फन एंड फ़ेअर

अद्द्या's picture
अद्द्या in जनातलं, मनातलं
2 Mar 2015 - 7:06 pm

हा एक लई भारी प्रकार असतो . गेली कित्येक वर्षे गेलो नवतो . मला वाटतं , ६-७वीत असेन. शेवटचा अशा कोणत्या गोष्टीला गेलो असेन कोणाबरोबर ते. .
गावात दर वर्षी उन्हाळ्यात आधी सर्कस आणि मग फन फ़ेअर , काही ना काही येतच . नोवेंबर डिसेंबर पर्यंत डेरा असतो या लोकांचा गावात .
घरी लहान बहिण या दोन्ही पैकी एकी कडे जाण्याबद्दल मला विचारून विचारून कंटाळून रडून शेवटी माझा नाद सोडून द्यायची . प्रत्येक वेळी तिला म्हणायचो . मोठी झालीस आता . लहान मुलांचे नाद सोड .
पण तरीही त्यादिवशी पोचलो तिथे . काय आहे . बहिणीला नकार देणे सोप्प असतं हो . पण समोर एक अति गोड प्रकारात मोडणारी मुलगी थांबली अहे. तिच्या बरोबर वेळ घालवता यावा म्हणून नाना प्रकार करून तिला गरज नसताना पण आपल्या ऑफिस मध्ये नोकरी मिळवून दिलीये. कैच्याकाय कारण काढत तिच्या घरी जातोय . हळू हळू इम्प्रेस करण्याचे प्रयत्न चालू आहेत . आणि ती सुद्धा होतिए इम्प्रेस हे दिसतंय . . आता जर अशी मुलगी स्वतः हून बोलवत असेल कुठे जायला . नकार द्यायला धारवाड हून थोडी आलोय मी .
असो . तर मुद्दा असा. कि फन फ़ेअर ला आलो . वेगवेगळ्या प्रकारचे खाण्याची दुकानं बघून तोंडाला पाणी सुटलंच होतं . पण तरी स्वतःला आवरत होतो . . उगाच इकडून तिकडून फिरणं चालू होतं . . या दुकानात हे बघ . त्या दुकानात घ्यायचं नसताना सुद्धा एका खेळण्याची किंमत विचार . . कुठे मुद्दाम नळी थोडी वाकवलेल्या बंदुकीने समोर लावलेले फुगे फोडायचा प्रयत्न कर . असे प्रकार चालू होते . आणि हे सगळं संपवून मग सर्वात महत्वाच्या प्रश्नावर दोघेही अडून बसलो होतो. इथे असलेल्या एखाद्या तिथल्या मशीन मध्ये राईड करावं का. आणि करावं तर कुठल्या यावर वाद . या मुलीला आधी , कोणत्याही राईड मध्ये बसल्यावर कोणालाही काही इजा होणार नाही . पहिलीत असताना उलटी झाली होती म्हणून आत्ताही होईल असं नाही इत्यादी गोष्टी समजावण्यात वेळ काढत होतो .
पण हे सगळं असताना . डोक्यात विचार हि चालू होता. . हि बाहुली माझ्या सारख्या वानराला कशी काय भेटली . आणि भेटली तर भेटली . . माझ्या बरोबर कुठेही बाहेर जाण्यासाठी तयार कशी झाली . . तसं बघितलं तर बाबांच्या एका मित्राची मुलगी . पण म्हणून कधी एकमेकाशी बोलण्याची वेळ आली नवती . कधी एखाद्या फंक्शन मध्ये दिसायची. . आणि मग ते पूर्ण फंक्शन मी तिलाच बघत बसायची कारणं शोधत असायचो . कधी मुद्दाम बाबांच्या मित्राशी काही विषय काढून बोल . कधी त्यांना कामात मदत कर . . काहीही . एकाच कॉलेज मध्ये होतो . तरीही कधी बोललो नवतो . . हिम्मतच नाही झाली कधी . तशी अगदीच काही स्वप्न परी नाही . पण सुंदरच . उंचीला थोडी कमी . पण गोल चेहरा , अगदी बोलके डोळे . कॉलेजच्या नोटीस बोर्डवर परीक्षेचे निकाल बघून हे कळलं होतं कि हुशार हि होती . पण कधी वाटलं नवतं कि हि अशी मुलगी . तिला मी आवडेन . . माझ्या सारख्या माणसाला . जो प्रचंड तिरसट आणि मूडी आहे , त्यालाही माणसात आणू शकेल . छोट्या छोट्या गोष्टीवर चिडणारा . आणि रागात समोरच्याला अतिशय थंड आवाजात नको ते बोलणाऱ्या माणसाला . हि मुलगी राग ताब्यात ठेवायला लावेल .
