अग़बाई अरेच्चा !

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
13 May 2015 - 2:40 pm

पतीने आपल्या पत्नीसाठी आणलेली भेट पत्नीला आवडते की नाही हे पाहण्यासाठी पती तिच्या नजरेकडे पाहात असतो. वस्तू पाहण्याची उत्सुकता आणि मिळणारा प्रतिसाद लागलीच डोळ्यांच्या भाषेतून कळतो. तिच्या डोळ्यात जी चमक आणि प्रसन्नता उमटते ती फक्त पतीलाच कळते. मागची ८ वर्षे मदर्स-डे निमित्त आपल्या पत्नीला ड्रेस किंवा अलंकार भेट म्हणून देतो आहोत, तर यावेळी आपण इतर लोकांपेक्षा काही वेगळेच गिफ्ट द्यायचेच, अशी खुणगाठ, पेन होल्डरनेस या, दोन मुलांचा बाप असलेल्या, ४० वर्षीय (साहसी ?) पतीने, मनाशी बांधली. तिच्याठाई असलेली प्रीती, कृतज्ञता, एप्रीसीएशन व्यक्त करण्यासाठीच, गिफ्ट म्हणून, तिने प्रसूतीकाळात जश्या वेदना सहन केल्या, तश्याच वेदना, (ऑनकॅमेरा) काहीकाळ सहन करण्याची त्याने तयारी दर्शवली. ती तुम्ही इथे तु-नळीवर पाहू शकता. पितृत्व जर तुम्हाला खर्या अर्थाने समजून घ्यायचे असेल, तर आई होताना, पत्नीला किती कळा सोसाव्या लागतात, हे जाणून घ्या ! असे त्याचे मत. त्यानंतर त्याची पत्नी किम ने, ऑनलाईन, लेबर(प्रसूतीकळा) सिम्युलेटर, खरेदी केले, व दोघेही तिच्या गायन्याक डॉक्टरांकडे पोहोचले. डॉक्टरांनी त्याला समजावून सांगितले की सिम्युलेटर कसे कार्य करते. सिम्युलेटरच्या वायरी पोटाला लावल्यावर, त्यातुन अँबडॉमिनल मसल ला सिग्नल पाठवून, आकुंचन करवता येतात, आणि प्रसूतीकाळात गर्भाशय आकुंचन पावून, ज्याप्रकारच्या वेदना उत्पन्न होतात, तश्याच प्रकारच्या वेदना मिमिक करता येतात. सिम्युलेटर १-१० अशी डायल नॉब असतो, की ज्याद्वारे आकुंचन-सिग्नलची तीव्रता नियंत्रित करता येते. १० वर नॉब म्हणजे स्त्रीच्या प्रत्यक्ष प्रसूतीआधीच्या प्रसूतीकळा. तर डॉ नी त्याला एक्झाम टेबलवर झोपवला व स्टीरअपमधे त्याचे पाय अडकवले. नंतर त्याची परवानगी घेऊन, सिम्युलेटर सुरु केला, सुरवातीला ३ वर नॉब असताना पेन एकदम शांत होता. पण डॉक्टरांनी हळू हळू नॉब वरच्या दिशेने फिरवायला सुरवात केली, मग मात्र पेनला 'पेन' व्हायला लागल्यावर, त्याने आपल्या मुठी घट्ट आवळून घेतल्या, टेबलावर तो गुद्दे आपटू लागला, त्याच्या जीवाची तगमग तगमग सुरु झाली, असह्य वेदनांचा कल्लोळ शरीरातून उमटू लागला, प्रत्येक कळेबरोबर ब्रह्मांड आठवायला सुरुवात झाली त्यावेळी, काटा फक्त ६ वर होता, पत्नी किमला मात्र हसू हसू येतं होत. 'असं किती काळ सहन करावं लागत ग तुम्हा पत्नींना ?' त्याने न राहवून ओरडून विचारले. 'काय जास्ती नाही राजा ! फक्त ८-१० तास !' प्रेमळ पत्नी उत्तरली. जेव्हा काटा ७ वर होता, तेव्हा 'आपलं काही आता खरं नाही' असे पेनच्या चेहेर्यावरून वाटायला लागले, तेव्हा किमने डॉक्टरांनां सिम्युलेटर बंद करण्याची विनंती केली. गलितगात्र नवर्याला ती म्हणाली, 'Thank you very, very much for doing this, I feel very bad. I am very sorry.'
अश्या फक्त काही साहसी सेकंदाचा अनुभव पेनला खुपकाही शिकवून गेला !

समाजजीवनमानमाध्यमवेध

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

13 May 2015 - 3:09 pm | आनन्दा

विषयाशी सहमत.
पण एक समांतर मत मांडू इच्छितो - हा विषय नेहमीच माझ्यासमोर येतो म्हणून. माझ्या मते स्त्रियांच्या शरीरात याच वेळेस काही संप्रेरके स्त्रवतात, जी तिला त्या कळा सहन करायची शक्ती देतात. या संप्रेरकांच्या शिवाय असा प्रयोग करणे म्हणजे धाडसच आहे. मला वाटते स्त्रियांवर देखील या यंत्राचे त्यांच्या प्रसूती सोडून इतर काळात प्रयोग झाले पाहिजेत, किंवा झाले असतील तर त्याबद्दल वाचायला आवडेल.

अति अवांतर, आज मी दहावा माणूस! पहिलीच प्रतिक्रिया देतोय.

आनन्दा's picture

13 May 2015 - 3:57 pm | आनन्दा

हे पहा

द-बाहुबली's picture

13 May 2015 - 5:11 pm | द-बाहुबली

:) :) :)

पेनने घेतलेले पेन खरंच वाखाणण्याजोगे आहेत. पण प्रसूती म्हणजे नुसत्या वेदना नव्हेत त्याच्याहून अधिक, आपण आपल्या बाळाला, शरीराच्या एका भागाला, जीवाच्या तुकड्याला ह्या जगात आणतोय, ही भावना देखील आईला त्या वेदना सहन करण्याची शक्ती देते, असे मला वाटते. ज्या प्रमाणे हिरा गौळणीने आपल्या बाळासाठी असामान्य धाडस केले तेच धाडस बाळ सुखरूप असताना ती करू धजली नाही, त्याच प्रमाणे प्रसूती वेदनेतून देखील काहीतरी सुंदर घडणार आहे ही जाणीव आईला शक्ती देते. सर्व मातांना वंदन.