नकोच सोने हिरेजवाहिर देऊ तू मजला देवा

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
29 Jan 2015 - 2:08 pm

नकोच सोने हिरे जवाहिर देऊ तू मजला देवा
एक हृदय अन त्यात भावना देई तू मजला देवा ..

निंदा द्वेष न उद्भावा कधीच हृदयामधून माझ्या
माया प्रेम नि वात्सल्याचा असु दे अमापसा ठेवा ..

गरीब थकले गांजुन गेले दया येऊ दे मनामधे
श्रीमंतीचा नको रुबाब नको मनाला त्याचा हेवा ..

गोडधोड नशिबात असू दे कधीतरी सणवाराला
नकोस पाडू मोहात कधी मिळण्यासाठी रे मेवा ..

भान राहु दे स्थळ काळाचे जगु दे स्थितीत आहे त्या
शबरी सुदामा श्रावणबाळ पुनर्जन्म दे मज देवा ..

.

शांतरसकविता

प्रतिक्रिया

छान कविता .. प्राथनेसम आहे कविता

पाषाणभेद's picture

6 Feb 2015 - 9:00 am | पाषाणभेद

सुंदर आशयगर्भ कविता!

विदेश's picture

10 Feb 2015 - 5:19 am | विदेश

गणेशा, पाषाणभेद - प्रतिसादाबद्दल आभार !

पैसा's picture

12 Feb 2015 - 10:21 am | पैसा

"पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी" आठवलं!

माहितगार's picture

12 Feb 2015 - 12:17 pm | माहितगार

कविता आवडली, परंतु बदललेल्या वास्तवीक सामाजिक परिस्थितीशी तुलना करण्यासाठी नकोच सोने हिरेजवाहिर -स्वप्नमयकल्पना आणि बदललेल्या काळातील लाकूडतोड्याची गोष्टीचे वास्तव हा स्वतंत्र धागा काढत आहे.

विदेश's picture

13 Feb 2015 - 3:42 pm | विदेश

पैसा...
धन्यवाद !

माहितगार ...
ही कविता आवडून, तुलना करण्यासाठी इतर आणखी चांगल्या कवितांचा संदर्भात आपण वापरली. छान वाटले. आभार !