Skip to main content

मी रेखाटलेली काही निसर्गचित्रे

लेखक बबन ताम्बे यांनी बुधवार, 13/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे विमानतळाजवळील लोहगाव आता ग्रामीण चेहरामोहरा बदलून काँक्रीटचे जंगल होऊ घातले आहे. सद्ध्या जो काही निसर्ग आणि ग्रामीण भाग शिल्लक आहे, तो मी रेखाटला आहे. Nature view Nature view 2 Nature view 3 Nature view 4 Nature view 5 गुहागर बिच.. Guhagar Beach घरातील खिडकीतून... View from window

वाचने 18004
प्रतिक्रिया 54

प्रतिक्रिया

सुरेख. रंगीत चित्रे विषेश आवडली पैजारबुवा

In reply to by आदूबाळ

बाजारात वॉटर कलर पेन्सिल मिळतात. आधी कोरड्या पेन्सिलले रंगवायचे आणि त्यानंतर ब्रश पाण्यात बुडवून रंग हवा तिथे पसरवायचा. रेग्युलर वॉटर पेंटींगपेक्षा वॉटर कलर पेन्सिल वापरून पेंटींग करणे सोपे आहे.

In reply to by बबन ताम्बे

रेग्युलर वॉटर पेंटींगपेक्षा वॉटर कलर पेन्सिल वापरून पेंटींग करणे सोपे आहे. हायला, हे माहीत नव्हतं. ही आयडीया मस्त आहे. वापरून बघायला पाहीजे. धन्स हो देवानू.

सुंदर ! वॉटर कलर्सच दिसताहेत बहुदा

व्वा. अतिशय आवडली चित्रे. खरेतर तुमच्या मधुबाला वगैरेंच्या चित्रांपेक्षा ही खूप सरस आहेत. एक सल्ला: घरे, भिंती, झाडे आणि जमीन यांच्या मधली रेखा जास्त ठळक रेखाटू नये, म्हणजे जमीन आणि त्यातून उगवलेली झाडे वा त्यावर बांधलेली घरे, भिंती यातील दुरावा नष्ट होतो, आणि चित्रात एक प्रकारची समरसता येते. या माध्यमात David Gentleman याची अतिशय सुरेख चित्रे असलेली पुस्तके उपलब्ध आहेत. ती जरूर बघावीत. डेव्हिड जंटलमन यांचे एक चित्रः . तुम्ही वापरलेल्या माध्यमातील एक चित्र (कुणाचे आहे, ठाऊक नाही, कॉपीराईटेड आहे वाटते, तरी देतो आहे) . पुढील चित्रांसाठी शुभेच्छा.

In reply to by चित्रगुप्त

तुम्ही सुचविलेल्या सुचनांमुळे नक्कीच सुधारणा होईल. पुढील चित्रांमध्ये अमलात आणण्याचा प्रयत्न करेन. David Gentleman यांची चित्रे सुंदर दिसताहेत. तसेच तुम्ही दाखवलेले दुसरे चित्र अप्रतिम आहे. पुन्हा एकदा आपणास धन्यवाद.

आहा सगळीच अव्वल आहेत कीप पेंटिंग !!!!

मला कं वाट्टं म्हायते, ह्या फटुंची पिरींट काढुनशिनी फ्रेम बनवुनशिनी घरान लावावी.

In reply to by इरसाल

इरसाल भाऊ, जरूर फ्रेम करून घरात लावा. नो आब्जेक्सन. मोबदला म्हून फकस्त च्या पाजा !

In reply to by बबन ताम्बे

इतकचं ना. घरी या जेवायलाच (पक्षी कापुन) वाढतो. कधी येताय ?

आवडली चित्र. अजुन येऊ दे. -दिलीप बिरुटे

चित्रे फारच आवडली.फोटोग्राफीपेक्षाही चित्रमाध्यम फार प्रभावी असते याचे उदाहरण."मला असे दिसले"हे पोहोचले.तो डोंगर आणि त्यावरचे देऊळ तुमच्या मनात लहानपणापासून नाते बनून राहिले आहे का?फोटोसारखी चित्रे यावीत अशी खटपट केली नाहीत हे मनास भावले.

