गुजरात.........४ डभोई/वधवाणा

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in भटकंती
18 Apr 2015 - 9:47 am

गुजरात......४ डभोई/वढवाणा

हिरव्यागार शेतांमधे हा भला मोठा तलाव पक्षांचे नंदनवनच आहे. याचा व्यास अंदाजे असेल २ किमी. डभोईपासून तो साधारणतः ८ किमी अंतरावर आहे. रस्ता मस्त. रस्त्यावरच आसपासच्या शेतात अनेक स्थानिक पक्षी नजरेस पडत होते. हा तलाव बांधला गायकवाड महाराजांनी १९०९-१० या काळात. याचे क्षेत्रफळ आहे ८६० चौ. किमी. ओर्संगनदीवर बांध घालून हे पाणी अडवले आहे. या पाण्यातून आसपासच्या २५/३० खेड्यांची पिण्याच्या पाण्याची व शेताला लागणार्‍या पाण्याची गरज भागवली जाते.

रस्ता संपला तेव्हा आम्ही जंगल खात्याच्या ऑफिससमोर होतो. एक माणूस टेबल टाकून बसला होता व त्याच्या हातात पावतीपुस्तक होते. त्याच्या मागे भले मोठे डांबरी व्यवस्थित आखलेले पार्कींग. नशीबाने त्यात एकही गाडी नव्हती. म्हणजे गर्दी नसणार व पक्षिनिरिक्षण आरामात करता येणार अशी खुणगाठ मनी बांधली. समोरच एक मोठा बांध दिसत होता व त्यापलिकडे पाण्याचा एवढा मोठा साठा असेल असे कोणाला सांगूनही खरे वाटले नसते. त्या माणसाने पावती फाडली व कुठून आलात इ चौकशी केली. त्यानंतर त्याने आम्हाला त्या बांधावरुन गाडी नेण्याची परवानगी दिली. मी नको म्हणत होतो पण त्याचे ऐकले ते बरे झाले. कारण त्या बांधावरुनच आम्ही नंतर मुख्य रस्त्याला दुसर्‍या बाजूने लागलो. गाडी बांधावर चढवून उजव्या बाजूला वळलो आणि गाडी आपोआप थांबली. समोर अथांग निळ्याभोर पाण्यावर असंख्य म्हणजे मोजता येणार नाहीत इतकी बदके व इतर पक्षी तरंगत होते. त्याचमागोमाग त्यांचा कलकलाट कानावर येऊन आदळला. बापरे ! एवढ्या प्रकारचे आवाज एकाच वेळी मी ऐकलेले मला स्मरत नाही (पुण्याचा रस्ता सोडून). बांधावर एकदोन पक्षिप्रेमी कॅमेरे घेऊन बसले होते. एका ठिकाणी बाजूला सावलीत गाडी उभी केली व ते अदभूत दृष्य नजरेत साठवू लागलो.....

पक्षिजगताचा काळा पांढरा करडा झेंडा असल्यासारखे वाटत होते.....बदके व कूट.... (बदके कुठली आहेत हे तज्ञांनी लिहावे)
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

येथे प्रमुखतः बदके जास्त प्रमाणात आढळतात. अर्थात विवीध मोसमात दिसणार्‍या पक्षांची यादी फारच मोठी आहे.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ब्राह्मणी बदक....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Odd Man Out....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हे एवढे सगळे होईपर्यंत सूर्य माथ्यावर आला होता पण बदकांना त्याचे काहीहे पडले नव्हते ती क्वॅक क्वॅक करत मस्तपैकी पोहत बसली होती. हे दृष्य पाहिल्यावर मला देर्सू आठवला. खरेच हे पक्षांचे विश्व अदभुत....रम्य !

आता आम्हाला बांधावरुन तसेच पुढे जायचे होते. रस्ता मातीचा असल्यामुळे भरपूर धूळ उडत होती. व रस्ताही कच्चा होता. अंधार पडण्याआधी आम्हाला डांबरी रस्ता गाठायचा असल्यामुळे व किती वेळ लागेल याचा अंदाज नसल्यामुळे आम्ही परत परत त्या तलावावर नजर टाकून निघालो. त्या सगळ्या दृष्याचा आमच्यामनावर इतका परिणाम झाला होता की सगळेजण चुपचाप बसले होते, ते एका कॅनॉलवर असलेल्या रस्त्यापर्यंत येइतोपर्यंत....तेथे आम्हाला आद्य मासेमारी पाहण्यास मिळाली व आम्ही परत एकदा छायाचित्रणामागे लागलो......

