ही वाट भटकंतीची १३ : वेरुळ - अजिंठा (भाग २)

गणेशा's picture
गणेशा in भटकंती
6 Apr 2015 - 5:09 pm

प्रस्तावना : सकाळची वेळ असल्याने, आणि बॅटरी बरोबर न घेतल्याने आतील बरेचसे फोटो काळसर येत असल्याने पुढील वेळेसच फोटो काढु आता निवांत सर्व बघुन घेवु असे ठरवले. काही फोटो काढले परंतु येथे देत नाही त्यासाठी लेणॅ १५ आणि १४ या लेण्यातील फोटो पाहण्यासाठी आमचे परममित्र वल्ली यांच्या धाग्याची लिंक दिलेली आहे, .
.
.
.

भाग १ : कैलास लेणे
.

मागील भागात पाहिल्या प्रमाणे, कैलास लेणे पाहुन मन खुप प्रसन्न होते..आता पर्यंत निसर्ग हा सर्वश्रेष्ठ कलाकार आहे हे मी मान्य करत होतो.. पण त्याच्या तोडीला तोड देणारे हे कैलास चे अथक काम पाहुन भारावुन न जाईल तो माणुस कसला.
त्यामुळे पुण्यावरुन - औरंगाबाद अशी सलग गाडी चालवुन संध्याकाळ पर्यंत कैलास पाहुन , पुन्हा सकाळी ५ ला एकटाच लवकर उठलो. आणि पुन्हा सकाळी कैलास पाहिले आणि शेजारील लेणे १५ आणि १४ कडे मोर्चा वळवला. खरे तर तो पर्यंत बाळ आणि बाळाची आई उठुन आवरुन तयार असणार होती.. पण त्यांचा फोन आल्यावरच त्यांच्याकडे जावुन नाष्टा करुन येवुन जैन लेण्यांकडे डायरेक्ट जावु असे ठरवले. आणि लेणी १५ आण १४ पाहण्यात गर्क झालो. खरे तर काल केलेल्या प्लॅनिंग नुसार लेणी १-१५ पुढच्या ट्रीपलाच निवांत पाहुयात असे ठरले होते. कारण पटापट सगळे हावर्या सारखे पाहण्यात खरेच अर्थ नाही असे वाटले. आणि तसेच प्लॅणिंग केले होते, त्यात संध्याकाळी आवडत्या देवगिरीकडे पण जाता आले तर जावुया असे ठरले.. कारण वेरुळ फक्त २च दिवसासाठी आम्ही ठरवले होते. आता असे जानवत होते की १ दिवस कमी पडला आपल्याला येथे.. पण काही हरकत नाही पुढील वेळेस १-१५ लेणी फिक्स.
तरीही एकट्यानेच १५-१४ लेणी पाहिलीच

मागे सांगितल्या प्रमाणे, लेणी क्रमांक १३ ते २९ ही हिंदू धर्मीयांची आहेत. ही सर्वसाधारणपणे सहाव्या ते आठव्या शतकांतील निर्मिती आहे. यात शैव शिल्पांची आणि शिवाच्या जीवनातील प्रसंगांच्या शिल्पपटांची संख्या अधिक असून वैष्णव शिल्पे तुलनात्मक दृष्ट्या कमी आहेत. राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याच्या अमदानीच्या आधीची आणि तिच्या समकालीन व नंतरची असे दोन विभाग कालदृष्ट्या आणि कलादृष्टीने करता येतात. यानुसार लेणी क्र. १४, १७, १८, १९, २०, २१, २२, २५, २७, २८ व २९ ही लेणी राष्ट्रकूटांच्या प्रभावाच्या आधीची असून, ही सहाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील असावीत. शैली व आखणी या दृष्टींनी लेणे क्रमांक २९ (सीता की नहाणी) ⇨घारापुरीच्या लेण्यांशी आश्चर्यकारक साम्य दर्शविते. लकुलीश-शिवाच्या प्रतिमांची शिल्पे (लेणी क्र. १८, २१, २९) ही वेरूळवरील लकुलीश-पाशुपत पंथाचा प्रभाव स्पष्ट करतात. आठव्या, दहाव्या व बाराव्या शतकांतील भित्तिचित्रांचे अवशेष हे कैलास लेणे, जैन गुंफा आणि डोंगरमाथ्यावरील गणेश लेण्यांत आढळतात.

