आंतरजातीय/धर्मिय विवाह ,एक जनुकीय (genetic) गरज!!!

ग्रेटथिंकर's picture
ग्रेटथिंकर in काथ्याकूट
4 Jun 2015 - 12:08 pm
गाभा: 

आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे. आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे.परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात.या पाठीमागच्या जनुकीय विज्ञानाचा अर्थ समजावून घेतला तर अडचण येणार नाही .
मनुष्याकडे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्या(pair)असतात,पैकी सेक्स क्रोमोझोमची तेविसावी जोडी फक्त विभिन्न असते, बाकीच्या जोड्या या सारख्या असतात(Identical).मनुष्याच्या DNAमध्ये अनेक जनुकं ही बाधीत असतात (Deleterious mutations).अशी म्युटेशन्स सर्व समाज आणि वंशात आहेत .यातील बहुतांश बाधीत जीन म्युटेशन्स ही रिसेसीव्ह पॅटर्नची आहेत. रिसेसीव्ह गुणधर्म(trait) तेव्हाच मनुष्यामध्ये व्यक्त/एक्स्प्रेस होतात जेव्हा बाधीत जनुके ही जोडीत (pair) असतात. याचा अर्थ एखाद्या फॉल्टी जनुकाच्या दोन कॉपीज जर एकत्र आल्या तर तो जनुक आपला प्रभाव दाखवु शकतो. वरती लिहल्याप्रमाणे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्यामध्ये जनुकांच्या दोन प्रती (Copies)असतात, जर दोन वेगवेगळ्या जनुकांची जोडी जर गुणसुत्रात जमली तर तो जेनेटीक अँडव्हांटेज समजला जातो व होणारे अपत्य सुदृढ जन्माला येते .

आता या सर्व विज्ञानाचा जातीव्यवस्थेशी काय संबंध असा प्रश्न पडणे साहजीक आहे.आपल्या कडे जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो.यासाठी एक उदाहरण बघु,

मनुष्यात उंची ठरवणारी 150 पेक्षा जास्त जनुके आहेत, आपल्याकडच्या जाती/ धर्म प्रकाराने कुठल्याही जातीत ही सर्व आवश्यक जनुके सापडणार नाहीत, प्रत्येक जातीत ती विभागली गेली असणार. याचाच अर्थ प्रत्येक जातीत उंची हा गुणधर्म ठरवणारी जनुकं वेगवेगळी व मर्यादीत आहेत व एकाच जातीतल्या विवाहाच्या प्रथेमुळे तीच तीच जनुकं पुढच्या पीढीत पास होत आहेत.यामुळे जेनेटीक फिटनेसला मर्यादा पडतात.

उंची हा फक्त उदाहरणाचा भाग झाला ईम्युनीटी ,बुद्धीमत्ता,शाररीक सदृढता ईत्यादी अनेक मानवी गुणधर्मांना अनेक जनुकं कारणीभूत असतात जी आपल्या जातीव्यवस्थेने आपण सिमीत करुन ठेवली आहेत.इम्युनीटी ठरवणारी जनुकं जर एखाद्या जातीत मर्यादीत असतील, तर त्या जातीत जन्माला येणार्याँची रोगप्रतिकारक शक्तीदेखील ठराविक पातळीवरच मर्यादीत राहते. ,कारण इम्युनीटी ठरवणार्या अनेकाविध जनुकांचा अभाव असणे.तेच बुद्धीमत्ता व इतर शारीरीक लक्षणांना लागू होते.
परत एकाच जातीत बाधित जनुकं असतील तर ती व्यक्त होण्याचा संभव जास्त असतो,एकाच जातीतल्या जोडप्यांना होणार्‍या अपत्यात बाधीत जनुकाच्या दोन प्रती एकत्र येऊन बाधीत गुणधर्म व्यक्त होण्याची शक्यता जास्त असते, कारण आपली जनुकीय विविधता जातींमुळे मर्यादीत झालेली आहे.

जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे. आंतरजातिय विवाहांमुळे मिळणारे फायदे हे जनुकीय विज्ञानाच्या अनुषंगाने खुप जास्त आहेत.
आंतरजातीय विवाह झाल्यास आपल्या भारतीय समाजाची जनुकीय विविधता वाढेल, भारतीय समाजाचा जनुकीय साठा(diverse gene pool) मोठ्या प्रमाणात वाढेल.

आंतरजातिय/वंशिय विवाहाचे खालील फायदे होऊ शकतात.
1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल.
2.विविध गुणधर्मासाठी अनेकविध जनुके उपलब्ध झाल्याने,रिसेसीव व डॉमिनंट पॅटर्नने इनहेरिट होणार्या जेनेटीक डीसॉर्डर कमी होतील व एक सुदृढ समाज तयार होईल
3.भारतीय समाज विविधांगी गुणधर्माचा एकजिनसी समाज होईल.
4.जनुकीय विविधता असलेला सदृढ समाज हा मानव वंशास फायद्याचाच ठरेल.
आंतरजातीय /वंशीय विवाहाचे विज्ञानाच्या अनुषंगाने केलेले हे चिंतन आहे. काही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी लिंक दिलेल्या आहेत . तर आंतरजातिय व आंतरधर्मिय विवाहाला खुल्या मनाने मान्यता देणारा समाज निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे व त्याला वैज्ञानिक आधारही आहे .धन्यवाद
http://www.bionews.org.uk/page_51579.asp

http://assoc.garden.org/courseweb/course2/week2/page18.htm

प्रतिक्रिया

Hrushikesh Marathe's picture

4 Jun 2015 - 12:22 pm | Hrushikesh Marathe

Upyukt mahiti..

आदूबाळ's picture

4 Jun 2015 - 2:31 pm | आदूबाळ

मराठेसाहेब - शक्य असेल तर प्रतिसादही देवनागरीतच द्यावा ही विनंती. मोबाईलवरून लिहीत असाल तर गूगल इंडिक कीबोर्ड वगैरे वापरून सहज शक्य आहे.

दमामि's picture

4 Jun 2015 - 12:23 pm | दमामि

१००% सहमत!

एस's picture

4 Jun 2015 - 12:34 pm | एस

बर्‍याच वर्षांपूर्वी काही सहकार्‍यांबरोबर झालेली जातिव्यवस्थेवरील चर्चा आठवली. त्यात गुणसूत्रांच्या वैविध्यास जातिसंस्थेच्या अडथळ्याबद्दल बरीच सकारात्मक चर्चा झाली होती.

अर्थात तुम्ही मांडलेला मुद्दा वैज्ञानिकदृष्ट्या बरोबर असला तरी त्याची अंमलबजावणी करणे हे सामाजिक रूढीवादी मानसिकतेमुळे जरा कठीणच आहे. पूर्वीच्या काळी अनुलोम विवाह एकवेळ चालत, पण तथाकथित उच्च जातीच्या पुरुषाने तथाकथित खालच्या जातीतील स्त्रीशी विवाह करणे अनुचित मानले जाई. आता हे प्रतिलोम विवाह तितके नवीन राहिले नाहीत. उलट खालावणार्‍या लिंगगुणोत्तरामुळे ते वाढीस लागले आहेत हे लेवा पाटील या जातीतील पुरुषांनी आदिवासी मुलींशी लग्न करण्याच्या वाढत्या प्रथेवरून दिसून येते. (हे केवळ उदाहरणार्थ.) पण त्याउलट दलित मुलाने उच्चवर्णीय मुलीशी विवाह केल्यास त्या दलित घराची राखरांगोळी केली जाते. यात दोन प्रकारच्या अनिष्ट प्रवृत्ती दिसतात. एक म्हणजे इतर जातींना आपल्या जातीपेक्षा कमी दर्जाच्या मानणे आणि स्त्रियांना भोगवस्तू असल्याप्रमाणे वागणूक देणे.

या दोन्ही प्रवृत्ती दुर्दैवाने कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे आंतरजातीय विवाहांची वाट कठीण आहे.

(आमच्या घरात आणि नातेवाईकांमध्ये अनेक आंतरजातीय विवाह झाले आहेत. एवढेच नव्हे तर अगदी आंतरधर्मीय विवाहही झाले आहेत.)

स्वतःबरोबर इतर सर्वांनाच फक्त माणूस मानणारा -
स्वॅप्स.

बॅटमॅन's picture

4 Jun 2015 - 1:20 pm | बॅटमॅन

सहमत, फक्त ते अनुलोम-प्रतिलोमचा तपशील अंमळ चुकलाय.

पुरुष उच्चजातीचा अन स्त्री नीचजातीची = अनुलोम.

पुरुष नीचजातीचा अन स्त्री उच्चजातीची = प्रतिलोम.

लेवा पाटील समाजातील पुरुषांनी आदिवासी मुलींशी लग्न करणे हे तस्मात अनुलोम विवाहाचेच उदाहरण आहे.

अन प्रतिलोम विवाहाप्रति समाज अर्थातच अजूनही खूप संवेदनशील आहे.

एस's picture

4 Jun 2015 - 1:26 pm | एस

अनुलोम-प्रतिलोमबाबत खातरजमा करून घेणे मोबाईलवरून प्रतिसाद लिहिल्याने शक्य झाले नाही.

सुबोध खरे's picture

4 Jun 2015 - 12:38 pm | सुबोध खरे

विषय शेवटी जातीव्यवस्थेवर जाईल म्हणून जास्त खोलात जात नाही
उदाहरणार्थ कोकणस्थ आणी देशस्थ ब्राम्हण या दोन पोटजातीतच इतके जनुकीय वैविध्य आहे कि त्यांचा संकर हा खूप फायदेशीर आहे. अशाच तर्हेने सर्व जातींचे जनुकीय पृथक्करण झाले पाहिजे आणी ज्या जातींची जनुके भिन्न आहेत त्यात विवाह असावा आणी ज्यात साम्य आहे त्यात विवाह टाळावा. हे शास्त्राला धरून होईल.
परंतु काही जातींमध्ये असलेली विशिष्ठ गुणाची जनुके विरलतेतून( DILUTION) लुप्त होऊ शकतील. उदा. उत्तर भारतात काही जातीत उंची खूप जास्त आहे. अशा लोकांनी बुटक्या जातीत लग्न केले तर उंचीचे सरासरीकरण( AVERAGING) होऊन उंची कमी होऊ शकेल. तेंव्हा सर्वच आंतर जातीय विवाह फायदेशीर ठरतील असेही नाही. आंतरधर्मीय विवाहात असे नक्की सांगता येणार नाही. गोव्यात बरेच GSB लोक ख्रिश्चन झाले आहेत( बाटवले गेल्या मुळे) तेथे विवाह मंडळाच्या जाहिराती सुद्धा RCB (ROMAN CATHOLIC BRAMHIN) वर/ वाढू पाहिजे अशा येतात. कोकणी मुसलमानात कोकणस्थ ब्राम्हणांची आडनावे डिन्गणकर, पाटणकर इ आणी गुण (घारे डोळे ई ) दिसून येतात. तेंव्हा धर्माधारीत विवाह हे जनुकीय संशोधन केल्याशिवाय करावे हे म्हणणे कठीण आहे. ( तशी माहिती उपलब्ध असेलही. मला माहित नाही)
मूळ ठरवून कोणी आंतर जातीय विवाह करीत नाहीत. त्यातून आपल्याकडे राखीव जागांमुळे हा प्रश्न ज्वलंत आणी गुंतागुंतीचा झाला आहे. यामुळे मी यावर भाष्य करीत नाही.

बॅटमॅन's picture

4 Jun 2015 - 1:18 pm | बॅटमॅन

प्रचंड सहमत.

वेल्लाभट's picture

4 Jun 2015 - 12:47 pm | वेल्लाभट

जनुकं बिनुकं शरीरात असतात. शरीराबाहेरचं एक जनुक असतं ज्याचं नाव असतं लोक. ते जनुक काय म्हणतं यावर बरंच अवलंबून असतं.

शिवाय जनुकं 'विचारांवर' परिणाम करत नाहीत ना ! ते विचार कसे बदलणार?

मृत्युन्जय's picture

4 Jun 2015 - 12:57 pm | मृत्युन्जय

थोडक्यात सांगायचे तर ५ + ७ ची सरासरी ६ होइल आणी विविधता वाढेल असेच ना? याला दुसरा प्रतिवाद असा होइल की ७+ ७ ची सरासरी ७ च राहिल. म्हणजे ७ ला या सगळ्या प्रकारामुळे काहिच फरक पडणार नाही आहे. ५ च्या भल्यासाठी ७ ने बलिदान देउन ७ पेक्षा कमी प्रतीचे प्रॉडक्ट तयार करणे कदाचित ७ ला आवडणार नाही. त्यामुळे या जनुकीय गुंतागुंतीला केवळ शास्त्रीय दृष्टीकोनातुन बघणे योग्य होणार नाही. ७ ला ५ आणि ५ ला ७ आवडत असेल तर प्रश्नच मिटला.

म्हया बिलंदर's picture

4 Jun 2015 - 6:58 pm | म्हया बिलंदर

७ ने स्वत:ला ०(शुन्य) समजावे म्हणजे ० + ०=० आणि ० X ० = ० किंवा ० / ० = ० च,
मग ते ५ चं भलं देखील म्हणता येणार नाही कारण ५ देखील तेव्हा ० च आणि ७ चं ते बलिदान होणार नाही.
त्रास आहे तो ७ ने स्वत:ला ७ आणि समोरच्याला नेहेमी २ ने कमी समजण्याचा.

