किणारा अन् लाट

यल्लप्पा सट्वजी कोकणे's picture
यल्लप्पा सट्वजी... in जे न देखे रवी...
23 May 2015 - 5:13 pm

किणारा अन् लाट

अजब मैत्री आहे
किणारा अन् लाटेची,
काय जादू आहे
निसर्गाच्या या किमयेची?

स्पर्शून हळूच जाते
लाट हि किणार्‍याला,
विलीन होत सागरात
खुणावित जाते वार्‍याला!

काय उपमा द्यावी
दोघांच्या या नात्याला?
यात कसे विसरता येईल
नटखट वेड्या वार्‍याला?

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१८ एप्रिल २०१५

९८९२५६७२६४

कविता

प्रतिक्रिया

म्हया बिलंदर's picture

23 May 2015 - 6:25 pm | म्हया बिलंदर

हं

टवाळ कार्टा's picture

23 May 2015 - 7:24 pm | टवाळ कार्टा

मोबाइल नंबर तुमचाच?

नाव आडनाव's picture

23 May 2015 - 7:42 pm | नाव आडनाव

त्यांच्या कवितेच्या चाहत्यांनी इतक्या वेळात त्यांना मेजर वैताग दिला असेल.

मी "किणारा" ऐवजी चुकून "किराणा" वाचलं होतं.

काळा पहाड's picture

24 May 2015 - 9:55 am | काळा पहाड

मी पण. बाकी मोबाईल नंबर दिल्याबद्दल थँक्यू. जबरदस्तीनं हॉलिडे पॅकेज विकणार्‍यांना कोणता नंबर द्यावा हा प्रश्न मिटला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 May 2015 - 11:36 am | डॉ सुहास म्हात्रे

जबरदस्तीनं हॉलिडे पॅकेज विकणार्‍यांना कोणता नंबर द्यावा हा प्रश्न मिटला.

कसं काय सुचतं हे असं ???!!!

काळा पहाड's picture

24 May 2015 - 4:02 pm | काळा पहाड

बिग बाझारात गेल्यावर सगळ्या पैल्यांदा हे लोक जवळ जमा होतात. आणि दर पाच मिनिटानी नवीनच माणूस येवून विचारतो, "सर नाम और फोन नंबर लिखिये. हॉलीडे पॅकेज मिल सक्ता है".

मी सुद्धा 'किराणा आणि लाट' असे वाचून कॉमेडी समजून आलो वाचायला… मोकालाया आठवले। रच्यकने तो धागाहि आज वर आलाय पुन्हा

अजया's picture

24 May 2015 - 10:51 am | अजया

=))

यसवायजी's picture

24 May 2015 - 12:36 pm | यसवायजी

णाद खुळा!!

नाखु's picture

25 May 2015 - 2:44 pm | नाखु

एक लंबर

प्यारे१'s picture

24 May 2015 - 3:20 pm | प्यारे१

न न बानातला णा?

किणा-यावरून बोलू नका, पान्यात जा.
आपनास काव्य कळत णाही हे सपष्ट झाले

योगी९००'s picture

26 May 2015 - 4:26 pm | योगी९००

स्णेहांकिता लिवायचे राहीले णा हो...!!

सूड's picture

25 May 2015 - 6:23 pm | सूड

१८ एप्रिल २०१५

हा आपला जण्मदिणांक का?

नीलमोहर's picture

25 May 2015 - 6:33 pm | नीलमोहर

सव्वा महिने वयाच्या मानाने बरंच लिहीलंय म्हणायचं

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 May 2015 - 6:36 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अस लिहा:
सव्वा महिणे वयाच्या माणाणे बरच लिहिलय म्हणायचं!

यसवायजी's picture

26 May 2015 - 12:51 pm | यसवायजी

च्यूक. शुण्य मार्क तुला. म्हनायचं!!

नाव आडनाव's picture

26 May 2015 - 2:09 pm | नाव आडनाव

आता मिसळपाव च्यूक. तुमची प्रतिक्रिया मला "नवीन" अशी दिसली. ती "णवीण" पाहिजे होती.

खंडेराव's picture

26 May 2015 - 2:14 pm | खंडेराव

परत परतणार नाही या धाग्याकडे..आधीच शुद्धलेखनाची बोंब आमच्या, त्यात हे असे वाचले तर जे येते ते ही विसरुन जाइल!

यसवायजी's picture

26 May 2015 - 3:48 pm | यसवायजी

@णाव आडणाव-
आहाहा.. हे बरं हाय की. आपलं ठेवायचं झाकूण आनी..

नाव आडनाव's picture

26 May 2015 - 3:58 pm | नाव आडनाव

:)

अजया's picture

25 May 2015 - 6:26 pm | अजया

किणारा काळजास भिडला.

नाखु's picture

26 May 2015 - 2:04 pm | नाखु

खरे किणारा घराण्याचे कवी !!!!

कट्ट्यावर सटीप काव्यवाचनाचा कारेक्रम झालाच पाहिजे.

मिपाचे त्रयी
(सूडेश पापड्गांवकर -
जॅक आपट-प्रगो धुरंध्रीकर )

चित्रगुप्त's picture

26 May 2015 - 8:17 pm | चित्रगुप्त

दुर्दैवाने 'किणारा' या शब्दातले गूढ माधुर्य, सौदर्य कुणाला जाणवलेले दिसत नाही.
नाजुक लाट तटावरील रेतीला हळुवार, मृदु स्पर्श करून नटखट वेड्या वार्‍याला खुणावीत सागरात विलीन होते, तेंव्हा संवेदनशील, कविमनाच्या व्यक्तीला अतिशय कोमल अशी किणकिण ऐकू येते, ती अनुभूति 'किणारा' या शब्दातून नेमकी व्यक्त होते.
होय ना यल्लप्पा सायेब ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 May 2015 - 8:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्यांच्या कवितेच्या "कलेवरा"वर आम्ही खुस आहोत.

मोहनराव's picture

26 May 2015 - 8:37 pm | मोहनराव

किणारा गाठला कवितेणे(ने)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 May 2015 - 8:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हे बघा लोकांच्या सूद्द्लेकणाच्या चूका काडन्यापेक्षा ट्रॉलार्थ समजूण घेने जास्तं म्हत्वाचं णाहि का?