मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राख

Vimodak · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
तुझ पावलांची आस, दारास नित्य आणि, आरास अश्रुनयनी, वदते जुनी कहानी. तुझ विसरु कशी मी, तुझ आठवू किती मी, अन रिक्त करता करता, तुझ साठवू किती मी ? दिमतिस काळ माझ्या, स्मरणे तुला अखंड, जाळून दिनरात, उरणे तुझे अनंत श्वासात घोळलेला, शरिरात रुजवलेला... सुगंध तुझ फिरस्ता, हृदयात सजवलेला. तुझ्यात मी जरी ना, माझ्यात तू अजुनी... राखेत मी जिवंत, गेले जरी विझूनी..

वाचने 1216 वाचनखूण प्रतिक्रिया 6

संपूर्ण कविताच सुरेख. पण खालील द्विपंक्ती जास्त आवडल्या.
तुझ विसरु कशी मी, तुझ आठवू किती मी, अन रिक्त करता करता, तुझ साठवू किती मी ?
कवितेतील प्रत्येक कडवे गझलेतील शेराच्या जातकुळीतील वाटत आहे.

सुंदर कविता ! फक्त, तुझ पावलांची आस' ऐवजी 'तुझ्या पावलांची आस' 'तुझ विसरु कशी मी, तुझ आठवू किती मी,' ऐवजी 'तु विसरु कशी मी, तु आठवू किती मी, आणि 'सुगंध तुझ फिरस्ता' ऐवजी 'सुगंध तु / तुझा फिरस्ता' जास्त योग्य होईल.