मी रेखाटलेली काही निसर्गचित्रे

बबन ताम्बे's picture
बबन ताम्बे in मिपा कलादालन
13 May 2015 - 2:46 pm

पुणे विमानतळाजवळील लोहगाव आता ग्रामीण चेहरामोहरा बदलून काँक्रीटचे जंगल होऊ घातले आहे. सद्ध्या जो काही निसर्ग आणि ग्रामीण भाग शिल्लक आहे, तो मी रेखाटला आहे.

Nature view

Nature view 2

Nature view 3

Nature view 4

Nature view 5

गुहागर बिच..
Guhagar Beach

घरातील खिडकीतून...
View from window

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 May 2015 - 3:05 pm | ज्ञानोबाचे पैजार

सुरेख.
रंगीत चित्रे विषेश आवडली

पैजारबुवा

छान! रंगीत चित्रांचं मिडीयम काय आहे?

बबन ताम्बे's picture

13 May 2015 - 3:15 pm | बबन ताम्बे

आधी काळ्या रंगाच्या जेल पेनने रेखाटले आहे. त्यानंतर रंगविले आहे.

आदूबाळ's picture

13 May 2015 - 3:57 pm | आदूबाळ

कशाने? जलरंग का?

बबन ताम्बे's picture

13 May 2015 - 4:03 pm | बबन ताम्बे

बाजारात वॉटर कलर पेन्सिल मिळतात. आधी कोरड्या पेन्सिलले रंगवायचे आणि त्यानंतर ब्रश पाण्यात बुडवून रंग हवा तिथे पसरवायचा. रेग्युलर वॉटर पेंटींगपेक्षा वॉटर कलर पेन्सिल वापरून पेंटींग करणे सोपे आहे.

आदूबाळ's picture

13 May 2015 - 4:19 pm | आदूबाळ

हायला! धन्यवाद.

विशाल कुलकर्णी's picture

14 May 2015 - 10:53 am | विशाल कुलकर्णी

रेग्युलर वॉटर पेंटींगपेक्षा वॉटर कलर पेन्सिल वापरून पेंटींग करणे सोपे आहे.

हायला, हे माहीत नव्हतं. ही आयडीया मस्त आहे. वापरून बघायला पाहीजे. धन्स हो देवानू.

विशाल कुलकर्णी's picture

13 May 2015 - 3:13 pm | विशाल कुलकर्णी

सुंदर !
वॉटर कलर्सच दिसताहेत बहुदा

चित्रगुप्त's picture

13 May 2015 - 3:30 pm | चित्रगुप्त

व्वा. अतिशय आवडली चित्रे. खरेतर तुमच्या मधुबाला वगैरेंच्या चित्रांपेक्षा ही खूप सरस आहेत.
एक सल्ला: घरे, भिंती, झाडे आणि जमीन यांच्या मधली रेखा जास्त ठळक रेखाटू नये, म्हणजे जमीन आणि त्यातून उगवलेली झाडे वा त्यावर बांधलेली घरे, भिंती यातील दुरावा नष्ट होतो, आणि चित्रात एक प्रकारची समरसता येते.

या माध्यमात David Gentleman याची अतिशय सुरेख चित्रे असलेली पुस्तके उपलब्ध आहेत. ती जरूर बघावीत.
डेव्हिड जंटलमन यांचे एक चित्रः
.

तुम्ही वापरलेल्या माध्यमातील एक चित्र (कुणाचे आहे, ठाऊक नाही, कॉपीराईटेड आहे वाटते, तरी देतो आहे)

.

पुढील चित्रांसाठी शुभेच्छा.

दुसरं चित्रं एक नंबर आहे.

बबन ताम्बे's picture

13 May 2015 - 3:52 pm | बबन ताम्बे

तुम्ही सुचविलेल्या सुचनांमुळे नक्कीच सुधारणा होईल. पुढील चित्रांमध्ये अमलात आणण्याचा प्रयत्न करेन.
David Gentleman यांची चित्रे सुंदर दिसताहेत. तसेच तुम्ही दाखवलेले दुसरे चित्र अप्रतिम आहे.
पुन्हा एकदा आपणास धन्यवाद.

स्पा's picture

13 May 2015 - 3:54 pm | स्पा

आहा

सगळीच अव्वल आहेत
कीप पेंटिंग !!!!

अत्रुप्त आत्मा's picture

13 May 2015 - 4:15 pm | अत्रुप्त आत्मा

फारच छान!

इरसाल's picture

13 May 2015 - 4:23 pm | इरसाल

मला कं वाट्टं म्हायते,
ह्या फटुंची पिरींट काढुनशिनी फ्रेम बनवुनशिनी घरान लावावी.