मृत्युन्जय's picture

4 Jun 2015 - 7:06 pm | मृत्युन्जय

प्रश्न समजण्याचा नाही. असण्याचा आहे. ७ स्वतःला ७ च समजेल ना? तो ७ नसेल तर तो स्वतःला ७ नाही समजु शकणार. ५ स्वतःला ७ समजायला लागला मह्णुन तो ७ थोडीच होणार आहे. आणि ७ ने स्वत:ला आणी इतरांनी त्याला ० समजणे हे ७ चे अवमूल्यन आहेच. अजुन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की समाजात फकत ७ नसतात. ८, ९, ५ आणि २ देखील असतात. ७ ने स्वतःला ७ समजणे (किंवा असणे) सोडले तरी ८ तसे करेल असे नाही आणि कदाचित असेही असेल की २ ला देखील स्वतःच्या २ असण्यातच जास्त आनंद आहे / असेल. २ असण्याने कदाचित त्याला काही जनुकीय फायदे म्मिळत असतील जे ७ असण्याने मिळणार नाहित. त्यामुळे कदाचित २ च २ राहण्यात समाधान मानेल.

शिवाय ७ ने दुसर्‍याला ५ समजण्याचा देखील प्रश्न नाही. ५ हा ५ च असतो. ७ ने त्याला काहिही समजले तरी त्यात फरक पडत नाही. शिवाय ७ समोरच्याला २ ने कमी समजण्याचा त्रासही असु शकत नाही. खासकरुन हे कमी समजणे म्हणजे असणे असेल तर प्रश्नच नाही. शिवाय मी अजुन एक गोष्ट म्हटली ती तुम्ही लक्षात घेतलेली नाही. ७ ला ५ आणि ५ ला ७ आवडत असतील आणी त्यासाठी तडजोडी करायची त्यांची तयारी असेल तर प्रश्नच मिटला की

असो महत्वाचा मुद्दा हा की समजणे महत्वाचे नसुन असणे महत्वाचे आहे. जे आहे ते आहेच. ते नाकारता कसे येइल?

म्हया बिलंदर's picture

4 Jun 2015 - 7:38 pm | म्हया बिलंदर

धागाकर्ताच

जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे.

असं म्हणत आहे.
शिवाय

आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे

असंही तेच म्हणतात. मुळात ० ते ९ हि विभागणीच चुकिची नाही का? आवडीचं म्हणाल तर ते पटलंच पण एक गोष्ट आणखी अशी की ही आवड निवड ते दोघे करायला तयार असतात पण घरचे, भावकीतले, समाज, ई. तयार नसतात व त्यामुळे थिंकर साहेबांची प्रमेय आणखी मागे पडत जातात/जातील. मी ७ म्हणून दुसर्‍या ७ बरोबर उभा असेल तर कोणाला काही वाटणार नाही पण मी ५ आहे असं कळलं तर बर्‍याच भुवया तानल्या जातात. आजपर्यंत असंच चालत आलंय म्हणुन तेच बरोबर आहे हा आग्रह देखील चुकीचा. शिवाय थिंकर यांची प्रमेय पचणी पडायला बराच वेळ जाणार हे देखील तितकंच खरं.

मृत्युन्जय's picture

4 Jun 2015 - 8:35 pm | मृत्युन्जय

० ते ९ ही विभागणी मुळीच चुकीची नाही. कारण ती मुलात जनुकीय रचनेवर अधारित आहे असे धागाकर्‍त्याचे म्हणणे आहे. मी तो धागा पकडुनच पुढे लिहिले आहे. जर मुळात ० ते ९ नसेलच तर या जनुकीय कॉम्बिनेशनची गरजही नाही,

काळा पहाड's picture

4 Jun 2015 - 7:37 pm | काळा पहाड

० / ० = ०

हे चुकलंय. कॅल्क्युलेशन 'अनंत' होतं.
बाकी
१) ५ ला ७ नं ० असावं असंच आत्तापर्यंत वाटत आलंय.
२) ५ ची १,२,३,४ बरोबर ची वागणूक बघता ५ वर विश्वास ठेवण्याचं कारणच नाही.
३) आधी १,२,३,४ आणि ५ यांनी सलोख्यानं वागून दाखवावं, मग ७ ला उपदेश करावा.
थोडक्यात, १,२,३,४,५ आणि ७ यांना तसं एकमेकाबद्दल काहीच प्रेम नाहीये. तेव्हा हे बिनकामाचे उद्योग कोण सांगितलेत? १,२,३,४ आणि ५ यांनी एकत्र किंवा वेगवेगळं सुखानं नांदावं. ७ ला रहायचंय तर राहू द्यावं एकटं. होईल ७ ला जनुकीय प्रॉब्लेम तर ७ बघून घेईल.

म्हया बिलंदर's picture

4 Jun 2015 - 7:45 pm | म्हया बिलंदर

अहो अगदीच याच तर भावनेने सगळा प्रॉब्लेम वाढवलाय ना?
० ते पुढे हे एका ओळीत नाहीत ना, ते खालुन वर या क्रमाने करुन ठेवलेले आहेत शिवाय आलाच एखादा ज्ञान शिकवायला तर तात्पुरते व सोयीनुसार हे अर्ध्याने किंवा खुप झालेच तर एकाने वर खाली होतात पण तात्पुरतेच.

काळा पहाड's picture

4 Jun 2015 - 10:34 pm | काळा पहाड

बरं मग उलट करूया. ७=१ समजा आणि मी वापरलेली १,२,३,४,५ ही रचना ही ३,४,५,६,७ अशी आहे असं समजा (किंवा अ,ब,क,ड,इ घेवूया. अ स्वतःला अ समजतो, ब स्वतःला ब समजतो हे तरी खरं आहे की नाही?)

दुसर्‍या शब्दात सांगायचं तर २ ला तो २ आहे ही जाणीव आहे, तशीच १ ला तो १ असल्याची जाणीव आहेच. आणि १ ला इतकं इतकं डिवचलं गेलंय (तुमच्या बापजाद्यांनी ७ ला शिकू दिलेलं नाही इत्यादी) आणि सरकारी नोकर्‍या वगैरे मधून, शिक्षणातल्या संधी मधून अशा प्रकारे दूर केलं गेलंय की आता १ ला तो १ आहे ही जाणीव पक्की झाली आहे. आता स्वतःच्या पायावर (जबरदस्तीनं उभं रहायला लागलेल्या) १ ला या सामाजिक समरसते मध्ये ईंटरेस्ट असेल असं वाटत नाही. त्याला त्याची गरजही नसेल. या अ‍ॅन्टी-१ प्रकारामुळे १ मधले काही स्वप्नांच्य जगात जगणारे सोडले तर १ ला एकत्र यायला २ ते ७ नी भाग पाडलंय. तेव्हा हा प्रकार कितीही आयडियल वगैरे असला तरी १ च्या पूर्वजांच्या पेक्षा १ च्या मनात २ ते ७ बद्दल जास्त अढी असणार. एखादा शत्रू सैनिक सामोपचाराची बोलणी करायला आलेला दिसला तरी या बाजूचा सैनिक जसा बंदूक रोखूनच सावधगिरीनं त्याच्याशी बोलेल, वागेल तसाच १ वागणार.

म्हया बिलंदर's picture

4 Jun 2015 - 10:59 pm | म्हया बिलंदर

अढी मिटावी याकरीताच धागाकर्त्याने प्रमेय मांडलीत ना? आणि काहींना ती पचली नाहीत, हेच सांगायचंय.

श्रीगुरुजी's picture

4 Jun 2015 - 8:31 pm | श्रीगुरुजी

>>> हे चुकलंय. कॅल्क्युलेशन 'अनंत' होतं.

किरकोळ दुरूस्ती - गणितात '०/०' किंवा कोणतीही 'अशून्य संख्या/०' म्हणजे 'अनंत' नाही. गणितात असे भागाकार निरर्थक किंवा Undefined समजले जातात.

अवांतर - नाना आणि माईंचा विवाह हा सजातीय का आंतरजातीय का आंतरपोटजातीय का आंतरउपजातीय का आंतरपंथीय का आंतरधर्मीय का आंतरराष्ट्रीय आहे याचा ग्रेटथिंकरांनी खुलासा करावा अशी विनंती आहे. माईंच्या आयडीने (म्हणजे आईने नव्हे तर आयडी वापरून) खुलासा केला तरी चालेल.

हाडक्या's picture

4 Jun 2015 - 9:37 pm | हाडक्या

काहीही श्री.. :D ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Jun 2015 - 9:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कोणीतरी हे लिहायची वाट पहात होतो. =)) हाडुक ट्रॉल =))

अत्रन्गि पाउस's picture

5 Jun 2015 - 1:58 pm | अत्रन्गि पाउस

०/० हे undefined आहे ....

बाबा पाटील's picture

4 Jun 2015 - 1:07 pm | बाबा पाटील

शाळेच्या दाखल्यावरचा धर्म आणी जातीचा उल्लेख काढुन टाका,आज हे केले तर २० वर्षानंतर त्याचे परिणाम नक्की चांगले होतिल.

टवाळ कार्टा's picture

4 Jun 2015 - 1:16 pm | टवाळ कार्टा

प्रचंड सहमत

नुस्तं तेवढ्यानं काय होणार? समजा जातधर्म हा निकष हद्दपार झाला असे समजू (जे मुळात कधीही होणे अशक्य), तरीही नवनवीन निकष येतच राहणार.

परीणाम होतील तेव्हा होतील. ते उल्लेख काढावे ह्याच्याशी मात्र अगदी सहमत...

संदीप डांगे's picture

4 Jun 2015 - 1:56 pm | संदीप डांगे

सहमत.

च्यामारी त्या सरकारी व्यवस्थेच्या. रेडक्रॉसमधे नव्या बाळाला लस द्यायला घेऊन गेलो. नावनोंदणी करतांना तुमची जात काय सांगा, म्हणाल्या बाई. डोक्यात तिडीक गेली. म्हटले बाई याचा काय संबंध इथे? तर ती सद्ग्रहणी उच्चारती झाली. "अहो, आमच्या मनाने नाही विचारत, इथे फॉर्ममधे लिहून सरकारला द्यावं लागतं आम्हाला."

माझा प्रॉब्लेम असा आहे की चारचौघात जात विचारली की तळपायाची मस्तकात जाते. हे सरकार काही पिच्छा सोडत नाही. मुलांच्या दाखल्यावर जात-धर्म लिहायचाच नाही अशी नागरिकांना सूट नाही आहे का?

अहो पण एक गोष्ट लक्षात घ्या. ज्यांना चार चौघात जात सांगायला लाज वाटते. तेच लोक आरक्षणाचा गैरफायदा अगदी खुलेआम घेताना दिसतात. हि समाजाची खूप मोठी विडंबना आहे. म्हणजे आरक्षण असेल तेथे स्वत: जात सांगायला काही प्रोब्लेम नाही आणि जर त्याच जातीचा दुसऱ्या कोणी उल्लेख केला कि atrocity लागू. हे कधी थांबणार
(व री न घे )

मृत्युन्जय's picture

5 Jun 2015 - 11:06 am | मृत्युन्जय

देशाचे अजुन एक दुर्दैव म्हणजे जातीपातीविरोधात आंदोलने करणारे स्वतःच मोठ्या प्रमाणावर जातपात मानतात. महाराच्या पोराने (इथे जातदर्शक उल्लेख हा तुच्छतापुर्ण अथवा द्वेषमूलक नाही हे लक्षात घ्यावे) उच्चवर्णीय मुलीबरोबर लग्न करण्यास विरोध केल्यावर त्यांना शिव्या घालणारे महार स्वतः जातपात मानतात. त्यांच्यातही पोटजाती आहेत आणी त्यांमध्ये रोटीबेटी व्यवहार चालत नाहित के खोटे आहे काय?

थोडक्यात प्रिफरेबली उच्चजातीय स्त्रियांनी वाट वाकडी करावी असेच ना? कारण अशा बहुतेक धाग्यांचा उद्देश तोच असतो. बाकी जाईना का कुठे.

बाकी असे ओरडणार्‍यांनी अगोदर तथाकथित नीचजातीयांचे वर्तन तपासून पाहणे उद्बोधक ठरेल.

अन असे धागे अन प्रतिसाद असाईड, आंतरजातीय विवाह होतच राहतात. कमी प्रमाणात का होईना.

संदीप डांगे's picture

4 Jun 2015 - 1:59 pm | संदीप डांगे

सहमत.

खरेसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे ठरवून असे विवाह अशक्यच. प्रेमविवाहामधे जे होतं त्याला तरी समाजाने पाठिंबा द्यावा अशीही अपेक्षा करू शकत नाही.

नाखु's picture

4 Jun 2015 - 2:11 pm | नाखु

अशी जाहीर धोतरफेड बरी नव्हे.. बरं दिसत नाही चार चौघात. आता त्यांनी इतकं थिंकून ग्रेट लिहिलय तर नीट लिसनना जरा, तू म्हणजे कुठे न्यायच्या लायकीचा नाहीस. तोच तुझा प्रोब्लेम (नोट शब्द नीट टाईपला आहे) आहे. तेव्हा गुरुजींकडे शिकवणी लावणे.

