Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अक्षरमित्र on Fri, 06/05/2015 - 20:26
नमस्कार. मी मुंबईत राहत असून गेली १०-१२ वर्षे मोटरसायकल वापरत आहे. आता माझी पहिली चारचाकी गाडी घेण्याची मानसिक तयारी झाली असून मिपाकरांकडून उपयुक्त माहिती हवी आहे. माझे बजेट साधारण ३ लाखांपर्यंत आहे. दैनंदिन वापर : घर ते ऑफीस रोज : ५० किमीपर्यंत. गावी जाण्यासाठी (साधारण २०० किमी अंतर वन वे) - वर्षातून २ ते ३ वेळा. जुन्या ऑल्टो, वॅगन आर घ्यावात की नॅनो घ्यावी यावर खुप विचार करुनदेखील निर्णय होत नाहीये. नॅनो कार खरोखरच अतिशय वाईट आहे काय ? नेटवर अगदी चांगले तर अगदीच वाईट रिव्यू आहेत. इथे कोणी नॅनो वापरणारे आहेत काय ? कृपया मदत करा. टीप : कृपया महागड्या गाड्या सुचवू नका. सध्या तेवढी आर्थिक ताकद नाहिये. सुरक्षिततेबाबत म्हणाल तर मोटरसायकलपेक्षा तुलनेने कोणतीही कार नक्कीच जास्त सुरक्षित वाटतेय सध्या तरी.
  • Log in or register to post comments
  • 46758 views

प्रतिक्रिया

Submitted by वेल्लाभट on Fri, 06/05/2015 - 20:37

Permalink

मी नॅनोत बसलोय, चालवलीय,

मी नॅनोत बसलोय, चालवलीय, फर्स्ट हँड रिव्ह्यू ऐकला आहे. नॅनो बसायला अत्तिशय आरामदायक आहे. स्विफ्ट पेक्षाही भारी. हेड रूम, लेग रूम (मागे सुद्धा) अफाट. टाटा ने स्पेस युटिलायझेशन पहिल्यापासून सरस केलेलं आहे. नॅनो अपवाद नाही. चालवायला सुद्धा वाईट नाही. थोडा आवाज येतो. पण नव्या मॉडेलमधे तो नाहीये/कमी आहे असं ऐकलं. एसी मस्त. आता ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्स्मिशन आहे. ब्लूटूथ म्युझिक सिस्टीम आहे. एकंदरित सुरेख फीचर्स. लगेज स्पेस आताच्या नव्या मॉडेलला आहे थोडीशी. बाकी त्या बाबतीत मार्क कमी. अर्थात गाडी ज्या पर्पज साठी बनवली आहे ते बघता ठीक आहे. दोन चारशे किमी सहज जाईल. फक्त ६०-८० च्या पुढे नेण्याची ही गाडी नव्हे माझ्या मते. ब्रेक्स आर मिडिऑकर अँड कॉर्नरिंग कॅन बी क्वाईट अ थ्रिल. त्यामुळे.... बाकी काहीच हरकत नाही. गरीबांची कार, चारचाकी रिक्षा वगैरे अशी मतं ज्याची झाली असतील किंवा टाटा म्हणजे.. हं ! असं म्हणणारा जो असेल त्याला नॅनो कधीच आवडायची नाही. पण इट्स अ प्रॅक्टिकल कार, अँड अ डिसेंट मशीन टू हॅव. बाकी तुमच्यावर :) हा रिव्ह्यू बघू शकता. http://www.team-bhp.com/forum/official-new-car-reviews/164034-tata-nano-amt-automatic-official-review.html
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षरमित्र on Fri, 06/05/2015 - 22:45

In reply to मी नॅनोत बसलोय, चालवलीय, by वेल्लाभट

Permalink

धन्यवाद !

नवीन नॅनोचे रिव्ह्यूज वाचले आहेत आणी बर्‍यापैकी पॉझीटीव्ह वाटत आहे. शिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीने नव्या नॅनोत इंपॅक्ट कुशनिंग क्रंपल झोन आहेत तसेच आणि अँटी रोलर बार दिलाय असे नॅनोच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. क्रंपल झोनबद्द्ल साधारण कल्पना आली पण अँटी रोल बार काय आहे ते अभ्यासावे लागेल. शिवाय गाडीचे मायलेज देखील जास्त आहे ही देखील जमेची बाजू म्हणता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Tue, 06/09/2015 - 23:33

In reply to मी नॅनोत बसलोय, चालवलीय, by वेल्लाभट

Permalink

ब्रेक्स आर मिडिऑकर अँड

ब्रेक्स आर मिडिऑकर अँड कॉर्नरिंग कॅन बी क्वाईट अ थ्रिल.
टिफ नीडल (फिफ्थ गिअर) ची आठवण झाली रे.
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Fri, 06/05/2015 - 21:00

Permalink

नॅनो चा अनुभव नाही..

