वन लायनर्स

गणेशा's picture
गणेशा in जनातलं, मनातलं
6 May 2015 - 12:17 pm

कधी काळी लिहिलेले माझे वन लायनर्स येथे देत आहे. आज काळ थोडा टाईम मिळत आहे मिपा वरती वाचन आणि लिखानासाठी त्यामुळे छान वाटत आहे.
कधी काळी एक कादंबरी लिहित होतो, परंतु ती कादंबरी अपुर्ण राहिली ती राहिली.. कादंबरी लिहिणे आपल्याला अशक्य असे वाटते आहे..तो आपला प्रांत नाही उगाच २-३ भाग लिहिले आणि मिपावर वर पण दिले होते .
असो एखादे वाक्य आवडले तर जरुर सांगा

वन लायनर्स :

१. "समर्थन हे चुकीच्या गोष्टींना लागते, जे बरोबर असते ते शास्वत असते त्याला आधाराची गरज नसते."

२. मिळालेल्या सुखापेक्षा त्या पलिकडील न मिळालेल्या सुखाकडे मन धावत असते आणि या अस्थिरतेचे रुपांतर होते असमाधाना मध्ये, माणुस असाच जीवनाचा प्रवास करतो आणि मनाच्या सुखासाठी यशाचे डोंगर तयार करतो . पण जेंव्हा जेंव्हा तो शिखरावर आरुढ होतो त्याला दिसते फक्त दरी आत्म्याच्या दबलेल्या स्वरांची दरी "

३. "आपण आपल्या माणसांशी आणि मनाशी प्रामाणिक रहायचे बस्स.. या सारखे सुख जगात दूसरे कुठलेच नाही "

४ "शब्दांना चेहरा नसतो.. तो असतो स्वच्छ आरसा मनाचा ...जेंव्हा या आरश्यास चेहरा चिकटतो..तेंव्हा समजावे शब्दरुपी आरश्यावरती मानवी अहंकाराचे प्रतिबींब उमटले ते"

५. कलाकारास वय नसते .. आणि त्याच्या कलाकृतीस कुठलेही बंधन.. लहान-मोठे पणाचे नाते एकदा का कलाकाराशी जोडले की उरतो फ़क्त आभास..बस्स.. कलाकृतीवरील निस्सीम प्रेमा ऐवजी राहतो फ़क्त एक क्रुत्रिम देखावा..

६. "अखंड दु:ख भोगणार्‍यांना ही दूसर्‍यास दु:ख देवूनच आनंद उपभोगता येतो "

७. "परीवर्तन .. परीसा प्रमाणे राहुन येणार्‍या प्रत्येक गोष्टीचे सोने केल्यास मिळणार्‍या यशास परीवर्तन म्हणतात "

८. "हातात असलेले फुलपाखरू उडाले की मागे उरतात ते रंग,फक्त रंग आणि ते ही फिकट , तसाच हा काळ .. तो ही असाच पटकन निघून जातो आठवणींचे रंग मागे ठेवून "

९. " काळाच्या प्रवाहात आयुष्य वाहत जात अण् या प्रवाहात शरीर रुपी अंगरख्याची लक्तरं होतात .. म्हातारपण हे आत्म्याच्या उच्छादी पणाला शाप असतं "

१०. " मन हे एक वृक्ष असते अन आठवणी त्या वृक्षाची पाने, ओळखीच्या दृष्यांची झुळूक एकदा का आली की ही पाने सळतात.. पूर्ण वृक्ष शहारून जातो अन कधी कधी तर नयनांवाटे गालावर अश्रू फुलांची ओघळण होते."

११. "शिखरावरती पोहचण्यासाठी प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात आणि दृष्टिकोन भिन्न, फक्त शिखरावरती पोहचल्यावर प्रत्येकाने निर्मायची असते ताकद आपल्या पायात शिखरावरती ठाम उभे रहाण्यासाठी ... "

१२. "ambulance वरील अक्षरे उलटी असतात कारण प्रत्येक जीविताचा प्रवास हा जीवनाकडून मरणाकडे चालू असतो, फक्त ambulance मधील व्यक्तीचा प्रवास हा उलटा मरणाकडून जीवनाकडे चालु असतो"

1३. "नातं कीतीही सुंदर असले ना तरी त्यातील बंध कोठे सैल आहेत आणि कोठे घट्ट हे नातं निभावणार्‍यालाच माहीत असते, म्हणुन त्या अनुशंघाने आपण नातं निभवत रहायच.. बस्स.. नात्याला मायेचा ओलावा आपोआप मिळतो"

१४. " आयुष्यामध्ये धडपड नसेल तर मिळालेल्या यशास ही काही अर्थ आणि आनंद नसतो "

१५. "यशाच्या वाटेवर जाण्यासाठी फक्त नविन मार्गाची इच्छा असणे गरजेचे नाही तर परिचित रस्ते सोडण्याचे धेर्य बाळगणे गरजेचे असते"

१६. "लिहिण्याला प्रामाणिकतेची जोड मिळाली की फक्त लिखाण होत नाही तर तो आयुष्याचा शिलालेख बनतो"

१७. "राजकारण हे प्रत्येक माणसाच्या मनात दडलेले असते .. माणुस जितका शांत तितका त्याचा रंग गडद"

१८. " अनुभव हा सुद्धा खुप वाईट मित्र असु शकतो"

१९. " प्रतिष्टावंतानी विचार करावा .. आपली जी प्रतिष्टा आहे ती समाजामध्ये आहे की मनामध्ये कारण या जगात प्रतिष्टा मिळवण्यासाठी बर्‍याचदा मनाला गहान ठेवावे लागते"

२०. " आपल्या विचारांशी प्रामाणिक रहाणे, हेच या जगातील सर्वश्रेष्ट कर्तव्य आहे "

२१. "सुख आणि दु;ख हे एकटेपणाच्याच दोन समान बाजू आहेत. माणसाचे दु:ख हे धृव तार्‍यासम असते.. अटळ आणि एकटे.. सुखा मध्ये माणुस अविरत आनंदी असतो, सूर्यासम.. अविरत.. स्वयंप्रकाशित..
पण सुर्यासही शाप असतो एकटेपणाचा म्हणुनच कदाचीत सुर्यासोबत कोणीच तारा नसतो सोबतीला"

२२. "चांगल काय आणि वाईट काय यांची सिमा जशी ठरलेली , तसेच गुरु आणि शिष्य
यांचे नाते असते.. अबाधीत ..समांतर"

२३ .एकटेपणा हाच आयुष्याचा एकुलता एक निरंतर सोबती आहे ..