काळजीवाहू नाखु.

थोडक्यात प्रिफरेबली उच्चजातीय स्त्रियांनी वाट वाकडी करावी असेच ना?

बॅट्या अरे असे कुठे कोणी लिहिलंय रे ? मी शोधतोय पण मला उल्लेख अथवा तसे सजेशन नाही आढळत आहे म्हणून विचारतोय.

अन असे धागे अन प्रतिसाद असाईड, आंतरजातीय विवाह होतच राहतात. कमी प्रमाणात का होईना.

हे मान्य..

बॅटमॅन's picture

4 Jun 2015 - 3:00 pm | बॅटमॅन

बॅट्या अरे असे कुठे कोणी लिहिलंय रे ? मी शोधतोय पण मला उल्लेख अथवा तसे सजेशन नाही आढळत आहे म्हणून विचारतोय.

कैकदा आडून आडून सजेशन तेच असते. अशाच एका कार्यक्रमात एका साहेबांनी 'मग ब्राह्मण पोरी आम्हांलाही मिळाल्याच पाहिजेत' असे जाहीर विधान केलेले अजून लक्षात आहे, तस्मात यांचा मुख्य रोख कुठे असतो हे सांगणे तसे अवघड नसावे. भलेही ग्रेटथिंकरसाहेबांना मी बेनिफिट ऑफ डौट द्यायला तयार आहे.

ग्रेटथिंकर's picture

4 Jun 2015 - 3:19 pm | ग्रेटथिंकर

मी कुठल्याही ब्रिगेड वा बामसेफी दृष्टीकोनातून हा लेख लिहलेला नाही. ब्राह्मणांचा तर यात उल्लेखही नाही. उच्च नीच जातीय विवाह असाही विषय नाही.
विषय आहे भारतीय समाजाचा जीन पूल वाढवुन एकजीनसी समाज तयार करणे. मग असे विवाह कुठल्याही स्तरातील जातींजातीमध्ये होऊ शकतात. जेणेकरुन Inbreeding depresion कमी होईल. फक्त उच्च व नीच जाती हा मुद्दा गौण ठरावा.
http://www.wikipedia.org/wiki/Inbreeding_depression

बॅटमॅन's picture

4 Jun 2015 - 3:28 pm | बॅटमॅन

तुम्हांला बेनिफिट ऑफ डौट दिलाय असे अगोदरच म्हटलेले आहे, सबब तो विषय नाहीच...

बाकी या अनुषंगाने अजूनेक प्रश्न, दक्षिण भारतात ब्राह्मणांपासून दलितांपर्यंत सर्व जातींत कझिन म्यारेज असते. हे इनब्रीडिंग नव्हे काय? अन त्याचा त्यांना तोटा झाल्याचा काही विदा आहे का?

साती's picture

4 Jun 2015 - 5:54 pm | साती

कॉंन्सॅग्विनस मॅरिजमुळे प्रोजेनी डिफेक्टीव निघण्याचा अतिप्रचंड विदा उपलब्ध आहे.
पिडिएट्रिक्स हा विषय शिकताना एक अख्खा सेक्शनच याप्रकारच्या विवाहांनी होणार्‍या लहान मुलांतील आजारांविषयी आहे.

दक्षिण भारतात गंमत म्हणजे मामा आणि भाच्यांचीही लग्ने होतात.

असाच एक विदा-

http://www.ias.ac.in/jgenet/Vol81No3/91.pdf

या लिंकवरून पुढेपुढे सर्च करत गेल्यास या संदर्भात प्रचंड विदा मिळू शकेल.

पण मग जनरल सौथ इंड्यन पब्लिक डिफेक्टिव्ह असतं का अ‍ॅज़ कंपेअर्ड टु नॉर्थ इंड्यन्स? शिवाय नक्की कसं काय कोरिलेशन वा कॉजेशन आहे ते बघायला आवडेल. हे लै वेळेस ऐकलं आहे पण मग जनरल सौथ इंड्यन पब्लिक असं डिफॉर्म्ड, रोगट दिसत नाही ते कसं काय???? या प्रश्नाचे उत्तर मात्र कोणीच देऊ शकलेले नाही. ते कृपया द्यावे ही विनंती. कारण कझिन म्यारेजला सौथमध्ये अमुकच एका जातीचे असे बंधन नाही.

डिसॅबिलिटी सर्टिफिकेट बनवायच्या कर्नाटक सरकारच्या प्रकल्पात सहभागी झाल्याने इथल्या भागात किती प्रचंड शारिरीक आणि मानसिक विकलांगता आहे याचा विदा आहे.
मात्रं उत्तर भारतीय राज्यांची क्रॉस सेक्शनल डाटा माझ्याकडे तरी नाही.
मात्रं कॉनसँग्विनिटी यातल्या किती विकलांगतेकरिता जबाबदार आहे याचा प्रत्यक्ष आकडा सध्या हातात नाही. ते मोजण्याचे काम चालू आहे.
अर्थात असा प्रायमरी अवस्थेतला डाटा मला सध्यातरी इथे उघड करता येणार नाही.

क्या बात है, एकदम नेमके काम आहे हे. जितके शक्य असेल तितके आणि तेव्हा अवश्य माहिती शेअर करावी, ही विनंती. जमल्यास रिसर्च पेपरही अवश्यमेव पाठवणेचे करावे हे विज्ञापना.

म्हया बिलंदर's picture

4 Jun 2015 - 7:51 pm | म्हया बिलंदर

साहेब प्रिफरेबली उच्चजातीय

म्हणजे

ब्राह्मण पोरी

किंवा

ब्राह्मण "च" पोरी

असं का वाटतं?? अहो जातीय व्यवस्थेने(व्यवस्था??) उच्च आणी निच अशा अनेक ब्राहमणेतर जातींमधे देखील सोय करुन ठेवलेली आहेच की. उगाच का स्वतःला

प्रिफरेबली उच्चजातीय

मानीत "च" रहायचं??

हे आम्ही मानण्या न मानण्यावर नाही, तर अनेकांचा जो रोख असतो तो पाहिल्यावर त्यातून आलेलं आहे.

म्हया बिलंदर's picture

4 Jun 2015 - 10:33 pm | म्हया बिलंदर

व्वा छान!!

आंतरजातीय की आंतरधर्मिय विवाहांना अनुदान वगैरे मिळतं असं मी ऐकलंय. त्यावर कुणी काही प्रकाश टाकू शकेल काय?

आदूबाळ's picture

4 Jun 2015 - 2:34 pm | आदूबाळ

लोल! काय सांगता!

महाराष्ट्र शासनानेच अनुदान जाहीर केलेय असे वाचनात आले होते मध्यंतरी.

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Jun 2015 - 12:17 pm | llपुण्याचे पेशवेll

तसे अनुदान आहेच. पण ते इतके कमी आहे ते पाहते ते दलित जातीत आंतर जातीय (महार + चांभार, महार + ढोर)किंवा वनवासी लोकांमधे असे विवाह प्रमोट करण्यासाठी असावे. पूर्वी युपीए च्या काळात त्याची जाहीरात ढँण ढँण वाजत असायची रेडीओवर. हल्ली रेडीओ ऐकायला वेळ मिळत नाही. असो.
ते अनुदान अजूनही असावे असे वाटते.

भुमन्यु's picture

4 Jun 2015 - 6:55 pm | भुमन्यु

आंतर जातिय विवाह केल्यास ५०००० अनुदान महाराष्ट्र सरकार कडुन मिळते.
दुवा १
दुवा २

अलबेला सजन's picture

4 Jun 2015 - 3:14 pm | अलबेला सजन

होय. आंतरजातीय व आंतरधर्मिय विवाहांना महाराष्ट्र शासनाकडुन रु. ५००००/- (पन्नास हझार) इतक अनुदान मिळतं.
पुर्वि हे अनुदान रु. १५००० त्यमधे रु. ७५०० चि किसान विकास पत्र व ७५०० चि भान्डि असे होते. मात्र २०१० च्या शासन निर्णयानुसार हि रक्कम आता रु. ५००००/- इतके करण्यात आलेले आहे.
आंतरजातीय विवाहामध्ये वर व वधुपैकि एक जण खुल्या प्रवर्गातिल व दुसरा मागासवर्गिय असणे अभिप्रेत आहे.
व हे सर्व जिल्हा परिषद मधिल समाजकल्याण विभागाच्या अखत्यारित येते.

असंका's picture

4 Jun 2015 - 3:20 pm | असंका

धन्यवाद हो ...!!
रच्याकने , २५००० ची भांडी देत नसावेत

असंका's picture

4 Jun 2015 - 3:22 pm | असंका

धन्यवाद हो ...!!

आदिजोशी's picture

4 Jun 2015 - 3:44 pm | आदिजोशी

एकंदर समाज व्यवस्था बघता हा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा सरसकट सगळ्या मुलांना पैष्टीक आहार, उत्तम शिक्षण आणि भरपूर व्यायाम दिला की आपोआप सगळे काही वर्षात एका पातळीवर येतील.

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Jun 2015 - 12:18 pm | llपुण्याचे पेशवेll

कृपया, असले सरळ मार्ग सुचवू नका.

मृत्युन्जय's picture

4 Jun 2015 - 4:18 pm | मृत्युन्जय

मला असे वाटते की असा संकुचित विचार करणे बरे नव्हे. जगातल्या सर्व लोकांनी एकत्र येउन एकदा आंतर्देशीय विवाह करणे सुरु करावे. म्हणजे संपुर्ण जगाचे जनुक बदकुन जाइल आणि समस्त जगतातल्या मानव वंशास त्याचा फायदा होइल. तोवर इतर कुठल्या ग्रहात जीवसृष्टी आहे असे आढळुन आल्यास आणि संकरातुन जीवनिर्मिती शक्य आहे असे आढळल्यास तसेही प्रयत्न करुन बघावेत म्हणजे समस्त ब्रह्मांडातील जीवसृष्टीला त्याचा फायदा होइल.

विज्ञान इतके प्रगत झालेच आहे तर मानव आणी इतर प्राण्यांच्या संबंधाने जीवनिर्मिती शक्य आहे का ते देखील बघावे आणि त्या अनुषंगाने प्रयत्न करावे. असे झाल्यास संपुर्ण प्राणीजगताची जनुकीय संरचना बदलुन जीवसृष्टीला त्याचा खुपच मोठा फायदा होइल.

बॅटमॅन's picture

4 Jun 2015 - 5:31 pm | बॅटमॅन

आणि असे केल्याने समाजाला म्युटंट एक्समेनदेखील लाभतील तो एक वेगळाच लाभ झाला.

मृत्युन्जय's picture

4 Jun 2015 - 6:57 pm | मृत्युन्जय

योग्य विचार. सध्या म्युटंट्स फक्त अमेरिकेत तयार होतात मग संपुर्ण ब्रह्मांडात तयार व्हायला लागतील. त्यांच्या सुपर्नॅचरल पॉवर्समुळे जगाचे कल्याण होइल. अर्रे देवा मनुष्याला हे आधी का नाही सुचले रे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Jun 2015 - 7:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हा मुद्दा विचारात घेणेबल आहे.

मला असे वाटते की असा संकुचित विचार करणे बरे नव्हे. जगातल्या सर्व लोकांनी एकत्र येउन एकदा आंतर्देशीय विवाह करणे सुरु करावे. म्हणजे संपुर्ण जगाचे जनुक बदकुन जाइल आणि समस्त जगतातल्या मानव वंशास त्याचा फायदा होइल. तोवर इतर कुठल्या ग्रहात जीवसृष्टी आहे असे आढळुन आल्यास आणि संकरातुन जीवनिर्मिती शक्य आहे असे आढळल्यास तसेही प्रयत्न करुन बघावेत म्हणजे समस्त ब्रह्मांडातील जीवसृष्टीला त्याचा फायदा होइल.

+१०*n

रच्याकने, आपल्या देशाची सद्य लोकसंख्या, पोरांच्या शाळेच्या/कॉलेजांच्या फिया, वाढती स्पर्धा येवढे उपद्व्याप असूनही लोकांना अजूनही पोरेबाळे हवी असल्याचं वाचून हसावं की रडावं ते कळत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jun 2015 - 9:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जगातल्या सर्व लोकांनी एकत्र येउन एकदा आंतर्देशीय विवाह करणे सुरु करावे.

जगातले सर्व लोक एकत्र आले आणि एखादा निर्णय अंमलात आणला गेला असं होत नसतं. आपण म्हणता तसे आंतर्देशीय विवाहही सुरु होतीलच ते आंतरधर्मीय विवाह म्हणुन आता मान्यता पावत आहेत आणि आजच्या जालीय युगात अधुन मधुन अशा बातम्या वाचायला मिळतातही. अशा गोष्टींसाठी चळवळ गरजेची असते. अशी चळवळ मग जातीभेद दुर व्हावेत म्हणुन सावरकरांनी लावलेले आंतरजातीय विवाह असतील किंवा ‘आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाची चळवळीस प्रोत्साहन देणारे अंनिस‘चे संस्थापक-अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर असतील अशा आधुनिक विचारांशी बांधलेल्या गेलेल्या लोकांनी सतत काम सुरु ठेवले लोकांमधे जागृती केली आणि एक निकोप दृष्टी आता वाढू लागलेली दिसते, असे अनेक लोकनेते जन्माला येतील, काही लोकांना विचार पटू लागेल आणि असे विवाह पुढे वाढीस लागतील.