डिसेंबर चा महिना असेल २०१२ चा . बेळगावात एका इन्स्टीट्युट साठी काम करत होतो . त्याच कंपनी च्या एका कामासाठी पुण्यात होतो . तेव्हा फोन आला . समोरून आवाज . "हेल्लो ! आदित्य मराठे का?? " असे फोन यायचेच . कारण कंपनीच्या सगळ्या जाहिरातींमध्ये माझा नंबर होता . समोरच्याला शब्दात गुंडाळू शकतो हे माझ्या बॉस ला समजलं होतं . आणि त्याला हेच हवं होतं . त्यामुळे वेगळी कौन्सेलर अशी पोस्ट आम्ही ठेवलीच नवती . ज्या काही इन्क्वायरी येतील त्या मीच सांभाळत होतो . नवीन नवीन आयडिया काढत होतो. मार्केट मध्ये आपल्या संस्थेची जाहिरात करायला . मी म्हटलं " हो . बोला ." समोरून मुलगी बोलत होती . त्यामुळे आवाजात थोडी नरमाई आणावी लागली होती .
ती म्हणाली . नेट्वर्किंग शिकायचं आहे . किती फी . कोणते कोणते कोर्स घेता . मी ते करू शकते का . इत्यादी इत्यादी हजार प्रश्न . म्हटलं " तुम्ही इन्स्टिटयुट ला या उद्या . तिथे समोरासमोर बोलू . ऑफिस बघता येईल . क्लास चा इन्फ्रा किती चांगला आहे हे हि दाखवता येईल . आणि फोन पेक्षा प्रत्यक्षात बोललं तर आपल्या दोघानाही जास्ती चांगल्या प्रकारे बोलता येईल . "
पण तरीही प्रश्न विचारणे चालूच होते . सो उत्तरं देणं भाग होतं . आणि रोमिंग वर असून सुद्धा तासभर तिच्या प्रश्नांना उत्तरे देत होतो . .शेवटी स्वतःच म्हणाली . मी उद्या ११ वाजता येईन माझ्या बाबांना घेऊन ऑफिस मध्ये . .
दुसऱ्या दिवशी एक साधारण ५ फुट ३ इंचाची मुलगी आली ऑफिस मध्ये . आणि माझ्याकडे बघून म्हणाली . . "आदित्य मराठे का? आपण काल बोललो होतो . एडमिशन करायची आहे "
दिसायला कितीही सुंदर असली . तरी थोडा कंट्रोल होता स्वतःवर . कोर्स बद्दल पूर्ण माहिती दिली . विषय वाढत जावा म्हणून कोर्स नंतर पुढे काय करू शकतो . काय नाही हे सुद्धा बोलायला लागलो . . तिला समजलं मी काय करतोय ते . . एकदम म्हणाली ." फी किती आहे" . आणि हळूच हसली . .बास . तिथेच हरलो मी . .
चेहऱ्यावर काहीच भाव न दाखवता गपगुमान सिनियर कडे पाठवून दिलं . .
दुसरे दिवशी क्लास सुरु झाला . जरी क्लास घेत असलो . तरी वय एकच होतं . त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस एकमेकाला ओळखण्यात गेले . आणि मग एकमेकाची चेष्टा करणे . चिडवणे रागावणे . सगळे प्रकार सुरु झाले . पाच सहा महिने तिचे एका नंतर एक कोर्सेस पुढे जात होते .
एकदा सहज म्हणालो . . पुण्यात मिळते तशी बाकरवडी इथे नाही मिळाली कधी . . आणि वेडीने दुसऱ्या दिवशी खरंच करून आणल्या . तेव्हा लक्षात आलं . हे प्रकरण काही तरी वेगळं आहे . मैत्रीच्या पुढे जाण्याला खूप उतावीळ होत होतो . पण का काय माहिती . भीती वाटत होतो . समजा तिला नाही आवडलं . तर चांगली मैत्री झालीये ती तुटायची . आणखी काही दिवस जाऊदे . थोडा अंदाज घेऊ . मग बोलू .
