क्शमता, नेहमीच आकर्शक असतात. पण त्याची आपली जातकुळी एक नव्हे.

पण त्याला हे माहित असते. तो नेहमी सान्गतो तसे मला. अगाध समुद्राचा वारसा सान्गत सान्गत तो मला समजावतो, तुला मी आहे ना...तू कशाला चिन्ता करतोस, माझ्याबरोबर रहा, मी आहे तुझ्याकरिता. मीही मग त्याचे ऐकतो. त्याच्या विचारन्च्या माळा मग झडत रहातात...एकलग!! माझ्या जिवात जीव येतो.
प्रत्येक अन्शात जसा पूर्णाचा आभास असतो तसाच प्रत्येक पूर्णातही अन्शाचे वेगळे अस्तित्व असते का? असे विचारले मात्र एकदा... तो नुसताच हसला. बर्याच वेळानी म्हणाला...जगण्याचे बोलतोयस की...आपल्या मनात खोल दडलेले गुपित त्याला अगदी सहज दिसते!
थकून मी त्याच्या कुशीत विसावतो. आपल्या खोल उदरातून काजळमाया घेउन तो बरसत रहातो...नि:शब्द...निरन्तर..

मुक्तकप्रकटनविचार

प्रतिक्रिया

पुणेकर भामटा's picture

9 Jun 2015 - 8:22 am | पुणेकर भामटा

आत्महत्या....
काहि समजले नाहि बुवा...

पोट भरलेल्या एका निराशावादी माणसाचे पावसाचे स्वप्न लिहायचा प्रयत्न आहे हा. तो आत्महत्येपर्यन्त जातो पण थाम्बतो.
दुसरे असे की पहिलेछूट मिसळपाववर असे काहीतरी लिहायचे म्हणजे सहित्यिक आत्महत्या करण्यासारखेच आहे असा ही अर्थ आहे! :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jun 2015 - 6:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> दुसरे असे की पहिलेछूट मिसळपाववर असे काहीतरी लिहायचे म्हणजे सहित्यिक आत्महत्या करण्यासारखेच आहे असा ही अर्थ आहे! :-)

हाहाहा लै भारी हं. लाईक. =))
(अगोदर प्रतिसाद आणि मग लेख वाचायची सवय आहे, थोड्या वेळाने लेख वाचून प्रतिसाद देतो.)

-दिलीप बिरुटे

gogglya's picture

9 Jun 2015 - 10:50 am | gogglya

७ तास...

वाचून शान्त झोप लागेल असे म्हणायचे असेल तर उत्तम!! अन्यथा पोचले नाही...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jun 2015 - 6:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पावसाची गोष्ट आहे लिहित राहा.
आता शीर्षक असं का ? असो, वाचलेल्या सर्वच गोष्टी समजल्याच पाहिजे
असं काही नसतं नै का !

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे

धन्यवाद! जरा जड भाशेत सान्गायचे तर माणूस जाणिवेच्या अन्तापर्यन्त जाउन तिथून परत येण्याचे म्हणत असेल तर तो जीवनाचा आस्वाद परत घ्यायला मिळणार म्हणून खुश म्हणायचा की साले हे ही नाही जमले करायला म्हणून निराश...ते बघतोय!

समजलं नाही, पण बरं लिहीलंय.

दिलगीर आहे! पुढच्या वेळी दुर्बोधता टाळण्याचा प्रयत्न करतो! एक डाव भुताचा!

बाबा पाटील's picture

9 Jun 2015 - 8:12 pm | बाबा पाटील

सगळ मराठीत सांगा बर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र

सटक's picture

9 Jun 2015 - 8:28 pm | सटक

नाही जमणार असे वाटतेय!!

तरी पण नीसो सर आम्हि तुम्हाला ओळखले.

होबासराव's picture

9 Jun 2015 - 8:18 pm | होबासराव

.

सटक's picture

9 Jun 2015 - 8:29 pm | सटक

तो मी नव्हेच!

होबासराव's picture

9 Jun 2015 - 8:35 pm | होबासराव

अख्या मिपा वरती इतके गहन विचार फक्त निसो सरांचेच आहेत.
आमचे गुर्जि वर्गात ज्याचे अक्षर खराब आहेत त्याला "आप लिखे खुदा बाचे" म्हणायचे, पण खर सांगतो निसो सर आपले लेखन तर इतके गहन असते कि त्या बिचार्‍या परमेश्वराला सुध्दा नाहि कळायचे, आम्हि तर त्यामानाने पामर आहोत. पण आम्हि तुम्हाला बरुबर वळखल का नाहि.

नाही हो...एक डाव सान्गा तरी कोण आहेत हे? वाचीन म्हणतो!

होबासराव's picture

9 Jun 2015 - 9:02 pm | होबासराव

:)