लेणे १५: दशावतार आणि १४: रावण की खाई

लेणे १५: दशावतार

गतिमान शिल्पे, राष्ट्रकूट दंतिदुर्गाचा उत्कीर्ण लेख आणि पुराणातील कथा दाखविणारे शिल्पपट ही या लेण्याची वैशिष्ट्ये होत. हे लेणे दुमजली आहे. त्याच्या दर्शनी खांबाच्या माथ्यावर भूमिस्पर्शमुद्रेतील बुद्धाची मूर्ती कोरलेली आहे.

या लेण्यासमोर प्रशस्त प्रांगण आहे आणि त्याच्या मध्यभागी एक मंडप आहे. मुख्य मंडपाच्या मागील भिंतीवर राष्ट्रकूल घराण्यातील दंतिदुर्ग राजाचा प्रदीर्घ लेख आहे. राष्ट्रकूट घराण्याची वंशावळ आणि शेवटी दंतिदुर्ग या लेण्यात सैन्यासह येऊन गेल्याचा उल्लेख यात आहे. मंडपावर सिंह, यक्ष, गर्भगृहांच्या प्रतिकृती, गंगा, यमुना इ. मूर्ती आणि जाळीदार खिडक्या आहेत.

हे लेणे दुमजली आहे. याच्या उत्तरेकडील कोपऱ्यात जिन्याच्या पायऱ्या असून, मधल्या कट्ट्याच्या भिंतीत कोनाडे आहेत. त्यांत गणेश, शिव - पार्वतीची आलिंगन-मूर्ती, सूर्य, शिव- पार्वती, गजानन-गण, महिषादुरमर्दिनी, अर्धनारीनटेश्वर, दुर्गा, तपस्वी उमा, गणेश, काली इ. मूर्ती आहेत. अंतराळाच्या आत गाभारा आहे. त्याच्या दर्शनी खांबावर आमलक, पूर्णघट, प्रणालिका, यक्ष इ. घटक आहेत.

या लेण्यात शिल्पपटांची रेलचेल आहे. उत्तरेकडे शैव आणि दक्षिण भिंतीवर वैष्णव शिल्पे आहेत. उत्तरेकडील पहिल्या खणात अंधकासुरवधमूर्ती असून ती रौद्रभीषण आहे. शिव अष्टभुज असून हातांत तलवार, डमरू, नीलासुराचे कातडे इ. आयुधे आहेत. शेजारी स्तिमित झालेली पार्वती व नरकपाल धरलेली काली असून, शिवाच्या पायाखाली अपस्मार पुरुष आहे. शिवाच्या गळ्यात रुंडमाला असून त्याने अंधकासुराला त्रिशूलाने विद्ध केलेले आहे. योगेश्वरीच्या जवळ घुबड, तर अंधकासुराच्या पायाजवळ राहूचे मस्तक दाखविलेले आहे. दुसऱ्या खणात तांडवनृत्यातील शिवप्रतिमा आहे. तिसऱ्या खणात शिवलिंग असून छतावर वेलबुट्टीच्या अलंकरणाचे अस्पष्ट अवशेष दिसून येतात. चौथ्या खणात शिव-पार्वती पट खेळतानाचे दृश्य आढळते. दुसऱ्या एका खणात `कल्याणसुंदर' मूर्ती असून शिवाचा पार्वतीशी झालेला विवाह शिल्पित केलेला आहे. यापुढील शिल्प `रावणानुग्रह' (रावण कैलास पर्वत हलविण्याचा प्रयत्न करीत आहे व या प्रयत्नात फसल्यावर शिवाने त्याच्यावर अनुग्रह केल्याची कथा) आहे.

पाठीमागील भिंतीवर मार्कंडेयानुग्रह आणि गंगावतरण ही शिल्पे आहेत. मार्केंडेय अल्पायुषी असतानाही त्याने शिवाराधना केली. ठरल्या वेळी यमाने आपले पाश मार्कंडेयाभोवती टाकल्यावर शिवाने आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी यमाला लाथ मारली, तेव्हा तो परत गेला आणि मार्कंडेय चिरंजीव झाला. यमाचे दुसरे नाव `काल' आहे. त्याचा नाश केल्याचे चित्रण केलेल्या या शिल्पास `कालारि' असे नाव दिले गेले आहे. क्रोधयुक्त शिव आवेशाने त्रिशुलाचा आघात यमावर करीत आहे. दुसऱ्या खणात गंगावतरणाचा प्रसंग आहे. शिवाने गंगा आपल्या जटापाशात बद्ध केल्याने या चित्रणास `गंगाधर शिव' असे नाव आहे. तप करणारा सागरही यात कोरलेला आहे; मात्र हा शिल्पपट बराचसा विच्छिन्न झालेला आहे.

