गुजरात.......३ डभोई हिरागेट

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in भटकंती
16 Apr 2015 - 1:34 pm

गुजरात.......३ डभोई हिरागेट

आत्तापर्यंत गुजरातमधे प्रवेश केल्यावर जेवढा प्रवास केला त्यात लक्षात राहणार्‍या बाबी म्हणजे रस्त्यांचा दर्जा. जगभरातील रस्त्यांना टक्कर देतील अशा दर्जाच्या रस्त्यावरुन जाताना पोटातील पाणीही हलत नव्हते. सगळे रस्ते डांबरी, त्यामुळे आवाजही कमी येत होता व मधे खटखट येणारे आवाजही नव्हते. बरेचसे रस्ते लार्सन अँड टुब्रो या कंपनीने केले होते. रस्ते म्हणजे नुसते डांबर टाकून त्यावरुन रोड रोलर फिरवणे असे नसते तर त्यामागी काहीतरी तंत्रज्ञान असते ही महाराष्ट्रातील राजकारण्यांना केव्हा उमगणार देव जाणे. टोल नाक्यावर एकदाही दोन मिनिटापेक्षा जास्त थांबावे लागले नाही. टोलही जाचक वाटला नाही. काका पुतण्या भाच्यांना काँट्रॅक्टर बनवून त्यांच्याकडून रस्ते बनवून घेतल्यावर काय होते हे आपण इथे बघतोच आहे. एका ठिकाणी चहा पिताना एका कर्नाटकमधून आलेल्या एका पर्यटकाशी बोलताना मला माझीच लाज वाटली. तो म्हणाला, "गुजरात, मध्यप्रदेश मधे सगळे प्रमुख रस्ते चांगले आहेत. गोव्यातही चांगले आहेत एक येही महाराष्ट्रमे प्रॉब्लेम !'' नुकताच कोकणात जाऊन आल्यावर सातार्‍याच्या पुढच्या रस्त्यावरुन प्रवास केला असल्यामुळे त्याच्याशी सहमत होण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मला आता वाटू लागले आहे की आपण निवडून दिलेले स्थानिक प्रतिनिधी नालायक असतील व जर स्वतःच्या तुंबड्या भरत असतील तर राज्य सरकारने व केंद्रसरकारने एक टेंडर काढावे ज्यात दर ठरवून, त्या दराने कुठेही काम करण्यास परवानगी द्यावी. त्यात काही % बदलाची परवानगी द्यावी. कारण लोकहो ही मामा, काका, भाच्चे, पुतणे कंपनीने केलेली कामे शेवटी अपल्याच खिशातून पैसे घेऊन जातात. मला आठवते, भारतातील सगळ्या राज्य परिवाहन मंडळाने अशी योजना राबविली होती ज्यात ते गाड्यांना लागणार्‍या सुट्ट्या भागांची एकदम खरेदी ओईकडून करायचे. ती अजून चालू आहे का ते माहीत नाही. मागच्या महिन्यात जेथे लहानपणी रहात होतो त्या वाड्यात गेलो होतो. लहानपणी वाड्यात जाण्यास दीडफुटी पायरी चढावी लागे. आता उंबरा रस्त्याच्या पातळीवर आलेला दिसला. गेल्या १० वर्षात पालिकेने एवढे डांबर त्या रस्त्यावर ओतले आहे. पण रस्ता चांगला झाला का ? या प्रश्नाचे उत्तर "नाही !'' असेच आहे. असो........आणि एक राहिलेच. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम चालू होते तेथील डायव्हर्जनचे रस्ते आपल्या हमरस्त्याहूनही चांगले होते. मी गुजरातमधे बर्‍याच खेड्यात फिरलो पण रस्त्याचा अनुभव हा चांगला होता असेच म्हणावे लागेल. हे अर्थात माझे निरिक्षण आहे....