या दरम्यान . गुलाब जामून . रसगुल्ले . बरेच पदार्थ करून आणलेन तिने. . अगदी त्या रासगुल्ल्या सारखीच गोड वाटत होती ती . प्रत्येक वेळी हाच विचार . आणखी थोडे दिवस जाऊदेत . थोडा अंदाज घेऊ . मग बोलू. . पण मग हे फन फ़ेअर प्रकरण झालं . .
तर . शेवटी आमचं ठरलं . म्हणजे . मी ठरवलं . कि कुठल्या राईड मध्ये बसायचं . एका साधारण २० फुट व्यास असलेल्या गोल लोखंडी सळ्यावर अधांतरी काही छोट्या कार सारखे . ज्यात एका वेळी दोघे जण बसू शकतील असे डबे होते . प्रचंड वेगामुळे . ते डबे काही वेळाने एका बाजूला झुकू लागायचे . . ते सगळं बघूनच ती सुरु झाली. . काहीही झालं तरी बसायचं नाही त्यात . चिडली ओरडली . शेवटी रडकुंडीला आली . पण मी ऐकायला तयार नवतो . तीही तेवढीच हट्टी . शेवटी तिला म्हणालो . . " मी असेन बाजूला . नाही होणार काही" का म्हणालो मलाच नाही माहिती . मला वाटलं आता कानाखाली वाजवेल . पण गोड हसली . चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती . तरीही तयार झाली ते ऐकून . .
शेवटी बसलो त्या डब्यात . आणि ते यंत्र फिरायला सुरु झाले . वेग पकडताच बाहेरच्या बाजूला झुकायला लागले डबे . आणि हिने एकदम माझा खांदा घट्ट पकडला . डोकं खांद्याला लावलं . आणि ओरडायला लागली . " थांबव ते. . भीती वाटतीये . मी पडेन थांबव . . प्लीज थांबव . " मला वाटलं फक्त बोलत असेल . बघितलं तर डोळ्यातून पाणी येत होतं तिच्या . . . . . सहज हात उचलला आणि तिच्या पाठीमागून हळूच जवळ घेतलं . "काही होणार नाही . मी आहे ना बाजूला . अजिबात पडू देणार नाही तुला . शांत राहा" . असं बोलत बोलत . दुसऱ्या हाताने डोक्यावर हात फिरवत होतो . .
रडायची कमी झाली . . पण अजुनी तोंडानी "थांबव थांबव चा जप चालूच होता" . यंत्राचा वेग कमी होऊ लागताच . वाटलं . त्याला मुलाला ओरडाव . "साल्या . अजून वेग वाढव . तासभर फिरव . . एवढी विश्वासाने आपणहून जवळ आलीये हि माझ्या . काहीही होऊ देणार नाही मी हिला" . .
पण थांबवलच शेवटी. यंत्रातून उतरल्यावर हि भीतीने कापत होती . तिला नॉर्मल करायला अर्धा हि एक तास लागला. पण कुठेतरी काही तरी चुकल्या सारखं वाटत होतं . मी किती चेष्टा केली तरी उत्तर देत नवती . इतरवेळेस माझ्या वरचढ उत्तर देणारी . किंवा चिडून मला मारल्यावर आपल्याच हाताला लागलं म्हणून अजूनच चिडणारी हि . . काहीच रीएक्ट होत नवती .
तिथून निघालो . माझ्याच गाडीवर बसली होती . घरी सोडलं तिला . जास्ती काही बोललो नाही . . वाटलं . संपलं . तेव्हा भीतीच्या भरात जवळ आली . आणि मीही जवळ घेतलं . चिडली असेल रागावली असेल . आता बोलणार नाही ती कधीच . याआधीच मनातलं बोललो असतो . तर बरं झालं असतं .
घरी पोचलो . आणि तिला मेसेज करावा कि नको या विचारात असतानाच तिचाच मेसेज आला . . "ऐक. तारीख लक्षात ठेव . २२ ऑक्टोबर." म्हटलं . का गं ??
" का म्हणजे ? ३ वर्षांनी याच तारखेला लग्न करायचं आपण . "
"काय ? तू काय बोलतीएस ? ठीक आहेस ना? दुसऱ्या कोणाचा मेसेज मला पाठवती आहेस का? आणि तारीख काय लक्षात ठिव?