नॅनो चा अनुभव नाही.. पण मुंबईत रोज गाडी वापरायची असेन तर सीएनजी वाल्या जास्त परवडतात... गावी जाण्याला नॅनो जास्त सुरक्षित नाही असे माझे मत ... त्यात टाटा आणि असे काही नाही.. जर सीएन्जी घ्यायची असेल तर वॅगनार कधी ही चांगलीच .. माझे तर असे मत आहे... जर चालवण्याची हौस असेल तर बजेट आनखिन थोडेशे वाढवुन .. स्विफ्ट पेट्रोल कींवा रिट्झ घ्यावी.. रिट्स दिसायला फक्त चांगली नाही... बाकी आतुन स्विफ्ट्च आहे... बाकी हे सर्व तुमच्या मनावर आहे.. कसे आणि काय ते .. मी फक्त सांगितले माझे मत . मी जुन्या गाड्या कधी प्रेफर करत नाही... नविनच घ्यायची.. आणि घेतानाच एकदा चांगली घेतली की पुन्हा काही जास्त टेंशन नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलेश on Fri, 06/05/2015 - 21:07

In reply to नॅनो चा अनुभव नाही.. by गणेशा

Permalink

मि नॅनो घेउन पुने ते गोआ ,

मि नॅनो घेउन पुने ते गोआ , पाचगनि गेलो होतो. मला तरि काहि त्रास झाला नाहि.
  • Log in or register to post comments

Submitted by ब़जरबट्टू on Mon, 06/08/2015 - 09:35

In reply to नॅनो चा अनुभव नाही.. by गणेशा

Permalink

सीएन्जी नाही...

सीएन्जी वर गाडी एका दमात जास्तीत जास्त १५०-१६० किमी जाते.. त्यामुळे दररोज ५० किमी जाणा-यांसाठी हे एक आव्हानच आहे. सीएन्जी पंपाची रांग व दर तिस-या दिवशी १ तास वाया घालवणे परवडेबल नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलेश on Fri, 06/05/2015 - 21:01

Permalink

अवश्य घ्या

एसी मस्त. आता ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्स्मिशन आहे. ब्लूटूथ म्युझिक सिस्टीम आहे. एकंदरित सुरेख फीचर्स. १००% सहमत मि गेलि ३ वर्षे नॅनो वापरत आहे. ऑल्टो, वॅगन आर पेक्षा मुंबईत ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्स्मिशन नक्कि उपयोगि होइल.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Fri, 06/05/2015 - 21:56