अंतराळाच्या डाव्या भिंतीवर गणेश, तर उजव्या बाजूस कार्तिकेय आहेत. गाभाऱ्याच्या उजव्या बाजूस गजलक्ष्मी, तर डाव्या बाजूस सरस्वती आहे. याशिवाय द्वारपालही आहेत. गाभाऱ्यात भग्नावस्थेतील शिवलिंग आहे. अंतराळाच्या खांबावर मिथुने कोरलेली आहेत. मागच्या भिंतीवर लिंगोद्भव शिव आणि त्रिपुरांतक शिव यांच्या मूर्ती आहेत. यातील लिंगोद्भव शिवमूर्तीच्या शिल्पात मधोमध ज्योतिर्मय शिवलिंग दिसत असून, उजव्या बाजूस वराहरूपी विष्णू व डाव्या बाजूस ब्रह्मा त्या लिंगाचा आदि-अंत शोधू पाहत आहेत. लिंगातून शिवमहादेव प्रकट झालेला आहे. त्रिपुरांतक शिव-शिल्पात रथारूढ शिव, रथाला सूर्य-चंद्राची चाके, ब्रह्मा सारखी, शिवधनुष्य म्हणून मेरू पर्वत, धनुष्याची दोरी म्हणून वासुकी नाग, विष्णुरूपी बाण आणि रथ नेणारे चार वेद अश्वरूपाने दाखविले आहेत.

उजव्या बाजूच्या भिंतीत अनुक्रमे गोवर्धनधारी कृष्ण, शेषशायी विष्णू, गजेंद्रमोक्ष करणारा विष्णू, भूवराह, त्रिविक्रम विष्णू आणि हिरण्यकशिपूचा वध करणारा नरसिंह ही शिल्पे आहेत. ही वैष्णव शिल्पे अत्यंत प्रमाणबद्ध, गतिमान आणि विविध भावमुद्रांचे यथार्थ दर्शन घडविणारी आहेत.

गर्भगृहासमोर सुटा नंदी आहे. प्रांगणाच्या उत्तरेतील भिंतीत एक लेणे असून त्याच्या गर्भगृहात शिवलिंग आणि त्याच्यामागे त्रिमूर्तीचे (अघोर, तत्पुरुष, कामदेव) शिल्प आहे.

या लेण्यातील शिल्पपटांची शैली आणि दर्जा दोन्ही अनियमित आहेत. जणू विविध कलापरंपरांमधून आलेले वेगवेगळ्या वकूबांचे शिल्पकार तेथे काम करून गेले असावेत. त्यावरून कैलास लेण्यासारख्या महत्त्वाकांक्षी योजनेला हात घालण्याआधी भारताच्या विविध भागांतून आलेल्या शिल्पीसंघांचे कसब इथे अजमावून त्यातून त्यांची निवड झाली असावी, असा अंदाज बांधता येईल. येथे काम करणाऱ्या आंध्र प्रदेशातील एका शिल्पीसंघाने नंतर पुण्याचे पाताळेश्वर लेणे कोरले असावे, असे समजण्यास वाव आहे.

लेणे १५ चा प्रवेश
1

मध्यभागी असणारे मंडप
2

आणखिन फोटोंसाठी आमचे परम मित्र वल्ली यांचा वेरुळ वरील हा भाग पहावा अशी विनंती
वेरूळ : भाग ६ - नवी सफर (दशावतार लेणे)

लेणे १४: रावण की खाई

हे लेणे `रावण की खाई' या नावाने ओळखले जाते. त्यातील कैलास पर्वत हलविणाऱ्या रावणाच्या शिल्पपटामुळे त्याला हे नाव पडले असावे. क्रमांक २ च्या बौद्ध लेण्याचा आराखडा जवळजवळ असाच आहे. याच्या बाजूच्या भिंतीत अर्धस्तंभामुळे शिल्पपटांना जणू चौकट लाभली आहे. दर्शनी खांबाचे अर्धे भाग साधे चौकोनी असून वरच्या भागात पूर्णघटाचे अलंकरण आहे.

उत्तरेकडील भिंतीत बहुतांशी वैष्णव शिल्पपट आहेत. पहिल्या खणात त्रिशूल घेतलेली दुर्गा आहे; तर त्यानंतरच्या खणात कमलासना गजलक्ष्मी असून तिच्या मस्तकावर चार हत्ती पाणी शिंपडीत आहेत. तिसऱ्यात भूवराहाचा पट आहे. वराहाची भव्यता व आवेश आणि पृथ्वीदेवीची प्रमाणबद्ध मूर्ती यांमुळे हा शिल्पपट देखणा झालेला आहे.

