काही नवे करावे म्हणून-भाग ४

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in जनातलं, मनातलं
22 May 2015 - 6:30 pm

सुरेखाच्या घरी पोचलो.टिपिकल कोकणातले घर.बाहेर अंगणात मांडव टाकलेला.गडग्याला लागून गावठी गुलाबाची लाल आणि गुलाबी झाडे,तगर ,अनंत, तीन चार रंगाच्या कण्हेरी,तीन चार रंगाच्या जास्वंदी,अबोली,मोगरा,मधुमालती,सदाफुली अशी फुलझाडे आणि चिकू, जाम,आंबे,पेरू, जांभूळ,आणि नारळ अशी फळझाडे होती त्यामुळे अंगणात गारवा.खुर्च्या टाकलेल्या होत्या.आम्ही तिथेच बसलो तिला सगळी कथा सांगितली. “असा वैताग आणला आहे ग मेल्याने.भिकारीच जसा.काहीना काही घेतल्याशिवाय रहात नाही.”सुरेखा संतापाने बोलली. “केव्हा आला हा इथे?”मी चौकशी केली.”आणि मग याची तक्रार का नाही केली?” “अग कितीवेळा त्या सर्कलला सांगितलं.पण तोपण तसलाच,” सुरेखाचे उत्तर. इतक्यात पंचायत कार्यालयातील शिपाई घाईघाईत आला. “वैनी, काय केलाव हो? तलाटी डोसक्याला हात लावन बसलाय.माला आई बोलली की,सड्यावरच्या गड्ग्याची मालकीण आलीय म्हनून”.हा पातेरे मामामामींचा मुलगा यशवंता.माझ्या बागेकडे जाताना शेवटचे आणि बागेकडून येताना पहिले घर यांचे लागायचे.बागेचा व्यवहार होण्याच्या कळत ओळ्ख झालेली. मामामामी,यशवंता, त्याची बायको सगळेच शेजारधर्म उत्तम प्रकारे निभावीत.त्यामुळे ओळख होती. “तरी दादा(मयू) त्यादिवशी येवन गेले ना,तेव्हाच मी त्यास सांगितलेला,की,पंगा घेव नुकोस म्हनून.आता बसलाय डोस्क्याक हात लावन.” “अरे पण आता तू इथे कसा?तू तर ड्यूटीवर आहेस ना?”असे विचारल्यावर यशवंता म्हणाला”.माज पाठवल्यान हाय बातमी काडुच्यासाटी”आणि गप्प झाला. “एवढेच फक्त?की आणखी काही?”असे विचारल्यावर यशवंता चाचरला .”काय रे ,बोल की.”मयू बोलला. त्यावर यशवंता म्हणाला,”निरोप दिलान हाय,मांडवलीचा. ,पण मी सांगलंय,की,माजा जीव काय वर नाय आ तुजा असला निरोप देवक.” मला हसू येऊ लागले.”तू निरोप सांग बघू.” ही केस मिटवूसाटी काय पायजे ते सांगा,मी करीन म्हटला.” पुन्हा मयू उसळला.’थांब,मी सांगतो तिला काय पाहिजे ते.चुलीतली राखाडी फास तोंडाला आणि पाटी अडकव गळ्यात,’मी पैसे खातो ‘अशि आणि मग गावात पाच फेऱ्या मार मग येऊन ताईची क्षमा माग.”मी मयुला थोवत म्हणाले,”अरे तो पैसे खाणारा माणूस.तो पैशांच्याच भाषेत बोलणार.किती देतोय रे?”शेवटचा प्रश्न यशवन्तासाठी होता. “तुमी काय तो आकडा बोला.ताबडतोब येतो म्हटलाय”.तो उत्तरला.मयू संतापून उठलाच.”हा रेडा काही मार खाल्ल्याशिवाय ऐकायचं नाही.”मला पैशाच्या भाषेत बोलणारी माणसंआवडत नाहीत. “अस्सं काय?ठीक आहे तर.जा त्याला संग ताईने दहाहजार रुपये घेऊन तबडतोब बोलावले आहे म्हणून.” हे ऐकताच यशवंतातर अचंबित झालाच पण मयू आणि सुरेखानेही आ वसला. आजीलाही धक्का बसला.त्यांना तोंडावर बोट ठेऊन गप्प करीत मी यशवंताला सांगितले की,”पळ,लवकर,तो चाफेरकर तुझी देवासारखी वाट पाहत असेल.”यशवंत गडग्याबाहेर पडताच मी त्याच्य्मागे जाऊन हलक्या आवाजात त्याला सूचना दिल्या.इतक्यात सुरेखाचे यजमान शहाळी घेऊन आले.मयूला ते ओळखत होतेच.माझी ओळख झाली.गडी शहाळी फोडून देऊ लागला .तेही मला चाफेरकरच्या आणखी कहाण्या सांगू लागले.मयू धुमसत होता.आजी गप्प झाली होती,आणि सुरेखाही बोलत नव्हती.मीच तिला म्हटलं,”स्वयंपाक आटप लवकर.मग बोलूयात.”ती स्वयपाकघरात गेली. थोड्या वेळाने मीही ‘तिला काही मदत हवीय ‘का ते विचारायला आत गेले,पण तिने मानेनेच नकार दिला.तिची मदतनीस बाहेर जाताच मी तिच्याशी कानगोष्ट केली.आता सुरेखा परत मूडमध्ये आली आणि मला घर दाखवून पुन्हा अंगणात सोडून आत गेली . थोड्याच वेळात चाफेरकर मागे आणि त्यापुढे दोन पोक्त माणसे सुरेखाच्या बेडयात आले.तिथूनच दोघांनीही “ओ सरपंच,”अशी हाक मारली.सुरेखा कोण आहे ते बघायला आली, तितक्यात,तिच्या यजमानांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.”या तात्या,या अण्णा.”तीन खुर्च्या रिकाम्या होत्या. एकीवर सुरेखा पटकन बसली आणि बाकी दोन खुर्च्यांवर तात्या आणि अण्णा स्थानापन्न झाले..चाफेकरचे कोणीही स्वागत केले नाही.तात्यांनी माझ्याकडे हात करत चाफेरकरला विचारले , ”याच का त्या? “त्याने ओशाळून मान हलवली.मी गप्पच होते.इतक्यात अण्णांनी आजीला फर्मावले,”गो शित्या,उठ बघू. तलाटी सायबानला बसुंदे”,मी आजीच्या हातावर हात ठेऊन बसण्याची खूण केली आणि म्हणाले.”आजी नाही उठणार.आणि या माणसासाठी तर बिलकुल नाही उठणार.आमची पाहुणी आहे ती.”अण्णा थंड.आजीच्या चेहऱ्यावर अस्फुट हसु.

