मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेम

परी१२३४५ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
प्रेम म्हणजे एक आस प्रेम म्हणजे एक ध्यास प्रेम म्हणजे एक श्वास प्रेम म्हणजे तुझा हवाहवासा सहवास. प्रेम म्हणजे गर्दीतला एकटेपणा प्रेम म्हणजे एक आंतरिक वेदना प्रेम म्हणजे एक गोड संवेदना प्रेम म्हणजे हुरहूर लावणारी मनाची दशा प्रेम म्हणजे चढलेली एक नशा. प्रेम म्हणजे माझ तुझी वाट पहाण प्रेम म्हणजे तुझ न येण प्रेम म्हणजे मी तुझी वाट पाहून थकून जाण प्रेम म्हणजे तू येणार नाहीस हे माहित असूनही रोज तुझीच वाट पहाण. येशील कधी तू माहित नाही तरीही रोज वाट तुझी पाहीन अखेरच्या श्वासापर्यंत फक्त तुझीच राहीन फक्त तुझीच राहीन.

वाचने 1933 वाचनखूण प्रतिक्रिया 12

दमामि 23/05/2015 - 10:35
प्रेमकविता?????? बऱ्याच तरुण होतकरू मिपाकरांचा पत्ता कटला वाटते!!!!

अजया 23/05/2015 - 10:46
अरेरे,बारावी होऊन दहा वर्ष झालेल्यांचे निरर्थक अत्मरंजन भंगणार :(

In reply to by अजया

नाखु 23/05/2015 - 11:19
का दुखर्या दातांवर बोट ठेवता आता त्यांना "पेन्-लिकर-किलर" घ्यावी लागेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी !!! सरळ धोपट नामा निराळे

अजया 23/05/2015 - 11:23
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे! सरळधोपट =))))

चित्रगुप्त 24/05/2015 - 10:58
"प्रेम म्हणजे एक श्वास"... तर मग "अखेरच्या श्वासापर्यंत फक्त तुझीच" हे कसेकाय, ते बरीक कळले नाही. "प्रेम म्हणजे एक वास" असे तर म्हणायचे नव्हते ?

ज्ञानोबाचे पैजार 25/05/2015 - 10:55
सदर कवितेमधे "प्रेम" या शब्दा ऐवजी "तांब्या" हा शब्द घातला तर ती कविता जास्त प्रगल्भ व अर्थवाही होईल असे मला वाटते. पैजारबुवा,