दुर्गा
3

भुवराह आणि पृथ्वी
3

दक्षिणेकडील भिंतीतही शिल्पपट आहेत. प्रथम अंधकासुरवध कथेतील शिव दाखविला आहे. दुसऱ्या शिल्पपटात शिव-पार्वती विहार करीत असलेल्या होंगरावरून रावणाचे पुष्पक विमान पुढे जाण्यास प्रतिबंध निर्माण झाला, त्या प्रसंगाचे शिल्पांकन आहे. रावणाचा आवेश आणि जिद्द, शंकराची शांत मुद्रा आणि पार्वतीची भयग्रस्तता व पतीचा आधार घेण्यासाठी त्याला बिलगण्याची कृती या सर्व मुद्रा शिल्पकाराने अत्यंत वास्तव स्वरूपात दाखविल्या आहेत.

नटराज
3

शिल्पात शिव-पार्वती पट खेळत असल्याचे दाखविले आहे. शिवाचे खेळण्यात लक्ष नसल्याने पार्वती रुसलेली आहे व तिने रुसून मुखकमल फिरविले आहे. शिव तिचा हात धरून आणखी एक खेळ खेळण्यासाठी अनुनय करीत आहे.
पार्वतीच्या मुखावरील रुसवा येथे अप्रतिम टिपला गेला होता परंतु त्य मुर्तीस मुघलांकडुन तोडण्यात आले.
3

अधिक फोटो आणि माहीतीसाठी पुन्हा वल्लीच्या धाग्याची लिंक देतो
वेरूळ

ही लेणी बघुन झाली आणि आमचा फोन वाजला, बाळाचे आवरुन झालेले असल्याने पुन्हा हॉटेल कडे वळावे लागले. तेव्हडे बरे झाले होते की हॉटेल हे वेरुळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिराच्या मध्ये होते, त्यामुळे आधल्या रात्री पण घृष्णेश्वराचे मस्त दर्शन झाले होतेच.

हॉटेल वरती गेलो तर आराध्या वाट पहातच होती, थंडीची लाट पुर्ण महारष्ट्रात आलेली असल्याने आणि पाणी जास्त गरम नसल्याने बाळाला अंघोळ न घालताच न्ह्यावे लागणार होते, आणि आराध्या पण पापा मला कधी न्हेणार तुमच्या बरोबर असा भाव करुन बसली होती.

आराध्या
3

१ ते १३ ही लेणी पुढच्या वेळेसच पाहावीत असे ठरले कारण आज वेरुळ मधला मुक्काम संपवत होतो आम्ही, तसेही उद्या मंगळवार असल्याने आणि वेरुळ लेणी बंद असल्याने आम्हाला मुक्काम वाढवण्यास काही वाव नव्हताच. कमालीची थंड हवेची लहर होती, नंतर असे कळाले की कुठे तरी गारा पडल्याने ही हवा वाहते आहे, आणी अश्या ही वातावरणात येव्हड्या सकाळी उठुन थंड पाण्यानेच आंघोळ करायची काय गरज होती का असा सवाल आलाच.
राग हा अंघोळीचा नसुन यायला उशीर लावल्यालाच आहे हे मला माहीती असल्याने, नाष्ट्याचा आणि त्यात ही गृहमंत्र्यांना चविष्ट वाटणार्या वडापाव .. मिसळ असल्या पदार्थांची नावे घेतली आणि अतिशय कौशल्याने विषय बदलला .. हुश्श.

१-१३ लेणी नंतर , असे ठरल्यावर सरळ गाडीने डायरेक्ट शेवटची लेणी ३०-३४ ही जैन लेणी ( जी हॉटेल मधुन काल दिसत असल्याने तिकडे कधी जाईन असे झाले होतेच) गाठायची असे ठरले.

लेणे ३२: इंद्रसभा
हे लेणे इंद्रसभा नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्या प्रांगणात मधोमध एका उंच चौथऱ्यावर तीर्थंकराचे सर्वतोभद्र प्रतिमागृह आहे. मंदिरावर द्राविड पद्धतीचे शिखर आहे. मंदिरनिर्मितीचे तंत्र कैलासाप्रमाणेच म्हणजे वरून खाली आहे. या लेण्यांच्या कक्षासनांवर कैलासाशी साम्य दर्शविणारी गजमुखे कोरलेली आहेत.

