भेग.. भाग २

गणेशा's picture
गणेशा in जनातलं, मनातलं
15 Sep 2010 - 3:17 pm

भाग १ : http://www.misalpav.com/node/14413

गोदा SS .. भान हरपून मी मोठ्याने हाक मारली .. मी.. मी.. माझ्या तोंडातून आनंदाच्या भरात पुढचे शब्द येईनात

वस्तीवरची माझी एक जीवाभावाची मैत्रीण गोदा माझ्या पुढे उभी होती, अंगावर नववारी ..आता काळाने कमी झाले असतील पण तरीही तो केसांचा अंबाडा, तो कणखर आवाजही अजून तसाच होता ..

तेव्हड्यात, गौराक्का SS असे म्हणत गोदा माझ्या कडे धावतच आली, १५ वर्ष झाली आम्ही भेटून, तो जुना काळ म्हणजे काही मजा औरच होती .. गोदा, शेजारच्या राजुदादा बरोबर लग्न करून नानांची सून म्हणून आली होती, ती आली आणि एका वर्षात माझे हात ही बाबांनी पिवळे केले .. म्हणजे आमची मैत्री १ वर्षभराची .. पण अजूनही ते दिवस आठवले ना तर अंगावर रोमांच उभा राहतो ..

काळाच्या अंतरंगात आठवणींच्या काही रंगीत पाकळ्या दडलेल्या असतात, तशीच ही आठवण .. मनावर तरंग निर्माण करणारी ..

अर्र टींग्या .. कोण आलया बघ .. आत्या आलीया तुझी, आत्या ! गोधडी आण आतून .. असे गोदाचे मोठ्या आवाजातील शब्द काणी पडल्यावर माझी विचारांची शृंखला पुन्हा खंडीत झाली ..

तेच अंगण.. तोच शेनखुराचा दर्प, वाळक्या लाकडां शेजारी तुटलेल्या जाळीचा खुराडा. बाजुच्या नाराळाची पिवळी झावळी उगाच झोका घेत असल्यागत मध्येच लटकलेली. मातीच्या भिंतीचे पोपडे उडुन गेलेले आणि चुली साठी झोपडी वजा केलेली वाळलेल्या सपराची खोली ही तशीच, आणि त्या सपरांमधुन उन्हाचा कवडसा आत आलेला आणी त्या भोवती धुळ आणि धुरांचा चाललेला खेळ.

गौराक्का आज इतक्या दिसांनी .. अन अस अचानक ..? काय तुम्ही पण ? इतकं का परकं करायचं आम्हासनी, येणं तर सोडा पण साध टपाल बिपाल तरी धाडायचं कधी मधी ..

अर्र टिंग्या आण की बिगीबिगी, असा काय बघत उभा राहिलयास अजुन , थांबा तांब्याभर पाणी देते रांजणातलं .. मला तर तुम्हास्नी पाहून काय करावं आण काय नाय हेच सूचना बघा ..

टिंग्या अजुनही तिथेच होता. कावरा बावरा होउन माझ्याकडे चोरुन पहात होता. कोण आत्या ? आणि आपल्याकडे का आली असा प्रश्न त्याच्या चेहर्यावर पडला होता.
मी त्याच्याकडे बघुन हसली , तसा आत पळून गेला.

गौराक्का काय चाललं हाय तुमचं ?.. आमचं तर बघा हे अस सगळीकडे पसारा अन सारखं हे काम .. अस म्हणत गोदा बोलत होती पण तरीही माझी नजर शेजारील पडक्या वाड्यावर जात होती मधून मधून ..

माझ्या नकळतच टिंग्यान गोधडी पटकन गोदाकडे आणुन दिली. आणि परत तो आत पळाला

तुझं कस चाललंय गोदा ? अन नानां ना काय झालंय ? मी विचारले..

