दगडूचे अभिनंदन!

चंबू गबाळे's picture
चंबू गबाळे in जनातलं, मनातलं
15 Aug 2008 - 11:27 am

पावसाने घेतलेल्या सुट्टीमुळे महाराष्ट्रवासीयांवर जे संकट ओढवले होते, त्यातून आपण आता पुरते सावरलो आहोत. नद्या,धरणे भरुन वाहत आहेत. शेतकर्‍यांनीही आत्महत्यांचे बेत पुढे ढकलले आहेत. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही प्यायला आणि धुवायला(कपडे, गाड्या वगैरे...) पाणी पुरत नव्हते.

नको तेव्हा धो-धो बरसणारा पाऊस कुठे दडी मारुन बसलाय हेच कलत नव्हते.

अशावेळी आमच्या दगडूने( आमच्या नंदीबैलाचे नाव) "पाऊस पडेल काय?" या प्रश्नाला मान हलवून 'हो' असे उत्तर दिले. आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दगडूने कौल दिल्यावर आम्ही निश्चिंत झालो कारण आमच्या दगडूवर आमची फार श्रद्धा आहे.

आता काही लोक यावर आपल्या मताची पिंक टाकणारच.(हे ईश्वरा! त्या अज्ञानी पामरांना क्षमा कर, त्यांना कळत नाही ते काय करत आहेत. आमेन!)
आमच्या दगडूवर आमचा जेवढा विश्वास आहे तेवढाच इथल्या लोकशाहीवर ही आहे.

दगडूला शुभेच्छा व अशीच जनसेवा करण्यासाठी त्याला दिर्घायुष्य लाभो ही प्रार्थना!

Dagadu-My own Nandi
दगडूची विजयी भावमुद्रा

(दगडूभक्त) - चंद्रकांत बूधाजी गबाळे उर्फ चंबू गबाळे

हे ठिकाणशुभेच्छाअभिनंदन

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

15 Aug 2008 - 12:11 pm | प्रमोद देव

ह्या प्रश्नाला होकारार्थी उत्तर देणार्‍या भोलानाथ उर्फ दगडूचे आणि दगडू भक्ताचेही अभिनंदन!
आपणा दोघांना आणि समस्त मिपा परिवाराला ६२ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

बेसनलाडू's picture

15 Aug 2008 - 12:55 pm | बेसनलाडू

वरच्या शुभेच्छांमध्ये '६२व्या' वरचे ते निळे अशोकचक्र बाकी 'मिपा परिवाराला' वर हवे होते ... पांढर्‍या रंगाच्या बरोब्बर मध्यभागी :) .. येथे हिरव्याला चिकटून आल्याने देश हिरव्याच्या अधिक जवळ, भगव्यापासून लांब वगैरे भलत्या शंकाकुशंका काढणार्‍यांच्या हाती कोलीत दिल्यागतच होईल :)
(धर्मनिरपेक्ष)बेसनलाडू

सखाराम बाइंडर's picture

15 Aug 2008 - 12:57 pm | सखाराम बाइंडर

हा छिद्रान्वेषी पणा आवडला बर का....
आम्ही आपले सरळ सोट विचार करणारे

- सर्किट

बेसनलाडू's picture

15 Aug 2008 - 1:03 pm | बेसनलाडू

इथले खरे आणि तोतये सर्किट, चोराचे आणि देवाचे सर्किट, शॉर्ट सर्किट सगळेच नीट ओळखू शकतो!
(छिद्रान्वेषी)बेसनलाडू

खरा सर्किट's picture

15 Aug 2008 - 1:06 pm | खरा सर्किट

अभिनंदन

- सर्किट लाडु

सर्किट ली's picture

15 Aug 2008 - 12:59 pm | सर्किट ली (not verified)

हे तर लक्षातच आले नाही बेला !

झेंडा समीक्षण समितीचाही सदस्य आहेस की काय ?

- सर्किट

(स्वगतः तसेही हल्लीचे सरकार हिरव्यांच्याच अधिक जवळचे आहे, असे भगवे म्हणतात.)

बेसनलाडू's picture

15 Aug 2008 - 1:01 pm | बेसनलाडू

केशवटुकारांनी समीक्षक म्हणून पहिल्या वर्गात बसवल्यावर तीच भूमिका यत्र तत्र सर्वत्र निभावत असतो
(समीक्षक)बेसनलाडू

सर्किट ली's picture

15 Aug 2008 - 1:02 pm | सर्किट ली (not verified)

दगडूला शुभेच्छा व अशीच जनसेवा करण्यासाठी त्याला दिर्घायुष्य लाभो ही प्रार्थना!

माझीही प्रार्थना !