“आता तात्यांनी पुढाकार घेत मलाच विचारले,”तुम्ही कोण?”मी चाफेरकरकडे एक थंड दृष्टीक्षेप टाकला. चाफेरकरने नजर चुकवली.मी उत्तले,”मी यांची वरिष्ठ अधिकारी आहे."

इथे मखलाशी अशी की,मी मंत्रालयात आहे,हे चाफेरकरला माहिती होतं पण कुठल्या विभागात आहे हे माहीत नव्हतं. पण कोकणच्या साध्याभोळ्या माणसाना खुमखुमी फार असते.”म्हणजे कलेक्टर कचेरीत काम करता?”अण्णाला आवाज फुटला.”नाही.”हे माझे उत्तर ऐकताच ,”मग कसले वरिष्ठ?”.मी चाफेरकर कडे पाहून त्याला म्हटलं”,तुमच्या हुशारीची मी दाद देते.पण कोणाकडे हुशारी करताय याची जाणीव आहे का तुम्हाला?”पुन्हा तात्या म्हणाले, “वरिष्ठ असले म्हणून काय झालं?गरिबाला त्रास नाय द्यायचा?”यावर मी,मयू,आजी,सुरेखा, सुरेखाचे यजमान आणि नुकताच तेथे दाखल झालेला यशवंता हसू लागलो.आजी आता मी लगेच उत्तरली ,”कोण हो गरीब.गनीम मेलो.”दोघेही चरफडून आजीला म्हणाले,’तू गप गो शित्या.कायव बोलतंस?’’आता सुरेखा सरसावली.”,अण्णा,तात्या ही माझी ताई.मुंबईला असते.मंत्रालयात काम करते.तुम्ही आता सडयावरची बाग घेतली आहे तिने.”हे ऐकल्यावर दोघेही आता काय बोलायचे?या विचारात,पण पुन्हा तात्यांनी पुढाकार घेतला,”गो सुन्बाय,पानाचो डबो खय?वाय सुपारी खावन आम्ही निघतो..”मी विचारले”,तुम्ही कोण?””मी साळ्वी”,दोघेही हजेरी द्यावी तसे बोलले, ”तुम्हाला काम असेल तर तुम्ही जा. पण तुमच्या बोलण्यावरून असे वाटते आहे की,तुमचा गैरसमज झाला आहे.किंवा या माणसाने तो करून दिला आहे?”पार्टी बदलण्याची संधी देताच दोघांनीही ती लगेच घेतली.”नाय,नाय गवर्मेणच्या कामात आमी नाय ढवळाढवळ करनार.”’मग थांबा ना थोडा वेळ.”मी विनंती केली.पार्टी बदलल्यामुळे आणि नक्की काय प्रकार झालाय याची उत्सुकता असल्याने दोघांनी पडत्या फळाची आज्ञा घेतली.चाफेरकरला दुसरा खड्डा दिसू लागला होता.”’नाय,नाय.तुमाला काय काम असलं”तर जा तुम्ही. मी परत एक ढुशी दिली.अहो,तुम्ही गावकऱ्यांच्यामध्ये का बोलताय?” तरीही चाफेरकर धीर करून म्हणाला,”मॅडम,मी ते घेऊन आलोय.” आजी आणि मयूचे चेहरे तणावपूर्ण. मी साळसूदपणे.”काय बरं?”खिशातून लिफाफा काढत चापेरकर म्हणाला,”ते तुम्ही सांगितलेली वस्तू.”मी?मी काय सांगितलं होतं?मी काही नव्हतं सांगितलं?”मी अतिसाळसुदपणे उत्तरले. मयू आणि आजीचा चेहऱ्यावरचा तणाव नाहीसा झाला होता.