२४. "काही प्रश्न असे असतात की त्यांची उत्तरे शोधली नाहीत तर जीवनाची असाध्य उत्तरे आपणास मिळतात"

२५ ." या जगात मैत्रीला स्थर नसतो , पण जर माणुस आपल्याच विचारांच्या टेकडीवरून मैत्रीकडे पहात असेल तर त्याला ती ठेंगणीच वाटणार.... अस्थीर विचार मैत्रीचा स्थर ठरवू शकतात, पण मैत्री विचारांचे स्थित्यंतरे पेलुन आपल्या जाग्यावर सदैव स्थिर असते "

२६. "जोपर्यंत पुरुष तन सोडून मनाकडे वळत नाही, तो पर्यंत मुलींनी आपणास मन नाही असेच समजून वागावे, मुली एकदा का मनाच्या चक्रात अडकल्या की समोरच्याची दृष्टी त्यांना अस्पष्ट दिसते .. आणि या चक्रात त्या स्वताला परावलंबी समजतात आणि मनाच्या गुरुत्वीय शक्तीभोवती फ़िरताना त्या कधी दूर फ़ेकल्या जातात त्यांनाच कळत नाही "

२७ "मन आणि विचार यात काहीच फरक नसतो, आपल्या विचरांना एक रुप देण्यासाठीच माणसाने मनाचे अस्तित्व निर्माण केले.. पण आता माणुसच विचार करतोय मनाचे स्थान कोठे आहे ..
पण तो विसरलाय विचार हाच मनाचा जन्मदाता आहे "

२८ ."वय वाढते शरीराचे .. मन तरुण असते ..भावनांना चिरतारुण्याचे वरदान लाभलेले असते..म्हणुन कुठलाही कलाकार वयस्कर नसतो, त्याच्या नजरेत सदा तारुण्य असते.. "

२९. आपल्या कलाकृतीच्या निर्मितीचा अहम नसलेला एकमेव कलाकार म्हणजे निसर्ग.

३०. "अस्थिर जीवन झाले की जगणे व्यर्थ वाटते माणसाला, आणि मग मनाच्या धुसर खिडकीतुन दिसतो फक्त एक मार्ग.. शेवटाचा.., भाबडे पणा हा अस्थिरतेची पहीली शिकार असतो त्यामुळे विचारांची ढाल हाती घेवुन अस्थिरतेचा सामना करावा प्रत्येकाने "

३१. relations हे माणसांसाठी असतात .. माणसे relations साठी नसतात ..

३२. "कुठल्याही कलाकारास त्यानी केलेल्या विविध कलाकृतींच्या निर्मितीमध्ये कधीच फ़रक जानवत नसतो त्याला दिसतो तो फ़क्त आनंद.. एक निस्सीम कलाकृतीच्या निर्मितीचा आनंद" ..

३३ " स्वप्न आणि अस्तित्व यांचा मेळ घालण्यासाठी सत्याच्या वाटेवर चालत रहावे .. तेंव्हाच माणसास मिळते एक स्वप्नवत अस्तित्व .. सत्य हाच जीवनात यशस्वी होण्याचा एकमात्र महामार्ग आहे" ..

३४."आपण काय आहोत आणि कोण आहोत हे समाजाला दाखवताना दुसर्‍यास तुच्छ लेखुन वक्तव्य करणे म्हणजे आपल्याच विचारांवर आपणच केलेला निर्घुन बलात्कार असतो" ----

३५ लादलेली नातीं न मानता मानुसकीच्या नात्यांनी समाजात वावरणे हेच आपण आपल्याशी निभावलेले सर्वस्रेष्ट नातं आहे ..
३६. "ज्यांना स्वताचे मत नसते, कींवा ते व्यक्त करता येत नाही, त्या व्यक्तिंस दूसर्‍यास मत विचारण्याचा अधिकार नसतो..."

३७. " जेंव्हा माणुस स्वताचा अहम बाजुला ठेवुन सारासार विचार करतो, तेंव्हाच त्याला स्वताचे आणि इतरांचे खरे रुप स्पष्ट दिसते.."

३८. "इतिहास हा वर्तमानावर अवलंबुन असतो ना की वर्तमान इतिहासावर"

३९. "कलाकार हा त्याच्यावर झालेले वार सहन करु शकतो, परंतु त्याच्या कलेवर झालेले वार त्याच्या ह्रद्याच्या ठिकर्या उडवून जातात.."

४०. संस्कृती आणि आपले विचार यात तफ़ावत आली तरी चालते ..पण आपले विचार, जर विचार करण्यास लावत असले तर आपण तरी त्या विचारांचा रीस्पेक्ट केला तरी बस्स ..बाकी संस्कृती ही विचारांच्या अस्तित्वावर तर टीकुन आहे

४१. " 'माझा' हा मनातील भावच 'परके'पणाचा जन्मदाता असतो, कुठल्याही वस्तुविषयी 'माझा' हा भाव निर्माण झाला की इतर जे ' आपले' या संज्ञेत बसतात, त्याविषयी ही आपोआप परकेपणाची जाणीव निर्मान होते."

४२. " 'शुभविवाह' ह्या शब्दाविषयी जरी वलय असले, तरी शुभविवाह हा नविन जोडप्यासाठी मंदिराबाहेरील पायरीसमानच असतो,'संसार' हेच खरे मंदिर.. आणि शुभसंसार हाच खरा भक्तीमार्ग"

४३. "creativity आणि त्यातुन मिळणारा आनंद हीच जीवनाची खरी संपत्ती असते.."