संपुर्ण जगाचे जनुक बदकुन जाइल आणि समस्त जगतातल्या मानव वंशास त्याचा फायदा होइल.

मानव वंशास फायदा होईल अशा गोष्टी भविष्यात होतच राहतील. कोणती जनुके मानवाच्या फायद्याची आहेत त्याचा विचार भविष्यात येईलच. मानवी शरीरातील पस्तीस हजार जनुकीय गोष्टी आहेत असे म्हणतात त्यातील काही मेंदु चेतसंस्था यासाठी कार्यरत असतात. मानवांच्या डोळ्यांसाठी, कानाने कितीतरी दुरवरचा आवाज ऐकु यावासाठी, पोक काढुन बसणा-यांसाठी भविष्यात विज्ञानाला जनुकीय बदल करावेच लागतील आंतरजातीय विवाहामुळे सहज काही जनुकीय बदल होणार असतील तर असे बदल होण्यासाठी आपल्याला काही विचार करायची आणि विरोध करायची गरज नसेल लोकच स्वत: अशा गोष्टीला तयार होतील, असे वाटते.

-दिलीप बिरुटे

मृत्युन्जय's picture

5 Jun 2015 - 11:51 am | मृत्युन्जय

जगातले सर्व लोक एकत्र आले आणि एखादा निर्णय अंमलात आणला गेला असं होत नसतं.

तुमच्या प्रतिसादाच्या अनुषंगाने हा धागा या वाक्यातच बाद करुयात असे नमूद करु इच्छितो. कारण जसे जगातले येउ शकत नाहित तसे भारतातलेही येउ शकत नाहित मग तर.

आपण असा निराशावादी सूर आळवण्याची काहिच गरज नाही. आपण आपले ध्येय मोठे आणि सुस्पष्ट ठेउयात. जागतिक जनुकीय बदलाची ही नांदी ठरु देत. टांझानियाची अबेदा आणि कवठे महांकाळचे पाटील यांच्या संबंधातुन जनुकीय क्रांती घडवुन अवघे विश्व समृद्ध करणारी संतती निर्माण व्हावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहुन मानवजातीला प्रोत्साहन देत राहुयात हीच प्रभूचरणी प्रार्थना ( वैज्ञानिक दृष्टीकोनातुन जनुकीय क्रांती घडवुन आणली जात असताना प्रभूची प्रार्थना केलेली चालेला ना?). आमेन.

खटपट्या's picture

5 Jun 2015 - 2:07 pm | खटपट्या

जगातील सर्व लोकांनी एकत्र येउन काही केलं जाउ शकतं का की नाही हे माहीत नाही. पण माझ्या चार ते पाच वर्षाच्या परदेशातील वास्तव्यात मला काही गोष्टी कटाक्षाने जाणवल्या.
१. गोरे लोक भारतीय मुलींशी लग्न करायला खूप उत्सुक असतात. माझ्या दोन सहकार्‍यांनी तेलगू मुलींशी लग्न केले होते. कारण विचारता "घटस्फोटाची शक्यता खूप कमी आणि भारतीय मुली नवर्‍याला मान देतात आणि त्यांची काळजी घेतात" असे त्यांचे मत

२. काही वयाने जास्त असलेल्या मुली/बायका भारतीय पुरषांशी लग्न करायला उत्सुक असतात. कारण विचारता "घटस्फोटाने कंटाळलेल्या असतात."

अर्थात हे माझे मत, निरीक्षण आणि अनुभव आहे. ईतर लोकांचे निरीक्षण/मत वेगळे असू शकते.

"घटस्फोटाची शक्यता खूप कमी आणि भारतीय मुली नवर्‍याला मान देतात आणि त्यांची काळजी घेतात"

नॉट एनीमोर, अप्यारंटलि.

टवाळ कार्टा's picture

5 Jun 2015 - 2:17 pm | टवाळ कार्टा

खिक्क...भारतीय मुली एक घाव दोन तुकडे करून संपवण्यापेक्षा टोचून टोचून स्लो डेथवर जास्त विश्वास ठेवतात ;)

+१ (जोडीदाराच्या ना ? )

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Jun 2015 - 2:59 am | निनाद मुक्काम प...

आयला
अजाणतेपणी आम्ही ह्या महान कार्यात आपला खारीचा वाटा उचलला हे पाहून आमचे उर भरून आले.

शब्दबम्बाळ's picture

5 Jun 2015 - 12:01 am | शब्दबम्बाळ

@मृत्युंजय साहेब, तुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया उपहासात्मक वाटली. आपल्याबद्दल मला माहिती नाही पण तरीही आपण जर बाहेर फिरला असाल तर हे पाहिलच असेल कि आंतरदेशीय विवाह हे होतच असतात आणि ज्यांना त्याचा फायदा होणार आहे, त्यांना होईलच! इथे लेख भारताबद्दल आहे आणि त्यामुळे तुमची प्रतिक्रिया संयुक्तिक वाटत नाही.

काळा पहाड's picture

5 Jun 2015 - 12:41 am | काळा पहाड

ते आंतर्देशीय "अरेंज्ड मॅरेज" बद्दल बोलतायत. लव्ह मॅरेज बद्दल नव्हे. म्हणजे बघा, पाकिस्तान मधले हाफीझ मसूद सईद यांची कन्या आणि अमेरिकेतले श्री. जेब बुश यांचे भाऊ यांचं लग्न केवळ जनुकीय गरजेसाठी करण्याबद्दल विचार करूया. किंवा सोमालियायाचे अब्दुल मोम्बासा (अतिशय गाजलेले माजी समुद्री चाचे) यांच्या कन्येचा विवाह श्री. शब्दबंबाळ यांच्या पुत्राशी ५० बकर्‍या आणि ५ म्हशी घेवून विवाह. फक्त जनुकीय गरजेसाठी हं. किती रोमांचक कल्पना ना?

तुमचा मुद्दा : "ते आंतर्देशीय "अरेंज्ड मॅरेज" बद्दल बोलतायत. लव्ह मॅरेज बद्दल नव्हे"
त्यांच्या पूर्ण प्रतिक्रियेत अरेंज्ड किंवा लव्ह मॅरेजबद्दल एकही शब्द नाहीये. हा अर्थ आपण "सोयीस्कर"रित्या काढलेला दिसतोय.
तुमची इतकी जळजळ का झाली हे कळाले नाही पण खाली मी लेखावर दिलेली प्रतिक्रिया वाचायचे कष्ट घेतले असते तर मी हि जनुकीय कारणासाठी लग्नाच्या कल्पनेला विरोधच दर्शवला आहे हे समजले असते तुम्हाला!

आणि पुन्हा, इथे लेख भारताबद्दल आहे आणि त्यामुळे उगाच भरकटू नका!

मृत्युन्जय's picture

5 Jun 2015 - 10:57 am | मृत्युन्जय

माझ्या पहिल्या प्रतिक्रियेत लव्ह मॅरिज असेल तर प्रश्नच मिटला अश्या आशयाला एक उल्लेख होता. तो काप नी वाचलेला असावा. कदाचित आपण वाचलेला नाही.

मृत्युन्जय's picture

5 Jun 2015 - 11:26 am | मृत्युन्जय

मी आपल्याइतका जग फिरलेलो नसेन कदाचित पण इतके माहिती आहे की भारतीय लोकांचे परदेशी लोकांबरोबर फार कमी विवाह होतात. आंतरजातीय विवाहांपेक्षा हे प्रमाण कमीच असेल. आता केवळ माझे मत खोडण्यासाठी एखादा निनाद मुकाम पोस्ट जर्मनीचे उदाहरण देइल पण ते अपवादात्मक उदाहरणच आहे. एकुण लोकसंख्येचा विचार करता अशी उदाहरणे कमीच.

शिवाय आपण नीट लेख वाचला असता आपल्याला कळेल की लेख भारताबद्दल नसुन जनुकीय विकासाबद्दल आहे. त्यामुळे मी संकुचित विचार बाजूला ठेवायचा सल्ला देउन व्यापक दृष्टीकोन समजावुन सांगितला. आंतरदेशीय विवाहांचे देखील तेच फायदे असु शकतील जे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांचे आहेत. शिवाय माणसाने फक्त माणसापुरता विचार का करायचा? त्याने आधिक व्यापक विचार केला तर संपुर्ण सृष्टीच जनुकीय दृष्ट्या समृद्ध होणार नाही का? आज तुम्हाला असले विचार टॅबू वाटतीलही कदाचित पण व्यापका हिताच्या दृष्टीकोनातुन हा विचार देखील झालाच पाहिजे. खासकरुन यामुळे जनुकीय क्रांती होणार असेल तर नक्की.

तुम्ही विचार करा टांझानियाची लुलु आणि कवठे महांकाळचे पाटील (इथे नावे केवळ वानगी दाखल आहेत) यांच्या संबंधांनी एक अतिशय समृद्ध जनुकीय संतती निर्माण होणार असेल तर अश्या विवाहांना प्रोत्साहन द्यायला नको?

तुमच आधीच वाक्य: " जगातल्या सर्व लोकांनी एकत्र येउन एकदा आंतर्देशीय विवाह करणे सुरु करावे."
आंतरदेशीय विवाह :- जगातल्या भिन्न देशाच्या लोकांनी आपापसात केलेला विवाह
मग इथे आता तुम्ही जे म्हणताय "की भारतीय लोकांचे परदेशी लोकांबरोबर फार कमी विवाह होतात." त्याचा संबंध येतोच कुठे?
मुळात तुमच्या प्रतिक्रियेमध्ये आंतरदेशीय विवाह हि कल्पना "फक्त" भारतीय लोकांसाठी मांडलीच नव्हती. म्हणून मी म्हणालो ज्यांना फायदा होणार आहे(जर काही असला तर) त्यांना होईल.
आधी आपल्या देशात तरी मोकळेपणा येऊ दे लोकांच्या विचारात!

आता लेखाच म्हणाल तर, "आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे" या वाक्याने सुरुवात झाली आहे आणि आपल्या इथे जनुकीय विकास कसा साध्य करता येऊ शकतो याविषयी लेखकाने स्वतःची मते मान्डली आहेत. अर्थात आपण पूर्ण जग बदलू इच्छित असाल तर माझा काहीही आक्षेप नाहीच आहे. पण तुमच्या प्रतिक्रियेत उपहासच जास्त दिसल्यामुळे मी माझे मत मांडले होते.

बाकी वानगी दाखल उदाहरण देण्याची गरज समजली नाही, मी हि चांगली उदाहरणे देऊ शकतो पण जाऊ दे, आपल्यात तेवढा फरक राहून देतो!

मृत्युन्जय's picture

5 Jun 2015 - 12:14 pm | मृत्युन्जय

१. मी जगातल्या भिन्न लोकांनी एकत्र येउन विवाह करण्ञाबाबत बोलतो तेव्हा त्यात भारतही येतो. भारत जगात येते असे मला इयत्ता पहिलीत शिकवले आहे. त्यामुळे इथे योग्य संबंध आहे.
२. मी व्यापक भूमिका घेतली आहे ज्याचे आपण खरे म्हणजे कौतुक करायला हवे,
३. लेखाची सुरुवात ज्या अनुषंगाने झाली आहे त्याच अनुषंगाने मी मत मांडले आहे आणि उदाहरणे दिली आहेत.
४. मी पुर्ण जग बदलु इच्छित आहे असे काही नाही. नाही असेही काही नाही. मी एक मत मांडले फक्त.
५. माझ्या प्रतिक्रियेत आपल्याला उपहास दिसला असेल तर त्याला मी काय करु शकतो?
६. उदाहरणे दिल्यामुळे मुद्दा नीट कळतो.
७. आपण माझ्यापेक्षा चांगली उदाहरणे देउ शकत असाल तर जरुर द्यावीत म्हणजे सगळ्यांनाच मुद्दे नीट कळतील.
८. आपल्यात तेवढा फरक राहु द्यात या वाक्याचा अर्थ नाही कळला. आपण चांगल्या अर्थानेच बोलला असेल असे समजतो

काळा पहाड's picture

5 Jun 2015 - 12:38 pm | काळा पहाड

८. आपल्यात तेवढा फरक राहु द्यात या वाक्याचा अर्थ नाही कळला. आपण चांगल्या अर्थानेच बोलला असेल असे समजतो

जनुकीय फरक? (काडी टाकण्याचे वगैरे आयकन्स कसे टाकायचे हो?)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jun 2015 - 12:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>मी व्यापक भूमिका घेतली आहे ज्याचे आपण खरे म्हणजे कौतुक करायला हवे,

मला वाटतं व्यापक भुमिकेपेक्षा प्रतिसाद उपरोधाने भरलेला होता.

-दिलीप बिरुटे

मृत्युन्जय's picture

5 Jun 2015 - 12:57 pm | मृत्युन्जय

असे तुम्हाला वाटते. त्यातली व्यापक भूमिका तुम्ही लक्षात का घेत नाही?