Permalink

मी नॅनोचा अत्यंत सुखी कष्टंबर

मी नॅनोचा अत्यंत सुखी कष्टंबर आहे. कोणत्याही प्रकारचं वाहन चालवणं हा वैताग वाटतो. तांत्रिक काही कळत नाही. पण घेतलेला अनुभव गोड मानून घ्यावा. लाँचच्या दिवशी नॅनो बघताक्षणी आवडली होती. तेव्हा चारचाकी घ्यायचा कोणताही विचार नव्हता. नंतर सुरक्षेच्या कारणासाठी गाडी घ्यायची वेळ आली, तेव्हा विचार केला - आपली नेमकी गरज काय? चार चाकं, डोक्यावर छप्पर, गुबगुबीत सीट आणि गाणी ऐकायला म्यूझिक सिस्टिम! बास! सीसी, टॉर्क, एबीएस, अ‍ॅलॉय व्हील्स वगैरे न समजणार्‍या गोष्टीत डोकं का घाला? तेव्हा मागे पाहिलेली नॅनो आठवली आणि तीच पक्की केली. तेव्हा नॅनो लॉटरी सिस्टिमवर मिळत असे. नॅनोच्या किमतीएवढी रोकडही हातात नव्हती. एरवी योगबिग असल्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवावासा वाटत, पण अशा घटना घडत गेल्या की एक दिवस पुण्यातली चौथी नॅनो घरी आली! ऐन पावसाळ्याचे दिवस. बालगंधर्व चौकात स्विमिंग पूल तयार होतो. होंडा सिटी सारख्या ग्राऊंड क्लियरन्स कमी असलेल्या गाड्या बंद पडताना पाहिल्या. ते पाणी कापत उंचनिंच नॅनो मात्र दिमाखात जात असे. एकूण लांबी कमी असल्याने लोकांच्या गाड्या जिथे आडव्या लावतात, तिथे मी नॅनो उभी पार्क करत असे! बारकुंड्या गल्ल्यांमध्ये इतर गाड्या वळण्यासाठी उलटसुलट प्रयत्न करत असताना नॅनो मात्र एका फटक्यात गोल वळत असे. (पुण्याची माहिती असणार्‍यांसाठी - बॅ० गाडगीळ स्ट्रीट, कोकण एक्स्प्रेसशेजारची गल्ली.) ड्रायव्हिंगचा कंटाळा असल्याने पुण्याबाहेर फारशी नेली नाही, पण जेव्हा नेली तेव्हा हायवेवर त्रास झाला नाही. पिरंगूट-पुणे चढबिढ व्यवस्थित चढली. साडेतीन वर्षांच्या काळात नॅनोने काही म्हणता काही त्रास दिला नाही. रोज तीसेक किलोमीटर गर्द ट्रॅफिकमधून हाणत असे. माझ्या दिव्य ड्रायव्हिंगमुळे मी मात्र नॅनोला चिक्कार त्रास दिला - मुरारबाजीसारख्या अनेक जखमा अंगावर वागवत होती. नेहेमीच्या सर्व्हिसिंगव्यतिरिक्त काहीही जास्त केलं नाही. पुढे भारताबाहेर जाताना नॅनो विकायची वेळ आली. मित्रांच्या मते हे डबडं कोणी घेणार नव्हतं. पण नॅनोला बघता बघता चक्क चार मागण्या आल्या! त्यातल्या एकाला विकली. (डबडं म्हणणार्‍यांपैकीच एकाला - त्यांच्या घरी माणसापेक्षा जास्त मान गाड्यांना आहे. त्यामुळे मुलगी सुस्थळी पडली आहे अशी खात्री होतीच.) तो अजूनही वापरतो. __________ त्या काळी नॅनो नवी असल्याने अशक्य किस्से घडत. नॅनोचे दोन किस्से सांगितल्याशिवाय रहावत नाही: १. संचेती हॉस्पिटलच्या सिग्नलवर थांबलो होतो. शेजारी एक टू-सीटर ऑडी येऊन थांबली. नेहेमी न पहायला मिळणारी भारी गाडी शेजारीच आल्याने मी पहात होतो. ऑडीची काच उघडली, आणि आतला माणूस माझ्याइतक्याच उत्सुकतेने नॅनोकडे पहायला लागला! मी त्याच्याकडे पहातोय हे लक्षात आल्यावर विचारलं, "कशी आहे हो गाडी?" मी म्हटलं, "चांगली आहे." मग बावळटासारखं विचारलं, "तुमची कशी आहे?!" २. रात्री आठ-साडेआठला कर्वेनगरातल्या एका गल्लीत नॅनो थांबवून शांतपणे बिडी मारत उभा होतो. शेजारी एक मर्सिडीज येऊन थांबली. मर्सिडीजला शोभेल असा, मध्यमवयीन माणूस उतरला, आणि म्हणाला, "मी चालवून बघू का? तुम्ही शेजारी बसा." मग मला शेजारी बसवून त्याने कर्वेनगरातल्या गल्ल्यांमधून गोल गोल फिरवलं. परत मूळ जागी आल्यावर थँक्यू-पूर्वक उतरला, आणि म्हणाला, "छान बनवली आहे गाडी, पण अजून रिक्षासारखा आवाज बंद नाही करता आला त्यांना..." हे गृहस्थ टाटा मोटर्सला कोणतातरी पार्ट पुरवणार्‍या अ‍ॅन्सिलरी कंपनीचे मालक होते. त्यांना बरेच दिवस नॅनो चालवून बघायची होती, आणि मी निवांत उभा दिसल्यावर त्यांना मोह आवरेना!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 06/05/2015 - 22:27

In reply to मी नॅनोचा अत्यंत सुखी कष्टंबर by आदूबाळ

Permalink

हाहा!

