प्रेम

परी१२३४५'s picture
परी१२३४५ in जे न देखे रवी...
22 May 2015 - 8:52 pm

प्रेम म्हणजे एक आस
प्रेम म्हणजे एक ध्यास
प्रेम म्हणजे एक श्वास
प्रेम म्हणजे तुझा हवाहवासा सहवास.

प्रेम म्हणजे गर्दीतला एकटेपणा
प्रेम म्हणजे एक आंतरिक वेदना
प्रेम म्हणजे एक गोड संवेदना
प्रेम म्हणजे हुरहूर लावणारी मनाची दशा
प्रेम म्हणजे चढलेली एक नशा.

प्रेम म्हणजे माझ तुझी वाट पहाण
प्रेम म्हणजे तुझ न येण
प्रेम म्हणजे मी तुझी वाट पाहून थकून जाण
प्रेम म्हणजे तू येणार नाहीस हे माहित असूनही
रोज तुझीच वाट पहाण.

येशील कधी तू माहित नाही
तरीही रोज वाट तुझी पाहीन
अखेरच्या श्वासापर्यंत फक्त तुझीच राहीन
फक्त तुझीच राहीन.

कविता

प्रतिक्रिया

खंडेराव's picture

22 May 2015 - 8:58 pm | खंडेराव

ही कविता...फारच छान :-)

आणि मी पहिला!

संदीप डांगे's picture

22 May 2015 - 9:32 pm | संदीप डांगे

चांगली कविता.

दमामि's picture

23 May 2015 - 10:35 am | दमामि

प्रेमकविता??????
बऱ्याच तरुण होतकरू मिपाकरांचा पत्ता कटला वाटते!!!!

अजया's picture

23 May 2015 - 10:46 am | अजया

अरेरे,बारावी होऊन दहा वर्ष झालेल्यांचे निरर्थक अत्मरंजन भंगणार :(

नाखु's picture

23 May 2015 - 11:19 am | नाखु

का दुखर्या दातांवर बोट ठेवता आता त्यांना "पेन्-लिकर-किलर" घ्यावी लागेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी !!!

सरळ धोपट
नामा निराळे

सस्नेह's picture

23 May 2015 - 11:22 am | सस्नेह

भावविभोर कविता !

अजया's picture

23 May 2015 - 11:23 am | अजया

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे!
सरळधोपट =))))

पैसा's picture

23 May 2015 - 11:29 am | पैसा

मस्तं ग!
छान गं!
कसं जमतं गं!

मुक्त विहारि's picture

23 May 2015 - 11:58 am | मुक्त विहारि

पुढल्या कलाक्रुतीच्या अपेक्षेत...

एक एकटा एकटाच's picture

23 May 2015 - 11:45 pm | एक एकटा एकटाच

प्रेमाच्या सगळ्या व्याख्या आवडल्या

चित्रगुप्त's picture

24 May 2015 - 10:58 am | चित्रगुप्त

"प्रेम म्हणजे एक श्वास"...
तर मग "अखेरच्या श्वासापर्यंत फक्त तुझीच" हे कसेकाय, ते बरीक कळले नाही.
"प्रेम म्हणजे एक वास" असे तर म्हणायचे नव्हते ?

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 May 2015 - 10:55 am | ज्ञानोबाचे पैजार

सदर कवितेमधे "प्रेम" या शब्दा ऐवजी "तांब्या" हा शब्द घातला तर ती कविता जास्त प्रगल्भ व अर्थवाही होईल असे मला वाटते.

पैजारबुवा,