ग्रेटथिंकर's picture

4 Jun 2015 - 5:24 pm | ग्रेटथिंकर

@मृत्युंजय महाराज, जरा सेन्सीबल चर्चा करा प्लीजच.

मृत्युन्जय's picture

4 Jun 2015 - 6:53 pm | मृत्युन्जय

मी एकदम सेन्सिबल विचार मांडला आहे. काय चुकीचे आहे त्यात? मी तुमचाच प्रतिवाद अजुन थोडा पुढे नेला आहे इतकेच. भारतातले आंतरजातीय / धर्मीय विवाहाल प्रोत्साहन मिळाले पाहिजे तसे इतर गोष्टींना का नको? आणी त्याहीपुढे जाउन माणसाने फक्त माणसाचाच विचार का करावा मग? तुम्हीच जरा सेन्सिबल विचार करा. प्लीजच्च्च.

कहर's picture

5 Jun 2015 - 11:53 am | कहर

१००% सहमत…
धाग्यावर जसा आंतर उपजातीय किंवा आंतर पोटजातीय विवाहाच्या (जे अजून नीटसे होत नाहीत ) पुढे जाउन आंतरजातीय / धर्मीय विचार मांडला असेल तर त्याही पुढे जाउन आंतरदेशीय / आंतर खंडीय (प्रचंड जनुकिय विविधता ) विवाहाच्या विचारला काहीच हरकत नसावी

र च्या क ने … समजा सहा फुटीय मी तुमच्या धागाकर्त्याच्या उदाहरणाप्रमाणे तीन फुटीय मुलीशी आंतर उंचीय विवाह केला तर होणाऱ्या साडे चार फुटीय अपत्याशी विवाह करण्यासाठी माझ्यासारख्या आंतर विचारांची साडेसहा फुटीय व्यक्ती मिळेल का ? (आणि तीन फुटीय व्यक्तीशी विवाहाचे दूरगामी परिणाम नंतर होतील पण नजीकगामी रोज रातीय (दूष:) परिणाम श्री अमिताभ बच्चन साहेबांना विचारावेत का ? कारण पित्याशी याच चर्चेनंतर श्री अभिषेक बच्चन साहेबांनी राणी मुखर्जी बाईसाहेबांशी विवाह तहकूब केल्याचे ऐकिवात आहे. )

@बॅटमॅन आणि मृत्युंजय साहेब - भलेही पुरोगामी चळवळीतील ब्राह्मण द्वेष वाढत आहे हे मान्य केले तरीही सरसकट प्रत्येक पुरोगाम्याला आणि तसा विचार मांडणार्‍याला ब्राह्मण द्वेष्टी असल्याच्या पूर्वग्रहातून बघणे बरोबर नाही. तुमच्या वैतागामागे लेखकाच्या एकांगी प्रतिसादाचा इतिहास आहे हे माहिती आहे. तरीही मूळ लेखामध्ये तसा काही सूर नसताना विनाकारण हा विषय आणून चर्चा भरकटवणे खटकले. तुमच्या मिपावरच्या एकंदर लिखाणाबद्दल आदर आणि संयत प्रतिवाद करण्याच्या क्षमतेबद्दल विश्वास असल्यामुळे हे सुचवण्याचे धाडस केले. लहान तोंडी मोठा घास घेतल्याबद्दल माफी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jun 2015 - 6:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरसकट प्रत्येक पुरोगाम्याला आणि तसा विचार मांडणार्‍याला ब्राह्मण द्वेष्टी असल्याच्या पूर्वग्रहातून बघणे बरोबर नाही.
सहमत.

-दिलीप बिरुटे

म्हया बिलंदर's picture

4 Jun 2015 - 7:54 pm | म्हया बिलंदर

सहमत

विनोद१८'s picture

4 Jun 2015 - 6:35 pm | विनोद१८

@बॅटमॅन आणि मृत्युंजय साहेब - भलेही पुरोगामी चळवळीतील ब्राह्मण द्वेष वाढत आहे हे मान्य केले तरीही सरसकट प्रत्येक पुरोगाम्याला आणि तसा विचार मांडणार्‍याला ब्राह्मण द्वेष्टी असल्याच्या पूर्वग्रहातून बघणे बरोबर नाही.

हे बरोबर, आता मुळ धाग्याला सोडुन थोडेसे विषयांतर होइल असे वाटते. माझ्या समजुतीप्रमाणे या 'तथाकथीत पुरोगामांच्या' इतिहासाकडे जर पाहिले तर अगदी असेच दिसून येइल. माझ्या मते, पुरोगामी होण्याची पहिली पायरी ही नेहमीच फक्त आणि फक्त हिंदुद्वेश्टेपणा अंगात मुरविल्याशिवाय ओलांडता येत नाही. येथे हिंदुद्वेश्टेपणा म्हणजेच ब्राह्मणद्वेष्टेपणा असा घ्यावा. म्हणुनच कदाचित असे तुम्ही समजता तसे प्रतिसाद येत असावेत.

बॅटमॅन आणि मृत्युंजय साहेब

साहेब ?? असो.. तुमचा प्रतिसाद मान्यच. बॅट्याने तसाही बेनिफिट ऑफ डौट्ट दिलाच आहे नंतर. तेव्हा सर्वांनीच कोणताही विशिष्ठ जाति-उल्लेख मग तो तथाकथित उच्चवर्णीय अथवा इतर कोणत्याही जातीचा असेल तो टाळावा.

लहान तोंडी मोठा घास घेतल्याबद्दल माफी.

त्या दोघांनाही ओळखत नाही मी. तरी देखील इतक्या विनम्रतेची काहीही गरज नव्हती असे नमूद करतो. उगी ते नाटकी वाटतं. आणि तुम्ही इतकेही काही कोणास दुखावणारे बोललेले नाही आहात.
बॉटम लाईन म्हणजे, जालावर कोणी लहान मोठा नै. बॅट्या कालिजात जाणारा पोरगा असेल आणि मी साठीतला प्रकांड पंडित असेन तरी माझ्या न पटलेल्या प्रतिसादाची तो पिसे काढू शकला पाहिजे आणि vice versa..

(जालावर मान-अपमान घेऊन येऊ नयेत असे मानणारा )

आदर हा वयाचा नाही ज्ञानाचा आहे. मिपावर असे काही आयडी आहेत ज्यांना काही सुचवताना किंवा प्रतिवाद करताना अशी विनम्र होण्याची ईच्छा होते. शेवटी ज्याचा त्याचा स्वभाव वगैरे...

मृत्युन्जय's picture

4 Jun 2015 - 6:50 pm | मृत्युन्जय

आपण दाखवलेल्या विश्वासाबद्दल आनंद अहे. परंतु या प्रतिसादात माझे नाव का आले ते कळाले नाही. मी तर माझ्या प्रतिसादात कुठेही ग्रेटथुंकर ब्राह्मणद्वेष्टे आहेत असे म्हटलेले नाही (ते तसे नाहितच असे काही मला म्हणायचे नाही पण ते तसे आहेत असे मी तरी कुठेही म्हटलेले नाही).

नाखु's picture

4 Jun 2015 - 7:23 pm | नाखु

असेलही पण माणूस ताक सुद्धा फुंकून पितो म्हणून बॅटमण ने प्रतीपादले असावे असा कयास आहे.
आणि ही गोष्ट जालावरही लप्प्न राहिली नाहीच अगदी आजच्या ताज्या घडामोडीत याचा उल्लेख आहे.

नक्की काय

खरे कारण

आणि सुरवातीसच संशयाचा फायदा असा स्पष्ट उल्लेख असताना पुढील प्रतीसादाची गरज नसावी.

हाडक्या साहेब आपण दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाबद्दल अभिनंदन

पण असे शेरे ऐकायची सवय झाल्याने मी सुद्धा बॅटोबाच्या प्रतिसादाला अनुमोदन दिले.

आप्ल्या सर्वंकश भूमीकेचे स्वागतच आहे.

नेमस्त नाखु

हाडक्या's picture

4 Jun 2015 - 9:44 pm | हाडक्या

हाडक्या साहेब

ऑ ..? कय चुकलं माकलं कय हो काका ?
नका हो साहेब वगैरे म्हणू असे.. :)

तुमचे नाव या प्रतिसादामुळे आले. तुमच्या नेहमीच्या तर्कशुद्ध आणि वस्तुनिष्ठ लेखनाच्या प्रतिमेला छेद देणारा युक्तिवाद वाटला तो. कारण मुळात कुणी सरसकट ७ किंवा ५ असणार नाही. प्रत्येकामध्ये काही गोष्टी ५ रँकींगच्या तर काही ७ रँकींगच्या असतात. मुळ लेखनात असे दोन वेगवेगळ्या जेनेटीक पूल मधून आलेल्या पालकांच्या मुलांना दोघांच्यापण चांगल्या (७ रँकींगच्या) जीन्सचा फायदा होऊ शकेल असे सांगितले आहे.

मृत्युन्जय's picture

5 Jun 2015 - 11:36 am | मृत्युन्जय

भलेही पुरोगामी चळवळीतील ब्राह्मण द्वेष वाढत आहे हे मान्य केले तरीही सरसकट प्रत्येक पुरोगाम्याला आणि तसा विचार मांडणार्‍याला ब्राह्मण द्वेष्टी असल्याच्या पूर्वग्रहातून बघणे बरोबर नाही.

मी माझ्या प्रतिसादात (ज्याचा तुम्ही उल्लेख केला आहे) ब्राह्मण शब्द कुठे वापरला आहे. तसेच ग्रेटथु़ंकर ब्राह्मणद्वेष्टे आहेत असे कुठे म्हटलेले आहे (ते तसे नाहितच असे काही माझे म्हणणे नाही पण ते तसे आहेत असे मी कुठेही म्हटलेले नाही) हे कृपया दाखवुन द्या अन्यथा माझा उल्लेख गैरसमजातुन आला आहे असे मान्य करा अशी मी आपल्याला नम्र विनंती करु इच्छितो. मी कुठल्याही पुरोगाम्याला माझ्या सदर प्रतिसादार ब्राह्मण द्वेष्टा म्हटलेले नाही (हॅविंग सेड दॅट, ग्रेटथु़ंकर पुरोगामी आहेत की नाहित याबद्दलही मी काही मतप्रदर्शित केलेले नाही आहे याची कृपया नोंद घ्यावी).

लेखक ब्राह्मण्द्वेष्टा असल्याचा आरोप आपण केला नाही हे मान्य. परंतु आपला प्रतिसाद अकारण पुर्वग्रहदुषित व अतार्किक वाटला. दोघांना वेगवेगळा प्रतिसाद देण्यापे़क्षा एकच प्रतिसाद देण्याचा आळस केला कारण मला दोघांनाही एकच विनंती करायची होती की लेख कोणी लिहिला आहे यापेक्षा काय लिहिला आहे हे बघुन उत्तर द्या आणि पुर्वग्रह ठेवु नका.
तार्किक प्रतिसादाचे सुंदर उदाहरण खाली इस्पिकच्या एक्का यांच्या 'या लेखातले अनुमान सरळधोपट आहे' प्रतिसादामध्ये दिसते..

ते खाली एकाने ऐसीअक्षरे.कॉम वरच्या प्रतिसादाची लिंक उद्धृत केलीये. तो प्रतिसाद पहा आणि ठरवा की ग्रेटथुंकर ब्राह्मणद्वेष्टे आहेत किंवा नाहीत ते.

शब्दबम्बाळ's picture

5 Jun 2015 - 3:52 pm | शब्दबम्बाळ

अहो पण जरी आपण मान्य केल कि ते ब्राह्मणद्वेष्टे आहेत तरी त्यांच्या या लेखात त्यांनी कोणत्याही जातीवर टिप्पणी केलेली नाहीये.
ज्या संकेतस्थळावर त्यांनी ती प्रतिक्रिया दिली होती, ती योग्य नव्हती आणि तिथे त्यावर टीका - टिप्पणी झालीच असेलच!
पण हा धागा मिपावर आहे, आणि धाग्यातील "मुद्द्यांवर" चर्चा होणे अपेक्षित आहे, जे काही लोक करत आहेत…

मृत्युन्जय's picture

5 Jun 2015 - 5:01 pm | मृत्युन्जय

वैज्ञानिक दृष्टीकोनातुन माझा प्रतिसाद कसा अतार्किक आहे हे कोणी समजावुन सांगितल्यास मी तद्नुषंगाने दुरुस्ती करायला तयार आहे. अन्यथा माझा प्रतिसाद ही ग्रेटथु़ंकरांच्या धाग्याच्या आशयाला अनुसरुनच आहे. त्यांनी जो युक्तिवाद केला आहे त्याचा मी विस्तार केला आहे एवढेच. त्यांच्या लोककल्याणकारी योजनेचा मी विस्तार केला आहे. एका विधानाने भौगोलिक सीमा मोडुन तो विस्तार घडवुन आणल आहे तर दुसर्‍या विधानाने मानववंशाने अप्पलपोटा विचार सोडुन देउन समस्त प्राणीवर्गाचा आणि जीवसृषटीचा विचार केला आहे. त्यात योग्य तिथे "शक्य असेल तर" वगैरे शब्दांचा उपयोग करुन विचारांना केवळ एक दिशा दिली आहे.