४४.. विचार हे प्रत्येकाच्या मनात असतात .. आणि प्रत्येकाच्या विचारांचा आदर करणे हे आपल्या मनावर असते

४५. मैत्रीमध्ये आपला फ़्रेंड मित्र आहे की मैत्रीण असा जेंव्हा विचार केला जातो तेंव्हाच त्यातिल निखळता निखळली जाते ... आणि मग उरते ती फ़क्त अस्तित्वाची आणि समाजकारणाची एक रेघ, उरतो फ़क्त एक पशुतुल्य माणुस आणि स्त्री ...

४६. " गगनभेदी इमारती बांधुन स्व:तावरच खुष असणारा माणुस, आकाशाच्या ईवल्याश्या तुकड्यावरही आपला हक्क प्रस्थापित करु शकत नाही. म्हणुनच आनंदाचे परिमान उंची न मानता, काही क्षणांचे खोल समाधान मानावे .."

४७. " समाधान आणि सुख यात फ़रक आहे .. समाधान हे आत्मिक असते, सुख हे सार्वभौम असते.
माणसाचा प्रवास सार्वभौमतेकडुन आत्मिकतेकडे जेंव्हा होतो तेंव्हा जीवनास पुर्णत्व लाभते"

४८. समाज म्हणजे काय ?
विशिष्ट चालीरीती आणि रुढींवर जातीची पगडी घेवून स्वार झालेले लोक म्हणजे समाज

४९ एकजुट ह्या शब्दातुनच फ़ुट आहे हे अधोरेखीत करुन आपला असणारा मराठी माणुस आपल्या तुकड्यांवर प्रेम करु लागला की एकजुट हे एक स्वप्न वाटते.. दुभंगलेले स्वप्न "

५०. यशस्वीतेचे कोठलेही परिमान न मानुन, येणारा प्रत्येक क्षण सुखाचा असो वा दुखाचा योग्य पद्धतीने जगणे म्हणजेच कदाचीत यशस्वी आयुष्य असेन

५१. "प्रेम हे प्रखर असते, त्यामुळे कधी कधी त्याची प्रखरता डोळ्यासमोर धुसरता निर्माण करते"

५२. "माणसाचे विचार मनातुन येतात, भाषेतुन येते ते फ़क्त त्या विचारांचे प्रतिबिंब"

५३. "घडलेल्या वाईट गोष्टींकडे जग जागरुकतेने पहात असते, आणि चांगल्या गोष्टींकडे एक अपवाद म्हणुन,
त्यामुळे आपण आपल्या गोष्टी आपल्या मनाने करत जायचे"

५४. "आघात हा मनावर होतो, शरीरावर होते ती जखम. जखम कालांतराने बरी होते, परंतु आघाताचे तरंग आयुष्यभर मनात संचार करत असतात."

५५. "इतिहास हा कागदाच्या पानावर नाही तर मनावर कोरला गेला पाहिजे "

५६. "प्रत्येक वर्तमान हा कालांतराने भुतकाळ होत जातो, परंतु त्याचा इतिहास बनवणे हे प्रत्येकाच्या मनगटात असते."

५७. तन हे विहिर माणले तरी मन हे पाणी असते हे जाणावे.
प्रेम विहिरिवर करायचे की पाण्यावर हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.

५८. प्रेमाचा रंग जरी दिसत नसला तरी आयुष्य रंगीत करण्याची ताकद प्रेमा मध्येच असते.

५९. "प्रेमाला व्याख्येत लिहिणे जरी सोपे असले तरी प्रेमाला जीवनात अखंडपणे बसवने तितकेच अवघड असते, हे ज्याला जमते तो माणुस."

६०. जोड मिळाल्यानेच अखंड अशी निर्मिती होते. तशेच अपुर्णत्वाचे सैल बंध ही, पुर्णत्वाचे आकाश विणत असतात...

६१. शुन्य भावनेच्या पाठीमागे, विचारांची एक शलाखा असते .. एक रेघ असते , जेव्हड्या शुन्य भावना जास्त तेव्हडी विचारांची रेघ मोठी

६२. "यशाच्या मार्गावरील अमुर्त अपयश हे आनंद देण्याचे कारंजे असते"

६३. "मुर्ख लोकांची परिसिमा दाखवताना .. त्यांच्या रेषेला आपला स्पर्ष होणे सहाजीकच असते .. त्या रेषेलाच बांध म्हणु शकतो आपण .. कधी तरी आपले एखादे विचारांचे पान घोंगावत तो बांध ओलांडतोच .. म्हणुन काही आपल्या हद्दीतील विचारांचा वृक्ष जागा बदलत नसतो..."

६४. " माणुस सवईचा गुलाम झाला की ती सवयच माणसाची ओळख बनते .. आणी कधी कधी त्याचे आयुष्य ह्याच सवईने अधोरेखीत होते "

------------ शब्दमेघ

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

वन लायनर्स चा भुकंप.कादंबरी। राहू द्या एकेकावर स्फुट लिहा.

रोज एकेक वाचणेत येईल.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

6 May 2015 - 1:37 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

"मी कधीच हरत नाही, एकतर मी जिंकतो नाहीतर शिकतो."

लालगरूड's picture

7 May 2015 - 12:40 am | लालगरूड

अप्रतिम

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 May 2015 - 1:45 pm | ज्ञानोबाचे पैजार

बरेचसे पटले देखील न पटलेले खालील प्रमाणे...

६. "अखंड दु:ख भोगणार्‍यांना ही दूसर्‍यास दु:ख देवूनच आनंद उपभोगता येतो "

असहमत :- उदा ज्ञानोबा माउली

१८. " अनुभव हा सुद्धा खुप वाईट मित्र असु शकतो"

-
या बद्दल तिव्र असहमती. अनुभव मग तो कसाही असुदे नेहमी चांगलाच मित्र असतो

४२. " 'शुभविवाह' ह्या शब्दाविषयी जरी वलय असले, तरी शुभविवाह हा नविन जोडप्यासाठी मंदिराबाहेरील पायरीसमानच असतो,'संसार' हेच खरे मंदिर.. आणि शुभसंसार हाच खरा भक्तीमार्ग"

बहुतेक गणेशाचे लग्न झाले नाही किंवा नुकतेच झालेले आहे. किंवा मग गणेशा ही एक भयंकर डँबीस व्यक्ती आहे. :)

५१. "प्रेम हे प्रखर असते, त्यामुळे कधी कधी त्याची प्रखरता डोळ्यासमोर धुसरता निर्माण करते"
५८. प्रेमाचा रंग जरी दिसत नसला तरी आयुष्य रंगीत करण्याची ताकद प्रेमा मध्येच असते.