भारी किस्से! मारुती ८०० आता बास असे वाटल्यानंतर जास्त पयशे घालायची इच्छा नसल्याने माझ्या नवर्‍याने आमच्या बजेटमधल्या ४ गाड्यांमधे बसून पाहिले ज्या २ गाड्यांमधे त्याच्या डोक्याच्यावर थोडी जागा शिल्लक रहात होती त्या त्याला एकदम कम्फर्टेबल वाटल्या. त्या म्हणजे मारुती वॅगन आर आणि नॅनो. बाकी अल्टो आणि सांत्रो एवढ्या कम्फर्टेबल वाटल्या नाहीत. मात्र आमचे रत्नागिरी-गोवा प्रवास बरेच होत असल्याने वॅगन आर चे पारडे जड ठरले.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Fri, 06/05/2015 - 23:44

In reply to मी नॅनोचा अत्यंत सुखी कष्टंबर by आदूबाळ

Permalink

"कशी आहे हो गाडी?" मी म्हटलं,

"कशी आहे हो गाडी?" मी म्हटलं, "चांगली आहे." मग बावळटासारखं विचारलं, "तुमची कशी आहे?!"
हहपुवा
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Sat, 06/06/2015 - 14:02

In reply to मी नॅनोचा अत्यंत सुखी कष्टंबर by आदूबाळ

Permalink

मग बावळटासारखं विचारलं,

मग बावळटासारखं विचारलं, "तुमची कशी आहे?!"
काय तो साळसूदपणा!!! रच्याकने, असा प्रसंग माझ्यावर आला अस्ता आणि मला असं बोलायचं सुचलं असतं त्यावेळी, तर मी तर हेच बोललो असतो...
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाश पांढरकर on Wed, 06/24/2015 - 16:44

In reply to मी नॅनोचा अत्यंत सुखी कष्टंबर by आदूबाळ

Permalink

भारी किस्से!

"तुमची कशी आहे?!" तर कळसच आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 06/05/2015 - 22:02

Permalink

दोन वेळा चालवुन बघितली आहे

दोन वेळा चालवुन बघितली आहे मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी चांगली गाडी आहे. तिचा आवाज एक सोडला तर बाकी सगळं छान आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षरमित्र on Fri, 06/05/2015 - 22:24

In reply to दोन वेळा चालवुन बघितली आहे by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

तिचा आवाज एक सोडला तर बाकी सगळं छान आहे :)

एक शंका : जर काचा बंद असल्या तरी आत (जाणवण्याइतका) आवाज येतो काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 06/05/2015 - 22:27

In reply to तिचा आवाज एक सोडला तर बाकी सगळं छान आहे :) by अक्षरमित्र

Permalink

हो. किमान मी चालवलेल्या

हो. किमान मी चालवलेल्या गाडीचा तरी येतं होता.
  • Log in or register to post comments

Submitted by त्रिवेणी on Fri, 06/05/2015 - 22:10

Permalink

ड्वा ले पा णा व ले गा डी चे

ड्वा ले पा णा व ले गा डी चे कओ तु क ए कु ण. न व रा २ व र्ष झा ले चा ल व तो य. का ही त्रा स ना ही. आ णि आ म ची मी ठ भा क री टा टा क डु न च मि ळ ते. घ्या बि न धा स्त.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 06/05/2015 - 22:40

Permalink

सेंट्रल कन्सोल मात्र आवडला

सेंट्रल कन्सोल मात्र आवडला नाही. स्टिअरिंग च्या मागे असलेला कन्सोल पहायला जास्तं सोप्पा जातो.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 06/05/2015 - 23:05

Permalink

या भारतवारीत न्यानोमध्ये

या भारतवारीत न्यानोमध्ये बसायला मिळालं. माझ्या जाऊबाईंनी लक्षुमी रोडसारख्या गर्दीच्या रस्त्यांवर फिरायला ही वेगळी गाडी घेतलीये (त्या फक्त शॉपिंगलाच जातात असे नाही तरी सगळे चिडवतात). उंच मनुष्यालाही व्यवस्थित बसता येते हा सुखद अनुभव होता. मलातरी फारच आवडली! ते सगळेजण पुण्यापासून दोन ते तीन तासांसाठी प्रवास करताना आरामात नियमीत वापरतात. काहीही त्रास नाही असे बोलताना समजले. मला कधी भारतात गाडी घ्यायची वेळ आल्यास हा पर्याय नक्कीच असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 06/05/2015 - 23:22

Permalink

सेफ्टी नाहीये

सेफ्टी नाहीये ज़रा ठोकली तर खर्च जास्त
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Fri, 06/05/2015 - 23:45

