शिवराय बोलले आज

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
10 Apr 2015 - 6:38 pm

काव्याचा ब्लॉग दुवा हा

|| शिवराय बोलले आज ||

वेळ आहे का थोडा
चार शब्द सांगायचेत
राहवत नाही म्हणून
काही जबाब मागायचेत

आधी आभार मानतो
मोठं केलत मला
पण खरंच सांगतो तुम्ही
खोटं केलत मला

अवघ्या तुमच्या जीवनात
व्यापून टाकलत मला
मनात सोडून सगळीकडे
छापून टाकलत मला

नाव माझं घेतलत
सण माझे केलेत
माझे छावे म्हणून
राडे सुद्धा केलेत

एवढ्यावर थांबला नाहीत
मला देवासोबत बसवलत
वाईट वाटतंय म्हणताना
पण तुम्ही मला फसवलत

माझे विचार घेतले नाहीत
माझे आचार घेतले नाहीत
चरित्र माझं ओरबाडलत
पण त्याचे सार घेतले नाहीत

नुसते प्रताप आठवू नका रे
तत्व सुद्धा जपा
स्मारक पुतळे झगमग नको
माझे किल्ले जपा

निष्ठा धैर्य न्याय नीती
तत्व माझी कुठे गेली?
अरे तुम्ही सगळे माझेच ना
मग तुमची एकी कुठे गेली?

काय नक्की साधायचंय
कशात भूषण आहे
हा विचार केला नाहीत
तर सगळंच कठीण आहे

स्वाभिमानात सामर्थ्य आहे
त्याच्या जागी माज नको
आणि आहे जिथे स्वाभिमान
तिथे मुळीच लाज नको

असो; याहून काय सांगू
तुमचा काळ वेगळा आहे
पण असे नका वागू ज्याने
मला वाटेल मी एकटा आहे

- अपूर्व ओक

भावकविताकविता

प्रतिक्रिया

चाण चाण णिबंढयुक्त काव्य

बॅटमॅन's picture

12 Apr 2015 - 3:36 pm | बॅटमॅन

अगडि अगडि!

विवेकपटाईत's picture

10 Apr 2015 - 8:08 pm | विवेकपटाईत

निष्ठा धैर्य न्याय नीती
तत्व माझी कुठे गेली?
अरे तुम्ही सगळे माझेच ना
मग तुमची एकी कुठे गेली?
आवडली.

टवाळ कार्टा's picture

10 Apr 2015 - 8:31 pm | टवाळ कार्टा

मस्तय

टवाळ कार्टा's picture

10 Apr 2015 - 8:32 pm | टवाळ कार्टा

आवडली

प्रचेतस's picture

10 Apr 2015 - 8:44 pm | प्रचेतस

आवडलं रे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Apr 2015 - 8:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

काव्य आवडलं !

अत्रुप्त आत्मा's picture

11 Apr 2015 - 12:07 am | अत्रुप्त आत्मा

ताजा हाल की बातों को अच्छी तरह से उतारा है आपने
.........सिर्फ आप शायर होते तो बात और होती!

वेल्लाभट's picture

11 Apr 2015 - 8:48 am | वेल्लाभट

सुना देता कोई चंद अशार शौक़ से
उर्दू की भी बात होती तो और बात होती

पॉइंट ब्लँक's picture

11 Apr 2015 - 9:19 am | पॉइंट ब्लँक

ईरशाद!

वेल्लाभट's picture

11 Apr 2015 - 1:29 pm | वेल्लाभट

मराठेतर काही पोस्ट केल्याबद्दल क्षमस्व.

एक ग़ज़ल पेश-ए-ख़िदमत है..

कुछ बातें है जो पराये नही जानते
अपने जो बिना बताये नही जानते

तजुर्बे कई अज़ीज़ोंके कर लिये
लोग मेरे ग़मोंकी दवायें नही जानते

चुभते है रोज़ ख़याल हमें दिल में
हर बात को कैसे भुलाये नही जानते

खुश है, जो दुनिया से जुदा रहते है
रात की ज़ुल्मत, दिन के साये नही जानते

ज़िंदा है अभी तक धडकन है क़ायम
किसने है की मगर दुवाएं नही जानते

अजीब है दुनिया का चलन हुआ ज़ियाद
ये हाल है, हम अपने-परायें नही जानते

-ज़ियाद

पॉइंट ब्लँक's picture

11 Apr 2015 - 3:26 pm | पॉइंट ब्लँक

लै भारि !