गोधडी झटकुन खाली टाकता टाकताच गोदा बोलु लागली,
गौराक्का काय सांगायचं तुम्हास्नी ३ वरीस झाल्यात म्हातारं हातरुनाला धरून हाय.. ह्यास्नी अन माइस्नी जाऊन १५ वरीस झालीयेत बघा, तेव्हा पासून म्या अन म्हाताऱ्यानं काय काय नाय सोसलं ..पण हा एकुलता एक आधार पण आता तुटतोय..

अजून मनगटात जोर हाय म्हणून चाललंय पण गौराक्का , " मुठीमधी कितीही बळ असलं ना तरी बी उणीव वाटते आपल्या माणसाच्या हाताची.. मायेच्या आधाराची .."

आता काय बोलत राहिलीया मी .. बस्सा हा मी च्या करून आणते ..अस म्हणत गोदा उठली ..

गोदा, कीती ग बदलय सगळं, तरी पण कधी एकदा गाव पाहते अस झालय मला, तो शेताचा बांध अजुन आठवतो मला, त्याच्या कडेचे ते आंब्याचे झाड. आणि ...

अहो काय बाकी राहिलंय आता, ते पडकं वाडं अन ती ओसाड शेतं काय पाहायचं त्यास्नी ...थांबा च्या ठेवलाय .. टिंग्या येयीन दाखवयास्नी तुमच्या बरुबर.. अन आता इतक्या दिसानी आलाय तर १०-५ दीस राहून जायच काय ..

अग मी तर एकाच दिवसा साठी आली आहे .. बरोबर कपडे पण नाहीत माझ्या कडे.. मी गोदास बोलली ..

आता कापडाच काय घेऊन बसलात माझी आहेत की म्हस पडलेली .. आता काय आईकणार नाय मी तुमचं ..

आता निवांत च्या प्या आणि वस्तीवरणं एक चक्कर मारा .. तो पर्यंत म्या मस्त कोंबडं कापते ..

आता गोदा काही ऐकणार नाही हे मला कळलेच होते ..

नाना, ओ नाना कोण आलया बघा रामा देशमुखाची पोर गौरी आलीया गौरी ..

कोण ? कंपन स्वरूपातील आवाजाने नानांनी गोदाला पुन्हा विचारले ?

आता काय म्हातार्‍याला आयकायला बी कमी येतय गौराक्का ..

अहो गौरी, देशमुखाची पोर .. गोदे ने ओरडून नानांना सांगितले.

नाव ऐकल्याबरोबर नानांनी उठण्याचा प्रयत्न केला ..

नाना नमस्कार करते, हा हा उठू नका नाना मी बसते येथे तुमच्या शेजारी. काय झालं आहे नाना ? मी कळत असूनही उगाच प्रश्न विचारला.
नानांच उभं आयुष्य कष्ट करण्यातच गेलं होते, त्याकाळातील ५ वी पर्यंतचे शिक्षण असुनही कायम शेतातच राबलेले नाना .. आणि आता त्यांची झालेली ही केविलवाणी अवस्था . बघवत नव्हत नानांकडे.

काय पोरी वय झालंया आता, मी काय उडेल बलप हाय आता कधी उडल याचा बी नेम नाय..

मी गोंधळून गप्प बसले. दोन मिनिट दोघेही गप्पच राहिलो.

पोरी का गप्प बसलीयास, चालायचंच .. " काळाच्या ओघात आयुष्य असच वहात जात, अन शरीराच्या अंगरख्याची अशी लक्तर हुत्यात, म्हातारपण हे आत्म्याच्या उच्छादी पणाला शाप असतं पोरी "

नाना.. येव्हडाच शब्द माझ्या तोंडातुन फुटला. नानांची भाषा अजुनही तशीच होती, शिकल्या मुळे त्यामध्ये मोठे मोठे मला ही माहित नसलेले शब्द येवुन जायचे. पण आता त्यांची हि अवस्था पाहिली जात नव्हती. बाजेला खिळलेले त्यांचे अस्थीपंजर शरीर, डोळ्यातली भेदकता गेलेली, सुरकतलेले कंप पावणारे हात. बस्स मी डोळे मिटुन घेतले.

ए टिंग्या इकडं ये .. आत्यास्नी च्या दे येवढा..