जसं काही आताच लक्षात येतंय असा चेहरा करून मी आवाज चढवून विचारलं.”म्हणजे?मला लाच हवीय म्हणून ती द्यायला येऊन तुम्ही साक्षीदार घेऊन आला होतात?गावातले लोक काय तुम्हाला मूर्ख वाटले की काय?” मयू भूमिकेत शिरला.”बघितलंस न ताई.हा कसल्या अवलादीचा आहे तो?सकाळीच मारत होतो तर तुला दया आली ह्याची.एवढे लोक ह्याच्याविरुद्ध साक्ष द्यायला तयार झालेत तरी ह्याला काय लाज आहे का बघ.”आता चाफेरकरचा चेहरा काळवंडला.तात्या आणि अण्णा दोघांनी तोंडात सुपारी जमवलेली.पण चेहरे सांगत होतेहोते,’नसत्या लफडयातून वाचलो.”मग मयूने दोघानाही सकाळची स्टोरी सुनवली.त्यांना असा शा.नि.झालाय वगैरे काही माहीत नव्हते.त्यांनी सुपाऱ्या थुंकून चाफेरकरला अस्सल कोकणातल्या शिव्या देऊन त्याची पूजा बांधायला सुरुवात केली.
तो यशवंताकडे अगतिकतेने पाहू लागला.आता सुरेखा भूमिकेत शिरली.तिने पुढे होऊन सांगितले.”हो,हो ते पैशे ना?ते मी सांगितले होते.ते आजीच्या जेवणाचे पैसे आहेत.द्या तिला.”चाफेरकर गार .पण करतो काय?प्रसंग सांभाळत म्हणाला,” मी देणारच होतो.”त्याने आजीच्या हातात लिफाफा ठेवला.आजी सुन्न झालेली.परत हा निर्लज्ज म्हणतो कसा?,”काय गे, जेवनाचा दर काय लावलाय?”मी म्हटलं,”मी शिकवते तुला हिशेब.आज तुला शिवाय्चाच दिवस आहे बहुतेक ,तू गेली अडीच वर्ष या गावात आहेस?बरोबर.म्हणजे एचकशे पंवीस आठवडे.सात दिवसाचा आठवडा.म्हणजे एका आठवड्यात १४ जेवणे.तुला नेहमी नॉनव्हेज लागतं.नॉनव्हेज थाळीप्रशांत हॉटेलमध्येसुद्धा ७०पयाला असते हे तर घरचे जेवण.तेव्हा त्याचा दर ८० रुपये..झाले एका आठवड्याचे१,१२० रुपये, या हिशेबाने एकशे पंचवीस आठवड्याचे होतात रुपये. १,४०,०००.हे किती आहेत?,तात्या मोजाहो, हे पैसे किती आहेत ते?”आता पार्टी बदलल्यामुळे आणि पूजा बांधल्यामुळे मोकळे झालेले तात्या उत्साहाने लिफाफ्यातलेपैसे मोजू लागले,”.”एवडे?”चाफेरकरच्या तोंडून आवाज फुटेना. “हे दहाच हजार आसत.” त्यांनी जाहीर केलं .”हो आणि रोज मासे आणायला बाजारात जायचे पैसे ह्याच्यात धरलेलेच नाहीयेत. रोजचे दहा पकड.एका आठवड्याचे ७० रुपये.ते ८७५०.यात मिळव.म्हणजे अजून तू आजीचे १,३८,७५० रुपये देणे लागतोस”या माझ्या फर्मानावर,चाफेरकर एव्हाना भुईसपाट व्हायच्या बेताला.आता अण्णांनी तोंड उघडले.”म्हंजे,शित्या, ह्याने तुज पैसे नाय दिलान अजून.मग ह्येच्यावर व्याजपण लावक हवा.”