स्पा's picture

11 Apr 2015 - 4:23 pm | स्पा

माशाल्ला

खुदा खॆर करे

वेल्लाभट's picture

12 Apr 2015 - 12:46 pm | वेल्लाभट

बहोत शुक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

12 Apr 2015 - 3:12 pm | अत्रुप्त आत्मा

जबराट..!

खंडेराव's picture

8 May 2015 - 5:08 pm | खंडेराव

आवडली!

पॉइंट ब्लँक's picture

11 Apr 2015 - 7:23 am | पॉइंट ब्लँक

विचार छान मांडलेत.

विअर्ड विक्स's picture

11 Apr 2015 - 3:16 pm | विअर्ड विक्स

काव्य आवडले ……

भाव न जाणुनी शब्दांची गुंफण पाहिली,

भाव मोल न जाणुनी वृत्तांची कुंपण घातली.

पद्य गद्य काही असेना , तृप्ती का न जाहली
हर्ष आम्हासी आज , अपूर्व ने सद्य स्थिती ताडली.

वेल्लाभट's picture

11 Apr 2015 - 3:20 pm | वेल्लाभट

सगळ्यांचे खूप आभार :)

एक एकटा एकटाच's picture

11 Apr 2015 - 11:48 pm | एक एकटा एकटाच

निष्ठा धैर्य न्याय नीती
तत्व माझी कुठे गेली?
अरे तुम्ही सगळे माझेच ना
मग तुमची एकी कुठे गेली?

ह्या ओळी जबरदस्त

वेल्लाभट's picture

12 Apr 2015 - 12:46 pm | वेल्लाभट

धन्यवाद्स

एक एकटा एकटाच's picture

20 Apr 2015 - 4:21 pm | एक एकटा एकटाच

तुमची ही कविता
Whatsapp वर फेमस झाली आहे.

गेल्या दोन दिवसात ३ वेगवेगळ्या ग्रुपमधुन रिसीव्ह झाली.

वेल्लाभट's picture

8 May 2015 - 5:21 pm | वेल्लाभट

हं....
प्रतिसाद उशीरा वाचतोय. हा तुमचा प्रतिसाद वाचण्यापूर्वीच मला एका नातेवाईकाने ही कल्पना दिलीन. पण वाईट इतकंच की नाव काढून्/बदलून अशा गोष्टी फॉरवर्ड होतात. असो. हे असं चौर्यकर्म भारी चालतं. माझ्या ब्लॉगवर मी प्रदर्शित केलेली आहेच.

बाकी फेमस झाली तर हवीच आहे की.

अप्रतिम कविता ... मनापासुन आवडली.. विचार करण्यासारखीच गोष्ट आहे.. तरी आपल्याच विचारात जगणार्यांचीच आजकाल राजेशाही आहे..

वेल्लाभट's picture

8 May 2015 - 5:23 pm | वेल्लाभट

आभार :)

प्राची अश्विनी's picture

9 May 2015 - 6:56 am | प्राची अश्विनी

ही कविता तुमच्या नावाशिवाय दोन तीन वेळा कस्काय्वर आली. वाइट वाटले

वेल्लाभट's picture

9 May 2015 - 8:38 am | वेल्लाभट

वरती म्हटल्याप्रमाणेच. काय करणार ! यापुढे सगळं क्वापिराईट करायचा विचार करतोय.

सतिश गावडे's picture

9 May 2015 - 9:49 am | सतिश गावडे

कविता आवडली.

शाळेच्या दिवसांमधला कितवीलातरी असलेला "महापुरुषांचा पराभव" हा धडा आठवतो अशा वेळी.
महापुरुषांच्या मृत्यूनंतर मागे उरतात ते त्यांचे विचार. या विचारांची पायमल्ली त्या महापुरुषाचे नाव घेणारे त्याचे अनुयायीच करतात. हा एक प्रकारे त्या अनुयायांनी त्या महापुरुषाचा केलेला पराभव असतो.

माधव ज्युलियनांची एक ओळ पुन्हा पुन्हा आठवते, "पुर्वजांची थोरवी लाभे पुन्हा बोलून का?"