ती म्हणाली । "एक मुलगी तुला स्वतःहून मागणी घालतीये . आणि तुला साधी तारीख पण लक्षात ठेवायला जमणार नाही? लग्न करायचं आपण . . अजून कोणी मला असं संभाळलं नवतं जसं आज तू सांभाळलास . . सेफ वाटलं खूप मला . . "
काहीच सुचलं नाही . "हो" असा मेसेज केला . कानफटात मारून घेतलं मग स्वतःला . हो काय गाढव. बोल आत्ता तरी . मनातलं बोल . .
"मलाही आवड्तीस तू . खूप . . . "
उत्तर आलं . "नशीब . आत्तातरी बोललास . " . .

कथाअनुभव

प्रतिक्रिया

एस's picture

2 Mar 2015 - 7:31 pm | एस

:-)

धडपड्या's picture

2 Mar 2015 - 9:53 pm | धडपड्या

गोड...

श्रीरंग_जोशी's picture

2 Mar 2015 - 10:10 pm | श्रीरंग_जोशी

सुंदर आहे प्रेमकथा.

यसवायजी's picture

2 Mar 2015 - 10:26 pm | यसवायजी

मस्त रे. वांड लिवलैस.
-
बाकी बेळगावला आलो की फन फेअरसाठी आणि तिथल्या मंच्युरियनसाठी मामाकडे हट्ट करायचो त्याची आठवण झाली. त्यावेळेस बहुतेक मिल्ट्री महादेवजवळ असायचे. आता असते काय?

अद्द्या's picture

2 Mar 2015 - 11:30 pm | अद्द्या

हो . जागा बदलले . .सि पी एड ला असतं हल्ली

पुणेकर भामटा's picture

2 Mar 2015 - 11:32 pm | पुणेकर भामटा

२२ ऑक्टोबर २०१६, तारिख लक्शात ठेवेन... लग्नाला नक्कि बोलवा... :)

अद्द्या's picture

3 Mar 2015 - 12:33 am | अद्द्या

कथा आहे साहेब . .
पण तसं काही ठरलंच तर नक्कीच बोलवेन

रुपी's picture

3 Mar 2015 - 2:07 am | रुपी

शेवटचा संवाद प्रत्यक्ष समोरासमोर असता तर जास्त रंगत आली असती.

नगरीनिरंजन's picture

3 Mar 2015 - 4:50 am | नगरीनिरंजन

झकास!

झकास's picture

3 Mar 2015 - 2:32 pm | झकास

नगरीनिरंजन!

