सिन्थॉल साबणाच्या पत्राला निरमाताईचं उत्तर

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
12 Aug 2008 - 9:29 pm

प्रिय सिन्थॉल दादास,
निरमाताईचा,
सप्रेम नमस्कार वि.वि.
तुझं पत्र मिळालं वाचून आनंद झाला.भारतात परत आल्यावर त्याचं नाव बदलल्याचं पाहून "लाईफ बॉयला"
वाईट वाटणं सहाजीक आहे.परंतु त्याने,
"फेअरग्लोला "
मधे घेण्याचे कारण नव्हतं.डॉ.डेटॉलचे आभार मानणं आवश्यक आहे.त्यांच्यामुळे तो बरा झाला.यावरून एक सिद्ध होतं की उगीच कुणाच्या भानगडीत पडू नये.असो.

बाकी तूं लिहीलेल्या सर्व आनंदाच्या बातम्या वाचून बरं वाटलं.
"सर्फ"
मावशीची तब्यत खूपच सुधारली आहे.काळजी नसावी.

मी अलिकडे ऐकत आहे की आपल्या,
"साबण जमातीची"
दुसरी पिढी आंगाखांदयाने खूपच रोडावत चालली आहे. हे काही बऱ्याचं लक्षण नाही.तसंच बुळबुळीतपणा आणि फेस हे गूण पण लोपत चालले आहेत.याबद्दल मी कुणाला दोष देऊं? महागाईला की सरकारच्या "टॅक्स पॉलीसीला?
असो.

"सिंथॉल दादा",
तुला ऐकून नवल वाटेल की आज जो, तो उठ बस अमेरिकेला जात आहे.आणि येताना ते त्यांच्या अमेरिकेतल्या मित्र मंडळीना पण ईकडे घेऊन येत आहेत.परवा सहज,
"सर्फ"
मावशीला भेटायला म्हणून गेलो होतो.तिचा मुलगा
"मोती"
याने येताना त्याच्या मित्र मैत्रीणीना आणलं आहे.माझी त्याने ओळख करून दिली.कोण तर म्हणे,
"डोव्ह",’शिल्ड" "सेफगार्ड"
आणि दादा, तुला मी सांगीतलं तर आश्चर्य वाटेल,अरे, ती
"आयव्हरी"
नावाची मुलगी इतकी नटली थटली होती की माझी जेव्हां सर्फमावशीने तिची ओळख करून दिली
"ही आमची "निरमाताई"
तर ती माझ्याकडे बघायला पण तयार नाही.

आणि त्या
"आयव्हरीने"
काय पर्फ्युम लावलं होतं,अरे, सगळ्या घरात सुवास दरवळला होता.माझी खात्री आहे की ही जर आपल्या
"शिकेकाई" "संतूर" "रेक्सोना"
वगैऱ्याना भेटली तर नक्कीच ती सर्व तिच्या समोर त्यांची स्वत:ची नाकं मुरडल्याशिवाय रहाणार नाहीत.

आणखीन तुला एक मी पाहिली ती गम्मत सांगते अरे,
"लिक्वीड सोप"
म्हणून एक जरा लठ्ठशी बाई सर्फमावशीजवळ बसली होती.ती म्हणे खूपच अमेरिकेत पॉप्युलर झाली आहे. हल्ली तिकडे आपल्या सारख्याना चोळत बसत नाहीत तर हिलाच डोक्यावर,
"स्क्वीझ"
करतात,आणि गम्मत म्हणजे डोळे चमचमत नाहीत डोळ्यातून पाणी पण येत नाही.लहान मुलांत ही
"बेबी म्याजीक बाई"
खूपच पॉप्युलर आहे.तिनेच मला सांगितलं की
"हवाईन जिंजर रूट कंडीशनर"
नावाची तिची दुसरी एक मैत्रीण आहे तिला पण काही इकडची
"टिन एजर"
वापरतात,हे तुला माहित नसेल. ह्या अमेरिकन लोकांवर देवाने
"ओरीजन्यालीटीसाठी "
वरदहस्त ठेवलेला आहे हे मात्र सत्य आहे.
आणखी काय लिहूं? सध्या एव्हडं पुरे.
तुझी
निरमाताई.

श्रीकृष्ण सामंत

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

रेवती's picture

12 Aug 2008 - 10:23 pm | रेवती

सामंतकाका, मजा वाटली वाचून! आपल्या सबणांची नावं वाचून किती वर्षं होउन गेली. आता ड्व्ह, सॉफ्ट्सोप आणि ओले हयांची सवय झालिये. डोळ्यातून पाणी न येता मुलांची अंघोळ होण्याचं श्रेय जॉन्सन आणि जॉन्सन ला जातं.

रेवती

श्रीकृष्ण सामंत's picture

12 Aug 2008 - 11:11 pm | श्रीकृष्ण सामंत

रेवती जी,
मला पण नाव विसरायला झाली होती अलिक्डे माझी मेहूणी इकडे आली होती तिच्याकडून नाव "याद" करून घेतली.
प्रतिक्रिये बद्दल अभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com