Permalink

सिटी कार म्हणून णॅणोला

सिटी कार म्हणून णॅणोला दहापैकी दहा मार्क. आउटडोअर म्हणाल तर दोन येड्यांनी लदाख टूर मारली आहे नॅनोमधून. नवीन नॅनो सर्वोत्तम चॉइस. बाकी भंगार गाड्यांत बजेट वाढवून पैसे घालवण्यापेक्षा ही बरी... कार चालवण्याचा अनुभव नसेल आणि जुन्या गाड्यांमधे इच्छा असेल तर भरपूर चॉइस २ लाखात मिळतील. वरचे एक लाख बाजूला ठेवा पुढच्या चार-सहा वर्षाच्या मेंटेनन्स साठी. चार वर्षांनी नविन गाडी घ्या. (माझी वेळ होती तेव्हा मी नॅनोऐवजी २००० सालची १० वर्षे पण उत्तम कंडीशनवाली जुनी लान्सर दिड लाखात घेतली. तेवढ्याच पैशात दहापट कम्फर्ट, पॉवर, पिकप आणि स्टाईल, इत्यादी इत्यादी मिळाले. बाकी अपना अपना चॉईस..) कुठलाही निर्णय घेण्याआधी आपल्या बजेटमधे येणार्‍या सर्व नव्या जुन्या गाड्यांची ट्रायल घ्या. नंतर पस्तावायला होत नाही. कारण किमान ५ वर्ष दिवस रात्र ती गाडी आपल्याला चालवायची असते. इन दी एन्ड, एवरी मशीन चूजेस इट्स मॅन...
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Sat, 06/06/2015 - 00:13

Permalink

चांगली आहे

माझ्या भावाने जुन्या मॉडेलची नॅनो रिलीज झाल्याझाल्या घेतली आहे. सहप्रवासी म्हणून बसायला अतिशय आरामदायक. उत्तम लेगरुम. एसी, म्युझिक सिस्टम असे बाकीचे सर्व फीचर्स फारच छान. मायलेजही चांगले मिळते. मुख्य म्हणजे महागड्या कॉम्पॅक्ट सेगमेंट गाड्यांचे जितके डेप्रिसिएशन होते तितक्या किमतीत नॅनो येते. उदा. मी पाच लाखाला आय-१० घेतली होती. दोन-तीन वर्षानंतर ती विकावी लागली तेव्हा साधारण तीन लाखापेक्षा थोडे कमी पैसे मिळाले. त्याचवेळी भावाला सर्व खर्च पकडून सव्वालाखात नवी नॅनो मिळाली. आता विकायची म्हटले तरी त्याला साठसत्तर हजार सहज मिळतील. मात्र नॅनोच्या जुन्या मॉडेलला पॉवर स्टिअरिंग नसल्याने मला चालवायला तितकीशी मजा येत नव्हती. पॉवर स्टिअरिंगवाली नॅनो असल्यास अवश्य घ्या असे सांगावेसे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sat, 06/06/2015 - 08:29

Permalink

नवशिक्या ड्रायव्हरने पहिली

नवशिक्या ड्रायव्हरने पहिली स्वतः चालवायची गाडी म्हणून आॅटो गिअर नॅनो घेणे कितपत बरोबर ठरेल सुरक्षेच्या दृष्टीने?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Sat, 06/06/2015 - 08:36

In reply to नवशिक्या ड्रायव्हरने पहिली by अजया

Permalink

नेमका प्रश्न काय आहे

प्रश्न वाचून नेमका प्रश्न काय आहे याचा उलगडा होत नाहीये.
  • नवशिक्या ड्रायव्हरने पहिली स्वतः चालवायची गाडी म्हणून नॅनो घेणे कितपत बरोबर ठरेल सुरक्षेच्या दृष्टीने?
  • नवशिक्या ड्रायव्हरने पहिली स्वतः चालवायची गाडी म्हणून आॅटो गिअर कार घेणे कितपत बरोबर ठरेल सुरक्षेच्या दृष्टीने?
  • नवशिक्या ड्रायव्हरने पहिली स्वतः चालवायची गाडी म्हणून आॅटो गिअर नॅनो घेणे कितपत बरोबर ठरेल सुरक्षेच्या दृष्टीने?
मला अजुनही मॅन्युअल ट्रान्समिशनवाली कार चालवता येत नाही. पण सुरक्षेच्या दृष्टीने मी चांगला ड्रायव्हर आहे हे खात्रीने सांगू शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sat, 06/06/2015 - 09:13

In reply to नवशिक्या ड्रायव्हरने पहिली by अजया

Permalink

अगदी अ‍ॅक्टिवा स्कूटीसारखे

अगदी अ‍ॅक्टिवा स्कूटीसारखे आहे ते. ऑटो असेल तर गच्च ट्रॅफीकमधे नवशिक्या ड्रायवरची तारांबळ उडणार नाही. शिवाय ड्रायवर प्रथम गीअरलेस कार चालवेल तर त्यालाही त्याची सवय होईल. पेट्रोलबचत होईल ते वेगळे, वर मेंटेनन्स कमी. मॅ. ट्रा.चीही सवय असू द्यावी म्हणजे अडीअडचणीला दुसर्‍याची कार चालवायची तर उपयोगात येते.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sat, 06/06/2015 - 09:04

Permalink

तिसरा प्रश्न घ्या!

