चिद्विलास (स्वैर भावानुवाद)

मूकवाचक's picture
मूकवाचक in जे न देखे रवी...
25 Mar 2015 - 8:42 pm

सहजसुंदर प्रेमाचे स्पंदन अनुभवत जागे व्हावे
अन निसर्गाच्या नितांत सुंदर जादूगरीशी समरस होत आरामात पहुडावे ...

चैतन्याच्या या अथांग सागरात मी काय तुम्ही काय
आपण सारेच लाटांसारखे सतत उफाळत असतो

आयुष्याच्या अनंत प्रवाहाच्या किनार्‍यालगत खेळताना
हाती लागलेल्या चार थेंबांचे शिंतोडे एकमेकांवर उडवत

तिथल्या सुंदर चकचकीत वाळूत ज्याने त्याने खुशाल आपापल्या स्वाक्षर्‍या कोरून काढाव्यात
आणि समिंदराची हाक आली की पुढल्या भरतीच्या लाटेत त्या विरूनही जाव्यात, कारण ...

रोज नव्याने त्याच किनार्‍याला अलगद बाहुपाशात घेणार्‍या
दर्याची ही अनावर ओढ असते मुळातच अनादि अनंत!

(मूळ काव्यः http://luthar.com/2015/03/25/rest-in-beauty-by-dr-harsh-k-luthar)

शांतरसमुक्तक

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

25 Mar 2015 - 10:25 pm | बहुगुणी

मूळ रचनाही सुरेख आहे, minimalistic, कमीत कमी शब्दांत खूप आशय असलेली. तुमची निवड चांगली आहे!

श्रीरंग_जोशी's picture

26 Mar 2015 - 8:24 am | श्रीरंग_जोशी

तुमची काव्यरुची अन हा भावनुवाद दोन्हीही आवडले.

अर्धवटराव's picture

26 Mar 2015 - 9:58 am | अर्धवटराव

:)