In reply to by कंजूस

डोंगर आणि त्यावरचे देऊळ तुमच्या मनात लहानपणापासून नाते बनून राहिले आहे का तुम्ही बरोबर ओळखलेत. डोंगरावर लांबून दिसणारे देऊळ मला लहानपणापासून आकर्षक वाटत आले आहे.

अप्रतिम आहेत सर्वच चित्रे. क्र. २ चे चित्र पाहून पूर्वी पाहिलेला पर्वतीचा ४०-५० वर्षांपूर्वीचा फोटो आठवला. आता शोधला तर लगेच मिळाला नाही.

सगळीच सुंदर पण मला B&W विशेष आवडली! :) फक्त दोन नंबरच्या चित्रामध्ये टेकडीच्या आउटलाईनने टेकडीला बंदिस्त केलंय असे वाटले…

In reply to by शब्दबम्बाळ

उपयुक्त सुचना आहे. टेकडीची आउटलाईन लाईट असती तर वर चित्रगुप्त साहेबांनी सुचविल्याप्रमाणे चित्रात अजून समरसता आली असती.टेकडी आणि आकाश एकमेकांत मिसळून गेले असते. अशाच उप्युक्त सुचना येऊ द्यात. जाणकारांच्या प्रतिक्रियांमुळे आपण कुठे चुकतो आणि कुठे सुधारणा करू शकतो याची कल्पना येते. धन्यवाद.

सगळीच चित्रे अतिशय सुंदर व अप्रतिम ! तिसरे रंगरेखाटन विशेष आवडले. पिसारलेले झाड, कौलारू बैठी घरे, त्यांच्या लालसर झालेल्या भिंती, कुंपणाचे दगड हे सर्व खासच ! अशी अप्रतिम चित्रे " चांदोबा" मध्ये पहायचो, त्याची आठवण झाली. रेषाचित्रान्मध्ये उन्हाचा आभास सुंदर आहे. कथा, कादंबरी अथवा दिवाळी अंकासाठी तुमची चित्रे चपखल आहेत. तुमच्या सारख्या कलाकारान्मुळे मिपा चे कलादालन समृध्द होतेय !

In reply to by चौथा कोनाडा

तुमच्या प्रतिसादावरून असे दिसतेय की तुम्ही मुरलेले चित्रकार असावेत. मिपा चे कलादालन समृध्द होण्यासाठी आपला पण हातभार लागला तर आनंदच आहे. आम्हाला पण दाखवा ना तुमचे कौशल्य.

In reply to by बबन ताम्बे

ताम्बेसाहेब, आम्ही मुरलेले चित्रकार वै नाही आहोत, हां, कधी तरी आपलं गंमत म्हणुन डुडल्स काढतो. उदाहरणार्थ: खालील दोन: DDL01 DDL02

सर्व चित्र मस्त आहेत एकदम.. कित्येक वेळ बघत होतो फक्त... मस्तच.. तिसर्‍या चित्रातील वाहणार्‍या वार्‍याच्या फील खुप आवडला.. तरीही सर्वच सुंदर.. पुन्हा पुन्हा पहावी अशी.. एक काय चिक्कार चहा पाजीन .. मल पण द्या की फ्रेम करायला चित्र

चित्रे रेखाटण्यातील कलेचा गंध नाही. पण पाहायला नक्कीच आवडतात. वरील सर्व चित्रे आवडली पण का कोण जाणे थेट काळजाला भिडली नाही. का ते सांगता येत नाही आणि माझा तो अधिकारही नाही. पण श्री. चित्रगुप्त ह्यांनी दिलेले सल्ले वाचता वाटले कदाचित तेच कारण असावे. असो. तुमच्या हाती नक्कीच कला आहे. चित्रगुप्त साहेबांसारखे मार्गदर्शक लाभले तर त्या कलेचे चिज होईल ह्यात तिळमात्र शंका नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

चित्रगुप्त साहेबांचे मार्गदर्शन आहेच. तसेच तुमच्या सारख्या रसिकांचे प्रांजळ मत पण आवडले. नक्कीच अजुन सुधारणा करण्यात येईल.

चित्रे आवडली, फारच छान आहेत. खिडकीवाले तर मस्तच.. वाटर कलर पेन्सील ची माहीती मिळाली, वापरुन बघतो.

मस्त आली आहेत चित्र