तिसरा प्रश्न घ्या! नवशिका ड्रायव्हर आॅटोगिअर नॅनो सुरक्षितता
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Sat, 06/06/2015 - 09:08

In reply to तिसरा प्रश्न घ्या! by अजया

Permalink

बरं

माझ्या स्वतःच्या अनुभवाप्रमाणे चारचाकी गाडीचे सुरक्षित ड्रायव्हिंग अन गाडी मॅन्युअल ट्रान्समिशनची आहे की ऑटोगिअरची या घटकाचा फारसा संबंध नाही. इतरांचे मत वेगळे असू शकते.
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Sat, 06/06/2015 - 13:18

In reply to बरं by श्रीरंग_जोशी

Permalink

जोशांशी सहमत. त्याचा

जोशांशी सहमत. त्याचा सुरक्षेशी विशेष संबंध नाही. सोयीशी आहे. सुलभतेशी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Sat, 06/06/2015 - 13:40

Permalink

फायदे

फायदे १. लेग स्पेस सर्वोत्तम २. जोरात पळते ३. कुठेही पार्क करता येते ४. मायलेज उत्तम ५. रहदारीत चालवायला उत्तम तोटे १. इंजिन मागच्याबाजूला असल्याने मागच्या सीटवर बसल्यावर एसी फुल चालु असुनही गरम वारा अंगावर येतो. २. मी ज्या २ -३ गाड्यांमध्ये मागे बसलो त्यांच्यात मागच्या सीटवर इंधनाचा वास यायचा. ३. जुन्या गाडीत तरी पॉवर स्टीयरिंग नसल्याने वळवण्यास फार सोप्पी नव्हती. ४. हायवेवर गाडी स्टॅबल नाही वाटत. ५. रिक्शासारखा आवाज येत असल्याने आपण कव्हर्ड रिक्षात बसल्याचा फील येतो. माझे मत घरी एक गाडी असेल आणि दुसरी घ्यायची असेल तर जरुर विचार करावा. लांब पल्ल्यासाठी किंवा अधिक आरामशीर पर्याय म्हणून दुसर्‍या गाडीचा विचार करता येण्यासारखे असेल तर शहरात चालवण्यासाठी उत्तम. महागडी दुचाकी घ्यावी किंवा नॅनो घ्यावी या संभ्रमात असाल तर उत्तम. फक्त शहरात चालवण्यासाठी, उन / पावसापासुन संरक्षण म्हणुन, चारचाकी हवीच आणि बजेटमधेच हवी वगैरे कारणासाठी घेणार असाल तर उत्तम पर्याय. फक्त शहरात चालवणार असाल तर उत्तम पर्याय. गाडीत एकटेच (किंवा दुकटेच) बसणार असाल तर उत्तम पर्याय.
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षरमित्र on Sat, 06/06/2015 - 20:20

In reply to फायदे by मृत्युन्जय

Permalink

गरम वारा अंगावर येतो.

गरम वारा अंगावर येतो हा गंभीर मुद्दा म्हणावा लागेल. जर १००-१५० किमी प्रवास एका दमात करायचा असेल तर नक्कीच त्रासदायक वाटेल. अर्थात नव्या गाडीत हा प्रश्न कसा हाताळलाय हे देखील बघावे लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Sat, 06/06/2015 - 14:08

Permalink

अव्ह्रेज कीती साधारण?

अव्ह्रेज कीती साधारण?
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Sat, 06/06/2015 - 17:18

In reply to अव्ह्रेज कीती साधारण? by अनुप ढेरे

Permalink

चौदा ते सोळा.