परत एकदा विचार करुन पहा बुवा. दोन्ही विरुध अर्थी वाटत आहेत.

पैजारबुवा,

पैजारबुवा, असहमताशी काही प्रमाणात सहमत [:)]
प्रत्येक वाक्य हे वेगवेगळ्या वेळी लिहिले असल्याने त्याचे भाव वेगळे.. परिस्थीती वेगळी.

बहुतेक गणेशाचे लग्न झाले नाही किंवा नुकतेच झालेले आहे. किंवा मग गणेशा ही एक भयंकर डँबीस व्यक्ती आहे. :)

या तिनही गोष्टींचे उत्तर 'नाही' असे आहे.. त्यामुळे ओळखा पाहु मी कसा आहे ?

५१. "प्रेम हे प्रखर असते, त्यामुळे कधी कधी त्याची प्रखरता डोळ्यासमोर धुसरता निर्माण करते"
५८. प्रेमाचा रंग जरी दिसत नसला तरी आयुष्य रंगीत करण्याची ताकद प्रेमा मध्येच असते.

पहिल्या वाक्यातील प्रेमात .. प्रेम आंधळेपणाने वागलेले येते.
दुसर्या वाक्यात प्रेमहीन आयुष्य बेरंगी असते हे सांगितलेले आहे.

---

काही दु:खी माणसे दुसर्यांना दु:ख्खी पाहुनच आनंदी होतात.. त्यांना आनंद म्हणजे काय हे आयुष्यभर कधी उमगतच नाही.
अखंड दु:ख म्हणजे कधी आनंद माहीतच नाही.. आपल्यासारखे दुसरे म्हणजेच त्यांचा आनंद..

ज्ञानोबा देव माणुस, संत ..महात्म्यांना हे वाक्य लागु होणारच नाही..

---

" अनुभव हा सुद्धा खुप वाईट मित्र असु शकतो"

तीव्र असहमती असु शकते.. पण लिहिताना हे वाक्य स्त्री पात्राने बोललेले आहे असे आठवते.. आणि त्या स्त्री ला नेहमीच वाईट अनुभव येत राहतात.. म्हणुन वाईट मित्र.

वेल्लाभट's picture

6 May 2015 - 3:04 pm | वेल्लाभट

९, १२, १७, १९, २३, ४७, ५१ जबरदस्त आवडली.

काही व्याकरणाच्या चुका आहेत. उदाहरणार्थ:

७. "परीवर्तन .. परीसा प्रमाणे राहुन येणार्‍या प्रत्येक गोष्टीचे सोने केल्यास मिळणार्‍या यशास परीवर्तन म्हणतात "

यातल्या तीनही 'री' पहिल्या असायला हव्यात. आणि राहून मधला हू दुसरा
मूर्ख मधला मू दुसरा
सवईचा नाही, सवयीचा
इत्यादी.

असो.

काही वाक्य पटली नाहीतही. पण त्याबद्दल बोलत नाही कारण तुम्हीच म्हटल्याप्रमाणे विचार हे प्रत्येकाच्या मनात असतात .. आणि प्रत्येकाच्या विचारांचा आदर करणे हे आपल्या मनावर असते

गणेशा.. वपुंचा फॅन आहेस का..? काही काही ओळींवर वपुंची छाप दिसत आहे.

Ambulance चे वाक्य वपुंच्या पुस्तकात वाचलेले आठवत आहे.

अत्रन्गि पाउस's picture

6 May 2015 - 4:18 pm | अत्रन्गि पाउस

+1

लेखक बरेचसे आवडतात.. त्यात वपु पण आलेच, पण हल्ली ३-४ वर्षात वपु वाचु नाही वाटत काय माहीत का ?
व.पुंची छाप असणारच आहे, कारण त्यांच्या लिखानाच्या प्रेरणेनेच मी असली वाक्य लिहित होतो...

तरी Ambulance चे वाक्य व.पु. काळेंच्या पुस्तकात नक्कीच नाही, असे माझे १००% मत आहे, कारण ते वाक्य मी लिहिले तेंव्हा मी खुप आनंदात होतो...असल्यास संदर्भ देता येइल का कुठे आहे.. कारण मी बर्यापैकी व.पु वाचले आहेत २-४ पुस्तके सोडली तर

शोधून देतो.. वपुर्झा मध्ये आहे बहुदा.

गणेशा's picture

6 May 2015 - 5:26 pm | गणेशा

नक्कीच देवु शकतो ... तु जिंकला तर माझ्यातर्फे गिफ्ट तुला... कारण वपुर्झा (सर्व व.पुंच्या वाक्यांचा/ पॅरेग्राफ चा सार) मी वाचलेले आहे.. त्यात असे वाक्य नाही....
तरीही पुन्हा घरी जावुन वाचुन काढतो पुस्तक .. बर्याच वर्षात तसेही व.पु वाचलेले नाहिच ...

इतर वाक्यांचे म्हणाला असता तर तसे विचार येवु शकतात,
परंतु ambulance चे वाक्य युनिक आहे, आणि ते वाक्य जेंव्हा मी लिहिले होते तेंव्हा ते खुप आनंद देवुन गेले होते.
तु शोध पण सापडेपर्यंत विश्वास ठेवावा .
कारण मी प्रामाणिक आहे.. [:)] प्रभाव आहे, हे कोणीही व.पु. फॅन सांगु शकेन, पण वाक्यच त्यांचे हे कसे शक्य आहे असे मला वाटते..

