राख

Vimodak's picture
Vimodak in जे न देखे रवी...
25 Apr 2015 - 9:27 pm

तुझ पावलांची आस, दारास नित्य आणि,
आरास अश्रुनयनी, वदते जुनी कहानी.

तुझ विसरु कशी मी, तुझ आठवू किती मी,
अन रिक्त करता करता, तुझ साठवू किती मी ?

दिमतिस काळ माझ्या, स्मरणे तुला अखंड,
जाळून दिनरात, उरणे तुझे अनंत

श्वासात घोळलेला, शरिरात रुजवलेला...
सुगंध तुझ फिरस्ता, हृदयात सजवलेला.

तुझ्यात मी जरी ना, माझ्यात तू अजुनी...
राखेत मी जिवंत, गेले जरी विझूनी..

कविता

प्रतिक्रिया

पॉइंट ब्लँक's picture

25 Apr 2015 - 10:20 pm | पॉइंट ब्लँक

वाह, क्या बात है.

Vimodak's picture

26 Apr 2015 - 4:17 pm | Vimodak

धन्यवाद.. :)

कानडाऊ योगेशु's picture

26 Apr 2015 - 5:43 pm | कानडाऊ योगेशु

संपूर्ण कविताच सुरेख. पण खालील द्विपंक्ती जास्त आवडल्या.

तुझ विसरु कशी मी, तुझ आठवू किती मी,
अन रिक्त करता करता, तुझ साठवू किती मी ?

कवितेतील प्रत्येक कडवे गझलेतील शेराच्या जातकुळीतील वाटत आहे.

तुझ पावलांची आस, दारास नित्य आणि,
आरास अश्रुनयनी, वदते जुनी कहानी.

अतिशय सुंदर कविता .. अप्रतिम निव्वळ अप्रतिम ..

सवडीने इतर कविता वाचेन

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Apr 2015 - 5:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर कविता !

फक्त,
तुझ पावलांची आस' ऐवजी 'तुझ्या पावलांची आस'

'तुझ विसरु कशी मी, तुझ आठवू किती मी,' ऐवजी 'तु विसरु कशी मी, तु आठवू किती मी,

आणि

'सुगंध तुझ फिरस्ता' ऐवजी 'सुगंध तु / तुझा फिरस्ता'

जास्त योग्य होईल.

Vimodak's picture

30 Apr 2015 - 1:10 am | Vimodak

लिखाणात योग्य सुधारणा सुचवल्याबद्दल धन्यवाद : )
भविष्यात लक्ष्यात ठेविन..