बबन ताम्बे's picture

13 May 2015 - 5:03 pm | बबन ताम्बे

इरसाल भाऊ,
जरूर फ्रेम करून घरात लावा. नो आब्जेक्सन.
मोबदला म्हून फकस्त च्या पाजा !

इरसाल's picture

14 May 2015 - 11:37 am | इरसाल

इतकचं ना. घरी या जेवायलाच (पक्षी कापुन) वाढतो. कधी येताय ?

बबन ताम्बे's picture

14 May 2015 - 12:30 pm | बबन ताम्बे

:-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2015 - 5:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली चित्र. अजुन येऊ दे.

-दिलीप बिरुटे

मराठी_माणूस's picture

13 May 2015 - 5:07 pm | मराठी_माणूस

सर्व चित्रे छान आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2015 - 5:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्र काटाआ

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

13 May 2015 - 8:27 pm | कंजूस

चित्रे फारच आवडली.फोटोग्राफीपेक्षाही चित्रमाध्यम फार प्रभावी असते याचे उदाहरण."मला असे दिसले"हे पोहोचले.तो डोंगर आणि त्यावरचे देऊळ तुमच्या मनात लहानपणापासून नाते बनून राहिले आहे का?फोटोसारखी चित्रे यावीत अशी खटपट केली नाहीत हे मनास भावले.

बबन ताम्बे's picture

13 May 2015 - 8:48 pm | बबन ताम्बे

डोंगर आणि त्यावरचे देऊळ तुमच्या मनात लहानपणापासून नाते बनून राहिले आहे का

तुम्ही बरोबर ओळखलेत. डोंगरावर लांबून दिसणारे देऊळ मला लहानपणापासून आकर्षक वाटत आले आहे.

श्रीरंग_जोशी's picture

13 May 2015 - 8:43 pm | श्रीरंग_जोशी

अप्रतिम आहेत सर्वच चित्रे. क्र. २ चे चित्र पाहून पूर्वी पाहिलेला पर्वतीचा ४०-५० वर्षांपूर्वीचा फोटो आठवला. आता शोधला तर लगेच मिळाला नाही.

शब्दबम्बाळ's picture

13 May 2015 - 8:48 pm | शब्दबम्बाळ

सगळीच सुंदर पण मला B&W विशेष आवडली! :)
फक्त दोन नंबरच्या चित्रामध्ये टेकडीच्या आउटलाईनने टेकडीला बंदिस्त केलंय असे वाटले…

बबन ताम्बे's picture

14 May 2015 - 11:12 am | बबन ताम्बे

उपयुक्त सुचना आहे. टेकडीची आउटलाईन लाईट असती तर वर चित्रगुप्त साहेबांनी सुचविल्याप्रमाणे चित्रात अजून समरसता आली असती.टेकडी आणि आकाश एकमेकांत मिसळून गेले असते.
अशाच उप्युक्त सुचना येऊ द्यात. जाणकारांच्या प्रतिक्रियांमुळे आपण कुठे चुकतो आणि कुठे सुधारणा करू शकतो याची कल्पना येते. धन्यवाद.

टवाळ कार्टा's picture

13 May 2015 - 8:48 pm | टवाळ कार्टा

हातात मज्या आहे तुम्च्या :)

चौथा कोनाडा's picture

14 May 2015 - 7:41 am | चौथा कोनाडा

सगळीच चित्रे अतिशय सुंदर व अप्रतिम !

तिसरे रंगरेखाटन विशेष आवडले.
पिसारलेले झाड, कौलारू बैठी घरे, त्यांच्या लालसर झालेल्या भिंती, कुंपणाचे दगड हे सर्व खासच !

अशी अप्रतिम चित्रे " चांदोबा" मध्ये पहायचो, त्याची आठवण झाली.

रेषाचित्रान्मध्ये उन्हाचा आभास सुंदर आहे.

कथा, कादंबरी अथवा दिवाळी अंकासाठी तुमची चित्रे चपखल आहेत.

तुमच्या सारख्या कलाकारान्मुळे मिपा चे कलादालन समृध्द होतेय !

अमृत's picture

14 May 2015 - 10:40 am | अमृत

सगळीच चित्रे एक्दम सुंदर!

बबन ताम्बे's picture

14 May 2015 - 11:16 am | बबन ताम्बे

तुमच्या प्रतिसादावरून असे दिसतेय की तुम्ही मुरलेले चित्रकार असावेत.
मिपा चे कलादालन समृध्द होण्यासाठी आपला पण हातभार लागला तर आनंदच आहे.
आम्हाला पण दाखवा ना तुमचे कौशल्य.

