निष्पर्ण

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in जे न देखे रवी...
28 Feb 2015 - 7:46 pm

आज माझ्या अंगावरचे शेवटचे पानही गळून गेले,
जिवंतपणाची निशाणी मिटवून माझी मला बोडके करून गेले…

आता वारा त्याला अलगद त्याच्या वाटेवरती घेऊन जाईल,
कुण्या बापुड्या पाखराच्या घरट्याचा ते भाग होईल,
पण मला एकटे करून ते खूप दूर निघून गेले,
आज माझ्या अंगावरचे शेवटचे पानही गळून गेले…

एकटा असलो तरीही मी शोक काही करत नाही,
का करावा शोक जर सांत्वन करायला कोणी नाही,
वाट पहात होतो मरणाची पण तेही पाठ फिरवून गेले,
आज माझ्या अंगावरचे शेवटचे पानही गळून गेले…

एकट्यानेच जर राहायचे असेल तर त्याला जगणेदेखील का म्हणायचे,
साथ देणारे जर कोणीच नसेल तर मग कोणासाठी जगायचे,
मी ज्यांची साथ केली ते मला सोडून दूर गेले,
आज माझ्या अंगावरचे शेवटचे पानही गळून गेले…

कविता

प्रतिक्रिया

चुकलामाकला's picture

28 Feb 2015 - 10:26 pm | चुकलामाकला

सुन्दर!

शब्दबम्बाळ's picture

1 Mar 2015 - 2:02 am | शब्दबम्बाळ

धन्यवाद! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Mar 2015 - 12:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

शब्दबम्बाळ's picture

2 Mar 2015 - 3:31 pm | शब्दबम्बाळ

धन्यवाद! :)

तिमा's picture

1 Mar 2015 - 8:34 pm | तिमा

तुमची कविता वाचून, आमच्या घरासमोरचे दोन निष्पर्ण वृक्ष आठवले.
कविता आवडली. बरेच काही सांगून गेली.

शब्दबम्बाळ's picture

2 Mar 2015 - 3:33 pm | शब्दबम्बाळ

प्रतिसादाबद्दल आभार!

अनुप ढेरे's picture

1 Mar 2015 - 9:12 pm | अनुप ढेरे

एकट्यानेच जर राहायचे असेल तर त्याला जगणेदेखील का म्हणायचे,
साथ देणारे जर कोणीच नसेल तर मग कोणासाठी जगायचे,

माचीवरला बुधा आठवला...

शब्दबम्बाळ's picture

2 Mar 2015 - 3:36 pm | शब्दबम्बाळ

एकटेपणा, निसर्ग आणि अध्यात्म सगळे सामावले आहेत त्यात…

ज्योति अळवणी's picture

9 Mar 2015 - 11:56 am | ज्योति अळवणी

सुंदर कविता