काव्याचा ब्लॉग दुवा हा
|| शिवराय बोलले आज ||
वेळ आहे का थोडा
चार शब्द सांगायचेत
राहवत नाही म्हणून
काही जबाब मागायचेत
आधी आभार मानतो
मोठं केलत मला
पण खरंच सांगतो तुम्ही
खोटं केलत मला
अवघ्या तुमच्या जीवनात
व्यापून टाकलत मला
मनात सोडून सगळीकडे
छापून टाकलत मला
नाव माझं घेतलत
सण माझे केलेत
माझे छावे म्हणून
राडे सुद्धा केलेत
एवढ्यावर थांबला नाहीत
मला देवासोबत बसवलत
वाईट वाटतंय म्हणताना
पण तुम्ही मला फसवलत
माझे विचार घेतले नाहीत
माझे आचार घेतले नाहीत
चरित्र माझं ओरबाडलत
पण त्याचे सार घेतले नाहीत
नुसते प्रताप आठवू नका रे
तत्व सुद्धा जपा
स्मारक पुतळे झगमग नको
माझे किल्ले जपा
निष्ठा धैर्य न्याय नीती
तत्व माझी कुठे गेली?
अरे तुम्ही सगळे माझेच ना
मग तुमची एकी कुठे गेली?
काय नक्की साधायचंय
कशात भूषण आहे
हा विचार केला नाहीत
तर सगळंच कठीण आहे
स्वाभिमानात सामर्थ्य आहे
त्याच्या जागी माज नको
आणि आहे जिथे स्वाभिमान
तिथे मुळीच लाज नको
असो; याहून काय सांगू
तुमचा काळ वेगळा आहे
पण असे नका वागू ज्याने
मला वाटेल मी एकटा आहे
- अपूर्व ओक
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5169
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
चाण चाण णिबंढयुक्त काव्य
अगडि अगडि!
In reply to चाण चाण णिबंढयुक्त काव्य by स्पा
निष्ठा धैर्य न्याय नीती
मस्तय
आवडली
आवडलं रे.
काव्य आवडलं !
ताजा हाल की बातों को अच्छी
सुना देता कोई चंद अशार शौक़ से
In reply to ताजा हाल की बातों को अच्छी by अत्रुप्त आत्मा
ईरशाद!
In reply to सुना देता कोई चंद अशार शौक़ से by वेल्लाभट
तो ठीक है...
In reply to ईरशाद! by पॉइंट ब्लँक
लै भारि !
In reply to तो ठीक है... by वेल्लाभट
माशाल्ला खुदा खॆर करे
In reply to तो ठीक है... by वेल्लाभट
बहोत शुक्रिया
In reply to माशाल्ला खुदा खॆर करे by स्पा
जबराट..!
In reply to तो ठीक है... by वेल्लाभट
मस्त!
In reply to तो ठीक है... by वेल्लाभट
विचार छान मांडलेत.
काव्य आवडले ……
सगळ्यांचे खूप आभार :)
अगदी मस्त चपराक.........
:)
In reply to अगदी मस्त चपराक......... by एक एकटा एकटाच
तुमची ही कविता
In reply to :) by वेल्लाभट
हं....
In reply to तुमची ही कविता by एक एकटा एकटाच
अप्रतिम कविता ... मनापासुन
आभार :)
In reply to अप्रतिम कविता ... मनापासुन by गणेशा
ही कविता तुमच्या नावाशिवाय
हं......
In reply to ही कविता तुमच्या नावाशिवाय by प्राची अश्विनी
सुंदर !!!