आता काही हिराभागोलची छायाचित्रे बघू....
घराच्या सज्जात उभी राहिलेली माणसे यात दाखविली आहेत. पण या पेक्षही जास्त चांगली सज्जा व त्यात उभी राहिलेली स्त्री बेलूर येथे दाखिविले आहे व ते सुद्धा अत्यंत लहान आकारात.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

बेलूरची गॅलरी. या देखाव्यातील स्त्रिच्या मुर्तीची उंची फक्त सहा/सात इंच आहे.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या जागेत एक समरप्रसंग अत्यंत बारकाईने कोरला आहे. हा प्रसंग त्रिमीतीत असल्यामुळे जास्त परिणामकारक आहे. मधे असलेला हत्ती, त्याभोवती असलेले सैनिक, वाजणारी वाद्ये....फारच मस्त..हत्तीवरची अंबारी......
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

समुद्रमंथन....यात दोरी म्हणून नागाचा उपयोग केलेला स्पष्ट दिसतो पण हे मंथन एका पात्रात का दाखविले आहे हे समजत नाही. कदाचित ते प्रतिकात्मक असावे.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या देवतेच्या हातात दिसतो तो बहुदा शुळ आहे.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

दोन झुंजणार्‍या हत्तींचे एक अप्रतीम शिल्प. एवढ्या उंचावर ते कसे चढविले असेल आणि बरोबर कसे बसविले असेल....अर्थात ते एवढे काही अवघड नसावे... :-)
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

नरसिंम्हाची पुजा आपल्याकडे बर्‍याच प्रांतात प्रचलीत होती. हंपीमधे तर आपण त्याच्या अनेक भाव असलेल्या मुर्ती पाहिल्या असतील. अर्थात महत्वाचे देव आले की त्यांचे स्त्रिस्वरुप आलेच. डाविकडे दिअसते आहे ती नरसिंहाचे स्त्रिरुप. उजवीकडे बहुदा मदन व रती असावेत. खात्री नाही.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

गेटला एक मोठा वीस एक फुटाचा लाकडी दरवाजा आहे. हा अजूनही रात्री बंद करतात. डभोईच्या या भागातून त्या भागात जाण्यासाठी हा वापरात आहे. या दरवाजातून आपण गेटच्या मागील भागात येतो. त्याचे एक छायाचित्र.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

वरील चित्रात जो डावीकडील भाग दिसत नाही त्या भिंतीवर असलेला हा एक सज्जा.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

खालील २ छायाचित्रे ही खाली जमिनीवर धुळ खात पडलेल्या दगडावरच्या कलाकुसरीची आहेत. ३ इंच आकाराच्या या शिल्पातही कारागिराने काय कमाल दाखविली आहे बघा....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हिरागेटच्या मागील भागाचे बाजूने घेतलेले छायाचित्र..... नशीबाने ही कमान त्या काळात पूर्णपणे ढासळलेली असल्यामुळे बहुदा मुर्तीभंजकांपासून वाचली असवी. ही कमान एएस्आयने मोठ्या कष्टाने उभी केली. यावर कित्येक दगडांवर क्रमांक टाकलेले स्पष्ट दिसतात. मनोमन त्या कारागिरांना व ज्यांनी ही कमान परत उभी केली त्यांना सलाम करुन आम्ही बाहेर पडलो.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

छायाचित्रांची संख्या प्रचंड असलयामुळे काहीच टाकली आहेत.

बाहेर आल्यावर आम्ही एका माणसाला अजून काही बघण्यासारखे येथे काय आहे ते विचारल्यावर त्याने सांगितले, "तुम्ही जामनगरला पक्षी बघण्यास जाणार असालच ना ? मग येथून फक्त पाच मैलावर असलेले वढवाणा चुकवूच नका.'' आणि तेथे डोळ्याचे पारणे फिटले हे सांगणे न लगे. तेथील एक फोटो खाली दिला आहे व इतर पुढच्या भागात बघू !
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

क्रमशः
जयंत कुलकर्णी.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

16 Apr 2015 - 2:08 pm | कंजूस

छान आहे.आवतीपाठथी मामाभानजाओने छट्टिउपर मोकलो.आपणनी गरवि गुजराथपर ध्यान राखलो जयंतभायजी।

अनुप ढेरे's picture

16 Apr 2015 - 2:44 pm | अनुप ढेरे

काय थक्क करणारी कलाकुसर आहे!!