धाग्यावरचा प्रतिसाद केवळ मूळ युक्तिवादाचा विस्तार आहे. धाग्यातील युक्तिवादाच्या अनुषंगाने मी लिहिलेले कसे आणि किती चुकीचे आहे हे कळाले तर त्यात नक्की बदल करता येतील असे मी आपल्याला आश्वासन देतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jun 2015 - 6:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुद्दा पटणारा. भविष्यकाळात जनुकीय गरज म्हणुन असे विवाह होतील की नै माहिती नाही. परंतु भविष्य काळात आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह होतील कारण सामाजिक चौकटी आणि परंपरा यांच्या पायर्‍या खचू लागल्या आहेत. धर्माच्या बाबतीत अतिशय कट्टर असलेले तो कोणताही समाज असू देत, परंतु आता त्यांनी असला कट्टरपणा सोडून दिलेला दिसतो आणि लवचिक धोरण स्वीकारलेले दिसते. प्रेमविवाह करणार्‍यांची संख्या आता वाढत चालली आहे. मुला-मुलींचे लग्न आता पालकांच्या काळजीचे विषय झालेले आहेत. धार्मिकता आणि परंपरेच्या जोखडात बांधुन घेतलेल्यांनी आपल्या मुलीने चांगला कर्ता धर्ता मुलगा निवडला ना, याचा आनंद पालकांच्या मनात दडलेला दिसतो. लोक काय म्हणतील याचं दडपण असतं पण आता त्या गोष्टीकडे लोक दुर्लक्ष करायला लागले आहेत, मला वाटते, जनुकीय बदलांसाठी नाही, पण भविष्यात आपण म्हणता तसे जनुकीय बदल नक्की दिसून येतील असे मला वाटते.

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jun 2015 - 7:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

या लेखातले अनुमान सरळधोपट आहे, पण वस्तूस्थिती इतकी सोपी नाही.

जनुकांच्या सरमिसळीने उत्तम जनुकेच निर्माण होतील हे विधान शास्त्रिय नाही...

माता आणि पित्याकडून येणारी (सरमिसळ होणारी) जनुके कोणत्या प्रकारची आहेत त्यावर मुलांची जनुके कशी असतील हे अवलंबून असते. ही सरमिसळ स्वैर (random) असल्याने, मातापित्यात लग्नापूर्वीचे जवळचे कौटुंबिक-जातीय-धार्मीक संबध नसल्यास त्यातून नेहमी अथवा बहुतेक वेळेस उत्तम जनुकीय संच तयार होईल हे म्हणणे तार्किक नाही. कारण प्रत्येकी अंदाजे २४,००० जनुके असलेल्या मातृ आणि पितृ या दोन संचांची व्यवहारात अगणित परम्युटेशन्स-कॉंबिनेशन्स होतात ! त्यातला केवळ एकच संच एका मुला/मुलीत असेल. तो उत्तमच असेल याची खात्री कशी काय असेल ?

मात्र, मातापित्याच्या जनुकीय संचांत वेगळेपणा जेवढा जास्त तेवढे रिसेसिव जनुकीय आजारांचे तोटे टळण्याची शक्यता नक्कीच वाढते...

रिसेसिव जनुकिय आजारांमध्ये मानवाच्या जनुकाच्या जोडीतले एक रोगकारक व दुसरे आरोग्यपूर्ण जनुक असल्यास, त्या एका रोगकारक जनुकामुळे रोग पुढच्या पिढीत संक्रमित होउ शकतो, पण तो रोग सद्यपिढीत प्रकट होत नाही (डॉर्मंट राहतो). प्रयोगशाळेतील परिक्षणांत अश्या रोगांची चाहूल (trait) लागू शकते पण तो रोग आस्तित्वात (manifestation) येत नाही. असे रोग आस्तित्वात येण्यासाठी जनुकाच्या जोडीतील दोन्हीही जनुके रोगकारक असणे आवश्यक असते.

जवळच्या नातेवाईकांमध्ये बरीच जनुकिय समानता असणे ही नैसर्गिक बाब आहे. त्यामुळे जवळच्या नातेवाईकांत लग्ने झाल्यास त्यापासून होणार्‍या संतत्तीला मातेकडून एक आणि पित्याकडून एक अशी एकाच प्रकारच्या रोगकारक रिसेसिव जनुकांची जोडी मिळण्याची शक्यता जास्त असते. अर्थातच, जवळच्या (पहिल्या, दुसर्‍या अथवा तिसर्‍या स्तरांच्या) नातेवाईकात लग्न करण्याची प्रथा असलेल्या समाजांत काही रिसेसिव जनुकिय आजारांचे प्रमाण सर्वसामान्य जनतेच्या मानाने जास्त दिसते. त्याविरुद्ध, खूप दूरचे नातेवाईक असलेल्या अथवा कौटूंबिक संबंध नसलेल्या स्त्री-पुरुषांच्या (जनुकिय वैविध्य असण्याची शक्यता असणार्‍या) संबंधाने रोगट जनुकांची जोडी बनण्याची शक्यता कमी होऊन मूल निरोगी असण्याची शक्यता वाढते.

आंतरजातीय किंवा आंतरधर्मिय विवाहांत रिसेसिव रोगकारक जनुकिय जोडी बनणे अधिकच कठीण असते त्यामुळे मुलांत रिसेसिव जनुकिय रोगांचे प्रमाण कमी असण्याची शक्यता खूपच वाढते...
परंतु, अश्या विवाहातील संतत्ती नेहमीच आणि सर्वप्रकारे/बहुप्रकारे शारीरीकदृष्ट्या जास्त सबळ, जास्त निरोगी अथवा जास्त बुद्धिमान होईलच असा त्याचा अर्थ नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jun 2015 - 7:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

अजून एक...

आंतरजातीय, आंतरधर्मिय किंवा आंतरराष्ट्रीय विवाहांमुळे बदलणार्‍या आर्थिक-सामाजिक-भौतीक परिस्थितीच्या नविन पिढीवर होणार्‍या परिणामाची आणि त्या पिढीला मिळणार्‍या नविन संधीचाही नविन पिढी कशी विकसित होईल यावर परिणाम होत असतो.

जनुकिय आजार सोडले तर व्यक्तीचा विकास त्याच्या जनुकिय संचाइतकाच त्याच्या भोवतालच्या परिस्थितीने दिलेल्या संधी आणि/अथवा उभी केलेली आव्हाने यावर अवलंबून असतो.

हाडक्या's picture

4 Jun 2015 - 9:58 pm | हाडक्या

+१ .. एक नंबर हो एक्का काका.( हेच लिहिणार होतो पण इत़कं नीट जमलं नसतं. ;) )

हे उत्तर धाग्याचे सार आहे. सगळे मुद्दे नीट मांडलेले आहेत. पुढची चर्चा यावर व्हावी अन्यथा नाही झाली तरी चालू शकेल असं वाटतंय..

शब्दबम्बाळ's picture

5 Jun 2015 - 1:45 pm | शब्दबम्बाळ

प्रा डॉ आणि आपला अतिशय उत्तम आणि समतोल प्रतिसाद!
कंपूबाज लोकांनी हल्ली सेन्सीबल चर्चा करण्याची काही सोय ठेवली नाहीये… त्यामुळे अशा प्रतिक्रिया ओअसिससारख्या वाटतात!

चिनार's picture

5 Jun 2015 - 2:16 pm | चिनार

समतोल प्रतिसाद !
सहमत !
असाच काहीतरी माझा मत होतं पण ते शास्त्रीय भाषा जमेना ..

पैसा's picture

5 Jun 2015 - 12:44 pm | पैसा

लेखात लिहिलेली परिस्थिती एक शक्यता आहे. पण हे असे मुद्दामहून ठरवून केले जाईल याबद्दल शंका आहेच. आणि

जनुकांच्या सरमिसळीने उत्तम जनुकेच निर्माण होतील हे विधान शास्त्रिय नाही..

.

यावरून जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि इसाडोर डंकन यांच्यातल्या "his beauty and her brains" या कथित चकमकीची आठवण झाली.

भारतातील जात व्यवस्था बदला.. दाखले वगिअरे ठिकाने जात लिहने बंद करा.सर्व लोकाना सामान वागणूक, आरक्षण बंद करा.सर्वाना माफक दरात शिक्षण वैद्यकीय सेवा दिले गेले पाहिजे. तेव्हाच भारत धर्मं निरपेक्ष होइल.

काळा पहाड's picture

4 Jun 2015 - 7:39 pm | काळा पहाड

तुम्हाला 'जातनिरपेक्ष' म्हणायचंय का?

लालगरूड's picture

4 Jun 2015 - 7:47 pm | लालगरूड

दोन्ही पण चालेल

पॉइंट ब्लँक's picture

4 Jun 2015 - 7:45 pm | पॉइंट ब्लँक

जनुकिय गरज म्ह्णून आंतरजातीय विवाह करा असं सुचवायचं असेल तर हा तर्क फक्त पाच दहा वर्ष चालेल. कारण एकदा CRISPR Cas9 साराखी जनुकामध्ये हवे तसे बदल करणारी यंत्रना प्रचलित झाली की तुमचे रेसेसिव्ह दोष काढूण टाकता येतील, आणि जेनेटिक्सवाले डिझायनर बेबीज तुम्हाला देण्याची स्वप्न दाखवयला लागली आहेत. एकदा ते झालं कि मग आंतरजातीय विवाहाची गरज राहाणार नाही असा निष्कर्ष काढायचा का?

जातीभेद अमानविय आहेत इतकं सरळ सांगता येत असताना, उगाच विज्ञानाची अर्धी अधुरी ढाल वापरायचा प्रयत्न काही समजला नाही.

बाकी जेनेटिक्समधल्या संकल्पना शास्त्रोक्त म्हणून फार विश्वासानं वापरू नका. कारण बहुतांश गोष्टी असोसियेशन लेव्हलला अडकल्या आहेत. त्याची कारण मिमांसा अजून व्हायला वेळ आहे.

ग्रेटथिंकर's picture

5 Jun 2015 - 10:30 am | ग्रेटथिंकर

रिसेसीव दोष जरी काढून टाकले ,तरी diverse gene pool कसा तयार करणार???
डीझायनर बेबी हा कन्सेप्ट अजून कल्पनेतच आहे आणि प्रयोगशाळेत DNA(अर्थी जनुकांची साखळी) निर्माण करण्याची क्षमता मानवाकडे नाही,ती जेव्हा येईल तेव्हा तुमचे म्हणणे ग्राह्य मानता येईल ,तोपर्यंत आंतरजातिय/ धर्मिय विवाहांना पर्याय नाही.

पॉइंट ब्लँक's picture

5 Jun 2015 - 3:48 pm | पॉइंट ब्लँक

रिसेसीव दोष जरी काढून टाकले ,तरी diverse gene pool कसा तयार करणार???

जिन एडिटिंग वापरून.

डीझायनर बेबी हा कन्सेप्ट अजून कल्पनेतच आहे आणि प्रयोगशाळेत DNA(अर्थी जनुकांची साखळी) निर्माण करण्याची क्षमता मानवाकडे नाही

डिझायनर बेबीसाठी जनुकांची साखळी कशाला निर्माण करायला लागते? आहे तो जनुक एडिट करून काम नाही का चालणार?
तुमची काही तरी गफलत होते आहे. खालील माहिती वाचा
डिझायनर बेबी

ग्रेटथुंकरांपुढे लॉजिक म्हणजे नेपाळच्या नेव्ही मिनिस्टरपदासारखे आहे. वट्ट उपयोग नाही.

ग्रेटथिंकर's picture

5 Jun 2015 - 4:35 pm | ग्रेटथिंकर

आपल्या लिंकमध्ये डीझायनर बेबी कन्सेप्टमुळे human gene pool वर विपरीत परिणाम होतील असे लिहले आहे .नीट वाचा.

पॉइंट ब्लँक's picture

5 Jun 2015 - 4:39 pm | पॉइंट ब्लँक

आता चर्चा अतार्किक होत आहे. इथेच थांबतो.

ग्रेटथिंकर's picture

5 Jun 2015 - 4:44 pm | ग्रेटथिंकर

अतार्कीक कशी .जीन एडीट करता येऊ शकतो ,पण मी लेखात दिल्याप्रमाणे एक गुणधर्म ठरवणारे शेकडो जनुकं असतात, पैकी डीझायर्ड जनुक कसे बनवणार? अजुनही प्रयोगशाळेत जनुकं बनवता येत नाहीत.

पॉइंट ब्लँक's picture

5 Jun 2015 - 9:35 pm | पॉइंट ब्लँक

जीन डिनएवर असतो आणि डिनए एडिट करता येतो. नवीन निर्माण करायचा अट्टाहास कशापायी? नवीन प्राणी निर्माण करायचा आहे का? गर्भामध्ये डिनए असतो की राव. त्याला बदलायचं. नवीन कशाला पाहिजे.

खटपट्या's picture

4 Jun 2015 - 8:29 pm | खटपट्या

खूप चांगली चर्चा चालू आहे.