काय, नाव काय तुझं ? मी चहा घेत टिंग्याला विचारले .
टिंग्या ..
अरे खरे नाव काय आहे ते सांग ना ..?
युवराज , टिंग्याने सांगितले.
वा ! काय मस्त नाव आहे रे तुझे .. बरं युवराज आता की नाही मला आपली वस्ती दाखवण्यास येशील ना तू ?

हो , येईल की वाटल्यास शेजारच्या मण्याला पण घेऊ का आपल्या बरोबर , माझा मैतर आहे .

हो चालेल की .. तू कितवीत आहेस? मी गोदाकडे कपबशी देतच बोलले.

आता साहवीत आहे .. टिंग्या उत्तर देतच मण्याला बोलावयाला पळाला ..

वस्ती.. माझे घर.. ते शेत .. मनात आठवणींची सुकलेली पाने पुन्हा आवाज करू लागली ..

आत्या, चल गं .. तुला वाडी दाखवतू मी ..

पहिलं शाळेत जाऊ .. मण्याने टिंग्या ला सुचविले .

नको आपण पहिल्यांदा ह्या शेजारच्या पडक्या वाड्या कडे जाऊ या ... गोदा येते मी असे म्हणत मी तिकडे वळले ...

क्रमशा:

नोट : भेग ही कथा वजा कादंबरी मी आधीच वेगळ्या नावने लिहायला घेतली होती, परंतु अधुरी राहिलेली हि कथा त्याचे पुर्ण चित्रण बदलुन, बरेच बदल करुन, हळु हळु येथे देत आहे.
तुम्ही वाचताना बर्याच न आवडलेल्या गोष्टी येथे सांगितल्या तर तसे बदल करुन लिखान आनखिन सम्रुद्ध करण्यास त्याची मदत होईन असे वाटते. हे माजेह तसे पहिलेच गद्य मोठे लिखान आहे. चुका दाखवुन दिल्यास छान वाटेल.

धन्यवाद
-

संस्कृतीकथाभाषासाहित्यिकजीवनमानरेखाटनमाध्यमवेध

प्रतिक्रिया

चिगो's picture

15 Sep 2010 - 4:49 pm | चिगो

झ्याक लिवताय भौ तुमि. येवु द्या अदीक...

प्रीत-मोहर's picture

15 Sep 2010 - 5:00 pm | प्रीत-मोहर

छान.......

शेखर's picture

15 Sep 2010 - 6:13 pm | शेखर

वाचतोय.... तुमच्या मना प्रमाणे लिहा.... सुंदर लिहताय

स्वप्निल..'s picture

15 Sep 2010 - 11:55 pm | स्वप्निल..

असेच म्हणतो

समंजस's picture

15 Sep 2010 - 6:31 pm | समंजस

सुंदर!!
दोन्ही भाग आवडलेत. पुढील भाग येउ द्या लवकर.

प्रभो's picture

15 Sep 2010 - 7:05 pm | प्रभो

वाचतोय.

बहुगुणी's picture

16 Sep 2010 - 3:01 am | बहुगुणी

लवकर लिहा पुढचे भाग.

स्वाती२'s picture

16 Sep 2010 - 5:15 pm | स्वाती२

पुढे ?

शिल्पा ब's picture

16 Sep 2010 - 10:21 pm | शिल्पा ब

मस्त..कथा आवडली.

गरजू पाटिल.'s picture

8 May 2015 - 5:20 pm | गरजू पाटिल.

अगदि बाज धरुन लिहिलय.. खररच अप्रतिम

गणेशा's picture

8 May 2015 - 5:27 pm | गणेशा

मनापासुन धन्यवाद.. पुढे लिहिण्यास सुरुवात करीन म्हणतो... एक रिप्लाय पण चित्र बदलवु शकतो ..

आनखिन एक भाग आहे याचा .. मग खर्‍या अनुभवासाठी ठेवलेली कहानी तशीच अंदाजाने पुढे न्ह्यावी म्हणतोय

भाग-३
http://www.misalpav.com/node/14455