. “आता तुम्ही बरोबर बोललात,गरिबाला नाडायचे नाही हेच माझेपण म्हणणे आहे.आता मला सांगा,हा विषय तुम्ही ग्रामसभेत घेणार का?येत्या ग्रामसभेला मी हजर राहणार आहे.तेव्हा हा विषय गटविकास अधिकाऱ्यांपुढे ठेवूया”.”नको ऽऽनकोऽऽऽ.तुम्ही मला इथेच काय ती रक्कम सांगा .मी देऊन टाकतो..”चाफेरकर कळवळला आणि मटकन खाली बसला.तात्या म्हणाले,“राउंड फिगर कर मेल्या.दीड लाख कर आता.”चाफेरकरकडे पर्यायच नव्हता.”तुमच्यापैकी कोणाचं खातंआहे का बॅंकेत?” तात्या आणिअण्णा दोघ्रंही एका सुरात म्हणाले. “ होय, युनायटेड वेस्टर्न बँकेत.” “मग जाल का तुम्ही उद्या बँकेत सुरेखाबरोबर.सुरेखा आजीना नेऊन त्यांचे खाते उघड या दहा हजारांनी.” तात्याच्या हातातला लिफाफा आजीच्या हातात देत मी म्हटले.सुरेखाला काही सांगायचे होते पण मी तिला गप्प बसण्याची खूण केली”.तू पण पैसे घेऊन येरे त्या बँकेत उद्याच.आम्हाला सारखं सारखं यायला करू नकोस.”तात्यांनी परस्पर दम दिला चाफेरकरला.मान हलवून त्याने होकार दिला आणिविचारले,म्हणजे ती वैशाली बारच्या बाजूचीच ना?”बर बरो तुज म्हायत?”तात्यांनी फटकारले. मी पुन्हा तात्या आणि अण्णा याचे आभार मानले आणि आता ते गेले तरी चालतील असे सुचवले.तेही परत चाफेरकरला दूषणे देत निघून गेले.चाफेरकर मला म्हणाला,”मॅडम,मी जाऊ की थांबू आता.?’आता सुरेखाच्या यजमानानी भाग घेतला,”नायतर काय तुज्या बापाच्या श्राद्धाचा जेवक थांबलंस.”चेहरा पडून चाफेरकर चालता झाला.यशवंताला मी म्हटलं”,तू सांभाळ आता.तो तुझ्यावर खार खाईल.”यशवंतापण त्याच गावाचा.म्हणतो कसा?नाय ,आता मी सांगीन माज वैनींची भीती वाटत होती,म्हणून मी खाली बगून बोलत होतो.मला वाटला त्यांनीच सांगितला.” “शाब्बास.हे मस्त होईल.”मी त्याला शाबासकी दिली.आणि तो गेला.मी यशवंताशी केलेली कानगोष्ट अशी होतीकी,’तू त्याला सांग की, पैसे देताना कोणीतरी साक्षीदार घेऊन जा.त्याप्रमाणे त्याने केले आणि मी तेच साक्षीदार माझ्या बाजूने वळवले आणि सुरेखशी केलेली कानगोष्ट अशी होती,चाफेरकरने पैसे आणले म्हटलं,की मी पेसे आणायला सांगितल्याचं नाकारणार आणि मग तिने यात भाग घेऊन ते आजीचे पैसे आहेत असं सांगायचं काही गोंधळ झाला तर मी निस्तरेन.,तेव्हा कुठे तिचा मूड परत आला होता .”.चला,भूक लागली आता जेवूयात.’आणि आम्ही जेवायला बसलो. इतक्यात आजी म्हणाली,” गो सुरेखा वायच हळद न कुकू आन गो.”सुरेखाने हळदीकुंकवाची कोयरी आणून तिच्याकडे दिली..