आंतरजातीय असो किंवा स्वजातीय विवाह असो प्रत्येकाला आपला जोड़ीदार निवडन्याचे स्वातंत्र्य हवे. चार दिवस जगलो तरी आनंदाने जगता आले

शब्दबम्बाळ's picture

4 Jun 2015 - 11:56 pm | शब्दबम्बाळ

माझ्या मते लग्न हि केवळ अपत्य जन्माला घालण्यासाठी केलेली गोष्ट नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आपल्या जोडीदाराबद्दल काहीतरी अपेक्षा असणार आणि जर त्या बर्यापैकी पूर्ण होत असतील तर लग्न होण्याची शक्यता! अर्थात हि गोष्ट झाली शहरातली आणि त्यातही सुधारलेल्या म्हणजे तथाकथित उच्च अथवा उच्चेतर (नीच कसे काय म्हणावस वाटत…) असूनही शिक्षित समाजाची… गरिबी आणि अज्ञानात राहणाऱ्या लोकांना कसली आलीये निवड!

मुळात जात आणि लग्न या दोन्ही व्यक्तीच्या अत्यंत खासगी गोष्टी असल्या पाहिजेत. मुद्दामहून आंतरजातीय/धर्मिय विवाह करणेसुद्धा चुकीचेच होईल, हा पण ते करण्याची दोघांची तयारी असेल तर त्याला होणारा विरोध मात्र कमी व्हायला हवा…

मला जातीवाचक उल्लेख नको वाटतो पण हल्ली मिपा वर ब्राह्मण या विषयावर बरीच चर्चा सुरु असते, त्याचा इतिहास वगैरे जाणून घ्यायची इच्छा नाही पण एकदाच जे कोणी ब्राह्मण विरोधी(असले तर) आणि समर्थक असतील त्यांनी एखादा धागा उघडून चर्चा करून विषय संपवावा!

ग्रेटथिंकर's picture

5 Jun 2015 - 7:55 am | ग्रेटथिंकर

सहमत

सुबोध खरे's picture

5 Jun 2015 - 10:45 am | सुबोध खरे

जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो
आंतरजातिय/ धर्मिय विवाहांना पर्याय नाही.

हे म्हणण्यासाठी आपल्या जवळ कोणता पुरावा किंवा विदा आहे. जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्न झाल्याने अनुवांशिक रोग जास्त होतात हे मान्य आहे. परंतु एकाच जातीत असलेले जनुकीय सारखेपण अजून तरी सिद्ध झालेले नाही (माझ्या माहितीप्रमाणे मी चूक असू शकतो) वर म्हटल्याप्रमाणे ब्राम्हण पोट जातीत म्हणजे कोकणस्थ आणि देशस्थ यात प्रचंड प्रमाणात जनुकीय फरक आहे( कोणतेच साधर्म्य नाही)अशा तर्हेचे संशोधन सर्व जातीत होणे आवश्यक आहे( झाले आहे कि नाही ते मला माहित नाही).
एका अनुसूचित जातीचे पुढारी मला पुण्यात एका सभेत म्हणाले होते कि आमच्या मुलांनी ब्राम्हण मुलींशी लग्न करायला पाहिजे. मी विचारले साहेब तुमच्या मुलीनी मग ब्राम्हण मुलाशी लग्न करायला पाहिजे.त्यावर ते म्हणाले अहो तिने ब्राम्हणाशी लग्न केले तर तिच्या मुलाला आरक्षण मिळणार नाही पण मुलाने ब्राम्हण मुलींशी लग्न केले तरी आमच्या नातवंडाना आरक्षण मिळेल. (शेवटी राजकारणी हे डोम कावळे असतात)परन्तु ते जे म्हणाले त्यातून स्वार्थी असे विदारक सत्य मात्र उघड झाले
असो. आंतरजातीय/ धर्मीय विवाह व्हायला पाहिजेत( खरं तर एक पुरुष अन स्त्री या दोनच जाती असाव्यात आणि लग्न त्यांनी स्वखुशीने करावे) या बाबत मी सहमत आहे पण त्यासाठी जनुकीय आवश्यकतेच्या शिखंडीच्या आड राहून लढायची गरज नाही किंवा जीन पूल वगैरेच्या कुबड्याची गरज नाही असे मला वाटते.

काळा पहाड's picture

5 Jun 2015 - 11:27 am | काळा पहाड

ब्राम्हण पोट जातीत म्हणजे कोकणस्थ आणि देशस्थ यात प्रचंड प्रमाणात जनुकीय फरक आहे( कोणतेच साधर्म्य नाही)

डॉक्टर साहेब, हे वाक्य थोडंसं विचित्र वाटतंय, कारण चिंपांझी आणि मानव यांच्यात फक्त ४% जनुकीय फरक आहे.
http://genome.cshlp.org/content/15/12/1746.full

सुबोध खरे's picture

5 Jun 2015 - 12:01 pm | सुबोध खरे

फरक हा शब्द variation चे भाषांतर करण्याचा प्रयत्न आहे. माझे म्हणण्याचा उद्देश दोन भावांमध्ये असलेला फरक किंवा दोन माणसांच्या गुणसूत्रात, जीन्स मध्ये असलेला फरक असा असुन दोन जैविक प्रजातीन्मधील नाही. gene, allele, trait इ चे भाषांतर कसे करावे ते समजत नाही. यात जरा गोंधळ झाला आहे. तो दूर झाला कि तुम्हाला मी सांगेन. तोवर भावना समजून घ्या

ब्राम्हण पोट जातीत म्हणजे कोकणस्थ आणि देशस्थ यात प्रचंड प्रमाणात जनुकीय फरक आहे( कोणतेच साधर्म्य नाही)अशा तर्हेचे संशोधन सर्व जातीत होणे आवश्यक आहे( झाले आहे कि नाही ते मला माहित नाही).
डॉक, कर्‍हाडे मंडळींच काय बुवा ? ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूक

मदनबाण's picture

5 Jun 2015 - 11:48 am | मदनबाण

हा... हा... हा... हे मिपावरच पहिल्यांदा वाचलं होत मी !
मला वाटत झाशीची राणी, सरसंघचालक श्री. माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी हे "कर्‍डाडे" ब्राम्हण होते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूक

म्हणजे IT मधल्या मुला मुलींनी एकमेकात लग्न केल्याने ते IT जनुक त्यांच्यापुरतेच मर्यादित रहाते. याउलट IT किंवा तत्सम उच्च शिक्षित व्यावसायिकाने BA / BCom अशा बँक किंवा शिक्षण क्षेत्रातल्या व्यावसायिकाशी लग्न केल्यास जनुक (आणि पगारही ) योग्य रीतीने वाटला जाउन समाज समजनुकीय आणि समआर्थिक अशा समान पातळीवर येण्यास मदत होणार नाही का ?

(IT / BA / BCom /बँक / शिक्षक हे शब्द केवळ नमुना दाखल आहेत. विचार करताना उच्च शिक्षित /उच्च व्यावसायिक आणि नीच शिक्षित / नीच व्यावसायिक ((नीच : तुलनात्मक शब्द) असा करावा )

ता क: या आधीही कोणत्यातरी धाग्यावर अशीच काहीशी चर्चा झाल्याचे स्मरते

(IT व्यावसायिक नसलेल्या अल्पसंख्यान्कातील एक )
कहर

टवाळ कार्टा's picture

5 Jun 2015 - 11:26 am | टवाळ कार्टा

याला फोडणी देउ का? आयटी मधली मुलगी बीए अथवा बीकॉम झालेल्या मुलाबरोबर लग्न करेल? (मुलाचा पगार मुलीपेक्षा कमी असेल तर)

टवाळ कार्टा's picture

5 Jun 2015 - 11:23 am | टवाळ कार्टा

जातींचा आणि जनुकांचा संबंध असतो???

टवाळ कार्टा's picture

5 Jun 2015 - 1:53 pm | टवाळ कार्टा

इतकी चर्चा सुरु आहे पण मी विचारलेल्या बेसिक प्रश्नाला (सोयिस्कर??) बगल???

नै म्हणजे माझ्या समजूतीनुसार इतक्या जाती आहेत त्या सर्व लोकांच्या कामाच्या/व्यवसायाच्या सातत्यामुळे तयार झालेल्या पण सोनार, न्हावी, ब्राम्हण, मराठा, शिंपी, चांभार, आणि बर्याच अठरापगड जाती, ईत्यादी ईत्यादी जातींमध्ये जात स्पेसिफिक जनुक असते???? असे असेल तर मग त्या जनुकांमुळे आपण भारतीय बाकी जगातल्या सर्व माणसांपेक्षा या सर्व व्यवसायांत कुशल असायला हवे कारण बाकी जगात या जातीच अस्तित्वात नैत

ग्रेट थिंकर साहेबांनी विचार करण्यासारखा धागा सुरु केला आहे. जनुकशास्त्रातला मला काहीही कळत नाही पण हा धागा वाचून काही प्रश्न पडले आहेत.
जनुकावर भौगोलिक परिस्थिती आणी वातावरणाचा काही प्रभाव असतो का ?
दक्षिण भारतीय लोक (आंध्र आणि तामिळनाडू ) हे प्रामुख्याने कृष्णवर्णीय असतात (वर्णभेद करण्याचा उद्देश नाही ). मग तो मुस्लीम असो /हिंदू ब्राह्मण /मराठा असो / ख्रिस्चन असो. याचा अर्थ वर्णाशी संबंधीत जनुक त्या सगळ्यांमध्ये आहे असा होतो का ?. हीच गोष्ट उत्तर भारतीय मुलींची ज्या गोऱ्या आणि सुंदर असतात मग त्या कोणत्याही धर्माच्या असो.
ज्यावेळी जातीव्यवस्था अस्तिवात नव्हती (म्हणजे अगदी सुरवातीच्या काळात) त्यावेळी तर जनुके सारखीच विभागल्या गेली असतील. त्यामुळे जनुकांच्या सगळ्याच जोड्या किंवा प्रकार प्रत्येकच जाती /धर्मात असतील का ?

मार्मिक गोडसे's picture

5 Jun 2015 - 1:05 pm | मार्मिक गोडसे

चिनारजी गूगलवर eugenics , Euthenics हे शब्द टाकून पहा तुमच्या प्रश्नाचे वैज्ञानीक उत्तर तेथे मिळेल.

@मृत्युंजय महाराज, जरा सेन्सीबल चर्चा करा प्लीजच.

ग्रेटथिंकर साहेब,
हीच का तुमच्या सेन्सीबल चर्चेची कल्पना?

http://www.aisiakshare.com/node/2449#comment-43122

बॅटमॅन's picture

5 Jun 2015 - 12:50 pm | बॅटमॅन

ठ्ठो =))

ग्रेटथुंकरसाहेबांचं कळलं काय ते. बहुत धन्यवाद!

मृत्युन्जय's picture

5 Jun 2015 - 12:56 pm | मृत्युन्जय

ग्रेटथुंकर साहेबांचा नक्की प्रॉब्लेम कळाला आता. याला ब्राह्मणद्वेष्टे असणे म्हणावे काय? प्राडाँचे याबद्दला काय मत आहे?

श्रीगुरुजी's picture

5 Jun 2015 - 6:25 pm | श्रीगुरुजी

>>> ग्रेटथिंकर साहेब,
हीच का तुमच्या सेन्सीबल चर्चेची कल्पना?

ब्रिगेडी पुरूषोत्तम खेडेकरच्या एका ब्राह्मणद्वेषी पुस्तकातले विखारी लेखन आणि या कॉमेंटमधील विचार यात कमालीचे साम्य आहे. खेडेकरने त्या पुस्तकात ब्राह्मण स्त्रिया व पुरूष यांविषयी अत्यंत किळसवाणे लेखन केले आहे.

नानासाहेब नेफळेने कितीही वेगवेगळे आयडी घेतले, माईसाहेबांचा आयडी वापरून सभ्य लेखनाचे बेअरिंग जपले आणि पुरोगामित्वाचा कितीही जाड बुरखा वापरला तरी त्याच्यात लपलेला ब्रिगेडी अचानक बाहेर येतो तो असा.

ग्रेटथिंकर's picture

5 Jun 2015 - 7:22 pm | ग्रेटथिंकर

गुरुजी लेखावर चर्चा करा ,ब्रिगेडी बामसेफी राहु द्यात बाजुला.

श्रीगुरुजी's picture

7 Jun 2015 - 6:19 pm | श्रीगुरुजी

लेखक आणि लेखाच्या मागची मूळ प्रेरणा ब्रिगेड आहे. त्यामुळे ब्रिगेड चर्चेत येणारच.

प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय चाळणीतून गाळू नका ! अरे उद्या लग्न करायचं ठरवलं तर मुलामुलीचा रक्तगट, मलमुत्राचे, वीर्याचे सँपल्सच तपासत बसणार काय ?
आपल्याला जी व्यक्ती आवडली तिच्याशी लग्न केले इतकी सोप्पी गोष्ट असू शकत नाही काय ?

सिरुसेरि's picture

5 Jun 2015 - 1:01 pm | सिरुसेरि

'देशस्थ म्हणजे बेशिस्त' असा समज कोणी निर्माण केला . तो खरा आहे का ?
तसेच बरयाच दक्षिणी सिनेमांमधल्या हिरोची नायिका मात्र नॉर्थ ( युपी , महाराष्ट्र ) प्रदेशांतुन आयात केलेली असते असे का ?

देशस्थ = बेशिस्त आणि कोकणस्थ = कंजूस, माणूसघाणे

हे दोन्ही स्टिरिओटैप एकमेकांनी बनवलेले असण्याची शक्यता जास्त आहे.