तु शोध पण सापडेपर्यंत विश्वास ठेवावा .

कारण मी प्रामाणिक आहे.

गणेशा.. लै विचार करून राहिलास बे.. :))

अरे मोदका.. मला वाटले.. मित्र कसा काय विसरुन राहिलाय जनु मला..

असो संदिप आणि आमचा ब्लॉग पण पाहु शकतो..
तेथे मात्र सर्व वाक्य फक्त व.पुंचीच आहेत

http://vapurvai.blogspot.in/

वपुंचे पाल्हाळिक लेखन कसे काय आवडते बे गणेशा तुला?

माझ्या वाचणाची खरी सुरुवातच मुळी व.पुं च्या पार्टनर आणि महोत्सव या पुस्तकां पासुन झाली..
शिवाय माझ्या घराचे नाव "पारिजात" , हे त्यांच्या महोत्सव मधील वाक्यावरुनच ठेवले आहे.. माझे त्यांचे सर्वात आवडीचे वाक्य

वाक्य

"पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल पण लयलुट करायची ती सुगंधाचीच" ... व.पु.काळे

माझ्या मित्राने आणि मी( थोडेशे सहकार्य) यांनी केलेला ब्लॉग पहा नक्की मग

http://vapurvai.blogspot.in/

प्रचेतस's picture

6 May 2015 - 6:04 pm | प्रचेतस

ब्लॉग पाहेन रे पण वपुंचे लेखन अजिबात आवडत नाही.

कोणाचे लेखन आवडत नाही असे असु नये असे मला वाटते.. काही लेखक मला ही आवडत नव्हते .. पण म्हणुन पुन्हा मी त्यांचे इतर पुस्तके वाचली तर त्यातील विचार/गोष्टी आवडल्या.. आपण उगाच आपल्यावर बांध घालुन ठेवतो .. जसे प्रत्येक माणुस वेगळा .. तशी त्याची लिहिण्याची पद्धत पण ..

एक गोष्ट सांगतो ..खरी आहे..

मी जेंव्हा घर घेणार होतो आपल्या येथले .. पण पगार कमी असल्याने कॅन्सलच केले होते, आणि तसाच मुंबईला निघालो होतो जाता जाता तेंव्हा अलकेमिस्ट वाचत होतो.. पुस्तक काही येव्हडे आवडले नव्हते.. पण त्यातील काही घटना .. विचार असे काही मनात होते की आपण हे घर घेवुच पुढचे पुढे बघु.. नाहीच जमले तर विकता येइल .. सुख बघुच शोधुन असले बरेच विचार आले आणि चक्क दूसर्याच दिवशी माघारी येवुन टोकन पण दिले.. ७ दिवसात व्यवहार पुर्ण ... आणि हे फक्त अलकेमिस्ट जे आवडले नव्हते येव्हडे त्या पुस्तकामुळे..

मला वनलायनर आवडतात त्यांचे सुंदरच असतात..

"कबुतरास गरुडाचे पंख लावता ही येतील , पण गगन भरारीचे वेड रक्तात असावे लागते, आणि ते दत्तक घेता येत नाही " .. व.पु काळे
काय सुंदर वाक्य आहे असे तुला वाटत नाही का ?

प्रचेतस's picture

6 May 2015 - 6:26 pm | प्रचेतस

वाक्य सुंदर आहेच पण अशी वाक्ये दर साताठ ओळींनंतर यायला लागली की इरिटेट होतेच.

अत्रन्गि पाउस's picture

6 May 2015 - 7:04 pm | अत्रन्गि पाउस

४ ५ वेळा वाचले कि अत्यंत सर्वसाधारण गोष्ट 'तत्व' म्हणून मांडले आहे असे जाणवते ....
कलाकार /कलाक्षेत्रातले लोक हे जणू काही विशेष आहेत आणि त्यांची नैतिकतेची परिमाणे वेगळी असली पाहिजेत ...असे काहीसे विचार होते ...
गजरा कार्यक्रमात वपुंनी दया डोंगरे ह्यांच्या बरोबर जे काही मांडले होते त्या दिवसापासून त्यांच्याबद्दल फारसा आदर राहिला नाही ...
एकदा मुंबई पुणे प्रवासात शेजारच्या सीटवर बसले होते ...पार्टनर तेव्हा नुकतीच प्रकाशित झाली होती ...त्यांना जाग आल्यावर एक सौजन्य म्हणून मी त्यांना पार्टनर आवडल्याचे सांगितले ...पुढची ३० ३५ मिनटे इतके पिडले इतके पिडले कि तेव्हा पासून तो विषयच सोडला ... मी कसा अर्कीतेक्त / किती छान फोटो काढतो ...लेखनात कसे हे सगळे आहे ..धर्म कसा मूर्खपणा आहे ...काय काय नि काय ...
हल्ली काहीवेळा त्यांना जरुरीपेक्षा ज्यास्त प्रगल्भ लेखक म्हणून मानले जाते ते पटत नै ...

राजाभाउ's picture

7 May 2015 - 1:52 pm | राजाभाउ

प्रचंड सहमत

राजाभाउ's picture

7 May 2015 - 1:53 pm | राजाभाउ

हल्ली काहीवेळा त्यांना जरुरीपेक्षा ज्यास्त प्रगल्भ लेखक म्हणून मानले जाते ते पटत नै ...

प्रचंड सहमत

अत्रन्गि पाउस's picture

6 May 2015 - 6:57 pm | अत्रन्गि पाउस

"कबुतरास गरुडाचे पंख लावता ही येतील , पण गगन भरारीचे वेड रक्तात असावे लागते, आणि ते दत्तक घेता येत नाही "

-अमृतवेल वि स खांडेकर ....

गणेशा's picture

6 May 2015 - 10:43 pm | गणेशा

.

मोदक's picture

7 May 2015 - 5:23 am | मोदक

वपुर्झा (भाग १ व २) पान क्रमांक १००

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 May 2015 - 5:58 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुला भेटलेलो नसतो तर श्री.रंग जोशींचा डुआयडी म्हणलो असतो. अफाट स्मरणशक्ती आहे त्यांची.