परत आजीने तिच्या कानात काहीतरी सांगितले आणि पदराच्या शेवाची गाठ सोडून एक पाच रुपयाची घडया पडलेली नोट तिच्या हातात दिली. सुरेखा आत गेली आणि तिने ताटातून तांदूळ आणि नारळ आणले.आजी उठली स्वता:च्या ताटासमोर तो लिफाफा ठेवला.त्यावर हळदीकुंकू वाहिले.नमस्कार केला.आणि मला हळदकुंकू लावले.मीही तिला लावले. .”गे वटी भरतंय,पदर धर.”मीच्या भावनेचा आदर राखून पदर धरला.त्यात आजीने माझी ओटी भरली.ती पायावर वाकणार इतक्यात मी तिचे हात धरले आणि माझ्या डोक्यावर धरले.”नाय गे,लक्षुमीच्या पाया पडतंय”आजीचा खुलासा.”मग त्या लिफाफाच्या पाया पड तर.चाल जेवायला बस.” जेवता जेवता आजीची इतर चौकशी केली.” आजोबा काय करतात?”’काय नाय.आदी दारू पीवन का होयना कामा करीत.पण पोर गेलो नि दारू सुटली.पण काय काम नाय करीत आता.बसून नि बसून.” ”हिंडतात फिरतात का?” “मनात इलातरच.” आजी उदासपणे बोलली.”उदय त्यांनापण घेऊन जा जमलं तर.”माझी सूचना.आता सुरेखाच्या यजमानांना पण सर्व कळले होते.ते म्हणाले ,”मी येतो घेऊन काकांना.” “मघाशी तू काय म्हणत होतीस ग ?’मी सुरेखाला विचारले.”अग, तू त्या तात्या आणि अण्णांना बोलावलं आहेस ना?ते पण गाडी भाडे मागतील आजीकडे.” “त्यांनी मागितलंच आता आजी देऊ शकते. पण ते चाफेरकरचे साक्षीदार आहेत खरं तर. त्यांनी मागितलेच तर,त्यांना सांग,ताई देणार आहे म्हणून. उद्या पाहू काय ते?तिनेही मान डोलावली.”चल आता मी निघते,बागेत जाऊन येते.” मी, मयू,आणि सुरेखाचे यजमान निघालो.बागेत पोचलो.जोशींनी व्यवहार झाल्यावर आम्ही अर्धे आंबे काढायचे असे ठरवले होते. कोणालाही व्यवहार झाल्याचे फारसे माहीत नसल्याने आंबे अजून शिल्लकही होते.सुरेखाच्या यजमानानी आंबे काढून पेट्या भरण्याची जबाबदारी स्वीकारली .”उदया तुम्ही.येणार ना बँकेत? मी तिथे घेऊन येतो.”त्यांना धन्यवाद देऊन खाली उतरलो.तर पातेरे मामा मामी उभेच.थोडे त्यांच्याकडे टेकलो.मी चहा घेत नाही पण पाणी घेतले. मयू आणि सुरेखाचे यजमान यांचा चहा पिऊन झाल्यावर निघालो.बसस्टॅापवर आलो.समोर चाफेरकर.ओशाळून म्हणाला.” घरी चाललोय.राजापूरला.”मी काहीच बोलले नाही.पण सुरेखाचे यजमान कसले गप्प बसतात?,”आणि उद्यारे?” “नाय त्याच कामासाठी चाललोय .येणार ना उद्या !पण मॅडम, तेवढी केस मागे घ्याल ना?”ते बघू पुडे पुढे ते प्रकरण आणि हे प्रकरण वेगवेगळे आहे तेव्हा आताच काही सांगू शकत नाही.”मी आजच्या दिवसारली सिक्सर ठोकली.