एस's picture

16 Apr 2015 - 3:59 pm | एस

सुंदर!

सविता००१'s picture

16 Apr 2015 - 4:30 pm | सविता००१

अप्रतिम

सविता००१'s picture

16 Apr 2015 - 4:30 pm | सविता००१

अप्रतिम

रामपुरी's picture

17 Apr 2015 - 4:22 am | रामपुरी

गुजरात मध्ये कधी फिरणे झालेच नाही. त्याची कसर थोडी का होईना भरून निघाल्यासारखी वाटतीये

कोकणातले रस्ते आठवून थोडा वेळ संताप झाला.
बाकी फोटो मस्त आलेत. ४ क्र. चित्रातला हत्ती मोठ्याने चित्कारत आहे, हे जबरद्स्त उतरलेय...

स्पंदना's picture

17 Apr 2015 - 1:51 pm | स्पंदना

काय कला होती या लोकाम्च्या हातात?
कुठे हरवलं हे सगळ ज्ञान?

सुबोध खरे's picture

17 Apr 2015 - 3:24 pm | सुबोध खरे

मागे एका धाग्यावर गुजरातचे रस्ते गालीच्या सारखे उत्तम आहेत सांगितल्यावर मोदि द्वेष्ट्यानी टीकेची झोड उठवली होती. जी गोष्ट चांगली आहे ती आहे म्हणण्यात काय वाईट आहे? बाकी आपले लेखन आणि फोटो उत्तमच आहेत.

जयंत कुलकर्णी's picture

17 Apr 2015 - 3:52 pm | जयंत कुलकर्णी

खरे बोललात नावाप्रमाणे. कितीही प्रयत्न केला तरी तुलना मनातून जात नाही. एके काळी महाराष्ट्राचा काय रुबाब होता. आता फक्त मिरवणूका आणि हाणामार्‍या व राजकारण (भ्रष्टाचार)

सुंदर.फोटो सुरेख डभोई सुंदरच आहे.

जावे लागेल परत गुजराथला,तुमच्या लेखांमुळे!

सुंदर! आजच वाचायला सुरुवात केली आणि तीन भाग वाचून झाले पण! लेखमाला फारच छान होत आहे.

रस्त्यांच्या बाबतीत सहमत. काही वर्षांपूर्वी नाशिकहून वापीला गेले होते. गुजरातची हद्द सुरू झाल्या झाल्या मोजक्या घरांचे गाव होते पण रस्ता अतिशय छान होता.

पैसा's picture

22 Apr 2015 - 10:31 pm | पैसा

अप्रतिम फोटो! गुजरातमधे बघण्यासारखे शिल्पसौंदर्य खूपच दिसते आहे!

रस्त्यांच्या बाबत तुमच्या निरीक्षणाशी अत्यंत सहमत! गेली ३ वर्षे पुण्याला जाते येते आहे. कोल्हापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग, पण अवस्था बिकट आहे. रत्नागिरीहून कोल्हापूर्कडे जाताना तोच प्रकार. गोव्यातून अनमोड मार्गे बेळगावला जाल तर तिथे गोव्याची बॉर्डर संपते त्या रेषेच्या पलिकडे कर्नाटकात रस्ता नावाचा प्रकार अस्तित्वात नाही. थेट खानापूरपर्यंत खड्डेच खड्डे. कर्नाटकात रस्ते चांगले आहेत, पण ते बेळगाव सोडून इतरत्र. बेळगावच्या आसपास विशेषतः गोव्याच्या बाजूला भयानक अवस्था आहे.