;-)

अनुप ढेरे's picture

3 Mar 2015 - 9:22 pm | अनुप ढेरे

हा हा :)

बॅटमॅन's picture

4 Mar 2015 - 3:47 pm | बॅटमॅन

हा हाहा =))

अजया's picture

4 Mar 2015 - 10:03 pm | अजया

=))
कथा मस्तच!

खटपट्या's picture

3 Mar 2015 - 4:54 am | खटपट्या

वा रावसाहेब !!

रोमन हॉलडीच्या पुढेच गेली की कथा रावसाहेब.

नाखु's picture

3 Mar 2015 - 8:42 am | नाखु

एव्हरी थिंग फेअर इन लव्ह आणि इथे तर फेअर विथ फिअर आहे !! *i-m_so_happy*
कथा स्पर्धेला का नाही पाठवली ??

अद्द्या's picture

3 Mar 2015 - 12:35 pm | अद्द्या

स्पर्धा ??

नाखु's picture

3 Mar 2015 - 3:11 pm | नाखु

म्हण्तोय मी !!!

अद्द्या's picture

3 Mar 2015 - 5:57 pm | अद्द्या

लक्षात नाही आलं .
:D

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Mar 2015 - 10:00 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आवडली.
__
ही कथा आहे हे लक्षात यायचं कारण लगेच लक्षात आलं. एवढी समजुतदार, स्वतःहुन पुढाकार घेणारी मुलगी फक्त गोष्टीमधेच असु शकते...
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:

अद्द्या's picture

3 Mar 2015 - 12:31 pm | अद्द्या

नाय हो . असं काहि नस्तं =))

अत्रुप्त आत्मा's picture

3 Mar 2015 - 4:06 pm | अत्रुप्त आत्मा

एवढी समजुतदार, स्वतःहुन पुढाकार घेणारी मुलगी फक्त गोष्टीमधेच असु शकते...

=)) क्यापटना.... =)) मर आता...! =)) येतीलच हो आता थोड्यावेळात! =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Mar 2015 - 6:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्या ह्या ह्या!!! घाबर्तो का काय!!!

टवाळ कार्टा's picture

3 Mar 2015 - 6:11 pm | टवाळ कार्टा

अता तु पण "लाडका" होशील =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Mar 2015 - 9:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

स्वर्गवासी ला समानार्थी शब्द लाडका आहे हे माहिती नव्हते.

प्रचेतस's picture

3 Mar 2015 - 4:42 pm | प्रचेतस

मस्त.
आवडली कथा.

यशोधरा's picture

3 Mar 2015 - 9:40 pm | यशोधरा

मस्त आहे कथा. आवडली.

संदीप डांगे's picture

3 Mar 2015 - 11:50 pm | संदीप डांगे

लेख वर आणन्याची गरज आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Mar 2015 - 8:55 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सगळे लेख एकदम कसे वर आणणार =))

अद्द्या's picture

4 Mar 2015 - 6:51 pm | अद्द्या

=))

एक एकटा एकटाच's picture

4 Mar 2015 - 5:31 pm | एक एकटा एकटाच

मस्तय !!!!!

मीता's picture

18 Dec 2015 - 2:10 pm | मीता

मस्त लिहिलंय :)

एक एकटा एकटाच's picture

18 Dec 2015 - 2:16 pm | एक एकटा एकटाच

मस्तच आहे

विनू's picture

18 Dec 2015 - 2:44 pm | विनू

लै भारी राव.

DEADPOOL's picture

18 Dec 2015 - 2:52 pm | DEADPOOL

एक नं.

पद्मावति's picture

18 Dec 2015 - 3:49 pm | पद्मावति

मस्तं गोष्ट. खूप आवडली.

मस्त.....मला वाटल सत्य घटना आहे कि काय?

कुसुमिता१'s picture

18 Dec 2015 - 11:18 pm | कुसुमिता१

किती मस्त!

प्रसाद गोडबोले's picture

5 Apr 2017 - 11:59 am | प्रसाद गोडबोले

ही कथा सुद्धा लैच भारी आहे राव