एक छोटा कॅनॉल, त्यात वाहते पाणी, पाण्यात मासे व पाण्यावर तारा. खंड्याला याहून मासेमारीला योग्य जागा कुठून सापडणार. एक जोडी त्या तारेवर एखाद्या पुतळ्याप्रमाणे स्तब्ध बसली होती. ते चलाख पणे एकमेकांकडे पाठ करुन बसले होते. सगळीकडे निरव शांतता पसरली होती. तेवढ्या एका खंड्याला खाली पाण्यात चाहूल लागली व त्याने पाण्यात सूर मारला. बहुदा एवढा मोठा मासा त्याच्या तावडीत सापडेल असे त्याला वाटले नसेल. तो तारेवर बसणार तेवढ्यात त्याच्या चोचीतून तो पक्षी निसटला. मी श्वास रोखला.....मला वाटले गेली शिकार हातातून. पण तेवढ्यात त्याच्या जोडीदाराने त्या सावजावर सरळ रेषेत खाली झेप घेतली व तो मासा हवेतच चोचीत पकडून tतो/ती परत वर तारेवर आला/आली. काहीच मिनिटात त्याचा चट्टामट्टा झाल्यावर त्यांनी परत आपापल्या जागा घेतल्या. गंमत म्हणजे या सगळ्या शिकारीत मी पाहिले, खंड्याला स्वतःच्या पाठीमागे असलेल्या पाण्यातीला माशांची चाहूल लागू शकते. येथे जेवढी काढायला जमली ती छायाचित्रे टाकली आहेत. त्यांचा वेग व अंतर जास्त असल्यामुळे मला हे छायाचित्रण काही झेपले नाही. छायाचित्रे कमी प्रतीची आहेत....चालवून घ्या.

बंड्या, कवड्या, लेसर पाईड किंगफिशर.....
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

त्यांची मासेमारी कितीवेळ चालणार होती देवाला ठाऊक....आम्हाला मात्र बडोद्याला पोहोचायचे असल्यामुळे आम्ही त्या जोडीचा निरोप घेतला.....देवा रे ! मला मासे पकडण्यासाठी तरी उडण्याचा वर दे.....पाहिजे तर मी फक्त समुद्रावर पापलेट मारेन.....मी मनोमन प्रार्थना केली...........

क्रमशः
जयंत कुलकर्णी.

प्रतिक्रिया

वढवाणातलाव बहु सारु छे। फारच आवडले फोटो.

स्पंदना's picture

18 Apr 2015 - 5:17 pm | स्पंदना

देवा! किती तो विनय?
छायाचित्रण झेपलं नाही म्हणताना, त्या खंड्याने सूर मारण्यासाठी मिटलेले (किंवा पोझीशन केलेले) पंख सुद्धा दिसताहेत.
सुंदर सुंदर आणि निव्वळ सुंदर!

जयंत कुलकर्णी's picture

18 Apr 2015 - 5:47 pm | जयंत कुलकर्णी

अहो जर माझ्याकडे Canon Dx series असतातर मला पाहिजे तसे आले असते. या फोटोत शार्पनेस नाही हो......

वाखू साठवली आहे. अप्रतिम जागा आणि तितकेच छान फोटो.

सुबोध खरे's picture

18 Apr 2015 - 9:19 pm | सुबोध खरे

ज कु सर
आपली सहल त्याचे वर्णन आणी प्रकाशचित्रे अप्रतिम आहेत. आम्ही दवाखान्यात बसून काय करतो आहोत असे वाटते आहे. सर्व सोडून मुक्त फिरावे पक्षांच्या संगतीत दिवस घालवावे.

दोन चांगले फोटो संपूर्ण सहल सत्कारणी लावल्याचा आनंद देतात ,इथे तर कमालच झाली आहे.आपले वर्णन वाचून आणखी चारजण जाऊ म्हणतात यातच सहलीचे यश असते.

उमा @ मिपा's picture

20 Apr 2015 - 11:28 am | उमा @ मिपा

अप्रतिम!
पुन्हा पुन्हा बघितले फोटो

रुपी's picture

22 Apr 2015 - 4:52 am | रुपी

छान! अप्रतिम फोटो!

हे दृष्य पाहिल्यावर मला देर्सू आठवला. >> देर्सू काय आहे?