चौदा ते सोळा.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Sat, 06/06/2015 - 14:14

Permalink

टाटा नॅनो

टाटा नॅनो टाटा नैनो माझ्याकडेही कार आहे? जुन्या चर्चा... काही काही गोष्टी अजूनही रीलेव्हंट असाव्यात... सगळ्या लिंका इथेच उघडतील.... त्या वेगळ्या टेबमध्ये उघडण्यासाठी काय करावे ते मला लक्षात नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Sat, 06/06/2015 - 20:36

In reply to टाटा नॅनो by असंका

Permalink

target = "_blank"

नव्या टॅबमध्ये दुवा उघडला जावा यासाठी दुव्याच्या कोडमध्ये target = "_blank" जोडावे उदा. <a target = "_blank" href="http://www.misalpav.com/node/6365">टाटा नॅनो</a> माझ्या चला जुजबी एचटीएमएल शिकुया या लेखात याविषयी खूपच थोडक्यात लिहिले होते. तिथे आता नव्या प्रतिक्रियेद्वारे तपशीलवार लिहिले आहे. हा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on Sun, 06/07/2015 - 01:43

In reply to टाटा नॅनो by असंका

Permalink

कंट्रोल की दाबून लिंकवर क्लिक

कंट्रोल की दाबून लिंकवर क्लिक केले की वेगळ्या टॅब मधे उघडता येते, कसेही HTML लिहिले असले तरी!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Sun, 06/07/2015 - 03:03

In reply to कंट्रोल की दाबून लिंकवर क्लिक by मनिष

Permalink

बरोबर आहे

गेल्या महिन्यात क्रोमबुक घेतले. त्याच्या टचपॅडला राइट क्लिकचे बटनच नसते. त्यावर दुवा नव्या टॅबमध्ये उघडण्यासाठी कंट्रोल की दाबून ठेवून क्लिक करावे लागते. फोनवरून किंवा टॅब्लेटवरून असे काही करणे क्लिष्ट असू शकते. आपला उद्देश जर सर्व युझर्सची सोय बघणे असा असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Tue, 06/09/2015 - 00:19

In reply to बरोबर आहे by श्रीरंग_जोशी

Permalink

अवांतर

अवांतरः क्रोमबुक असेल तर दोन बोटं टचपॅडवर आपटलीत की राईट क्लीक होतं. ह्या घ्या टिप्स! https://support.google.com/chromebook/answer/1047367?hl=en
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 06/09/2015 - 00:23

In reply to अवांतर by मराठे

Permalink

धन्यवाद

मी जालावर शोधून जी क्लृप्ती वापरत असतो ती बहुधा Alt + Ctrl व लेफ्ट क्लिक करून राईट क्लिकचा मेनू मिळवणे आहे. आता हापिसात असल्याने खात्रीशीरपणे सांगू शकत नाही. घरी जाऊन तपासून पाहिन. डबल क्लिकपण सोपा पर्याय आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Tue, 06/09/2015 - 01:15

In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी

Permalink

थोडक्यात म्हणजे, क्रोमबुक ला

थोडक्यात म्हणजे, क्रोमबुक ला राईट क्लिकचा ऑप्शन असला तरच टाटा नॅनो कार घ्यायला हवी असं काही नाही तर!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 06/09/2015 - 01:18

In reply to थोडक्यात म्हणजे, क्रोमबुक ला by काळा पहाड

Permalink

बरोब्बर

बरोब्बर :-) .
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा पाटील on Sat, 06/06/2015 - 20:08

Permalink

नॅनो माझ्या लेकीला मात्र प्रचंड आवडली होती.

चार वर्षापुर्वी मी इंडिगो बदलली त्यावेळी मी सफारीची टेस्ट ड्राइव्ह घ्यायला गेलो होतो.तेंव्हा शोरुम मधल्या डिस्पेला ठेवलेली पिवळी नॅनो लेकीने पाहिली आणी बया त्यागाडीत जावुन बसली,त्यातुन परत उतरायचे मात्र नाव घेइना.कस बस खेचुन तिला त्यातुन बाहेर काढव लागल होत.रिलेशनशिप मॅनेजरच्या म्हणन्यानुसार टाटाच्या शोरुमला येणार प्रत्येक लहानमुल हा गोंधळ घालतच. एकुनात गाडी नक्की आकर्षक आहे.आणी मसुरी नैनीतालच्या डोंगरावर पण नॅनो फिरताना पाहिलीय म्हणजे गाडी नक्की दणकट असणार.
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षरमित्र on Sat, 06/06/2015 - 20:24

In reply to नॅनो माझ्या लेकीला मात्र प्रचंड आवडली होती. by बाबा पाटील

Permalink

अगदी !