सर्वतोभद्र प्रतिमागृह
3

प्रांगणाच्या तिन्ही बाजूंस दुमजली लेणी कोरलेली आहेत. या लेण्यांच्या कक्षासनांवर कैलासाशी साम्य दर्शविणारी गजमुखे कोरलेली आहेतमुख्य लेण्यात तळमजल्याच्या गर्भगृहात महावीराची मूर्ती आहे. वरच्या मजल्यावर चढताना अर्ध्या वाटेतील प्रतिमागृहात महावीर, पार्श्वनाथ, गोमटेश्वर, सिद्धायिका आणि मातंग यक्ष यांच्या प्रतिमा आहेत;

गजमुखे
3

पार्श्वनाथ:
3

बाहुबली ( गोमटेश्वर)
3

अहो पापा एखादा माझा पण फोटो येवुद्या की
आराध्या मागे महावीर यांची मुर्ती

3

वरच्या मजल्यावरील अग्रमंडपात मातंग आणि सिद्धायिका यांच्या समोरासमोर भव्य प्रतिमा आहेत.

मातंग
3

सिद्धायिका

3

मंडपाचे खांब घटपल्लव आणि इतर शिल्पे यांनी सुशोभित केले आहेत, छतावर कमळ कोरलेले आहे. मंडपाच्या मागील भिंतीत पार्श्वनाथ, महावीर व गोमटेश्वर यांच्या प्रतिमा आहेत. या मंडपाच्या छतावर चित्रकारीचे पुसट अवशेष दिसतात.

छतावरील कमळ आणि पुसटशी झालेली रंगचित्रे
3

3

महावीर

3

पार्श्वनाथ : ( विविधप्रकारे भय दाखवुन ही तपश्चर्या भंग करता न आल्याने शेवटी नर्तकीस बोलवलेले होते त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी.)

3

खांबावरील नक्षिकाम :

3

येथील खांब आणि हिंंदु कैलास उपलेणे येथील खांब यांच्या नक्षीकाम एकदम सेम आहे, त्यामुळे जैन लेणीत ज्या कारागिरांनी काम केले आहे त्याच कारगिरांनी किंवा त्यांच्याच वंशजांनी इतर लेण्यांची ही कामे केली आहेत अशी स्पुष्टी मिळते, फक्त राजाश्रय वेगळाअ. आणि काही पुसटशी भित्तीचित्रे येथे दिसत आहेत त्यांचे साधर्म्य हे अजिंठाशी आहेच, आणि आधी लिहिलेल्या लेखात हे सांगितले आहेच.

काही भित्तीचित्रे

3

3

लेणे ३३ : जग्गनाथ सभा

`जगन्नाथ सभा' ह्या नावाचे हे लेणे दुमजली आहे. तळमजल्यातील लेण्यात मातंग आणि सिद्धायिका यांची उत्कृष्ट शिल्पे आहेत. वरच्या मजल्यावर बारा खांबांचा मंडप असून भिंतीत व गर्भगृहात तीर्थंकर प्रतिमा आहेत. महावीर प्रतिमेलाच जगन्नाथ समजून या लेण्याला त्याचे नाव दिले गेले असावे.

खांबावरील नक्षी
3

पद्मासनामधील तिर्थंकार
3

मातंग
3

सिद्धीका
3

वरच्या मजल्यावरी मंडप आणि नंतर गर्भगॄहातील महावीर मुर्ती

3

3

लेणे ३४
हे शेवटचे जैन लेणे अग्रमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह या योजनेचे असून, येथेही तीर्थंकर आणि गोमटेश्वर ह्यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. काही अपवाद वगळल्यास या लेण्यांतील मूर्ती साचेबंद वाटतात. विशेषतः तीर्थंकरांच्या मूर्तींत विविधता नसून निर्जीवपणा जाणवतो.

लेणे ३०: छोटा कैलास
हे लेणे कैलासप्रमाणेच द्राविड धर्तीचे मंदिर आहे. उजवीकडे समभंगातील तीर्थंकरांच्या तीन मूर्ती आहेत. लेण्यात अग्रमंडप, मुख्य मंडप व गर्भगृह हे वास्तुघटक आहेत. गर्भगृहात महावीर यांची मुख्य मूर्ती असून बाजूला इतर तीर्थंकरांच्या प्रतिमा आहेत. त्यांत पार्श्वनाथ, गोमटेश्वर यांच्या मूर्ती लक्षणीय आहेत. परंतु उत्तरेकडील भिंतीत योगासनातील अष्टभुजा देवीची मूर्ती आहे.

या लेण्याजवळ एक अपूर्ण लेणे आहे. या लेण्यात चतुर्मुख तीर्थंकर, छतावरील कमलपुष्प, पूर्णघट कोरलेले स्तंभ, अग्रमंडपातील कक्षासन आणि जोत्यावरील हत्ती अशी मोजकी शिल्पे आढळतात. कदाचीत तेच लेणे ३१ असावे असे मला वाटते.