श्रीरंग_जोशी's picture

7 May 2015 - 6:24 am | श्रीरंग_जोशी

<माई>
असं कै नै रे क्यापटन्या, दिल चाहता है मधल्या सुबोध (टाइमटेबल) प्रमाणे तारीख अन वार लक्षात ठेवणे अन त्याच्या जोडीला खूप सारा फाजील आत्मविश्वास यावरच रंग्याचं दुकान चाललेलं आहे.

यांचं आताशी वय झालय म्हणून नाहीतर त्या रंग्याचं बिंगं कधीच फोडलं असतं.

</माई>

जेपी's picture

7 May 2015 - 11:39 am | जेपी

=))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 May 2015 - 8:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

खपलो. वयं झालं?? खरं वाटेल कोणालातरी चुकुन.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 May 2015 - 7:05 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अल्केमिस्ट जब्राट पुस्तक आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 May 2015 - 6:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मैने एक बार कमिटमेंट करली तो मै खुदकीभी नही सुनता!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 May 2015 - 6:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

बा द वे. हल्ली एक गोष्ट लक्षात आलेली आहे. एखादं गंभीर किंवा सखोल वाक्य सुचलं की ते व.पुंच्या नावानी खपवुन दिलं जातं.

अत्रन्गि पाउस's picture

6 May 2015 - 7:06 pm | अत्रन्गि पाउस

+1

विवेकपटाईत's picture

6 May 2015 - 7:48 pm | विवेकपटाईत

जगायचा आनंद घ्यायचा असेल तर लोकोक्ती किंवा वन लायनर इत्यादी वाचले नाही पाहिजे.
अग्यांनी व्यक्ती परम सुखी असतो.

hitesh's picture

7 May 2015 - 10:55 am | hitesh

.

वपुंबद्दल कुठेतरी वाचलेला एक जबरी (आणि मार्मिक) आक्षेपः "त्यांना प्रथम गोजिरी वाक्यं सुचतात आणि त्याभोवती ते कथा रचतात!"

सतिश गावडे's picture

6 May 2015 - 11:30 pm | सतिश गावडे

अवांतरः गोजिरीवरुन आठवलं, त्यांनी आधी 50 First Dates पाहिला आणि मग त्यावरुन गोजिरी बनवला.

टवाळ कार्टा's picture

7 May 2015 - 2:46 pm | टवाळ कार्टा

ढापलेला आहे तो...आणि अतिशय वाईट्ट पध्धतीने :(

गणेशा's picture

7 May 2015 - 2:48 pm | गणेशा

50 First Dates

खुप सुंदर आहे.. गोजीरी कोकणातला दाखवुन पण तितकासा प्रभाव पाडु शकला नाही..

50 First Dates मधली अभिनेत्री पण खुप सुंदर होती

टवाळ कार्टा's picture

7 May 2015 - 2:52 pm | टवाळ कार्टा

drew barrymore ;)

लालगरूड's picture

7 May 2015 - 12:48 am | लालगरूड

६. "अखंड दु:ख भोगणार्यांना ही
दूसर्यास दु:ख देवूनच आनंद उपभोगता येतो ">>हे नाही पटले

"लिहिण्याला प्रामाणिकतेची जोड
मिळाली की फक्त लिखाण होत नाही तर तो
आयुष्याचा शिलालेख बनतो">>>> +100000000

३८. "इतिहास हा वर्तमानावर अवलंबुन असतो
ना की वर्तमान इतिहासावर">>>>> कळले नाही. समजून सांगा

३८. "इतिहास हा वर्तमानावर अवलंबुन असतो
ना की वर्तमान इतिहासावर">>>>> कळले नाही. समजून सांगा

सोप्पे आहे हे... मागे एकदा इतिहासातील व्यक्तींवरुन महाराष्ट्रात राजकीय वाद चालु होता.. अनेक व्यक्ती ज्यांनी आपले आयुष्य ज्या घटनांसाठी वेचले त्यांना ही लोक मानायला तयार नव्हते... उगाच इतिहास उकरुन काढुन काही ही चिकटवायचे मला मान्य नव्हते.. तेंव्हा एक असाच लेख लिहिलेला होता तेंव्हा त्यातले हे वाक्य आहे

अर्थः
इतिहास हाच मुळी वर्तमान झाल्यावर येतो... म्हणजे तुम्हाला जर इतिहास घडवायचा असेल तर तुम्हाला तुमचा वर्तमान दैदिप्यमान करावा लागेल, आपण जन्मल्यापासुन इतिहास वाचतो आणि आपणास वाटते त्या इतिहासावर तर आपण चालतो आहे.. पण ते चुक आहे... वर्तमान जसजसा पुढे जाईल तसतसा जाणारा काळ हा इतिहास बनत जातो ...
पुन्हा इतिहास आणि भुतकाळ वेगळे आहे.. ते वाक्य दिले आहे बहुतेक मी येथे...

लालगरूड's picture

7 May 2015 - 6:47 pm | लालगरूड

वर्तमान जसजसा पुढे जाईल तसतसा
जाणारा काळ हा इतिहास बनत जातो

_/\_

लालगरूड

द-बाहुबली's picture

7 May 2015 - 3:14 am | द-बाहुबली

हातात असलेले फुलपाखरू उडाले की मागे उरतात ते रंग,फक्त रंग आणि ते ही फिकट

पण फुलपाखरु नेहमीप्रमाणे उडत असताना ते रंग पंखावरुन हवेत झटकले कसे जात नाहित ?

श्रीरंग_जोशी's picture

7 May 2015 - 7:27 am | श्रीरंग_जोशी

गेलं वर्ष दीड वर्ष गणेशाला राजकारणावरील निरर्थक चर्चांमध्ये मोठमोठाले प्रतिसाद टंकताना पाहून माझा जीव तीळ तीळ तुटत असे. देवताओं का दिया हूनर वापरायचं सोडून हा माणूस राजकारणाची (त्यावर लिहिण्याची) नशा का करतोय असे वाटायचे. अर्थात जसं झोपेचं महत्व झोप न येणार्‍याला अधिक कळतं तसच प्रतिभेचं महत्व माझ्यासारख्या दगडाला अधिक कळतं.

