टु शेक्सपिअर विथ लव

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
23 Apr 2015 - 1:15 pm

प्रस्तावना: हि अप्रतिम कविता प्राजक्त देशमुख यांची ५ वर्षांपूर्वी लिहीलेली आहे. आजही ती तितकीच टवटवीत आहे. मुळात शेक्सपिअर हा फार कठीण विषय. पण प्राजक्तचे वाचन या कवितेत अगदी ठिकठिकाणी जाणवते. मला या कवितेचे रसग्रहण करणे काही जमले नाही, पण हि कविता तुमच्यासमोर आणण्यावाचूनही राहवले नाही. अर्थात हे करण्यापूर्वी कविची परवानगी घेतलेली आहेच.

टु शेक्सपिअर विथ लव

तू होतास तेव्हा आम्ही नव्हतो
तू गेलास तेव्हाही आम्ही नव्हतो,

पांढ-या टोकपिसाने...
तुला लिहतांना कधी पाहिलं नाही

लिहता लिहता..
चुकुन उडलाच शिंतोडा तर...
तो तळहाताने पुसुन...
डोक्या कि दाढीवर घासल्याचंही नाही माहित...
पण
माझ्या अजागळ खोलीत....
रॉकेलचा स्टोव्ह भगभगला की उगाच..
खिडकीजवळ
पेटत्या रोमकडे बघत
फ़िडेलवर बोटं फ़िरवणारा
दिसतो अलिप्त नेरो..

‘ती'च्या घराखालुन जातांना खिडकी दिसली...
की उगाच रोमीओगत लोंबकळुन
एखादं म्हणावसं वाटतं मखमली स्वगत ....

मित्रांच्या गराड्यात कुणी मागुन पाठिवर थाप दिली की
गंमतीनं आम्ही टाळ्या देत उसन्या ‘सिझरी’अवसानाने म्हणतो
"ब्रुटस यु टु ?"

कपाळावर आठया आल्याच तर
ओथेल्लोची गत आठवुन
ऑगस्ट्ससारखा होतो शांत...

मोकळ्या थिअटरच्या पसरल्या स्टेजवर उभा राहताच...
उगाच..
सल्ला मसलत होते हॅम्लेट्शी
जगावं की मरावं ?

टिव्हीवरच्या मालिकेतल्या..
(ओढुन ताणुन) रागीट,कुटिल,कटकारस्थानी नायिका दिसल्या की,
वाटत राहतं...
ह्या सगळींना एकत्र बसवुन..
दाखवावी लेडी मॅकबेथ

सकाळी आतुरतेनं ज्याची वाट पाहिली....
ते वर्तमानपत्र...
संध्याकाळी चोळामोळा कोप-यात दिसला कि,
उगाच आठवतो किंग लिअर

..

तू होतास तेव्हा आम्ही नव्हतो
तू गेलास तेव्हाही आम्ही नव्हतो,
हे तर जाउच दे पण....
आम्ही तरी...
खरचं आहोत कि नुसतेचं आहोत
हेही माहित नाही आम्हाला..

पण इतकं मात्र खरं शेक्सपिअर कि,

आम्ही असो नसो तू असशील..
हां तुझे शब्द आता मात्र तुझे नाहीच...

आणि
आम्ही आता थांग लावतोय ह्याचा....
कि
आमचे शब्द तरी आमचेच आहेत...?

कि
प्रसवलेत तुझ्या शब्दांतुनच .....?

-प्राजक्त ।१४।१०।१०

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

खेडूत's picture

23 Apr 2015 - 3:21 pm | खेडूत

कविता आवडली !

आणि आमच्यापर्यंत ती पोहोचवल्याबद्दल तुमचेही आभार!

पैसा's picture

23 Apr 2015 - 8:03 pm | पैसा

कविता खूपच सुंदर आहे!

बहुगुणी's picture

23 Apr 2015 - 8:16 pm | बहुगुणी

इथे दिल्याबद्दल धन्यवाद! ('मिसळलेला काव्यप्रेमी' वाचून अपेक्षेने धागा उघडला होता, तरीही मिका ने स्वतःची कविता न दिल्याचं वाईट नाही वाटलं...)

किसन शिंदे's picture

23 Apr 2015 - 8:37 pm | किसन शिंदे

मिकाचे नाव बघूनच धागा अपेक्षेने उघडला अन् नेहमीप्रमाणे धागा आवडला.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Apr 2015 - 11:25 pm | अत्रुप्त आत्मा

+१

एक एकटा एकटाच's picture

23 Apr 2015 - 9:19 pm | एक एकटा एकटाच

छान
आवडली कविता

गणेशा's picture

28 Apr 2015 - 6:47 pm | गणेशा

कविता आवडली..
पण प्राजक्त च्या आवाजात ऐकण्याची मजा वेगळीच असेल.
काही वर्षांपुर्वीचे नाशिक ला गेलेलो दिवस आठवले ( बहुतेक २००८ साल असावे)

मदनबाण's picture

29 Apr 2015 - 10:09 am | मदनबाण

सुरेख...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Nepal earthquake: humanitarian crisis engulfing 8 million people – rolling report

नाखु's picture

29 Apr 2015 - 10:21 am | नाखु

मिका खरचं फार अभिमान वाटला चांगले काव्य आमच्या पर्यंत पोहोचवले.

हि जिंदादीली सर्व प्रतिसादकांत येवो हिच शेक्सू चरणी प्रार्थना