छोटा कैलास चा बाह्य भाग
3

भरपुर उन लागत होते, आणि आता पुन्हा आम्ही गाडीने राहिलेली हिंदु लेणी पाहण्यास लेळे २९ ला निघालो.

लेणे २९: सीता की नहाणी (दूमारलेणे)

या हिंदु धर्मिय लेण्यातील शिल्पे भव्य आहेत. अग्रमंडपाच्या अधिष्ठानावर भव्य सिंहशिल्पे आहेत, तर भिंतीवर रावणानुग्रह आणि अंधकासुरवध यांचे शिल्पपट आहेत. सभामंडपाच्या मागील गर्भगृहात शिवलिंग आहे.

प्रवेशद्वार आणि सिंहशिल्पे
3

3

रावणानुग्रह शिल्पपट
3

अंधकासुरवध शिल्पपट
3

गर्भगृहातील शिवलिंग
3

दक्षिणेकडील पार्श्वमंडपात शिव-पार्वती विवाह, अक्षक्रीडेत रमलेले शिव-पार्वती असून उत्तरेकडील पार्श्वमंडपात कमळावर पद्मासनात बसलेला लकुलीश शिव आहे. त्याचा उजवा हात व्याख्यानमुद्रेत असून त्याच्या डाव्या हातात लगुड (लाकडाचा दंड) आहे. जटामुकुट, वनमाला आणि यज्ञोपवीत ल्यालेली ही मूर्ती ऊर्ध्वरेतस अथवा ऊर्ध्वमेढ्र आहे. समोर अपूर्णावस्थेतील नटराज शिवाचे शिल्प आहे.

शिव-पार्वती विवाह
3

अक्षक्रीडेत रमलेले शिव-पार्वती
3

नटराज शिव
3

सिंह
3

खांबामधील मुर्ती
3
या मुर्तीबरोबरच एक यमुनेची मुर्ती आहे सिंहाजवळ त्या मुर्तीलाच सीता समजल्याने या लेण्याचे नाव सीता की नहाणी असे पडले, वास्तविक सीता आणि या लेण्याचा काहीही संबंध नाहीये.

या लेण्याच्या बाजुनेच २८ व्या लेण्यात जाता येते परंतु तो रस्ता बंद केलेला आहे, कारण वेरुळ चा जगप्रसिद्ध धबधबा या मध्ये आहे( पावसाळ्यात एकदा भेट दिली पाहिजे असे वाटत आहे)

दिसणारे २८ वे लेणे आण धबधब्याची जागा
3

भव्यता, अग्रमंडप, सभामंडपादी विकसित वास्तुघटक आणि शिल्पांतील गतिमानता व चेहऱ्यांवरील विविध भाव या दृष्टींनी ही लेणी वैशिष्ट्य पूर्ण आहेत. तसेच या लेण्यांतून शाक्त, शैव व वैष्णव या तिन्ही पंथीयांचे शिल्पांकन दृग्गोचर होते. काही लेण्यांत भित्तिचित्रे आढळतात.

लेणे १७
हे लेणे आखणी, स्तंभ आणि शिल्पपट या दृष्टींनी प्रेक्षणीय आहे. यातील गण, शालभंजिका व त्यांच्या बाजूस असलेल्या सेविका व गंधर्व यांच्या कमनीय मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

3

ब्रम्हदेव

3

महिषासुर मर्दिनी
3

आराध्य गणेश
3

इतर काही शिल्पे
3

3

3

लेणी १८-२० ही लेणी सर्वसामान्य असून, त्यांत उल्लेखनीय अशी वैशिष्ट्ये नाहीत

लेणे २१: रामेश्वर
या लेण्याच्या दर्शनी भागाचे खांब कमनीय शालभंजिकांमुळे प्रेक्षणीय झाले आहेत. बाजूच्या खांबांना जोडून असलेल्या कठड्यावर गजथर असून त्यावर एकूण चौदा मिथुने कोरलेली आहेत. कठड्यास लागून असलेल्या भिंतीवर गंगा आणि दुसऱ्या बाजूस यमुना आहे. सभामंडपाच्या दोन्ही बाजूंस उंच जोत्यावर दोन लहान उपवर्णक असून, त्यांत डाव्या बाजूला शिव-पार्वतीचा विवाहसोहळा दाखविलेला आहे.
पंचाग्निसाधन करणारी उमा, हिमालयाकडे उमामहेश्वरांचा विवाहप्रस्ताव घेऊन गेलेला ब्रह्मा आणि शिव-पार्वती विवाह (कल्याणसुंदर) हे तिन्ही पट अप्रतिम आहेत. विशेषतः विवाहप्रसंगी पार्वतीच्या चेहऱ्यावर दर्शविलेला सलज्ज भाव अत्यंत विलोभनीय आहे. याशिवाय महिषासुरमर्दिनी आणि मोरावर बसलेला कार्तिकेय यांची शिल्पे आहेत. त्याचा अग्नीशी असलेला संबंध अजमुख सेवक सूचित करतात. अंतराळाजवळ रावणानुग्रहाचा शिवमूर्तीपट आहे. दक्षिण दालनात सप्तमातृका, नटराज आणि कंकाल-काली यांची शिल्पे आहेत. सप्तमातृका दालनाजवळ शिव-पार्वती पट खेळत असल्याचे शिल्प आहे.