एकाहून एक वाक्ये रचली आहेत. तत्वज्ञानाची आवड असणार्‍या कुणालाही भावतील अशीच आहेत. परंतु इतकी सारी वाक्ये एकत्र वाचताना योग्य तो परिणाम साधला जात नाहीये. वर काही लोकांनी म्हंटल्याप्रमाणे काही वाक्ये तार्किकदृष्ट्या पटत नाहीयेत. कदाचित संदर्भरहित असल्याने तसे होत असेल.

अधून मधून येणार्‍या टंकंनचुका एखाद्या चविष्ट पदार्थात मिठाच्या खड्यांप्रमाणे लागत आहेत. यापुढे या प्रकारचे लेखन प्रकाशित करण्यापूर्वी या निकषांवर तपासून हवे असल्यास त्या कामात हातभार लावण्यास मी आनंदाने तयार असेन.

यावरून आठवले- अशी वाक्यांच्या लोकप्रियतेत शेक्सपिअरने त्याच्या नाटकांत लिहिलेली वाक्ये आघाडीवर असतील. असेच एक माझ्या आवडीचे वाक्य ...

"Cowards die many times before their death. The tallant tastes the death but once."

यावर द्वारकानाथ संझगिरी यांचा इथे जन्मला शेक्सपिअर हा लेख वाचनीय आहे.

गणेशा's picture

7 May 2015 - 11:36 am | गणेशा

धन्यवाद मित्रा....

मिपावर गेल्या २-३ वर्षात खुप कमी येणे झाले होते.. आणि त्यात राजकारणांवर बोलणे योग्य नव्हते असे आज मला वाटत आहे... राजकारण तसा माझा आवडीचा विषय पण राजकिय विश्लेषक किंवा राजकिय तपशील याबद्दल माझे ज्ञान शुन्य आहे.. जे लिहिले ते आवडीमुळे होते.. त्यात अभ्यास काही नव्हता .. त्यामुळे येथुन पुढे शक्यतो राजकिय धाग्यावर लिहिणे बंद करणार आहे.. आवड म्हणुन वाचन फक्त केले जाईन.
---
शुद्धलेखनाबद्दल मात्र माफी असावी.. तुला तरी किती त्रास देऊ .. प्रत्येक वाक्यात खुप चुका असतील ... आता ते सुधारणार नाही..कारण मी त्याला वेळ देवु शकत नाहि...
---

लिखाणाचे म्हणशील तर ते सोडुन दिले होते.. साहित्यात पुढे जायचे असेल तर वशिला लागत आहे.. साध्या प्रोग्रॅम मध्ये पण आपलेच गाणे/कविता येण्यासाठीची व्यर्थ धडपड पाहुन हे आपणास कसे जमेल असेच वाटले होते.. आणि लिखानापासुन लांब जात राहिलो ... पुढे जाण्यासाठी वरिष्टांची विनाकारण चांगुलपणे चमचेगिरी करणे जमने निव्वळ अशक्य त्यामुळे तो प्रांत ही सुटत गेला...
पुढे घर ..संसार .नोकरी या सामान्य माणसाच्या चक्रात अडकवुन घ्यावेच लागले.. सामान्य माणासाने आधी आपल्या गरजा आणि आपल्या घराच्या गरजा भागवाव्या.. जे काही छंद असतील ते त्या नंतर हे मला पटले.. कदाचीत हे नाही पटनार इतरांना.. पण आपले घर.. आपली कुटंब सुखी असेल तरच माणुस इतर आनंद उपभोगु शकतो अशीच माझी धारणा झाली आहे.. हुश्श विषयापासुन भरकटत चाललो आहे.. त्यामुळे थांबतो ...
यावरुन एक वाक्य असेच लिहितो ...

"आयुष्याच्या सिडी वरती, कौटुंबिक पायरी जरी उशिरा येत असली तरी नंतर तिचे प्राधान्य पहिले असावे .. भले त्यासाठी स्वता धडपडले तरी चालेल... "

आपण भेटायचो तो काळ खुप छान होता... निदान तश्या कारणासाठी नाही.. पण पुन्हा आपण एकत्र जमले पाहिजे निदान महिन्यातुन एकदा असे वाटत आहे...

जाने कहा गये वो दिन ....................................

साहित्यात पुढे जायचे असेल तर वशिला लागत आहे

कोणाचा / कशासाठी वशिला? प्रकाशनासाठी का?

साहित्य म्हणजे मी गाणे/कविता या संदर्भात बोलतो आहे.. ओळखी असल्याशिवाय ( आणि चाटु गिरी गेल्याशिवाय) तुम्हाला त्या फिल्ड मध्ये घुसता येत नाही.. गेला बाजार एखाद्या सिरिअल चे गाणे पण मिळणार नाही.. जाहिरात पण दुरची गोष्ट.
अपवाद असतील तर ते सुखी...

चौकटराजा's picture

7 May 2015 - 2:20 pm | चौकटराजा

देव अस्तित्वात आहे का?१०० टक्के नाही,मग देवा ची लीला अस्तित्वात आहे का? १००० टक्के आहे.

गरजू पाटिल.'s picture

7 May 2015 - 7:41 pm | गरजू पाटिल.

९, २९, ४८ आवडेश....
बरं, ambulance नाही बरकां वपुर्झात. म्या लयीदा वाचलय, भांडत व्हतां म्हुन सांगिटलं.

गणेशा's picture

8 May 2015 - 12:06 am | गणेशा

धन्यवाद !
आणि ambulance चे वाक्य वपुर्झातच नाही तर आणखिन कुठल्याच पुस्तकात सापडणार नाही, हे माझे चॅलेंज आहे..
कारण तसे विचार मी तरी ऐकले नव्हते आधी.. बाकीचे विचार आपण अनुभवत असतो ऐकत असतो ते फक्त मी माझ्या शब्दात लिहिलेत ... ( म्हण्जे माझा चेहरा त्या शब्दांना चिकटलाय [:)]

गणेशा.. वपुर्झामध्ये हे वाक्य नाहीये.