(क्रमश:)

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

लेखाचा काही भाग रिपीट झालाय तो काढून घ्या.

बाकी केस जबरीच! पुभाप्र.

नूतन सावंत's picture

22 May 2015 - 6:39 pm | नूतन सावंत

काहीतरी गडबड झाली असून काही भागाची पुनरावृत्ती झाली आहे.सं.मं. कृपया मदत करा.

संदीप डांगे's picture

22 May 2015 - 6:44 pm | संदीप डांगे

लय भारी.. काय डोकं चालतं ब्वॉ तुम्हा मंत्रालयातल्या लोकांचं... वा वा. मजा आली.

सुबोध खरे's picture

22 May 2015 - 6:45 pm | सुबोध खरे

लेख चुकून दोन वेळा टाकला गेला आहे. सं मं ला विनंती एक भाग काढून टाकावा.
लेख उत्कृष्ट आहे हे वे सां न ल.

त्रिवेणी's picture

22 May 2015 - 7:06 pm | त्रिवेणी

म स्त ग ता ई . ब र च शि का य ला मि ळ त य.

एस's picture

22 May 2015 - 7:23 pm | एस

जेव्हा पूर्ण होईल तेव्हा सगळीकडे शेअर करण्याचे ठरवले आहे.

अतिशय प्रेरणादायक, हिरॉइक पद्धतीचे लेखन.

पुढचे क्रमशः लगेच टाका हां.

रुस्तम's picture

22 May 2015 - 7:38 pm | रुस्तम

लय भारी.. डोकेबाज ताई....

कविता१९७८'s picture

22 May 2015 - 7:43 pm | कविता१९७८

मस्तच

छान पकडलाय त्या मनुष्याला!

टवाळ कार्टा's picture

22 May 2015 - 8:40 pm | टवाळ कार्टा

कोन रे त्यो म्हंतो मिपाक साचलेपन का काय ता इला हा....शिरा पडो तेच्या तोंडार...ह्या वाचूक दी त्याका ;)

नाखु's picture

23 May 2015 - 1:53 pm | नाखु

या दिलखुलास दादेसाठी..

आणि मंत्रालयातल्या ताईंना नमन _/\_

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 May 2015 - 8:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

चांगला धडा शिकवला बदमाषाला !

अतिशय प्रेरणादायी लेखन! मस्त धडा शिकवला लाचखोराला.

श्रीरंग_जोशी's picture

22 May 2015 - 10:55 pm | श्रीरंग_जोशी

संपूर्ण मालिकाच प्रेरणादायी आहे.

हे खूपच आवडलं...

त्यावर यशवंता म्हणाला,”निरोप दिलान हाय,मांडवलीचा. ,पण मी सांगलंय,की,माजा जीव काय वर नाय आ तुजा असला निरोप देवक.” मला हसू येऊ लागले.”

बाकी काही वेळा वाक्य नेमकं कोणी म्हंटलय असा प्रश्न पडत होता. पुढच्या भागांमध्ये जरा अधिक सुटसुटीत लिहावे ही विनंती. संभाषण बरंच असल्यास नाटकाप्रमाणेसुद्धा लिहिता येईल.

रुपी's picture

23 May 2015 - 12:22 am | रुपी

अशा लोकांना तुमच्यासारखेच धडा शिकवणारे मिळायला पाहिजेत.

स्रुजा's picture

23 May 2015 - 10:18 pm | स्रुजा

+१

चुकलामाकला's picture

23 May 2015 - 7:37 am | चुकलामाकला

मजा येतेय वाचायला!

द-बाहुबली's picture

23 May 2015 - 10:37 am | द-बाहुबली

मस्त...!

रुस्तम's picture

23 May 2015 - 1:23 pm | रुस्तम

स मं कृपया लेखामधे मागील भागांच्या links डकवा.