चौथा कोनाडा's picture

17 May 2015 - 6:10 pm | चौथा कोनाडा

ताम्बेसाहेब, आम्ही मुरलेले चित्रकार वै नाही आहोत,
हां, कधी तरी आपलं गंमत म्हणुन डुडल्स काढतो.
उदाहरणार्थ: खालील दोन:

DDL01

DDL02

बबन ताम्बे's picture

18 May 2015 - 2:08 pm | बबन ताम्बे

चौको साहेब,
अतिशय लयबद्ध आणि दमदार रेषा !
येऊ द्या अजून तुमची डुडल !

अनुप ढेरे's picture

14 May 2015 - 10:05 am | अनुप ढेरे

वाह!

विवेकपटाईत's picture

14 May 2015 - 10:06 am | विवेकपटाईत

चित्रे आवडली.

यशोधरा's picture

14 May 2015 - 10:22 am | यशोधरा

सुरेख चित्रे. आवडली.

किसन शिंदे's picture

14 May 2015 - 10:36 am | किसन शिंदे

अतिशय सुरेख चित्रे.

मृत्युन्जय's picture

14 May 2015 - 10:41 am | मृत्युन्जय

कमाल कला आहे हो तुमच्या हातात. एक नंबर आहेत चित्रे. तुमच्याकडे क्लास लावला पाहिजे,

बबन ताम्बे's picture

14 May 2015 - 11:18 am | बबन ताम्बे

कधी पण क्लास जॉइन करू शकता .

सर्व चित्र मस्त आहेत एकदम.. कित्येक वेळ बघत होतो फक्त... मस्तच..

तिसर्‍या चित्रातील वाहणार्‍या वार्‍याच्या फील खुप आवडला..

तरीही सर्वच सुंदर.. पुन्हा पुन्हा पहावी अशी..
एक काय चिक्कार चहा पाजीन .. मल पण द्या की फ्रेम करायला चित्र

बबन ताम्बे's picture

14 May 2015 - 12:34 pm | बबन ताम्बे

फक्त चहाचा बंदोबस्त करा :-)

प्रभाकर पेठकर's picture

14 May 2015 - 11:59 am | प्रभाकर पेठकर

चित्रे रेखाटण्यातील कलेचा गंध नाही. पण पाहायला नक्कीच आवडतात.
वरील सर्व चित्रे आवडली पण का कोण जाणे थेट काळजाला भिडली नाही. का ते सांगता येत नाही आणि माझा तो अधिकारही नाही. पण श्री. चित्रगुप्त ह्यांनी दिलेले सल्ले वाचता वाटले कदाचित तेच कारण असावे. असो.
तुमच्या हाती नक्कीच कला आहे. चित्रगुप्त साहेबांसारखे मार्गदर्शक लाभले तर त्या कलेचे चिज होईल ह्यात तिळमात्र शंका नाही.

बबन ताम्बे's picture

14 May 2015 - 12:37 pm | बबन ताम्बे

चित्रगुप्त साहेबांचे मार्गदर्शन आहेच. तसेच तुमच्या सारख्या रसिकांचे प्रांजळ मत पण आवडले. नक्कीच अजुन सुधारणा करण्यात येईल.

खंडेराव's picture

14 May 2015 - 12:13 pm | खंडेराव

चित्रे आवडली, फारच छान आहेत. खिडकीवाले तर मस्तच..
वाटर कलर पेन्सील ची माहीती मिळाली, वापरुन बघतो.

सानिकास्वप्निल's picture

14 May 2015 - 1:20 pm | सानिकास्वप्निल

सुरेख चित्रे, खूप आवडली.

बबन ताम्बे's picture

14 May 2015 - 2:21 pm | बबन ताम्बे

सर्व प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद.

प्यारे१'s picture

14 May 2015 - 3:21 pm | प्यारे१

छान चित्रं आहेत.

पुढील चित्रांसाठी शुभेच्छा!

पिलीयन रायडर's picture

14 May 2015 - 5:11 pm | पिलीयन रायडर

छान कला आहे हो हातात! सुंदर चित्रे.. फार आवडली..

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 May 2015 - 1:04 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त आली आहेत चित्र

झकासराव's picture

15 May 2015 - 2:34 pm | झकासराव

क्या बात है!!!!! :)

कविता१९७८'s picture

15 May 2015 - 2:42 pm | कविता१९७८

खुपच सुंदर आहेत निसर्गचित्रे