शंकासुराबद्दल क्षमस्व!

त्या निमित्ताने बोलणे झाले मोदक , ते ही नसे थोडके..
ते वाक्य सापडले नाही, हि शुल्लक गोष्ट आहे, ते कुठेच इतरत्र पण नाही सापडणार हा माझा विश्वास आहे.

पण चुकुन दुसरे कुठले विचार , मिळते जुळते असले तरी जर त्याचा जोड येथे लागला तर काय परिस्थीती होयील ते सहज आठवले..
चोरुन ..वाक्य/कविता ढापण्यावर मला खुप राग आहे.. पण मी ते जाहिरपणे बोलत नाही.
जर हे वाक्य तुला कुठे ही सापडले असते तर तुला गिफ्ट देणार होतो..पण मी असले लिहिणे सोडुन दिले असते...
कारण कॉपी - पेस्ट मध्ये स्वारश्य नाही... आनि जेथे प्रामाणिकपणा नाही तेथे मला आवडले नसते पुन्हा लिहिण्याला.
असो माणसाने साधेच लिहिणे ..साधेच राहणे.. हे पटते.

तुझ्या सायकल ट्रीप बद्दल व्यनित बोलु

मोदक's picture

8 May 2015 - 7:53 pm | मोदक

धन्यवाद.

माझ्याकडच्या वपुंच्या कलेक्शनमध्ये जालावर मिळतील ती वपुंची वाक्ये पेस्टवून ठेवली आहेत. त्यामुळे गैरसमज झाला.

ते वाक्य तुझ्या नावावर टाकतो आता.

प्रसाद गोडबोले's picture

7 May 2015 - 8:13 pm | प्रसाद गोडबोले

सध्या प्रचलित असणारे ३ प्रसिध्द वन लायनर्स पुढील प्रमाणे

तो तुमचा समज आहे
.

चालु द्या तुमचे निरर्थक अत्मरंजन
.

ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूल्ल्ल्ल्ल्ल्ल्लऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ

टवाळ कार्टा's picture

7 May 2015 - 10:03 pm | टवाळ कार्टा

त्याच्या आधीचे
तु ये तुला फुकट देईन

प्रसाद गोडबोले's picture

7 May 2015 - 10:40 pm | प्रसाद गोडबोले

हायला हे विसरलोच होतो की =))

बॅटमॅन's picture

8 May 2015 - 12:22 am | बॅटमॅन

=))

बाकी स्वमतांधता हा एक वन-वर्डर देखील प्रचलित आहे असे कळते. ;)

सतिश गावडे's picture

8 May 2015 - 11:09 am | सतिश गावडे

तुम्हाला मुद्दा कळलेला नाही.

हे आम्ही नुकतेच वाचलेले वन लायनर आहे. आपल्याला जे सोयीचे नाही त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतरही कुणी ते लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत असल्यास ते प्रयत्न हाणून पाडण्यासाठी "तुम्हाला मुद्दा कळलेला नाही" असे म्हणावे.

बॅटमॅन's picture

8 May 2015 - 2:47 pm | बॅटमॅन

निरर्थक अत्मरंजनाला तोड नाही.

येथील ९ नंबरचे वाक्य बर्याच जनांना आवडले आहे आणि होते..

ते मी येथे दिलेल्या माझ्या अपुर्ण कादंबरीतील होते..... खरे भुकंपाचे अनुभव लिहिण्यासाठी जी कादंबरी रखडली ती रखडलीच त्यावेळेस लातुर ला जावुन अनुभव गोळा करु शकलो अस्तो पण राहिले ते आणि कादंबरीपण

हे वाक्य ज्या भागात आले होते तो भाग
http://www.misalpav.com/node/14430

(आणि वाक्य व.पु. च्या प्रभावाखाली असली तरी माझे ते लेखन माझ्या ग्रामिण शैलीतील आहे.. पुर्ण करेन आता ते मी असे ठरवत आहे.. एकदा प्रोजेक्ट चेंज झाला की त्याच कामाला लागतो..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 May 2015 - 5:30 am | निनाद मुक्काम प...

गणेशा म्हणजे प्रतिक्रियेचा बादशहा
मिपावर काही लोकांच्या लेखांची तर गणेशाच्या बादशाही प्रतीक्रीयाची मी वाट पाहतो.
सदर एकोळी विचार रत्ने काही काळातच चेपू व काय आप्पा वर
पूल , वपु , खांडेकर . किंवा त्यांचे विंग्रजीत भाषांतर होऊन विंग्रजी साहित्यिकांचा फोटोवर आढळून आई तर मला नवल वाटणार नाही आणि मग ढकलाढकलीचा खेळ सुरु होईल.
लखू रिसबूड ही अविनाशी प्रवृत्ती आहे

गणेशा's picture

8 May 2015 - 3:04 pm | गणेशा

धन्यवाद,
कवितेंना माझे जास्त रिप्लाय असायचे, नंतर भटकंतीला.. लिखानातील ९० % भाग रिप्लायमध्येच आहे.
परंतु कोणी त्याची दखल घेत असेल असे वाटले नव्हते...

अत्रन्गि पाउस's picture

8 May 2015 - 6:28 pm | अत्रन्गि पाउस

मॉडर्न लिटररी क्रीटीसिझ्म वाचले इथे शेण खाल्ले ...
मार्क्सिस्ट अप्रोचचा ह्या गध्ध्यांना पत्ताच नाही ..

गरजू पाटिल.'s picture

8 May 2015 - 5:00 pm | गरजू पाटिल.

चहात क्रिमची बिस्कीटं बुडवून खाणाराला, कुठल्याही गोष्टीवर मत व्यक्त करण्याचा नैतिक अधिकार उरत नाही ..... आमच्या कुश्याभाऊन सकाळी-सकाळी टेबलावर मारला हा लायनर, बिस्कीटं गळुन पडली ना राव चहात..

गणेशा's picture

8 May 2015 - 6:40 pm | गणेशा

एकदम मस्त