कविता१९७८'s picture

23 May 2015 - 3:10 pm | कविता१९७८

मस्त

अभिजित - १'s picture

23 May 2015 - 4:27 pm | अभिजित - १

चान्गला फाडला

पिलीयन रायडर's picture

23 May 2015 - 6:05 pm | पिलीयन रायडर

वाचतेय!! मस्त लिहिताय सुरंगी ताई!!!

अजया's picture

23 May 2015 - 10:38 pm | अजया

मस्त मस्त मस्त!!

स्नेहानिकेत's picture

23 May 2015 - 11:05 pm | स्नेहानिकेत

छान लिहिलय सुरंगी ताई !! मजा येतेय वाचायला. पुढचा भाग लवकर येउदे .

स्पंदना's picture

24 May 2015 - 5:17 am | स्पंदना

अयोयोयो! आजीचे दिडलाख खाउन बसला व्हता ह्यो? मडं बशीवल त्याचं!१
१ नंबर गो बाय! त्या म्हातारीला पैसे मिळाल्याचा मला इतका आनंद झालाय म्हणुन सांगू?

नूतन सावंत's picture

24 May 2015 - 7:08 pm | नूतन सावंत

बॅटमॅन,संदीप डांगे,सुबोध खरे,स्वॅप्स,त्रिवेणी,
यशोधरा,निलापी,कविता,रेवाक्का,टका,नादखुळा,इस्पीकचा एक्काजी,स्वाती२,श्रीरंगजोशी,रुपी,सृजा,चुकला माकला,बॉमकेस बक्षी कविता,अभिजित,पिरा,अजया,स्नेहानिकेत आणि स्पंदना.
ताई सर्वांचे आभार.
निलापी याची सूचना पटली.सं,मं.कृपया दुवे चिकटवायला मदत करा.
त्रिवेणी, शिका आणि लढा.
रुपी,प्रत्येकवेळी आमच्यासारखे मदतीला येऊ शकत नाही तेव्हा स्वत:च स्वतःला मदत करा,
जोशी साहेब,पहिलाच प्रयत्न आहे लेखनाचा.तुमच्या सूचना लक्षात ठेवेन.
स्पन्दनाताई,अजजून शिक्षा संपली नाहीये बरं.

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 May 2015 - 9:46 am | ज्ञानोबाचे पैजार

शेवटी क्रमशः वाचुन उत्सुकता अजुनच ताणली गेली आहे.
पुढचा भाग लवकर टाका.

पैजारबुवा

उमा @ मिपा's picture

25 May 2015 - 6:11 pm | उमा @ मिपा

सगळे भाग एकदम वाचले. तुमच्या हिमतीला सलाम. मस्त धडा शिकवलाय. पुभाप्र.

तुम्हास नियम माहीत होते म्हणून तुम्ही करू शकलात, पण गावात अजूनही असेच चालते
त्याला कसा पायबंद घालणार ?अ

नूतन सावंत's picture

26 May 2015 - 10:25 pm | नूतन सावंत

नितीन, मला नियम माहीत नव्हते.मी माहीत करून घेतले.सिस्टीममध्ये असल्याचा २०%फायदा मिळतो.पण सिस्टीममधल्या सगळ्यांनाच हे करता येत नाही.आणि तसेही तर कुठेही जाताना नियम माहीत करून घ्यावेच लागतात.
या प्रकरणात फक्त नियम माहीत करून घेऊन उपयोग नव्हता.बाकीची माहितीही मिळवावी लागलीच,शिवाय तुम्हाला काय करायचे आहे असा पश्न प्रतीपाक्षाकडून येण्याची शक्यता असतेच.त्याला तोंड देण्याची हिम्मतही ठेवणे आवश्यक असते. ग्रामसभा वगैरे गावातल्या लोकांना जास्त माहीत असतात. आणि मी एकटी हे सर्व घडवून आणू शकले नसते.मदत उपलब्ध करून घेता आली पाहिजे.

खुप प्रेरणादायी लिखान असले तरी तितकेच उत्कंटावर्धक ही आहे, वाचतानाच आम्हाला इतकि मजा येत होती तर त्यावेळेस तुम्हाला आणि तुमच्या बरोबर असणार्यांना तर काय मजा येत असेल.. अशी अद्दल घडवलीच पाहिजे होती...