- (आद्य) सर्किट

सखाराम बाइंडर's picture

15 Aug 2008 - 1:03 pm | सखाराम बाइंडर

दगडूला शुभेच्छा व अशीच जनसेवा करण्यासाठी त्याला दिर्घायुष्य लाभो ही प्रार्थना!

माझीही प्रार्थना !

- (सद्य) सर्किट

खरा सर्किट's picture

15 Aug 2008 - 1:05 pm | खरा सर्किट

दगडूला शुभेच्छा व अशीच जनसेवा करण्यासाठी त्याला दिर्घायुष्य लाभो ही प्रार्थना!

माझीही प्रार्थना !

- (खरा) सर्किट

सखाराम बाइंडर's picture

15 Aug 2008 - 1:13 pm | सखाराम बाइंडर

सखाराम गटणे हाच पावसाची परी नावाने वावरत असतो
सहज म्हणुन सांगितले

- सर्किट

खरा सर्किट's picture

15 Aug 2008 - 1:15 pm | खरा सर्किट

आनंद यात्री हाच सर्किट व बाळिशा व मिसळप्रेमी नावाने वावरतो
सहज म्हणुन सांगितले
- खरा सर्किट

सर्किट ली's picture

15 Aug 2008 - 1:16 pm | सर्किट ली (not verified)

ठ्ठो ! करून हसलो !

वा ! विषयांतर हवे, तर हे असले !

- (आद्य) सर्किट

खरा सर्किट's picture

15 Aug 2008 - 1:18 pm | खरा सर्किट

काल भेंडीच्या भाजीत पाणी जास्त झाले म्हणुन भरलेले वांगे खाल्ले

- (खरा) सर्किट

सखाराम बाइंडर's picture

15 Aug 2008 - 1:20 pm | सखाराम बाइंडर

मला वांगे खुप आवडतात पण तात्या म्हणतात वांगे खावुन खुप वारा सरतो
म्हणुन मी खात नाहि
भेंडी मी नुसती खातो

-सर्किट

चंबू गबाळे's picture

15 Aug 2008 - 1:23 pm | चंबू गबाळे

सर्किट हाच सर्किट ली म्हणून वावरतो.
=))

सहज म्हणून सांगितले
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D

खरा सर्किट's picture

15 Aug 2008 - 1:29 pm | खरा सर्किट

सर्किट
सरकीट
सर्कीट
सर्किट ली
यांच्यातिल फरक कळला नाहि तर स्वतःच्या बुद्धिची कींव करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे, शांती करणे जरुरी आहे

(सर्व शांति करणारा) खरा सर्किट

सर्कीट's picture

15 Aug 2008 - 1:30 pm | सर्कीट

कोण रे तु?
आम्हा सर्किट लोकांच्या गप्पांमध्ये मधे मधे लुडबुड करणारा?
"चंबु गबाळे" आवरायचे का रे तुला इथुन?

(सभासद)समस्त सर्किट भाइ लोग.

प्रियाली's picture

16 Aug 2008 - 12:16 am | प्रियाली

अरे केवढे हे सर्किट, वाचून सरकटले.

सर्किट सहस्त्रनामाचा जप करायला हवा सर्वांनी.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Aug 2008 - 12:52 am | बिपिन कार्यकर्ते

मला तर इथेच जास्त सुरस आणि चमत्कारिक वाटायला लागले आहे.... ~X(

सर(क)लेला बिपिन.

धनंजय's picture

16 Aug 2008 - 1:21 am | धनंजय

भोलेनाथांना आमचाही नमस्कार.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Aug 2008 - 9:51 am | प्रकाश घाटपांडे

वा आम्हाला नंदीबैल आठवला.
प्रकाश घाटपांडे

अवलिया's picture

16 Aug 2008 - 9:54 am | अवलिया

वा वा वा

समस्येने ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी जे विविध लोक पुढे येत आहेत ते पाहुन बरे वाटले
असेच गावोगाव भटकत राहुन लोकरजना बरोबर लोकशिक्षण करण्याचे जे व्रत आपण अंगिकारले आहे हे पाहुन बरे वाटले
आपणास शुभेच्छा

नाना

चंबू गबाळे's picture

16 Aug 2008 - 9:58 am | चंबू गबाळे

आभारी आहोत नाना!

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D

अभिज्ञ's picture

16 Aug 2008 - 2:30 pm | अभिज्ञ

दगडुचे हार्दिक अभिनंदन!
ठराव किती मतांनी पास झाला ते तरी लिहा कि!!!
चंबु शेठ,
फोटु जब-या आलाय.

अभिज्ञ.

चंबू गबाळे's picture

16 Aug 2008 - 4:03 pm | चंबू गबाळे

ठराव किती मतांनी पास झाला ते तरी लिहा कि!!!
आता हे काम तर आपला नानाच करु शकतो बॉ! त्यालाच सांगा तुम्ही.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D