प्रवेशद्वार
3

गंगेची त्रिभंगातील मूर्ती शरीरसौष्ठव व कलात्मक केशरचना यांमुळे लक्ष वेधून घेते.
3

शिवपार्वती विवाह
3

रावणानुग्रह शिल्पपट
3

पट खेळताना शिव- पार्वती
3

नटराज
3

सप्त मातृकापट
3

आणि
काल-काली
3

पाण्याच्या शोधात आलेला खंड्या

3

लेणे २२ ते २६

२२-२६ लेणी फारशी वैशिष्टपुर्ण नाहित

लेणे २२ : हे लेणे `नीलकंठ' या नावाने ओळखले जाते. तेथील नंदी-मंडपाच्या उजव्या बाजूच्या मंडपात सप्तमातृकांची शिल्पे आहेत. गर्भगृहात शिवलिंग आहे.

सप्त मातृकाचे शिल्प
3

3

लेणे २३ व २४ : ही फारशी वैशिष्ट्यपूर्ण लेणी नाहीत. क्रमांक चोवीसच्या लेण्यात चार शिवमंदिरे असून त्यांत योनिपीठे आहेत. याला `तेली की घाणी' असेही म्हणतात.
3

लेणे २५ : हे लेणे आकाराने विस्तृत असून मंडपात कुबेर, स्तंभावर शालभंजिका, छतावर गजलक्ष्मी व आतील छतावर सूर्य यांची शिल्पे आहेत. ग

लेणे २६ : याची रचना एकविसाव्या लेण्यासारखीच आहे. दर्शनी भागात घटपल्लवयुक्त स्तंभ, दोन अर्धस्तंभ व प्रवेशद्वारात गजमुखे कोरलेली आहेत. याच्या प्रवेशद्वारापाशी द्वारपालांची दोन भव्य शिल्पे आहेत.

लेणे 28 : हे लेणे पावसाळ्यातील जवळच्या धबधब्यामुळे रम्य वाटते. लेण्याच्या दरवाजाच्या बाजूस गंगा, यमुना यांची भग्न शिल्पे असून सभामंडपात योगासनातील अष्टभुजा शाक्त देवी, गर्भगृहाशी संलग्न द्वारपाल आणि गर्भगृहात योनिपट आहेत. देवीच्या हातांत खड्ग, भुजंग, त्रिशूल, नरमुंड इ. आहेत.

लेणे २७: जानवसा
हे लेणे `जानवसा' लेणे अथवा `जानवसा घर' म्हणून ओळखले जाते. याच्या जवळच क्र. २९ चे `सीता की नहाणी' या नावाने संबोधले जाणारे लेणे शिव - पार्वती विवाहाचा शिल्पपट असल्याने या विवाहाच्या संदर्भात या लेण्याला जानवसा असे म्हणत असावेत.

सभामंडपाच्या दरवाजाच्या एका बाजूस बलराम, एकानंशा व कृष्ण आणि दुसऱ्या बाजूस ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे मोठे शिल्पपट आहेत. शिवाय शेषशायी विष्णू, वराह यांच्या मूर्ती आहेत. याच दरवाज्याच्या दोन बाजूंस खिडक्या असून त्यांच्यावर महिषासुरमर्दिनीचे शिल्प आहे. गर्भगृहात फक्त अधिष्ठान आहे, मूर्ती नाही.

बलराम, एकानंशा व कृष्ण
3

ब्रह्मा, विष्णू व महेश
3

वराहअवतार
3

वेरुळ लेणी समाप्त.