नॅनो गाडी लहान मुलांना तिच्या वेगळ्या डिझाईनमुळे जास्त आवडते असे माझेही निरिक्षण आहे. मात्र बायडी लोकांना ती गाडी आवडत नाही असेही निरिक्षण आहे. (गाडी नवर्‍याला जास्त वापरायची असते पण बायकांनाच नवर्‍याच्या स्टेटसची काळजी नवर्‍यापेक्षा जास्त असते असे वाटते.) कृ. ह. घेणे नाहितर नॅनोचा गाडी भलत्याच रस्त्याला लागायची.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Sun, 06/07/2015 - 00:01

In reply to अगदी ! by अक्षरमित्र

Permalink

टाटा अशा चुकी कशा करतं कळत

टाटा अशा चुकी कशा करतं कळत नाही. इंडिका विस्टाला इंडिका म्हणायची काय घाई झाली होती? नुसतं व्हिस्टा म्हटलं तर चाललं नसतं? नॅनो ला गरीबोंकी कार अशी प्रोजेक्ट करायची काय गरज होती?
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sun, 06/07/2015 - 10:28

Permalink

टाटा नॅनो घेण्यापेक्षा रिक्षा बरी!!!!

कारण नॅनो ही चार चाकंवाली रिक्षाच आहे!!!!!! पूर्वी एकदा हिच्यात बसण्याचं दुर्भाग्य लाभलेलं आहे!!!!! नव्या कोर्‍या, खळगे नसलेल्या रस्त्यावरचा हिचा परफॉर्मन्स देखील अगदीच बेकार जाणवला!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by केवळ_विशेष on Mon, 06/08/2015 - 16:38

Permalink

बिनधास्त घ्या...

मी अगदीच लेटेष्ट म्हणजे २ जूनला ऑटोमॅटीक नॅनो घेतली आहे. अतिशय उत्तम गाडी आहे. मी पहीली नॅनो बाय बॅक करून ही घेतली. जुनी नॅनो सुद्धा मी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर चालवली आहे अनेक वेळा. डेअरिंग करून १०० पर्यंत नेऊन पाहीली. एकदम स्टेबल आहे. पण नंतर इमानदारीत ८० नी चालवली. व्यवस्थित आहे. जुनी आणि नविन मधला फरक मुख्यतः पेट्रोल कपॅसिटी आहे. २४ लि. क्षमता आहे. जुन्याची १५ आहे. ग्राउंड क्लिअरंस १८० मि.मि आहे. जर ऑटोमॅटीक घ्याल तर डिकि कपॅसिटी मॅन्युअल पेक्षा थोडी कमी आहे. पुण्यात ३,४७ ला जाते ऑटोमॅटीक टॉप एंड मॉडेल. पण ऑटोमॅटीक घ्या. सुख आहे चालवण्यात. किंमतीमध्ये अंदाजे २०-२५,००० चा फरक पडतो. पण शहरातला वाहतूकीचा वेग पाहता, उत्तम पर्याय आहे. आणि सर्वांत मुख्य म्हणजे डिकि बाहेरून उघडते. बाकी ब्लुटूथ टेप व कनेक्टीविटी वगैरे उत्तम (वैयक्तिक अनुभवः- आय फोन ६ कनेक्ट करता आला नाहीये. प्रयत्न चालू आहेत)
  • Log in or register to post comments

Submitted by केवळ_विशेष on Mon, 06/08/2015 - 16:40

In reply to बिनधास्त घ्या... by केवळ_विशेष

Permalink

जाता जाता...

मॉल मध्ये/थिएटरात कोणी चेक करण्याच्या फंदात पडत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by रॉजरमूर on Mon, 06/08/2015 - 18:32

In reply to जाता जाता... by केवळ_विशेष

Permalink

म्हणजे ?........

म्हणजे ?........
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 06/08/2015 - 18:41

In reply to म्हणजे ?........ by रॉजरमूर

Permalink

कारची सुरक्षा तपासणी

माझा अंदाज - पंचतारांकीत हॉटेलच्या प्रवेशद्वारापाशी जसे आरशाने कारच्या खाली स्फोटके वगैरे जोडली आहेत का तपासले जाते तसे नॅनो बरोबर केले जात नसावे.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Mon, 06/08/2015 - 16:52

In reply to बिनधास्त घ्या... by केवळ_विशेष

Permalink

अभिनंदन!!!

अभिनंदन!!! प्रतिसाद थोडा त्रोटक आहे. 'प्रथमतुजपाहता' म्हणजे फस्ट इम्प्रेशन रीव्यू चा लेख टाका. त्यानंतर एक फर्मास ओनरशीप रीव्यू येऊ द्या १,००० किमी झाल्यावर.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 06/08/2015 - 17:34

In reply to बिनधास्त घ्या... by केवळ_विशेष

Permalink

प्रतिसाद आवडला.

प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by केवळ_विशेष on Mon, 06/08/2015 - 17:21

Permalink

नक्की दादा...:)

:)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com