सुनील's picture

5 Jun 2015 - 2:35 pm | सुनील

नुकताच वॉट्सअ‍ॅपवर आलेला विनोद -

कोकणस्थ आणि देशस्थ ह्या दोघांकडील जेवणाचे निमंत्रण स्वीकारू नका!

कारण कोकणस्थांकडे किती आणि देशस्थांकडे कधी जेवायला मिळेल, हे सांगता येणार नाही!!

hitesh's picture

7 Jun 2015 - 6:37 am | hitesh

अस्ताव्यस्त समस्त वस्तू मिळुनी देशस्थ निर्मियला.

स्वस्तात स्वस्त समस्त वस्तू मिळुनी कोकणस्थ निर्मियला.

वास्तविक सगळा प्रोबलेम आपल्या हिंदु धर्मात आहे. मुळ हिंदु धर्म (कि जिवन पध्दत?) हा खुप चांगला होता पण नंतर्च्या हजारो वर्षात हिंदु धर्मामध्ये खुप सरमिसळ झालि आहे. आणि जातिव्यवस्था बळकट झालि आणी समाज विभागत गेला तो आजतागायत आहे.
जर आपल्या धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य यांनि एखदि धर्मसंसद बोलाऊन धर्मातिल जातिव्यवस्था नष्ट करायचे मनावर घेतले तर काय अवघड आहे. जातिव्यवस्था नष्ट होने हे हिंदु धर्माच्या बळकटिसाठि आवश्यक आहे. आणी ति नष्ट झालि तरच हिंदु धर्म टिकेल. यासाठि हिंदु धर्मातिलच लोकांचा दबाव होने आवश्यक आहे.
जातिव्यवस्था नष्ट झाली तर आपोआपच आरक्षण रद्द होइल व्होट बँकेचे राजकारण बंद होइल आणी ग्रेटथिंकर म्हणतात तसे जनुकिय द्रुष्ट्या आपला समाज सम्रुध्द होइल.

काळा पहाड's picture

5 Jun 2015 - 3:23 pm | काळा पहाड

मुळ हिंदु धर्म (कि जिवन पध्दत?) हा खुप चांगला होता पण नंतर्च्या हजारो वर्षात हिंदु धर्मामध्ये खुप सरमिसळ झालि आहे.

जशी की?

जातिव्यवस्था बळकट झालि

म्हणजे नक्की काय झालं?

जातिव्यवस्था बळकट झालि आणी समाज विभागत गेला तो आजतागायत आहे.

म्हणजे जातिव्यवस्था आधीपासूनच होती आणि ती फक्त बळकट झाली? समाज जातिव्यवस्था (जी आधीपासूनच होती) ती बळकट होण्यापूर्वी विभागला गेला नव्हता म्हणजे काय? मग जातिव्यवस्था होती म्हणजे तो आधीपासूनच विभागला होता ना?

जर आपल्या धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य

१. आपल्या धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य आहेत हे नक्की का? कारण तसं असतं तर बरेच हिंदू साईबाबांना कसं मानत असते?
२. सर्वोच्च नेत्याला फतवा (धर्माधिकार?) काढायचा अधिकार असतो. असा धर्माधिकार शंकराचार्यांनी कधी काढलाय?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Jun 2015 - 9:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमचा ह्या धाग्याशी काय संबंध? तुम्ही लिइरी वाली ना =))

ज्यांना विवाह विषयात अधिक "मेंदू" खर्च करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी खाली खुराक देउन ठेवतो:-
मनुस्मॄति :- अध्यात तिसरा

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूक

तिमा's picture

5 Jun 2015 - 3:26 pm | तिमा

अशा चर्चा फक्त मराठी लोकांतच होऊ शकतात. तुमच्या या थिअर्‍या जाट, सरदार आणि तत्सम कर्मठ लोकांना ऐकवायचा प्रयत्न करा. जगलात, वाचलात तर नंतर बोलू.

मदनबाण's picture

5 Jun 2015 - 3:31 pm | मदनबाण

तुमच्या या थिअर्‍या जाट, सरदार आणि तत्सम कर्मठ लोकांना ऐकवायचा प्रयत्न करा. जगलात, वाचलात तर नंतर बोलू.
Haryana’s crisis: Bridegrooms all decked up, but no one to marry

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूक

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jun 2015 - 4:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल.

हे लेखाच्या सारातले पहिले विधानच प्रचंड विरोधाभासाने भरलेले आहे !

१. सद्या, जगात जाती, धर्म, वंश, देश इत्यादीं गट आहेत आणि त्या गटांतले संकर अभावाने/कमी होतात म्हणून तर आजच्या घडीला गटागटात फरक (डाव्हर्सिटी) आहे !!!

२. जाती, धर्म, वंश, देश इत्यादींच्या सीमा न बाळगता जगातील सर्व मानवांचा संकर होत राहीला तर अनेक पिढ्यांनी सर्व मानवसमाजाच्या जीन पूलचे एकत्रिकरण (युनिफॉर्मिटी) होईल आणि अर्थातच डायव्हर्सिटी नष्ट होईल !!!

३. "एकत्रिकरणाने जनुकीय सदृढता वाढीस लागेल" या विधानातला फोलपणा येथे विशद केला आहेच.

भिन्न गटांतील संकराला, तो जर एकमेकाच्या संमत्तीने झाला तर त्याला माझा अजिबात विरोध नाही. केवळ, लेखाच्या गमकातला विरोधाभास स्पष्ट करण्यासाठीच मी वरचे शास्त्रिय सत्य सांगत आहे, इतकेच.

======

हा लेख एकतर केवळ वाचकांचे पाय खेचण्यासाठी लिहीलेला आहे किंवा युजेनेटिक्स या शास्त्रावरून तयार केलेली शास्त्रीय भासणारी (स्युडो सायंटिफिक) व फार पूर्वी कालबाह्य झालेली लोकवदंता (anecdotal) तत्वे वापरून अज्ञानाने लिहीलेला आहे. वसाहतवादाच्या काळात गोर्‍या (कॉकेशियन) लोकांचा जनुकीय वरचढपणा सिद्ध करण्यासाठी अशी वंशश्रेठतेची तत्वे मोठ्या हिरीरीने पुढे आणली गेली आणि शतक-दीडशतक अरेरावीने खपवली गेली.

नाझी नरसंहार हे "निगेटीव्ह युजेनेटिक्स"चे (नको असलेली जनुके असणारे लोक कायमचे नष्ट करा) न विसरणारे उदाहरण. तर, ऑस्ट्रेलियन अ‍ॅबओरिजीनल्सनधील मुलींची लग्ने गोर्‍यांबरोबर लावून मग त्यांच्या संतत्तीची लग्ने इतर गोर्‍यांबरोबर लावून... अनेक पिढ्यांनंतर "सुधारित" लोक तयार करण्याच्या कल्पनेने पछाडलेले ऑस्ट्रेलियन पाद्री हे "पॉझीटीव्ह युजेनेटिक्स"चे (उत्तम प्रतिची जनुके असलेले लोक तयार करा) उदाहरण. बलवान गोरी जनुके दर पिढीमागे कमी प्रतिची अ‍ॅबओरिजीनल जनुके जीन पूलमधून काढून शेवटी पूर्ण नष्ट करतील, असा त्यांचा दावा होता. हा क्रूर प्रयोग करताना मुलांना लहानपणीच आईवडीलांपासून दूर करून खास मिशन्समध्ये ठेवत असत आणि त्यांची लग्ने चर्चच्या मर्जीने करत असत. या जुलुमी कारवायांसाठी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानाला अ‍ॅबओरिजीनल्सची उघड माफी मागावी लागली आहे.

(अ) वर दिलेल्या उदाहरणांप्रमाणे युजेनेटिक्स तत्वावर आधारलेल्या वाटणार्‍या पण अशास्त्रिय असलेल्या कल्पनांना
आणि
(आ) एक मानववंश दुसर्‍या मानववंशापेक्षा जनुकीयरित्या श्रेष्ठ असतो या अशास्त्रिय कल्पनेलाही;
गेल्या काही दशकांत झालेल्या जनुकशास्त्राच्या विकासामुळे सुरुंग लागला आहे.

======

जनुकशास्त्रिय सत्ये...

१. मानवाच्या जाती, धर्म, वंश, देश इत्यादींवर आधारलेल्या गटांमध्ये फार लक्षणिय जनुकीय फरक नाहीत.

२. निरोगी जनुके असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या विकासात त्याच्या आजूबाजूच्या कौटुंबिक-सामाजिक-धार्मिक-आर्थिक-राजकिय परिस्थितीचा सर्वात मोठा प्रभाव असतो.

३. सर्व मानवांची जनुके तंतोतंत एकसारखी नसल्याने आणि व्यक्तीची जडणघडण होताना आस्तित्वात असलेल्या आजूबाजूच्या परिस्थितील फरकामुळे आपल्यातला प्रत्येकजण अनन्य (unique) बनतो.

======

"लोकवदंता (anecdotal)" युजेनेटीक्सला चपखल चपराक देणारी व्यावहारीक सत्ये...

१. तथाकथीत निम्नस्तरातून येऊन वरचढ होऊन, तथाकथीत उच्चस्तरातून आलेल्या धनदांडग्यांना, राजकारण्यांना व नोकरशहांना आपल्या मुठीत ठेवण्याचे कसब असलेल्या व्यक्तींची उदाहरणे जगभर आहेत आणि भारतातही कमी नाहीत... अगदी चंद्रगुप्त मौर्याच्या आधीपासून ते आजच्या राजकारणी, उद्योगधुरीण, शास्त्रज्ञ, कलाकार, इ पर्यंत !

२. जगभरच्या शात्रज्ञांत निम्नस्तरातून वर आलेल्या व्यक्तींची उदाहरणे काही विरळ नाहीत. नोबेल पारितोषिक अथवा तत्सम पारितोषिके मिळविणार्‍या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांमध्ये भारतातून परदेशात जाणारेच आहेत यामागे केवळ जनुके आहेत की परिस्थितीतील बदल आहे, हे सांगायला हवेच का ? त्यांच्या इतकी उत्तम किंवा अधिक चांगली किती जनुके इथे गाईगुरांमागे धावत असतील बरे ?

३. अगदी व्यावहारीक दृष्ट्या पाहिले तरीही, केवळ उत्तम बौद्धीक काम करणार्‍यांपेक्षा, बौद्धीक काम करणार्‍यांना काबूत ठेऊन त्यांच्याकडून काम करवून घेणारा; जास्त सत्ता, संपत्ती आणि महत्व मिळवतो हेच दिसते.

समान संधी जेवढ्या जास्त प्रमाणात आस्तित्वात असतात तेवढ्या जास्त प्रमाणात असे घडते, इतकेच.

gogglya's picture

5 Jun 2015 - 6:07 pm | gogglya

__/\__

मृत्युन्जय's picture

5 Jun 2015 - 6:45 pm | मृत्युन्जय

अर्रे देवा म्हणजे इतकावेळ चाललेली चर्चा फुकाचीच म्हणायची का? आम्ही निघालो होतो एका नविन जनुकीय संरचनेच्या निर्मितीत आणि हा खोडा आला. आता कशी काय सुदृढ जनुके तयार होणार? आंतर्जालीय, आंतर्धर्मीय, आंतरदेशीय, आंतरबीस्टीय वगैर वगैरे विवाहांना चालना देउन काहीच का उपयोग नाही म्हणजे?

महत्तम कार्यात नसते खोडे घालणार्‍या तुमच्यासारख्या लोकांमुळेच पृथ्वी रसातळाला चालली आहे असे नमूद करु इच्छितो.

नाव आडनाव's picture

7 Jun 2015 - 9:45 am | नाव आडनाव

१. मानवाच्या जाती, धर्म, वंश, देश इत्यादींवर आधारलेल्या गटांमध्ये फार लक्षणिय जनुकीय फरक नाहीत.

अर्र..... ते ५ आणि ७ पण चुकलं का काय? त्यानन्तर ०*०, ०/०, undefined, अनंत अशी बरीच मोठी आकडेमोड झाली ना भौ. ती पण चुकलीच बहुतेक :)

५ च्या भल्यासाठी ७ ने बलिदान देउन ७ पेक्षा कमी प्रतीचे प्रॉडक्ट तयार करणे

आता ते "बलिदान" पण चुकलं का काय ?

मृत्युन्जय's picture

8 Jun 2015 - 12:49 pm | मृत्युन्जय

बघा ना. सग्ळेच चुकले. आता काय करणार?

सुबोध खरे's picture

5 Jun 2015 - 7:56 pm | सुबोध खरे

एक्का साहेब
तुम्ही तर लोकांच्या चड्डीलाच हात घालता एकदम !!!
हे म्हणजे ग्रेट थिंकर सिक्सर मारायला गेले आणी तुम्ही मागून त्यांना यष्टीचीत( STUMPED OUT) केलेत कि हो

संदीप डांगे's picture

6 Jun 2015 - 11:14 am | संदीप डांगे

एक्कासाहेबांना दंडवत, यापेक्षा अचूक काहीच असू शकत नाही.

लेख प्रचंड गंडलेला आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.

(आणि हो, आम्ही लेख कुणी लिहिला यापेक्षा काय लिहिलंय यालाच महत्त्व देतो बरंका..)