क्रमशा: (पुढील भाग - देवगीरी किल्ला)

-------------------------------------------------------------------------------------------------------------------
ही वाट भटकंतीची १२ : हिमाचल http://www.misalpav.com/node/29393
ही वाट भटकंतीची ११ : तुंग:http://misalpav.com/node/22303
ही वाट भटकंतीची ८-९-१०: रोहिडा-लोहगड-बेडसे.
ही वाट भटकंतीची ७: राजगड...स्वराज्याचा शिल्पकार : http://www.misalpav.com/node/20849
ही वाट भटकंतीची ६ - कार्ला लेणी.
ही वाट भटकंतीची ५ - किल्ले पुरंदर : http://www.misalpav.com/node/20592
ही वाट भटकंतीची ४ - केरळ : http://www.misalpav.com/node/20316
ही वाट भटकंतीची ३ - रतनगड: http://www.misalpav.com/node/19239
ही वाट भटकंतीची २ - सांदण दरी: http://www.misalpav.com/node/18728
ही वाट भटकंतीची १ - राजा रायगड: http://www.misalpav.com/node/18323

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

6 Apr 2015 - 8:01 pm | प्रचेतस

मस्तच रे गणेशा.
सध्या ही केवळ पोच. सविस्तर प्रतिसाद नंतर देतो.

बाकी जैन लेणीतील त्या प्रतिमा मातंग यक्ष आणि सिद्धायिका यांच्या नसून सर्वानुभूती यक्ष( कुबेर) आणि यक्षिणी अंबिका यांच्या आहेत. बहुसंख्य स्रोतांमध्ये ह्यांना मातंग आणि सिद्धायिका असेच संबोधले गेले पण त्यांची लक्षणे किंचित भिन्न आहेत.

पॉइंट ब्लँक's picture

6 Apr 2015 - 11:57 pm | पॉइंट ब्लँक

मस्त माहिती आणि चित्रन. धन्यवाद :)

श्रीरंग_जोशी's picture

7 Apr 2015 - 12:32 am | श्रीरंग_जोशी

भटकंतीचे वर्णन अन फोटो दोन्हीही सुरेख.

सर्व फोटोत आराध्याचे फोटो एक नंबर !!

अत्रुप्त आत्मा's picture

7 Apr 2015 - 8:55 am | अत्रुप्त आत्मा

व्वाह!

गणेशा's picture

7 Apr 2015 - 4:30 pm | गणेशा

सर्वांचे आभार !

वल्ली मित्रा आता तु म्हणत आहे तर तसेच असेल आम्ही पामर या बाबतीत काहीच बोलु शकणार नाही [:)]
तरीही खुप जुन्या लिखानात ही मी म्हंटले तसाच उल्लेख आढळला मला.

प्रचेतस's picture

9 Apr 2015 - 3:14 pm | प्रचेतस

हो.
जुन्या लिखाणात मातंग आणि सिद्दायिका असेच उल्लेख आहेत. पण डॉ. जामखेडकर जे अतिशय उच्च कोटीचे पुरातत्ववेत्ते आणि मूर्तीतद्न्य आहेत त्यांनी संपादित केलेल्या महाराष्ट्र गेझेटीयर प्राचीन महाराष्ट्र खंड २ मध्ये ह्या मूर्तींना सर्वानुभुती आणि अंबिका असे ओळखले आहे जे मत ग्राह्य वाटते.

गणेशा's picture

9 Apr 2015 - 3:58 pm | गणेशा

ओके. मान्यच

तरीही असे वाटत आहे आज काल की असे धागे येथे टाकावेत का नको. कारण मागच्या भागाला १० रिप्लाय आणि या धाग्याला ५ पन नाहीत .. वेळ तर खुप द्यावा लागतो.

असो.. पर्सनल गृप नसल्याने ही असे होत असेन.

किती प्रतिसाद आलेत ह्याकडे दुर्लक्ष कर. लेखाची वाचने किती झालीत ते बघ आणि अवश्य लिहित रहा.

श्रीरंग_जोशी's picture

9 Apr 2015 - 10:25 pm | श्रीरंग_जोशी

बाकी कशात नसला तरी येथे अकुंचा आदर्श ठेवावा. एकदा लेख प्रकाशित केला की गंगार्पणमस्तु.

ह ते बरोबर आहे, आता पर्यंत तसेच करत आलो आहे.
पण ह्या धाग्यांना खुप वाचन करावे लागले शिवाय खुप वेळ द्यावा लागला म्हणुन तसे म्हंटले बहुतेक.

असो.. हे लेख कंपणीच्या न्युजलेटर मध्ये पण देत असतो ( इंग्रजीत ट्रान्सलेट करताना मात्र वाट लागते)

सुहास झेले's picture

19 Apr 2015 - 4:37 pm | सुहास झेले

मस्तच ... आणि प्रतिक्रिया हा लेखन चांगले की वाईट ठरवण्याचा निकष नाही रे. पुढचा भाग लवकर येऊ देत :)